BREAKING : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज देशातील सर्व विरोधी पक्षांची संयुक्त बैठक बंगळुरू येथे पार पडली आहे. या बैठकीमध्ये देशातील 26 पक्ष हजर होते. त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीसाठी सर्व विरोधी पक्ष बंगळुरुमध्ये भाजपविरोधात एकवटले आहेत. मुख्य म्हणजे, या 26 विरोधी पक्षांच्या आघाडीला “इंडिया” असे नाव देण्यात आले आहे.
इंडिया म्हणजेच Indian National Democratic Inclusive Alliance असा त्याचा संक्षिप्त अर्थ आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, येत्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला नमविण्यासाठी देशभरातील 26 पक्षांचे बैठक पार पडली. या बैठकीमध्ये निवडणुकी संदर्भात अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. तसेच लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाचा फॉर्मुला देखील ठरवण्यात आला.
विपक्षी गठबंधन का नाम रखा गया INDIA- इंडियन नेशनल डेमोक्रेटिक इंक्लूसिव एलायंस। pic.twitter.com/dMNNyCEu4l
— ANI_HindiNews (@AHindinews) July 18, 2023
यानंतर विरोधी पक्षांनी संयुक्त पत्रकार परिषद आयोजित करून निवडणुकीसाठी आखलेल्या रणनीतीची माहिती दिली. याचवेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आघाडीचे नाव इंडिया असे ठेवण्यात आले असल्याचे जाहीर केले. यानंतर टीएमसी खासदार डेरेक ओब्रायन यांनी देखील “चक दे इंडिया” असे ट्विट करत या नावाचे स्वागत केले.
Chak De! INDIA
— Derek O'Brien | ডেরেক ও'ব্রায়েন (@derekobrienmp) July 18, 2023
दरम्यान आता मोदी सरकारला नमवण्यासाठी 26 पक्ष एकत्र आल्यामुळे आगामी लोकसभा निवडणुक अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. सर्वात प्रथम विरोधी पक्षांची पहिली बैठक पटना येथे आयोजित करण्यात आली होती. तेव्हाच पुढील बैठकी जुलै महिन्यात आयोजित केली जाईल अशी माहिती विरोधी पक्षांकडून देण्यात आली होती.
त्यानुसार, काल सायंकाळपासूनच सर्व पक्षांचे नेते एकत्र आले होते. त्यानंतर आज पार पडलेल्या बैठकीत विरोधी पक्षांच्या आघाडीला इंडिया हे नाव देण्यात आल्याचे निश्चित झाले. या बैठकीमध्ये शिवसेना नेते उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेते राहुल गांधी यांसह इतर सर्व पक्षांचे नेते उपस्थित होते.