फ्रेंच फुटबॉल क्लब रीम्सचे डॉक्टर बर्नार्ड गोंजालेझ यांची कोरोनाची लागण झाल्यानंतर आत्महत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूची लागण झाल्याची पुष्टी झाल्यानंतर फ्रेंच फुटबॉल क्लब रीम्सचे डॉक्टर बर्नाड गोन्जालेझने आत्महत्या केली. रीम्स क्लबने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “बर्नाड गोन्झालेझच्या मृत्यूमुळे रीम्सला मोठा धक्का बसला आहे. केवळ क्लबच नाही तर शेकडो रीम्स फॅन्ससुद्धा यामुळे दुखावले आहेत. “

रीम्सचे नगराध्यक्ष, आर्नार्ड रॉबिनेट म्हणाले की, गेल्या २० वर्षांपासून क्लबमध्ये कार्यरत असलेल्या ६० वर्षीय गोंजालेझच्या आत्महत्येबद्दल मला माहिती आहे.ते म्हणाले, “मला सांगण्यात आले आहे की डॉक्टर गोंजालेझ यांनी एक पत्र लिहीले आहे ज्यात त्याने लिहिले आहे की त्यांना कोविड -१९ चा संसर्ग झाल्याचे आढळले आहे. मी गेल्या अनेक वर्षांपासून त्याला ओळखत असल्यामुळे मला धक्का बसला आहे. “

फ्रान्समध्ये कोरोना विषाणूमुळे ८,०००हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर, जर आपण संपूर्ण जगाबद्दल बोललो तर हा आकडा ११ लाख ३० हजारांच्या पुढे गेला आहे. त्याच वेळी, जगभरातील ६२ हजाराहून अधिक लोक या विषाणूमुळे मरण पावले आहेत.त्याचवेळी या साथीमुळे भारतातही बर्‍याच प्रमाणात नुकसान झाले आहे.आतापर्यंत भारतात तीन हजाराहून अधिक लोकांना याचा संसर्ग झाला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’

हे पण वाचा –

राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ, संख्या पोहोचली ७८१ वर

‘कोरोना’ आणि ‘व्हायरस’ नावाची भानगड नक्की काय आहे ?

करोना फोफावतोय; पिंपरी-चिंचवडमध्ये १९, तर मुंबईत ११ जणांना संसर्ग

कोरोनापासून वाचण्यासाठी घरच्या घरी ‘असा’ बनवा मास्क

शाळा, महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय १४ एप्रिललाच- केंद्र सरकार

 

Leave a Comment