हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंग्लंडचा माजी फुटबॉलपटू नॉर्मन हंटर यांचे वयाच्या २७ व्या वर्षी कोरानामुळे निधन झाले आहे. कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर हंटरला १० एप्रिलला रुग्णालयात दाखल करण्यात आले. १९६६ मध्ये फिफा विश्वचषक जिंकण्यासाठी हंटर इंग्लंडच्या संघाचा भाग होता. मात्र, त्याला मैदानात उतरण्याची संधी मिळाली नाही.
लीड्सची दोन इंग्रजी पदके जिंकण्यात नॉर्मन हंटरने महत्त्वाची भूमिका बजावली. हंटरने ५४० सामन्यांमध्ये लीड्स क्लबचे प्रतिनिधित्व केले ज्यामध्ये त्याने १८ गोल केले. क्लबच्या निवेदनानुसार नॉर्मन हंटर यांना कोविड -१९ चा संसर्ग झाल्यामुळे गेल्या आठवड्यात रुग्णालयात दाखल करण्यात आले होते पण आज सकाळी त्याने अखेरचा श्वास घेतला.
प्रोफेशनल फुटबॉलर्स असोसिएशनने हंटरच्या निधनाबद्दल सांगितले की, “फुटबॉलने एक आख्यायिका गमावली. संपूर्ण फुटबॉल समुदाय दुःखाच्या या कठीणप्रसंगी एक झाला आहे. हंटरला इंग्लंडकडून २८ सामने खेळण्याची संधी मिळाली. हंटरच्या निधनामुळे इंग्लंड फुटबॉलचे एक युग संपुष्टात आले आहे .
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.