गंगाखेड प्रतिनिधी | कधीकाळी शेतकरी कामगार पक्षाचा गड म्हणून ओळखला जाणारा गंगाखेड मतदारसंघ आता लक्ष्मी दर्शनाच्या अस्त्रापुढे भुलून पडला आहे. या मतदारसंघात लोक विकासाला तरसले असले तरी निवडणुकीला पैशासमोर डुलतात. म्हणून येथील राजकारणी त्यांच्या दुर्गुणांचा पुरता फायदा उचलतात. ज्ञानोबा गायकवाड यांना येथील मतदारांनी चारवेळा विधानसभेवर पाठवले खरे मात्र १९९५ साली सीताराम घनदाट यांना येथील जनतेने पसंती दिली. तेव्हा घनदाट अपक्ष उभा राहिले होते.
विधानसभा निवडणूक २०१९ : या मतदारसंघात सहाव्यांदा जिंकण्यास भाजप सज्ज
१९९५ आणि १९९९ सालच्या दोन निवडणुका सीताराम घनदाट यांनी जिंकल्या त्यानंतर त्यांना २००४ च्या निवडणुकीत भाजपच्या डॉ. मधुसुदन केंद्रे यांच्या मदतीने विठ्ठल गायकवाड यांनी घनदाट यांना आडवे केले. त्यानंतर २००९ साली हा मतदारसंघ राखीव मधून खुल्या प्रवर्गात गेला तेव्हा सीताराम घनदाट यांनी खुल्या मतदारसंघात देखील विजय संपादित करून दाखवला.
उरी-द- सर्जिकल स्ट्राईक हा चित्रपट महाराष्ट्रात ‘या’ दिवशी चित्रपटगृहात दाखवणार मोफत
२०१४ ची निवडणूक या मतदारसंघात अत्यंत टोकाच्या लक्ष्मी दर्शनाने गाजली. अभ्युदय बँकेचे अध्यक्ष सीताराम घनदाट अपक्ष, उद्योजक रत्नाकर गुट्टे रासप, डॉ. मधुसूधन केंद्रे राष्ट्रवादी असा तिरंगी सामना या ठिकाणी रंगला. तिन्हीही उमेदवार पैशाने टोलेजंग असल्याने त्यांनी अमाप पैसा या मदतरसंघात ओतला. या पैशाच्या युद्धात राष्ट्रवादीचे डॉ. मधुसूदन केंद्रे विजयी झाले.
चंद्रकांत पाटीलच्या मेळाव्यात महिलांची केली छेडछाड
डॉ. मधुसूदन केंद्रे यांनी या मतदारसंघात कसलाच विकास केला नाही.त्यामुळे लोक त्यांच्यावर नाराज आहेत. तर शेतकऱ्यांच्या नावे उपसलेल्या ३८० कोटी रुपयांच्या कर्ज प्रकरणी रत्नाकर गुट्टे जेलची हवा खात आहेत. डॉ. मधुसूदन केंद्रे लढण्यास सज्ज आहेत. तसेच आजवर अपक्ष उभारणारे सीताराम घनदाट राष्ट्रवादीचे तिकीट मागत आहेत. रत्नाकर गुट्टे जेल मधूनच निवडणूक लढणार आहेत. काही तांत्रित अडचणीमुळे गुट्टे यांना निवडणूक लढता आली नाही तर त्यांच्या कन्या स्वाती गुट्टे या निवडणुकीच्या रणात उतरणार आहेत. तसेच याही वेळी तिरंगीच लढत होण्याची संभावना आहे.
हे पण वाचा –
मराठा आरक्षणाच्या बाजूने लढणाऱ्या विनोद पाटलांना हा पक्ष बनवणार आमदार
लक्ष्मण मानेंनी केली नव्या राजकीय पक्षाची घोषणा ; काँग्रेससोबत आघाडी करण्याचे संकेत
या मतदारसंघातून चंद्रकांत खैरे विधानसभा निवडणूक लढणार !
आणि रोहित पवारांनी त्याच्या हट्टापायी सलूनमध्ये केली कटींग!
म्हणून सनी लिओनी कधीच पाहत नाही आपल्या आई-वडिलांचा फोटो
ना मंत्रीपद, ना राज्यपाल पद , विजयसिंहांना मिळणार ‘या’ विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी?
अजित पवार मोहिते पाटलांच्या पाठीशी ; घेतली मुख्यमंत्र्यांची भेट