Saturday, December 20, 2025
Home Blog Page 2671

धक्कादायक ! एकुलती एक मुलगी घरातून निघून गेली अन्…

गडहिंग्लज : हॅलो महाराष्ट्र – कोल्हापूर जिल्ह्याच्या गडहिंग्लज तालुक्यात एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये एकुलती एक मुलगी घरातून निघून गेल्याच्या कारणातून एका 52 वर्षीय पित्याने आपल्या आयुष्याचा हृदयद्रावक शेवट केला आहे. एकुलती एक मुलगी चार दिवसांपूर्वी घरात कोणालाही न सांगता निघून गेल्याने नैराश्यात गेलेल्या पित्याने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेची माहिती हलकर्णी पोलिसांना देण्यात आली असून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

रामा शट्याप्पा इरगार असे आत्महत्या करणाऱ्या बापाचे नाव आहे. ते गडहिंग्लज तालुक्यातील कवळीकट्टी या ठिकाणचे रहिवाशी आहेत. आपली एकुलती एक मुलगी घरातून निघून गेल्याने रामा शट्याप्पा इरगार यांना नैराश्य आले होते. याच नैराश्यातून त्यांनी आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत रामा इरगार हे कवळीकट्टी या ठिकाणच्या रयत गल्लीत राहत होते.मात्र त्या ठिकाणचे जुनं घर मोडकळीस आल्याने अलीकडेच ते आपली पत्नी आणि मुलीसह नवीन घरात राहायला आले होते.

दरम्यान चार दिवसांपूर्वी मृत रामा शट्याप्पा इरगार त्यांची एकुलती एक मुलगी घरातून अचानक गायब झाली. यानंतर रामा शट्याप्पा इरगार यांनी आणि कुटुंबातील इतर सदस्यांनी मुलीचा सर्वत्र शोध घेतला. पण तिचा कुठेच पत्ता लागला नाही. चार दिवसानंतरही मुलगी घरी परतली नसल्याने मृत रामा शट्याप्पा इरगार यांना नैराश्य आलं होतं. यातूनच रामा शट्याप्पा इरगार यांनी रयत गल्लीतील आपल्या जुन्या घरात तुळईला गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून घटनेचा पुढील तपास सुरु केला आहे.

शिकवणीसाठी आलेल्या 2 अल्पवयीन मुलीसोबत शिक्षकाने केले ‘हे’ दुष्कृत्य

ratnagiri rape

जळगाव : हॅलो महाराष्ट्र – जळगाव जिल्ह्यातील भुसावळमध्ये शिक्षकाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये एका सेवानिवृत्त शिक्षकाने आपल्या दोन अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले आहेत. या नराधम आरोपी शिक्षकाविरोधात पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि धक्कादायक घटना जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरामध्ये घडली आहे.

आरोपी सेवानिवृत्त शिक्षक हा खासगी शिकवणी वर्ग घेत होता. पीडित अल्पवयीन मुली या नियमितपणे त्याच्याकडे शिकवणीसाठी येत होत्या. यादरम्यान या आरोपी नराधम शिक्षकाने दोन्ही अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले. तसेच याबाबत घरी न सांगण्याची धमकीसुद्धा या पीडित मुलींना दिली. मात्र पीडित मुली जेव्हा घरी गेल्या तेव्हा एका अल्पवयीन मुलीने आपल्या पालकांना हा सगळा प्रकार सांगितला.

पीडित मुलीने आपल्याबाबत घडलेला सर्व प्रकार घरी सांगितल्याने तिच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला. यानंतर पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी तातडीने बाजारपेठ पोलीस स्टेशनकडे धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. पोलिसांनीसुद्धा या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने पाऊल उचलले आणि नराधम शिक्षकाला अटक केली. यानंतर पोलिसांनी नराधम शिक्षकाविरोधात पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

भर अधिवेशनात गिरीश महाजनांची लागली डुलकी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्वाचे असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास दि. ३ मार्चपासून सुरुवात झाली आहे. या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अनेक मुद्यांवरून खंडाजगी होत आहार. दरम्यान अधिवेशात मंगळवारी चक्क भाजपच्या एका आमदाराची डुलकी लागल्याचे दिसून आले.

गेल्या काही दिवसापासून सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप नेत्यांकडून महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला जात आहे. मंगळवारी अधिवेशनाच्या काळात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सभागृहाला संभोधित करत होते. त्यावेळी त्यांच्या पाठीमागे भाजप आमदार आशिष शेलार व गिरीश महाजन बसलेले होते. यावेळी पुढे देवेंद्र फडणवीस बोलत असताना पाठीमागे बसलेल्या आमदार महाजन यांना आदिवेशन कामकाज सुरु आहे हेही कळाले नाही. त्यांची अधूनमधून डुलकी लागत होती.

गिरीश महाजन हे वारंवार झोपत असल्याने त्याची हि गोधत लक्षात येताच त्याच्या शेजारी बसलेले आमदार आशिष शेलार यांच्याकडून त्यांना झोपेतून उठवण्याचा प्रयत्नही केला गेला. या प्रकारामुळे उपस्थितांच्यात चर्चा रंगली होती.

पाटण तालुक्यात 41 गावातील 42 किलोमीटर शेत/ पाणंद रस्ते मंजूर : शंभूराज देसाई

 कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

पाटण तालुक्यातील डोंगरी व दुर्गम भागामधील अनेक गांवामध्ये शेत पाणंद रस्ते अरुंद व ना दुरुस्त असल्याने या रस्त्यावरुन शेतीशी निगडीत विविध बाबींसाठी कमी प्रमाणात या रस्त्यावरुन वहिवाट होत होती. शेत पाणंद रस्त्यांची कामे मार्गी लागणे गरजेचे असल्याने राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दुसऱ्या टप्प्यात पुनश्च: मतदारसंघातील 41 गावात सुमारे 42 कि. मी. लांबीच्या शेत/ पाणंद रस्त्यांची कामे ही मातोश्री ग्रामसमृध्दी शेत/ पाणंद रस्ते योजनेतून मंजूर होण्यासाठी रोजगार हमी मंत्री संदिपान भुमरे यांचेकडे शिफारस केली होती. त्यास मंजूरी देण्यात आली आहे.

पाटण मतदारसंघातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतीचे मशागतीचे साहित्य, शेत मालाची वाहतूकीसाठी शेत पाणंद रस्त्यांची सुविधा नसल्याने स्थानिक शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. याकरीता शासनाच्या  मातोश्री ग्रामसमृध्दी शेत/ पाणंद रस्ते योजने अंतर्गत सन 2022-23 या आर्थिक वर्षासाठी शेत/ पाणंद रस्त्यांच्या आराखडा तयार करण्यासंदर्भात गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना सुचना करीत या रस्त्यांच्या कामांच्या शिफारशी राज्याचे रोजगार हमी मंत्री संदिपान भुमरे यांचेकडे केलेल्या शिफारशीनुसार दुसऱ्या टप्प्यात या 41 गावांतील शेत/ पाणंद रस्त्यांच्या कामांचा समावेश करुन या कामांना मंजूरी दिली आहे.

शेत/ पाणंद रस्त्यांच्या कामांमध्ये प्रत्येक गांवाना एक किलोमीटरप्रमाणे पाणंद रस्त्यांची कामे देण्यात आली आहेत, त्यांची नावे पुढीलप्रमाणे

आबदारवाडी ऊरुल घाट आबदारवाडी ते मल्हारपेठ पाणंद रस्ता, गव्हाणवाडी खरेदी ते सुळेवाडी रस्ता, सोनवडे स्मशानभूमी ते शिव रस्ता, आडूळपेठ कराड चिपळूण रोड ते मळा रस्ता, बेलवडे खुर्द मळीचा माळ ते धावर पूल रस्ता, दिवशी बु.वाडी घाटदरा ते पडशिवार पाणंद रस्ता, टेळेवाडी पडेवाडी शिवार ते काळवट सनद रस्ता, जानुगडेवाडी मंद्रुळकोळे खुर्द ते मदनेवस्ती रस्ता, पवारवाडी कुठरे पवारवाडी ते सर्व्हे नं. मळा रस्ता, काढणे बौध्दवस्ती काढणे ते शिव रस्ता, मंद्रुळहवेली म्हारवडा मुलाणकी ते पानस्करवाडी रस्ता, नवसरी चावर रस्ता, येराडवाडी ठाणमपट्टी रस्ता, जमदाडवाडी शिरचा रस्ता, मुरुड मुरुड ते तोंडोशी पूल रस्ता, डेरवण डेरवण फाटा ते आंब्रुळकी रस्ता, मुळगाव डोंगरुबा मंदिर ते नदीकाठ रस्ता, त्रिपुडी नायकवडा ते आंबाटेक रस्ता, सांगवड म्हसोबा ते गडकर रस्ता, हावळेवाडी हावळेवाडी ते जखिण रस्ता, येराड येराड ते काळू माळ रस्ता खडीकरण, येराड रामाचावाडा ते जोतिबाचीवाडी रस्ता, वेताळवाडी  ते इरिगेशन रस्ता, बनपेठवाडी पाटण कराड चिपळूण रोड ते कुकुरटेक रस्ता, बनपेठवाडी कराड चिपळूण रोड ते जानाईचावाडा रस्ता, चोपदारवाडी सरकारी दवाखाना ते बिगा रस्ता, मल्हारपेठ ते दिंडूकलेवाडी व मल्हारपेठ ते नारळवाडी रस्ता, कडवे बुद्रुक बेंदवाडी ते माळवाडी कडवे बुद्रुक रस्ता, नविवाडी (जिंती) नविवाडी जिंती  ते कारळे फाटा रस्ता, बनपूरी पेठबनपूरी ते बाचोली रस्ता, कसणी निनाईवाडी जि.प शाळा ते पाणवटा रस्ता, साबळेवाडी मालदन साबळेवाडी सळवे रस्ता, शेडगेवाडी विहे रस्ता खडीकरण, मालोशी मालोशी येथे रस्ता, मत्रेवाडी निवास मत्रे यांचे घर ते भवानी देवस्थान रस्ता, मारुलहवेली धंद शिवार बेंद ते कारखाना रस्ता रस्ता, गव्हाणवाडी पायरन ते गतकुळी रस्ता, मुरुड मुरुड ते मळवी रस्ता, बहुले बहुलेश्वर देऊळ ते बेंद रस्ता, मालदन  ते साबळेवाडी रस्ता, येराड ते तामकडे रस्ता या कामांचा समावेश आहे.

जिच्यावर जिवापाड प्रेम केलं तिलाच दिला भयंकर मृत्यू

pimpari crime

पिंपरी : हॅलो महाराष्ट्र – पिंपरीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये आरोपीने आपल्या प्रेयसीची निर्घृणपणे हत्या केली आहे. हा आरोपी तरुण मागच्या काही महिन्यांपासून मृत तरुणीसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. या दोघांमध्ये एका क्षुल्लक कारणावरून भांडण झाले त्यानंतर आरोपीने आपल्या प्रेयसीची गळा आवळून हत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हि घटना उघडकीस येताच पोलिसांनी काही तासातच संशियत आरोपीला अटक केली आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?
रितू भालेराव असे मृत पावलेल्या तरुणीचे नाव आहे. मृत रितू ही मूळची औरंगाबाद जिल्ह्यातील रहिवासी असून ती काही दिवसांपूर्वी पुण्यात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी आली होती. तर आरोपीचे नाव श्याम ढेरे असे आहे. तोदेखील पुण्यात राहून स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. हे दोघेही मागच्या पाच ते सहा महिन्यांपासून पिंपरी चिंचवडमधील निगडी परिसरात ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहत होते. या ठिकाणी हे दोघे नवरा बायकोसारखे राहायचे. मात्र आरोपी श्याम हा आधीपासूनच विवाहित होता.

याची माहिती मृत रितूला समजताच त्यांच्यात खटके उडू लागले. यानंतर रितू श्यामकडे सतत पैशांची मागणी करू लागली. त्यानंतर हा वाद एवढा विकोपाला गेला कि आरोपीने रितूचा गळा आवळून तिची हत्या केली. यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपी श्यामला काही तासातच अटक केली.

“बाधवानशी काडीमात्र संबंध नाही, संजय राऊतांकडून आरोपांची नौटंकी केली जातेय”; किरीट सोमय्यांचे प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेना भवन येथे दुसरी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी भाजप, ईडी, आयकर विभाग व किरीट सोमय्या यांच्यावर आरोप केला. राऊतांच्या आरोपानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “संजय राऊतांकडून माझ्यावर जे आरोप केले आहरेत. ते त्यांनी गेल्या महिन्यातही केले आहेत. वास्तविक राकेश बाधवानशी माझा संबंध नाही. उपलट मी कोव्हीड घोटाळा बाहेर काढला म्हणून माझ्यावर आरोप करीत राऊतांकडून नौटंकी केली जात आहे,” असे प्रत्युत्तर सोमय्या यांनी दिले.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “संजय राऊत यांनी जे आरोप केले आहेत कि माझा वाधनवानशी संबंध आहे. मात्र, वास्तविक पाहता माझा वाधनवानशी काडीमात्र संबंध नाही. जितेंद्र नवलानी यांनाही मी ओळखत नाही. तरीही मी महाराष्ट्रातील भ्रष्टाचार बाहेर काढत असेल आणि त्यासाठी मी आदींचा वसुली एजंट आहे, असा माझ्यावर कोणी आरोप करत असेल तर मला काहीही फरक पडत नाही, असे सोमय्या यांनी म्हंटले.

काय केले आहेत संजय राऊतांनी आरोप?

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज शिवसेना भवन येथे दुसरी पत्रकार परिषद घेत ईडी आणि किरीट सोमय्यांवर आरोप केले. आज आयकर विभागाची कारवाई करण्यात आली. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी काही दिवसापूर्वी भ्रष्टाचाराचे पुरावे दिले होते. सध्या आयटीची भानामती सुरु आहे. आजही ईडीच्या अधिकाऱ्यांकडून अधिकारी बिल्डर्स, कॉर्पोरेटर्सना धमकावण्याचे काम केले जात आहे. ज्या ज्या कंपनीची ईडीने चौकशी केली त्या कंपन्यांनी जितेंद्र नवलानी यांच्या खात्यावर पैसे पाठवले आहेत. अविनाश भोसलेंची चौकशी झाली मग भोसलेंकडून 10 कोटी ट्रान्सफर केले नवलानीला नवलानीच्या सात कंपनीन कोट्यवधी रुपये ट्रान्सफर केले गेले, असे आरोप राऊत यांनी केले आहेत.

अविनाश भोसले यांच्याकडून ईडी अधिकाऱ्याला कोट्यवधी रुपये ट्रान्सफर; संजय राऊतांचा गौप्यस्फोट

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | प्रसिद्ध बिल्डर अविनाश भोसले यांच्याकडून ईडी अधिकाऱ्याला कोट्यवधी रुपये ट्रान्सफर झाले आहेत असा गंभीर आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. जितेंद्र नवलानी असे त्या वरिष्ठ ईडी अधिकाऱ्याचे नाव असून त्यांच्या 7 कंपन्या असून खंडणी वसूल केली गेली आहे. खंडणी वसूल केलेले पैसे हे नवलानीच्या कंपन्यांमध्ये टाकण्यात आले आहे. पुण्यातील बिल्डर अविनाश भोसलेंनीही १० कोटी रुपये दिले आहेत, असेही राऊत यांनी सांगितले. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेत भाजप आणि केंद्रीय तपास यंत्रणांवर निशाणा साधला.

ईडीकडून 100 हून जास्त व्यावसायिकांना धमकावलं जातं आणि त्यांच्याकडून खंडणी वसुल केली जाते. जितेंद्र नवलानी हा व्यक्ती ईडीचे हे रॅकेट चालवतो. नवलानी हा कन्सल्टन्सी कंपनी चालवतो पण त्याच्या कार्यालयात कोणताही कर्मचारी नाही, मग तो कोणती कंपनी चालवतो. केंद्रीय एजन्सीजना हाताशी धरून महाराष्ट्राचं महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा भाजपचा डाव आहे, असा थेट आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला.

भाजपचे नेते भ्रष्टाचार करत आहेत. बोगस कंपन्या दाखवून गैरव्यवहार करत आहेत आणि यासंदर्भात आपल्याकडे पुरावे आहेत, असं राऊत म्हणाले. ‘ED आणि Income Tax विभागाला मी 50 नावं दिली आहेत. पण त्यांनी अद्याप काही केलेलं नाही. असे राऊत यांनी म्हंटल.

ईडीच्या सर्वात जास्त कारवाया या महाराष्ट्रात होत आहेत. महाविकास आघाडीच्या १४ प्रमुख नेत्यांवर ईडीने कारवाई केली आहे. भाजपा नेत्यांवर कोणत्याही तपास यंत्रणांची कारवाई झालेली नाही. ते लोक मुंबईच्या रस्त्यांवर वाटी घेऊन भीक मागत आहेत का? इनकम आणि टॅक्स फक्त आमच्याचकडे आहे का? या सर्व कारवाया कोण नियंत्रीत करत आहे याबाबत शिवसेना लवकरच मोठा खुलासा करणार आहे,” असे संजय राऊत म्हणाले.

युवक काॅंग्रेस निवडणूक : सातारा जिल्ह्यात कराडचे अमित जाधव सर्वाधिक 16 हजार 895 मतांनी विजयी

सातारा | सातारा जिल्हा युवक काँग्रेस व विधानसभा कार्यकारिणीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यात अध्यक्षपदी खटावचे अमरजित कांबळे हे 6 हजार 234 मते मिळवून तर कार्याध्यक्षपदी कराडचे अमित जाधव हे 16 हजार 895 मते मिळवून विजयी झाले. अध्यक्षपद अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी राखीव होते. त्यामुळे अमरजित कांबळे याची अध्यक्षपदी तर अमित जाधव यांची जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड झाली. सदरच्या निवडणुका ह्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली व युवक कॉग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या.

राष्ट्रीय काँग्रेसचे नेते खा. राहुल गांधी यांच्या संकल्पनेतून सन 2010 पासून विद्यार्थी काँग्रेस (एन.एस.यु.आय) व युवक काँग्रेस मध्ये सर्वसामान्य लोकांना पदे मिळावीत व नवीन नेतृत्व घडवण्याची संधी मिळावी या दृष्टिकोनातून दर 3 वर्षांनी संघटनात्मक निवडणुका घेतल्या जातात. या निवडणुकीत जिल्हा कार्यकारिणीसाठी एकूण 24 उमेदवार उभे होते. मिळालेल्या मतांनुसार प्राधान्यक्रमाने इतर उमेदवार हे उपाध्यक्ष, सरचिटणीस,चिटणीस म्हणून विजयी झाले आहेत. सदर जिल्हा कार्यकारिणीत महिला, इतर मागास प्रवर्ग, अनुसूचित जाती, अल्पसंख्याक ई. प्रवर्गांना आरक्षण दिले गेले होते.

जिल्हा कार्यकारिणीसाठी संपूर्ण जिल्ह्यातील 18 ते 35 या वयोगटातील एकूण 62 हजार 345 युवकांनी मतदान केले होते. त्यापैकी 50 हजार 634 मते वैध ठरली. इतर मतदारांची मते आधारकार्ड, फोटो यामध्ये त्रुटी असल्याने अवैध ठरली. जिल्हा कार्यकारिणीसोबतच विधानसभा मतदारसंघनिहाय निवडी जाहीर झाल्या आहेत.

जिल्हा कार्यकारिणी अशी असेल – अध्यक्ष -अमरजित कांबळे , कार्याध्यक्ष – अमित जाधव,
महिला उपाध्यक्षा – सौ.निलम येडगे, उपाध्यक्ष – विहार पावस्कर, सागर सावंत, समीर पटवेकर, सरचिटणीसपदी – प्रशांत पवार ,गंगाराम रणदिवे, प्राची ताकतोडे, प्रमोद माने, अभिजित चव्हाण, देवदास माने, रोहित पाटील, प्रेरणा काशीद, अमोल नलवडे, सुरज कीर्तिकर , सचिवपदी- अजित पवार, राहुल फडतरे, सचिन घाडगे, दिग्विजय वाघमारे, राहुल रासकर, सचिन गोरड, महेश देसाई, जयेश चव्हाण आदी विजयी झाले आहेत.

विधानसभा निहाय निवडी खालीलप्रमाणे –

कराड दक्षिण – दिग्विजय पाटील (अध्यक्ष), राम मोहिते (उपाध्यक्ष)
कराड उत्तर – सुरज पवार ( अध्यक्ष ) , प्रवीण वेताळ ( कार्याध्यक्ष)
पाटण – नरेंद्र पाटणकर (अध्यक्ष), प्रथमेश पाटील (उपाध्यक्ष)
सातारा – विक्रांतसिंह चव्हाण ( अध्यक्ष ), अमोल शिंदे व सुयोग गोरे (उपाध्यक्ष)
कोरेगाव – दत्तात्रय भोसले (अध्यक्ष), सागर साळुंखे (उपाध्यक्ष)
माण-खटाव – ॲड.संदीप सजगणे (अध्यक्ष), पंकज पोळ (उपाध्यक्ष)
वाई – सचिन काटे (अध्यक्ष), ऋषिकेष धायगुडे-पाटील (उपाध्यक्ष)
फलटण – अजिंक्य कदम ( अध्यक्ष ).

आ. पृथ्वीराज चव्हाण, जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव,युवकचे प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे, प्रदेश सरचिटणीस रणजितसिंह देशमुख, मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, मावळते जिल्हाध्यक्ष विराज शिंदे, जि. प. सदस्य ॲड. उदयसिंह पाटील, निवासराव थोरात, हिंदुराव पाटील, महेंद्र बेडके, राजेंद्र शेलार, नरेश देसाई, दयानंद भोसले, महिला अध्यक्षा सौ.अल्पना यादव आदींनी अभिनंदन केले.

राष्ट्रवादीच्या ‘या’ नागरसेविकेवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल, राष्ट्रवादीच्याच महिला जिल्हाध्यक्षांनी केली तक्रार

sangeeta abhijeet harge

सांगली : हॅलो महाराष्ट्र – सांगली जिल्ह्यातील मिरजमधील राष्ट्रवादीच्या नगरसेविका संगीता अभिजित हारगे यांच्या विरोधात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या सामाजिक न्याय विभागाच्या सांगली जिल्हाध्यक्षा संध्या आवळे यांच्या तक्रारीनुसार राष्ट्रवादीच्याच नगरसेविकेवर हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आर्थिक देवाणघेवाणीतून संध्या आवळे यांना शारीरिक, मानसिक, आर्थिक त्रास देण्यात आला तसेच जातिवाचक शिवीगाळ करुन अपमानास्पद वागणूक देण्यात आल्याचा दावा संध्या आवळे यांनी केला आहे. याबाबत मिरज शहर पोलीस ठाण्यात नगरसेविका संगीता अभिजित हारगे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादीच्या नगरसेविका संगीता हारगे या सांगली महापालिकेच्या माजी स्थायी सभापती असून, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष अभिजित हारगे यांच्या पत्नी आहेत.

काय आहे प्रकरण?
मिरज येथील राष्ट्रवादीच्या सामाजिक न्याय विभागाच्या सांगली जिल्हाध्यक्षा संध्या आवळे यांनी पतीच्या आजारपणामुळे आणि लॉकडाऊनमध्ये पैशाची गरज असल्याने नगरसेविका संगीता हारगे यांच्याकडून 2021 मध्ये 55 हजार रुपये उधार घेतले होते. त्या बदल्यात नगरसेविका संगीता हारगे यांनी त्यावर पाच टक्के व्याजाची आकारणी केली. त्यापैकी 39 हजार रुपये रक्कम परत केली असता थोड्या प्रमाणात मुद्दलसुद्धा जमा केली असल्याचे संध्या आवळे यांनी आपल्या तक्रारीत म्हंटले आहे.

यावेळी नगरसेविका संगीता हारगे यांनी वारंवार अजून 52 रुपये द्यायला लागतील असे सांगून धमकावले. यानंतर शारीरिक, मानसिक आणि आर्थिक त्रास देत असल्याची तक्रार संध्या आवळे यांनी मिरज शहर पोलीस ठाण्यात केली. तसेच थकित रक्कम फेडण्यासाठी जातीवाचक भाषा वापरून अवमानित करत असल्याचेसुद्धा संध्या आवळे यांनी आपल्या तक्रारीत म्हंटले आहे. या प्रकरणामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.

आम्ही ईडीला 50 नावे दिली, त्याची चौकशी का नाही केली ?? संजय राऊतांचा सवाल

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेत भाजप आणि केंद्रीय तपास यंत्रणांवर निशाणा साधला. ईडी असो वा इन्कम टॅक्स, शिवसेना त्रास देण्यासाठी हा सगळं प्रयत्न सुरु असून आम्हीही ईडीला ५० नावे दिली त्यांची चौकशी का केली नाही असा सवाल संजय राऊत यांनी केला.

आता इन्कम टॅक्स नावाची भानामती आली आहे. मुंबई महापालिका निवडणूक होईपर्यंत या धाडी सुरूच असतील असा टोला संजय राऊत यांनी लगावला. ईडीचे अधिकारी हे भाजपचे एटीएम मशीन आहेत. तेच भाजप नेते किरीट सोमय्या हे ईडीचे पाचवे एजंट आहेत असा आरोप त्यांनी केला.

ईडीचे अधिकारी मोठमोठ्या बिल्डर्सना धमकवतात. ज्या कंपन्यांवर ईडीने धाड टाकली त्या कंपन्यांनी ईडीचे वरिष्ठ अधिकारी जितेंद्र नवलानी यांना पैसे पाठवले. आपण ईडीच्या ४ अधिकाऱ्यांची तक्रार पोलिसांना केली असून अनेक अधिकारी जेल मध्ये असा इशारा संजय राऊत यांनी केला