Friday, December 19, 2025
Home Blog Page 2672

…. ‘या’ लोकांची मुलं दिव्यांग जन्माला येतील; इंदुरीकर महाराजांचं वादग्रस्त वक्तव्य

Indurikar Maharaj

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | माझ्या भाषणाचे व्हिडिओ अपलोड करून पैसे कमावणाऱ्यांची मुले दिव्यांग जन्माला येतील,’ असं वादग्रस्त वक्तव्य सुप्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी केलं आहे. अकोला येथील एका कार्यक्रमात त्यांनी हे विधान केले. दरम्यान, त्यांच्या या विधानांने नवा वाद होण्याची शक्यता आहे.

इंदुरीकर महाराज म्हणाले, माझ्या कीर्तनाचे व्हिडीओ यूट्यूबवर अपलोड करून आतापर्यंत चार हजार लोकांनी कोट्यवधी रुपये कमावले आहेत. त्यांना पैसे मोजायलाही वेळ नाही. मात्र त्यांच्यामुळेच मी सतत अडचणीत आलो आहे. माझ्या कीर्तनाच्या व्हिडीओ क्लिप्स यूट्यूबवर टाकणाऱ्यांची मुलं दिव्यांग जन्माला येतील,’ असं इंदुरीकर यांनी म्हटलं आहे. विशेष म्हणजे यावेळी उपस्थितांनी त्यांना टाळ्या वाजवून साथही दिली.

दरम्यान, इंदुरीकर महाराज यांनी यापूर्वीही अनेकदा काही वादग्रस्त वक्तव्य केली होती. एका किर्तनामध्ये त्यांनी सम तिथीला स्त्री संग केला तर मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते. असं म्हटलं होतं. त्यानंतर त्यांचं हे वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात सापडलं होतं. या प्रकरणात त्यांना नोटीसही पाठवण्यात आली होती.

“उद्धव ठाकरेंना मलिकांचा राजीनामा घ्यायचा असेल पण त्यांच्यावर दाऊदचा दबाव”

Nawab Malik Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयकर विभागाच्यावतीने आज सकाळी मुंबईत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय असलेल्या राहुल कनाल यांच्या घरी छापा टाकण्यात आला. तसेच दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांच्यावर कारवाई करण्यात आल्यानेत्यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपकडून केली जात आहे. यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मलिक यांचा राजीनामा घेण्याचा ठरलं होतं मात्र कुणाचा दबाव होता. कदाचित ठाकरेंवर दाऊदचाही दबाव असेल, असे पाटील यांनी म्हंटले.

चंद्रकांत पाटील यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले, अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यावाच लागेल, त्यांचा राजीनामा घेण्याचा ठरलं होतं मात्र कुणाचा दबाव होता त्यामुळे राजीनामा झाला नाही, कदाचित दाऊदचाही दबाव असेल, हा माझा अंदाज आहे, मी जेवढं उद्धव ठाकरे यांना ओळखतो. त्यानुसार त्यांना नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यायचा असेल, पण त्यांच्यावर दबाव आहे एवढं नक्की, असे पाटील यांनी म्हंटले.

यावेळी चंद्रकांत पाटील यांनी आयकर विभागाच्यावतीने राहुल कणाल यांच्या घरी टाकण्यात आलेल्या छाप्याबाबतही प्रतिक्रया दिली. ते म्हणाले की, आज जे सुपात आहेत. त्यांना उध्या जात्यात जावंच लागणार आहे. काहीही झाले तरी आम्ही नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यायला लावणार आहोत. कोणत्या परिस्थितीत पोलिसांची परवानगी मिळाली नाही तरी आम्ही मोर्चाचे हा काढणारच आहोत, अशी प्रतिक्रिया यावेळी चंद्रकांत पाटील यांनी दिली.

“केंद्रीय तपास यंत्रणा भाजपच्या प्रचार यंत्रणा झाल्या आहेत”; आयकर विभागाच्या छाप्यावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

Aditya Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयकर विभागाच्यावतीने आज सकाळी मुंबईत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय असलेल्या राहुल कनाल यांच्या घरी छापा टाकण्यात आला. या छाप्यावरून आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “महाराष्ट्रात यापूर्वीपासूनच आयकर विभाग तसेच ईडीच्या धाडीचे सत्र सुरु आहे. हे तर दिल्लीचे आक्रमणच म्हणावे लागेल. या यंत्रणा भपच्या प्रचार यंत्रणा झाल्या आहेत,” अशी टीका ठाकरे यांनी केली.

आज सकाळीच आयकर विभागाच्यावतीने राहुल कणाल याच्या घरी छापा टाकल्यानंतर याबाबत मंत्री आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधत प्रतिक्रिया दिली. यावेळी मंत्री ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रात ज्या काही ईडी आणि आयकर विभागाकडून धाडी टाकल्या जात आहेत. ते केंद्राचे आक्रमणच म्हणावे लागेल. महापालिका निवडणुका जवळ आल्या असल्यामुळे अशाप्रकारे निवडणुकीच्या अगोदरच केंद्रीय तपास यंत्रणांकडून धाडी टाकल्या जात आहे. या तपास यंत्रणा भाजपच्या प्रचार यंत्रणाच झाल्या आहेत. मात्र, तरीही महाराष्ट्र झुकणार नाही आणि थांबणार नाही.

दरम्यान आज सकाळी आयकर विभागाने शिर्डी देवस्थानचे ट्स्टी आणि युवा सेनेचे पदाधिकारी राहुल कनाल यांच्या घरी छापा मारला. यावेळी आयकर विभागाचे एक पथक कनाल यांच्या वांद्रे येथील भाभा हॉस्पिटलच्या गल्लीतील नाईन अल्मेडा इमारतीतील कनाल यांच्या घरी आले. त्या ठिकाणी आयकर विभागाच्यावतीने पुरावे शोधण्याचे काम केले जात आहे.

खळबळजनक!! पुण्यात ISIS संबंधित व्यक्ती? एनआयएने घेतले ताब्यात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पुण्यातील एका दाम्पत्याचा आयसीससोबत संबंध असल्याचं चौकशीत समोर आलं आहे. कोंढवा भागातील तल्हा खान नावाच्या 38 वर्षीय व्यक्तीच्या घरावर छापा टाकून इस्लामिक स्टेटशी संबंधित कागदपत्रे आणि डिजिटल साहित्य जप्त केलं आहे. यानंतर पोलिसांनी संशयित जोडप्याला आज अटक केली आहे.

या प्रकरणात आधीच चार जणांना अटक करण्यात आलीय. तल्हा खान हा अटक केलेल्या चार जणांपैकी नबील सिद्दीक खत्रीच्या संपर्कात होता. मार्च २०२० मध्ये दिल्लीतील लोधी कॉलीनी पोलीस स्थानकामध्ये या प्रकरणात गुन्हा दाखल झालेला आहे. काश्मीरमधील एक पती-पत्नीचं जोडपं आयसिससाठी तरुणांना काम करण्यासाठी प्रवृत्त करत असल्याचा खुलासा मागील वर्षी झाला होता.

या दोघांना अटक करुन चौकशी केली असता पुण्यातील एक मुलगी या दोघांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली. याच मुलीच्या संपर्कात नबील सिद्दीक खत्री होता. तर तल्हा खानही खत्रीच्या संपर्कात होता असं आता समोर आलं आहे. त्याच आधारे त्याला एनआयएने ताब्यात घेतलंय. या चौकशीमधून आणखी काही लोकांपर्यंत एनआयए पोहचू शकते अशी शक्यताही व्यक्त केली जातेय.

या प्रकरणी आतापर्यंत सहा आरोपींवर आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर भारतात दहशतवादी कारवाया करण्यासाठी समविचारी लोकांचा पाठिंबा मिळवून ISIS ची विचारसरणी पसरवण्याचा कट रचणे, ISIS साठी काम करण्यासाठी सेल स्थापन करणे, निधी उभारणे, शस्त्रे गोळा करणे, आयईडी बनवणे आणि टार्गेट करुन हत्या करणे, यांसारखे आरोप निश्चित करण्यात आले आहेत.

आदित्य ठाकरेंच्या मुंबईतील ‘या’ निकटवर्तीयावर आयकर विभागाचा छापा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयकर विभागाच्यावतीने आज मुंबईत अनेक ठिकाणी धाडीचे सत्र राबविले जात आहे. दरम्यान आज सकाळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि युवासेनेचे पदाधिकारी राहुल कनाल यांच्या घरी आयकर विभागाने छापा मारला आहे.

आज सकाळीच आयकर विभागाचे एक पथक कनाल यांच्या घरी पोहोचले आणि त्यांनी छापेमारीस सुरू केली. यावेळी केंद्रीय राखीव दलाच्या जवानांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे शिवसेना नेते संजय राऊत यांची आज दुपारी पत्रकार परिषद होणार आहे.

दरम्यान आज आज सकाळी आयकर विभागाने शिर्डी देवस्थानचे ट्स्टी आणि युवा सेनेचे पदाधिकारी राहुल कनाल यांच्या घरी छापा मारला. यावेळी आयकर विभागाचे एक पथक कनाल यांच्या वांद्रे येथील भाभा हॉस्पिटलच्या गल्लीतील नाईन अल्मेडा इमारतीतील कनाल यांच्या घरी आले.

भ्रष्टाचारी भाजप नेत्यांचे मुखवटे उघडे पाडणार; संजय राऊतांचा इशारा

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत आज 4 वाजता शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यापूर्वीच आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना भाजपला आणि केंद्रीय तपास यंत्रणांना इशारा दिला आहे. भ्रष्टाचारीं भाजप नेत्यांचे मुखवटे उघडे पाडणार असा इशारा संजय राऊत यांनी दिला.

संजय राऊत म्हणाले, काही विशिष्ट लोकं आमच्यावरती हल्ले करतात. त्याचवेळी मोठमोठे लोक घोटाळे करून नामानिराळे राहतात. त्यांचे मुखवटे फोडले पाहिजेत, असं राऊत यांनी सांगितलं. तसेच त्यांनी आपण ईडीसंदर्भात पंतप्रधानांना 13 पानी पत्र लिहिलं असल्याची माहितीदेखील दिली.

त्या पत्रात केंद्रीय तपास यंत्रणा भ्रष्टाचाराने किती पोखरल्या आहेत, कोणाच्या नियंत्रणाखाली काम करतात आणि राजकीय विरोधकांची कोंडी करुन, अडचणीत आणून भाजपाच्या राजकारणाला हातभार लावतात हे सगळं आहे. ते पत्र आज मी सर्वांसमोर ठेवणार आहे.आज पहिला भाग बाहेर काढत आहे,” असा इशारा संजय राऊतांनी दिला आहे.

युवक काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष : निवडणूकीत कुणाल राऊत, शिवराज मोरे शर्यतीत

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | युवक काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासाठी राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचे पुत्र कुणाल राऊत यांना सर्वाधिक मते मिळाली आहेत. वरिष्ठाच्याकडून मुलाखत झाल्यानंतर युवक प्रदेशाध्यक्ष यांची निवड जाहीर होणार आहे.

निवडणुकीच्या निकालानुसार कुणाल राऊत यांना सर्वाधिक 5 लाख 48 हजार 267 यांनी नंबर एकची मते मिळाली आहेत. कराड येथील शिवराज मोरे यांनी दुसऱ्या क्रमांकाचे 3 लाख 80 हजार 367 तर तिसऱ्या क्रमांकावर शरण बसवराज पाटील यांना 2 लाख 46 हजार 695 मते मिळाली. आता या तिन्ही उमेदवारात कोण बाजी मारणार हे पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून मुलाखत घेतली जाणार आहे. त्यानंतर युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा केली जाणार आहे.

या निवडणुकीसाठी चांगलीच चुरस बघायला मिळाली होती. युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाकरिता एकूण 14 उमेदवार रिंगणात होते. त्यासाठी 12 नोव्हेंबर 2021 ते 12 डिसेंबर 2021 दरम्यान सदस्यत्व मोहीम राबविण्यात आली होती.

मुंबईत आयकर विभागाच्या कारवाईवरून अतुल भातखळकरांचे ‘ते’ ट्विट; म्हणाले कि…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ईडी आणि आयकर विभागाच्यावतीने राज्यात अनेक ठिकाणी धाडी टाकल्या जात आहेत. यावरून आज भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ट्विट करीत सवाल उपस्थित केला आहे. “अंधेरी पश्चिमेला कुणावर तरी आयकर विभागाची कारवाई सुरू आहे. कोण असावा हा नवा बजरंग खरमाटे???:, असे ट्विट भातखळकर यांनी केले आहे.

भाजप नेते अतुल भातखळकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, सध्या आयकर विभागाच्यावतीने राज्यात ठीक ठिकाणी कारवाई केली जात आहे. यामध्ये आज अंधेरी पश्चिमेला कुणावर तरी आयकर विभागाची कारवाई सुरू आहे. कोण असावा हा नवा बजरंग खरमाटे???, असा सवाल भातखळकर यांनी केला आहे.

यावेळी अतुल भातखळकर यांनी महाविकास आघाडी व शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरही निशाणा साडह्ला. यावलेली ते म्हणाले की, राज्यात सध्या महाभकास आघाडीचे सरकार आहे. आणि पंधरा दिवसापूर्वी शिवसेनेचे खासदार संजय राऊतच म्हणाले होते कि मी सर्व भ्रष्टाचाराचे पुरावे बाहेर काढणार. कुठे गेले ते पुरावे? काय झाले त्यांच्या पुराव्याचे याची उत्तरे आता का राऊत देत नाहीत?, असे अनेक प्रश्न यावेळी भातखळकर यांनी उपस्थित केले.

उत्तरप्रदेश मध्ये भाजपचाच बोलबाला?? पहा एक्झिट पोलचा अंदाज काय सांगतो

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांचा निकाल १० मार्चला असून भाजपलाच स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र भाजपच्या जागेत गतवेळी पेक्षा घट होण्याची शक्यता आहे. उत्तरप्रदेश मध्ये विधानसभेच्या 403 जागा आहेत. गत विधानसभा निवडणुकीत भाजपला 312 जागा मिळाल्या होत्या. यंदा भाजपच्या जागा कमी झाल्या तरी पक्षाला पूर्ण बहुतम मिळेल असा अंदाज आहे. एक्झिट पोलमधून वर्तवले जाणारे अंदाज हे बहुतांश वेळा अंतिम निकालाच्या जवळपास जाणारे असतात

इंडिया टुडे-अॅक्सिसच्या सर्व्हेनुसार भाजपला 288 ते 326 जागा मिळतील असा अंदाज आहे. समाजवादी पार्टीला (सपा) 71 ते 101 जागा मिळतील, बहुजन समाज पक्षाला (बसपा) 3 ते 9, काँग्रेसला 1 ते 3 आणि इतर पक्षांना 2 ते 3 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

टाईम्स नाऊचा एक्झिट पोलमध्ये उत्तर प्रदेशमध्ये भाजप आणि मित्रपक्षांना मिळून 225 जागा मिळवू शकतो असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. दुसऱ्या बाजूला समाजवादी पक्ष आणि इतरांना 151 जागा मिळू शकतात. तर बसपा 14, काँग्रेस 9 आणि इतरांना 4 जागा मिळण्याची शक्यता आहे.

इंडिया न्यूजच्या सर्व्हेनुसार, भाजपला 222 ते 260, सपाला 135 ते 165, बसपाला 4 ते 9 जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आलाय.

News 18 च्या सर्वेनुसार भाजप – 240.. समाजवादी पक्ष – 140 , बहुजन समाज पक्ष – 17 तर इतर – 6 जागा

उत्तरप्रदेश निवडणूकीत भाजप आणि समाजवादी पक्षात जोरदार चुरस पाहायला मिळाली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना अखिलेश यादव यांचे कडवे आव्हान होते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यासमवेत केंद्रीय मंत्र्यांनी उत्तरप्रदेशात केलेल्या जोरदार प्रचाराचा भाजपला फायदा झाला आहे.

परीविक्षाधीन तहसीलदारांचा दणका : माण तालुक्यात 11 स्टोन क्रशर सील

दहिवडी | माण तालुक्यात ठिकठिकाणी वर्षानुवर्षे डोंगर पोखरून खडी, क्रश सँड, डबर अशा गौण खनिजची लूट करणार्‍या खाणसम्राटांना माणचे परीविक्षाधीन तहसीलदार रिचर्ड यानथन यांनी दणका दिला. विविध ठिकाणी बेकायदेशीरपणे सुरू असलेले 11 स्टोन क्रशर त्यांनी सील केले तसेच गौण खनिजची अनधिकृत वाहतूक करणारी वाहने जप्‍त केली.

माण तालुक्यात अनाधिकृत खाणी सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर रिचर्ड यानथन हे महसूल अधिकारी, कर्मचार्‍यांचा लवाजमा घेवून खाणीजवळ असलेल्या क्रशर साईटवर पोहोचले. त्यांनी अधिकृत परवान्याबाबत संबंधित क्रशर चालकांकडे विचारणा केली. त्यावर काही क्रशरचालकांनी क्रशर परवाना मंजुरीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले. सध्या तात्पुरते परवाने दिले आहेत का? याबाबत विचारणा केली असता असे कोणतेही परवाने नसल्याचे समोर आले. त्यामुळे यानथन यांनी संबंधित मंडलाधिकारी व तलाठ्यांना अनाधिकृत क्रशर सील करण्याचे आदेश दिले. घटनास्थळी असणारी वाहने जाग्यावरच जप्‍त करून हवा सोडण्या आली.

या कारवाईत परीविक्षाधीन तहसीलदार रिचर्ड यानथन मार्गदर्शनाखाली निवासी नायब तहसीलदार शैल्य वट्ट, महसूल सहाय्यक युवराज खाडे यांच्यासह गोंदवले, कुक्कुडवाड, मार्डी व म्हसवड सजातील मंडलाधिकारी व तलाठ्यांनी सहभाग घेतला. सील केलेल्या स्टोन क्रशरचा वीजपुरवठा बंद करण्याच्या सुचनाही महावितरणच्या उपअभियंत्यांना दिल्या आहेत.

कुठे- कुठे कारवाई

तहसीलदारांनी केलेल्या कारवाईत गोंदवले येथील सुनीता कट्टे, दत्तू कट्टे व विवेक कट्टे, धुळदेव येथे बबन वीरकर, गोंदवले खुर्द येथे विनोद शेडगे व निवृत्ती फडतरे, धामणी येथे निलेश गायकवाड, इंजबाव येथे राजेंद्र फडतरे, जाशी येथे रणजित शिंदे, रांजणी येथे धनाजी दोलताडे व सुरेश भोसले यांच्या क्रशरचा समावेश आहे.

संबंधितांनी किती ब्रास खडी, डबर, क्रश सँड विकली? याची माहिती घेवून जप्‍त केलेला साठा याचा विचार करुन दंड केला जाणार आहे. चालू बाजारभावाच्या पाच पट प्रति ब्रास दंड आकारला जाणार आहे. तहसीलदारांनी केलेल्या या कारवाईमुळे खाणसम्राटांचेही धाबे दणाणले आहेत.