Thursday, December 18, 2025
Home Blog Page 2688

पाकिस्तानात मशिदीत मोठा स्फोट; 30 जणांचा मृत्यू तर 50 जखमी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पाकिस्तानातील एका मशिदीत मोठा स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये 30 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तसेच 50 जण जखमी झाले आहेत. जिओ न्यूज, नुसार पेशावरच्या मशिदीत नमाजाच्या वेळी हा स्फोट झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, कोचा रिसालदार भागातील किस्सा ख्वानी बाजारातील मशिदीमध्ये हा स्फोट झाला. स्फोटाची माहिती मिळताच बचाव पथक तेथे पोहोचले आणि जखमींना लेडी रीडिंग रुग्णालयात दाखल करण्यात आले. बचाव पथकासोबतच आसपासच्या लोकांनीही जखमींना मदत केली. 50 जखमींपैकी 10 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या पोलीस आणि सुरक्षा दलांनी आजूबाजूचा परिसर रिकामा केला आहे. तेथे तपास सुरू आहे.

आतापर्यंत कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, यात दोन हल्लेखोर सामील असल्याचे पेशावर पोलिसांनी सांगितले आहे. आधी दोघांनी मशिदीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर थांबवल्यानंतर पोलिसाला गोळ्या घातल्या. स्फोटापूर्वी झालेल्या गोळीबारात एक पोलीस शहीद झाला, तर इतर जखमी झाले.

 

महागाईचा परिणाम ! किंमती वाढल्याने दैनंदिन वापराच्या वस्तूंवर झाला परिणाम : NielsenIQ रिपोर्ट

नवी दिल्ली । चलनवाढीचा परिणाम अर्थव्यवस्थेवर दिसू लागला आहे. भारतीय FMCG कंपन्यांनी सामान्य माणसाने वापरल्या जाणार्‍या वस्तूंच्या किंमती वाढल्यामुळे त्यांचा वापर कमी केला आहे. ही बाब शहरी भागासह ग्रामीण भागातही दिसून येत आहे. एका सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे.

दैनंदिन वापरातील उत्पादने (FMCGs) बनवणाऱ्या भारतीय कंपन्यांना 2021 मध्ये महागाईमुळे शहरी बाजारपेठेतील खप आणि ग्रामीण भागात घसरणीचा सामना करावा लागला. डेटा एनालिसिस फर्म नील्सनने एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, महागाईने हैराण झालेल्या या कंपन्यांना वारंवार किमती वाढवणे भाग पडले.

NielsenIQ ने प्रसिद्ध केलेल्या इंडस्ट्रीच्या आकडेवारीनुसार, एका वर्षापूर्वीच्या तुलनेत जलद गतीने चालणाऱ्या ग्राहक वस्तूंच्या विक्रीचे प्रमाण 2.6% कमी झाले आहे, कारण चलनवाढीमुळे ग्रामीण मागणीत तीव्र घट झाल्यामुळे, सकारात्मक वाढीच्या पाच तिमाहीनंतर आहे.

2021 मध्ये, FMCG इंडस्ट्रीला आपले मार्जिन वाचवण्यासाठी सलग तीन तिमाहीत किंमती दुहेरी अंकात वाढवाव्या लागल्या. यामुळे 2020 च्या तुलनेत मागील वर्षी किंमत नियंत्रित वाढ 17.5 टक्क्यांवर पोहोचली आहे. Nielsen IQ च्या रिटेल इंटेलिजेंस टीमने तयार केलेला FMCG स्नॅपशॉट रिपोर्ट सांगतो की,”ऑक्टोबर-डिसेंबर 2021 तिमाहीतही FMCG इंडस्ट्रीला महागाईच्या दबावामुळे वापरात 2.6 टक्क्यांची घसरण झाली.”

दक्षिण आशिया क्लस्टर NielsenIQ लीड दीपांशु रे म्हणाले की,”ग्रामीण भारतातील ग्राहक महागाईचा सामना करण्यासाठी लहान पॅक आकाराकडे वळत आहेत. मात्र, मोठ्या कंपन्यांनी किंमतीत सतत वाढ केल्यामुळे डिसेंबर तिमाहीत भारतातील FMCG साठी मूल्याच्या दृष्टीने 9.6% वार्षिक वाढ दिसून आली. संपूर्ण वर्षासाठी, FMCG इंडस्ट्रीने 17.5% ची वाढ नोंदवली.

पर्सनल केअर आणि होम केअर यांसारख्या गैर-खाद्य श्रेणींमध्ये डिसेंबर तिमाहीत वार्षिक 5.9% ची घट झाली आहे, तर खाद्यपदार्थ 1.2% खाली आहेत. NielsenIQ ने म्हटले आहे की नॉन-फूड श्रेण्यांना मोठ्या प्रमाणावर ताण येत आहे.

महामार्गावर वेडसर व्यक्तीला वाचविण्याच्या नादात दुचाकीचा मोठा अपघात

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

पुणे- बंगळूर महामार्गावर वेळे गावच्या हद्दीत दुचाकीस्वाराचा अपघात झाल्याची घटना घडली. रस्त्यात आलेल्या एका वेडसर व्यक्तीला वाचविण्याच्या नादात हा अपघात झाला. अपघातात दुचाकीचे मोठे नुकसान झाले असून एक महिला व एक पुरूष गंभीर जखमी झाले आहेत.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, महामार्गावर आज शुक्रवारी दि. 4 रोजी दुपारी कडाक्याच्या उन्हात एका दुचाकी क्रमांक (MH- 14- HZ- 4941) दोघेजण प्रवास करत होते. वाई तालुक्यातील वेळे येथे एक वेडसर व्यक्ती रस्त्यात आल्यानंतर त्याला वाचविण्याचा प्रयत्न दुचाकी चालकाने केला. तेव्हा गाडीवरील ताबा सुटल्याने रोडच्या बाजूला संरक्षण जाळीवर दुचाकी धडकली.

दुचाकीवर निकिता मंजुनाथ मूराळे (वय-32) व मंजुनाथ कामोपा मूराळे (वय- 36) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. अपघातात दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. जखमींना वाईच्या गीतांजली हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अधिक तपास भुईंज पोलीस स्टेशनचे हवालदार घाडगे करीत आहेत.

Jhund Movie Review | भेदभावाच्या भिंतीला धडक देणारी जिगरबाज ‘झुंड’

Jhund Review

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| नागराज मंजुळे यांचा बहुचर्चित झुंड सिनेमा आज रिलीज झाला. चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलावंतांनी आधीच चित्रपटाची भरभरून स्तुती केली असल्याने चित्रपटात नेमकं काय असणार याची उत्सुकता रसिक प्रेक्षकांना होतीच. या सर्व अपेक्षांवर खरा उतरलेला चित्रपट असंच ‘झुंड’ च्या बाबतीत म्हणता येईल. जात वास्तव दाखवून त्यावर विचार करायला भाग पाडणाऱ्या फँड्री, सैराट या चित्रपटांइतकीच ‘झुंड’ची कथा प्रभावी असून ‘वस्ती’ किंवा ‘झोपडपट्टी’ आणि तिथले लोक ही थीम न सोडता पूर्ण चित्रपट करण्यात नागराज मंजुळे यशस्वी झाले आहेत.

https://www.facebook.com/nagraj.manjule/videos/639918740406603

‘स्लम सॉकर’ म्हणजेच वस्तीतील फुटबॉल खेळणारी मुलं ही चित्रपटाची कल्पना टीजर आणि ट्रेलरमधून आधीच स्पष्ट झाली होती. वस्तीपातळीवरच्या लोकांचं रोजचं जगणं, त्यातील तानेबाने, भांडणं-मारामारी, व्यसनाधीनता, इतर समाजाची त्यांच्याकडे बघण्याची नजर या घटना चित्रपटात अत्यंत समर्पकपणे मांडल्या आहेत. वस्तीतल्या लोकांच्या या जगण्याकडे आपण पाहून न पाहिल्यासारखं करतो किंवा ही परिस्थिती सुधारणार नाहीच अशी धारणा घेऊन इथला मध्यमवर्ग, उच्च मध्यमवर्ग जगत असतो. या धारणेला छेद देणारा विजय बोराडे (अमिताभ बच्चन) सारखा एखादा शिक्षक समाजात असू शकतो, तो समाजात कृतिशील बदल घडवू शकतो हा संदेश पोचवण्यात ‘झुंड’ला यश आलं आहे. वस्तीतील गुंडगिरी, व्यसनं यामुळे वस्तीतल्या मुलांची होत असलेली हानी, मुलांचं कमी वयातच जीवनाबद्दलचं गांभीर्य कमी होणं या सगळ्यांचा बारकाईने विचार करणारा शिक्षक या चित्रपटात मध्यवर्ती आहे. वस्तीतल्या मुलांना सुधारण्यासाठीचे त्याचे प्रयत्न, त्या प्रयत्नात व्यवस्थेकडून येत असलेल्या अडचणींशी दोन हात करणं हे सगळंच पाहण्यासारखं आहे.

https://www.facebook.com/nagraj.manjule/videos/687585308932148

नागपूर शहरात या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झालं असून दोन समाजघटकांना वेगळं करणारी ‘भिंत’ हा रेफरन्स चित्रपटात अधिक समर्पकपणे वापरण्यात आला आहे. याशिवाय चित्रपटातील इतर चौकटीही उल्लेखनीय आहेत. यामध्ये गोंदियाच्या तलाठी कार्यालयातील बिरसा मुंडा यांची फ्रेम, त्याच ठिकाणी असलेला डिजीटल इंडियाचा बोर्ड, कोर्टातील भिंतीवर असलेल्या गांधी आणि आंबेडकरांच्या प्रतिमा, बाबासाहेब जयंती साजरं करण्याचं स्वरूप, दुकानदाराकडून विद्यार्थ्यांच्या स्पर्धेसाठी आर्थिक स्वरूपात मदत मिळणं, विमानाने उड्डाण घेताना भिंत लांघनं या फ्रेम्सचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. देशाचं नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी कागदपत्र दाखवण्याचा अट्टहास करणाऱ्या सरकारला आपल्या कलाकृतीतून सणसणीत चपराक लगावण्याचं काम नागराजने केलं आहे. ते कसं हे पाहण्यासाठी हा चित्रपट बघणं गरजेचंच आहे.

https://www.facebook.com/nagraj.manjule/videos/447494537110846

फँड्री आणि सैराट या मराठी चित्रपटात भूमिका केलेले बहुतांश कलाकार या चित्रपटात पुन्हा दिसतात. चित्रपटातील गाणी जोशपूर्ण आहेत. १-२ रॅप गाणीही प्रभावी आहेत. सुरुवातीला काहीसा संथ वाटणारा चित्रपट नंतर खेळाच्या निमित्ताने गुंतवून ठेवतो. त्या खेळातील बारकाव्यांसोबत व्यक्तीमधील बारीक-बारीक बदलांची भाषाही बोलतो. चित्रपटाच्या उत्तरार्धात अमिताभने कोर्टात सादर केलेलं ६ मिनिटांचं मनोगत प्रभावी आहे. चित्रपटाचा सार म्हणावा असंच ते मनोगत आहे. चित्रपटाच्या सुरुवातीला काल्पनिक अशी पाटी असली तरीसुद्धा वस्ती अनुभवलेल्या प्रत्येकाला हा चित्रपट रिलेट होणारा आहे. ‘भारत म्हणजे काय?’ या चित्रपटात एका चिमुकल्याकडून विचारल्या गेलेल्या प्रश्नाचं उत्तरच ‘झुंड’ असं आहे. देशातील नागरिकांना या ‘झुंड’ची ओळख आणि ताकद दाखवून देणाऱ्या नागराज मंजुळे यांचं कौतुक करणं त्यासाठीच गरजेचं आहे.

शेतीसाठी दिवसा 10 तास वीज मागणीसाठी स्वाभिमानीचा “रास्ता रोको”

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

शेतीसाठी दिवसा 10 तास वीज मिळावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कोल्हापूर येथे धरणे आंदोलन सुरू असून आज या आंदोलनाचा 10 वा दिवस आहे. अद्यापही या मागणीकडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने याचा साताऱ्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने निषेध करण्यात आला.

सातारा येथे राज्य सरकार आणि ऊर्जामंत्री यांचा निषेध करत तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांच्या नेतृत्वाखाली बाँम्बे रेस्टाॅरंट चौक येथे ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले. रास्ता रोको केल्याने काहीकाळ वाहतूक विस्कळीत झाली होती. दरम्यान रस्त्यावर बसून आंदोलन करणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

कोल्हापूरात सुरू असलेल्या आंदोलनाला दोन मंत्री, दोन आमदारांनी भेट दिली होती. मात्र, शासनस्तरावर कोणताही निर्णय झाला नाही. यापुढे मंत्री, आमदारांच्या सार्वजनिक कार्यक्रमात अडथळा आणणार, असाही इशाराही राजू शेट्टी यांनी यापूर्वी दिला होता. ऊर्जामंत्र्यांनी आंदोलनातील नुकसानीची जबाबदारी माझ्यावर टाकून बघावी, विजेच्या वाढीव दरांची जबाबदारी त्यांच्यावर टाकेन, असा टोलाही राजू शेट्टी यांनी लगावला होता. आज 12 वीच्या परीक्षा सुरू होत असल्याने 11 वाजल्यानंतर रास्तो रोको करण्याच्या सूचना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना राजू शेट्टी यांनी दिल्या होत्या.

कागलला महावितरणचे कार्यालय पेटविले

माजी खासदार राजू शेट्टी यांनी सरकारला वेळोवेळी इशारा देऊनही सरकारने दुर्लक्ष केल्याने संतप्त अज्ञात शेतकऱ्यांनी कागल (जि. कोल्हापूर) येथील महावितरणच्या कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय पेटविले. स्वाभिमानीचे आंदोलन सुरू झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी महावितरणचे कार्यालय पेटविले होते. त्यामुळे राज्यात आज रास्ता रोको करण्यात येत आहे.

एसटी कर्मचाऱ्यांनो, 10 मार्चपर्यंत कामावर या; अनिल परब यांचे आवाहन

Anil Parab

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एसटी कर्मचाऱ्यांचे सरकार मध्ये विलीनीकरण व्हावे म्हणून काही महिन्यांपासून कर्मचाऱ्यांकडून संप पुकारण्यात आला आहे. मात्र एसटी चे सरकारमध्ये विलीनीकरण शक्य नसल्याचे त्रिसदस्यीय समितीच्या अहवालात स्पष्ट झाले आहे. त्यानंतर परिवहन मंत्री अनिल परब यांनी पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांना कामावर परत येण्याचे आवाहन केले आहे.

एसटी हि सर्वसामान्य माणसाची आणि ग्रामीण लोकांची गरज आहे. मी पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांना आव्हान करतो कि त्यांनी ताबडतोब कामावर यावे असे अनिल परब यांनी म्हंटल. ज्या कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली आहे किंवा ज्यांचे निलंबन करण्यात आले आहे त्यांचे निलंबन मागे घेण्यात येईल. कोणाच्याही भूलथापांना बळी पडू नका. कामगारांची रोजी रोटी जाणार नाही याची काळजी सरकार घेईल. अशी ग्वाही अनिल परब यांनी दिली

तरीही एवढं सर्व काही सांगूनही कामगार कामावर आपले नाहीत तर आम्ही असे समजू कि त्यांना नोकरीची गरज नाही आणि मग त्यांच्या बदली दुसरे कर्मचारी नेमायचे किंवा कंत्राटी पद्धत राबवायची याचा विचार करू असं म्हणत अनिल परब यांनी सूचक इशारा दिला

या संपामुळे एसटीचे प्रचंड नुकसान झाले आहे आणि अजून नुकसान होऊ नये आणि जनतेला त्रास होऊ नये यासाठी आम्ही कारवाया मागे घेत आहोत परंतु तरीही कोणाला कामावर येऊ वाटलं नाही तर आम्हाला वेगळे पर्याय निवडावे लागतील असे अनिल परब म्हणाले

विधिमंडळातील कालच्या गोंधळाचे राज्यपालच महानायक; संजय राऊत यांची घणाघाती टीका

Sanjay Raut Koshyari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | काल विधिमंडळातील अर्थसंकल्पीय अधिवेशनात अभिभाषण अर्धवट सोडून राज्यपाल कोश्यारी निघून गेले. त्यामुळे सत्ताधारी चांगलेच आक्रमक झाले. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यपालांवर निशाणा साधला. काल राज्यपालांनी जे केले आणि त्यानंतर भाजपने जे केले ते ठरवून करण्यात आले. स्क्रिप्टेड हा प्रकार होता. राज्यपालच कालच्या गोंधळाचे महानायक होते,” अशी घणाघाती टीका राऊत यांनी केली.

संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, मुंबईत सध्या विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहार. या अधिवेशनात राज्यपाल भगतसिह कोशारी अभिभाषण न करता निघून गेले. त्याच्या या प्रकाराबद्दल सांगायचे झाले तर कालच्या विधिमंडळातील प्रकार हा पूर्णतः स्क्रिप्टेड असा होता. आणि कालच्या प्रकारातील महानायक हे राज्यपालच होते.

यावेळी राऊत यांनी नवाब मलिक याच्या अटक प्रकरणी प्रतिक्रिया दिली. महाविकास आघाडी सरकारमधील ते मन्त्र, नेते असल्याने आमचे कर्त्यव्य आहार कि आम्ही त्यांच्या कुटुंबीयांची भेट घ्यावी. म्हणून आम्ही आज त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेली. नवाब मलिक यांना अटक करण्यात आली आहे. त्याचे हे प्रकरण पूर्णपणे बोगस आहे. आपण हे बोगस प्रकरण नक्की बाहेर काढणार आहोत. त्याच्या या प्रकरणाची कागदपत्रेही पंतप्रधान कार्यालयाला देण्यात आली आहेत, असे राऊत यांनी सांगितले.

एसटी कर्मचाऱ्यांचे सरकारमध्ये विलीनीकरण शक्य नाही; राज्य सरकार कडून त्रिसदस्यीय समितीचा अहवाल सादर

anil parab

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एसटी कर्मचाऱ्यांचे सरकार मध्ये विलीनीकरण व्हावे यासाठी गेल्या काही महिन्यांपासून कर्मचाऱ्यांनी राज्यभर संप पुकारला आहे. त्याच पार्श्वभूमीवर सरकारने स्थापना केलेल्या त्रिसदस्यीय समितीच्या अहवालात मात्र एसटी कर्मचाऱ्यांने विलीनीकरण शक्य नसल्याचे समोर आले आहे. हा अहवाल आज परिवहन मंत्री अनिल परब यांनी विधानसभेत सादर केला.

अहवालात नेमकं काय म्हंटल-

एसटी कर्मचाऱ्यांने राज्य सरकार मध्ये विलीनीकरण शक्य नाही
महामंडळाचा प्रवासी वाहतुकीचा व्यवसाय शासनामार्फत करणं शक्य नाही.

महामंडळाच्या आर्थिक कामगिरीचा आढावा घेऊन पुढील मदतीबाबत निर्णय घेण्यात यावा.

महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी किमान पुढील चार वर्ष शासनानं त्यांच्या अर्थसंकल्पात तरतूद करावी.

एसटी कर्मचाऱ्यांकडून वेतनवाढ आणि राज्य सरकार मध्ये विलीनीकरण या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले होते. त्याच पार्श्वभूमीवर आता तीन सदस्यीय समितीच्या अहवालानंतर आता एसटी कर्मचारी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलीनिकरण करावं की करू नये यासाठी कोर्टाने त्रिसदस्यीय समिती नेमली होती. या समितीचाच अहवाल आज विधानसभेत मांडण्यात आला आहे.

दरम्यान, राज्य सरकारने वेतनाची हमी दिली आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावं, तुमच्यावरील कारवाई मागे घेतो. एसटी ही सर्वसामान्य नागरिकांची गरज आहे. असे आवाहन परिवहन मंत्री अनिल परब यांनी केलं

राणे – पिता पुत्रांना दिलासा; कोर्टाकडून ‘या’ तारखेपर्यंत अटक न करण्याचे पोलिसांना आदेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजप आमदार नितेश राणे यांनी दिशा सालीयन वर लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी पोलिसांनी त्यांना आज चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. दरम्यान आज दिंडोशी कोर्टाकडून त्यांना अंतरिम दिलासा देण्यात आला. राणे पिता-पुत्रांना येत्या 10 तारखेपर्यंत अटक न करण्याचे आदेश कोर्टाकडून देण्यात आले.

केंद्रीयमंत्री नारायण राणे व त्यांचे पुत्र नितेश राणे यांनी दिशा सालीयनवर लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप केला होता. त्यानंतर दिशा सालीयानच्या आई आणि वडिलांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली होती. याप्रकरणी राणे पितापुत्रांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात होती. दरम्यान या प्रकरणी राणे पितापुत्रांनी पोलिस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश दिल्यानंतर दोघांनीही वेळ वाढवून मागितली होती. मात्र, आज दिंडोशी कोर्टाकडून त्यांच्याबाबत आज निर्णय देण्यात आला. राणे पिता-पुत्रांना येत्या 10 तारखेपर्यंत अटक न करण्याचे आदेश कोर्टाकडून देण्यात आले.

काय म्हणाले होते राणे?

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी काही दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेत दिशा सालियान मृत्यूप्रकरणात गंभीर आरोप केले होते. दिशा सालियानवर बलात्कार करून हत्या करण्यात आल्याचा आरोप नारायण राणेंनी केला होता. त्यानंतर दिशाचं मृत्यूप्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं. त्यानंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी राज्य महिला आयोगाला पत्र लिहून दिशाची बदनामी केली जात असल्याचं म्हटलं. आज परत महापौरांनी दिशाच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर दिशाच्या आई-वडिलांनी आमच्या मुलीची बदनामी करू नका, अशी विनंती केली. तसेच राज्य महिला आयोगाकडे तक्रार दिली.

ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी नवे विधेयक मांडणार; अजित पवारांची घोषणा

Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ओबीसी आरक्षणाचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाने नाकारल्या नंतर राज्यात सत्ताधारी आणि विरोधकामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. याच मुद्द्यांवरून विरोधकांनी अधिवेशनात गोंधळ घातल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी नवे विधेयक सादर करू अशी घोषणा केली आहे.

अजित पवार म्हणाले, सोमवारी ओबीसी आरक्षणाचे नवे विधेयक विधानसभेत मांडले जाईल. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मार्ग निघावा, ही भावना आमची होती. त्यामुळे आजच्या कॅबिनेटमध्ये मंजूर करत बिल मांडू. सर्वांनी मंजुरी द्यावी. आमच्यावर कोणाचा दबाव नाही, अन् कोणाच्या दबावाला आम्ही भीक घालत नाही असेही त्यांनी म्हंटल.

ते पुढे म्हणाले, राज्यात ओबीसी समाजाची संख्या मोठी आहे. पुढच्या काळात राज्यातील जवळपास दोन तृतीयांश महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका होऊ घातल्या आहे. या सगळ्या निवडणुकांसाठी राज्यातील जवळपास ७० ते ७५ टक्के नागरीक मतदान करतील. अशावेळी ओबीसी समाजाला राजकीय प्रतिनिधित्वापासून वंचित ठेवणे आमच्या सरकारला योग्य वाटत नाही. त्यामुळे आम्ही आज संध्याकाळी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मध्य प्रदेशच्या धर्तीवर ओबीसी आरक्षणासाठी नवा कायदा आणण्याचा ठराव संमत करू,