Sunday, December 28, 2025
Home Blog Page 2699

“एक एक मंत्री तुरुंगात जायला लागले तरी यांना लाज वाटत नाही”; सदाभाऊ खोत यांची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईत महाराष्ट्र विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिनेशनात आज विरोधकांनी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून सरकारला घेरले. यावेळी आमदार सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडी सरकावर घणाघाती टीका केली. “नवाब मलिक यांच्याबाबत सभागृहात विषय निघाल्यास त्याचे उत्तर कोण देणार तुरुंगात बसलेले मलिक. मलिक हे निर्दोष सिद्ध झाल्यानंतर नंतर त्यांना मंत्री काय मुख्यमंत्रीही करा की. मात्र, एक एक मंत्री तुरुंगात जायला लागले तरी यांना लाज वाटत नाही”, अशी घणाघाती टीका खोत यांनी केली.

मुंबई येथील अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानभवनात विरोधक आक्रमक झाल्यामुळे विधानसभेचे कामकाज स्थगित करण्यात आले. त्यानंतर भाजप आमदार सदाभाऊ खोत याणी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकावर टीका केली. ते म्हणाले की, “राज्याच्या हिताच्या दृष्टीने अधिवेशनात काही निर्णय होत असतात. अशात जर एखादा मंत्री तुरुंगात असेल आणि त्यांचा विषय सभागृहात उपस्थित होत असेल. तर त्याला उत्तर काय मंत्री तुरुंगातून देणार काय? निर्दोष सिद्ध झाल्यानंतर नंतर त्याला मंत्री काऊ मुख्यमंत्रीही करा की तुम्हाला कोणी अडवले आहे.”

मात्र, एक एक मंत्री तुरुंगात जायला लागले तरी यांना लाज वाटत नाही. एका बाजूला ओबीसी आरक्षण न्यालयाने फेटाळला आहे. त्यामुळे असे दिसते कि हे पांढऱ्या पायाचे सरकार आहे, अशी घणाघाती टीका आमदार सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडी सरकावर केली आहे.

मराठवाडा हादरला ! एकाच दिवशी चार खून

औरंगाबाद – काल दिवसभरात चार खुनांच्या घटनांनी मराठवाडा हादरून गेला. नालीत कचरा टाकण्याच्या शुल्लक कारणावरून नांदेडमधील दोन सख्ख्या भावांचा धारदार शस्त्राने हल्ला करून खून करण्यात आला तर बंदाघाट भागात महिलेचा खून करून मृतदेह नदीत फेकल्याची घटना घडली. तिसऱ्या घटनेत कळंब तालुक्यात पतीने पत्नीवर कोयत्याने सपासप वार करुन तीची हत्त्या केली. एकाच दिवशी झालेल्या चार खुनांच्या घटनांमुळे मराठवाड्यात कायद्याचा धाक संपला की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पहिल्या घटनेत नालीत कचरा टाकण्याच्या शुल्लक कारणावरून वाद घालत धारदार शस्त्राने प्रफुल दिगंबर राजभोग (35), संतोष दिगंबर राजभोग (33) या दोन सख्ख्या भावांचा अमानुष खून करण्यात आल्याची घटना नांदेड शहरातील देगावचाळ भागात घडली. या प्रकरणी वजीराबाद पोलिसांनी सात जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून या प्रकरणात दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

दुसरी घटना नांदेड शहरातील बंदा घाट भागात घडली. या भागात एका महिलेचा निर्घुण खून करून मृतदेह नदीपात्रात फेकल्याची घटना उघडकीस आली. 25 ते 30 वर्षे वय असलेल्या एका अनोळखी महिलेचे मान आवळून दोन्ही हात, पोटापासूनचा भाग कापून तिची अमानुषपणे हत्या करण्यात आली आणि पुरावे नष्ट करण्याचा हेतूने तिला नदीपात्रात फेकून देण्यात आले. या प्रकरणी वजीराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तिसऱ्या घटनेत कळंब तालुक्यातील रांजणी येथे अज्ञात कारणाने पतीने आपल्या 55 वर्षीय पत्नीवर कोयत्याने सपासप वार करून तिला ठार मारल्याची घटना उघडकीस आली. मंगल विठ्ठल संगापुरे असे मयत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी शिराढोण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पती विठ्ठल संगापुरे याला पोलिसांनी अटक केली आहे.

राज्यपालांविरोधात राष्ट्रवादीच्या आमदाराचे शीर्षासन; राज्यपाल हटवा महाराष्ट्र वाचवाच्या घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आज पासून सुरू होत झाले आहे. याच दरम्यान, अधिवेशानापुर्वी महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये जोरदार खडाजंगी सुरू आहे. त्यातच राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संजय दौंड यांनी शीर्षासन केला.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी केलेल्या विधानाचा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जोरदार निषेध केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संजय दौंड यांनी चक्क शीर्षासन करत आपला राग व्यक्त केला. यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून राज्यपालांचे करायचं काय, खाली डोकं वर पाय … राज्यपालांना हटवा महाराष्ट्र वाचवा अशा घोषणा दिल्या.

दरम्यान, सत्ताधाऱ्यांचा गोंधळ पाहता राज्यपाल अभिभाषण सोडून निघून गेले. इतकेच नाही, तर ते राष्ट्रगीतालाही थांबले नाहीत. यानंतरही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपाल विरोधात आपल्या घोषणा सुरूच ठेवल्या.

“आज बाळासाहेब ठाकरे असते तर मुंबईसोबत गद्दारी करणाऱ्याला सोडले नसते”; देवेंद्र फडणवीस आक्रमक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाराष्ट्र विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिनेशनास आज पहिल्याच दिवसापासून वादळी सुरुवात झाली. मुंबईत पार पडणाऱ्या या अधिवेशनात विरोधकांनी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून सरकारला घेरले. यावेळी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली. “मलिक यांच्यावर दाऊदसोबत व्यवहार केल्याचा आरोप आहे. हसीना पैसे दिल्याचा आरोप आहे. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आज असते तर एका मिनिटात त्यांना काढून टाकले असते. कारण मुंबईसोबत गद्दारी करणाऱ्याला सोडले नसते,”असे फडणवीस यांनी म्हंटले.

मुंबईतील अधिवेशनावेळी देवेंद्र फडणवीस यांनी आपले भाषण केले. यावेळी ते म्हणाले की, मुंबईत जे बॉम्बस्फोट झाले त्यातील आरोपीना पैसे दिल्याचा आरोप आहे. अशात मलिक यांना अटक करण्यात आली आहे. अशी अटक असताना मंत्रिपदावर राहण्याचा नैतिकटला धरून नाही. आमची अपेक्षा मुख्यमंत्र्यांकडे आहे. हसीना पारकरला 55 लाख रुपये पैसे देणे म्हणजे बॉंबस्फोटात सहभागी असणाऱ्या लोकांना मदत करण्यासारखे आहे. त्यामुळे आम्हची मागणी आहे कि अशा मंत्र्याला मंत्रिपदावरून हटवण्यात यावे, अशी मागणी फडणवीस यांनी केली.

यावेळी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याचं दिवशी भाजपाकडून पायऱ्यांवर आंदोलन करत आक्रमक पवित्रा घेतला. नवाब मलियांचा राजीनामा झाला पाहिजे. असे म्हणत दाऊदच्या दलाल मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, नवाब मलिक देशाचे गद्दार असल्याच्या आशयाच्या घोषणा विरोधकांनी दिल्या. एकंदरीत नवाब मलिकांच्या राजीनाम्यावरुन अधिवेशनापूर्वीच राजकीय वातावरण तापले आहे.

धक्कादायक!! रशिया युक्रेनवर हल्ला करणार हे ‘या’ देशाला आधीच माहिती होतं

putin

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून रशिया आणि युक्रेन मध्ये जोरदार युद्ध सुरू असून रशियाने युक्रेन मधील एक एक शहरावर ताबा मिळवण्यास सुरुवात केली आहे. बॉम्ब हल्ला आणि गोळीबारात अनेक नागरिकांचा मृत्यु झाला असून याच दरम्यान एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. रशिया आणि युक्रेन मध्ये युद्ध होणार हे चीनला आधीच माहिती होत हे आता समोर आले आहे.

द गार्डियनमधील प्रसिद्ध वृत्तानुसार, रशिया-युक्रेन युद्ध सुरू होण्या पूर्वी फेब्रुवारीच्या सुरुवातीला चीनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रशियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. बिजिंगमधील हिवाळी ऑलिम्पिक संपण्यापूर्वी युक्रेनवर हल्ला करू नये, असे चिनी अधिकाऱ्यांनी म्हटले होते. यासंदर्भात माहिती देताना न्यू यॉर्क टाईम्सने, बायडेन प्रशासनातील अधिकारी आणि एका युरोपियन अधिकाऱ्याचा हवाला दिला आहे.

मात्र, वॉशिंग्टनमधील चिनी दूतावासाचे प्रवक्ते लिऊ पेंग्यू यांच्या म्हणण्यानुसार, ‘अमेरिकेचे हे अहवाल केवळ अनुमानांवर आधारित आहेत. त्यांना कोणताही आधार नाही. आरोप करणं आणि चीनची बदनामी करणं हा त्याचा उद्देश आहे’

एकाच दिवशी सहा आत्महत्येनं औरंगाबादेत खळबळ

suicide
suicide

औरंगाबाद – 28 वर्षीय उच्चशिक्षित तरुणासह आणखी पाच जणांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटना उघडकीस आली आहे. वेगवेगळ्या घटनेत सहा आत्महत्या उघडकीस आल्याने औरंगाबादेत एकच खळबळ उडाली आहे. मंगळवार हा आत्महत्येचा वार ठरला आहे.

पहिली घटना बिडबायपास येथील खान शहाजील रजा खान असे गळफास घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. शहाजील हे अविवाहित असून काही दिवसांपासून त्याच्यासाठी मुलगी बघायचे काम सुरू होते. त्यांचे वडील कस्टम ऑफिसर होते. मात्र, त्याचा तीन वर्षापूर्वी मृत्यू झाला. त्याची आई आणि तो दोघे राहत होते. तो एका कंपनीत मार्केटिंगचे काम करत होता. शनिवारी त्याची आई नातेवाईकांच्या लग्नासाठी गेली होती.रोजी रात्री दहा वाजता मित्रांसोबत होता. रात्री त्याने फोन घेतला नाही म्हणून मित्र घरी गेला. आवाज दिला असता प्रतिसाद मिळाला नाही. दरवाजा तोडून बघितले असता त्याने गळफास घेतला होता. यावेळी घटनेची माहिती पोलिसांना दिली. या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली तर प्रेम प्रकरणाची किनार मुलीच्या प्रकरणातून शहाजील याने आत्महत्या केली असावी असा अंदाज नातेवाईक वर्तवत होते. शहाजीलने रात्री आत्महत्या केली मात्र पहाटे पाचनंतर त्याच इंस्टाग्राम अकाऊंट अचानक डी ॲक्टिव झाले होते. अंत्यविधी नंतर याप्रकरणी तक्रार देण्यासंदर्भात विचार करणारा असल्याचे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले. तर दुसऱ्या घटनेत रिक्षाचालक 36 वर्षीय तरुणाने घरातील सीलिंग फॅनला ओढानिच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवार पहाटे सहा वाजता उघडकीस आली. शाम आत्माराम झळके गवळीवाडा दौलताबाद असे गळफास घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. शाम विवाहित असून रिक्षाचालक म्हणून काम करत होते. त्यांना तीन मुली आहेत. दरम्यान सोमवार रोजी घरातील सदस्यांसोबत जेवण करून शाम हे झोपले. पहाटे पत्नी उठून अंगण झाडून घेण्यासाठी बाहेर गेली. यावेळी शाम ने घरातील बेडरूममध्ये ओढणीचा सहायाने गळफास घेऊन आत्महत्या केली. काही वेळाने ही बाब घरच्यांच्या लक्षात येताच त्याला तत्काळ घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषीत केले. या प्रकरणी दौलताबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

तिसरी घटना आचारी काम करणाऱ्या 48 वर्षीय व्यक्तीने घरातील फॅनला बेडशीटच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना जाधववाडी परिसरातील मयूर पार्क येथे उघडकीस आली. राजू शिवलाल धुसिंगे रा. जाधववाडी परिसर मयूर पार्क असे गळफास घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे. राजू हे आचारी काम करत होते. त्यांना एक मुलगा एक मुलगी आहे. मुलीचा विवाह झाला आहे. यामुळे पती पत्नी व मुलगा हे तिघे राहत होते. चौथ्या घटनेत मजुरी काम करणाऱ्या 43 वर्षीय व्यक्तीने राहत्या घरात हुकला साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गल्ली न. ३ संजय नगर येथे उघडकीस आली. विष्णू भगवानराव ढवळे असे गळफास घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे. विष्णू हे मजुरी काम करत होते. त्यांना एक मुलगा एक मुलगी आहे. सोमवार रोजी विष्णू हे मद्य प्राशन करून आले होते. त्यांनी पत्नीसोबत भांडण केल्याने पत्नी बहिणीच्या घरी गेल्या होत्या. पत्नी सकाळी घरी आल्या तेव्हा दार आतून लावले होते.आवाज दिला असता प्रतिसाद मिळाला नाही. शेजारच्याच मदतीने दार तोडून बघितले असता त्याने गळफास घेतला होता. पाचव्या घटना गणेश वाल्मीक गोते असे गळफास घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. किरायाच्य खोलीत सीलिंग फॅनला नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना लक्षात येताच त्याला तात्काळ घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषीत केले. सहावी घटनेत अविनाश राजू पवार वय 22 रा. असे गळफास घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. एकाच दिवशी सहाही आत्महत्या समोर आल्याने औरंगाबादेत एकाच खळबळ उडाली आहे.

“नवाब मलिक हाय हाय”; मलिक यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांचे आंदोलन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण अनेक कारणांनी चांगलेच तापले आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काल देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांचा राजीनामा घेणार असल्याचे सांगितले. दरम्यान, आज अधिवेशनाच्या सुरुवातीलाच विरोधकांनी चहापाण्यावर बहिष्कार टाकत विधानभवनाच्या पाय-यांवर आंदोलन केले.

आज विधानसभेचे अर्थसंकल्पी अधिवेशनास सुरुवात होत आहे. काल चहापानावर बहिष्कार टाकलेल्या विरोधकांनी आज विधानभवनाच्या पायऱ्यांवरच आक्रमक पवित्रा घेत आंदोलन केले. नवाब मलिकांचा राजीनामा घेण्यात यावा अशी विरोधकांनी घोषणाबाजीही यावेळी केली

यावेळी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याचं दिवशी भाजपाकडून पायऱ्यांवर आंदोलन करत आक्रमक पवित्रा घेतला. नवाब मलियांचा राजीनामा झाला पाहिजे. असे म्हणत दाऊदच्या दलाल मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, नवाब मलिक देशाचे गद्दार असल्याच्या आशयाच्या घोषणा विरोधकांनी दिल्या. एकंदरीत नवाब मलिकांच्या राजीनाम्यावरुन अधिवेशनापूर्वीच राजकीय वातावरण तापले आहे.

पोक्सोचा गुन्हा : अल्पवयीन 11 वर्षीय मुलीवर 22 वर्षाच्या नातेवाईकाने केला अत्याचार

Balrampur Rape Victim

सातारा |अकरा वर्षाची मुलगी घरात एकटी असताना जवळच्या नातलगाने चिमुरडीवर जबरदस्तीने अत्याचार केला. सातारा जिल्ह्यात दिवसभरात दोन अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या घटना उघडकीस आल्या. यामध्ये एक सातारा शहरातील अकरा वर्षीय तर खंडाळा तालुक्यातील एका गावात बारा वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याच्या तक्रारी पोलिस ठाण्यात दाखल झाल्या आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहरात अत्याचाराबाबत पीडित मुलीच्या आईने सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, या महिलेच्या नंणदेच्या 22 वर्षीय मुलाने हे घृणास्पद कृत्य केले आहे. त्यांची अकरा वर्षांची मुलगी मंगळवारी घरात एकटीच होती. त्यावेळी नणंदेचा मुलगा घरात गेला. त्याने दरवाजा लावल्यानंतर चिमुकलीवर जबरदस्तीने अत्याचार केला. सायंकाळी आई घरी आल्यानंतर पीडित मुलीने आपल्यावर ओढावलेला प्रसंग आईला सांगितला. तेव्हा आईच्या पायाखालची जमीनच सरकली. संबंधित मातेने तातडीने सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन आपल्या मुलीसोबत घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला.

त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीच्या शोधासाठी पथके पाठविली. मात्र, संबंधित युवक फरार झालेला होता. या प्रकारामुळे साताऱ्यासह संबंधित उपनगरात संतापाची लाट उसळली आहे. सहायक पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी पीडित महिलेच्या घरी जाऊन या प्रकाराची माहिती घेतली. आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी, यासाठी योग्य पुरावे गोळा करण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. संबंधित युवकाविरोधात तक्रार दिली असून 22 वर्षीय युवकावर पोक्सो कायद्यांतर्गत सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातारा शहर पोलिसांनी युवकाला अटक केली असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

“महाराष्ट्रात वादळ अडीच वर्षांपूर्वी आलेय, ते अजून उठलेच नाहीत”; राऊतांचा भाजपला टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण अनेक कारणांनी चांगलेच तापले आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काल देवेंद्र फडणवीसांनी आघाडी सरकावर निशाना साधल्यानंतर आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला टोला लगावला आहे. “महाराष्ट्रात वादळ हे अडीच वर्षांपूर्वी आलं होतं, त्यामध्ये सगळेच झोपले, ते अजून उठलेच नाहीत, आमच्याकडे 170 आमदारांची ताकद कायम आहे. त्यामुळे अधिवेशनात वादळ वगैरे येणार नाही, असा टोला राऊतांनी लगावला आहे.

आज संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, विरोधी भाजपकडून महाविकास आघाडी सरकारला कोंडीत पकडण्यासाठी राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात विरोधक वादळ निर्माण करणार असे सांगत आहेत. मात्र, त्यांच्या या सांगण्यामागे यामध्ये काहीही तथ्य नाही. महाराष्ट्रात वादळ हे अडीच वर्षांपूर्वी आले होते. त्यामध्ये सगळेच झोपले, ते अजून उठलेच नाहीत. विरोधक साधी फुंकर मारतात पण त्यांना वादळ आल्यासारखे वाटते. पण महाविकास आघाडीची 170 आमदारांची ताकद कायम आहे. त्यामुळे अधिवेशनात वादळ वगैरे येणार नाही. ठाकरे सरकारला साधा ओरखडाही उठणार नाही, हे विरोधकांनी लक्षात ठेवावे.

फडणवीसांच्या प्रशाना उत्तर देताना राऊत म्हणाले की, सभागृहात आदळआपट करून प्रश्न सुटणार नाहीत. आम्ही लोकशाही मानतो. लोकसभा आणि राज्यसभेत लोकशाही नसली तर महाराष्ट्राच्या विधिमंडळाला एक परंपरा आहे. विरोधकांना प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. तसेच अर्थसंकल्पीय अधिवेशनला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहतील, असेही राऊत यांनी म्हटले.

30 वर्षांपासून सापाला दूध पाजले, अन् आता आमच्यावरच फुत्कारतय; मुख्यमंत्र्यांची भाजपवर टीकेची झोड

thackeray fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर चौफेर टीका केली आहे. गेल्या 30 वर्षांपासून सापाला दूध पाजले, आणि आता ते आमच्यावरच फुत्कारततय अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी भाजपवर हल्लाबोल केला. तसेच महाविकास आघाडीही भाजपला जशास तसं प्रत्युत्तर देणार अस म्हणत ठणकावले आहे.

फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्यावर केलेल्या आरोपांवरून उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीका केली. तुमच्यात हिंमत असेल तर दाऊदला शोधून का आणत नाही तुम्ही? पाकिस्तानला जाऊन नवाज शरीफचा केक खाता, थडग्यांवर माथा टेकवता, मग तुम्ही दाऊदच्या मुसक्या का आवळत नाही?” असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला आहे.

केंद्रीय तपास यंत्रणांकडून महाविकास आघाडीतील नेत्यांवर होणाऱ्या कारवाईवरही मुख्यमंत्र्यांनी भाष्य केले. आज इकडे तिकडे धाड पडत आहे, याला- त्याला अटक करत आहेत. मात्र आपली आपली एकजूटच आपली ताकद आहे असे म्हणत माझे 170 मोहरे फोडून दाखवाच. मला सोडून ते तुमची गुलामगिरी पत्करणार नाहीत, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी भाजला थेट आव्हान दिलंय.