Saturday, December 27, 2025
Home Blog Page 2717

भारतात कोरोनाची चौथी लाट कधी येणार? तज्ञांनी दिली मोठी माहिती

नवी दिल्ली । कोरोना व्हायरसच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे भारतात आलेली तिसरी लाट जवळपास संपली आहे. कोरोनाच्या रुग्णांमध्येही झपाट्याने घट होत आहे. संसर्गाचा वेग थांबला आहे मात्र आता कोविडच्या चौथ्या लाटेबाबतही चर्चा सुरू झाली आहे. याच दरम्यान, आयआयटी कानपूरच्या शास्त्रज्ञांनी कोविडच्या चौथ्या लाटे बाबत चांगली माहिती दिली आहे. 22 जूनच्या सुमारास देशात कोरोनाची पुढची लाट येईल, जी 24 ऑक्टोबरपर्यंत राहील, असे सांगण्यात येत आहे.

याआधी कोविडशी संबंधित आयआयटीच्या शास्त्रज्ञांनी ज्या काही शक्यता व्यक्त केल्या होत्या, त्या जवळपास बरोबर होत्या. यावरून असा अंदाज वर्तवला जात आहे की, कोविडची चौथी लाट तिसर्‍या लाटेक्षा थोडी जास्त काळ टिकू शकते. मात्र, शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, चौथ्या लाटेचे संक्रमण कोरोनाच्या व्हेरिएंटवर अवलंबून असेल.

कोरोनाची तिसरी लाट ओसरत आहे. संसर्गाची प्रकरणे दिवसेंदिवस कमी होत आहेत. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे सुमारे 10 हजार रुग्ण आढळले आहेत, तर आता पॉझिटिव्हीटी रेट केवळ 1 टक्के राहिला आहे. संशोधक आता कोविडची पुढची लाट भारतात किती काळ येऊ शकते यावर संशोधन करत आहेत. MedRxiv मध्ये प्रकाशित झालेल्या रिपोर्ट्स नुसार, कोविडची चौथी लाट 22 जूनपर्यंत भारतात येऊ शकते तर ती 24 ऑक्टोबरपर्यंत राहील.

यापूर्वी, आयआयटी कानपूरनेही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत शक्यता व्यक्त केली होती की तिसरी लाट फेब्रुवारीच्या सुरुवातीला येईल आणि त्यानंतर प्रकरणांमध्ये घट होईल. शास्त्रज्ञांचे अंदाज अगदी बरोबर निघाले. चौथ्या लाटेबाबत शास्त्रज्ञांनी सांगितले की, ऑगस्टमध्ये कोरोनाच्या चौथ्या लाटेचा उच्चांक येऊ शकतो. 15 ऑगस्ट ते 31 ऑगस्टपर्यंत संसर्गाच्या प्रकरणांमध्ये वाढ होईल.

बुलडाण्यात ग्रामसेवक महिलेची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

Buldhana Crime

बुलडाणा : हॅलो महाराष्ट्र – बुलडाणा शहरातील सुंदरखेड परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका 35 वर्षीय ग्रामसेवक महिलेने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे यावेळी मृत महिलेचा मुलगा देखील घरातच होता. पण आईच्या मनात काय चाललंय याची जराही कल्पना त्याला नव्हती. गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये आईला पाहून त्या मुलाला जबर धक्का बसला आहे. यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.

अपेक्षा प्रवीण कंकाळ असे मृत पावलेल्या 35 वर्षीय ग्रामसेवक महिलेचे नाव आहे. हि मृत महिला बुलडाणा शहराच्या सुंदरखेड परिसरातील तार कॉलनीत आपले पती आणि दोन मुलांसोबत राहत होती. मृत अपेक्षा यांचे पती प्रवीण कंकाळ हे लघुसिंचन विभागात नोकरीला आहेत. घटनेच्या दिवशी प्रवीण हे नेहमीप्रमाणे सकाळी कामावर गेले होते. यावेळी मृत अपेक्षा कंकाळ आणि त्यांचा मोठा मुलगा हे दोघेच घरी होते.

यादरम्यान “माझं डोकं दुखत आहं” असे सांगून अपेक्षा या घरातील मागील खोलीत निघून गेल्या. काही वेळानं मुलगा आईच्या खोलीत गेला. यावेळी अपेक्षा हि घरातील पंख्याला ओढणीनं गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. आपल्या आईला या अवस्थेमध्ये पाहून त्याला धक्काच बसला. त्याने लगेच आपल्या वडिलांना फोन करून या घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पती प्रवीण कंकाळ तातडीनं घरी आले. यानंतर प्रवीण कंकाळ यांनी तातडीने अपेक्षाला बुलडाणा जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले मात्र त्यागोदरच तिचा मृत्यू झाला होता. 35 वर्षीय ग्रामसेवक महिलेने आत्महत्या केल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

नारायण राणेंवरील कारवाईबाबत अजित पवारांनी दिली ‘हि’ प्रतिक्रिया; म्हणाले कि…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिशा सलियनबाबत केलेल्या वक्तव्या प्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. नारायण राणे यांचे पूत्र आमदार नितेश राणे यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एखादे वक्तव्य केल्यास त्याचा तपास करणे हा एक प्रक्रियेचा भाग असतो. कोणी काय तक्रार करायची त्यात तथ्य असेल तर कारवाई होते. त्यात तथ्य नसेल तर कारवाई होत नाही, असे पवार यांनी म्हंटले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, दिशा सलियन मृत्यू प्रकरणी सध्या तपास सुरु आहे कि कोणी काय आणि कोणती वक्तव्ये केली आहेत. सलियन प्रकरणी ज्यांनी कोणी काही विधाने वापरली असतील त्याची चौकशी हि केली जात आहे.

चौकशी करणे हा एक तपासातील प्रक्रियेचा भाग असतो. तक्रारीमध्ये काही तथ्य असेल तर कारवाई हि होते. आणि चौकशीत मिळालेल्या माहितीत तथ्य नसेल तर कारवाई होत नाही, असे पवार यांनी म्हंटले.

धक्कादायक !! युक्रेन- पोलंड सीमेवर भारतीय विद्यार्थ्यांना मारहाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रशिया आणि युक्रेन मध्ये जोरदार युद्ध सुरू असून हे युद्ध संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. अनेक ठिकाणी गोळीबार आणि बॉम्ब हल्ले सुरूच असून परिस्थिती अत्यंत भीषण बनली आहे. त्यातच आता युक्रेनमधून पोलंडमध्ये स्थलांतर करत असताना भारतीय विद्यार्थ्यांना बेदम मारहाण झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

याबाबत एका विद्यार्थीनीने सांगितलं, “आम्ही जेव्हा युक्रेन-पोलंड सीमेवर आलो तेव्हा आम्हाला सुरक्षा रक्षकांनी घेरलं होतं. आम्हाला प्रवेशद्वारावर प्रवेश देण्यात आला नाही. तेथून केवळ युक्रेनच्या नागरिकांना पोलंडमध्ये प्रवेश दिला जात होता. खूप विनवण्या केल्यानंतर केवळ भारतीय मुलींना प्रवेश देण्यात आला. त्यानंतर पोलीस आले आणि त्यांनी भारतीय मुलांना बेदम मारहाण केली.

https://twitter.com/iJasOberoi/status/1497752193901887490?s=20&t=ZZnhoX4tFYQShc09jzSFmg

दरम्यान युक्रेनमध्ये अडकून पडलेल्या एका गुजराती विद्यार्थ्याने सांगितलं की, “आम्हाला युक्रेनच्या लोकांकडून त्यांच्या देशाची सीमा ओलांड्यापासून रोखण्यात आलं. चाळीस किमीची पायपीट करुन आम्ही युक्रेन-पोलंड सीमेवर पोहोचलो, मात्र यावेळी पोलिसांनी आम्हाला मारलं. भारत रशियाच्या बाजूनं असल्यानं आमच्यावर हा हल्ला झाला आहे असे त्या विद्यार्थ्याने सांगितले

साताऱ्यातील भरदिवसा टाकलेल्या दरोड्यात कामगाराचा हात : सातारा एलसीबीकडून तिघांना अटक

सातारा | शहरातील पोवई नाक्यावर दोन दिवसापूर्वी भरदिवसा बँकेत 1 लाख 52 हजार रुपये भरायला निघालेल्या कामगाराला रस्त्यात अडवून मारहाण करून दरोडा टाकला होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने (एलसीबी) या दरोड्यातील तिघांना अटक करण्यात आली असून, अजून तीन संशयितांचा शोध सुरु आहे. दरम्यान, दुकानात काम करणार्‍या कामगारानेच हा कट रचल्याचे पोलिसांना तपासात समोर आले आहे. शुभम हनुमंत साठे उर्फ ऋषीकेश, गौरव अशोक भिसे उर्फ ट्यॅटू, राकेश कृष्णा सोनकांबळे (तिघे रा. मल्हारपेठ, सातारा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तक्रारदार धर्मराज गुंजले व संशयित राकेश सोनकांबळे हे सातार्‍यातील एका हार्डवेअरच्या दुकानात काम करत आहेत. शुक्रवारी दि. 25 रोजी गुंजले दुकानातील 1 लाख 52 हजार रुपयांची रक्कम बँकेत भरण्यासाठी पोवई नाक्याकडे जात असताना, त्याला रस्त्यात अडवून चार संशयितांनी मारहाण करत रक्कम चोरली. पैसे चोरुन नेत असताना तक्रारदार यांनी प्रतिकार केला हाेता. भरदिवसा घडलेल्‍या या घटनेने परिसर हादरुन गेला. सातारा शहर व एलसीबी याचा तपास करत असताना एलसीबीला तपासाला यश आले.

तपासामध्ये संशयित राकेश सोनकांबळे याने कट रचून इतर संशयितांना पैसे भरणाची माहिती देवून प्लॅन केल्याचे तपासात समोर आले. पोलिसांनी रोख 51 हजार 500 रुपये, 2 मोबाईल, दुचाकी असा 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक अजित बोर्‍हाडे, पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार गणेश वाघ, पोलीस उत्तम दबडे, संतोष पवार, संतोष सपकाळ, संजय शिर्के, विजय कांबळे, कांतीलाल नवघणे, शरद बेबले, मंगेश महाडिक, प्रवीण फडतरे, निलेश काटकर, मुनीर मुल्ला, अर्जुन शिरतोडे, अमित सपकाळ, विशाल पवार, मयुर देशमुख यांनी कारवाईत सहभाग घेतला.

“ताकाला जाऊन मला भांड लपवायची सवय नाही, मी मतांची भिक मागायला आलोय” – चंद्रकांत पाटील

chandrakant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आगामी महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने भाजपकडून जोरदार तयारी केली जात आहे. अनेक ठिकाणी जाऊन भाजप नेत्यांकडून महत्वाचं विधाने केली जात आहेत. दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एक विधान केले. “मी पुणे महानगरपालिकेसाठी मतांची भीक मागायला आलोय आणि तुमची मतं बुक करायला आलेलो आहे. ताकाला जाऊन मला भांड लपवायची सवय नाही,” असे पाटील यांनी म्हंटले आहे.

भाजपच्या वतीने पुणे येथे आगामी महानगर पालिका निवडणुकीच्या दृष्टीने मोर्चेबांधणी केली जात आहे. यासाठी ठिकठिकाणी सभाही घेतल्या जात आहेत. पुण्यात एका सभेत पाटील म्हणाले की, पुणे महापालिकेत नव्याने 34 गावे समाविष्ट झाल्यामुळे पुणे महानगरपालिकेचे लोकसंख्या तब्बल 70 लाखांवर गेली आहे. असे असताना प्रगती कशी होणार? त्यासाठी पुण्यामध्ये दोन महानगर पालिका व्हायला पाहिजे.

यावेळी चंद्रकांत पाटील यांनी पालकमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले की, महानगरपालिकेत गावे समाविष्ट करण्याला माझा विरोधच आहे. याने गावाच गावपण नष्ट होत. मात्र अजित पवारांना वाटत म्हणून ते निर्णय घेतात अशी टीका देखील पाटील यांनी अजित पवारांवर केली आहे.

चांगल्या आर्थिक भविष्यासाठी ‘या’ पाच मार्गांचा वापर करा

post office

नवी दिल्ली । गेली दोन वर्षे कोरोना मुळे लोकांसाठी खूप अवघड गेली आहेत. या दरम्यान अनेकांच्या नोकऱ्या गेल्या तर काहींना पगारात कपातीला सामोरे जावे लागले. तसेच काहींचे व्यवसाय देखील ठप्प झाले. अशातच उपचाराचा खर्चही प्रचंड वाढला. अशा परिस्थितीत अनेक लोकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला.

मात्र, गेल्या दोन वर्षांत लोकांना आर्थिक नियोजनाचे महत्त्वही कळून चुकले आहे. अशा परिस्थितीत, पुढील आर्थिक वर्ष सुरू होण्यापूर्वी म्हणजेच 2022-23, तुमचा आर्थिक आराखडा तयार करा जेणेकरून वर्षभर पैशांचे मॅनेजमेंट करता येईल. आपली कमाई मॅनेज करण्यासाठी नवीन आर्थिक वर्षापासून वापरता येतील असे पाच मार्ग खाली देण्यात आले आहेत.

बजट निश्चित करा
आपल्या खर्चाचा मागोवा ठेवणे ही आर्थिक नियोजनाची पहिली पायरी आहे. यावरून आपण कुठे आणि किती खर्च करत आहोत हे कळते. यावरून आपल्याला खर्च कुठे कमी करणे आवश्यक आहे हे देखील कळून येते. याची नोंद ठेवण्यासाठी अ‍ॅपची देखील मदत घेता येते, जे तुमच्या सर्व ट्रान्सझॅक्शनचे रेकॉर्ड ठेवेल. याद्वारे तुम्ही तुमच्या खर्चाचा प्राधान्यक्रमही ठरवू शकता.

ध्येयांचे पुनरावलोकन करत रहा
आपल्या आर्थिक उद्दिष्टांचे पुनरावलोकन करत रहा. प्रत्येक व्यक्ती आपल्या कमाईची ठराविक रक्कम सेव्हिंग, इन्व्हेस्टमेंट इत्यादींमध्ये विशिष्ट ध्येय ठेवून वाटप करते. नवीन वर्ष सुरू झाल्यावर, तुमची इच्छा असेल तर तुम्ही त्या उद्दिष्टांचा पुनर्विचार करू शकता. यासह, आपण नवीन वर्षासाठी नवीन ध्येय जोडू इच्छित असाल. उदाहरणार्थ, पूर्वी तुम्ही 10 वर्षांनंतर घर घेण्याचा विचार करत होता, मात्र तुमच्या वाढलेल्या उत्पन्नामुळे तुम्हाला ते लवकर मिळेल. त्यामुळे तुम्ही घर खरेदीसाठी दिलेली मासिक रक्कम वाढवू शकता.

इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ पुनरावलोकन
जर तुम्ही आधीपासूनच इन्व्हेस्टमेंट करत नसाल तर ती सुरू करण्यासाठी आणि मजबूत इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ तयार करण्यासाठी ही चांगली वेळ आहे. मात्र, जर आपल्याकडे आधीपासूनच पोर्टफोलिओ असेल तर आपण त्याचे पुनरावलोकन करू शकता. आपल्या पोर्टफोलिओचा ट्रॅक रेकॉर्ड वेळोवेळी तपासून, आपली गुंतवणूक कशी कामगिरी करत आहे हे तुम्हाला कळू शकेल.

इन्शुरन्स कव्हर
आपत्कालीन परिस्थितीत इन्शुरन्स खूप उपयुक्त ठरतो. हेल्थ इन्शुरन्स आणि लाईफ इन्शुरन्स प्रत्येक व्यक्तीसाठी आणि कुटुंब प्रमुखासाठी खूप महत्त्वाचा आहे. अशा परिस्थितीत, जर तुमचा इन्शुरन्स एक्सपायर होत असेल तर त्याचे रिन्यूअल करण्याची वेळ आली आहे आणि जर तुमचे कुटुंब अलीकडे लग्नामुळे किंवा मुलांच्या जन्मामुळे वाढले असेल तर इन्शुरन्समध्ये सुधारणा करणे देखील महत्त्वाचे आहे.

टॅक्सचे प्लॅनिंग
टॅक्सचे प्लॅनिंग हा आर्थिक नियोजनाचा सर्वात महत्वाचा भाग आहे. जर तुम्ही आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला टॅक्सचे प्लॅनिंग केले तर तुम्हाला गुंतवणुकीची गणना करण्यासाठी आणि जास्तीत जास्त टॅक्स वाचवण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल. याच्या मदतीने तुम्ही तुमची गुंतवणूक वर्षभर योग्य पद्धतीने करू शकता.

युक्रेन – रशिया युद्धाचा भारताला मोठा फटका; खाद्यतेल महागणार

edible oil

नवी दिल्ली । युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम भारतातही पाहायला मिळणार आहे. या युद्धामुळे भारतात खाद्यतेलाच्या किंमती वाढू शकतात. याचे मुख्य कारण म्हणजे रशिया आणि युक्रेन हे दोन्ही सूर्यफूल तेलाचे मोठे उत्पादक आहेत. रशिया आणि युक्रेन युद्धामुळे या दोन्हींच्या पुरवठ्याची कमतरता होईल ज्यामुळे किंमती आणखी वाढतील. इतर देशांच्या तुलनेत याचा भारताला जास्त त्रास होईल, कारण देशाच्या सूर्यफूल तेलाच्या आयातीपैकी 90 टक्के रशिया आणि युक्रेनमधून येते.

वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, भारत दरवर्षी सुमारे 2.5 मिलियन टन (mt) सूर्यफूल तेल वापरतो, मात्र ते केवळ 50,000 टन सूर्यफूल तेलाचे उत्पादन करते आणि उर्वरित आयात करते. सर्व खाद्यतेलाच्या आयातीमध्ये सूर्यफूल तेलाचा वाटा 14 टक्के आहे. पाम (8-8.5 मिलियन टन), सोयाबीन (4.5 मिलियन टन) आणि मोहरी/रेपसीड (3 मिलियन टन) नंतर हे चौथ्या क्रमांकाचे खाद्यतेल आहे. सूर्यफूल तेलाची किंमत फेब्रुवारी 2019 मध्ये 98 रुपये प्रति लिटरवरून फेब्रुवारी 2022 मध्ये 161 रुपये प्रति लिटर झाली.

भारताची सूर्यफूल तेलाची आयात 2019-20 (एप्रिल-मार्च) मध्ये 2.5 मिलियन टन आणि 2020-21 मध्ये 2.2 मिलियन टन आहे, ज्याचे मूल्य $1.89 अब्ज आणि $1.96 अब्ज आहे. युक्रेनमधून ते 2019-20 मध्ये 1.93 मिलियन टन ($1.47 अब्ज) आणि 2020-21 मध्ये 1.74 मिलियन टन ($1.6 अब्ज) आयात करते, रशियासह ते सुमारे 0.38 मिलियन टन ($287 मिलियन ) आणि 0.28 मिलियन टन ($287 मिलियन टन) आयात करते.

आयातीवर अवलंबून राहण्याचे सर्वात मोठे कारण
आनंद राठी शेयर्स आणि स्टॉक ब्रोकर्सचे इनवेस्टमेंट सर्व्हिसेजचे सीईओ रूप भूत म्हणाले, “उच्च तेलाच्या किंमती भारतासाठी नेहमीच जोखमीचे घटक असतात, ज्यात आयात हा एक प्रमुख घटक असतो. मात्र, तेलाच्या किंमतीतील सध्याची हालचाल प्रामुख्याने युक्रेनच्या संकटामुळे आहे आणि काही काळाने शांत व्हायला हवी.”

खाद्यतेलाच्या किंमती वाढल्या
जागतिक स्तरावर आणि भारतात, महामारी सुरू झाल्यापासून खाद्यतेलाच्या किंमती सातत्याने वाढत आहेत. ही वाढ एवढी झपाट्याने आहे की भारत सरकारला किंमतीतील वाढ रोखण्यासाठी अनेक उपाययोजना कराव्या लागल्या.”

गांजा न मिळाल्यामुळे मलिकांची तब्येत बिघडली; मोहित कंबोज यांची टीका

Mohit Kamboj Nawab Malik

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ईडी कस्टडी मध्ये असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांची तब्ब्येत बिघडल्याने त्यांना मुंबईतील जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यावरून भाजप नेते मोहित कंबोज यांनी नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला आहे. गांजा न मिळाल्यामुळे मलिक यांची तब्ब्येत बिघडली असे म्हणत त्यांची ड्रग टेस्ट करावी अशी मागणी मोहित कंबोज यांनी केली

मोहित कंबोज यांनी ट्विट करत म्हंटल की, नवाब मलिकांची नक्की तब्येत कशामुळे बिघडली? हम झुकेंगे लेकिन हम पीटेंगे जरूर आणि आता बहाना करुन मलिक रुग्णालयात दाखल झाले आहेत. कोण म्हणतंय नवाब मलिकांची तब्येत बिघडले ते घाबरले आहेत. आणि ते प्रचंड तणावात आहेत. अटक होण्याच्या एक दिवस आधी नवाब मलिक बलियावरुन घरी परतले होते. ते सकाळी घरी होते जेव्हा ईडीने त्यांना ताब्यात घेतलं.

नवाब मलिक रोज हर्बल तम्बाकू खातात. गांजाशिवाय नवाब मलिकांची झोप उडत नाही. कोणालाही विचारले तर सांगतील नवाब मलिक रोज गांजा ओढतात. गांजा न मिळाल्यामुळे त्यांच्यातील लक्षणे दिसू लागली आणि ते घाबरत आहेत. यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. माझी विनंती आहे की, डॉक्टरानी आणि केंद्रीय तपास यंत्रणांनी नवाब मलिकांची ड्रग्ज टेस्ट करावी. नवाब मलिकांचा अहवाल जाहीर करावा अशी मागणी त्यांनी केली

दरम्यान, ईडी कोठडीत असलेल्या अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची तब्बेत अचानक बिघडली असून त्यांना मुंबईतील जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. . किडनीमध्ये दुखत असल्यामुळे मलिकांना रुग्णलायात दाखल करण्यात आलय. डी गॅंग संबंधित व्यक्ती कडून जमीन खरेदी केल्याच्या आरोपाखाली नवाब मलिक याना अटक केली असून त्यांना ३ मार्च पर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे.

 

“दिल्लीच्या तख्त्यावर 2024 मध्ये शिवसेना बसणारच”; आदित्य ठाकरेंचे मोठे विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या केंद्र सरकारवर महात्राष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारकडून निशाणा साधला जात आहे. कारण भाजप केंद्र सरकारकडून तपास यंत्रणेचा वापर करून आघाडीतील नेत्यांवर कारवाई करत आहे. दरम्यान यावरून शिवसेना नेते तथा पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी आगामी 2024 मध्ये सत्तेच्या दृष्टीने महत्वाचे विधान केले आहे. ” 2024 मध्ये आपण सर्व दिल्लीत बसणार म्हणजे बसणारच, असे आदित्य ठाकरे यांनी म्हंटले आहे.

आज आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, नुकताच उत्तर प्रदेशातील दौरा केला. या ठिकाणी मी दिल्लीत जे बोललो ते उत्तर प्रदेशातही म्हंटले.सध्या केंद्र सरकारकडून महाराष्ट्रातून अनेक गोष्टी हलविण्याचे डाव सुरू आहेत. पण 2024 ला शिवसेना तिथे बसेल आणि सगले थांबेल. दिल्लीत सत्तेत बसल्यावर शिवसेना प्रत्येक राज्याला न्याय देईल.

सध्या केंद्रीय एजन्सीकडून केले जात असलेले जे काम आहे, ते केवळ प्रचारासाठीच सुरू आहे. कोणतेही राज्य अशा प्रकारच्या एजन्सीला घाबरणार नाही, झुकणार नाही. प्रत्येक राज्यात शिवसेना निवडणूक लढेल. राज्यातील नानक पक्ष नाटकी करतात, आपण परखडपणे बोलतो. मराठी भाषा दिल्लीच्या तख्तापुढे झुकली नाही आणि आजही मराठी दिल्लीपुढे झुकणार नाही, असे मत आदित्य ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केले.