Saturday, December 27, 2025
Home Blog Page 2718

विंगमध्ये तब्बल 25 वर्षानंतर सत्तांतर : काॅंग्रेसला नाराजीचा फटका

कराड | विंग येथील विकास सेवा सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणूकीत काॅंग्रेसच्या नाराज गटाच्या मदतीने जय हनुमान सहकार पॅनेलच्या उमेदवारांनी 11- 2 असा विजय मिळवित सत्तांतर घडविले. विंग येथील सोसायटीत तब्बल 25 वर्षानंतर संत्तापालट झाली. जय हनुमान सहकार पॅनेलने विजय मिळवल्यानंतर गुलालाच्या उधळणीत मिरवणुक काढत विजयोत्सव साजरा केला.

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीमुळे कराड दक्षिण व कराड उत्तर विधानसभा मतदार संघातील विकास सेवा सोसायट्याच्या निवडणुकांना मोठे महत्व प्राप्त झाले आहे. कराड दक्षिणमधील विभागात सोसायटीची मोठी सभासद संख्या आहे. त्यामुळे या निवडणूकीकडे सर्वाचे लक्ष लागून राहते. यावेळची निवडणूक पहिल्यादाच अटीतटीची झाली असून चांगलीच गाजली. स्थानिक पातळीवर अॅड. उदयसिंह पाटील (दादा) – आ. पृथ्वीराज चव्हाण (बाबा) यांच्या विचाराच्या लक्ष्मीदेवी ग्रामविकास पॅनेल विरूध्द अतुल भोसले व नाराज काॅंग्रेस गट यांच्या विचाराच्या जय हनुमान सहकार पॅनेलमध्ये लढत झाली. काल मतदानानंतर सायंकाळी मतमोजणी झाली.

काल झालेल्या निवडणुकीत 11 विरूध्द 2 च्या फरकाने जय हनुमान सहकार पॅनलने सत्तातंर घडविले. तब्बल 25 वर्षानंतर सत्ता ताब्यात घेतली. माजी सरपंच बबनराव शिंदे, उपसरपंच सचिन पाचुपते, प्रा. हेंमत पाटील, जयवंत माने, संपतराव खबाले, संपत खबाले यांच्या मार्गदर्शनाखाली जय हनुमान सहकार पॅनेलच्या अनिल कणसे, आनंदा सोपान खबाले, जयवंत शिवाजी खबाले, राजेंद्र परशराम खबाले, रामदास सदाशिव खबाले, अनिल भिमराव पाटील, निवासराव शिंदे, अंकूश होगले, सिंधुताई पाटील, शोभा आण्णा माने, कृष्णत सोनावले यांनी विजय संपादन केला. राजेंद्र लक्ष्मण कुंभार, व सागर डाळे लक्ष्मीदेवी ग्रामविकास पॅनेलचे दोनच उमेदवार विजयी ठरले.

दिशा सलियन प्रकरणी तक्रार दाखल होताच नितेश राणेंनी केले ‘हे’ ट्विट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | दिशा सलियनबाबत बदनामीकारक वक्तव्य केल्याने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच सलियाबाबत खोटी माहिती दिल्याबद्दल आमदार नितेश राणे, चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याबाबत नितेश राणे यांनी ट्विट केले आहे. “विनाश काले विपरीत बुद्धि,” असे ट्विट क्रिया या प्रकरणी आपली भूमिका मांडली आहे.

दिशा सलियन यांच्याबाबत बदनामीकारक वक्तव्य केल्याने सलियनबाबत केलेल्या वक्तव्याची गंभीर दखल महिला आयोगाने घेतली. आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी थेट गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले. या प्रकरणी आता नितेश राणे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट केले आहे. त्यांनी या प्रकरणी त्यांच्याबाबत केलेल्या तक्रारीबाबत “विनाश काले विपरीत बुद्धि !!!,” अशा शब्दात ट्विट केले आहे.

दरम्यान या प्रकरणी रुपाली चाकणकरांकडून थेट गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले असून त्या केलेल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “दिवंगत दिशा सॅलियनची बलात्कार करून हत्या करण्यात आली आहे असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले होते.तिच्या शवविच्छेदन अहवालानुसार तिच्यावर बलात्कार झालेला नसून ती गरोदर सुद्धा नव्हती हे मालवणी पोलिसांनी राज्य महिला आयोगाला दिलेल्या अहवालात स्पष्टपणे नमूद केले आहे.

मृत्यूपश्चात देखील होत असलेल्या आपल्या मुलीच्या बदनामीमुळे व्यथित झालेल्या दिशा सॅलियनच्या आई वडिलांनी या संदर्भात दिशाच्या मृत्यूबाबत खोटी व बदनामीकारक माहिती देणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे, आ.नितेश राणे व संबंधित सर्व व्यक्तींवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

रशियाकडून युक्रेनला चर्चेचा प्रस्ताव, पण युक्रेन राष्ट्राध्यक्षांनी ठेवली ‘ही’ अट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये जोरदार युद्ध सुरूच असून अजूनही रशिया कडून युक्रेन वर गोळीबार आणि बॉम्ब हल्ले सुरूच आहेत. याच पार्श्वभूमीवर अनेक युरोपिअन देशांनी रशिया वर काही निर्बंध लादले आहेत. या सर्व घडामोडींदरम्यान रशियाने युक्रेन समोर बेलारूस मध्ये चर्चेचा प्रस्ताव ठेवला आहे.

रशियाने बेलारुसमध्ये चर्चेसाठी प्रस्ताव दिल्यानंतर युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांनी आपण तयार असल्याचं म्हटलं. मात्र बेलारूसमध्ये चर्चा करायला आपण तयार नाही असे त्यांनी सांगितले. कारण बेलारूसचा हल्ल्यासाठी लाँचपॅड म्हणून वापर केल्याचा आरोप त्यांनी केलाय. चर्चा करायचीच असेल तर बेलारूस ऐवजी इंग्लंड, हंगेरी, ब्रातिस्लावा, बुडापेस्ट, इन्स्ताबुल किंवा बाकु यापैकी कोणत्याही ठिकाणी चर्चा करण्यासाठी तयार आहे असं झेलेन्स्की यांनी सांगितले.

दरम्यान, युक्रेन मध्ये भीतीदायक परिस्थिती असून युक्रेनच्या मदतीला अद्याप कोणीही आलेले नाही. नाटो सदस्य असलेल्या देशांनीही हात वर केल्याने युक्रेन एकाकी पडला आहे. परिस्थिती हाताबाहेर जाण्याची वेळ येताच अमेरिका राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी रशियाला इशारा दिला आहे. आता तिसर महायुद्ध हाच अंतिम उपाय आहे असं त्यांनी म्हंटल.

NSE Scam : आनंद सुब्रमण्यमच आहे हिमालय बाबा; CBI लवकरच करणार खुलासा

नवी दिल्ली । नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) च्या माजी MD आणि CEO चित्रा रामकृष्ण या ज्याच्या सांगण्यावरून निर्णय घेत असे तो हिमालयीन योगी बाबा दुसरा कोणीही नसून आनंद सुब्रमण्यनच आहे. अर्न्स्ट अँड यंगच्या (E&Y) तपासणीत असे अनेक पुरावे सापडले आहेत, ज्यावरून असे सूचित होते कि हा रहस्यमय हिमालयीन योगी बाबा दुसरा कोणीही नसून सुब्रमण्यमच आहे.

E&Y ने सांगितले की, या तपासात NSE चे माजी ग्रुप ऑपरेटिंग ऑफिसर आनंद सुब्रमण्यम यांच्या चेन्नईच्या निवासस्थानापासून अवघ्या 13 मीटर अंतरावर दोन जिओटॅग केलेले फोटो, हिमालयन योगी बाबाने बुक केलेले हॉटेल (सुब्रमण्यम यांनी पेमेंट केले होते), योगी यांना पाठवलेले ईमेलचे अटॅचमेंट आणि याच्या काही मिनिटांपूर्वी योगी आणि सुब्रमण्यमच्या संभाषणात वापरलेल्या वाक्यांची समानता यासारखे पुरावे हे दर्शवतात कि योगी दुसरा कोणी नसून आनंद सुब्रमण्यम आहे.

CBI काही दिवसांत खुलासा करेल
हा तोच योगी आहे ज्यांच्यासाठी चित्रा रामकृष्ण यांच्यावर बाजारातील गोपनीय माहिती लीक केल्याचा आरोप आहे. CBI ने 2018 मध्ये एक्सचेंजमध्ये फेरफार केल्याप्रकरणी सुब्रमण्यम यांना अटक केली आहे. चित्रा रामकृष्ण यांनी आनंद सुब्रमण्यम यांच्या नियुक्तीमध्ये नियमांचे उल्लंघन केल्याचे आणि [email protected] या ईमेल आयडीद्वारे हिमालयन योगी यांच्याशी NSE ची गोपनीय माहिती शेअर केल्याच्या सेबीच्या रिपोर्टनंतर ही अटक करण्यात आली. CBI म्हणते की, त्यांच्याकडे E&Y चा रिपोर्टआहे. येत्या काही दिवसांत ते या गोष्टी उघड करणार आहे.

फोटोंचे एकच लोकेशन
E&Y चे निष्कर्ष जानेवारी 2000 ते मे 2018 दरम्यान रामकृष्ण, सुब्रमण्यम आणि हिमालयन योगी यांच्यातील परस्परसंवादाच्या विश्लेषणावर आधारित आहेत. रामकृष्ण एप्रिल 2013 ते डिसेंबर 2016 पर्यंत NSE चे MD आणि CEO होते. सुब्रमण्यम यांची नियुक्ती याच काळात झाली. E&Y म्हणतात की,” त्यांनी अटॅचमेंट असलेल्या 17 ईमेलचे विश्लेषण केले. यामध्ये आठ फोटोंचा समावेश होता, त्यापैकी दोन जिओटॅग करण्यात आले होते. दोन्ही फोटोंचे लोकेशन सुब्बू (सुब्रमण्यम) यांच्या चेन्नईतील निवासी पत्त्याजवळ होते. या फोटोंचे कॅप्चर केलेले लोकेशन रिग्याजुर्समाने पाठवलेल्या फोटोंच्या कॅप्चर केलेल्या लोकेशन सारखेच होते.

उम्मेद भवन पॅलेसमध्ये बुकिंग आणि 237984 रुपयांचे पेमेंट
E&Y रिपोर्टमध्ये असे म्हटले गेले आहे की, उम्मेद भवन पॅलेसमध्ये केलेले बुकिंग हा आणखी एक पुरावा आहे. 1 डिसेंबर 2015 रोजी [email protected] वरून रामकृष्ण (सुब्रमण्यमसाठी देखील चिन्हांकित) यांना ईमेल पाठवण्यात आला. कांचनची (सुब्रमण्यमचा संदर्भ) रजा मंजूर झाली आहे आणि उम्मेद भवन येथे एमईच्या वतीने बुकिंग करण्यात आल्याचे सांगण्यात आले. सुब्बूच्या बँक स्टेटमेंटनुसार, 27 नोव्हेंबर 2015 रोजी उम्मेद भवन पॅलेसला 237984 रुपयांचे पेमेंटही करण्यात आले होते.

सुब्रमण्यम यांच्या यूझर प्रोफाइलमध्ये सानंद यांचा उल्लेख आहे
E&Y ने सुब्रमण्यम यांना NSE कडून मिळालेल्या डेस्कटॉपवर वापरलेल्या स्काईप प्रोफाइलचे विश्लेषण केले. शेअर केलेल्या डेस्कटॉपवरील सुब्रमण्यम यांच्या यूझर प्रोफाइलमध्ये सानंदचा उल्लेख असल्याचे आढळून आले. विंडोज प्रोफाईल सानंदशी संबंधित डेस्कटॉप डेटाच्या पुनरावलोकनातून असे दिसून आले की, anand.subramanian9 आणि siromani.10 या नावांखालील स्काईप अकाउंट स्काईप ऍप्लिकेशन डेटाबेसमध्ये कॉन्फिगर करण्यात आले होते.

siromani.10 आणि रामकृष्ण यांची भाषा एकच आहे
sironmani.10 यूझर प्रोफाइल नाव असलेले स्काईप अकाउंट [email protected] या ईमेल आयडीशी आणि मोबाइल क्रमांक +9191675774 12 (हा क्रमांक NSE ने सुब्बूला दिला होता) शी लिंक केले होते. siromani.10 ने रामकृष्णांशी स्काईप चॅटमध्ये जी भाषा वापरली होती ती भाषा [email protected] वरून रामकृष्णांशी संवाद साधण्यासाठी वापरल्या जाणार्‍या भाषेसारखीच होती असा निष्कर्षही निघाला.

कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किंमतीपासून सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकार उचलणार ‘हे ‘ पाऊल

Crude Oil

नवी दिल्ली । रशिया-युक्रेन संकटामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. जगातील तिसरा सर्वात मोठा तेल ग्राहक असलेला भारत आपल्या गरजेच्या 85 टक्के तेल खरेदी करतो. अशा परिस्थितीत महागडे क्रूड भारताला आयात बिलाच्या आघाडीवर झटका देऊ शकते. त्यामुळे व्यापार तूटही वाढेल.

हे धक्के टाळण्यासाठी आणि सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी, सरकार आपल्या स्ट्रॅटेजिक ऑइल रिझर्व्हचा वापर करू शकते. नोव्हेंबरमध्ये सरकारने या तेलसाठ्यातून 50 लाख बॅरल तेल काढण्याचा निर्णय घेतला होता. यातून आतापर्यंत 35 लाख बॅरल तेल काढण्यात आले आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामुळे 24 फेब्रुवारी रोजी आंतरराष्ट्रीय ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल $ 105.58 च्या ऑल टाईम हायवर पोहोचली.

जागतिक बाजारपेठेवर सरकारचे लक्ष आहे
पेट्रोलियम मंत्रालयाचे म्हणणे आहे की,”भारत सरकार जागतिक ऊर्जा बाजारांवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. बदलत्या भू-राजकीय परिस्थितीमुळे ऊर्जेच्या पुरवठ्यातील व्यत्ययांची माहिती मिळू शकते. सध्याचा पुरवठा स्थिर किंमतीत सुरू राहावा यासाठी भारत योग्य पावले उचलण्यास तयार आहे.”

ग्राहक किंमतीवर परिणाम झाल्याचा उल्लेख नाही
आंतरराष्ट्रीय किंमतीत झालेल्या वाढीमुळे ग्राहकांच्या किंमतींवर होणाऱ्या परिणामाचा या निवेदनात उल्लेख करण्यात आलेला नाही. त्यात असे म्हटले गेले आहे की, भारत धोरणात्मक पेट्रोलियम साठ्यांमधून तेल सोडण्याच्या, बाजारातील अस्थिरता कमी करण्यासाठी आणि कच्च्या तेलाच्या किंमतीत होणारी वाढ रोखण्याच्या उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी वचनबद्ध आहे.

50 लाख बॅरल तेल सोडण्याचे मान्य केले
आंतरराष्ट्रीय तेलाच्या किंमती खाली आणण्यासाठी अमेरिका, जपान आणि इतर प्रमुख अर्थव्यवस्थांसह भारताने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये आपल्या आणीबाणीच्या साठ्यातून 50 लाख बॅरल कच्चे तेल सोडण्याचे मान्य केले होते. तेव्हा कच्च्या तेलाची आंतरराष्ट्रीय किंमत प्रति बॅरल 82-84 डॉलर होती. मात्र भारत किती प्रमाणात क्रूड सोडेल हे या निवेदनात सांगितले गेलेले नाही.

रशिया दररोज 50 लाख बॅरल कच्चे तेल विकतो
रशिया हा जगातील दुसरा सर्वात मोठा तेल निर्यातदार आणि तिसरा सर्वात मोठा उत्पादक देश आहे. रशिया दररोज 50 लाख बॅरल कच्च्या तेलाची निर्यात करतो. 48 टक्के युरोप आणि 42 टक्के आशियाई देश रशियावर अवलंबून आहेत. त्यामुळे रशियाकडून होणाऱ्या आयातीकडे दुर्लक्ष करता येणार नाही. सध्या जगातील सर्वात मोठा तेल निर्यातदार असलेला सौदी देशही रशियाच्या पाठीशी उभा असल्याचे दिसत आहे.

हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक मिरजेच्या मिरासाहेब ऊरूसास प्रारंभ

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेल्या मिरजेच्या मिरासाहेब यांच्या ऊरूसास प्रारंभ झाला. सातपुते वाड्यातून चर्मकार समाजाचा मानाचा गलेप सकाळी सात वाजण्याच्या सुमारास मिरासाहेब यांना अर्पण करण्यात आला. पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होती. महाराष्ट्रासह इतर राज्यातूनही भाविक मिरजेच्या मिरासाहेब ऊरूसास येत असतात. 647 वा चर्मकार समाजाचा मानाचा पहिला गलेफ भक्तिमय वातावरणात अर्पण करण्यात आला.

हजरत ख्वाजा शमनामिरा मिरज दर्गाचा मानाच्या गलेफसाठी दर वर्षी चार राज्यातून भाविक येतात, हजारो भक्त दरसाल येतात गेले दोन वर्ष कोरोनाचे सावट असल्याने गर्दी मर्यादित होती, पण यावेळी शिथिल असल्याने गलेफ भक्तिमय वातावरणात अर्पण करण्यात आला. नेहमी प्रमाणे मिरजेतील मधली गल्ली,सातपुते वाडा येथून गलेफला प्रारंभ झाला, मंडई मार्ग दर्गा कमान येते नगराखाना कमानीतून पार होत, दर्ग्यात प्रवेश होऊन सूर्योदय पूर्वी गलेफ अर्पण झाला.

यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. यावेळी नियोजन बाबू सातपुते, हिरालाल सातपुते, श्रीकांत सातपुते, प्रशांत सातपुते, विशाल सातपुते, दत्ता सातपुते, विजय सातपुते, शरद सातपुते, दीपक सातपुते, किरण सातपुते, तानाजी सातपुते आदिनी केले तर यावेळी माजी महापौर इद्रिस नायकवडी, माजी सभापती आंनदा देवमाने,बबन दबडे, गंगाधर कुरणे अनेक मान्यवर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भाजपकडून गांधी पुतळा परिसरात गोमुत्र शिंपडून निषेध

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

मनी लॉंड्रिंग प्रकरणी इडीची कारवाई झालेल्या मलिक नवाबांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेसने गांधी पुतळ्या समोर निदर्शने केल्याने गांधी पुतळा परिसराची विटंबना झाली असे सांगून गोमूत्र शिंपडून भाजपने पवित्र केला. माजी आमंदार दिनकर पाटील आणि माजी स्थायी सभापती, नगरसेवक अजिंक्य पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपने हे शुद्धीकरण आंदोलन केले.

यावेळी बोलताना दिनकर पाटील म्हणाले बॉम्ब स्फोटात आरोपींकडून कमी दरात जमीन खरेदी करून चुकीचे काम करणाऱ्याचे समर्थन करणे निषेधार्ह आहे. अहिंसेचे पुजारी असणाऱ्या गांधीजी च्या पुतळ्यासमोर हिंसेचे समर्थन केल्याने एक प्रकारे पुतळ्याची विटंबना झाली आहे. म्हणून भाजपच्या वतीने शुद्धीकरण करण्यात आले. यावेळी सुनील पाटील, अरुण यादव, सर्जेराव चव्हाण, शहाजी पाटील,राहुल पाटील, प्रताप जामदार, संदीप जाधव,प्रवीण पाटील, शरद देशमुख, विजय पवार आदी उपस्थित होते.

युक्रेनमध्ये अडकले सांगली जिल्ह्यातील दहा विद्यार्थी, विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरु

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

रशिया आणि युक्रेन युद्ध सुरु आहे. या युद्धाची झळ युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना बसला आहे. युद्धजन्य परिस्थितीत प्रचंड तणावाचे वातावरण असताना देशाची चिंता वाढली असताना सांगली जिल्ह्यातील दहा विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले असल्याची जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली. काही विद्यार्थ्यांना सुरक्षित युक्रेनमधून सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले असल्याचे समजते. मात्र या विद्यार्थ्यांचे पालक चिंतेत आहेत.

विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. चार विमाने पाठविण्यात येणार असल्याने युक्रेनमधील विद्यार्थी लवकरच परततील, अशी शक्यता व्यक्त होत आहे. रशियाकडून युक्रेनमधील महत्वाच्या शहरांवर हल्ले करण्यात येत आहेत. या युद्धजन्य परिस्थितीत प्रचंड तणावाचे वातावरण असताना, भारताची चिंता वाढली आहे. शिक्षणासाठी युक्रेनमध्ये गेलेले शेकडो विद्यार्थी तिथे अडकले आहेत. यामध्ये सांगली जिल्ह्यातील दहा विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

या विद्यार्थ्यांनी भारत सरकारकडे मदत मागितली आहे. तर त्याची सर्व माहिती जिल्हा नियंत्रण विभागामार्फत सरकारकडे पाठविण्यात आली आहे. जिल्ह्यातील पार्थिव विजय सुतार युनिर्व्हसिटी इन कार्कीव, अभिषेक प्रकाश पाटील लीईव्ह युनिर्व्हसिटी, प्रथमेश सुनिल हंकारे लिव्हीव्ह, तोहिद बशीर मुल्ला, विशाल सुभाष मोरे, आदित्य अर्जुन पुसावळे, स्नेहल नवनाथ सावंत, संध्या रामचंद्रा, कोमल तानाजी लवटे लिनिव्हो फान्सिस्क, यश मनोज पाटील बुकोव्हीन युनिर्व्हसिटी याठिकाणी असलेले विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत.

“उद्धव ठाकरे यांचे पुन्हा ‘सूड दुर्गे सूड’…”; अतुल भातखळकर यांची मुख्यमंत्र्यांवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | दिशा सलियनबाबत बदनामीकारक वक्तव्य केल्याने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावरून भाजप नेते अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांनी दिशा सलियन खून प्रकरणी वाचा फोडल्याबद्दल केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांच्या विरोधात तक्रार केली आहे. अशा या खुनशी ठाकरे सरकारचा निषेध आम्ही करत आहोत, असे भातखळकर यांनी म्हंटले आहे.

आज केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ट्विट करीत मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, ‘उद्धव ठाकरे यांचे पुन्हा ‘सूड दुर्गे सूड’…दिशा सालीयन प्रकरणाला वाचा फोडल्याबद्दल केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांच्याविरोधात FIR. खुनशी ठाकरे सरकारचा निषेध’, असे भातखळकर म्हणाले आहेत.

दरम्यान, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काही दिवसापूर्वी दिशा सालियनवर लैंगिक अत्याचार करून हत्या झाली तसेच ती गरोदरही होती, असा दावा यांनी केला होता. त्यावर सालियन कुटुंबीयांनी आक्षेप घेत आमच्या मुलीची बदनामी थांबवा, असे आवाहन केले होते. तसेच या प्रकरणी सालियन कुटुंबीयांनी राज्य महिला आयोगाकडेही दाद मागितली होती. त्यानंतर आज प्रत्यक्ष मंत्री नारायण राणे, नितेश राणे व चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.