Saturday, December 27, 2025
Home Blog Page 2719

जर तुम्हीही करदाते असाल तर तातडीने करा ‘हे’ काम; उद्या आहे शेवटची तारीख !

Share Market

नवी दिल्ली । इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने भरलेल्या इन्कम टॅक्स रिटर्नचे व्हेरिफिकेशन /ई-व्हेरिफिकेशन करून घेण्यासाठी करदात्यांना नोटीस बजावली आहे. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने 2019-20 या आर्थिक वर्षासाठी इन्कम टॅक्स रिटर्नचे व्हेरिफिकेशन / ई-व्हेरिफिकेशनची अंतिम मुदत 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत वाढवली आहे. आता इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने ट्विटद्वारे करदात्यांना या मुदतीची आठवण करून दिली आहे.

जोपर्यंत करदात्यांचे ITR व्हेरिफाय होत नाही तोपर्यंत ITR दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण मानली जात नाही. जर ITR वेळेवर भरला गेला असेल मात्र ITR व्हेरिफाय केला गेला नसेल, तर ITR फाइल करण्याची प्रक्रिया पूर्ण मानली जाणार नाही.

ITR व्हेरिफाय करण्याचे मार्ग
तुम्ही तुमचा ITR ऑनलाइन तसेच ऑफलाइन व्हेरिफाय करू शकता. तुमचा ITR ई-फायलिंग वेबसाइटवर अपलोड झाल्यानंतर, आयटी विभाग तुम्हाला तुमचा ITR व्हेरिफाय करण्यासाठी 120 दिवसांचा अवधी देतो. जर ते त्या दिवसात पूर्ण झाले नाही, तर आयटी कायद्यानुसार तुमचा टॅक्स भरणे इनव्हॅलिड होईल.

‘या’ 6 पद्धतींच्या मदतीने, ITR व्हेरिफाय केले जाऊ शकते…
1. बँक खात्याच्या मदतीने
2. नेटबँकिंगद्वारे
3. आधार OTP द्वारे
4. डीमॅट खात्याद्वारे
5. ATM च्या मदतीने
6. ऑफलाइन मोड

ITR E-Verify कसे करावे ?
>> ई-व्हेरिफिकेशन प्रक्रिया सुरू करण्यासाठी ई-फायलिंग पोर्टलवरील ‘ई-व्हेरिफाय रिटर्न’ क्विक लिंकवर क्लिक करा.
>> यानंतर पॅन, मूल्यांकन वर्ष इत्यादी आवश्यक माहिती भरा.
>> आता ‘e-verify’ वर क्लिक करा.
>> यानंतर तुम्हाला तुमचा ई-व्हेरिफिकेशन कोड (EVC) जनरेट होईल.

उदयनराजे यांचे स्टंट म्हणजे वाऱ्यावरची वरात : आ. शिवेंद्रसिंहराजे

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

खा.उदयनराजे भोसले यांनी गाडीवर बसून हवेतून येण्याचा केलेला स्टंट म्हणजे वाऱ्यावरची वरात असल्याची टीका आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी केली आहे. खा. उदयनराजे यांची सर्व कामे ही नुसती वाऱ्यावरची असतात. त्यामुळे ते असले स्टंट ते करू शकतात. आपल्याला मात्र असलं काही हवेतल जमणार नसल्याची खोचक टीका देखील साताऱ्यातील एका कार्यक्रमात केली.

सातारा येथे श्री सुवर्ण गणेश नागरी सहकारी पंतसंस्थेच्या 16 व्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, निवडणुकीच्या आधी सहा महिन्यात कामे वाऱ्यावरती दाखवायची. परवा काही आपण स्टंट बघितले, ते वाऱ्यावरचे प्रकार आहे. कारण यांची सगळी कामे वाऱ्यावरती आहेत, जमीनीवरती काही नाहीत. आम्ही आपली स्वतःच्या पैशाने गाडी घेतली आहे, त्यामुळे रस्त्यावरच चालवत असतो.

साताऱ्यात काही दिवसावर सातारा नगरपालिकेची निवडणुकीचा बिगूल वाजणार आहे. त्या अगोदर दोन्ही राजे एकमेकांवर जोरदार हल्लाबोल करण्याची एकही संधी सोडत नाहीत. छ. उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित चला हवा येऊ द्या कार्यक्रमात बाईकवरून हवेतून एंन्ट्री केली होती. त्यावर आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी खोचक टीका केली आहे.

पीटलाईन पाठोपाठ जालन्यात ‘लोको शेड’ची तयारी

Railway

औरंगाबाद – जालन्यात पिटलाईन सोबतच ‘लोको शेड’ तयार करण्याची तयारी सुरू आहे. लोको शेड म्हणजे रेल्वे इंजिन ची देखभाल दुरुस्ती करणारी जागा. पीटलाईनचे काम करतानाच प्रस्तावित लोको शेडचे डिझाईन तयार होणार आहे. लोको शेड झाल्यास मराठवाड्याला त्याचा फायदा होणार असून भंगार रेल्वे इंजिन पासून कायमची सुटका होईल अशी आशा व्यक्त होत आहे.

अनेक वर्षापासून मराठवाड्यात लोको शेडची मागणी होत आहे. पूर्वी मीटरगेज असताना पूर्णा येथे लोको शेड होते. ब्रॉडगेज झाल्यावर ते बंद करण्यात आले. दक्षिण मध्य रेल्वेकरडून मराठवाड्याला मुख्य करून मौला-अली, गुंटकल, गुत्ती या लोको शेडचे इंजिन दिले जातात. तर मध्य रेल्वेकडून पुणे आणि कल्याण लोको शेडचे इंजिन दिले जातात. दमरे कित्येकदा भंगार इंजिन देत असल्याची आणि त्यामुळेच वारंवार इंजिन बिघडण्याच्या घटना घडून रेल्वे खोळंबल्याच्या घटना होत असल्याची ओरड रेल्वे संघटनांकडून होते.

मराठवाड्यात जवळपास हजार किलोमीटरचे मार्ग असून देखील लोको शेड दिले जात नव्हते. जालनाच्या माध्यमातून अखेर लवकरच मराठवाडाला लोको शेड मिळण्याची आशा व्यक्त होत आहे. ड्रायपोर्टमुळे जालना येथून मालवाहतूक वाढणार आहे. त्यामुळे नवीन लोकोमोटिवची म्हणजेच लोको अथवा रेल्वे इंजिनची गरज भासणार आहे. यासाठी जालना येथील पीटलाईन करतानाच लोको शेड चे डिझाईन तयार केले जाणार आहे.

Cryptocurrency Price : रशिया-युक्रेन संकटामुळे क्रिप्टो मार्केटमध्ये प्रचंड चढउतार

Cryptocurrency

नवी दिल्ली । जगभरातील शेअर बाजारासोबतच क्रिप्टोकरन्सी मार्केटची स्थिती देखील बिकट बनली आहे. रशिया-युक्रेन संकटामुळे क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये प्रचंड अस्थिरता दिसून येत आहे. बिटकॉइन गेल्या 24 तासांत 3.1% घसरून 38,508 डॉलर्सवर आला आहे. ग्लोबल क्रिप्टो करन्सी मार्केट कॅप गेल्या 24 तासांमध्ये 3.2% ने घसरून $1.82 ट्रिलियन झाली आहे.

गेल्या 24 तासांत इथेरियम 4.1% घसरून $2,706.81 वर आला आहे. त्याच वेळी, सोलाना $ 87.21 वर ट्रेड करत आहे, जो 7% खाली आला आहे. मात्र, रविवारी सकाळी त्यात किंचित वाढ झाली आहे.

Dogecoin 3 टक्क्यांनी घसरला
पोल्काडॉट 2% घसरून $17.65 वर आला आहे तर Dogecoin 3.4% घसरून $0.125384 वर आले आहे. मात्र, रविवारी सकाळी Dogecoin नेही वेग पकडला आहे. शिबा इनू गेल्या 24 तासांत 6.3% घसरून $0.00002381 वर आला. मात्र रविवारी सकाळी तो 0.4% वाढला आहे.

युक्रेन क्रिप्टोमध्ये घेत आहे डोनेशन
हे लक्षात घ्या की, युक्रेनियन अधिकारी थेट क्रिप्टोमध्ये डोनेशन घेत आहेत. युक्रेनियन नेत्यांनी क्राउडफंडिंगद्वारे 50 लाख डॉलर्स उभे केले आहेत. यामध्ये बिटकॉइन आणि इथरसह इतर टोकनद्वारे फंड उभारण्यात आला आहे.

युक्रेनचे अधिकृत ट्विटर हँडल आणि देशाचे उपाध्यक्ष मिखाइलो फेडोरोव्ह यांनी शनिवारी डोनेशन साठी क्रिप्टो वॉलेटचे डिटेल्स शेअर केले. या डिटेल्सवर, 100 हून जास्त लोकांनी 30 लाख डॉलर्स डोनेशन दिले.

मार्केट एक्सपर्टच्या मते, शुक्रवारी बाजारात दिसून आलेला पुलबॅक हे चांगले लक्षण आहे, मात्र निफ्टीला 16700-16800 च्या पुढे एक मोठा अडथळा आहे. जर निफ्टी या पातळीच्या वर राहिला तरच अल्पावधीत आणखी वाढ अपेक्षित आहे. दुसरीकडे, निफ्टीला 16500 वर तात्काळ सपोर्ट आहे, जर हा सपोर्ट तुटला तर आणखी घसरण होऊ शकते.

युद्धाचा प्रभाव आणि जागतिक कारणांमुळे पुढील आठवड्यात बाजारात अस्थिरता राहणार, तज्ञांचे मत जाणून घ्या

नवी दिल्ली । रशिया-युक्रेन संकटामुळे जगभरातील शेअर बाजारात प्रचंड अस्थिरता आहे. गेल्या आठवड्यात भारतीय शेअर बाजारात सुमारे 3 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली. मात्र, आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी बाजारात रिकव्हरी झाली. देशांतर्गत गुंतवणूकदारांनी व्हॅल्यू शेअर्समध्ये खरेदी केली.

गेल्या आठवड्यात निफ्टी 3.6 टक्क्यांनी आणि सेन्सेक्स 3.4 टक्क्यांनी घसरला. ब्रॉडर मार्केटमध्येही मोठी घसरण झाली. मिडकॅप इंडेक्स 3.4 टक्के आणि स्मॉलकॅप इंडेक्स 5.3 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला.

कच्च्या तेलाने $100 चा आकडा ओलांडला
भू-राजकीय तणावाचा परिणाम वस्तूंच्या किंमतीवरही दिसून आला. कच्च्या तेलाने गेल्या 8 वर्षांचा विक्रम मोडीत काढत $100 च्या पुढे गेला आहे. सोमवारपासून सुरू होणाऱ्या पुढील आठवड्यात भू-राजकीय तणाव केंद्रस्थानी राहण्याची शक्यता आहे, त्यामुळे बाजार अस्थिर राहील. याशिवाय यूएस फेडचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांच्या काँग्रेसमधील स्टेटमेंटवरही बाजाराची नजर असेल. देशांतर्गत बाजाराबद्दल बोलायचे तर, बाजाराची नजर पुढील आठवड्यात येणार्‍या जीडीपी डेटा, पायाभूत सुविधा आऊटपुट डेटावर असेल.

निफ्टीला 16500 वर इमीडिएट सपोर्ट
एचडीएफसी सिक्युरिटीजचे नागराज शेट्टी सांगतात की,” शुक्रवारी बाजारात दिसून आलेला पुलबॅक हे चांगले लक्षण आहे, मात्र निफ्टीला 16700-16800 च्या पुढे जाण्यासाठी मोठा अडथळा आहे. जर निफ्टी या पातळीच्या वर राहिला तरच अल्पावधीत आणखी वाढ अपेक्षित आहे. दुसरीकडे, निफ्टीला 16500 वर तात्काळ सपोर्ट आहे, जर हा सपोर्ट तुटला तर आणखी घसरण होऊ शकते.”

भारत VIX अजूनही 25 च्या वर आहे
स्वस्तिक इन्व्हेस्टमार्टचे संतोष मीना सांगतात की,”शेवटचा आठवडा बाजारासाठी खूप वाईट होता आणि निफ्टी 200-DMA च्या खाली सरकताना दिसला. बाजारातील परिस्थिती अजूनही अनिश्चित आहे. भारत VIX अजूनही 25 च्या वर आहे. अशा स्थितीत पुढील आठवड्यात बाजारात अस्थिरता येण्याची शक्यता आहे.”

बँक निफ्टीवर बोलताना ते म्हणाले की,” गेल्या आठवड्यात 200-DMA चा सपोर्ट देखील तोडा. आता यासाठी इमीडिएट सपोर्ट 35000 वर दिसत आहे. जर हा सपोर्ट तुटला तर तो 34250-34000 च्या पातळीवर जाताना दिसतो. वरच्या बाजूस, त्याची 200 DMA किंवा 37000 पातळी मजबूत रेझिस्टन्स म्हणून पाहिली जाते.

रशिया युक्रेन युद्धात अणुबॉम्बची एन्ट्री; युक्रेनमध्ये चिंतेचे वातावरण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या तीन दिवसांपासून युद्ध सुरू आहे. रशियाने युक्रेनवर हल्ला केला आहे. या हल्ल्यामध्ये आतापर्यंत हजारो युक्रेनियन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान आता रशिया- युक्रेन युद्धात आता अणुबॉम्बची एन्ट्री झाली आहे. बेलारुसने रशियाला आपल्या देशात अण्वस्त्र तैनात करण्यास परवानगी दिली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता युक्रेनच्या नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

रशिया आणि युक्रेमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून संघर्ष सुरू असल्याचे पहायाला मिळत होते. सध्या या दोन देशांतील संघर्ष हा आता टोकाला पोहचला आहे. वारंवार रशियाकडून युक्रेनवर हल्ले केले जात आहेत. आतापर्यंत रशियाकडून केलेल्या हल्ल्यात युक्रेनमधील हजारो नागरिक मृत्युमुखी पडले आहेत.

दरम्यान रशियाकडून केल्या जात असलेल्या युक्रेनवरील वारंवार हल्ल्याबाबत जगभरातून रशियाचा विरोध केला जात आहे. आता रशिया- युक्रेन युद्धात आता अणुबॉम्बची एन्ट्री झाली आहे. रशियाने युद्ध समाप्तीची घोषणा करून, सैन्या माघारी बोलवावे अशी मागणी युरोपीयन रा्ष्ट्रांकडून करण्यात येत आहे. मात्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी आंतरराष्ट्रीय कायदे तोडणाऱ्यांची गय केली जाणार नाही, त्यांना धडा शिकवावाच लागेल. तिसरे महायुद्ध देखील होऊ शकते असा इशारा दिला आहे. त्यामुळे येथील वातावरण आधीच चिघळत चालले आहे.

सेन्सेक्समधील टॉप 10 कंपन्यांची मार्केट कॅप गेल्या आठवड्यात 3.33 लाख कोटी रुपयांनी घटली

Recession

नवी दिल्ली । गेल्या आठवड्यात सेन्सेक्समधील टॉप 10 कंपन्यांच्या मार्केटकॅपमध्ये 3,33,307.62 कोटी रुपयांची मजबूत घसरण नोंदवली गेली. त्याच वेळी, शेअर बाजारातील मोठ्या नुकसानीमुळे BSE लिस्टेड कंपन्यांची मार्केटकॅप फेब्रुवारीमध्ये सात महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आली आहे.

फेब्रुवारी 2022 मध्ये लिस्टेड कंपन्यांची मार्केटकॅप 2,49,97,053.39 कोटी रुपयांवर घसरली. यापूर्वी जुलै 2021 मध्ये,लिस्टेड कंपन्यांची मार्केटकॅप 2,35,49,748.9 कोटी रुपयांच्या नीचांकी पातळीवर आली होती. जानेवारीमध्ये लिस्टेड कंपन्यांची मार्केटकॅप 2,64,41,207.18 कोटी रुपये होती.

टीसीएस आणि रिलायन्सचे मोठे नुकसान
गेल्या आठवड्यात सोमवारी मार्केटकॅप 2,57,39,712.95 कोटी रुपये होती. गुरुवारी ती 2,42,24,179.79 कोटी रुपयांच्या नीचांकी पातळीवर आली. त्याच दिवशी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनवर लष्करी कारवाई सुरू करण्याची घोषणा केली.

रिलायन्स इंडस्ट्रीजची मार्केटकॅप गेल्या आठवड्यात 94,828.02 कोटी रुपयांनी घसरून 15,45,044.14 कोटी रुपयांवर आली. Tata Consultancy Services (TCS) ची मार्केटकॅप 1,01,760.91 कोटी रुपयांनी घसरून 13,01,955.11 कोटी रु[पये झाली.

खासगी बँकांचेही नुकसान झाले
HDFC बँकेची मार्केटकॅप 31,597.65 कोटी रुपयांनी घसरून 8,06,931.95 कोटी रुपयांवर आली. इन्फोसिसची मार्केटकॅप 5,501.34 कोटी रुपयांनी घसरून 7,12,443.09 कोटी रुपयांवर तर ICICI बँकेची मार्केटकॅप 5,07,414.1 कोटी रुपयांनी घसरून 13,240.66 कोटी रुपयांच्या तोट्यासह झाली.

HDFC ची मार्केटकॅप 6,929.03 कोटी रुपयांनी घसरून 4,35,233.9 कोटी रुपये झाली. हिंदुस्थान युनिलिव्हरची मार्केटकॅप 33,234.97 कोटी रुपयांनी घसरून 5,09,990.53 कोटी रुपयांवर आली.

SBI मार्केट कॅप
स्टेट बँक ऑफ इंडियाचे (SBI) ची मार्केटकॅप 29,094.23 कोटींनी घसरून 4,30,924.87 कोटी रुपये झालीआणि बजाज फायनान्सची मार्केटकॅप 3,802.65 कोटींच्या तोट्यासह 4,20,653.95 कोटी रुपये झाली. भारती एअरटेलची मार्केटकॅप 13,318.16 कोटी रुपयांनी घसरून 3,78,098.62 कोटी रुपयांवर आली.

टॉप 10 कंपन्यांच्या लिस्टमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज पहिल्या स्थानावर आहे. त्यानंतर अनुक्रमे टीसीएस, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, हिंदुस्थान युनिलिव्हर, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी, एसबीआय, बजाज फायनान्स आणि भारती एअरटेल यांचा क्रमांक लागतो.

इनकम आणि टॅक्स महाराष्ट्रातच आहे का? संजय राऊतांचा संतप्त सवाल

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते आणि मुंबई महापालिकेतील स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी इनकम टॅक्सची छापेमारी अजूनही सुरुच असून याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि केंद्रीय तपास यंत्रणेवर निशाणा साधला आहे. इनकम आणि टॅक्स फक्त महाराष्ट्रातच आहे का असा सवाल त्यांनी केला आहे.

संजय राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हंटल की, मला वाटतं केवळ महाराष्ट्रातच इन्कम आहे आणि टॅक्स आहे. मुंबई सर्वाधिक टॅक्स केंद्र सरकारला देते. जिथे जिथे भाजपची सत्ता आहे, त्या राज्यात इन्कमही नाही आणि टॅक्सही नाहीये. या राज्यांमध्ये सर्व काही अलबेल आहे का? असा सवाल त्यांनी यावेळी केला.

आगामी मुंबई महापालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून त्रास देण्याचं काम सुरू आहे. असा आरोप संजय राऊत यांनी केला. केंद्रीय तपास यंत्रणेला फक्त महाराष्ट्रतच काम आहे असा टोला लगावत महाराष्ट्रातील जनता हे सर्व पाहत आहे असा इशारा संजय राऊत यांनी भाजपला दिला.

“नारायण राणेंसह नितेश राणे, चंद्रकांत पाटील यांच्यावर कारवाई करा”; रुपाली चाकणकर यांचे निर्देश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | दिशा सलियन यांच्याबाबत बदनामीकारक वक्तव्य केल्याने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान सलियनबाबत केलेल्या वक्तव्याची गंभीर दखल महिला आयोगाने घेतली आहे. “दिशाच्या शवविच्छेदन अहवालानुसार तिच्यावर बलात्कार झालेला नसून ती गरोदर सुद्धा नव्हती हे मालवणी पोलिसांनी अहवालात स्पष्टपणे नमूद केले आहे. त्यामुळे दिशाच्या मृत्यूबाबत खोटी व बदनामीकारक माहिती देणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे, आ. नितेश राणे व संबंधित सर्व व्यक्तींवर कारवाई करावी, असे निर्देश महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दिले आहेत.

रुपाली चाकणकर यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “दिवंगत दिशा सॅलियनची बलात्कार करून हत्या करण्यात आली आहे असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले होते.तिच्या शवविच्छेदन अहवालानुसार तिच्यावर बलात्कार झालेला नसून ती गरोदर सुद्धा नव्हती हे मालवणी पोलिसांनी राज्य महिला आयोगाला दिलेल्या अहवालात स्पष्टपणे नमूद केले आहे. मृत्यूपश्चात देखील होत असलेल्या आपल्या मुलीच्या बदनामीमुळे व्यथित झालेल्या दिशा सॅलियनच्या आई वडिलांनी या संदर्भात दिशाच्या मृत्यूबाबत खोटी व बदनामीकारक माहिती देणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे, आ.नितेश राणे व संबंधित सर्व व्यक्तींवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

तसेच दिशाबद्दल समाजमाध्यमावर नमूद असलेली चुकीची व बदनामीकारक माहिती काढून टाकण्यात यावी अशी तक्रार आई वसंती सॅलियन व वडील सतीश सॅलियन यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे केली आहे. त्यामुळे दिशाच्या मृत्यूबाबत कोणतेही पुरावे नसताना नारायण राणे यांच्यावर मृत्यूपश्चात तिचे चारित्र्यहनन करणे, तिची प्रतिष्ठा मलिन करणे तिची व कुटुंबाची बदनामी केली आहार. तसेच दिशाच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआय यंत्रणेमार्फत सुरु असल्याची खोटी विधाने केली आहेत.

मुंबई पोलिसांच्या तपास यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर अविश्वास दाखवून दबाव निर्माण करून समाजामध्ये संभ्रम निर्माण केले असल्याने या कृत्याबाबत नारायण राणे यांच्या विरुद्ध तसेच त्यांनी केलेल्या आरोपांना दुजोरा देणारे नितेश राणे व चंद्रकांत पाटील यांच्यावर तात्काळ फौजदारी कारवाई करावी. आणि कात्याबाबतचा अहवाल राज्य महिला आयोगास २४ तासांच्या आत सादर करण्याचेनिर्देश वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मालवणी पोलीस स्टेशन यांना दिले आहेत.

तसेच दिशा सॅलियन मृत्यू प्रकरणी समाज माध्यमावर तयार करण्यात आलेले लाखो खोटे अकाउंट्स बंद करून तिच्याबद्दल नमूद असलेली खोटी माहिती तात्काळ काढून टाकण्यात यावीआणि अर्जदार श्रीमती व श्री. सॅलियन या जेष्ठ नागरिक असलेल्या दाम्पत्याला शांततेने व सुरक्षित जगता यावे याकरिता योग्य ती सुरक्षात्मक उपाययोजना करावी व अर्जदारांच्या मागणीनुसार या प्रकरणी योग्य ती चौकशी करून कारवाई करावी, असे निर्देष चाकणकर यांनी दिले आहेत.

पती व प्रेयसीकडून हल्ला : अनैतिक संबंधाला विरोध करणाऱ्या पत्नीवर कोयत्याने वार

सातारा | अनैतिक संबंधाला विरोध करत असल्याच्या रागातून पतीनेच प्रेयसीच्या मदतीने पत्नीवर जीवघेणा हल्‍ला केल्याची घटना घडली. याबाबत पती व तिच्या प्रेयसीवर वाई शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाई शहरातील फुलेनगर येथे हल्याची घटना घडली. संशयित पती सिकंदर आमीन आतार (रा. फुलेनगर) व त्याची प्रेयसी संतोषी पिसाळ (रा. व्याजवाडी, ता. वाई) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहे. याप्रकरणी तन्झीला सिकंदर आतार (वय 30, रा. फुलेनगर) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेली माहीती अशी, रविवारी सिकंदर याने भाजी मंडई परिसरात तन्झीला यांना शिवीगाळ करत धक्‍काबुक्‍की केली. त्यानंतर चित्र टॉकीजच्यासमोर सिकंदर याने तन्झीला हिचे पकडले याचवेळी संतोषी हिने तन्झीला यांच्यावर कोयत्याने वार करून जखमी केले. यानंतर दोघांनीही तन्झीला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.

यावेळी त्यांनी आरडाओरडा केल्यामुळे नागरिक जमा झाले. त्यामुळे सिकंदर व संतोषी यांनी तेथून पळ काढला. कोयत्याने वार केल्याने तन्झीला या गंभीर जखमी झाल्या असून त्यांना उपचारासाठी खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले.