Saturday, December 27, 2025
Home Blog Page 2720

रंगाच्या व्यापाऱ्याला साडेबारा लाखांचा ‘चुना’

औरंगाबाद – शहरातील बीड रोडवरील निपाणी येथील पेंट्स कंपनीच्या गोदामातून फोनवर संपर्क झालेल्या व्यक्तीवर विश्वास ठेवून 12 लाख 61 हजार 165 रुपये किमतीचे 1 हजार 724 कलरचे डब्बे आयशर गाडीत भरले. हे डबे शहरातील चेलीपुरा भागात देण्यास सांगितले. मात्र अनोळखी व्यक्तीने हमाल तेथे न उतरवता अकोला येथे घेऊन जात फसवणूक केली.

ज्ञानेश्वर सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, निपाणी येथे एशियन पेंट कंपनी गोदाम आहे. त्यातील ट्रांसपोर्टेशनचे काम ज्ञानेश्वर यांच्यासह त्यांचे भाऊ अंबादास पाहतात. ज्ञानेश्वर यांना 12 फेब्रुवारी रोजी एकाने फोनवर गाडी भाड्याने ऑर्डर असल्यास कळवण्यास सांगितले. ज्ञानेश्वर यांनी समाज 13 फेब्रुवारी रोजी परभणीचे भाडे असल्याचे सांगितले. त्यानुसार परभणीतील रंगाचा माल भरून दिला. त्या गाडीच्या चालकाकडे गाडीभाडे फोनवर पाठवून दिले. दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच क्रमांकावरून गाडी भाड्याचे विचारपूस झाली. तेव्हा औरंगाबादेतील बाबा ट्रेडर्स चेलीपुरा येथे माल पोहचता करायचे असल्याचे सांगितले. त्यानुसार आयशर (एम एच 20 इएल 0619) गाडी घेऊन दोघेजण आले. त्या गाडीत 1724 कलरचे डबे भरले. त्याची किंमत 12 लाख 61 हजार 165 रुपये होती. हा सर्व माल पोहोचता करण्यासाठी 5 हजार रुपये भाडे ठरले.

माल भरून देताना सोनवणे यांनी कोणतीही विचारपूस केली नाही. दुसऱ्या दिवशी तीन वाजेपर्यंत संबंधितांना माल पोहोचला नाही. त्यामुळे संबंधित मोबाईल वर संपर्क साधला असता एक तासात माल पोहोचता करतो असे सांगून फोन ठेवला. त्यानंतर मोबाईल बंद येऊ लागला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सोनवणे यांनी चिकलठाणा पोलिस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणात गुन्हा नोंदवण्याची माहिती निरीक्षक देविदास गा त्यांनी दिली. या प्रकरणी अधिक तपास सहायक निरीक्षक शरदचंद्र रोडगे करत आहेत.

अमित ठाकरे यांच्यावर मनसेने सोपवली ‘हि’ मोठी जबाबदारी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या राज्यातील राजकारणात आता माणसेही सक्रिय झालेली पहायला मिळत आहे. त्यात आता आगामी काळात मुंबई महानगर पालिकेसह राज्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मनसेने मोठा निर्णय घेतला असून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांच्याकडे मोठी जबाबदारी सोपवली आहे. अमित ठाकरे यांची निवड महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदी करण्यात आलेली आहे.

अमित ठाकरे यांना अध्यक्षपद देण्यात आल्यानंतर आज सकाळी मनसेच्या मुंबईतील राजगड या मध्यवर्ती कार्यालयाने एक पत्रक प्रसिद्ध करून या संदर्भातील घोषणा करण्यात आली. या निवडीमुळे पुढच्या काळात अमित ठाकरे हे मनसेमध्ये अधिक सक्रिय झालेले दिसू शकतात.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांच्याकडून गेल्या काही वर्षांपासून मनसेच्या संघटनात्म बांधणीसाठी सक्रिय झाले आहेत. मात्र त्यांच्याकडे पक्षानेकोणतीही पद तसेच जबाबदारी सोपवली नव्हती. आता आगामी महानगर पालिका निवडणुकीच्या पार्शवभूमीवर मनसेने निवडसणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यामीट ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. नव्याने जबाबदारी देण्यात आली असल्याने अमित ठाकरेंवरील जबाबदारी वाढणार आहे.

मी राष्ट्राध्यक्ष असतो तर….; युद्धाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांचे मोठं विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रशिया आणि युक्रेन मध्ये जोरदार युद्ध सुरू असून हे युद्ध संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. अनेक ठिकाणी गोळीबार आणि बॉम्ब हल्ले सुरूच असून परिस्थिती अत्यंत भीषण बनली आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठं विधान केलं आहे. मी राष्ट्राध्यक्ष असतो तर अस काही घडलंच नसत असे त्यांनी म्हंटल.

ट्रम्प म्हणाले, माझ्या संपूर्ण कार्यकाळात युद्ध झालं नाही. मी आपल्याला युद्धातून बाहेर काढलं. व्लादिमिर पुतीन हे जो बायडेन यांना एखाद्या ढोलसारखे वाजवत आहेत. मी राष्ट्राध्यक्ष असतो तर अस घडलंच नसत असे म्हणत त्यांनी बायडेन यांच्यावर निशाणा साधला.

दरम्यान, परिस्थिती हाताबाहेर जाण्याची वेळ येताच अमेरिका राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी रशियाला इशारा दिला आहे. आता तिसर महायुद्ध हाच अंतिम उपाय आहे असं त्यांनी म्हंटल. तसेच अमेरिका कडून युक्रेन ला अनेक शस्त्रास्त्रे पुरवण्यात आली आहेत. तर इतर अनेक युरोपियन देशांनीही युक्रेनला मदतीचा हात दिला आहे.

“तिसरं महायुद्ध हाच एकमेव पर्याय”; जो बायडेन यांचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या रशिया आणि युक्रेन यांच्यात अत्यंत अटीतटीची लढाई सुरु आहे. रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर जागतिक स्तरावर गंभीर चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान काल या युद्धात संयुक्त राष्ट्रांशी संबंधित २८ देशांनी युक्रेनला सामरिक मदत करण्याची घोषणा केली आहे. आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी आज मोठे वक्तव्य केले आहे. आता तिसरे महायुद्ध हाच एकमेव पर्याय आहे, असे म्हणत त्यांनी गंभीर इशारा दिला आहे.

राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी शनिवारी रात्री दिलेल्या निवेदनामध्ये तिसऱ्या जागतिक महायुद्धाचा उल्लेख केला आहे. “आता तिसर्या महायुद्धाशिवाय कोणता पर्याय नाही. जर तिसरे जागतिक महायुद्ध टाळायचे असेल, तर रशियावर निर्बंध घालणे अत्यावश्ययक आहे. युक्रेनकडे सध्या दोन पर्याय आहेत. एक तर तिसरे जागतिक महायुद्ध सुरू करा आणि थेट रशियन सैन्याशी आमने-सामने लढा. किंवा दुसरा म्हणजे जो देश (रशिया) आंतरराष्ट्रीय नियमच पाळत नाही, त्यांच्या विरोधात वागतोय, त्या देशाला त्यासाठी किंमत चुकवायला लावा”, असे बायडेन यांनी म्हटले आहे.

गेल्या तीन दिवसांपासून रशियाच्या सैन्यदलाकडून युक्रेनची राजधानी कीवर हल्यावर हल्ले केले जात आहेत. कीवमधल्या अनेक इमारती रॉकेट हल्ल्यांमध्ये उद्ध्वस्त झाल्या आहेत. मात्र, तरीदेखील युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की कीवमध्येच असून त्यांनी रशियन फौजांना तोडीस तोड उत्तर देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्याच्या निर्धारानंतर यासंदर्भात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी महत्त्वपूर्ण विधान केले आहे.

मराठी भाषा अभिजात दर्जाचा प्रस्ताव केंद्राकडे 9 वर्ष पडून : पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात समिती व प्रस्ताव गठीत

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी… जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी… धर्म , पंथ , जात एक जाणतो मराठी… एवढ्या जगात माय मानतो मराठी अशी सर्वत्र असणारी आपली मराठी भाषा हजारो वर्षे जुनी आहे. आजवर कित्येक प्रकारचे मराठी साहित्य समृद्ध झाले. जगातल्या सर्वात जास्त बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये मराठीचा निश्चित समावेश होतो. काॅंग्रेसच्या काळात डॉ. मनमोहनसिंग पंतप्रधान असताना 12 ऑक्टोबर 2004 रोजी केंद्र सरकारनं तामिळ भाषेला पहिल्यांदा अभिजात दर्जा दिला होता. मात्र, काॅंग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी 2014 साली दिलेला मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवण्यासाठीचा प्रस्ताव 9 वर्षे धूळखात पडून आहे.

अभिजात भाषेसाठी पहिल्यादाच समिती गठीत

मराठी भाषा अभिजात होण्यासाठी 2012 पर्यंत कोणतीही ठोस कृती झाली नव्हती. मात्र, अखेरीस पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवण्यासाठीच्या कामाला गती आली. पहिल्यादाच पृथ्वीराज चव्हाण यांनी 10 जानेवारी 2012 रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी एक तज्ञ समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला. ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली तज्ञांच्या आणि राज्य सरकारच्या भाषेविषयक संस्थांच्या संचालकांची सदस्य म्हणून समितीची नेमणूक केली. समितीने पुराव्यानिशी अहवाल तयार करण्याचे काम हाती घेतले. त्यानंतर प्रा. पठारे, प्रा. नरके हे समन्वयक आणि डॉ. बहुलकर व डॉ. देशपांडे हे सदस्य असलेल्या मसुदा उपसमितीची स्थापना करण्यात आली व त्यांच्यावर अहवाल लेखनाचे काम सोपवण्यात आले. या उपसमितीने एकूण 19 बैठका घेतल्या, तज्ज्ञांशी चर्चा करून 435 पानांचा एक अहवाल तयार केला. जवळपास पूर्ण वर्षभरानंतर म्हणजे मे 2013 मध्ये तो अहवाल तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना सादर करण्यात आला. अभिजात भाषा समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर तो सर्वात आधी इंग्रजी भाषेत भाषांतरीत करण्यात आला. हा इंग्रजी अहवाल 2013 मध्ये 12 जुलैला केंद्राच्या सांस्कृतिक कार्य मंत्रालयाकडे पाठवण्यात आला. सांस्कृतिक मंत्रालयाकडून तो अहवाल साहित्य अकादमीकडे सोपवला व त्यावर निर्णय मागविला, साहित्य अकादमीने अहवालाचा सखोल अभ्यास केल्यावर फेब्रुवारी 2014 मध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबद्दल शिफारस करून अहवाल अंतिम निर्णयासाठी केंद्र सरकारकडे परत पाठवला. त्यानंतर 28 मार्च 2014 रोजी देखील मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यासाठी पाठपुरावा केला.

विनोद तावडेंना 2015 साली अभिजात भाषेचा तुरा रोवता आला असता

ऑक्टोबर 2014 मध्ये महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचे स्थापन झाले. यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री म्हणून विनोद तावडे यांनी सूत्र स्वीकारली. त्यावेळी विनोद तावडे यांनी काहीसे सकारात्मक वातावरण तयार केलं. त्यांनी एक वर्षात मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देणार अशी घोषणा केली होती. मात्र त्यात तावडेंना यश आलं नाही. अभिजात भाषेचा दर्जा संदर्भात एक दाखल प्रकरण न्यायप्रविष्ठ होते, म्हणून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यास केंद्र सरकारला अडचणी निर्माण होत होती असं सांगण्यात येतं होतं. मात्र तावडे यांनी योजलं होतं, तसं झालं असतं, तर 2015 च्या राजभाषा दिनीच माय मराठीच्या शिरपेचात अभिजात भाषेचा तुरा खोवला गेला असता.

अभिजात भाषेसाठी सर्वच राज्य सरकारकडून प्रयत्न

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात अनुक्रमे 3 फेब्रुवारी 2018 आणि 12 डिसेंबर 2018 रोजी त्यांनी स्वतः केंद्राकडे पाठपुरावा केला होता. शिवाय तत्कालिन मराठी भाषा विकास मंत्र्यांकडून 26 नोव्हेंबर 2014, 1 डिसेंबर 2016, 28 सप्टेंबर 2017 आणि उच्च व तंत्रशिक्षण 19 ऑगस्ट 2019 यांनी देखील पत्र लिहून पाठपुरावा केला होता. तर त्यानंतर आलेल्या मुख्यमंत्री म्हणून आलेल्या उद्धव ठाकरे यांनी देखील 2 वर्षात प्रयत्न केल्याचं बघायला मिळतं. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी 24 डिसेंबर 2019 आणि 7 जून 2021 रोजी केंद्राकडे या मागणीसाठीचा पाठपुरावा केला आहे. शिवाय, 27 फेब्रुवारी 2020 रोजी राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत शासकीय ठराव मंजूर करून तो केंद्राकडे पाठवण्यात आला होता. सोबतच 10 डिसेंबर 2020 रोजी भाषा विकास मंत्र्यांकडून देखील केंद्राला याबाबतचं पत्र पाठवण्यात आले आहे.

दिशा सालीयन प्रकरणी राणेंवर गुन्हा दाखल; ते आरोप भोवणार??

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दिशा सालीयन हिच्या बदनामी प्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजप आमदार नितेश राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिशा सालीयन प्रकरणी केलेल्या वेगवेगळ्या आरोपांनंतर सालियन कुटुंबीयांनी राज्य महिला आयोगाकडेही दाद मागितली होती. त्यानंतर मालवणी पोलीस ठाण्यात राणेंविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

दिशा सालियनवर लैंगिक अत्याचार करून हत्या झाली आहे. ती गरोदरही होती, असा दावा नारायण राणे यांनी केला होता. त्यावर सालियन कुटुंबीयांनी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. तसेच या प्रकरणी सालियन कुटुंबीयांनी राज्य महिला आयोगाकडेही दाद मागितली होती. त्यावर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पोलिसांकडून दिशा सालियन मृत्यूप्रकरणाचा अहवाल मागितला होता.

महिला आयोगाकडे आलेल्या तक्रारीची आम्ही गंभीर दखल घेतलेली आहे. पत्रात ज्यांची नावे आहेत त्यांच्यावर कारवाई होईल, असं महिला आयोगाच्या सदस्या गौरी छाब्रिया म्हणाल्या. त्यामुळे नारायण राणे आणि नितेश राणे यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. आता पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतल्याने घडामोडींना वेग आला आहे.

औरंगाबादकरांना मिळणार थेट पाइपलाइनद्वारे स्वयंपाकाचा गॅस

Gas pipeline

औरंगाबाद – अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा ते औरंगाबाद सीएनजी गॅस पाईपलाईन टाकण्याचा भूमिपूजन समारंभ 2 मार्च रोजी सकाळी 11 वाजता मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर आयोजित करण्यात येणार आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि नगर विकास मंत्री हरदीपसिंग पुरी यांच्या हस्ते आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, खासदार, आमदारांच्या उपस्थितीत हा समारंभ होणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.

डॉ. कराड म्हणाले, आपल्या शहरातील सुमारे दोन लाख कुटुंबांना पाइपलाइनद्वारे गॅसचा पुरवठा केला जाईल. सोबतच वाळूज, शेंद्रा एमआयडीसीतील उद्योगांनाही या गॅस पाईपलाईनचा लाभ होईल. यासाठी महापालिका, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महावितरणने ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे. या समारंभाला पालकमंत्री सुभाष देसाई, खासदार इम्तियाज जलील, आमदार हरिभाऊ बागडे, अतुल सावे, प्रशांत बंब, प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाट, सतीश चव्हाण, विक्रम काळे यांची उपस्थिती असेल असेही त्यांनी सांगितले.

1555 किमीचे जाळे –
श्रीगोंदा ते औरंगाबाद 218 किमी लांबीची पाइपलाइन टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. शहरातील अंतर्गत मुख्य रस्त्यावरील 66 किलोमीटर तर गल्ली गोळा पर्यंत 1555 किलोमीटरचे पाईपलाईन जाळे दोन वर्षात टाकले जाईल. यासाठी केंद्र सरकार चार हजार कोटी रुपये खर्च करणार आहे. ही पाईपलाईन टाकण्याचे काम भारत पेट्रोलियम कंपनी करणार असल्याचे डॉ. कराड यांनी नमूद केले.

आज जिल्ह्यात पल्स पोलिओ लसीकरण मोहीम

polio

औरंगाबाद – जिल्ह्यात 0 ते 5 वयोगटातील मुलांसाठी 27 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे ग्रामीण भागात तर महापालिकेच्या वतीने शहरात पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबवली जात आहे.

ग्रामीण भागातील एकूण 2 लाख 67 हजार मुलांना तर शहरातील 1 लाख 98 हजार 614 बालकांना या अभियानाअंतर्गत डोस देण्यात येणार आहे. या मोहिमेचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष मीना शेळके यांच्या हस्ते आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे, आरोग्य व शिक्षण सभापती अविनाश गलांडे यांच्या हस्ते कुंबेफळ येथे सकाळी होईल.

तर शहरातील लसीकरण मोहिमेचा प्रारंभ सिद्धार्थ उद्यान येथे सकाळी 11 वाजता प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांच्या हस्ते होईल.

भिवंडीमध्ये महागड्या बाईकची चोरी, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

भिवंडी : हॅलो महाराष्ट्र – ठाणे जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. भिवंडीमध्ये अशीच एक चोरीची घटना समोर आली आहे. यामध्ये घराबाहेर पार्क करण्यात आलेली महागडी बाईकच चोरटयांनी पळवून नेली आहे. भिवंडी तालुक्यातील वडपे गावात ही घटना घडली आहे. चोरीची संपूर्ण घटना घराबाहेर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

https://twitter.com/RajaramUbhe/status/1497586191046418434

काय आहे प्रकरण ?
भिवंडी तालुक्यातील वडपे गावात राहणारे जयेश पाटील यांच्या घराजवळ पार्क केलेली महागडी बाईक अज्ञात चोरांनी शुक्रवारी रात्रीच्या सुमारास चोरी केली. ही सर्व चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. पोलीस या सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत आहेत.

नागपूर शहरातील हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतदेखील चोरीची एक घटना घडली आहे. या घटनेत आरोपी चोराला घरात काहीच मुद्देमाल न सापडल्याने तो भयंकर चिडला. त्यानंतर त्याने त्या घरातून निघण्याच्या अगोदर घरमालकासाठी एक चिठ्ठी लिहिली. या चिठ्ठीमध्ये त्याने “घरातून कोणताही मुद्देमाल चोरीला गेला नाही” असं म्हटलं आहे. शिवाय संबंधित चिठ्ठीत त्याने घरमालकाची लायकी काढत त्याला भिकारी म्हंटले आहे.

एकाच बाईकवरून प्रवास करणाऱ्या 4 मित्रांचा ‘या’ प्रकारे झाला दुर्दैवी अंत

संकेश्वर : हॅलो महाराष्ट्र – संकेश्वर राष्ट्रीय महामार्गालगत असणाऱ्या सर्व्हिस रोडवरून एकाच दुचाकीने प्रवास करणाऱ्या चार मित्रांचा अपघातात दुर्दैवी अंत झाला आहे. हे चौघेजण काही कामानिमित्त निपाणीला गेले होते. निपाणीहून परत येत असताना हा दुर्दैवी अपघात घडला आहे. वेगात बाईक चालवत असताना बाईक घसरून हा दुर्दैवी अपघात घडला आहे. यामध्ये चारही मित्रांना आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेची माहिती मिळताच मृतांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. या दुर्घटेत तिघांचा जागीच तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

बसवराज अर्जुन माळी, प्रवीण कल्लापा सनदी, मेहबूब सय्यद शेगडी आणि मलिकजान जमादार असे या अपघातात मृत पावलेल्या तरुणांची नावे आहेत. यामधील बसवराज अर्जुन माळी, प्रवीण कल्लापा सनदी, मेहबूब सय्यद शेगडी हे संकेश्वर येथील अनंत विद्यानगर परिसरातील रहिवासी होते तर मलिकजान जमादार हा बेळगाव शहरातील खंजर गल्ली परिसरातील रहिवासी होता. तसेच मृत मेहबूब आणि मलिकजान हे दोघं मामे भाऊ होते. मलिकजान हा काही दिवसांपूर्वी बेळगावहून संकेश्वरला आपल्या नातेवाईकांकडे आला होता.

घटनेच्या दिवशी रात्री बसवराज, प्रवीण, मेहबूब आणि मलिकजान चौघेही एकाच दुचाकीने काही कामानिमित्त निपाणीला गेले होते. तेथील काम आटोपल्यानंतर चौघेही पुन्हा एकाच दुचाकीने संकेश्वरला येत होते. यादरम्यान संकेश्वर येथील पर्वतराव यांच्या पेट्रोल पंपाजवळून जात असताना त्यांची दुचाकी अचानक घसरली. बाईकचा वेग जास्त असल्याने सर्वजण उडून रस्त्यावर पडले तर काहीजण दुचाकीसह फरफटत गेले.

यामध्ये डोक्याला मार लागल्यामुळे बसवराज, प्रवीण आणि मेहबूब यांचा जागीच मृत्यू झाला. तर मलिकजान हा सर्वात पाठीमागे बसल्याने तो बाजूला उडून पडला होता. मात्र त्याला गंभीर दुखापत झाली होती. या घटनेची माहिती मिळताच या तरुणांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. मलिकजान याला बेळगावच्या सरकारी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले मात्र त्याचा देखील उपचारादरम्यान अखेर मृत्यू झाला. या 4 मित्रांचा असा दुर्दैवी अंत झाल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.