Friday, December 26, 2025
Home Blog Page 2742

“पैहचान कौन ?”; मलिकांवरील कारवाईनंतर नितेश राणेंचे ट्विट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | ईडीच्यावतीने आज राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची चौकशी केली जात आहे. मलिक यांच्यावर कारवाई करण्यात आल्याने राजकीय वातावरण तापले आहे. यावरून भाजप आमदार नितेश राणे यांनी पुन्हा मलिक यांच्यावर निशाणा साधला आहे. राणेंनी एका डुक्कराचा जाळ्यात अडकल्याचा फोटो शेअर केला असून त्यावर पेहचान कौन असे लिहले आहे.

नितेश राणे यांच्याकडून अनेकवेळा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला जात आहे. दरम्यान आज पहाटे मलिक यांच्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली. ईडीच्या कारवाईनंतर आता भाजप नेत्यांनी मलिक यांच्यावर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान नितेश राणे यांनी आज सकाळी ट्विट करीत मलिक यांच्यावर टीका केली आहे.

ईडीच्या कारवाईवरून एकीकडे महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांकडून भाजपवर आरोप केला जात आहे. या दरम्यान आज मलिक यांच्यावर केलेल्या कारवाईवरून पुन्हा राजकीय वातावरण तापले आहे.

Stock Market : बाजाराने घसरणीचा ट्रेंड मोडला, सेन्सेक्स-निफ्टीची चांगली सुरुवात

Share Market

नवी दिल्ली । सहा ट्रेडिंग सत्रांपासून सुरू असलेल्या घसरणीचा ट्रेंड बुधवारी भारतीय शेअर बाजाराने मोडला. ट्रेडिंगच्या सुरुवातीलाच सेन्सेक्स आणि निफ्टीने स्थिर वाटचाल केली.

सेन्सेक्सने 333 अंकांच्या वाढीसह ट्रेडिंगला सुरुवात केली आणि 57,633 वर उघडला. त्याचप्रमाणे निफ्टीनेही 103 अंकांच्या वाढीसह 17,194 अंकांवर खुले होऊन ट्रेडिंग सुरू केले. गुंतवणूकदारांच्या सकारात्मक वृत्तीमुळे सकाळी 9.30 वाजता सेन्सेक्स 427 अंकांनी तर निफ्टी 137 अंकांच्या वाढीसह ट्रेड करत होता.

बाजार उघडल्यानंतर बीएसईवर लिस्टेड सुमारे 1,388 शेअर्स वाढले आणि 554 शेअर्स घसरले. कोटक महिंद्रा बँक, टाटा मोटर्स, मारुती सुझुकी आणि बीपीसीएल निफ्टीवर ट्रेड करत होते, तर ओएनजीसी आणि एल अँड टी घसरले होते. तेल आणि वायू, ऊर्जा, सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि रिअल इस्टेटमध्ये सुमारे 1 टक्क्यांची वाढ दिसून आली.

आशियाई बाजार देखील ग्रीन मार्कवर
बुधवारी आशियातील बहुतांश बाजार ग्रीन मार्कवर ट्रेड करताना दिसले. सिंगापूर एक्सचेंज 0.44 टक्के, तैवान 0.19 टक्के आणि दक्षिण कोरिया 0.66 टक्के वाढले. आशियाई बाजारातील या तेजीचा परिणाम भारतीय शेअर बाजारांवरही दिसून येईल आणि आज बाजार ग्रीन मार्कवर उघडेल अशी अपेक्षा तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

“सत्य बोलत असल्यानेच मलिकांवर कारवाई, 2024 नंतर ते आणि आम्ही आहोत”; संजय राऊतांची प्रतिक्रिया

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | ईडीच्यावतीने आज राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची चौकशी केली जात आहे. मलिक यांच्यावर कारवाई करण्यात आल्याने राजकीय वातावरण तापले आहे. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “नवाब मलिक यांच्यासारखे खूप लोक सत्य बोलून असत्य उघड करत आहे. त्यांच्यामागे आता देशभरात ईडी, सीबीआय लावली जात आहे. आज सकाळी मलिक यांच्या घरी ईडीची लोक आले आणि त्यांना घेऊन गेले. अशा प्रकारच्या चौकशा 2024 पर्यंत चालतील. त्यानंतर आम्ही आणि तेच आहोत, असे राऊत यांनी म्हंटले.

संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नवाब मलिक यांच्यावर एडीच्यावतीने केलेल्या कारवाईबाबत प्रतिक्रिया दिली. यावेळी राऊत म्हणाले की, मलिकी यांच्यासह आमच्यासारखे खूप लोक आहेत, जे सातत्याने बोलत आहे. म्हणून त्यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. नक्कीच ते संध्याकाळी घरी येतील.

ईडीच्यावतीने 20-20 वर्षानंतर जीनी पुराणी प्रकरणे बाहेर काढून चौकशी केली जात आहे. किरीट सोमय्या यांनीही काही प्रकरण ईडीकडे दिलेली आहेत. भ्रष्टाचारा विरोधात लढणारे महात्मा हा शब्द चांगला आहे, कारण त्यांना मी काही बोललो तरी वाटतं मी शिवी दिली. जे महात्मा आहेत, त्यांनी ईडी कडे अनेकांची प्रकरणे दिलेली आहेत, त्यांना का समन्स गेले नाही?. “आता ही सगळी प्रकरणे आम्ही परत एकदा ईडीकडे घेऊन जाणार आहोत. तक्रार कशी करायची हे आम्हाला माहिती आहे, असेही राऊत यांनी सांगितले.

औरंगाबादेतही होणार रेल्वे पीटलाईन

pit line

औरंगाबाद – औरंगाबादची पीटलाईन जालन्याला आणलेली नाही. ती औरंगाबादला होणार आहे. परंतु रेल्वेची स्वतःची जागा नसल्याने अडचणी येत आहेत. औरंगाबादच्या विमानतळाचा विस्तार करायचा आहे. त्यालाही जागेचा प्रश्न निर्माण होत आहे. जालन्यात मात्र स्वतंत्र शंभर कोटींची पीटलईन होणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली. काल जालना येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते.

जालना ते जळगाव हा रेल्वे मार्ग शंभर टक्के होणार आहे. याच्या सर्वेक्षणासाठी टेंडर पास झाले आहे. हा मार्ग चारही विधानसभा मतदारसंघातून जाणार आहे. शिवाय अहमदनगर, बडोदा, सुरत, बेंगलोर मार्गावर रेल्वे धावणार आहे. मनमाड ते नांदेड मार्गावरील एलेक्ट्रिफिकेशन चे काम सुरू आहे. 2023 नंतर रेल्वे विद्युत वर चालणार असल्याची माहितीही या वेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली.

औरंगाबाद येथील रेल्वे पीटलाईन आणि विमानतळाच्या विस्तारीकरणाचे नियोजन आहे. परंतु स्वतःची जागा नसल्याने अडचणी येत आहेत. जागा खरेदी करून पीटलाईन किंवा विमानतळाचे विस्तारीकरण करायचे तर खर्च दुप्पट होणार असल्याचे दांवे म्हणाले. लोकसभा मतदार संघाच्या विकासासाठी प्रयत्न केले जात आहेत. फुलंब्री राजुर मार्गासाठी 85 कोटींचा निधी मंजूर आहे. जालना राजूर मार्गासाठी 260 कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याचेही यावेळी दानवे यांनी नमूद केले.

ईडीकडून नवाब मलिक यांची चौकशी; पहाटेच घरी दाखल

nawab malik

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | ईडीच्यावतीने गेल्या अनेक दिवसापासून राज्यातील नेत्यांवर कारवाई केली जात आहे. या दरम्यान आज पहाटे राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यावर ईडीच्यावतीने कारवाई करण्यात आली आहे. आज पहाटे मलिक यांना चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात नेण्यात आले आहे.

ईडीच्यावतीने केल्या जात असलेल्या कारवाईविरोधात अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांच्याकडूनही ईडीवर निशाणा साधण्यात आला. दरम्यान जुन्या मालमत्ता व्यवहार प्रकरणी नवाब मलिक यांची ईडीने चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. पहाटेच ईडीच्या पथकानी नवाब मलिक यांच्या घरी दाखल होत चौकशी करण्यास सुरुवात केली. दरम्यान मलिक यांची ईडी कार्यालयात अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू केली जात आहे.

दरम्यान काही दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून केंद्रीय तपास यंत्रणा राज्यात कारवाई करतात. ईडीचे लोक कसे भेटतात, कशी चौकशी करतात हे आम्हाला माहिती आहे. वेळ आल्यावर आम्ही माहिती बाहेर काढू” असा इशारा मलिक यांनी दिला होता. आता ईडीच्यावतीने मलिक याची चौकशी सुरु करण्यात आली आहे.

फडणवीसांनी केले होते ‘हे’ आरोप

भाजप नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डसोबत संबंध आहेत, असा आरोप 9 नोव्हेंबर 2021 रोजी केला होता. मलिकांनी दाऊद इब्राहिमच्या टोळीकडून जमीन खरेदी केलेल्या जमिनी मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपींच्या आहेत. मलिकांचे सरदार शाह वली खान आणि हसीना पारकर यांच्या जवळचा सलीम पटेलसोबत व्यावसायिक संबंध आहेत. या दोघांनी मलिकांच्या नातेवाईकांच्या एका कंपनीला मुंबईतील एलबीएस रोडवरची कोट्यवधींची जमीन कवडीमोल किमतीने विकली असल्याचा आरोपही फडणवीस यांनी केला होता.

आणखी एका कुंटणखान्यावर छापा; दोन दिवसांतील दुसरी कारवाई

औरंगाबाद – सिडको पोलिसांनी दोन दिवसापूर्वीच स्पाच्या आडून सुरू असलेल्या कुंटणखान्यावर कारवाई केल्याची घटना ताजी असतानाच जवाहर नगर पोलिसांनी सुतगिरणी चौकातील स्पाच्या नावाखाली खुलेआम चालणार्‍या आणखी एका कुंटणखान्यावर काल रात्री छापा टाकून पर्दाफाश केला. याप्रकरणी दोघांना अटक केली तर आंटी फरार असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. स्पाचालक अजय कोळगे, प्रियंका भालेराव आणि कामगार कुणाल गजहंस अशी आरोपींची नावे आहेत. यापैकी अजय आणि कुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले.

जवाहरनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गारखेडा सूतगिरणी चौकातील एका इमारतीत क्रिस्टल स्पाच्या नावाखाली कुंटणखाना चालवण्यात येत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पोलीस निरीक्षक संतोष पाटील, उपनिरीक्षक वसंत शेळके, अजित दगडखैर, कॉन्स्टेबल गोरे, सोनवणे, महिला कर्मचारी हाके, मुळे यांनी एका बनावट ग्राहकाला दोन हजार रुपये देऊन त्या कुंटणखान्यावर पाठवले. तत्पूर्वी त्या नोटांचे नंबर पंचायत समक्ष लिहून ठेवले होते. डमी ग्राहक कुंटणखान्यावर गेल्यानंतर अजयने दोन हजार रुपये घेऊन त्याच्यासमोर तीन मुली उभ्या केल्या. यापैकी एका मुलीसोबत रूम मध्ये जाण्यास सांगितले. डमी ग्राहकाने इशारा करताच पथकाने धाड टाकली. या कारवाईत तेथे ‘धंदा’ करण्यासाठी आणलेल्या तीन मुलींपैकी एक पश्चिम बंगाल मधील रहिवासी व दोघी महाराष्ट्रातील आहेत. त्यांनी पंचांसमक्ष पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार अजय आणि प्रियंका हे दोघे स्पर्धा चालवतात. त्यांनी त्या मुलींना आमिष दाखवून वेश्याव्यवसायाला संपल्याचे सांगितले.

अजय आणि आंटी प्रियंका भालेराव यांनी भागीदारीत चार खोल्यांमध्ये हा व्यवसाय सुरू केला. विविध ठिकाणांहून आणलेल्या मुलींना पैशाच्या आमिषाने या व्यवसायात ओढल्याचे पोलिसांनी सांगितले. ग्राहकाकडून दोन हजार रुपये घेत होते. एक हजार रुपये मुलींना देत आणि एक हजार रुपये स्वतः घेत असे पोलिसांनी सांगितले. या स्पाची भागीदार प्रियंकाचा पोलीस शोध घेत आहेत.

मनपाचा लिपिक लाचेच्या जाळ्यात

औरंगाबाद – घराच्या मालमत्ता कराचे पुनर्मूल्यांकन न करण्यासाठी दहा हजार रुपये लाचेची मागणी करणाऱ्या महापालिकेच्या वरिष्ठ लिपिक आला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. सोहेल पठाण फेज अहमद पठाण (52) असे अटकेतील लिपिकाचे नाव आहे. याप्रकरणी लिपिकाविरोधात जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

महापालिकेच्या सेंट्रल नाका येथील कार्यालयातील मालमत्ताकर विभागात तो कार्यरत आहे. डिसेंबर महिन्यात पठाण तक्रारदाराच्या घरी गेला होता. तेथे त्याने तुमच्या घराला चुकीच्या पद्धतीने कमी कर लावण्यात आला आहे. यामुळे तुमच्या घरपट्टीची फेररचना करण्यासाठी पुनर्मूल्यांकन करणार असल्याचे सांगितले. तक्रारदारांनी मनपाने नियमानुसार कर लावलेला आहे असे सांगितले. पठाण अनेकदा त्यांच्या घरी गेल्यावर तुमच्या इमारतीचे पुनर्मूल्यांकन करतो असे म्हणाला. अन्यथा दहा हजार रुपये लाच त्याने मागितली.

त्यानंतर तक्रारदारांनी 16 डिसेंबर रोजी एसीबी कडे तक्रार नोंदवली एसीबीच्या अधिकाऱ्यांनी पडताळणी केली तेव्हाही त्यांनी दहा हजार रुपये लाच मागितली. मात्र, नंतर त्याला संशय आल्याने त्याने रक्कम घेतली नाही. शेवटी एसीबीने काल पठाणला ताब्यात घेतले.

खासदार जलील यांच्या पोस्टने राजकीय वर्तुळात खळबळ! केले ‘हे’ गंभीर आरोप

jalil

औरंगाबाद – मतदार संघातील विकास कामाचा निधी देण्यासाठी जि. प. बांधकाम सभापती किशोर बलांडे यांनी 5 टक्के कमिशन मागितल्याचा खळबळजनक आरोप खा. इम्तियाज जलील यांनी केला. याविषयी त्यांनी ट्विटर या समाजमाध्यमावर टाकलेल्या पोस्टमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना टॅग करून असा उघड भ्रष्टाचार कधीच पाहिला नसल्याचे नमूद केले.

जिल्हा परिषदेचे पदाधिकारी सध्या वार्षिक नियोजन करण्यात व्यग्र आहेत. गतवर्षी जिल्हा नियोजन समितीने मंजूर केलेला निधी 31 मार्च अखेरपर्यंत खर्च करणे जि. प.ला बंधनकारक आहे. शिवाय यावर्षी जिल्हा नियोजन समितीने मंजूर केलेले सुमारे 158 कोटी आणि 15 व्या आयोगाचा निधी तसेच जि. प. उपकराचा निधी विकास कामावर खर्च करण्याचे नियोजन पदाधिकारी करीत आहेत. जिल्ह्यातील खासदार, आमदारांनी मतदारसंघातील विकास कामासाठी जि. प.कडे निधीची मागणी केली आहे. जि. प. ला मंजूर निधीच्या खर्चाचे नियोजन करण्याचे अधिकार जि.प. पदाधिकाऱ्यांना आहेत. यामुळे खासदार, आमदारांना निधी देण्यात येऊ नये, असा सूर काही पदाधिकाऱ्यांमध्ये होता. तत्पूर्वी अन्य लोकप्रतिनिधींप्रमाणे खा. इम्तियाज जलील यांनीही मतदारसंघातील विकास कामे करण्यासाठी जि.प. बांधकाम सभापती किशोर बलांडे यांना पत्र देऊन निधीची मागणी केली होती.

दरम्यान, खा. जलील यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून मुख्यमंत्री कार्यालय आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना टॅग करून एक पोस्ट सोमवारी रात्री अपलोड केली. त्यांनी जि. प.तील भ्रष्टाचारावर नियंत्रण आणण्याची विनंती केली. माझ्या मतदारसंघासाठी विकास निधी देण्यासाठी बांधकाम सभापती बलांडे 5 टक्के मागत आहेत. असे उघड भ्रष्ट व्यवहार कधीच पाहिलेले नाहीत. कृपया हे थांबवा, असे नमूद केले. खा. जलील यांच्या या पोस्टने खळबळ उडाली.

जिल्हा परिषदेतील निधी वाटपाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी –
रस्ते विकासासाठी साडेआठ कोटींच्या निधीचे जि.प.कडे प्रस्ताव दिले होते. पालकमंत्र्यांनी निधी वाटपाची यादी अंतिम केल्याचे सांगून सभापती बलांडेंनी 50 लाख रुपये दिल्याचे सांगितले. एवढेच नव्हे तर माझ्या माणसाकडे 5 टक्के कमिशन मागितले. याबाबत मी बलांडेंना फोन केला असता त्यांनी माझ्याकडेही कमिशन मागितले. खासदारांकडे कमिशन मागण्याची हिंमत कशी होते. याबाबतचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत. या निधी वाटपाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. – इम्तियाज जलील, खासदार

शहरातील रिक्षा इलेक्ट्रिक करण्याचा प्रयत्न

औरंगाबाद – डबल डेकर स्मार्ट शहर बस घेण्यासोबतच रिक्षांचे इलेक्ट्रिक रिक्षांमध्ये परिवर्तन व इ-सायकलला चालना देण्यासाठी औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनचा प्रयत्न राहील, असे महापालिकेचे प्रशासक तथा स्मार्ट सिटीचे सीईओ आस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले.

औरंगाबाद स्मार्ट सिटीच्या शहर सल्लागार समितीची बैठक सोमवारी स्मार्ट सिटी कार्यालयात पार पाडली. यावेळी स्मार्ट सिटीतर्फे सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला. पांडेय यांनी प्रकल्पांचे सादरीकरण केले. त्यात पूर्ण झालेली कामे, सुरू असलेली कामे, भविष्यातील प्रकल्पांची माहिती दिली.

मास्टर सिस्टम इंटीग्रेटर, ई गव्हर्नर्स, जीआयएस सर्व्हेक्षण, कौशल्य विकास प्रकल्प, ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन व सौंदर्यिकरण, पादचारी मार्गासह सायकल ट्रॅक, स्ट्रीट फॉर पिपल, स्मार्ट सिग्नल, स्मार्ट बस याची माहिती पांडेय यांनी दिली. खासदार इम्तियाज जलील व माजी महापौर नंदकुमार घोडेले, काँग्रेसचे माजी गटनेते भाऊसाहेब जगताप, नाथव्हॅलीचे प्राचार्य रणजीत दास, आर्किटेक्ट हारेस सिद्दीकी, शहर अभियंता सखाराम पानझडे व स्मार्ट सिटीचे अधिकारी उपस्थित होते.

धक्कादायक ! पॉर्न व्हिडिओ दाखवून मामीने भाच्यावर केले लैंगिक अत्याचार

sex

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – नागपूरमध्ये मामी आणि भाच्याच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. या घटनेत आरोपी मामीने आपल्या अल्पवयीन भाच्याचे लैंगिक शोषण करून त्याच्यावर अत्याचार केले आहेत. हि धक्कादायक घटना नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी या ठिकाणी घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलाने दिलेल्या तक्रारीवरून 21 वर्षीय मामीविरुद्ध पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित मुलगा दहावीच्या वर्गात शिकतो. या मुलाचे वडील मोलमजुरीचे काम करतात. दोन वर्षांआधी पीडित मुलगा आपल्या मामाकडे गेला, तेव्हा मामीने पीडित भाच्याला अश्लील व्हिडिओ दाखवून त्याचे पहिल्यांदा लैंगिक शोषण केले. हि आरोपी मामी एवढ्यावरच थांबली नाही तर तिने या घटनेचे स्वतःच्या मोबाईलमध्ये चित्रीकरणसुद्धा केले. त्यानंतर पीडित मुलगा हा आपल्या घरी परतला. यानंतर या मामीने पीडित भाच्याशी मोबाइलवर संपर्क साधून त्याचे चित्रीकरण व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर तिने पीडित मुलाला वारंवार घरी बोलावून त्याचे लैंगिक शोषण केले.

चार महिन्यांपूर्वीच आरोपी मामीचा पतीसोबत वाद झाला तेव्हा ती आपल्या माहेरी राहायला गेली. त्या ठिकाणीसुद्धा मामीने आपल्या भाच्याला बोलून त्याचे वारंवार लैंगिक शोषण केले. यानंतर हा त्रास असह्य झाल्यामुळे पीडित मुलाने आपल्या नातेवाईकांना याबाबत माहिती दिली. यानंतर पीडित मुलाच्या नातेवाईकांनी पारशिवनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी पीडित मुलाच्या तक्रारीवरून ठार मारण्याची धमकी देणे व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. पारशिवनी पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.