Thursday, December 25, 2025
Home Blog Page 2755

हिजाब परिधान करून मुस्लिम महिलांनी साजरी केली शिवजयंती

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेल्या मिरज शहरामध्ये शिवजयंती निमित्त असंख्य मुस्लिम महिलांनी हिजाब परिधान करून मोठ्या उत्साहात मध्ये शिवजयंती साजरी केली. यावेळेस सामाजिक कार्यकर्त्या सुमय्या वसीम रोहिले. त्याच बरोबर प्रभाग पाच मधील भाजपामधून निवडणूक लढवलेले महिला उमेदवार आफ्रीन निसार रोहिले . आणि शहनाज मुल्ला. तबस्सुम रोहिले, नजो शिलेदार परिसरातील आणि सर्वच महिला कार्यकर्त्या हे त्या ठिकाणी उपस्थित होते.

सौ सुमय्या रोहिले म्हणाल्या,”छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये स्त्रियांना मानसन्मान आणि आदर होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हिंदू-मुस्लीम हा भेद कधीच नव्हता. त्याचबरोबर कर्नाटकात बहुचर्चित असलेल्या या प्रकरणावर ती टिपणी करत देशाच्या विकासासाठी असलेली कृत्य देशाच्या देशाच्या हितासाठी चांगले नाही.” आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये राहतो आणि आम्हाला त्याचा स्वार्थ अभिमान असल्याचे त्या म्हणाल्या.

जम्मू काश्मीर येथे देशसेवा बजावत असताना शिगावचे सुपुत्र जवान रोमित चव्हाण यांना आले वीरमरण

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

शिगाव गावचे सुपुत्र रोमित तानाजी चव्हाण वय 23 यांना जम्मू काश्मीर येथे देशसेवा बजावत असताना वीरमरण आले. जम्मू-काश्मीर येथील शोपिया या भागामध्ये दहशतवाद्यांच्यावरील कारवाईच्या वेळेस गोळीबार झाला. त्यामध्ये राष्ट्रीय रायफलचे जवान रोमित तानाजी चव्हाण हे दहशतवाद्यांशी लढताना शहीद झाले.

पाच वर्षा पूर्वी रोमित हा मुंबई येथे सैन्य दलात भरती झाला होता. त्यानंतर मध्यप्रदेश येथील सागर येथे महार रेजिमेंटल सेंटर वर त्यांचे एक वर्षे ट्रेंनिग झाले होते. चार महार येथून त्यांच्या देशसेवेला सुरवात झाली होती. एक वर्षा पूर्वी जम्मू काश्मीर येथे 1 राष्ट्रीय रायफल मध्ये पोस्टिंग झाले होते. जम्मू काश्मीर येथील शोपिया भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती भारतीय सैन्याला समजताच या भागात घेराबंदी करून सर्च ऑपरेशन करण्यात आले होते.

यावेळी लपून बसलेल्या दहशतवाद्यानी जवानांवर गोळीबार सुरू केला यामध्ये शिगाव येथील रोमित चव्हाण व उत्तर प्रदेश येथील संतोष यादव हे जवान शहीद झाले. शिगाव गावासह भागात ही बातमी समजताच शोककळा पसरली व सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. पार्थिव रविवारी संध्याकाळी पर्यंत गावात येण्याची शक्यता आहे.

दहावी बारावी परीक्षेच्या भरारी पथकात राहणार आरोग्य विभागाचे पथक

Exam

औरंगाबाद – दहावी-बारावीच्या परीक्षा केंद्रावरील गैरप्रकार टाळण्यासाठी व परीक्षा केंद्राना भेटी देवून पहाणीसाठी शासनाच्या अध्यक्षतेखाली दक्षता समिती (भरारी पथक) स्थापन केली जाते. यामद्ये पोलिस आयुक्तालय, जिल्हा परीषद, शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचा समावेश असतो. यंदा कोरोनाच्या अनुषंगाने या भरारी पथकात आरोग्य विभागाचा देखील समावेश करण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत दहावी, बारावी परीक्षा औरंगाबाद विभागातील बीड, जालना, औरंगाबाद, परभणी आणि हिंगोली या पाचही जिल्ह्यामंध्ये चार मार्च ते चार एप्रिल या कालावधीत घेण्यात येणार आहे. परीक्षा केंद्रांवरील गैरप्रकार टाळण्यासाठी, परीक्षा सुरळीत संचलनाकरिता तसेच परीक्षा केंद्रांना भेटी देवून पहाणी करण्याकरीता पोलिस आयुक्त किंवा त्यांचा प्रतिनिधी (आयुक्तालय असलेल्या जिल्ह्यासाठी)
पोलिस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, (जिल्हा परीषद), शिक्षणाधिकारी (प्राथमिक, माध्यमिक), जिल्हा शिक्षणाधिकारी (निरंतर शिक्षण), जिल्हा परीषद (सदस्य, सचिव) यांचा समावेश असतो.

मात्र, यंदा कोरोनाच्या अनुषंगाने दहावी-बारावी परीक्षेच्या कालावधीत जिल्हा दक्षता समितीमध्ये जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका स्तरावरील आरोग्य अधिकारी यांचा समावेश करण्यात येणार आहे. प्रत्येक परीक्षा केंद्र, उपकेंद्रासाठी जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे आवश्यक ते सहकार्य मिळावे, यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचे फिरते पथक ठेवण्यात येणार आहे.

5 कंपन्यांनी चिप युनिटसाठी भारताला दिला 1.50 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा प्रस्ताव

नवी दिल्ली । देशातील ऑटो सेक्टरमधील चिपचे संकट भविष्यात दूर होईल असे वाटते. जगातील 5 मोठ्या कंपन्यांनी देशात इलेक्ट्रॉनिक चिप आणि डिस्प्ले मॅन्युफॅक्चरिंग प्लांट उभारण्यासाठी सरकारला गुंतवणुकीचा प्रस्ताव दिला आहे. हा प्रस्ताव $20.5 अब्ज (1.53 लाख कोटी रुपये) चा आहे. सरकारी निवेदनात ही माहिती मिळाली आहे.

Vedanta Foxconn JV, IGSS Ventures आणि ISMC यांनी सरकारला $13.6 अब्ज गुंतवणुकीसह इलेक्ट्रॉनिक चिप मॅन्युफॅक्चरिंग युनिट इन्स्टॉल करण्याचा प्रस्ताव दिला आहे. यासोबतच या कंपन्यांनी सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंगला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू केलेल्या ‘सेमिकॉन इंडिया प्रोग्राम’ अंतर्गत केंद्र सरकारकडे $5.6 अब्जची मदतही मागितली आहे.

सरकारने दिली माहिती
सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले मॅन्युफॅक्चरिंगच्या या ग्रीनफिल्ड सेगमेंटमध्ये सरकारला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने एक निवेदन जारी करून ही माहिती दिली आहे.

वेगाने वाढणारे सेमीकंडक्टर मार्केट
याशिवाय वेदांत आणि एलेस्ट या दोन कंपन्यांनी अंदाजे $6.7 बिलियन गुंतवणुकीसह डिस्प्ले मॅन्युफॅक्चरिंग प्लांट इन्स्टॉल करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे, तसेच सरकारला भारतात डिस्प्ले फॅब्स उभारण्यासाठी $2.7 बिलियनचे इन्सेन्टिव्ह मागितले आहे, असेही निवेदनात पुढे म्हटले आहे. दक्षिण आशियाई देशाचा सेमीकंडक्टर मार्केट 2020 मध्ये 15 अब्ज डॉलरच्या तुलनेत 2026 पर्यंत $63 अब्जपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.

डिझाइन लिंक्ड प्रोत्साहन योजना
याव्यतिरिक्त, SPEL सेमीकंडक्टर, एचसीएल, सिरमा टेक्नॉलॉजी आणि वेलँकी इलेक्ट्रॉनिक्सने सेमीकंडक्टर पॅकेजिंगसाठी स्वतःचे रजिस्ट्रेशन केले आहे, तर रुटोन्सा इंटरनॅशनल रेक्टिफायरने कंपाउंड सेमीकंडक्टरसाठी स्वतःचे रजिस्ट्रेशन केले आहे. यासह टर्मिनस सर्किट्स, ट्रायस्पेस टेक्नॉलॉजीज आणि क्युरी मायक्रोइलेक्ट्रॉनिक्स या तीन कंपन्यांनीही डिझाईन लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम अंतर्गत अर्ज केले आहेत.

भारत अजूनही इतर देशांवर अवलंबून आहे
गेल्या वर्षी भारतासह जगभरात सेमीकंडक्टरची मोठी कमतरता होती. त्यामुळे ऑटोमोबाईल आणि इतर क्षेत्रांवर त्याचा नकारात्मक परिणाम दिसून आला. भारतातील कंपन्यांच्या उत्पादनावरही मोठा परिणाम झाला. सेमीकंडक्टर आणि इतर इलेक्ट्रॉनिक चिप्ससाठी भारताला जगातील देशांवर अवलंबून राहावे लागते. भारतात इतका मोठा तुटवडा टाळण्यासाठी सरकार आता भारतातच सेमीकंडक्टर किंवा चिप्सच्या निर्मितीला इन्सेन्टिव्ह देत आहे.

SBI कार्ड हरवले तर त्वरित करा ‘हे’ काम, अन्यथा होऊ शकेल मोठे नुकसान

PIB fact Check

नवी दिल्ली । देशात बँकिंग फसवणुकीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. ही फसवणूक करणारी लोकं अनेक नवनवीन मार्गाने लोकांना आपल्या फसवणुकीचे बळी पाडत आहेत. आजच्या काळात छोटीशी जरी चूक झाली तरीही फटका बसू शकतो. मात्र, काही गोष्टी लक्षात ठेवूनच तुम्ही ऑनलाइन फसवणुकीला बळी पाडण्यापासून टाळू शकता. जर तुमचे क्रेडिट कार्ड कोणी हरवले किंवा चोरीला गेले तर ते ताबडतोब ब्लॉक करावे, अन्यथा कोणीही त्याचा गैरवापर करून तुमचे पैसे काढून घेऊ शकतो. तुमचे SBI क्रेडिट कार्ड हरवल्यास तुम्हाला त्रास होऊ शकतो, त्यामुळे तुम्हाला ते ब्लॉक करण्याची प्रक्रिया माहित असणे आवश्यक आहे.

अ‍ॅक्सिस कार्ड SMS द्वारे देखील ब्लॉक केले जाते
तुम्ही SBI क्रेडिट कार्ड अनेक प्रकारे ब्लॉक करू शकता. विशेष म्हणजे तुम्ही SMS द्वारेही ब्लॉक करू शकता. हा मेसेज पाठवणे खूप सोपे आहे.

तुमचे कार्ड ब्लॉक करण्यासाठी, 5676791 वर BLOCK XXXX पाठवा. येथे XXXX हे तुमच्या कार्ड नंबरचे शेवटचे 4 अंक आहेत. क्रेडिट कार्डसह रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावरून SMS पाठवण्याची खात्री करा.

कॉन्टॅक्टलेस कार्डने 5000 रुपयांपर्यंतच्या पेमेंटसाठी पिन आवश्यक नाही
कॉन्टॅक्टलेस टेक्नॉंलॉजीने सुसज्ज असलेले कार्ड ‘टॅप अँड पे’ ची सुविधा देखील देते म्हणजेच कार्ड स्वाइप न करता फक्त POS मशीनवर टॅप करून पेमेंट केले जाऊ शकते. तुम्ही पिन न टाकता कॉन्टॅक्टलेस कार्डने 5000 रुपयांपर्यंत पैसे देऊ शकता.

बिलात कॅरीबॅगची रक्कम जोडण्याबाबत NCDRC झाले कठोर, आता शुल्क आकारण्यासाठी भरावा लागणार दंड

नवी दिल्ली । देशात पॉलिथिनच्या वापरावर बंदी आल्यापासून कॅरी बॅग चार्जच्या नावाखाली ग्राहकांकडून अनावश्यक रक्कम वसूल करण्यास सुरुवात झाली आहे. दुकानदार, विक्रेते किंवा शॉपिंग मॉल्सही ग्राहकांच्या बिलात कॅरीबॅगचे चार्ज त्यांना न कळवता जोडत आहेत. अशा परिस्थितीत, राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगाने बिलामध्ये कॅरीबॅगची रक्कम न कळवता जोडणे ही अनफेअर ट्रेड प्रॅक्टिस असल्याचे मानले आहे. आयोगाने आता याबाबत कडक भूमिका घेतली आहे. विक्रेते किंवा उत्पादक ग्राहकांच्या खरेदीतून नफा कमावतात, त्यामुळे ग्राहकांच्या सोयीची काळजी घेणे ही त्यांची जबाबदारी आहे, असे आयोगाचे मत आहे.

देशात अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत, ज्यामध्ये कॅरीबॅगच्या बदल्यात चार्ज आकारून दंड आकारण्यात आला आहे. ग्राहक विवाद निवारण आयोगाने तक्रारदाराला कॅरीबॅग चार्ज करण्यासाठी भरपाई म्हणून भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच ही प्रथा तातडीने बंद करण्यास सांगितले जात आहे. जिल्हा ग्राहक विवाद निवारण आयोगाने मान्य केले आहे की, तुम्ही अनफेअर ट्रेड प्रॅक्टिससाठी जाहिरात एजंट म्हणून ग्राहकांना वापरू शकत नाही.

दुकानदार कॅरीबॅगसाठी पैसे घेऊ शकत नाहीत
अलीकडेच, केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने प्लॅस्टिक उत्पादक किंवा उत्पादक, प्लॅस्टिक पॅकेजिंग कचऱ्याच्या ब्रँड्सची जबाबदारी वाढवण्यासाठी प्लॅस्टिक कचरा कमी आणि नियंत्रित करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. सरकारने ही मार्गदर्शक तत्त्वे तातडीने लागू करून उत्पादकांची जबाबदारी वाढवण्यास सांगितले आहे. ही मार्गदर्शक तत्त्वे सिंगल युझ प्लॅस्टिकचे उच्चाटन करण्याच्या दिशेने सरकारच्या पावलांचा एक भाग आहेत.

बिल भरण्यापूर्वी ‘या’ गोष्टी जाणून घ्या
त्यामुळे मार्केट किंवा मॉलमध्ये खरेदी केल्यास कॅरीबॅगची माहिती आधीच घ्या. तसेच, बिल भरताना, कॅरीबॅगसाठी चार्ज तर जोडले गेले नाही ना याची खात्री करा. यासोबतच GST आणि इतर टॅक्स देखील तपासा, कारण MRP नंतर कोणताही टॅक्स लावता येणार नाही. तसेच, वस्तूंच्या दरातील डिस्काउंट बिलाशी अचूक जुळवा.

कॅरीबॅग ताब्यात घेणे निष्पक्ष व्यापारासाठी चांगले नाही: NCDRC
अलीकडेच NCDRC ने अनेक निर्णयांमध्ये कॅरीबॅगसाठी लोकांकडून अतिरिक्त चार्ज आकारण्यास मनाई केली आहे. NCDRC ने म्हटले आहे की, न भरलेल्या काउंटरवर कॅरीबॅगसाठी अतिरिक्त चार्ज आकारणे हे न्याय्य नाही. नवीन ग्राहक संरक्षण कायदा-2019 नुसार, रिटेल विक्रेते आपल्या कंपनीचा लोगो न वापरता प्लॅस्टिक कॅरी बॅगसाठी चार्ज आकारू शकतात. म्हणजे रिटेल विक्रेता पैशासाठी साध्या कॅरीबॅग विकू शकतो, मात्र जर कंपनीचा लोगो कॅरीबॅगमध्ये विकला गेला असेल तर तो विनामूल्य पुरवठा केला पाहिजे.

मात्र, कॅरीबॅगसाठी चार्ज आकारले जाईल असे कंपनीने खरेदीपूर्वी तुम्हाला सांगितले तर तुमची सुनावणी कंझ्युमर कोर्टात होऊ शकत नाही. यासोबतच तुमच्या कंपनीसोबत कॅरीबॅग घेण्याचा करार झाला असला तरी कंपनीवर कारवाई करता येणार नाही.

देशात असे खूप चुतीया लोक आहेत; संजय राऊतांची सोमय्यांवर टीका

raut somaiya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या कडून आज भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर टीका करताना त त्यांचा उल्लेख चुतीया असा केला. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. या भेटीवरून किरीट सोमय्या यांनी टीका केली होती. त्याला उत्तर देताना संजय राऊत यांनी सोमय्यांवर टीका केली.

संजय राऊत म्हणाले, देशात असे खूप चु# लोक आहेत. पण अशा चु# लोकांच्या बोलण्यावरून देशाच्या राजकारणासंदर्भात प्रश्न विचारण्यात अर्थ नाही. देशात २०२४ नंतर अशा चु# लोकांना स्थान उरणार नाही, ते संपतील. २०२४ नंतर देशात लोकशाही येईल, राजकारण पारदर्शक असेल, असे संजय राऊत यांनी म्हटले.

के. चंद्रशेखर राव हे शिष्टमंडळासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला येत आहेत. भाजपचे नेते याची खिल्ली उडवतात. त्यामुळे मी संबंधित नेत्यांना चु# बोललो. अशा लोकांना केंद्र सरकार सुरक्षा पुरवते, ही योग्य बाब नाही. हा मुख्यमंत्र्यांचा आणि महाराष्ट्रातील जनतेचा अपमान आहे, असेही संजय राऊत यांनी सांगितले.

कोरोनामुळे झालेल्या मृत्यूचा दावा करणारा LIC संबंधित रिपोर्ट सरकारने फेटाळला, लिस्टिंग करण्यापूर्वी दिले स्पष्टीकरण

LIC IPO Date

नवी दिल्ली । देशातील सर्वात मोठी इन्शुरन्स कंपनी असलेली लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (LIC) आपला IPO लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. दरम्यान, LIC IPO च्या आकड्यांबाबत वाद निर्माण झाला आहे. केंद्र सरकारने शनिवारी LIC IPO आकडेवारीशी संबंधित केवळ ‘अंदाज’ रिपोर्ट म्हणून फेटाळून लावले, ज्यात दावा केला गेला होता की, 2021 मध्ये कोरोना विषाणूमुळे झालेल्या मृत्यूची संख्या अधिकृत आकडेवारीपेक्षा खूप जास्त असू शकते.

पारदर्शक शासन व्यवस्था
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी सांगितले की,”देशात कोविड-19 मुळे होणाऱ्या मृत्यूची नोंद करण्यासाठी पंचायत, जिल्हा आणि राज्य स्तरावर पारदर्शक आणि प्रभावी यंत्रणा आहे.” मृत्यूच्या प्रकरणांच्या नोंदणीवरही लक्ष ठेवले जाते, असे मंत्रालयाकडून सांगण्यात आले.

सरकार म्हणाले – “पक्षपाती अर्थ लावला गेला”
LIC द्वारे जारी केल्या जाणार्‍या प्रस्तावित IPO शी संबंधित मीडिया रिपोर्ट्समध्ये इन्शुरन्स कंपनीने निर्णय घेतलेल्या पॉलिसी आणि क्लेमचे डिटेल्स दिले आहेत, जेणेकरून सट्टा आणि पक्षपाती अर्थ लावता येईल, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनानुसार, या पक्षपाती स्पष्टीकरणाचा उद्देश हे दाखवणे आहे की, कोविडमुळे झालेल्या मृतांची संख्या दिलेल्या अधिकृत आकडेवारीपेक्षा जास्त असू शकते. हा रिपोर्ट निराधार आणि अंदाजावर आधारित असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे, असे देखील या निवेदनात म्हटले गेले आहे.

निवेदनानुसार, LIC ने निकाली काढलेल्या दाव्यांमध्ये सर्व कारणांमुळे झालेल्या मृत्यूंचा समावेश होता, मात्र मीडिया रिपोर्ट्सने असा निष्कर्ष काढला आहे की, कोविडमुळे झालेल्या मृत्यूंना कमी लेखले गेले. अशी चुकीची व्याख्या तथ्यांवर आधारित नाही आणि लेखकाचा पूर्वाग्रह उघड करते.

निवेदनानुसार, पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी सरकारने कोविड मृत्यूची पारदर्शक पद्धतीने नोंद करण्यासाठी जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त वर्गीकरण स्वीकारले आहे. या अंतर्गत राज्यांनी स्वतंत्रपणे नोंदवलेले कोविडमधील मृत्यूचे आकडे संपूर्ण केंद्र सरकारने तयार केल्याचेही सांगण्यात आले.

मार्चमध्ये बँका 13 दिवस बंद राहणार, शाखेत जाण्यापूर्वी सुट्ट्यांची संपूर्ण लिस्ट पहा

Bank Holiday

नवी दिल्ली । रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने फेब्रुवारी 2022 साठी बँक सुट्ट्यांची लिस्ट प्रसिद्ध केली आहे. अशा परिस्थितीत, फेब्रुवारीमध्ये शिल्लक असलेल्या कामासाठी शाखेत जाण्यापूर्वी तुम्ही बँकेच्या सुट्टीची लिस्ट तपासली पाहिजे. या लिस्ट नुसार मार्च 2022 मध्ये एकूण 13 दिवस बँका बंद राहतील.

मार्चमध्ये, एकूण 13 दिवसांच्या बँक सुट्ट्यांपैकी 4 सुट्ट्या रविवारी असतात. यातील अनेक सुट्ट्याही सातत्याने पडणार आहेत. मात्र देशभरात एकूण 13 दिवस बँका बंद राहणार नाहीत. RBI च्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या सुट्ट्यांच्या लिस्ट नुसार, या सुट्ट्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये आहेत. या सर्व सुट्ट्या सर्व राज्यांमध्ये लागू होणार नाहीत. त्याच वेळी, RBI च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, रविवार व्यतिरिक्त महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँका बंद असतात.

फेब्रुवारी 2022 मधील बँक सुट्ट्या
चला तर मग जाणून घेऊयात की, फेब्रुवारी 2022 मध्ये कोणत्या राज्यांमध्ये बँका कधी बंद राहतील? ज्यामुळे पुढील महिन्याच्या सुट्टीच्या लिस्टच्या आधारे तुम्ही तुमचे बँकेशी संबंधित काम पूर्ण करावे, जेणेकरून तुम्हाला अनावश्यक त्रास टाळता येईल.

1 मार्च (महाशिवरात्री) – आगरतळा, ऐझॉल, चेन्नई, गंगटोक, गुवाहाटी, इम्फाळ, कोलकाता, नवी दिल्ली, पणजी, पाटणा आणि शिलॉंग वगळता इतर ठिकाणी बँका बंद.
3 मार्च (लोसर) – गंगटोकमध्ये बँक बंद
4 मार्च (चपचर कुट) – आयझॉलमध्ये बँक बंद
6 मार्च (रविवार) – साप्ताहिक सुट्टी
12 मार्च (शनिवार) – महिन्याचा दुसरा शनिवार
13 मार्च (रविवार) – साप्ताहिक सुट्टी
17 मार्च (होलिका दहन) – डेहराडून, कानपूर, लखनौ आणि रांचीमध्ये बँका बंद
18 मार्च (होळी / धुलेती / डोल जत्रा) – बेंगळुरू, भुवनेश्वर, चेन्नई, इंफाळ, कोची, कोलकाता आणि तिरुवनंतपुरम व्यतिरिक्त इतर ठिकाणी बँका बंद आहेत.
19 मार्च (होळी / याओसांगचा दुसरा दिवस) – भुवनेश्वर, इंफाळ आणि पाटणा येथे बँका बंद
20 मार्च (रविवार) – साप्ताहिक सुट्टी
22 मार्च (बिहार दिन) – पाटण्यात बँक बंद
26 मार्च (शनिवार) – महिन्याचा चौथा शनिवार
27 मार्च (रविवार) – साप्ताहिक सुट्टी