Thursday, December 25, 2025
Home Blog Page 2758

“उद्धव ठाकरे हिंमत असेल तर मला अटक करा,”; किरीट सोमय्यांचे थेट आव्हान

thackeray somaiya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व त्याच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावर सातत्याने टीका केली जात आहे. दरम्यान आज त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले. “हिंमत असेल तर मला अटक करा, असे सोमय्या यांनी म्हंटले.

किरीट सोमय्या यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “आतापर्यंत जे काही मी आरोप केलेले आहेत ते सर्व खरे आहेत. कारण मी पुराव्याशिवाय एकही शब्द बोलत नाही. उद्धव ठाकरेंचे सरपंच मिसाळ हे मी ज्यावेळी 2020 मध्ये गेलो होतो, त्यावेळी सांगतात, आहेत बंगले. पैसे घेतायत त्यात तुझं काय? असं म्हणत काय शिव्या दिल्या होत्या मला त्यावेळी.

छगन भुजबळांना दोन वर्षे तुरुंगात रहावे लागले. आता सत्तेत आले तर त्या बेनामी संपत्तीची पाहणी करायला किरीट सोमय्या गेले तर किरीट सोमय्याला लगेच नोटीस. मी उद्या सकाळी साडेअकरा वाजता सांताक्रुझ पोलीस स्टेशनमध्ये जाणार आहे. आणि त्या ठिकाणी तक्रार दाखल करणार आहे. उद्धव ठाकरे हिंमत असेल तर करा मला अटक.” असे सांगत सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले.

“रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लागते है, ईडीचा सर्वात मोठा घोटाळा बाहेर काढणार” – संजय राऊत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पत्रकार परिषदेनंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नाराय राणे, किरीट सोमय्या आणि भाजपवर निशाणा साधला. केंद्रीयमंत्री नारायण राणे आणि भाजप नेत्यांकडून ईडी कारवायांच्या धमक्या दिल्या जात असल्याने यावर राऊत यांनी आम्ही तुमच्या धमक्यांना घाबरत नाही. तुम्ही अशा कितीही धमक्या दिल्या तरी रिश्ते में हम आप के बाप लगते है आणि बाप काय असतो हे तुम्हाला दिसेल, असा इशारा दिला. तसेच आठवडाभरात ईडीचा सर्वात मोठा घोटाळाया बाहेर काढणार असल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला.

संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “केंद्रीय तपास यंत्रणांना तुम्ही खंडणीखोर बनवले आहे. हि भाजप नेत्यांची साधने झाली आहेत. हे क्रिमिनल सिंडिकेट आहे. ते उघड केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. कुणाला अंगावर यायचे असेल तर या. तुम्हाला तुमच्याच भाषेत उत्तर देऊ. तुम्हाला तोंड काळे करून जावे लागेल. सोमय्यांकडून गेल्या चार दिवसांपासून रोज एक प्रकरण दिले जात आहे. पालघरला येऊर नावाच्या गावात सोमय्यांचा एक मोठा प्रोजेक्ट सुरू आहे. 260 कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे.

किरीट सोमय्या यांचा मुलगा नील सोमय्या यांच्या नावाने हा प्रकल्प सुरू आहे. त्यांची पत्नी मेधा किरीट सोमय्या या प्रकल्पाच्या डायरेक्टर आहेत. या 260 कोटींच्या प्रकल्पात ईडीच्या डायरेक्टरचे किती पैसे आहेत? ही बेनामी प्रॉपर्टी एका ईडीच्या संचालकाची आहे. हे कोटी कोटी रुपये यांच्याकडे येतात कुठून?, असा सवाल राऊत यांनी केला.

विद्यापीठ कायद्यामध्ये बदल केल्याच्या निषेधार्थ अभाविचे आंदोलन

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

राज्य शासनाकडून विद्यापीठ कायद्यामध्ये बदल केल्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. परिषदेच्या शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनास निवेदन दिले. 15 डिसेंबर 2021 रोजी महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विद्यापीठाच्या स्वायतत्तेवर घाला घालत राजकीय स्वार्थासाठी विद्यापीठ कायद्यामध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला.

शासनाच्या प्रस्तावित विद्यापीठ सुधारणा कायद्यामुळे राज्यातील सर्व शासकीय विद्यापीठांचे कुलपती असणारे राज्यपाल हे देखील कुलगुरूंची थेट नियुक्ती करू शकणार नाहीत. यापुढे कुलगुरू निवड राज्यशासनाने सुचवलेल्या दोन नावांमधूनच राज्यपाल यांना करावी लागेल. या सर्व प्रकारामुळे राज्य शासन पूर्णपणे कुलपती अधिकारात हस्तक्षेप करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. विद्यापीठामध्ये कुलपती आणि कुलगुरू या पदा व्यतिरिक्त प्र. कुलपती म्हणून एक नवीन पद निर्माण करण्यात येणार आहे. त्या पदी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

यावरून विद्यापीठांच्या स्वायतत्तेवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न राज्यशासन करीत आहे. यावरून स्पष्टपणे राजकीय पक्ष, नेते यांचा अवाजवी हस्तक्षेप विद्यापीठाच्या निर्णय प्रक्रियेत वाढेल. कुलपती हे सर्व विद्यापीठांचे प्रमुख आहेत. त्यांच्या अधिकारांवर हे आक्रमण आहे. यामुळे विद्यापीठांची गुणवत्ता ढासळण्याची शक्यता असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. आंदोलनात विदयार्थी परिषदेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

‘स्वाभिमानी’च्या मोर्चात शेतकरी-पोलिसांत जोरदार झटापट

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखाने एकरकमी एफआरपी देत असताना खाली जिल्ह्यातील कारखानदारांकडून ठेंगा दाखवला आहे. याविरोधात शुक्रवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या तिरडी मोर्चा पोलिसांनी अडवला. पोलिसांनी तिरडी काढून घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संतप्त शेतकरी आणि पोलीस यांच्यात जोरदार झटापट झाली. मोर्चामध्ये आक्रमक झालेल्या माजी खासदार राजू शेट्टी यांनी एकरकमी एफआरपी देण्याच्या विरोधात पालकमंत्री जयंत पाटील कारखानदारांचे टोळके बनवले असल्याचा आरोप केला.

कारखानदारांचे मढं घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर चाललो असताना पोलिसांनी त्याची विटंबना केली. या कृत्यामागे पालकमंत्र्यांचा हात असल्याबद्दल त्यांचा निषेध केला. मोर्चा संपल्यानंतर गनिमी काव्याने सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयार एकरकमी एफआरपीसह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानीच्यावतीने राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत मोर्चा काढण्यात आला. त्यामध्ये प्रदेशाध्यक्ष जालींदर पाटील, सावकर मादनाईक, जिल्हाध्यक्ष महेश खराडे, संदीप राजोबा यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते.

विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात झाली. तेथून काही अंतरावर मोर्चा आला असता शेतकर्‍यांनी कारखानदारांची तिरडी बाहेर काढली. ही बाब पोलिसांच्या लक्षात येताच त्यांनी तिरडी काढून घेण्याचा प्रयत्न केला. शेतकर्‍यांनी तिरडी देण्यास विरोध दर्शविल्याने पोलिसांनी हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. या कारणांनी शेतकरी संतप्त झाले, शेतकर्‍यांनी तिरडी कोणत्याही परिस्थितीत न देण्याची भूमिका घेतली. त्यामुळे पोलीस आणि शेतकर्‍यांमध्ये जोरदार झटापट झाली. या प्रसंगाने तेथे तणाव निर्माण झाला होता. काही वेळाने थांबलेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर जावून धडकला. पोलीसांनी कारखानदारांच्या तिरडीची विटंबना केल्याने राजू शेट्टी आक्रमक झाले.

सातारा जिल्ह्यात आजपासून 14 दिवस जमावबंदीचे आदेश

shekhar singh

सातारा | सातारा जिल्ह्यात आज दि. 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी होत आहे. तसेच सज्जनगड येथे रामदास नवमी, स्वा. सावरकर पुण्यदिन, शंभू महादेवाचा महाशिवरात्री हा उत्सव साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी शस्त्र व जमावबंदी जारी करण्याचे आदेश दिले आहेत.

कोविड विषाणुचा प्रादुर्भाव, विविध सण, उत्सव, समारंभ, यात्रा, पर्यटन क्षेत्र, धार्मिक स्थळे, लग्न, विविध आंदोलने या ठिकाणी जनसमुदाय एकत्र येऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणुन जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 (सुधारणा अध्यादेश) महाराष्ट्र पोलीस अधिनियम 2014 चे कलम 37(1)(3) अनव्ये प्राप्त अधिकारास अधिन राहून संपूर्ण सातारा जिल्ह्यात दि. 19 फेब्रुवारी 2022 रोजीचे 00.00 वा. पासून ते दि. 4 मार्च 2022 चे 24.00 वा. पर्यंत शस्त्र बंदी व जमावबंदी आदेश जारी केला आहे.

या आदेशामुळे पुन्हा नियमांचे व अटीचे पालन करून सण- उत्सव साजरे करावे लागणार आहेत. आज कोळे (ता. कराड) येथे होणारी बैलगाडी शर्यत त्यामुळे रद्द करण्यात आलेली आहे. या निर्णयामुळे भाविकांच्यातून व नागरिकांच्यातून नाराजी व्यक्त केली जात आहे.

“राणेंकडून ईडीच्या कार्यालयातून कागदपत्रांची चोरी करून धमकीचा प्रयत्न”; विनायक राऊतांचा गंभीर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेतली. त्यांच्या पत्रकार परिषदेवरून शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी राणेंवर निशाणा साधला. राणेंची आजची पत्रकार परिषद म्हणजे खोदा पहाड, निकाला कचरा, अशी झाली आहे. राणेंनी स्वाभिमान घाण ठेऊन लाचारी पत्करली आहे. राणेंकडून केवळ भाजपच्या गुडबुडबुकमध्ये राहण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. माझ्या नावाचा वापर करून राणेंनी काल ट्विट केले आहे. त्याचा सोक्षमोक्ष लावणार आहे, अशी टीकाही यावेळी राऊतांनी केली.

शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी खासदार संजय राऊत महापौर किशोरीताई पेडणेकर आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी नारायण राणे यांनी केलेल्या आरोपांवर स्पष्टीकरण दिले. “केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी काल एक ट्विट केले. राणेंनी ज्या बडेजाव पद्धतीने जी गोधना केली होती ट्विटच्या माध्यमातून त्याकडे पाहिल्यानंतर खोडा पहाड, निकाला कचरा, अशी त्याची अवस्था झाली. केवळ भाजपच्या गुडबुकमध्ये राहायचे यासाठी राणे याची केविलवाणी परिस्थिती पाहिल्यानंतर खूप वाईट वाटते.

सत्तेसाठी स्वाभिओमान घाण ठेऊन लाचारी कशा प्रकारे स्वीकारायची हे राणेंकडून शिकावे. ईडीच्या नावाचा दुरुपयोग करून एखाद्याला धमकी देणे हे निश्चितच केन्द्रियपदाचा वापर करून केलेला दुरुपयोग आहे. यामागचे काय कारण असेल तर त्यांनी ईडीच्या नावाचा वापर करून ईडीच्या कार्यालयातून केलेल्या कागदपत्रांची चोरी असेल. नाहीतर एखाध्या शिकाऱ्यासोबत त्यांनी केलेली हातमिळवणी असेल, अशी शंका राऊत यांनी व्यक्त केली.

कराड शहरातील आग प्रकरणी प्रशासन योग्य ती कारवाई करेल : पालकमंत्री बाळासाहेब पाटील

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

शहरात आग लागली तेथे व्यवसाय सोडून काही अनावश्यक गोष्टी दिसत आहेत. लोकवस्ती दाट असल्यामुळे अगीने राैद्ररूप धारण केले. प्रशासन ही घटना घडल्यानंतर योग्य ती कारवाई करेल. शहरात अशाप्रकारे असणाऱ्या वस्ती, घरांवर प्रशासन निश्चितपणे कारवाई करेल, असा इशारा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिला आहे.

कराड शहरातील वेशा वस्तीत मध्यरात्री आग लागून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री यांनी या परिसराची पाहणी केली. यावेळी माजी नगरसेवक साैरभ पाटील यांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. पालकमंत्री यांनी स्थानिक रहिवाशांकडून घडलेल्या घटनेची माहिती घेतली.

बाळासाहेब पाटील म्हणाले, रात्री आग लागली, प्रशासन, नगरपालिकेने आग विझविण्याचा प्रयत्न केला. ज्याच्या घराचे नुकसान झाले त्यांचा पंचनामा सुरू करण्यात आला आहे. रस्ता तयार करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. अग्निशामक दलाची गाडी येण्यात अडचण आलेली आहे. त्यामुळे आता प्रशासन योग्य ती कारवाई करेल.

 

प्रवीण दरेकरांच्या गाडीला तिसऱ्यांदा अपघात; दरेकर बचावले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या गाडीच्या ताफ्याचा सातारा येथील पुणे बंगलोर महामार्गावर खंडाळ्याजवळ अपघात झाल्याची घटना नुकतीच घडली होती. त्यानंतर आज सकाळी पुन्हा जोगेश्वरी, विक्रोळी लिंक रोडवरती एनएसजी कॅम्पजवळ दरेकर यांच्या गाडीला अपघात झाला. या महिनाभरात दरेकरांच्या गाडीला तिस-यांदा अपघात झाला असून तिन्ही अपघात एकसारखे आहेत.

भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्या आतापर्यंतच्या तिन्ही अपघाताचे कारण म्हणजे मोटारसायकल स्वार अचानक पुढे आल्याने अपघात झाला आहे. कुठेतरी घातपाताचा प्रकार केला जात असल्याचा संशय प्रवीण दरेकर यांनी यावेळी व्यक्त केला. याबाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचे दरेकरांनी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

भाजप नेते प्रवीण दरेकर हे गेल्या पंधरा दिवसांपासून राज्यभर दौरे करत आहेत. त्यांच्या गाडीच्या ताफ्याची अपघाताची मालिका सुरू असून आजचा हा प्रकार तिस-यांदा झाला आहे. त्यामुळे मी चौकशी करणार असल्याचे देखील दरेकरांनी सांगितले.

Google ने सांगितले – “क्रोम ब्राउझरमध्ये आहेत11 सिक्युरिटी बग”, कसे काढायचे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । गुगल क्रोम ब्राउझरमध्ये नुकतेच 11 सिक्‍योरिटी बग्‍स आढळले आहेत. यापैकी निम्म्याहून जास्त हाय-रिस्‍क वाले आहेत. हे पाहता आता Google ने युजर्सना आपला वेब ब्राउझर त्वरित अपडेट करण्यास सांगितले आहे. Google ने यासाठी एक अपडेट देखील जारी केले आहे. हे अपडेट डाउनलोड करून युजर्स क्रोम ब्राउझर अपडेट करू शकतात. जगभरात 32 कोटी युजर्स Chrome वापरत आहेत.

Google ने एका बगला Zero-Day Rating दिले आहे. या बगमुळे, हॅकर्स ब्राउझरमध्ये अनऑथोराइज्ड एक्सेस करू शकतात. कंपनीने यापूर्वी कधीही हा बग पॅच केला नव्हता. मात्र, नवीन अपडेटसह हा बग फिक्स केला जाऊ शकतो आणि सायबर अ‍ॅटॅक टाळता येऊ शकतात.

Zero-Day Rating म्हणजे काय ?
Zero-Day हा कॉम्प्युटर-सॉफ्टवेअर असुरक्षिततेचा एक प्रकार आहे. याचा फायदा हॅकर्स सहजपणे घेऊ शकतात. हॅकर्सना कोणतीही असुरक्षा माहिती असल्यास Zero-Day Rating दिले जाते. युजर्स ई-मेल, डिजिटल पेमेंट, सोशल मीडिया इत्यादींसाठी क्रोम ब्राउझर वापरतात. अशा परिस्थितीत, ब्राउझरच्या या त्रुटीमुळे, युजर्सची वैयक्तिक माहिती हॅकर्स किंवा सायबर गुन्हेगारांच्या हाती लागू शकते.

क्रोम ब्राउझर कसे अपडेट करावे ?
कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवर Google Chrome ब्राउझर उघडा.
वरती उजवीकडे दिलेल्या तीन डॉट आयकॉनवर क्लिक करा.
हेल्प वर जाऊन About Google Chrome वर जा.
नवीन विंडोमध्ये, युजर्स Chrome ब्राउझरचे व्हर्जन पाहत येईल.
तुम्हाला इथे अपडेट मिळत आहे यावर क्लिक करून अपडेट करा.

Chrome अ‍ॅप देखील अपडेटेड ठेवा
Apple अ‍ॅप स्टोअर आणि Google Play Store वरून Chrome ब्राउझर अ‍ॅप iOS आणि Android डिव्हाइसवर अपडेट केले जाऊ शकते. Google ने नुकतेच Chrome अ‍ॅपसाठी एक नवीन ट्रॅव्हल फिचर जाहीर केले आहे जे युझर्सना आपली ब्राउझिंग हिस्ट्री मॅनेज करण्यात मदत करते. नवीन फिचर सब्जेक्ट किंवा कॅटेगिरीनुसार युजर्सनी विशीत केलेल्या साइटचे ग्रुप करतात.

मनसेच्या शिवजयंती कार्यक्रमावेळी स्टेज कोसळले; राज ठाकरे सुखरूप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज शिवजयंतीनिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते साकीनाका तसेच गोरेगाव येथील येथे मनसे शाखेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी गोरेगाव येथील कार्यक्रमावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत असताना अचानक कार्यक्रमाचे स्टेज कोसळले. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसून राज ठाकरे सुखरूप बचावले आहेत.

शिवजयंतीनिमित्त मुंबईतील गोरेगाव परिसरातील साकीनाका येथे मनसेच्या शाखेचे आज उदघाटन करण्यात आले. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यासपीठावर येऊन मनसेच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यांच्या भाषणानंतर पुढील कार्यक्रम सुरु असतानाच एकाच वेळी असंख्य कार्यकर्ते स्टेजवर आल्याने स्टेज कोसळला. स्टेजचा मधला भाग अचानक खचल्याने त्यात काही महिला अडकल्या.

मुंबईतील कार्यक्रमावेळी मोठ्या संख्येने मनसे सैनिकांनी उपस्थिती लावली होती. यावेळी स्टेज कोसळल्यानंतर मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रसंगावधान राखत स्टेजवरील मनसे पदाधिकारी व महिला कार्यकर्त्यांना खाली उतरवले.