Thursday, December 25, 2025
Home Blog Page 2759

किल्ले प्रतापगडावर शिवजयंती उत्साहात साजरी : मंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते ध्वजारोहण

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

किल्ले प्रतापगडावर आई भवानी मातेची आज सकाळी श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते अभिषेक व पुजा करण्यात आली. भवानी मातेच्या मंदिरासमोरील ध्वजस्तंभाचे मान्यवरांच्या ह्रस्ते विधिवत पूजन करुन भगव्या ध्वजाचे ध्वजारोहण ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, शिक्षण व अर्थ समितीचे सभापती मानसिंगराव जगदाळे, महिला व बाल कल्याण सभापती सोनाली पोळ, समाज कल्याण सभापती कल्पना खाडे, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, अर्चना वाघमळे, समाज कल्याण अधिकारी डॉ. सपना घोळवे यांच्यासह विविध विभागांचे विभाग प्रमुख, विविध संस्थांचे पदाधिकारी, नागरीक उपस्थित होते.

यावेळी मानाच्या पालखीची मान्यवरांच्या हस्ते पूजा करण्यात आली. छत्रपतींची मूर्ती असलेल्या या पालखीची मिरवणूक काढण्यात आली. पालखीचे शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्याजवळ आगमन झाल्यावर ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते पुष्प अर्पण करुन भक्तिभावाने पूजन करुन भगव्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.

‘या’ टॉप 10 क्रिप्टोकरन्सी 2022 द्वारे मिळवता येईल प्रचंड नफा

Online fraud

नवी दिल्ली । गेल्या वर्षी क्रिप्टोकरन्सी सतत चर्चेत होती. अनेक करन्सीनी एका वर्षात हजारो टक्के रिटर्न दिला. याशिवाय जगभरात ते झपाट्याने स्वीकारलेही जात आहे. असे मानले जाते की, या वर्षी देखील क्रिप्टोकरन्सीमध्ये 2021 पेक्षा जास्त वाढीची शक्यता आहेत. आज आपण अशा टॉप 10 क्रिप्टोकरन्सीबद्दल चर्चा करणार आहोत जे या वर्षी जोरदार रिटर्न देऊ शकतील. मात्र, त्याबाबत निश्चितपणे काहीही सांगता येणार नाही. क्रिप्टोकरन्सी हा अत्यंत धोकादायक गुंतवणुकीचा पर्याय आहे.

1. Bitcoin
Bitcoin, जगातील सर्वात लोकप्रिय क्रिप्टोकरन्सी, क्रिप्टो मार्केटमध्ये येऊ इच्छिणाऱ्या कोणत्याही गुंतवणूकदारासाठी एक अनिवार्य होल्डिंग आहे. पीअर-टू-पीअर नेटवर्कवर ऑपरेट करणारी ही पहिली ब्लॉकचेन-आधारित क्रिप्टोकरन्सी म्हणून ओळखली जाते. जगभरातील जवळजवळ सर्व इंडस्ट्रीजने Bitcoin ला पेमेंटचा एक प्रकार म्हणून स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. फेब्रुवारी 2022 पर्यंत बिटकॉइनची मार्केट कॅप US$771 बिलियन आहे, ज्याचे व्हॉल्यूम US$26.84 बिलियन आहे.

2. Ethereum
Bitcoin नंतर Ethereum ही दुसरी सर्वात लोकप्रिय क्रिप्टोकरन्सी आहे. हे ओपन सोर्स ब्लॉकचेन आहे. फेब्रुवारी 2022 पर्यंत Ethereum ची मार्केट कॅप US$346.39 बिलियन आहे, ज्याचे व्हॉल्यूम US$15.80 बिलियन आहे.

3. Cardano
2022 मधील क्रिप्टो गुंतवणूकदारांसाठी Cardano ही एक मोठी क्रिप्टोकरन्सी आहे. त्याच्या वेगवान ट्रान्सझॅक्शनमुळे ते लोकप्रिय होत आहे. Cardano ची मार्केट कॅप फेब्रुवारी 2022 पर्यंत US$34.60 बिलियन आहे, ज्याचे व्हॉल्यूम US$2.94 बिलियन आहे.

4. Solana
2021 मध्ये Solana सर्वोच्च कामगिरी करणाऱ्या क्रिप्टोपैकी एक आहे. हे एक प्रूफ-ऑफ-स्टेक ब्लॉकचेन प्लॅटफॉर्म आहे. Cardano त्याचे फ्लेक्सिबल नेटवर्क आणि लोअर एनर्जी लेवलमुळे क्रिप्टो गुंतवणूकदारांमध्ये लोकप्रिय होत आहे. ते Ethereum चा एक कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून उदयास येत आहे. Solana ची मार्केट कॅप फेब्रुवारी 2022 पर्यंत US$30.20 बिलियन आहे, ज्याचे व्हॉल्यूम US$1.83 बिलियन आहे.

5. Binance Coin
Binance Coin हे व्हॉल्यूमनुसार जगातील सर्वात मोठ्या क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजेस आणि altcoin क्रिप्टो एक्सचेंजेसपैकी एक आहे. हे कोणत्याही स्मार्ट डिव्हाईसशी कम्पेटिबल आहे आणि क्रिप्टो गुंतवणूकदारांना सुरक्षितपणे ट्रेडिंग सुरू करण्यास अनुमती देते. Binance Coin ची मार्केट कॅप फेब्रुवारी 2022 पर्यंत US$66.85 बिलियन आहे, ज्याचे व्हॉल्यूम US$1.69 बिलियन आहे.

6. Tether
Tether ही एक अशी क्रिप्टोकरन्सी आहे जी Ethereum ब्लॉकचेनवर Tether लिमिटेडद्वारे जारी केलेल्या टोकनसह होस्ट केली जाते. अशाप्रकारे ते Bitfinex च्या नर्सद्वारे नियंत्रित केले जाते. फेब्रुवारी 2022 पर्यंत Tether ची मार्केट कॅप US$78.73 बिलियन आणि व्हॉल्यूम US$59.79 बिलियन आहे.

7. XRP
XRP ही एक पॉप्युलर मोठी क्रिप्टोकरन्सी आहे जे XRP लेजर म्हणून ओळखले जाणारे ओपन-सोर्स डिस्ट्रिब्युटेड लेजर वापरते. फेब्रुवारी 2022 पर्यंत XRP ची मार्केट कॅप US$2.94 बिलियन सह US$37.81 बिलियन आहे.

8. USD Coin
कोणतीही जोखीम न घेता क्रिप्टो स्पेस एक्सप्लोर करू इच्छिणारे गुंतवणूकदार USD Coin सारख्या स्थिर क्रिप्टोकरन्सीला प्राधान्य देऊ शकतात. USD Coin ची मार्केट कॅप US$52.58 बिलियन आणि व्हॉल्यूम US$3.91 बिलियन फेब्रुवारी 2022 पर्यंत आहे.

9. Terra
Terra ही ग्लोबल टॉप 10 क्रिप्टोकरन्सीमध्ये आहे. फेब्रुवारी 2022 पर्यंत Terra ची मार्केट कॅप US$19.91 बिलियन तर व्हॉल्यूम US$1.29 बिलियन आहे.

10. Avalanche
Avalanche एक लेयर वन ब्लॉकचेन आहे. त्यात वाढीचीही मोठी क्षमता आहे. Avalancheची मार्केट कॅप फेब्रुवारी 2022 पर्यंत US$21.79 बिलियन आहे, ज्याचे व्हॉल्यूम US$1.56 बिलियन आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती 365 दिवस साजरी व्हावी – राज ठाकरे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज शिवजयंतीनिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते साकीनाका येथे मनसे शाखेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी महत्वाचे विधान केले. “मी हारतुरे घालायला आलो नाही. आज शिवजयंती आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवजयंती तिथीने साजरी करते. याचा अर्थ आज शिवजयंती साजरी करायची असे नाही. आपल्या छत्रपतींचा जयजयकार आणि जयंती 365 दिवस साजरी केली पाहिजे .मनसे म्हणून आपण शिवजयंती साजरी करतो,” असे राज ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

शिवजयंतीनिमित्त मुंबईतील साकीनाका येथे मनसेच्या शाखेचे उदघाटन करण्यात आले. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यासपीठावर येऊन मनसेच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी ते म्हणाले की, आजही शिवजयंती सर्वत्र साजरी केली जाते. आपल्या शिवाजी महाराजांची जयंती 365 दिवस साजरी व्हावी, अशी आम्ही मागणी आहे. महाराजांची जयंती आजही साजरी केली तरी काही हरकत नाही. तिथीनं का साजरी करावी याचे कारण आपल्याकडे जेवढे सण येतात हे सर्व तिथीने साजरे करतो.

आपल्याकडील इतर सणही आपण तिथीने साजरे करतो, दिवाळी आणि गणपती वेगवेगळ्या दिवशी साजरी करतो. महापुरुषांचा जन्मदिवस हा आपल्यासाठी सण, तिथी प्रमाणेच आहे. त्यामुळे जल्लोषात शिवजयंती साजरी करुयात, असे ठाकरे यांनी सांगितले.

वाई तालुक्यात विद्युत पुरवठा करणाऱ्या डी. पी. फोडून तांब्याच्या तारा लंपास, शेतकरी चिंताग्रस्त

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

कवठे (ता. वाई) येथील शेतीच्या पाणीपुरवठा करणारी डी. पी. फोडून त्यातील तांब्याच्या तारा पळविण्याचे सत्र सुरूच आहे. आतापर्यंत चोरट्यांनी 20 हून अधिका डी. पी फोडलेल्या आहेत. पोलिसांनी तातडीने या चोरट्यांच्या मुसक्या आवळण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. वारंवारं होणाऱ्या चोऱ्यामुळे परिसरातील शेतक-यांच्यात चिंतेचे वातावरण आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, कवठे येथील सुतारकी या शिवारातील शेती पाणी पुरवठ्यासाठी बसवण्यात आलेली अगदी अडचणीच्या ठिकाणी असलेली डी.पी. चे कनेक्शन चोरट्यांनी तोडले. मध्यरात्रीच्या सुमारास डी.पी. फोडून त्यातील अंदाजे 70 ते 80 किलो तांब्याच्या तारा चोरट्यांनी पळविल्या आहेत. विशेष म्हणजे ट्रान्सफर अडचणीत असल्याने व लोकवस्तीपासून दूर असल्याने या ट्रान्सफच्या सुरक्षिततेसाठी महावितरणने ट्रान्सफरला वेल्डिंग केलेले होते. चोरट्यांनी वेल्डिंग कटरच्या सहाय्याने कापून या डीपीला विद्युत पुरवठा करणा-या केबल्स तोडून टाकून सराईतपणे ही चोरी करण्यात आली आहे. या चोरीमुळे या डीपीवरून कनेक्शन असलेल्या 10 ते 15 विहिरींवरील विद्युत पुरवठा खंडित झाल्याने व उन्हाची ताप वाढत असल्याने शेतक-यांना पिकांना पाणी देण्यास अडचण होत आहे. याबाबत या ठिकाणचा डी. पी. तात्काळ बसविण्यात यावा, यासाठी या परीसरातील शेतक-यांनी कवठे महावितरण येथे विनंती अर्ज केला आहे.

वर्षभरात कवठे, सुरूर, जोशी विहीर ते पांडे कँनाल या परिसरातील अंदाजे 20 च्या आसपास डी. पी. फोडण्यात आले असून तांब्याच्या तारांची चोरी करण्यात आलेली आहे. महावितरण व शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. एका चोरीच्या बाबत चोरांचा छडा लावण्यात भुईंज पोलिसांना यश आल्यानंतर काही काळ हा प्रकार बंद होता. मात्र आता पुन्हा या चो-यांचे सत्र सुरु झाले आहे. रात्रीच्या वेळी कोणी डी. पी. च्या आसपास संशयास्पद रित्या फिरताना आढळल्यास त्वरित महावितरणला कळविण्याचे आवाहन  महावितरणमार्फत करण्यात आले आहे. या चोरीबाबत भुईंज पोलीस स्टेशनमध्ये महावितरणच्या कवठे कार्यालातून तक्रार देण्यात आली असून स. पो. नि. आशिष कांबळे यांच्या  मार्गदर्शनाखाली बीट अंमलदार धायगुडे अधिक तपास करीत आहेत.

टर्म इन्शुरन्स पॉलिसी घेताना मेडिकल टेस्ट करणे का आवश्यक आहे ते समजून घ्या

Life Insurance

नवी दिल्ली । टर्म इन्शुरन्स कौटुंबिक आणि इतर आर्थिक गरजांसाठी आवश्यक बनला आहे. कोरोना महामारीनंतर आर्थिक दृष्टीकोनातून ते जीवनासाठी खूप महत्वाचे झाले आहे. सध्याच्या काळात टर्म इन्शुरन्स जास्त लोकप्रिय होत आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे विमाधारकाचा अकाली मृत्यू झाल्यास, ते त्याच्या कुटुंबाला भक्कम आर्थिक पाठबळ देते आणि तेही अत्यंत कमी प्रीमियममध्ये.

कमी प्रीमियममध्ये जास्त कव्हरेज असल्यामुळे टर्म इन्शुरन्स हा झपाट्याने पसंतीचा पर्याय बनत आहे. विमा कंपन्याही स्पर्धात्मक दरात ते देत आहेत. ही पॉलिसी खरेदी करताना सहसा मेडिकल टेस्ट करावी लागते. काही कंपन्या मेडिकल टेस्टमध्ये शिथिलता आणू शकतात, मात्र क्लेमच्या वेळी ते तुम्हाला महागात पडू शकते.

नो चेकअप पॉलिसी खरेदी करणे टाळा
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, अशी पॉलिसी घेणे टाळावे, ज्यात खरेदी करण्यापूर्वी संपूर्ण मेडिकल चेकअप होत नाही. जर संपूर्ण वैमेडिकल चेकअप नसेल तर पॉलिसी खरेदी करताना विमाधारकाला थोडासा दिलासा मिळतो, मात्र क्लेमच्या वेळी यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यांना सहजासहजी क्लेम मिळत नाहीत.

…तर कंपन्या क्लेम देत नाहीत
टर्म प्लॅन कमी प्रीमियमवर जास्तीत जास्त कव्हरेज देतात. अशा परिस्थितीत विमा कंपन्या पॉलिसी विकण्यापूर्वी मेडिकल टेस्ट घेतात. मात्र, काही प्रकरणांमध्ये, विमा कंपन्या यासाठी आग्रह धरत नाहीत आणि केवळ विमाधारकाच्या वतीने चांगल्या आरोग्याचे डिक्लेरेशन दिल्याने काम पूर्ण होते. मात्रविमाधारकाने ते टाळावे. यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे पॉलिसी खरेदी केल्यानंतर काही कालावधीत पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास, अनेक वेळा विमा कंपन्या माहिती लपविण्याच्या आधारावर क्लेम नाकारू शकतात. विमा कंपन्या असा युक्तिवाद करू शकतात की, विमाधारकाने पॉलिसी खरेदी करताना आपल्या आरोग्याची अचूक माहिती दिली नाही. त्यामुळे क्लेमची रक्कम मिळणार नाही.

विमा कंपनी जबाबदार आहे
टर्म इन्शुरन्स प्लॅन घेण्यापूर्वी तुम्ही मेडिकल टेस्ट केली तर मेडिकल रिपोर्टची जबाबदारी विमा कंपनी आणि तपासणी करणाऱ्या डॉक्टरांवर येते. अशा परिस्थितीत, पॉलिसीधारकाच्या नॉमिनीला क्लेम सेटलमेंट करताना फारशा अडचणी येत नाहीत. केवळ एक टर्म इन्शुरन्स प्लॅन खरेदी करणे शहाणपणाचे आहे ज्यामध्ये संपूर्ण मेडिकल चेकअप करणे आवश्यक आहे.

नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम वेळेत पूर्ण करा – डॉ. कराड

औरंगाबाद – नागरिकांना वेठीस धरू नका, पाणी पुरवठा योजनेचे काम वेळेत पूर्ण करा, अन्यथा कारवाई केली जाईल, अशा शब्दात केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी, कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्यांना सुनावले.

राज्य शासनाने मंजूर केलेल्या 1680 कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेच्या कामाचा आढावा केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी शुक्रवारी घेतला. यावेळी जायकवाडी धरणातील जॅकवेलसंदर्भात वन्यजीव विभागाकडून परवानगीचा तातडीने निर्णय होणे आवश्यक आहे. महापालिका प्रशासन व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने तातडीने यासंदर्भात कारवाई करणे आवश्यक आहे.

पैठण रस्त्याचे रुंदीकरण हे राष्ट्रीय महामार्ग राजमार्ग प्राधिकरण यांच्याकडून होत आहे. त्यानुसार परवानगीही मिळाली आहे. कंपनीने पाईप निर्धारित वेळेत तयार करावे म्हणजे, मुख्य जलवाहिनीचे काम पूर्ण होईल. योजनेचे काम लवकर पूर्ण करावे, अन्यथा नागरिक पाण्याच्या प्रश्‍नावर आक्रमक होतील, असे डॉ. कराड यांनी सांगितले. बैठकीला माजी महापौर भगवान घडमोडे, महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता अजयसिंग, शहर अभियंता सखाराम पानझडे, कंत्राटदाराचे प्रतिनिधी अभिषेक जाधव उपस्थिती होते.

डिझेल गाड्या पेट्रोलपेक्षा जास्त मायलेज का देतात? यामागील कारण जाणून तुम्हाला वाटेल आश्चर्य

नवी दिल्ली । जास्त मायलेज देणारी कार भारतीय ग्राहकांची नेहमीच पहिली पसंती राहिली आहे. कार खरेदी करताना नेहमीच ग्राहक अशा कारला प्राधान्य देतात, ज्या मायलेजमध्ये जास्त चांगल्या असतात. पेट्रोल कारपेक्षा डिझेल कार जास्त मायलेज देते हे सर्वांनाच माहीत आहे. मात्र तुम्ही कधी विचार केला आहे का, असं का होतं? तर आज आपण जाणून घेणार आहोत की यामागचे कारण काय आहे?

हे अशा प्रकारे समजून घेता येईल की, Hyundai Grand i10 Nios पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. पेट्रोल व्हर्जन कारमध्ये 20.7 किमी प्रति लीटर मायलेज असल्याचा दावा कंपनीने केला आहे तर डिझेल व्हर्जन कारमध्ये 26.2 किमी प्रति लीटर मायलेजचा दावा करण्यात आला आहे. आता डिझेल व्हेरियंटमध्ये सारखीच इंजिन क्षमता असूनही ते जास्त मायलेज का देतात, हा प्रश्न उरतो.

डिझेलमध्ये जास्त ऊर्जा
डिझेलमध्ये इंधन म्हणून जास्त ऊर्जादायक असते. डिझेल प्रति लिटर पेट्रोलपेक्षा जास्त ऊर्जा निर्माण करते. डिझेल प्रति लिटर 38.6 Mega Joules ऊर्जा देते तर एक लिटर पेट्रोलमध्ये केवळ 34.8 Mega Joules ऊर्जा मिळते. Mega Joules हे ऊर्जेच्या मोजमापाचे एकक आहेत.

डिझेलला स्पार्कची गरज नाही
डिझेल हे असे इंधन आहे जे पेट्रोल सारखे फारसे ज्वलनशील नाही. मात्र, ते जास्त तापमानात आपोआप इग्नाइट होते. हे असे तत्त्व आहे ज्यावर डिझेल इंजिन काम करतात. डिझेल इंजिनच्या सिलेंडरमध्ये हवेचे उच्च प्रमाण कंप्रेस केले जाते. हे प्रमाण 18:1 किंवा 21:1 च्या आसपास आहे. हवा कंप्रेस केल्यावर उष्णता निर्माण होते. अशा प्रकारे, जेव्हा सिलेंडरमधील तापमान 210 अंश सेंटीग्रेडच्या वर वाढते, तेव्हा थोड्या प्रमाणात डिझेल सिलेंडरमध्ये फवारले जाते. अशा प्रकारे इंजिनमध्ये इग्निशन तयार होते. यामुळेच अत्यंत थंड वातावरणात डिझेल इंजिन सुरू होण्यास थोडा वेळ लागतो.

डिझेलचा कमी वापर
डिझेल इंजिनमध्ये, सिलेंडरमध्ये इंधन फवारले जाते. यामुळे ते पेट्रोलपेक्षा कमी वापरते. दुसरीकडे, डिझेलची बर्निंग कॅपॅसिटी जास्त चांगली आहे. ते हळूहळू जळते. अशा प्रकारे ते बराच काळ जळत राहते. यामुळे डिझेल इंजिन जास्त RPM रेंजपर्यंत पोहोचत नाही. हेच तंत्रज्ञान आता पेट्रोल इंजिनमध्येही वापरले जात आहे. हेच स्प्रे तंत्रज्ञान ह्युंदाईच्या सोनाटा वाहनातील पेट्रोल इंजिनमध्येही वापरण्यात आले आहे, जेणेकरून ते जास्त चांगले मायलेज देऊ शकेल.

डिझेल कार विक्रीत घट
डिझेल इंजिनमध्ये चांगले मायलेज मिळूनही अशा कारच्या विक्रीत सातत्याने घट होत आहे. सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (SIAM) च्या रिपोर्टनुसार, 2012-13 मध्ये देशात विकल्या गेलेल्या एकूण कारमध्ये डिझेल इंजिनचा वाटा 58 टक्के होता, जो आता 17 टक्क्यांवर आला आहे. डिझेलच्या दरात झालेली वाढ हे त्यामागचे प्रमुख कारण आहे. पेट्रोलपाठोपाठ सरकारने डिझेलचेही दर नियंत्रणमुक्त केले. यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आता क्वचितच 7-10 रुपयांची तफावत आहे, जिथे दशकापूर्वी 20-25 रुपये प्रति लिटर होते. डिझेलच्या किंमतीत झालेली वाढ आणि डिझेल कारवरील तुलनेने जास्त टॅक्स यामुळे ग्राहक आता चांगले मायलेज असूनही पेट्रोल कारला पसंती देत ​​आहेत.

“एक इंचही बेकायदेशीर बांधकाम नाही, ‘ती’ नोटीस ‘मातोश्री’च्या सांगण्यावरूनच”; नारायण राणेंची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईतील जुहू येथील बंगल्यात अनधिकृत बांधकाम केल्या प्रकरणी तपासणी करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने नोटीस बजावल्यानंतर आज केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी जुहू येथील माझ्या घरात मी एका इंचाचेही बेकायदा बांधकाम केलेले नाही. मला बेकायदा बांधकाम करण्याची गरज पडली नाही. माझी इमारत शंभर टक्के कायदेशीर आहे. एक इंचही बांधकाम बेकायदेशीर नाही. मात्र, मातोश्रीच्या सांगण्यावरूनच नोटीस पाठवून तक्रार करण्यात आली,” अशी टीका राणे यांनी केली आहे.

नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत मुंबई महानगरपालिकेने पाठविलेल्या नोटिसीबाबत खुलासा केला. यावेळी ते म्हणाले की, मी मुंबईतील घेतलेल्या माझ्या जुहूच्या घरात 17 सप्टेंबर 2009 मध्ये आलो. 14 वर्ष झाली मी या घरात राहत आहे. ही इमारत बांधल्यानंतर 1991च्या डीसी रुलप्रमाणे इमारत बांधली आणि पजेशन देण्यात आले. मी एक इंचही अनधिकृत बांधकाम केलेले नाही. आणि तशी मला काही आवश्यकताच पडली नाही.

माझे दोन मुले. त्यांच्या पत्नी आणि दोन लहान मुले असं सहा जण आम्ही या घरात राहतो. ही निवासी इमारत शंभर टक्के कायदेशीर असतानाही सेनेकडून, मातोश्रीकडून काही लोकांना सांगून या इमारतीविरोधात तक्रार करण्यात आली आहे. मुख्यमंत्री ठाकरेंनीही मातोश्री पार्ट टू तयार केली. आम्ही काय म्हणालो? मातोश्री पार्ट टूसाठी पैसे भरून इलिगल काम लिगल करून घेतले. त्यांच्या दोन्ही बिल्डिंगचे प्लान माझ्याकडे आहेत. पण मी कुणाच्या घरावर किंवा नोकरीवर जात नाही म्हणून गप्प आहे, असा इशाराही त्यांनी दिला.

दिशा सालियनवर बलात्कार कोणी केला?

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिशा सालियन प्रकरणावरून अनेक प्रश्न उपस्थित केले. दिशा सालियनवर बलात्कार कोणी केला?, सुशांतसिंगच्या इमारतीचे सीसीटीव्ही कॅमेरे गायब कसे झाले ?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. 8 जूनला दिशा सालियनची बलात्कार करून हत्या झाली. आणि तिने आत्महत्या केली असे सांगण्यात आले. तिच्यावर बलात्कार होत असताना बाहेर प्रोटेक्शन कुणाचे होते. तिचा पोस्टमार्टेम अहवाल का आला नाही? त्या इमारतीत राहायची त्यातील 8 जूनची पाने कुणी फाडली. कुणाला इंटरेस्ट होता, असा सवाल त्यांनी केला.

सहकार क्षेत्रात खळबळ : कोरेगावचा जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना अवसायनात

Jardeshwer Koregaon

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

राज्यात सध्या चर्चेत असलेला कोरेगाव तालुक्यातील जरंडेश्र्वर सहकारी साखर कारखाना अवसायनात निघाला आहे. राज्याचे साखर संचालक यांनी साखर कारखान्याच्या अवसायकपदी कोरेगाव तालुक्याच्या दुय्यम सहकारी उपनिबंधक प्रिती कि. काळे यांची शासनाने नियुक्ती केली आहे. यामुळे सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने, इतर अनेक बँकांच्या कोट्यवधी रुपयांच्या थकीत कर्जाच्या वसुलीसाठी लिलावात काढला. गुरु कमोडिटी प्रा. लि. या खाजगी कंपनीने लिलावात तो साखर कारखाना 65 कोटी 75 लाख रुपयांना 2010 साली विकत घेतला. साखर कारखान्याच्या तत्कालीन चेअरमन माजी महसूलमंत्री डॉ. शालिनीताई पाटील यांनी लगेचच सन 2011 सालापासून विविध कोर्टात जरंडेश्र्वर सहकारी साखर कारखाना विक्री विरोधात अनेक दावे दाखल करुन राज्य सरकारच्या आणि राज्य सहकारी बँकेच्या विरोधात आवाज उठवला.

जरंडेश्र्वर सहकारी साखर कारखाना विक्री व्यवहार रद्द व्हावा आणि साखर कारखाना पुन्हा शेतकरी सभासदांच्या मालकीचा करावा. यासाठी गेली 10 वर्षे शालिनीताई पाटील यांचा विविध कोर्टात न्यायालयीन संघर्ष सुरू होता, असे असताना जरंडेश्र्वर सहकारी साखर कारखान्यावर अचानक अवसायक नेमून शासनाने शालिनीताई पाटील यांना मोठा धक्का दिला.

SBI चा अंदाज, घर चालवण्यासाठी सरकार देऊ शकते 50 हजार रुपयांची भेट!

मुंबई । स्टेट बँक ऑफ इंडियाच्या इकोरॅपच्या रिसर्च रिपोर्टनुसार, आर्थिक वर्ष 2021-22 च्या तिसऱ्या तिमाहीत (ऑक्टोबर-डिसेंबर) देशाचे सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) 5.8 टक्के दराने वाढू शकते. याशिवाय या रिपोर्टमध्ये 2021-22 या आर्थिक वर्षासाठीचा भारताचा आर्थिक वाढीचा अंदाज 8.8 टक्के करण्यात आला आहे.

2021-22 च्या दुसऱ्या तिमाहीत देशाची अर्थव्यवस्था 8.4 टक्के दराने वाढली. मात्र, जुलै-सप्टेंबरमधील GDP वाढीचा दर मागील तिमाहीतील 20.1 टक्के वाढीपेक्षा कमी होता. नॅशनल स्टॅटिकल ऑफिस (NSO) 28 फेब्रुवारी रोजी चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीसाठी GDP अंदाज जाहीर करेल.

SBI च्या रिपोर्टमध्ये शुक्रवारी म्हटले गेले आहे की, ‘SBI नॉकास्टिंग मॉडेलनुसार, आर्थिक वर्ष 2021-22 च्या तिसऱ्या तिमाहीत अंदाजे GDP वाढीचा दर 5.8 टक्के असेल. संपूर्ण वर्षासाठी (आर्थिक वर्ष 2021-22) GDP वाढीचा अंदाज 9.3 टक्क्यांवरून 8.8 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे.’

नॉकास्टिंग मॉडेल औद्योगिक क्रियाकलाप, सेवा क्रियाकार्यक्रम आणि जागतिक अर्थव्यवस्थेशी संबंधित 41 उच्च वारंवारता निर्देशकांवर आधारित आहे. या रिपोर्ट मध्ये म्हटले गेले आहे की, देशांतर्गत आर्थिक क्रियाकलापांमध्ये रिकव्हरीचा आधार अजूनही विस्तृत करणे बाकी आहे, कारण खाजगी वापर हा महामारीपूर्वीच्या पातळीपेक्षा कमी आहे. या रिपोर्ट मध्ये असेही सुचवले गेले आहे की, सरकार ग्रामीण भागातील गरिबांना 50,000 रुपयांपर्यंत उपजीविका कर्ज देऊ शकते.

प्रमुख देशांच्या तुलनेत भारताची अर्थव्यवस्था सर्वात जलद गतीने वाढेल – अर्थ मंत्रालयाचा रिपोर्ट
अर्थ मंत्रालयाच्या मासिक आर्थिक आढाव्यानुसार, केंद्रीय अर्थसंकल्प 2022-23 मध्ये सरकारने घेतलेल्या विविध उपक्रमांच्या बळावर भारतीय अर्थव्यवस्था प्रमुख देशांमधील सर्वात वेगवान वाढ नोंदवेल. “PLI स्कीम आणि पायाभूत सुविधांमध्ये सार्वजनिक भांडवल गुंतवणुकीमुळे उत्पादन आणि बांधकाम क्षेत्र हे विकासाचे मुख्य चालक असतील,” असे पुनरावलोकन रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

या रिपोर्टमध्ये पुढे म्हटले गेले आहे की, प्रधानमंत्री किसान योजनेद्वारे फायदेशीर किमान आधारभूत किंमत आणि उत्पन्न हस्तांतरणामुळे कृषी क्षेत्रामध्येही स्थिर वाढ होत आहे. या रिपोर्टमध्ये म्हटले गेले आहे की, भारत हा आतापर्यंत एकमेव मोठा आणि मोठा देश आहे ज्याचा विकास अंदाज IMF ने 2022-23 साठी वाढवला आहे. महत्त्वाचे म्हणजे, IMF ने 2022 चा जागतिक वाढीचा अंदाज कमी केला आहे.