Tuesday, December 23, 2025
Home Blog Page 2787

रणसिंगवाडीसह परिसरातील शेतकऱ्यांसाठी जिहे-कठापूरचेच पाणी आणणार – शशिकांत शिंदे

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके

रणसिंगवाडी येथील विविध विकासकामाचे भूमिपूजन राष्ट्रवादी काँग्रेस नेते तथा आमदार शशिकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी “रणसिंगवाडी व वेटने गावातून जाणाऱ्या जिहे कटापुर योजनेच्या अंतर्गत आंधळी बोगदाच्या योजनेचा सर्व्हे करण्यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी 16 लाख मंजूर केले आहेत. या दोन्ही गावांना पाणी मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे, असे आमदार शशिकांत शिंदे यांनी प्रतिपादन केले.

रणसिंगवाडी येथील विविध विकासकामाचा भूमिपूजन कार्यक्रम पार पडला. यावेळी सातारा जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रदिप विधाते, बाळासाहेब इंगळे, सागर साळुंखे,राजेंद्र कचरे, जोतिनाना सावंत, संतोष साळुंखे, तुकाराम यादव, युवराज बिटले, ज्ञानेश्वर जगताप सरपंच सुखदेव रणसिंग,उपसरपंच विठ्ठल मसुगडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी आमदार शिंदे म्हणाले कि, रणसिंगवाडी गावाने कायम राष्ट्रवादी पक्षाला साथ दिली आहे. रणसिंगवाडी बुध मुख्य रस्ता डांबरीकरणासाठी 42 लाख, साकव पूलासाठी 30 लाख, अंतर्गत रस्ता कामासाठी 10 लाख यासह विविध विकास कामाचा निधी प्रत्यक्षात उपलब्ध करून दिला आहे.

यावेळी सरपंच सुखदेव रणसिंग म्हणाले की, आमदार शशिकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत चांगले काम करत आहे. गावच्या विकासासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करत आहोत. गावाला जिहे कटापूर योजनेचे पाणी मिळावे व या भागातील शेतकऱ्याला न्याय मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. यावेळी कार्यक्रमास मोठ्या संख्येने ग्रामस्थ व पदाधिकारी यांनी उपस्थिती लावली होती.

सत्ता नसल्याने फडणवीस वैफल्यग्रस्त; आदित्य ठाकरेंची जोरदार टीका

Aditya thackeray fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजप मधील दरी ही वाढतच चालली असून आता शिवसेना युवा नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. राज्यात सत्ता नसल्याने फडणवीसांना वैफल्य आले आहे अशी जोरदार टीका आदित्य ठाकरे यांनी केली. आदित्य ठाकरे चंद्रकांत दौऱ्यावर होते त्यावेळी त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

आदित्य ठाकरे हेचंद्रपूर दौऱ्यावर होते. शहरातील गोंडकालीन रामाळा तलावाच्या काठाशी त्यांनी तलावाच्या खोलीकरण आणि सौंदर्यीकरणाच्या कामाची पाहणी केली. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी फडणवीसांवर टिका केली. सरकार गेल्यापासून दोन वर्षात फडणविसांमध्ये नैराश्य आलं आहे. विरोधी पक्षाच्या वागण्यात ते दिसत आहे असे ते म्हणाले.

ते कधी म्हणतात मुख्यमंत्री आहे, कधी म्हणतात नाही. कधी म्हणतात सरकार आहे, तर कधी म्हणतात नाही. मात्र, लोकांचा सरकारवर विश्वास आहे. जे डोळे बंद करुन फिरतात त्यांना काहीच दिसणार नाही, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावलाय. सत्तेतील तिन्ही पक्ष आनंदाने एकत्र आहोत. कोणताही वाद नाही. मिळून अन्यायाविरुद्ध लढा देऊ, असंही आदित्य ठाकरे असेही ते म्हणाले.

“महाविकास आघाडी सरकार पाडलं तरी पुन्हा… ”; राष्ट्रवादीच्या नेत्याचे महत्वाचे विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दरम्यान काल एका कार्यक्रमात राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी चंद्रकांत पाटील यांना उत्तर दिले असून त्यांनी महत्वाचे विधान केले आहे. “चंद्रकांत पाटील हे सत्तेतून बाहेर पडल्याने अस्वस्थ झाले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून अशा प्रकारची विधाने केली जात आहेत. आघाडी सरकार पाडले तरी बहुमताच्या जोरावर पुन्हा सरकार येईल, असे विधान खडसेंनी केले आहे.

भुसावळ येथील एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस नेते एकनाथ खडसे यांनी चंद्रकांत पाटील यांच्या टीकेला उत्तर दिले. यावेळी खडसे म्हणाले की, “पाटील हे उत्तम भविष्यकार आहेत. महाविकास आघाडी सरकार पडणार यासाठी त्यांनी अनेकवेळा तारखा जाहीर केल्या आहेत. मात्र, सरकार पाडायचा विचार केला व दुर्दैवाने सरकार पाडलं तरी बहुमताच्या जोरावर परत हेच सरकार येणार आहे. “सरकार पडायला ठोस कारण असला पाहिजे. विरोधक मनाचे मांडे खात असून जोपर्यंत तिन्ही पक्षाचे बहुमत आहे तोपर्यंत हे सरकार पडू शकत नाही

चंद्रकांत पाटील सत्तेतून बाहेर पडल्याने ते अस्वस्थ झाले आहेत. सत्तेत नसल्याने त्यांना वणवण फिरावे लागत आहेत. त्यामुळे त्याच्याकडून अशा प्रकारची वक्तव्य केली जात आहेत, अशी टीकाही यावेळी एकनाथ खडसे यांनी केली आहे.

कशी आहे मुंबईची पलटन; पहा एका क्लिक वर

mumbai indians

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएलच्या लिलाव प्रक्रियेवेळी 5 वेळचे चॅम्पियन राहिलेल्या मुंबई इंडिअन्सच्या संघाने खूप मोठा डाव टाकला नाही. मुंबईने मोजकेच खेळाडू विकत घेऊन आर्थिक संतुलनही राखले. मात्र युवा यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशनची 15.25 कोटींची बोलली ही मुंबई साठी सर्वोच्च ठरली.

लिलावाच्या पहिल्या दिवशी मुंबईने फक्त 2 च खेळाडूंना घेतलं. मुंबईने डोक्याने प्लॅनिंग करून आपले भरपूर पैसे दुसऱ्या दिवशी साठी राखून ठेवले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी जोफ्रा आर्चर या बड्या खेळाडूला मुंबईने 8 कोटींना खरेदी केले. आणि अष्टपैलू खेळाडू टीम डेव्हिड ला संघात घेऊन हार्दिक पंड्याची कमतरता देखील भरून काढली.

बेबी एबी डीविलीर्स म्हणून ओळखला जाणारा डेवॉल्ड ब्रेव्हिस ला संघात सामील करून मुंबईने फलंदाजी मध्ये बळकटी आणली. तसेच जयदेव उनाडकट आणि टायमल मिल्स ला संघात घेऊन गोलंदाजी अजून मजबूत केली आहे.

अशी आहे मुंबईची नवी टीम-
रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, किरॉन पोलार्ड, जसप्रीत बुमराह, इशान किशन , डेवॉल्ड ब्रेव्हिस बासील थम्पी, मुरुगन अश्विन , जयदेव उनाडकट , मयंक मार्कंडे , एन तिलक वर्मा, संजय यादव , जोफ्रा आर्चर , डॅनिएल सॅम्स , टायमल मिल्स ,टीम डेव्हिड , अनमोलप्रीत सिंग , रमणदीप सिंग , आर्यन जुयल , रिले मेरेडिथ , मोहम्मद अर्षद खान , हृतिक शोकीन , फॅबियन अॅलन , आर्यन जुनाल , अर्जुन तेंडुलकर , राहुल बुद्धी .

कोरोनाच्या अनुषंगाने दहावी बारावीच्या परीक्षेसाठी झिगझॅग पद्धत 

 

औरंगाबाद – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढील महिन्यात पार पडणार आहेत. वेळापत्रकानुसार दहावीची परीक्षा 15 मार्च; तर बारावीची परीक्षा 4 मार्चपासून सुरू होत आहे. या परीक्षेसाठी शिक्षण मंडळाकडून पूर्ण तयारी करण्यात आली आहे. कोरोनाच्या अनुषंगाने परीक्षेसाठी झिगझॅग पद्धतीचा अवलंब करण्यात येणार असून या काळात शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी काय काळजी घ्यावी? याबाबत मंडळाने सर्व शिक्षक, मुख्याध्यापकांना सूचना दिल्या आहेत.

विद्यार्थ्यांच्या परीक्षा कक्षात बैठक व्यवस्था करण्यासाठी जास्तीत जास्त आकारमानाच्या खोल्यांचा वापर करावा, दोन बॅंचमध्ये पुरेसे अंतर ठेवावे, वर्गखोलीत एका बेंचवर एकच विद्यार्थी याप्रमाणे झिगझॅग पद्धतीने बसविण्यात यावेत, याबाबत केंद्र संचालक, उपकेंद्रसंचालकांना सूचित केले आहे. कोरोनाच्या अनुषंगाने परीक्षेपूर्वी केंद्राच्या वर्ग खोल्या, स्वच्छतागृहे व संपूर्ण परिसर स्वच्छ व निर्जंतुकीकरण करावे. परीक्षा कालावधी पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, आवश्यक तेथे साबण, हॅण्डवॉश ठेवावे. परीक्षा केंद्राच्या प्रवेशद्वारावर थर्मल स्कॅनद्वारे तापमान चेक करावे, सॅनिटायझर, मास्क वापरण्यासंदर्भात सूचना द्याव्यात. एखाद्या विद्यार्थ्याचे तापमान मर्यादेपेक्षा जास्त आढळून आल्यास आवश्यक कार्यवाही करावी.

शिक्षकांसाठी सूचना –

शिक्षकांनी प्रश्नपत्रिका जमा करणे, उत्तरपत्रिकांचे गठ्ठे तयार करणे इतर सर्व आनुषंगिक कामे करताना पुरेसे अंतर ठेवावे. गैरहजर विद्यार्थी किंवा अन्य कारणामुळे शिल्लक राहिलेल्या प्रश्नपत्रिका, पेपर संपेपर्यंत पर्यवेक्षकाने स्वतःकडे जपून ठेवाव्यात, त्याचा गैरवापर होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच दैनंदिन गैरमार्ग प्रकरण, विद्यार्थ्यांची उपस्थिती, अनुपस्थिती व आनुषंगिक माहिती प्रत्येक पेपर संपल्यावर ऑनलाइन सादर करावी, अशा सूचना मंडळाने दिल्या आहेत.

आयपीएलच्या आजच्या लिलावात परदेशी खेळाडूंचा दबदबा

IPL 2022

बँगलोर : वृत्तसंस्था – आज आयपीएल 2022 च्या लिलावाचा दुसरा दिवस पार पडला. काल पहिल्या दिवसाच्या लिलावात भारतीय खेळाडू सगळ्यात महाग ठरले. आजच्या लिलावात परदेशी खेळाडू वरचढ ठरले कि पुन्हा भारतीय खेळाडूंनी वर्चस्व गाजवले ते चला पाहूया….

कोणत्या खेळाडूवर किती लागली बोली ?
एडन मार्कराम : 2.6 कोटी ( सनराईज हैद्राबाद )
अजिंक्य रहाणे : 1 कोटी ( कोलकाता नाईट रायडर्स )
मनदीप सिंग : 1.1 कोटी (दिल्ली कॅपिटल्स)
लियाम लिव्हिंगस्टोन : 11.5 कोटी ( पंजाब किंग्स)
डोमिनिक ड्रेक्स : 1.1 कोटी ( गुजरात टायटन्स )
जयंत यादव : 1.70 कोटी ( गुजरात टायटन्स )
विजय शंकर : 1.40 कोटी ( गुजरात टायटन्स )
ओडियन स्मिथ : 6 कोटी ( पंजाब किंग्स)
मार्को जॅन्सन : 4.20 कोटी ( सनराईज हैद्राबाद )
शिवम दुबे : 4 कोटी ( चेन्नई सुपर किंग्स)
कृष्णप्पा गौथम : 90 लाख ( लखनऊ)
खालिद अहमद : 5.25 कोटी ( दिल्ली कॅपिटल्स)
दुष्मंथा चमीरा : 2 कोटी ( लखनऊ)
चेतन साकरीया : 4.20 कोटी (दिल्ली कॅपिटल्स)
संदीप शर्मा : 50 लाख ( पंजाब किंग्स)
नवदीप सैनी : 2.60 कोटी (राजस्थान रॉयल्स)
जयदेव उनाडकट : 1.30 कोटी (मुंबई इंडियन्स)
मयंक मार्कंडे : 65 लाख (मुंबई इंडियन्स)
शाहबाज नदीम : 50 लाख ( लखनऊ)
महेश थेक्षाना : 70 लाख ( चेन्नई सुपर किंग्स)
रिंकू सिंग : 55 लाख ( कोलकाता नाईट रायडर्स )
मनन वोहरा : 20 लाख ( लखनऊ)
ललित यादव : 65 लाख (दिल्ली कॅपिटल्स)
रिपाल पटेल : 20 लाख (दिल्ली कॅपिटल्स)
यश धुल : 50 लाख (दिल्ली कॅपिटल्स)
एन टिळक वर्मा : 1.70 कोटी (मुंबई इंडियन्स)
महिपाल लोमरोर : 95 लाख (आरसीबी)
अनुकुल रॉय : 20 लाख ( कोलकाता नाईट रायडर्स )
दर्शन नळकांडे : 20 लाख ( गुजरात टायटन्स )
संजय यादव : 50 लाख (मुंबई इंडियन्स)
राज अंगद बावा : 2 कोटी ( पंजाब किंग्स)
राजवर्धन हंगरगेकर : 1.5 कोटी ( चेन्नई सुपर किंग्स)
यश दयाल : 3.2 कोटी ( गुजरात टायटन्स )
सिमरजीत सिंग : 20 लाख ( चेन्नई सुपर किंग्स)
फिन ऍलन : 80 लाख (आरसीबी)
डेव्हॉन कॉन्वे : 1 कोटी ( चेन्नई सुपर किंग्स)
रोव्हमन पॉवेल : 2.8 कोटी (दिल्ली कॅपिटल्स)
जोफ्रा आर्चर : 8 कोटी (मुंबई इंडियन्स)
ऋषी धवन : 55 लाख ( पंजाब किंग्स)
ड्वेन प्रिटोरियस : 50 लाख ( चेन्नई सुपर किंग्स)
शेर्फेन रदरफोर्ड : 1 कोटी (आरसीबी)
डॅनियल सॅम्स : 2.6 कोटी (मुंबई इंडियन्स)
मिचेल सँटनर : 1.9 कोटी ( चेन्नई सुपर किंग्स)
रोमॅरियो शेफर्ड : 7.75 कोटी ( सनराईज हैद्राबाद )
जेसन बेहरेनडॉर्फ : 75 लाख (आरसीबी)
टायमल मिल्स : 1.5 कोटी (मुंबई इंडियन्स)
सुभ्रांशु सेनापती : 20 लाख ( चेन्नई सुपर किंग्स)
टिम डेव्हिड : 8.25 कोटी ( मुंबई इंडियन्स)
प्रवीण दुबे : 50 लाख (दिल्ली कॅपिटल्स)
प्रेरक मंकड : 20 लाख ( पंजाब किंग्स)
सुयश प्रभुदेसाई : 30 लाख (आरसीबी)
वैभव अरोरा : 2 कोटी ( पंजाब किंग्स)
मुकेश चौधरी : 20 लाख ( चेन्नई सुपर किंग्स)
रसिक दार : 20 लाख ( कोलकाता नाईट रायडर्स )
मोहसीन खान : 20 ;लाख ( लखनऊ)
छमा मिलिंद : 25 लाख (आरसीबी)
प्रशांत सोळंकी : 1.20 ( चेन्नई सुपर किंग्स)
सिन अबॉट : 2.40 कोटी ( सनराईज हैद्राबाद )
अल्झारी जोसेफ : 2.40 कोटी ( गुजरात टायटन्स )
रिले मेरेडिथ : 1 कोटी ( मुंबई इंडियन्स)
आयुष बडोनी : 20 लाख ( लखनऊ)
अनिश्‍वर गौतम : 20 लाख (आरसीबी)
बाबा इंद्रजित : 20 लाख ( कोलकाता नाईट रायडर्स )
चमिका करुणारत्ने : 50 लाख ( कोलकाता नाईट रायडर्स )
आर समर्थ : 20 लाख ( सनराईज हैद्राबाद )
अभिजीत तोमर : 40 लाख ( कोलकाता नाईट रायडर्स )
प्रदीप सांगवान : 20 लाख ( गुजरात टायटन्स )
प्रथम सिंग : 20 लाख ( कोलकाता नाईट रायडर्स )
रिटिक चॅटर्जी : 20 लाख ( पंजाब किंग्स)
शशांक सिंग : 20 लाख ( सनराईज हैद्राबाद )
काइल मेयर्स : 50 लाख ( लखनऊ)
करण शर्मा : 20 लाख ( लखनऊ)
बलतेज धांडा : 20 लाख ( पंजाब किंग्स)
सौरभ दुबे : 20 लाख ( सनराईज हैद्राबाद )
मोहम्मद अर्शद खान : 20 लाख ( मुंबई इंडियन्स)
अंश पटेल : 20 लाख ( पंजाब किंग्स)
अशोक शर्मा : 55 लाख ( कोलकाता नाईट रायडर्स )
अरुणय सिंग : 20 लाख (राजस्थान रॉयल्स)
डेव्हिड मिलर : 3 कोटी ( गुजरात टायटन्स )
सॅम बिलिंग्ज : 2 कोटी ( कोलकाता नाईट रायडर्स )
वृद्धिमान साहा : 1.9 कोटी ( गुजरात टायटन्स )
मॅथ्यू वेड : 2.4 कोटी ( गुजरात टायटन्स )
सी हरि निशांत : 20 लाख ( चेन्नई सुपर किंग्स)
अनमोलप्रीत सिंग : 20 लाख ( मुंबई इंडियन्स)
एन जगदीसन : 20 लाख ( चेन्नई सुपर किंग्स)
विष्णू विनोद : 50 लाख ( सनराईज हैद्राबाद )
ख्रिस जॉर्डन : 3.6 कोटी ( चेन्नई सुपर किंग्स)
लुंगी निगडी : 50 लाख (दिल्ली कॅपिटल्स)
करण शर्मा : 50 लाख (आरसीबी)
कुलदीप सेन : 20 लाख (राजस्थान रॉयल्स)
अॅलेक्स हेल्स : 1.5 कोटी ( कोलकाता नाईट रायडर्स )
इव्हन लुईस : 2 कोटी ( लखनऊ)
करुण नायर : 1.4 कोटी (राजस्थान रॉयल्स)
ग्लेन फिलिप्स : 1.5 कोटी ( सनराईज हैद्राबाद )
नॅथन एलिस : 75 ( पंजाब किंग्स)
टिम सेफर्ट : 50 लाख (दिल्ली कॅपिटल्स)
फजलहक फारुकी : 50 लाख ( सनराईज हैद्राबाद )
रमणदीप सिंग : 20 लाख ( मुंबई इंडियन्स)
अथर्व तायडे : 20 लाख ( पंजाब किंग्स)
ध्रुव जुरेल : 20 लाख (राजस्थान रॉयल्स)
मयंक यादव : 20 लाख ( लखनऊ)
तेजस बरोका : 20 लाख (राजस्थान रॉयल्स)
भानुका राजपक्ष : 50 लाख ( पंजाब किंग्स)
गुरकीरत सिंग : 50 लाख ( गुजरात टायटन्स )
टिम साउथी : 1.5 कोटी ( कोलकाता नाईट रायडर्स )
राहुल बुद्धी : 20 लाख ( मुंबई इंडियन्स)
बेनी हॉवेल : 40 लाख ( पंजाब किंग्स)
कुलदीप यादव : 20 लाख (राजस्थान रॉयल्स)
वरुण आरोन : 50 लाख ( गुजरात टायटन्स )
रमेश कुमार : 20 लाख ( कोलकाता नाईट रायडर्स )
हृतिक शोकीन : 20 लाख ( मुंबई इंडियन्स)
के भगत : 20 लाख ( चेन्नई सुपर किंग्स)
अर्जुन तेंडुलकर : 30 लाख ( मुंबई इंडियन्स)
शुभम गढवाल : 20 लाख (राजस्थान रॉयल्स)
मोहम्मद नबी : 1 कोटी ( कोलकाता नाईट रायडर्स )
उमेश यादव : 1 कोटी ( कोलकाता नाईट रायडर्स )
जेम्स नीशम : 1.5 कोटी (राजस्थान रॉयल्स)
नॅथन कुल्टर-नाईल : 2 कोटी (राजस्थान रॉयल्स)
विकी ओस्तवाल : 20 लाख (दिल्ली कॅपिटल्स)
रस्सी वॅन डर दुसेन : 1 कोटी (राजस्थान रॉयल्स)
डॅरिल मिशेल : 75 लाख (राजस्थान रॉयल्स)
सिद्धार्थ कौल : 75 लाख (आरसीबी)
बी साई सुदर्शन : 20 लाख ( लखनऊ)
आर्यन जुयाल : 20 लाख ( मुंबई इंडियन्स)
लवनीथ सिसोदिया : 20 लाख (आरसीबी)
फॅबियन ऍलन : 75 लाख ( मुंबई इंडियन्स)
डेव्हिड विली : 2 कोटी (आरसीबी)
अमन खान : 20 लाख ( कोलकाता नाईट रायडर्स )

कोणते खेळाडू ठरले अनसोल्ड ?
डेव्हिड मालन
मार्नस लॅबुशेन
सौरभ तिवारी
आरोन फिंच
चेतेश्वर पुजारा
इशांत शर्मा
शेल्डन कॉट्रेल
तबरेझ शम्सी
कैस अहमद
ईश सोधी
पियुष चावला
विराट सिंग
हिम्मत सिंग
सचिन बेबी
हरनूर सिंग
हिमांशू राणा
रिकी भुई
वसु वत्स
यश ठाकूर
अरझान नागवासवाला
मुजतबा युसूफ
आकाश सिंग
चारिथ असलंका
जॉर्ज गार्टन
रहमानउल्ला गुरबाज
बेन मॅकडरमॉट
ओबेद मॅकॉय
रईस टोपले
अँड्र्यू टाय
संदीप वारियर
तन्मय अग्रवाल
टॉम कोहलर-कॅडमोर
अपूर्व वानखेडे
अथर्व अंकोलेकर
प्रशांत चोप्रा
बेन द्वारशुईस
पंकज जसवाल
युवराज चुडासामा
मिधुं सुधेसन
मार्टिन गप्टिल
रोस्टन चेस
बेन कटिंग
पवन नेगी
धवल कुलकर्णी
केन रिचर्डसन
लॉरी इव्हान्स
हेडन केर
सौरभ कुमार
शम्स मुलाणी
ध्रुव पटेल
अतित शेठ
डेव्हिड विसे
केन्नर लुईस
बीआर शरथ
सुशांत मिश्रा
ब्लेसिंग मुजरबानी
कौशल तांबे
मुकेश कुमार सिंग
निनाद रथवा
अमित अली
ललित यादव
आशुतोष शर्मा

चोराने मंदिराचे कुलूप तोडून दानपेटीतील रक्कम केली लंपास

भंडारा : हॅलो महाराष्ट्र – भंडारा तालुक्यातील परसोडी गावामध्ये चोरीची घटना उघडकीस आली आहे. परसोडी गावामध्ये मानव मंदिर आहे. या मंदिरात या चोरट्याने डल्ला मारला आहे. परमात्मा एक सेवक यांनी परसोडी गावामध्ये एक मानव मंदिर तयार केले आहे. या मानव मंदिरामध्ये येणारे भाविक त्या दानपेटीमध्ये पैसे टाकत होते.

हि दानपेटी गेल्या वर्षभरापासून उघडली नव्हती. यामुळे या चोरट्याने डाव साधून रात्रीच्या अंधारामध्ये मंदिराचा गेट तोडून मंदिरात प्रवेश केला. यानंतर त्यांनी मंदिरातील दानपेटी लंपास केली.

ही सगळी घटना मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या प्रकरणी जवाहरनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जवाहरनगर पोलिस सीसीटीव्हीच्या आधारे आरोपी चोरट्यांचा शोध घेत आहेत.

FPI ने फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरवड्यात भारतीय बाजारातून काढले 14,935 कोटी रुपये

नवी दिल्ली । विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी म्हणजेच FPIs ने फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरवड्यात भारतीय बाजारातून 14,935 कोटी रुपये काढले आहेत. सलग चौथ्या महिन्यात FPची विक्री झाली आहे.

डिपॉझिटरी डेटानुसार, 1 ते 11 फेब्रुवारी दरम्यान, FPIs ने इक्विटीमधून 10,080 कोटी रुपये, कर्ज विभागातून 4,830 कोटी रुपये आणि हायब्रीड इंस्ट्रुमेंट्स मधून 24 कोटी रुपये काढले आहेत. अशा प्रकारे त्यांची एकूण रक्कम 14,935 कोटी रुपये झाली आहे.

हिमांशू श्रीवास्तव, असोसिएट डायरेक्टर (मॅनेजर रिसर्च), मॉर्निंगस्टार इंडिया म्हणाले, “अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेने नरम आर्थिक भूमिका सोडण्याचे संकेत दिल्यानंतर FPI विक्री वाढली आहे. यूएस मध्यवर्ती बँकेने व्याजदर वाढीचे संकेत दिल्यानंतर जागतिक स्तरावर बाँडवरील उत्पन्न वाढले आहे.”

यूएस महागाई 40 वर्षांच्या उच्चांकावर
श्रीवास्तव म्हणाले की,”अमेरिकेतील महागाई 40 वर्षांच्या उच्चांकावर पोहोचली आहे. अशा स्थितीत अमेरिकेची मध्यवर्ती बँक येत्या काही महिन्यांत आक्रमकपणे व्याजदर वाढवू शकते. यामुळे भारतीय शेअर्समधून विदेशी निधीचा फ्लो आणखी वाढू शकतो.”

उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये संमिश्र प्रवाह
कोटक सिक्युरिटीजचे इक्विटी रिसर्च (रिटेल) प्रमुख श्रीकांत चौहान म्हणाले की,”फेब्रुवारीमध्ये आजपर्यंत उदयोन्मुख बाजारांचा कल संमिश्र होता.” ते म्हणाले की,”या काळात थायलंड, इंडोनेशिया, दक्षिण कोरिया आणि फिलीपिन्समध्ये अनुक्रमे 115.5 कोटी डॉलर्स, 58 कोटी डॉलर्स, 47.7 कोटी डॉलर्स आणि 13.3 कोटी डॉलर्स गुंतवणुकीचा फ्लो झाला आहे. दुसरीकडे, या काळात तैवानमधुनकडून 4.1 कोटी डॉलर्स पैसे काढण्यात आले आहेत.”

जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे मुख्य फायनान्शिअल इन्व्हेस्टर व्ही. के, विजयकुमार म्हणाले, “जागतिक बाजारपेठेतील कमकुवत कल आणि यूएसमधील 10 वर्षांच्या बॉण्डवरील उत्पन्नात झालेली वाढ यामुळे आगामी काळात FPI ची विक्री सुरू राहील.”

महागाई आणि कच्च्या तेलाच्या तेजी दरम्यान सोन्याद्वारे करता येईल कमाई

Digital Gold

नवी दिल्ली । जागतिक चलनवाढीने जगभरातील सरकार आणि केंद्रीय बँकांना विचार करायला भाग पाडले आहे. जानेवारी महिन्यात अमेरिकेतील महागाईने गेल्या चार दशकांचा विक्रम मोडला. तेथे महागाईचा दर 7.5 टक्क्यांवर पोहोचला. सततच्या वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे सोन्यामध्ये गुंतवणूकदारांचे आकर्षण वाढत आहे.

विक्रमी महागाई आणि कच्च्या तेलाच्या किंमतीत झालेली झेप यामुळे सोन्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या आठवड्यात सोन्याचा भाव 1860 डॉलरच्या पुढे गेला आहे, जो तीन महिन्यांच्या उच्चांकावर आहे. MCX वर तो 49000 च्या पुढे गेला आहे. अशा परिस्थितीत तुम्ही सोन्यात गुंतवणूक केली तर तुम्हाला मोठा नफा मिळू शकतो.

युक्रेन-रशियामधील तणाव आणखी वाढणार आहे
महागाईमुळे सोन्याची मागणी वाढत असल्याचे कमोडिटी बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे पिवळ्या धातूचे भाव वाढत आहेत. रशिया आणि युक्रेनमधील तणावादरम्यान जागतिक बाजारात कच्च्या तेलाने $95 च्या वर गेले आहे. युक्रेन आणि रशिया यांच्यातील तणाव वाढला तर कच्च्या तेल आणि महागाई वाढेल. ज्यामुळे सोन्याच्या किमती आणखी वाढतील.

पिवळा धातू लवकरच 50000 ची पातळी गाठेल
केडिया एडव्हायझरीचे व्यवस्थापकीय संचालक अजय केडिया म्हणतात की, “आंतरराष्ट्रीय बाजारात अल्पावधीत सोने MCX वर $1920 आणि 50,000 पर्यंत पोहोचू शकते.” IIFL सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष अनुज गुप्ता म्हणाले की,”अमेरिकेतील वाढती महागाई ही चिंतेची बाब आहे. कच्च्या तेलाने $95 चा आकडा पार केला आहे. अशातच युक्रेन आणि रशिया यांच्यातील वाद वाढल्यास कच्च्या तेलाचा दर लवकरच 100 डॉलरच्या पुढे जाईल. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि वाढती महागाई यामुळे सोन्याचे भाव आणखी वाढू शकतील.”

जागतिक बाजारपेठेत $1900 पर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे
मोतीलाल ओसवालचे उपाध्यक्ष अमित सजेजा सांगतात की,” सोन्याचा कल वाढत राहील. पहिले ते 1865 डॉलर्सची पातळी ओलांडेल. त्यानंतर लवकरच ते $1890 आणि नंतर $1900 ची पातळी ओलांडेल.” अनुज गुप्ता म्हणाले की,”MCX वर सोन्याला 48500 च्या पातळीवर मजबूत सपोर्ट मिळाला आहे. त्याचे पुढील लक्ष्य 49700 असेल. काही काळ वाट पाहिल्यानंतर ती 50000 ची पातळीही पार करेल.”