Tuesday, December 23, 2025
Home Blog Page 2786

मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे आक्रमक; ‘या’ दिवशी आमरण उपोषणाला बसणार

Sambhaji raje

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यांवरून छत्रपती संभाजी राजे पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. ठाकरे सरकार आरक्षणाबाबत ठोस निर्णय घेत नसून यामुळे मी 26 फेब्रुवारी ला मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसणार आहे अशी भूमिका छत्रपती संभाजी राजे यांनी मांडली.

संभाजीराजे म्हणाले, ५ मे २०२१ ला आरक्षण रद्द झालं, त्यानंतर अनेकवेळा आंदोलनं केली, पण कोणतीच मागणी पूर्ण झालेली नाही. आतापर्यंत मी आक्रमक होतो, पण आता मी उद्विग्न झालो आहे, असं सांगत संभाजीराजे यांनी येत्या २६ फेब्रुवारीपासून मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषणाला बसणार असल्याची घोषणा केली आहे.

मी सगळ्या पक्षाच्या नेत्यांना हात जोडून विनंती केली की आरक्षण द्या. आरक्षण कशामुळे गेलं हे देखील सांगितले परंतू काहीच हालचाल झाली नाही. मी आरक्षण रद्द झाल्यानंतर रिव्ह्यू पिटिशन दखल करा असं सांगितल. परंतू खुप दिवसांनंतर याचीका दाखल केली. सध्या त्याची काय परिस्थिती आहे हे काहीच माहिती नाही. आता मी उद्विग्न झालो आहे, असं सांगत संभाजीराजे यांनी येत्या २६ फेब्रुवारीपासून मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषणाला बसणार असल्याची घोषणा केली आहे.

केबीसी मध्ये लॉटरी लागल्याचे सांगून अज्ञातांनी निवृत्त शिक्षकाला घातला 74 लाखांना गंडा

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

सांगलीतल्या कुपवाड रोडवरील खाताळनगर येथे राहणाऱ्या एका निवृत्त शिक्षकाला केबीसी मध्ये लॉटरी लागल्याचे सांगून तसेच विना पेपर कर्ज मंजूर झाल्याचे सांगत अज्ञात नंबरवरून तब्बल 73 लाख 95 हजार 797 रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. सदर फसवणुकीचा प्रकार हा 02 नोव्हेंबर 2021 ते 31 डिसेंबर 2021 या कालावधीत घडला. या प्रकरणी किशोर दाभणे यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

फिर्यादी किशोर दाभणे हे निवृत्त शिक्षक आहेत. दाभणे आपल्या घरी असताना 2 नोव्हेंबर रोजी त्यांच्या मोबाईलवर एक मॅसेज आला. तुम्हाला केबीसी कडून 25 लाख रुपयांची लॉटरी लागली असल्याचे सांगून प्रोसेसिंग फी, बारकोट फी, पॅनकार्ड आणि एक्स्चेंज चार्जेस भरण्यास सांगितले. त्या मॅसेजवर दाभणे यांनी विश्र्वास ठेऊन एसबीजीआय बँकेतून मॅसेज मध्ये दिलेल्या बँक खात्यावर तब्बल 46 लाख रुपये भरले. त्यानंतर दाभणे यांनी कर्जासाठी रिलायन्स ऑनलाईन फायनान्स या अँप वरून अर्ज केला होता.

त्यानंतर दाभणे यांच्या फोनवर अज्ञात व्यक्तीने फोन करून 5 लाखांचे कर्ज विनापेपर मंजूर झाल्याचे सांगून काही चार्जेस भरण्यास सांगितले. सदरचे चार्जेस हे रिफंड असल्याचे सांगितल्याने त्यांनी 27 लाख 95 हजार 797 रुपये अज्ञात व्यक्तीने दिलेल्या बँक खात्यावर गुगल पे द्वारे भरले. दाभणे यांची अज्ञातांनी एकूण ७३ लाख ९५ हजारांची फसवणूक केली.

व्यवसायासाठी खूप उपयोगी ठरते बिझनेस लोन; जाणून घ्या काय आहेत फायदे

FD

नवी दिल्ली | तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल किंवा जास्त उत्पादनासाठी प्रगत मशीन्स घ्यायच्या असेल किंवा नवीन युनिट सुरू करण्यासाठी जास्त मनुष्यबळाची गरज असेल. या सर्व कामांसाठी आपल्याला आणखी पैशांची गरज असेल तर अशा आर्थिक गरजा आपण बिझनेस लोन घेऊन पूर्ण करू शकतो.

हे स्पर्धेचे युग आहे आणि व्यवसायात यशस्वी होण्यासाठी आपल्याला सतत आपल्या संसाधनांमध्ये नवनवीन शोध घेणे आवश्यक आहे. प्रगत तंत्रज्ञानाच्या बळावरच आपण व्यावसायिक जगात सुरू असलेल्या स्पर्धेत मात करू शकतो.

व्यवसाय चालवण्यासाठी यंत्राप्रमाणे इंधनही लागते आणि पैसा हे व्यवसायाचे इंधन आहे. बिझनेस वाढवायचा असो किंवा नवीन युनिट सुरू करायचा असो, सगळ्या कामांसाठी मोठ्या प्रमाणात पैसा लागतो.काहीवेळा आपल्याकडे व्यवसायातील पैशांची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी आपले वैयक्तिक सोर्स असू शकतात. मात्र जर आपल्याकडे स्वतःची संसाधने नसतील किंवा संसाधने संपली असतील तर नेहमी बँक किंवा नॉन बँकिंग फायनान्स कंपनी- NBFC कडून बिझनेस लोन घेण्याचा पर्याय असतो.

बिझनेस लोन हे असुरक्षित कर्जाचा (unsecured loan) प्रकार आहे. कर्जदाराच्या पतपात्रतेच्या आधारावर व्यवसाय कर्ज दिले जाते. अनेक बँका आणि NBFC आवश्यक कागदपत्रांच्या आधारे व्यावसायिकाला कर्ज देतात.

बिझनेस लोन बेनिफिट
स्पर्धेच्या युगात व्यवसाय टिकवून ठेवण्यासाठी आणि तो फायदेशीर बनवण्यात बिझनेस लोनचा मोठा वाटा आहे. याने व्यवसायाच्या आर्थिक गरजा तर पूर्ण होतातच, सोबतच करातही अनेक फायदे मिळतात. बिझनेस लोनमुळे कॅश फ्लो वाढतो. व्यवसायाच्या गरजांसाठी पैसा मदत करतो. पैशाची गरज अल्प व दीर्घ मुदतीसाठी भागवली जाते.

व्यवसायाचा विस्तार
जास्त रोख रक्कम ओतल्याने व्यवसायाचा विस्तार करणे शक्य होते. आपण नवीन उत्पादने विकसित करू शकतो आणि बाजारात आणू शकतो. बिझनेस लोनच्या आधारावर, तुम्ही तुमच्या सध्याच्या उत्पादनांची नवीन बाजारपेठेत जाहिरात करू शकता.बिझनेस लोन घेऊन खेळत्या भांडवलाच्या गरजा भागवता येतात.

व्यवसायावर नियंत्रण
जर तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या विस्तारासाठी भागधारक किंवा भागीदारांमार्फत पैसे उभे केले तर त्यांचा व्यवसायाच्या निर्णयात हस्तक्षेप वाढतो. याशिवाय त्यांना नफ्यातही वाटा मिळतो. याउलट, एखादी व्यक्ती बँका आणि NBFC कडून बिझनेस लोन घेऊ शकते आणि त्यांचा व्यवसायात इच्छेनुसार वापर करू शकते. यासह, तुमचे व्यवसायावर पूर्ण नियंत्रण असेल आणि नफ्यातही पूर्ण वाटा असेल.

क्रेडिट स्कोअर सुधारा
जर आपण आपल्या बिझनेस लोनची वेळेवर परतफेड केली तर त्यामुळे आपला क्रेडिट स्कोअर सुधारतो. यामुळे भविष्यात गरज पडल्यास कमी व्याजाने जास्त कर्ज घेण्यास मदत होते.

“मला त्यांच्या ड्रायव्हरला आय लव यु संदेश पाठवावा लागेल तेव्हा उदयनराजेंना मिळेल” – शिवेंद्रराजे भोसले

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके

सातारा जिल्ह्यातील राजकीय नेत्यांकडून एकमेकांवर टीकाटिप्पणी केली जाते तर कधी एकमेकांबद्दल प्रेमही दर्शवले जाते. असा प्रकार अनेकदा सातारचे भाजपचे खासदार छत्रपती उदयराजे भोसले आणि आमदार छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्याबाबतीत बघायला मिळतो. दरम्यान आज व्हेलेंटाईन डे निमित्त खासदार उदयनराजे भोसले यांच्याविषयी मनात असलेल्या प्रेमाबद्दल आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी मनातील इच्छा बोलून दाखवली. “आज व्हेलेंटाईन डे आहे. मला नेहमी उदयनराजे त्याच्या ड्रायव्हरच्या फोनवरून फोन करतात. मला त्यांना आय लव्ह यु म्हणायचे असेल तर अगोदर त्यांच्या ड्रायव्हरला आय लव यु असा संदेश पाठवावा लागेल तेव्हा उदयनराजेंना मिळेल, असे शिवेंद्रराजे भोसले यांनी म्हंटले आहे.

आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी सातारा येथे आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, आज व्हेलेंटाईन डेही आहे. या दिवशी खासदार उदयनराजे भोसले यांना जर प्रेमाचा संदेश पाठवायचा असेल तर त्यांचा फोन नंबर माझ्याकडे नाही. ते नेहमी मला त्यांच्या ड्रायव्हरच्या फोनवरून फोन करतात. आता तर माझ्याकडे त्यांच्या ड्रॉयव्हरचाही फोन नंबर नाही. मला त्यांना जर आय लव्ह यु पाठवायचे असेल तर अगोदर त्यांच्या ड्रायव्हरला आय लव्ह यु पाठवावे लागे, असे भोसले यांनी म्हंटले.

आज व्हेलेंटाईन डे असल्यामुळ राजकीय नेते मंडळींकडूनही या डे निमित्त एकमेकांनाप्रेमाचे संदेश पाठविले जातायंत. दरम्यान खास करून सातारा जिल्ह्यात दोन्ही राजेंच्या प्रेमाची जास्त चर्चा होते. खासदार छत्रपती उदयनराजे भोसले आणि आमदार छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्यातील एकमेकांवर असलेले परम हे सर्वांनाच माहिती आहे. आज व्हेलेंटाईन डे निमित्तही शिवेंद्रराजे भोसले यांनी आपले बंधू उदयनराजे भोसले यांच्याविषयी आपल्या शैलीत प्रेम व्यक्त केले आहे.

शिवप्रेमींच्या संयमाचा अंत पाहू नका; मनपाला इशारा

Kranti chouk , Chatrapati Shivaji Maharaj
Kranti chouk , Chatrapati Shivaji Maharaj

औरंगाबाद – शिवजयंतीला आठवडा शिल्लक राहिलेला आहे. अशा परिस्थितीत क्रांती चौकात बसवण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणाविषयी महापालिकेकडून गोपनीयता बाळगली जात आहे. तसेच पुतळ्याची उंची वाढविल्यामुळे महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करता येणार नाही. यासाठी पर्यायी व्यवस्थेचे काय नियोजन करण्यात आले आहे, याविषयी सस्पेन्स ठेवण्यात येत आहे. हा सस्पेन्स किती दिवस ठेवणार आहात असा सवाल करून शिवप्रेमींच्या संयमाचा अंत पाहू नका, असा इशारा शिवजयंती महोत्सव समितीच्यावतीने देण्यात आला आहे.

क्रांती चौक येथे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची व चबुतऱ्याची उंची वाढवावी ही शिवप्रेमींची अनेक वर्षांपासूनची मागणी होती. तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर शिवजयंतीच्या मुहूर्तावर कसे तरी घाई करून यावेळेस स्मारकाचे काम पूर्ण केले व पुतळादेखील बसविण्यात आला. आता प्रश्न आहे तो पुतळ्याच्या अनावरणाचा. तो कुणाच्या हस्ते करायचा व कधी करायचा. शिवप्रेमींची काय इच्छा आहे, त्यांची काय मागणी आहे. महापालिकेचे काय नियोजन आहे. यावर महापालिका प्रशासक काहीही बोलायला तयार नाहीत. महापालिकेमध्ये लोकप्रतिनिधी नसल्याने प्रशासकांना जाब विचारायला कुणीच नाही म्हणून प्रशासक मनमानी करत असल्याचा आरोप शिवप्रेमींकडून करण्यात आला आहे.

शिवजयंती समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून विश्वासात घ्यायला तयार नाहीत. शिवजयंतीच्या दिवशी 19 फेब्रुवारीला महापालिकेचे काय नियोजन आहे हे स्पष्ट करावे असे म्हटले आहे. महापालिका प्रशासकांनी समितीच्या पदाधिकाऱ्यांना अथवा शिवप्रेमींना त्यांनी केलेल्या नियोजनाबद्दल सांगावे, असे आवाहन औरंगाबाद जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार, समिती अध्यक्ष अभिजित देशमुख, प्रा. मनोज पाटील, अनिल मानकापे, राजेंद्र दाते पाटील, अप्पासाहेब कुढेकर, मच्छिंद्र देवकर, सुनील औटे, महेश उबाळे, अनिल बोरसे, संदीप शेळके, विशाल दाभाडे यांनी केले आहे.

Gold Price : सोने-चांदी महागले, आजचा दर पहा

Gold Price

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. त्याच वेळी, चांदीच्या दरातही तेजी आहे. आजच्या दरवाढीनंतर सोन्याचा दर 50,000 रुपयांच्या जवळ पोहोचला आहे. MCX वर सोने 0.87 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत आहे. त्याचवेळी चांदीचा भाव आज 64 हजार रुपये प्रति किलोच्या जवळ पोहोचला आहे.

सोन्या-चांदीचा भाव
0.87 टक्क्यांच्या वाढीसह एप्रिलमधील डिलिव्हरीसाठीचा सोन्याचा भाव 50 हजारांच्या जवळ पोहोचला आहे. आज सोन्याचा दर 49,540 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर आहे. त्याचवेळी, आजच्या ट्रेडिंगमध्ये चांदी 1.29 टक्क्यांच्या वाढीसह 64,799 रुपये प्रति किलोच्या पातळीवर ट्रेड करत आहे.

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,250 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 50,450 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,300 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 50,510 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,300 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 50,510 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत.

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 46,300 रुपये
पुणे – 46,250 रुपये
नागपूर – 46,300 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 50,510 रुपये
पुणे – 50,450 रुपये
नागपूर – 50,510 रुपये

PolicyBazar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Gram 22 Carat Gold Yesterday 22 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4676.00 Rs 4675.00 -0.021 %⌄
8 GRAM Rs 37408 Rs 37400 -0.021 %⌄
10 GRAM Rs 46760 Rs 46750 -0.021 %⌄
100 GRAM Rs 467600 Rs 467500 -0.021 %⌄

 

PolicyBazar वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Gram 24 Carat Gold Yesterday 24 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 5071.00 Rs 5100.00 0.569 %⌄
8 GRAM Rs 40568 Rs 40800 0.569 %⌄
10 GRAM Rs 50710 Rs 51000 0.569 %⌄
100 GRAM Rs 507100 Rs 510000 0.569 %⌄

तोरणा किल्ल्यावर सैदापुरातील युवकाचा डोक्यावर दगड पडून मृत्यू

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

कराड तालुक्यातील सैदापूर येथील एका युवकाचा तोरणा किल्ल्यावर डोक्यात दगड पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ओम महेशकुमार भरमगुंडे (वय 21, रा. सैदापूर, ता. कराड) असे युवकाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कराड तालुक्यातील सैदापूर येथील ट्रेकर असणारा ओम भरमगुंडे हा पुणे येथे शिक्षणासाठी होता. दरम्यान रविवारी सुट्टी असल्याने तो आपल्या मित्रांसमवेत वेल्हे तालुक्यातील तोरणा किल्यावर ट्रेकिंगसाठी गेला. किल्यावर ट्रेकिंग करीत असताना अचानकपणे वरील बाजुकरून त्याच्या डोक्यावरती दगड पडला.

डोक्यावर दगड पडल्याने त्याचा यामध्ये मृत्यू झाला. ओम हा वहागाव येथील अण्णाजी पवार विद्यालयातील इंग्रजी विषयाचे शिक्षक महेशकुमार भरमगुंडे यांचा मुलगा आणि हास्यसम्राट अजितकुमार कोष्टी यांचा भाचा आहे. दरम्यान रात्री उशिरा ओमचे पार्थिव कराड येथे आणण्यात आले.

Share Market : सेन्सेक्स-निफ्टी मोठ्या घसरणीने उघडले, गुंतवणूकदारांचे 5 लाख कोटी बुडव

Share Market

नवी दिल्ली | सोमवारी सकाळी भारतीय शेअर बाजारात ट्रेडिंग सुरू होताच गुंतवणूकदारांमध्ये गोंधळ उडाला. जोरदार विक्रीमुळे सेन्सेक्स 1,197.86 अंकांनी घसरून 56955.06 वर उघडला, तर निफ्टी 348 अंकांनी घसरून 17,026 वर आला.

जागतिक बाजारातील घसरण आणि अन्य कारणांमुळे सकाळपासूनच बाजारात विक्रीचा बोलबाला होता. परिस्थिती अशी होती की, सकाळी 9.21 पर्यंत सेन्सेक्स 17 हजारांच्या खाली 1,462 अंकांच्या आणि निफ्टी 400 अंकांच्या मोठ्या घसरणीने ट्रेड करत होता. SBI, ITC, ICICI बँक यांसारख्या मोठ्या शेअर्सना मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागत आहे. NSE आणि BSE वरील सर्व क्षेत्रांमध्ये घसरण झाली.

आशियाई बाजारांची स्थिती
भारतापूर्वी उघडलेल्या इतर आशियाई बाजारांमध्ये सकाळी मोठी घसरण दिसून आली. जपानच्या बाजारात 2 टक्क्यांहून जास्तीची घसरण दिसून येत होती, तर सिंगापूर आणि हाँगकाँगमध्येही 1.5 टक्क्यांहून अधिकची घसरण दिसून आली. याआधी शुक्रवारी अमेरिका आणि युरोपचे शेअर बाजार मोठ्या घसरणीवर बंद झाले होते, ज्याचा परिणाम आज जगभरातील शेअर बाजारावर दिसून येत आहे.

गुंतवणूकदारांचे 5 लाख कोटींचे नुकसान
बाजारात झालेल्या विक्रीमुळे बँक निफ्टी निर्देशांक 3 टक्क्यांहून अधिकने घसरला आहे. आयसीआयसीआय बँक, पीएनबी आणि एयू स्मॉल फायनान्स बँकेच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. बाजारातील प्रचंड विक्रीमुळे बीएसईवर लिस्टेड कंपन्यांचे बाजार भांडवलही सुमारे 5 लाख कोटी रुपयांनी घसरले.

भाजपचे साडेतीन लोक तुरुंगात जातील; संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडून शिवसेना खासदार संजय राऊत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर उद्या शिवसेनेकडून पत्रकार परिषद आयोजित केली आहे. तत्पूर्वी संजय राऊत यांनी भाजपला ठणकावले आहे. भाजपचेच साडेतीन लोक तुरुंगात जातील असा दावा करत संजय राऊतांनी खळबळ उडवून दिली आहे.

संजय राऊत म्हणाले, गेले काही दिवसांपासून भाजपकडून तो जेलमध्ये जाईल, हा जेल मध्ये जाईल अस सांगितले जात आहे. अनिल देशमुखांच्या बाजूच्या कोठडीत जातील असंही वारंवार सांगितलं जात आहे. पण तुम्हाला सांगतो, भाजपचेच साडेतीन लोक देशमुखांच्याच बाजूच्या कोठडीत जाणार आहेत. देशमुख बाहेर असतील आणि भाजपचे लोक आत असतील.

ते पुढे म्हणाले, आता खुप झालं. डोक्यावरुन खूप पाणी गेलंय? राजकीय मर्यादांचं उल्लंघन तुम्ही केलं आहे. आता बघाच, तुम्हांला आता कळेल काय असतं ते. हमाम में सब नंगे होते है, अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला दिला आहे.

मनपा भरणार 46 लाखांचा हफ्ता

औरंगाबाद – सातारा-देवळाई परिसराचा सहा वर्षांपूर्वी मनपात समावेश झाला. या भागात ड्रेनेज ची कोणतीही यंत्रणा नाही. 232 कोटी रुपये खर्च करून ड्रेनेज लाईन टाकण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला.

प्रस्तावाला तांत्रिक मंजुरी आवश्यक आहे त्यासाठी 2 कोटी 32 लाख रुपये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला द्यावे लागणार आहेत. त्यातील पहिला टप्पा म्हणून 46 लाख रुपये सोमवारी महापालिकेकडून देण्यात येणार आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने देण्याच्या डीपीआरला तांत्रिक मंजुरी देण्यासाठी काम सुरू केले.

नियमानुसार एक टक्का रक्कम भरणे बंधनकारक आहे. 2 कोटी 32 लाख रुपये भरावेत, अशी मागणी प्राधिकरणाकडे मनपाकडे केली. तेवढी रक्कम मनपाकडे नसल्यामुळे पाच हप्ते पाडून देण्याची विनंती करण्यात आली. पहिला हप्ता म्हणून 46 लाख रुपये मनपाने भरावे तसेच सूचना देखील केली आहे.