Tuesday, December 23, 2025
Home Blog Page 2790

HARC संस्थेतर्फे 72 HIV ग्रस्त बालकांना मल्टिव्हिटॅमिन अन् आयर्न टॉनिक औषधीचे वाटप

हॅलो महाराष्ट्र | परभणी प्रतिनिधी 

बेकॉन हेल्थकेअरची सामाजिक बांधिलकी या उपक्रमासाठी बेकॉन हेल्थकेअरच्या लियाकुद्दीन , राजेश पाटील व महादेव यांनी जवळपास 12 हजार किंमतीची मल्टिव्हिटॅमिन व आयर्न टॉनिक औषधी परभणीतील एचएआरसी संस्थेच्या माध्यमातून 12 फेब्रुवारी रोजी 72 एचआयव्ही ग्रस्त बालकांना वाटप करण्यात आली.

एचआयव्ही एड्स सारख्या दुर्धर आजारग्रस्त बालकांना संधी साधू आजारापासून बचावासाठी पोषक आहार सोबत, हिमोग्लोबिन वाढी सोबत कॅल्शियम, आयर्न, मिनरल आदी घटकांची योग्य मात्र आवश्यक असते ते नसेल तर ऍनिमिया अर्थात पंडुरोग सारख्या आजार होऊ शकतात. त्यामुळे वेळोवेळी एचएआरसी संस्था पोषक आहार व वापरविषयी जनजागृती सोबत हिमोग्लोबिन वाढी साठी मल्टिव्हिटॅमिन व आयर्न टॉनिक औषधीचे वाटप करत असते.

12 फेब्रुवारी रोजी होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज (एचएआरसी) या संस्थेतर्फे 72 एचआयव्ही ग्रस्त बालकांना वाटप करण्यासाठी एचआयव्ही ग्रस्त बालके व माता यांचे नेटवर्क चालविणाऱ्या ‘विहान’ या संस्थेकडे सुपूर्द करण्यात आली. ही औषधी पुढे विहान या संस्थे मार्फत हिमोग्लोबिन कमी असलेल्या व पोषण ची आवश्यकता असलेल्या एचआयव्ही ग्रस्त बालके व मातांना वाटप करण्यात येणार असल्याची माहिती एचएआरसी संस्थेचे अध्यक्ष डॉ पवन चांडक यांच्या वतीने देण्यात आली आहे.

या उपक्रमाच्या यशस्वीततेसाठी एचएआरसी संस्थेचे अध्यक्ष डॉ पवन चांडक, डॉ आशा चांडक, रितेश कालानी, गोपाळ मुरक्या, संदीप भंडे, लियाकुद्दीन , राजेश पाटील व महादेव, विहान संस्थेच्या बबिता चरण यांनी परिश्रम घेतले.

वाईन विरोधात अण्णा हजारे आक्रमक; उद्यापासून आमरण उपोषण

anna hajare

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्य सरकारने किराणा दुकान आणि सुपर मार्केट मध्ये वाईन विक्रीचा निर्णय घेतल्यानंतर जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सरकारवर सडकून टीका करत सरकारच्या निर्णयाविरोधात आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. तसेच तुमच्या राज्यात जगण्याची माझी इच्छा नाही हे सरकारला सांगा असेही ते म्हणाले.

राज्यात लोकशाही नसून हुकूमशाही आहे. वाईन ही आपली संस्कृती आहे का ?? असा सवाल करतानाच वाईन विक्रीचा निर्णय घेताना जनतेचे मत विचारात घ्यायला हवे होते असे अण्णा हजारे यांनी म्हंटल. जनतेची मान्यता नव्हती तर मग कॅबिनेट ने निर्णय कसा घेतला असा सवाल अण्णा हजारे यांनी केला.

मंत्री मंडळाने निर्णय घेतला वाईन ही किराणा दुकानात विक्रीला ठेवल्याने लहान मुलांना व्यसन लागू शकते. यामुळे पिढ्या बरबाद होतील. व्यसनाने लोक बरबाद झाले आणि बालके व्यसनाच्या अधीन गेले तर काय होणार असा सवाल अण्णा हजारे यांनी राज्य सरकार ला केला.

खाद्यतेलाच्या किंमती कमी करण्यासाठी सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

edible oil

नवी दिल्ली । खाद्यतेलाच्या वाढत्या किंमती कमी करण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. खरं तर, सरकारने शनिवारी क्रूड पाम तेल किंवा CPO वरील प्रभावी कस्टम ड्युटी 5.5 टक्के कमी केली. या निर्णयामुळे खाद्यतेलाच्या किंमती कमी होण्यास मदत होणार असून ग्राहकांना दिलासा मिळणार आहे.

एका अधिकृत अधिसूचनेत शनिवारी सांगितले गेले की, आता 5 टक्के कृषी पायाभूत सुविधा विकास उपकर कच्च्या पाम तेलावर लावला जाईल, जो आतापर्यंत 7.5 टक्के होता. या कपातीनंतर क्रूड पाम तेलावरील प्रभावी कस्टम ड्युटी 8.25 टक्क्यांऐवजी 5.5 टक्के होईल.

ऑक्टोबर 2021 मध्ये खाद्यतेलाच्या आयात शुल्कात कपात करण्यात आली होती
या कपातीमुळे भाव 280 रुपये प्रति क्विंटलने खाली येण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. सरकारने यापूर्वी ऑक्टोबर 2021 मध्येही खाद्यतेलाच्या आयात शुल्कात कपात केली होती. भारत आपल्या खाद्यतेलाच्या 60 टक्क्यांहून अधिक गरजा आयातीद्वारे भागवतो. इंडोनेशिया आणि मलेशिया हे भारताला RBD पामोलिन आणि क्रूड पाम तेलाचे प्रमुख पुरवठादार आहेत.

शनिवारी बाजारातील घाऊक भाव पुढीलप्रमाणे राहिले- (रु. प्रति क्विंटल)
मोहरी तेलबिया – 8350-8380 रुपये (42 टक्के कंडीशनचा भाव)
भुईमूग – 5,825 – 5,920 रुपये
भुईमूग तेल मिल डिलिव्हरी (गुजरात) – 12,900 रुपये
भुईमूग सॉल्व्हेंट रिफाइंड ऑइल 2050 – 2,175 रुपयेप्रति टिन
मोहरीचे तेल दादरी – 16,600 रुपये प्रति क्विंटल
मोहरी पक्की घणी – 2450-2500 रुपये प्रति टिन
मोहरी कच्छी घाणी – 2650-2745 रुपये प्रति टिन
तीळ तेल मिल डिलिव्हरी – 16,700-18,200 रुपये
सोयाबीन ऑइल मिल डिलिव्हरी दिल्ली – 14,100 रुपये
सोयाबीन मिल डिलिव्हरी इंदूर – 13,850 रुपये
सोयाबीन तेल डेगम, कांडला – 12,700 रुपये
सीपीओ एक्स-कांडला – 12,150 रुपये
कॉटनसीड मिल डिलिव्हरी (हरियाणा) – 12,950 रुपये
पामोलिन आरबीडी, दिल्ली – 13,600 रुपये
पामोलिन एक्स- कांडला – 12,500 रुपये (जीएसटी शिवाय)
सोयाबीन धान्य – 6750-6800 रुपये
सोयाबीन लूज – 6550-6690 रुपये
मक्का खल (सारिस्का) – 4,000 रुपये

‘व्हॅलेंटाईन डे’ च्या विरोधात सनातन संस्था रस्त्यावर

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

हिंदु जनजागृती समितीच्यावतीने ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखण्यासाठी मारुती चौकामध्ये आंदोलन करण्यात आले. व्गेल्या काही वर्षांत 14 फेब्रुवारी हा दिवस ‘व्हॅलेंटाईन डे’ म्हणून साजरा करण्याची पाश्‍चात्त्यांची कुप्रथा भारतातही रुढ झाली आहे. या विकृत संकल्पनेमुळे युवा पिढी भोगवाद अन् अनैतिकता यांच्या गर्तेत ओढली जात आहे.

या अपप्रकारांना आळा घालण्यासाठी, तसेच भारतीय समाजव्यवस्था उत्तम रहावी आणि अनैतिक कृत्यांमुळे होणार्‍या गैरप्रकारांना आळा बसावा, या युवापिढीचे, नागरिकांचे प्रबोधन व्हावे यानिमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मारुती चौक येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी असंख्य सनातन जनजागृती चे कार्यकर्ते उपस्थित होते.

सातारा जिल्ह्यात 1340 हेक्टरवर सोयाबीन लागवड

सातारा | गतवर्षी सोयाबीनच्या दरात झालेली समाधानकारक वाढ, खरिपात बियाण्यांसह होणारी मागणी यामुळे जिह्यातील शेतकऱ्यांचा उन्हाळी सोयाबीन लागवडीकडे कल वाढला आहे. जिह्यात आतापर्यंत 1340 हेक्टरवर सोयाबीन लागवड झाली असून, सातारा तालुक्यात सर्वाधिक लागवड झाल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.

सातारा जिह्यात सोयाबीनची खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. सोयाबीनचे सरासरी 65 हजार हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र असून, सुमारे 75 हजार हेक्टरवर सोयाबीनची लागवड होते. मागील खरिपात अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे नुकसान झाल्याने उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली होती. त्यामुळे कृषी विभागाने उन्हाळी सोयाबीन पेरणीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले होते. त्यामुळे महाबळेश्वर तालुक्याचा अपवाद वगळता सर्वच तालुक्यांत सोयाबीनची कमी-अधिक स्वरूपात पेरणी झाली आहे. यामध्ये सर्वाधिक सातारा, कोरेगाव, कराड, खटाव, वाई तालुक्यांत सोयाबीनची लागवड झाली आहे.

गतवर्षी सोयाबीनचे दर 10 हजार रुपये क्विंटलपर्यंत गेले होते. सध्याही दर 6 ते 6 हजार 500 रुपये क्विंटल मिळत आहे. पेरणीच्या तोंडावर दरात वाढ होईल, या आशेवर सोयाबीन लागवड करण्याकडे कल वाढला आहे. अनेक शेतकऱ्यांकडून सोयाबीनची नगदी पिकाप्रमाणे काळजी घेतली जात आहे. ठिबक सिंचनाचा वापर केला जात आहे.

 

एक दिवस हिजाबी देशाची पंतप्रधान होईल; ओवेसींचे वक्तव्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कर्नाटकातील हिजाब प्रकरणामुळे देशभर नवा वाद निर्माण झाला असतानाच एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी मोठं विधान केले आहे. एक दिवस हिजाब घातलेली मुलगी देशाची पंतप्रधान होईल अस वक्तव्य त्यांनी केलं आहे. असदुद्दीन ओवेसी यांनी एक व्हिडिओ ट्विट करत हे विधान केले आहे.

या व्हिडिओ मध्ये ओवेसी म्हणतात, आम्ही आमच्या मुलींना शुभेच्छा देतो’ इंशाअल्लाह, जर त्यांनी अब्बा-अम्मी ठरवलं तर मी हिजाब घालेन. तर अम्मा-अब्बा म्हणतील – बेटा घाल, आम्ही बघू तुला कोण अडवते. हिजाब घालून, नकाबही घालून कॉलेजात जाईल, कलेक्टरही बनेल, बिझनेस मॅनही बनेल, एसडीएमही बनेल आणि या देशात एक दिवस मुलगी हिजाब घालून पंतप्रधान बनेल.

हिजाब प्रकरणी ओवेसींनी यापूर्वी देखील आपल मत व्यक्त केले होते. तुम्हाला देशाच्या राज्यघटनेने हक्क दिला आहे. तुम्ही चादर ओढा, नकाब ओढा की हिजाब घाला… ही आपली ओळख आहे. घाबरू नका आणि भीती बाळगू नका. ज्या मुलीने घोषणा देणाऱ्या मुलांना उत्तर दिले, तिला मी सलाम करतो, असं ओवेसी म्हणाले होते.

10 लाखांच्या खंडणीसाठी पेट्रोल पंप चालकास भोसकले

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

संजयनगर परिसरात असणार्‍या एस्सार पेट्रोल पंपवर दहा लाखांची खंडणी देण्यासाठी चौघा तरुणांनी तुफान राडा केला. पेट्रोलपंप चालकास बेदम मारहाण करत एका तरुणाला चाकूने भोसकल्याचा धक्कादायक प्रकार घडला. सदरची घटना हि गुरुवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी जखमी सर्वेश अमोल भोई याने संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्याच्या फिर्यादीवरून हल्ला करणार्‍या अज्जू इनामदार यांच्यासह तिघा अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्वेश भोई याचे काका शरद भोई यांच्या मालकीचा कुपवाड रोडवरील लक्ष्मी मंदिर जवळ एस्सार कंपनीचा पेट्रेल पंप आहे. गुरुवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास संशयित चौघेजण पेट्रोल पंपवर येऊन १० लाख रुपये खंडणी देण्यासाठी शरद भोई आणि इंद्रजित भोई यांच्याशी वाद घालू लागले.

पैसे देण्यास भोई यांनी नकार दिल्यानंतर चौघांनी मिळून इंद्रजित भोई आणि शरद भोई यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरवात केली. यावेळी सर्वेश भोई याने वाचविण्याचा प्रयत्न केला असता अज्जू इनामदार याने त्याच्या जवळ असणार्‍या चाकूने सर्वेश याला भोसकले. त्यानंतर चौघांनी पेट्रोल पंपावर दगडफेक करत पलायन केले.या प्रकरणी सर्वेश भोई याने संजयनगर पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली.

शुल्लक कारणावरुन वाद विकोपाला गेल्याने पतीने पत्नीला दिली ‘हि’ भयंकर शिक्षा

अमरावती : हॅलो महाराष्ट्र – पती पत्नी म्हंटले कि वाद हा आलाच. पती आणि पत्नी यांच्यात झालेल्या या वादानंतर त्यांच्यात काहीकाळ अबोला निर्माण होतो पण काही वेळाने राग शांत झाला कि पुन्हा सगळे पाहिल्याप्रमाणे होते. मात्र अमरावती जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका पतीने शुल्लक कारणावरुन रागाच्या भरात चक्क आपल्या पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्हा हादरला आहे.

पत्नी गंभीर जखमी
हि घटना मेळघाटातील धारणी तालुक्यातील बैरागड या ठिकाणी घडली आहे. यामध्ये पती- पत्नींमध्ये झालेल्या शुल्लक कारणावरून पतीने पत्नीला डिझेल ओतून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेत महिला 83 टक्के भाजली आहे. पीडित महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेत पत्नी गंभीर जखमी झाली आहे.

आरोपी पतीला अटक
या प्रकरणात पीडित महिलेच्या पतीवर पत्नीला जिवंत जाळण्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळताच धारणी पोलिसांनी पीडित महिलेचा पती नासिर याला अटक केली आहे. धारणी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

काय आहे नेमके कारण ?
हाती आलेल्या माहितीनुसार आरोपी पती नासिर शेख गफूर आणि त्याची पत्नी यांच्यात किरकोळ कारणावरुन वाद झाला होता. हा वाद एवढा विकोपाला गेला कि पतीने रागाच्या भरात चक्क पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला आहे.

एसटीत आता खासगी वाहक देणार तिकीट

ST

 

औरंगाबाद – एसटी महामंडळात खाजगी चालकांपाठोपाठ आता खाजगी वाहकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे लवकरच एसटीत खाजगी वाहक प्रवाशांना तिकीट देताना पाहायला मिळतील. या सगळ्यात बेकायदेशीर प्रवासी वाहतुकीचा प्रकार सुरू असल्याने खाजगी चालक रडारवर आले आहेत.

एसटी शासनात विलीनीकरणाच्या मागणीसाठी गेल्या तीन महिन्यांपासून कर्मचारी संपावर आहेत. यात चालक-वाहकांची सर्वाधिक संख्या आहे. यावर पर्याय म्हणून महामंडळाकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत. खासगी पुरवठादार याच्या शिवनेरी आणि शिवशाही बसद्वारे प्रवाशांची वाहतूक केली जात आहे. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांचा संपा दरम्यान एसटी महामंडळाने पुरवठादारामार्फत खाजगी चालकांची ही नियुक्ती केली आहे. खाजगी चालक अनेक मार्गांवर कर्तव्य देखील बजावत आहेत. मात्र खासगी बसेस वरील चालक आणि पुरवठादारामार्फत नियुक्त केलेल्या चालकांकडून बेकायदेशीरपणे प्रवाशांची वाहतूक केली जात आहे. विनातिकीट प्रवासी घेऊन पैसे वसूल केले जात असल्याचा प्रकार महामंडळाच्या निदर्शनास आला आहे. उत्पन्नावर परिणाम होत असल्याने ही बाब गांभीर्याने घेण्यात आली आहे.

मार्ग तपासणी पथके कार्यान्वित करून, बसची तपासणी करण्याची सूचना महाव्यवस्थापकांनी विभाग नियंत्रकांना केली आहे.

छ. शिवाजी महाराजांच्या जयंतीला मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे निर्बंधात शिथिलता देण्याची मागणी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

वर्षापासून राज्यात कोविडमुळे विविध धार्मिक, राजकीय कार्यक्रम, उत्सव यावर कडक निर्बंध लागू होते. कोविडचा संसर्ग रोखण्यास शासनाने घालून दिलेल्या निर्बंधाची चांगल्या पध्दतीने अंमलबजावणी करण्यात आली. त्यामुळे तिसऱ्या लाटेचा संसर्ग रोखण्यामध्ये यश आले आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शनिवारी (ता. 19) होणार आहे. हा जयंती उत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यासाठी शासनाने घातलेल्या निर्बंधामध्ये शिथिलता देण्यात यावी, अशी विनंती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी लेखी पत्राव्दारे केली आहे.

पत्रातील माहिती अशी, दोन वर्षापासून राज्यात कोविडच्या अनुषंगाने विविध धार्मिक, राजकीय व विविध धर्माचे उत्सव साजरे करणे यावर कडक निर्बंध लागू केले आहेत. त्या निर्बंधाची प्रभावी अंमलबजावणी राज्यातील जनतेने यशस्वीपणे केली आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेचा संसर्ग रोखण्यात राज्य शासनासह सर्वजण यशस्वी झालो आहोत. सध्या संक्रमणाचा दर कमी झाला असला तरी खबरदारी म्हणून शासनाने काही निर्बंध हे आज देखील लागू केले आहेत.

राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शनिवारी मोठया उत्साहात साजरी करण्याची भावना शिवप्रेमींमध्ये आहे. मात्र, कोविडच्या अनुषंगाने लागू असलेल्या निर्बंधामुळे शिवप्रेमी व पोलीस विभागामध्ये शिवजयंती उत्सव साजरा करण्याबाबत तसेच शिवज्योत परवानगी देण्याबाबत संभ्रमाचे वातावरण आहे. याबाबत काही निर्बंध व अटी शिथील केल्यास शिवप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावण निर्माण होऊन शिवजयंती उत्साहात साजरी होईल. यंदाची शिवजयंती साजरी करताना शासनाने घालून दिलेल्या निर्बंधामध्ये शासनाचे नियम पाळून थोडया फार प्रमाणात शिथीलता देण्यात यावी, अशी विनंती केली आहे.