Tuesday, December 23, 2025
Home Blog Page 2791

कार घेण्यासाठी कर्ज घेत असाल तर ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

Car Loan

नवी दिल्ली । जर तुम्ही कार घेण्याचा विचार करत असाल आणि कारसाठी कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची ठरू शकते. कारचे मॉडेल, फीचर्स, लूक आणि किंमत यावर कार लोनचा विचार करावा लागतो. इन्शुरन्स सेक्टर मधील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, कार लोन घेताना लोकं अनेकदा अशा चुका करतात, ज्यामुळे त्यांना क्लेमच्या वेळी समस्यांना सामोरे जावे लागते.

त्यामुळे कर कर्ज घेण्यापूर्वी अनेक गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे. हे कर्ज घेताना लक्षात ठेवायला हव्यात अशा काही महत्त्वाच्या गोष्टी आम्ही येथे सांगत आहोत.

तुम्ही किती कर्ज व्यवस्थापित करू शकता ?
कार लोन घेण्यापूर्वी, दर महिन्याला तुम्ही किती हप्त्याचा भार उचलू शकाल याचा विचार करा. हे शक्य आहे की तुम्ही इतर कर्जावर देखील EMI भरत आहात. त्यामुळे बजटचे योग्य नियोजन करा. कार कर्जाच्या वेळी डाउनपेमेंट रक्कम देखील समाविष्ट करा.

रीपेमेंट टाळा
कर्जाची रीपेमेंट टाळा. बहुतेक लोकं कार कर्जाच्या परतफेडीसाठी दीर्घ कालावधीची निवड करतात. ही गोष्ट अशी आहे जी आपल्याला लॉन्ग टर्म रीपेमेंट कमी वाटते. मात्र यामध्ये तुम्ही कारच्या किंमतीपेक्षा जास्त पैसे व्याज म्हणून देता. तुम्ही जितका कमी रीपेमेंटचा कालावधी निवडाल तितका तुमचा फायदा होईल. हे समजून घेण्यासाठी तुम्ही एखाद्या तज्ञाची किंवा EMI कॅल्क्युलेटरची (car loan emi calculator) मदत घेऊ शकता.

माहिती घ्या
कर्ज घेण्यापूर्वी, विविध कार कर्ज योजनांची तुलना करा, त्यांची वैशिष्ट्ये समजून घ्या. आजकाल कार लोन मिळणे फार कठीण नाही. खूप विचार करून हे ठरवण्यातच शहाणपण आहे.

झिरो डाऊन पेमेंट टाळा
कर्ज घेताना झिरो डाउन पेमेंट योजनेबद्दल ऐकणे नक्कीच चांगले आहे. मात्र यासाठी तुम्हाला जास्त कर्ज भरावे लागेल. झिरो डाउन पेमेंट योजना टाळण्याचा प्रयत्न करा. डाउन पेमेंटमध्ये जास्तीत जास्त पैसे टाकण्याचा प्रयत्न करा.

शरद पवारांच्या डोक्यात आयपीएलची कल्पना आली कुठून??

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जगभरात इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएल सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग म्हणून ओळखली जाते. आयपीएल मुळे भारतीय क्रिकेट अजून मजबूत झाले आणि देशातील युवा खेळाडूंना आपली छाप पाडण्यासाठी एक मोठं व्यासपीठ उपलब्ध झाले. पण तुम्हांला हे माहीत आहे का? की आयपीएल ही संकल्पना कोणाची आहे? ही संकल्पना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीच…

शरद पवार हे मुरब्बी राजकारणी जरी असले तरी त्यांचे खेळांवरील प्रेम हे सर्वांनाच माहीत आहे. विशेष म्हणजे ज्या क्रिकेटला भारतात धर्म मानतात तो क्रिकेट हा खेळही शरद पवारांच्या आवडीचा विषय…. शरद पवार बीसीसीआय आणि आयसीसीचे अध्यक्ष झाले. त्यानंतर त्यांनी अनेक देशांची आणि क्रिकेट खेळाशी संबंधित व्यक्तींशी जवळीक वाढवली.

कुठून आणि कशी सुचली कल्पना-

शरद पवार तेव्हा इंग्लंड ला गेले असता तेथील फुटबॉलच्या सामन्यांमधील चुरस पहायचे. इंग्लंड मधील स्थानिक शहरांचे फुट बॉल मधील क्लब सामने पाहून क्रिकेट मध्येही असं काही करता येईल का? असा प्रश्न शरद पवार यांना पडला. शरद पवार यांनी ही कल्पना ललित मोदी यांना सांगितली आणि या कल्पनेला विकसित करण्याची जबाबदारीही शरद पवारांनी ललित मोदी यांच्यावर सोपवली.

शरद पवार यांच्या सूचनेनुसार ललित मोदी कामाला लागले आणि त्यांनी इंडिअन प्रीमिअर लीग नावाने मोठी क्रिकेट स्पर्धा सुरू केली. भारतातील मोठ्या उद्योजकांनी या स्पर्धेत गुंतवणूक केली. आयपीएलमुळे बीसीसीआय अजून श्रीमंत झाली. आणि खेळाडूंनाही याचा फायदा झाला. येवडच नव्हे तर देशभरातील युवा खेळाडूंना अनेक दिग्गजांबरोबर खेळण्याची संधी मिळाली.

पर्सनल लोनवर कर सवलतीचा लाभ मिळू शकतो, त्यासाठी काय करावे ‘हे’ जाणून घ्या

Tax Rules On FD 

नवी दिल्ली । आर्थिक वर्ष 2022-23 साठी टॅक्स सेव्हिंग प्लॅन करण्याची वेळ आली आहे. पगारदार लोकं, विशेषत: खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्यांनीही कार्यालयांमध्ये टॅक्स सेव्हिंग प्लॅन सादर करण्यास सुरुवात केली आहे. आपण इन्कम टॅक्स वाचवण्यासाठी वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करतो. अनेक ठिकाणी गुंतवणूक करूनही कराचा बोजा कमी होत नसल्याचे अनेकदा दिसून आले आहे.

होम लोन घेतल्याने मोठ्या प्रमाणात टॅक्स वाचण्यास मदत होते. एज्युकेशन लोनसह देखील आपण टॅक्स वाचवू शकतो. पण होम लोन किंवा एज्युकेशन लोन नसेल तर टॅक्स वाचवायचा कसा, ही समस्या अनेकदा पाहायला मिळते. पर्सनल लोनच्या आधारेही टॅक्स सूट मिळू शकते, असे कर तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मात्र फक्त काही विशिष्ट परिस्थितींमध्येच पर्सनल लोनवर कर सवलतीचा लाभ मिळू शकतो.

पर्सनल लोनवरील टॅक्स वाचवण्याचे मार्ग
तसे, पर्सनल लोनवर सूट घेण्याची इन्कम टॅक्समध्ये तरतूद नाही. मात्र यासाठी इतर पद्धतींचा अवलंब करून पर्सनल लोनवरही टॅक्स मिळवता येतो. जर तुम्ही व्यवसायासाठी, घर बांधण्यासाठी किंवा खरेदीसाठी पर्सनल लोन घेतले असेल, तर तुम्ही त्यावर कर सवलतीचा लाभ घेऊ शकता.

मालमत्ता खरेदीवर सवलत
जर तुम्ही कोणत्याही मालमत्तेच्या खरेदीसाठी पर्सनल लोन घेतले असेल तर तुम्ही येथे कर सवलतीचा लाभ देखील घेऊ शकता. तुम्ही दागिने किंवा अनिवासी मालमत्ता खरेदी केली असेल किंवा शेअर बाजारात गुंतवणूक केली असेल, तर तुम्हाला टॅक्स सूट मिळू शकते. कर सवलत कर्जाच्या मूळ रकमेवर नव्हे तर व्याजावरच मिळेल.

व्यवसायासाठी पर्सनल लोन
जर तुम्ही व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी पर्सनल लोन घेतले असेल, तर तुम्ही खर्च म्हणून व्याज दाखवू शकता. तुम्ही खर्चावर टॅक्स सूट मागू शकता. हे तुमचे कर दायित्व कमी करेल. तुम्ही कोणत्याही रकमेवर व्याज खर्च दाखवून क्लेम करू शकता.

घर दुरुस्तीसाठी पर्सनल लोन
होम लोनवर दोन प्रकारचे कर सूट लाभ उपलब्ध आहेत. एकाला व्याजावर कर लाभ मिळू शकतो आणि दुसरा मुद्दलावर. जर तुम्ही घराच्या दुरुस्तीसाठी पर्सनल लोन घेतले असेल किंवा निवासी मालमत्ता खरेदी केली असेल, तर तुम्ही कर सवलतीचा लाभ घेऊ शकता. यावर तुम्ही आयकर कायद्याच्या कलम 24 अंतर्गत व्याजावरील सूटचा लाभ घेऊ शकता. तुम्ही घरी राहून 2 लाख रुपयांपर्यंतची कर सूट घेऊ शकता. जर घर भाड्याने दिले असेल तर किती कर सूट मिळू शकते याचा क्लेम केला जाऊ शकतो.

15 फेब्रुवारीला शिवसेनेची पत्रकार परिषद, सर्व आरोपांना प्रत्युत्तर देणार- संजय राऊत

Sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या हे सातत्याने कोविड सेंटरच्या घोटाळ्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप करत आहेत. त्याबाबत संजय राऊत यांना विचारलं असता 15 फेब्रुवारी ला शिवसेना पत्रकार परिषद घेणार असून याबाबत सर्व आरोपांना उत्तर देईल अस म्हंटल आहे.

संजय राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सोमय्यांनी केलेल्या आरोपांवर भाष्य केले. कोविड सेंटर मध्ये कोणताही घोटाळा झाला नाही. कोरोना काळात राज्य सरकारने चांगल काम केलं. मुख्यमंत्र्यांचे अनेकदा कौतूकही झालं. त्याउलट उत्तरप्रदेशात हजारो मृतदेह गंगेत गेले, त्यामुळे कोणाला जर भ्रष्टाचार उघड करायचा असेल तर त्यांनी त्या फायली घेऊन उत्तरप्रदेशात जावा…अस संजय राऊत यांनी सांगितले

काही लोकांना भुंकायची सवय असते, कोणाला किती भुंकायच ते भुंकू द्या. याबाबत 15 फेब्रुवारी ला 4 वाजता शिवसेना भवन येथे शिवसेना पक्ष म्हणून पत्रकार परिषद घेणार आहे आणि त्यानंतर महाविकास आघाडी एकत्र पत्रकार परिषद घेणार आहे. तोपर्यंत कोणाला किती फायली काढायच्या ते काढू द्या, आम्ही कोणाला घाबरत नाही असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

काय आहे सोमय्यांचा आरोप-
पुण्यातील कोव्हिड सेंटरंच कंत्राट मुंबईतील एका चहावाल्याला दिल्याचा नवा आरोप किरीट सोमय्या यांनी केला. संजय राऊत यांच्या निकटवर्तीयांवर कोविड सेंटर घोटाळ्याचा आरोप केला अस त्यांनी म्हंटल. पुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरचे कंत्राट चहा विकणाऱ्या राजीव साळुंखे यांच्या न्यू लाईफ कंपनीला देण्यात आले. फक्त १ लाख उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीला १०० कोटी रुपयांचे कंत्राट कसे काय दिले जाऊ शकते, असा सवाल किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला आहे.

गुजरात मध्ये सर्वात मोठा बँक घोटाळा; 22 हजार कोटींना गंडा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाच्या इतिहासातील आजवरचा सर्वात मोठा बँकिंग घोटाळा गुजरात मध्ये झाला आहे.. हा घोटाळा एका शिपयार्ड कंपनीचा असून या कंपनीने 28 बँकांना 22 हजार कोटींचा गंड घातल्याचं सांगितलं जात आहे. यासंदर्भात एबीजी शिपयार्डच्या विरोधात केंद्रीय अन्वेषण ब्यूरोने गुन्हा दाखल केला आहे

ABG शिपयार्ड ही कंपनी जहाजाची निर्मिती आणि दुरुस्ती करण्याचे काम करते. या कंपनीचे शिपयार्ड गुजरातमधील दहेज आणि सूरत येथे आहेत. ABG शिपयार्ड कंपनीच्या एकूण आठ जणांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार, हा घोटाळा एप्रिल 2012 ते जुलै 2017 यादरम्यान झाला आहे. सीबीआयद्वारे दाखल करण्यात आलेला हा सर्वात मोठा घोटाळा असल्याचे बोलले जातेय

एबीजी शिपयार्ड कंपनीने सर्व नियम तोडत अनेक बँकांमध्ये फसवणूक केली आहे. फक्त बँकच नाही तर एलआयसीलाही चूना लावला आहे. एएफआयआरनुसार, एबीजी शिपयार्डने एलआयसीची 136 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. तर एसबीआयला  2468 कोटी रुपयांचा चुना लावला आहे

एबीजी शिपयार्डवर सध्या एसबीआयचं 2 हजार 925कोटी, आयसीआयसीआय बँकेचं 7 हजार 089 कोटी, आयडीबीआयचं 4 हजार 634 कोटी, बँक ऑफ बडोदाचं 1 हजार 614 कोटी, पीएनबीचं 1हजार 244 कोटी आणि इंडियन ओव्हरसीज बँकेचं 1हजार 228 कोटी रुपयांचं कर्ज आहे.

कंपनीचे माजी अध्यक्ष-महासंचालक ऋषी कमलेश अग्रवाल यांच्यासह इतर अधिकाऱ्यांवर सीबीआयने फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. एएनआयनं दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दिवसभर या कंपन्यांच्या कार्यालयांवर सीबीआयकडून छापेमारी सुरू होती. हा आत्तापर्यंत उघड झालेल्या सर्वात मोठ्या घोटाळ्यापैकी एक मानला जात आहे.

औरंगाबाद-मुंबई प्रवास होणार दुहेरी रेल्वे मार्गावरुन

railway

औरंगाबाद – औरंगाबाद ते अंकाई (मनमाड) या 98 कि.मी. रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण फास्टट्रॅकवर आले असून अंतिम भूखंड सर्वेक्षणासाठी काल निविदा प्रक्रिया सुरू झाली. यासाठी लिडार तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे.

परभणी-मनमाड मार्गाचे दुहेरीकरण रेंगाळले. मात्र, किमान औरंगाबादहुन मुंबईचा रेल्वे प्रवास दुहेरी मार्गावरून होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात औरंगाबाद अंकाईच्या दुहेरी करण्यासाठी फायनल लोकेशन सर्वेक्षणाला मंजुरी दिली. अवघ्या काही दिवसातच सर्वेक्षणाच्या कामाला गती देण्यास सुरुवात झाली आहे.

दक्षिण मध्य रेल्वेने काल या सर्वेक्षणासाठी निविदा प्रसिद्ध केली 28 रोजी निविदा उघडण्यात येणार आहे.

10 मार्च नंतर सरकारला सत्ता सोडावी लागेल; चंद्रकांत पाटलांचे नवे भाकीत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून सातत्याने हे सरकार लवकरच पडेल अशा भविष्यवाण्या भाजप नेत्यांकडून करण्यात आल्या. त्यातच आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी 10 मार्च नंतर सरकारला सत्ता सोडावी लागेल अस विधान केले आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले, महाविकास आघाडी सरकारची सध्याची स्थिती पाहिली तर कोणीही विश्लेषण करणारा सांगू शकेल की, हे सरकार आता फार दिवस टिकणार नाही. आघाडीतील मतभेद उफाळले आहेत. दोन मंत्र्यांचा राजीनामा झाला. तसे बाकीच्यांचेही होतील आणि सरकार ला सत्ता सोडावी लागेल अस चंद्रकांत पाटील यांनी म्हंटल.

पोलीस अधिकाऱ्यांच्या बदली घोटाळा प्रकरणात मोठमोठी नावं समोर येत आहे. यामध्ये उच्च न्यायालयाने सीबीआय मार्फत चौकशी करण्याचे आदेशही दिले आहेत. बदली घोटाळ्यात सहभागी असलेल्यांना लवरकरच तुरुंगात जावं लागणार आहे. त्यामुळे लहान मुलगाही हे सरकार टिकणार नाही, असं सांगू शकेल. मी तर राजकारणात आहे. त्यामुळे वारंवार सांगतोय की, १० मार्चनंतर हे सरकार टिकणार नाही”, असा दावा पाटील यांनी केला आहे.

‘स्मार्ट सिटी’तील 37 हजार ग्राहक अंधारात

औरंगाबाद – चिकलठाणा येथील महापारेषणच्या 132 के.व्ही. उपकेंद्रात काल दुपारी 4 वाजेच्या सुमारास बिघाड झाला आणि महावितरणची माडा कॉलनी तसेच एन-4 ही 33 के.व्ही.ची दोन्ही उपकेंद्रे बंद पडली. परिणामी चिकलठाणा, मुकुंदवाडी, एन-4, गारखेडा, आकाशवाणी, पुंडलिक नगर इत्यादी भागातील तब्बल 37 हजार वीज ग्राहकांचा पुरवठा खंडित झाला. दुपारी बंद पडलेल्या पुरवठा सायंकाळपर्यंत सुरळीत झाला नव्हता. त्यामुळे मनस्ताप सहन करत नागरिकांना रात्री 9 वाजेपर्यंत अंधारात राहावे लागले.

चिकलठाण्यातील महापारेषणच्या 132 केव्ही उपकेंद्रातून महावितरणच्या म्हाडा कॉलनी 33 के.व्ही. उपकेंद्र आणि एन-4 येथील 33 के.व्ही. उपकेंद्राला वीज पुरवठा होतो. महापारेषणच्या या उपकेंद्रातील ब्रेकर मध्ये काल दुपारी 4 वाजेच्या सुमारास अचानक बिघाड झाला. त्यामुळे महावितरणच्या दोन्ही उपकेंद्रात तून शहरातील विविध भागांना होणारा वीजपुरवठा बंद पडला. महापारेषणच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी दुरुस्तीसाठी उपकेंद्रावर धाव घेतली. महावितरणचे कर्मचारीही तेथे पोहोचले. बिघाड शोधण्यात आणि दुरुस्तीत एक एक तास पुढे जात होता, तसा नागरिकांमध्ये संताप वाढत होता. महावितरणच्या कार्यालयात नागरिकांचे फोनवर फोन येत होते. मात्र, रात्री 8 वाजेपर्यंत बहुतांश भागातील वीज पुरवठा सुरळीत झालेला नव्हता.

दुरुस्ती सुरू असल्याची माहिती महापारेषणच्या अधिकाऱ्यांनी दिली. विजेअभावी अनेक व्यापाऱ्यांचा व्यवसाय बुडाला. महावितरणने पर्यायी यंत्रणेद्वारे रात्री नऊ वाजता वीज पुरवठा सुरळीत केला. यामुळे शहरातील एन-4, एन-3, एन-2, मुकुंदवाडी, संजय नगर म्हाडा कॉलनी, चिकलठाणा, रामनगर, गारखेडा, हनुमान नगर, न्याय नगर, हायकोर्ट परिसर, सेव्हन हिल, आकाशवाणी परिसरातील काही भागातील वीज गुल झाली होती.

यंदाच्या आयपीएल लिलावात अनेकांना लागली लॉटरी

IPL 2022

बँगलोर : वृत्तसंस्था – 2022 च्या आयपीएल रणसंग्रामासाठीची लिलाव प्रक्रिया आज पार आहे. 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी बंगळुरु येथे ही खेळाडूंची लिलाव प्रक्रिया होणार आहे. या लिलावात अनेक मोठे खेळाडू सामील आहेत. यामध्ये कोणत्या खेळाडूला किती बोली लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आयपीएलच्या या हंगामात यंदा लखनऊ आणि अहमदाबाद या दोन नव्या टीम दाखल झाल्या आहेत. यामुळं आयपीएलच्या आगामी म्हणजे पंधराव्या मोसमापासून दहा फ्रँचाईझी विजेतेपदाच्या शर्यतीत असणार आहेत.

कोणत्या खेळाडूवर किती लागली बोली ?
शिखर धवन : 8.25 कोटी ( पंजाब किंग्स)
आर. अश्विन : 5 कोटी (राजस्थान रॉयल्स)
पेट कमिन्स : 7.25 कोटी ( कोलकाता )
कागिसो रबाडा : 9.25 कोटी ( पंजाब किंग्स)
ट्रेन्ट बोल्ट : 8 कोटी ( राजस्थान रॉयल्स)
श्रेयस अय्यर : 12.25 कोटी ( कोलकाता)
मोहम्मद शामी : 6.25 कोटी (गुजरात टायटन्स)
फॅफ डू प्लेसिस : 7 कोटी (आरसीबी)
क्विंटन डी कॉक : 6.75 कोटी ( लखनऊ)
डेव्हिड वार्नर : 6.25 कोटी ( दिल्ली)
मनीष पांडे : 4.60 कोटी ( लखनऊ)
शिमरॉन हेटमायर : 8.5 कोटी ( राजस्थान रॉयल्स)
रॉबिन उथप्पा : 2 कोटी ( सीएसके)
देवदत्त पडीकल : 7.5 कोटी ( राजस्थान रॉयल्स)
ड्वेन ब्रावो : 4.4 कोटी ( सीएसके)
नितेश राणा : 8 कोटी ( कोलकाता)
जेसन होल्डर : 8.75 कोटी ( लखनऊ)
हर्षल पटेल : 10.75 कोटी (आरसीबी)
दिपक हुड्डा : 5.75 कोटी ( लखनऊ)
वानिंदू हसरंगा : 10.75 कोटी ( आरसीबी)
वॉशिंग्टन सुंदर : 8.75 कोटी ( सनराईज हैद्राबाद )
कृणाल पंड्या : 8.25 कोटी ( लखनऊ)
मिचेल मार्श : 6 कोटी ( दिल्ली)
अंबाती रायुडू : 6.75 कोटी ( सीएसके)
इशान किशन : 15.25 कोटी ( मुंबई इंडियन्स)
जॉनी बेअरस्टो : 6.75 कोटी ( पंजाब किंग्स)
दिनेश कार्तिक : 5.5 कोटी ( आरसीबी)
निकोलस पूरन : 10.75 कोटी ( सनराईज हैद्राबाद )
टी नटराजन : 4 कोटी ( सनराईज हैद्राबाद )
दीपक चहर : 14 कोटी ( सीएसके)
लॉकी फर्ग्युसन : 10 कोटी ( गुजरात टायटन्स)
प्रसिद्ध कृष्णा : 10 कोटी ( राजस्थान रॉयल्स)
जोश हेझलवुड : 7.75 कोटी ( आरसीबी)
मार्क वुड : 7.5 कोटी ( लखनऊ)
भुवनेश्वर कुमार : 4.2 कोटी ( सनराईज हैद्राबाद )
शार्दुल ठाकूर : 10.75 कोटी ( दिल्ली)
मुस्तफिजुर रहमान : 2 कोटी ( दिल्ली)
कुलदीप यादव : 2 कोटी ( दिल्ली)
राहुल चहर : 5.25 कोटी (पंजाब किंग्स)
युझवेंद्र चहल : 6.5 कोटी ( राजस्थान रॉयल्स)
जेसन रॉय : 2 कोटी (गुजरात टायटन्स)
प्रियम गर्ग : 20 लाख ( सनराईज हैद्राबाद )
अभिनव सदरांगणी : 2.6 कोटी (गुजरात टायटन्स)
“बेबी एबी”, डेवाल्ड ब्रेविस : 3 कोटी ( मुंबई इंडियन्स)
अश्विन हेब्बर : 20 लाख ( दिल्ली)
राहुल त्रिपाठी : 8.5 कोटी ( सनराईज हैद्राबाद )
रियान पराग : 3.8 कोटी ( राजस्थान रॉयल्स)
अभिषेक शर्मा : 6.5 कोटी ( सनराईज हैद्राबाद )
सरफराज खान : 20 लाख ( दिल्ली)
शाहरुख खान : 9 कोटी (पंजाब किंग्स)
शिवम मावी : 7.25 कोटी ( कोलकाता)
राहुल तेवतिया : 9 कोटी ( गुजरात टायटन्स)
कमलेश नगरकोटी : 1.1 कोटी ( दिल्ली)
हरप्रीत ब्रार : 3.8 कोटी (पंजाब किंग्स)
शाहबाज अहमद : 2.4 कोटी (आरसीबी)
केएस भरत : 2 कोटी ( दिल्ली)
अनुज रावत : 3.4 कोटी (आरसीबी)
प्रभसिमरन सिंग : 60 लाख (पंजाब किंग्स)
शेल्डन जॅक्सन : 60 लाख ( कोलकाता)
जितेश शर्मा : 20 लाख (पंजाब किंग्स)
बासिल थंपी : 30 लाख ( मुंबई इंडियन्स)
कार्तिक त्यागी : 4 कोटी ( सनराईज हैद्राबाद )
आकाश दीप : 20 लाख (आरसीबी)
केएम आसिफ : 20 लाख ( सीएसके)
आवेश खान : 10 कोटी ( लखनऊ)
इशान पोरेल : 25 लाख (पंजाब किंग्स)
तुषार देशपांडे : 20 लाख ( सीएसके)
अंकित राजपूत : 50 लाख ( लखनऊ)
नूर अहमद : 30 लाख ( गुजरात टायटन्स)
मुरुगन अश्विन : 1.6 कोटी ( मुंबई इंडियन्स)
केसी करिअप्पा : 30 लाख ( राजस्थान रॉयल्स)
श्रेयस गोपाळ : 75 लाख ( सनराईज हैद्राबाद )
जे सुचिथ : 20 लाख ( सनराईज हैद्राबाद )
साई किशोर : 3 कोटी ( गुजरात टायटन्स)

अनसोल्ड खेळाडू
डेविड मिलर
सुरेश रैना
स्टिव्ह स्मिथ
शकीब अल हसन
मोहम्मद नबी
मॅथ्यू वेड
वृद्धिमान साहा
सॅम बिलिंग्ज
उमेश यादव
आदिल रशीद
मुजीब झर्दन
अ‍ॅडम झाम्पा
अमित मिश्रा
इम्रान ताहिर
रजत पाटीदार
अनमोलप्रीत सिंग
सी. हरि निशांत
मोहम्मद अझरुद्दीन
विष्णू विनोद
विष्णू सोळंकी
एन जगदीसन
एम सिद्धार्थ
संदीप लामिछाने

विकृतीचा कळस ! आरोपीने वहिनीला शेतात फरफटत नेऊन केले ‘हे’ घृणास्पद कृत्य

भोकरदन : हॅलो महाराष्ट्र – जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील एका गावात दीर आणि वहिनी यांच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये आरोपी तरुणाने आपल्या वहिनीला शेतात फरफटत घेऊन जात तिच्यासोबत विकृतीचा कळस गाठत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले आहेत. पीडित महिलेने आरडाओरड करताच आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपी दिराला अटक केली आहे. हसनाबाद पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

हि घटना भोकरदन तालुक्यातील हसनाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावामध्ये घडली आहे. घटनेच्या दिवशी आरोपी नराधम दीर पीडित महिलेला ज्वारीच्या शेतात फरफटत घेऊन गेला होता. या ठिकाणी आरोपी नराधमाने पीडितेला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. या महिलेने त्या क्षणी आरडाओरडा केल्यामुळे पिडीत महिलेचा पती तातडीने घटनास्थळी दाखल झाला.

यावेळी आरोपी दिराने घटनास्थळावरून पळ काढला. दिरानेच आपल्या वहिनीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ माजली आहे. या प्रकरणी पीडित महिलेने हसनाबाद पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी आरोपीविरोधात बलात्कारासह जीवे मारण्याची धमकी अशा कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, आरोपी दीर बाबासाहेब गव्हांडे याला अटक केली आहे. हसनाबाद पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.