Monday, December 22, 2025
Home Blog Page 2796

सोन्याची चमक वाढतेय; गुंतवणुकीची आता योग्य वेळ आहे का?

Digital Gold

नवी दिल्ली । अमेरिकेसह जगभरातील वाढत्या महागाईमुळे सोन्याच्या दरातही सातत्याने वाढ होत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचा भाव 49 हजारांवर पोहोचला असून त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

केडिया एडव्हायझरीचे कमोडिटी एक्सपर्ट आणि डायरेक्टर अजय केडिया सांगतात की,”महागाईचा धोका जसजसा वाढेल तसतसा सोन्याच्या किंमतीवरही परिणाम होईल. 49 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहोचल्यानंतर, MCX वर स्पॉट प्राईस 50 हजारांपर्यंत जाण्याची अपेक्षा आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याचा भाव 1,852 डॉलर प्रति औंसवर पोहोचला असून, ही सध्याची सर्वोच्च पातळी आहे. लवकरच तो $1,865 चा नवीन उच्चांक गाठू शकतो.

कच्च्या तेलाच्या किंमतीआणि रशिया-युक्रेन तणावाचे पारडे जड होणार आहे
अजय केडिया यांच्या मते, कच्च्या तेलाच्या किंमतीप्रति बॅरल $90 च्या वर राहिल्या आहेत, त्यामुळे महागाई आणखी वाढण्याची शक्यता आहे. महागाईचा थेट परिणाम सोन्याच्या किंमतीवर होतो, जो नंतर वाढतो. दुसरीकडे, रशिया आणि युक्रेनसोबतच्या वाढत्या तणावामुळे क्रूडच्या पुरवठ्यावर परिणाम होत असून, त्यामुळे इंधन महाग होऊन भारतासह जगभरातील महागाईवर परिणाम होणार आहे.

किरीट सोमय्यांच्या आरोपांना अजित पवारांनी दिले ‘हे’ उत्तर; म्हणाले कि…

Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या हे गेल्या काही दिवसांपासून सातत महाविकास आघाडी सरकारमधील मंंत्री व नेत्यांवर आरोप करत आहेत. त्यांनि नुकताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर पुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमधील भ्रष्टाचारावरून आरोप केला. त्यांच्या आरोपांना पवारांनी उत्तर दिले आहे. “पुण्याच्या जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये कोणताही भ्रष्टाचार झाला नाही. तसेच या सेंटरच्या कामात कोणताही राजकीय सहभाग नव्हता असे पवार यांनी उत्तर दिले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुणे येथे कोरोना परिस्थितीबाबत यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, आज पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीवेळी येथील जम्बो कोविड सेंटरच्या उभारणीवेळी भ्रष्टाचार झाला आहे का अशी विचारणा केली. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी या सेंटरच्या उभारणीत कोणताही घोटाळा झाला नाही. पारदर्शक काम झाले आहे, असे सांगितले.

वास्तविक पाहता ज्यावेळी जम्बो हॉस्पिटलच्या कामात राज्य सरकार आणि जिल्हा वार्षिक योजना आणि पालिकेचा हिस्सा असतो. सीओपीच्या मैदानावर आणि दुसऱ्या एका ठिकाणी दोन कोव्हिड सेंटर उभे करण्यात आले, असेही यावेळी पवार यांनी सांगितले.

माजी मुख्यमंत्र्यांचा पराभव करणारा आमदार कसा बघण्यासाठी गोव्यात : डाॅ. अतुल भोसले

Dr. atul Bhosale

हॅलो महाराष्ट्र प्रतिनिधी | विशाल वामनराव पाटील

गोवा राज्याची जबाबदारी आमच्या नेत्यावर टाकल्यानंतर मी भेटायला गेलो होतो. तेव्हा साहेबांना म्हणालो की आम्हांला एखाद्या मतदार संघात काम करण्याची संधी मिळू दे. त्यावेळी साहेबांनी दया भाऊंच्या मतदार संघात जाण्याचे आदेश दिले. मलासुध्दा मनापासून आनंद या गोष्टीचा झाला, माजी मुख्यमंत्र्यांचा पराभव करून निवडूण आलेले आमदार कसे असतात हे बघता याव याच्यासाठी मी खास तुमच्या मतदार संघात गाठ घ्यायला आलो असल्याचे वक्तव्य भाजपा प्रदेश सरचिटणीस व कराड दक्षिणचे नेते डाॅ. अतुल भोसले यांनी केले.

मांद्रे (गोवा) विधानसभा मतदार संघातील भाजपचे उमेदवार दयानंद सोपटे यांच्या प्रचारार्थ सभेत ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चित्रा वाघ यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. अतुल भोसले पुढे म्हणाले, दयानंद भाऊ प्रत्येक माणसाला वाटते हा आपल्या कुटुंबातील माणूस आहे. माता- भगिनीला वाटते हा आपला भाऊच आहे. त्यांनी प्रत्येक गोष्ट नियोजन पूर्वक केलेली आहे.

https://twitter.com/Princy_Vishu/status/1492391526537707523

मांद्रे विधानसभा मतदार संघात लढत कोणा- कोणात

गोवा राज्यात विधानसभा 2022 निवडणुकासाठी रणसंग्राम जोरात सुरू आहे. या राज्यातील मांद्रे विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार दयानंद सोपटे आणि भाजपचे माजी मुख्यमंत्री व अपक्ष उमेदवार लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्यात लढत होत आहे. 2017 साली लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा दयानंद सोपटे यांनी निवडणूकीत पराभव केला होता. तसेच सध्या चालू असलेल्या निवडणूकीत पार्सेकर यांना डावलेल्याने त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. तर पूर्वीचे काॅंग्रेसचे असलेलेल व 2017 साली भाजपमध्ये प्रवेश केलेले दयानंद सोपटे यांना उमेदवारी दिलेली आहे.

कराड दक्षिणेत व मांद्रेत काय साम्य

कराड दक्षिण मतदार संघात विद्यमान आ. पृथ्वीराज चव्हाण हे काॅंग्रेसचे माजी मुख्यमंत्री आहेत. तर डाॅ. अतुल भोसले यापूर्वी राष्ट्रवादी पक्षातून कराड उत्तर मतदार संघातून सातारा जिल्ह्याचे सध्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढविली होती. तर गेल्या दोन टर्म माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात लढत दिली आहे. अशा परिस्थितीत माजी मुख्यमंत्र्यांचा पराभव करणारा आमदार कसा बघण्यासाठी गोव्यात गेल्याचे वक्तव्याने कराडच्या राजकीय नेत्याच्या व कार्यकर्त्याच्या मनात उखळ्या उडाल्या नाही तर नवलच.

फोर्डचे भारतात पुनरागमन; आता बनवणार स्वस्त इलेक्ट्रिक कार

नवी दिल्ली । भारतात फोर्ड कारची आवड असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अमेरिकन वाहन निर्माता कंपनी फोर्डने भारतात परतण्याचे संकेत दिले आहेत. असे मानले जात आहे की, कंपनी आता इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये आपली ताकद दाखवेल. कंपनी या इलेक्ट्रिक कारची निर्यातही करणार आहे. फोर्ड इंडियाने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये भारतातून बाहेर पडण्याची घोषणा केली होती.

25,938 कोटी रुपयांच्या PLI योजनेंतर्गत निवडलेल्या 20 ऑटोमोबाईल कंपन्यांपैकी फोर्ड ही एक आहे. ही इलेक्ट्रिक उत्पादनांच्या निर्मिती आणि विक्रीसाठी उत्पादनाशी जोडलेली गहन योजना आहे.

इलेक्ट्रिक कार बनवणार कंपनी
या योजनेंतर्गत देण्यात आलेला कंपनीचा अर्ज सरकारने स्वीकारला असून त्यांना शॉर्टलिस्ट केले आहे. असे मानले जाते की, फोर्ड गुजरातमधील साणंद प्लांटमध्ये इलेक्ट्रिक कार तयार करेल. फोर्डचे भारतात दोन कार प्लांट आहेत. या कार निर्मात्याने यापूर्वी EV आणि बॅटरीमध्ये $30 अब्ज गुंतवण्याची आपली योजना उघड केली होती.

कंपनी अधिक किफायतशीर कार बनवेल
भारत सोडण्यापूर्वी फोर्डचे साणंद आणि मराईमलाई येथील दोन प्लांटमध्ये उत्पादन होते. कार निर्मात्याने म्हटले आहे की, ते इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीसाठी भारतातील प्लांट वापरू शकतात. याचा अर्थ असा होऊ शकतो की, फोर्ड जास्त परवडणाऱ्या EV उत्पादनात इतर अनेक जागतिक कंपन्यांना मागे टाकू शकते.

फोर्डच्या मान्यतेने टेस्लाला बसला धक्का
फोर्ड मोटारला भारतात इलेक्ट्रिक कार बनवण्यासाठी सरकारने दिलेली मान्यता टेस्लासाठी मोठा धक्का मानली जात आहे. जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी गेल्या अनेक महिन्यांपासून भारतात येण्याचा प्रयत्न करत आहे. त्यावर ते अजूनही काम करत आहे. मात्र, टेस्लाने अद्याप भारतात आपली प्रोडक्शन प्लान शेयर केलेला नाही.

कंपनीच्या अनेक गाड्या लोकप्रिय होत्या
जेव्हा फोर्ड भारतातून बाहेर पडला तेव्हा त्यांनी असे म्हटले होते की, ते आपल्या गाड्या कंप्लीटली बिल्ट युनिट (CBU) द्वारे आणणे सुरू ठेवतील. ज्यामध्ये त्याचे Mustang सारखे मॉडेल देखील समाविष्ट केले जाईल. जेव्हा फोर्डने भारत सोडला तेव्हा कार निर्माता भारतात एंडेव्हर, इकोस्पोर्ट, फिगो, फिगो अस्पायर आणि फ्रीस्टाइल सारखी मॉडेल्स विकत होता.

डिसेंबरमध्ये औद्योगिक उत्पादनात झाली 0.4 टक्के वाढ, IIP वाढ 10 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर

नवी दिल्ली । डिसेंबर 2021 मध्ये देशातील औद्योगिक उत्पादनात 0.4 टक्के वाढ झाली आहे. मात्र, इंडस्ट्रियल प्रोडक्शन इंडेक्स (IIP) वाढीचा दर 10 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर राहिला. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (NSO) शुक्रवारी आपली अधिकृत आकडेवारी जाहीर केली. आकडेवारीनुसार, यापूर्वी नोव्हेंबर 2021 मध्ये IIP वाढीचा दर 1.3 टक्के होता.

वीज निर्मितीत 2.8 टक्के वाढ
NSO ने जारी केलेल्या IIP आकडेवारीनुसार, डिसेंबर 2021 मध्ये मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचे प्रोडक्शन 0.1 टक्क्यांनी घसरले. दुसरीकडे, मायनिंग सेक्टरचे प्रोडक्शन 2.6 टक्क्यांनी वाढले तर वीज उत्पादनात 2.8 टक्के वाढ नोंदवली गेली.

एक वर्षापूर्वी डिसेंबर 2020 मध्ये IIP चा विकास दर 2.2 टक्के होता. NSO च्या मते, IIP एप्रिल-डिसेंबर 2021 या कालावधीत 15.2 टक्क्यांनी वाढला आहे, जो एका वर्षापूर्वी याच कालावधीत 13.3 टक्क्यांनी वाढला होता.

कोविड-19 महामारीचा औद्योगिक उत्पादनावर परिणाम
कोविड-19 महामारी आणि त्याच्या प्रतिबंधासाठी लादलेल्या निर्बंधांमुळे औद्योगिक उत्पादनावर विपरित परिणाम झाला. मार्च 2020 मध्ये औद्योगिक उत्पादन 18.7 टक्क्यांनी घसरले आणि एप्रिल 2020 मध्ये ते 57.3 टक्क्यांवर आले.

DECEMBER 2021        NOVEMBER 2021        DECEMBER 2020
IIP growth                 0.4%                           1.3%                                   2.2%

Mining                       2.6%                           4.9%                                   -3.0%
Manufacturing        -0.1%                           0.8%                                    2.7%
Electricity                  2.8%                           2.1%                                    5.1%

संजय राऊत – केशव उपाध्ये यांची गुप्त भेट; चर्चाना उधाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात शिवसेना आणि भाजपमधील वैर दिवसेंदिवस वाढतच असतानाच शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी गुप्त भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. गोव्यात आपल्याला पक्षाचा प्रचार करायला आलेल्या दोन्ही नेत्यांनी गुप्त भेट घेताच चर्चाना उधाण आले आहे.

पणजीमधील मँरिएट हाँटेलमध्ये केशव उपाध्ये आणि संजय राऊत यांच्यात गुप्त भेट झाली आहे. शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांमध्ये झालेल्या या गुप्त भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, भेटीत नेमकी काय चर्चा झाली याबाबत मात्र सविस्तर समजू शकले नाही.

दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सध्या ईडी च्या रडारावर आहेत. त्यावरून राऊत हे आक्रमक झाले असून त्यांनी केंद्रीय तपास यंत्रणा आणि भाजपवर सूडाच्या राजकारणाचे गंभीर आरोप केले आहेत. तसेच ईडी कार्यालयासमोर हजारोंच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेऊन अनेक गोष्टी उघड करणार आहे असेही त्यांनी म्हंटल आहे.

“देशमुखांच्या शेजारची जागा सॅनिटाईज करा कारण पुढचा नंबर राऊत अन् परब यांचा”; किरीट सोमय्यांचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचा काल पुण्यात भाजप कार्यकर्त्यांच्यावतीने महापालिकेच्या पायऱ्यांवर सत्कार करण्यात आला. यानंतर सोमय्या यांनी शिवसेना खासदार संजय राऊत आणि परिवहनमंत्री अनिल परब याच्यावर हल्लाबोल केला आहे. “सध्या जेलमध्ये असलेले अनिल देशमुख यांच्या जेलची बाजूची जागा सॅनिटाईज करून ठेवा, कारण आता पुढचा नंबर हा संजय राऊत आणि अनिल परब यांचा असणार आहे,” असा इशारा सोमय्या यांनी दिला आहे.

किरीट सोमय्या यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, संजय राऊत यांच्या संबंधात सध्या जेलमध्ये बंद असलेला त्यांचा मित्र प्रवीण राऊत काय काय बोलले. आणि बाकीच्या काही लोकांची काही माहिती दिली आहे. अनिल देशमुख यांच्या संबंधात असा प्रकार घडला होता.

आज मी निश्चितपणे सांगतो कि अनिल देशमुख यांच्या जेलमधील डावीकडची आणि उजवीकडची बाजू हि सॅनिटाईज करून ठेवायांची व्यवस्था उद्धव ठाकरे यांनी लवकर करावी, कारण अनिल परब आणि संजय राऊत यांना जेलमध्ये जावे लागणार आहे, असल्याचा दावाही यावेळी सोमय्या यांनी केला आहे.

देशाच्या तिजोरीत झाली 2.198 अब्ज डॉलर्सची वाढ, सोन्याचा साठा किती आहे जाणून घ्या

नवी दिल्ली । 4 फेब्रुवारी 2022 रोजी संपलेल्या आठवड्यात देशाचा परकीय चलन साठा $2.198 अब्जने वाढून $631.953 अब्ज झाला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) शुक्रवारी जारी केलेल्या आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे. यापूर्वी, 28 जानेवारी रोजी संपलेल्या शेवटच्या आठवड्यात परकीय चलन साठा $4.531 अब्ज डॉलरने घसरून $629.755 अब्ज झाला होता. RBI च्या आकडेवारीनुसार, 21 जानेवारी रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलन साठा $67.8 कोटीने घसरून $634.287 अब्ज झाला आहे.

FCA $2.251 अब्ज वाढवले
RBI च्या साप्ताहिक आकडेवारीनुसार, 4 फेब्रुवारी रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलन साठ्यात वाढ होण्याचे कारण म्हणजे परकीय चलन मालमत्ता (FCA) आणि सोन्याच्या साठ्यात झालेली वाढ, जे एकूण चलन साठ्याचा महत्त्वपूर्ण भाग मानले जाते. RBI डेटानुसार, FCAs या आठवड्यात $2.251 अब्जने वाढून $568.329 अब्ज झाले. डॉलरमध्ये नामांकित, FCA मध्ये परकीय चलनाच्या साठ्यामध्ये असलेल्या युरो, पौंड आणि येन सारख्या इतर विदेशी चलनांच्या मूल्यामध्ये वाढ किंवा घट होण्याचा परिणाम देखील समाविष्ट असतो.

सोन्याच्या साठ्यात घट
याशिवाय, रिपोर्टींग वीकमध्ये सोन्याच्या साठ्याचे मूल्य $21 लाख डॉलरने कमी होऊन $39.283 अब्ज झाले. रिपोर्टिंग वीकमध्ये , आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच MIF मध्ये देशाचा SDR (Special Drawing Rights) 9.8 कोटी डॉलरने वाढून $ 19.108 अब्ज झाला आहे. IMF मधील देशाचा चलन साठा $ 5.9 कोटीने वाढून $ 5.233 अब्ज झाला आहे.

भाजपाच्या 12 आमदारांचं निलंबन अखेर मागे; राज्य सरकारचा निर्णय

VIDHANBHAVAN

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विधानभवनात गदारोळ घातल्याप्रकरणी निलंबित केलेल्या भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन अखेर मागे घेण्याचे मोठी घोषणा राज्यातील ठाकरे सरकारने केली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची राजभवन येथे भेट घेतल्यानंतर विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी ही घोषणा केली. यामुळे भाजपच्या आमदारांना दिलासा मिळाला आहे.

याप्रकरणी गेल्या आठवड्यात २८ जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला होता. यामध्ये १२ आमदारांवर करण्यात आलेली निलंबनाची कारवाई रद्द करण्यात आली होती. आमदारांविरोधात ६० दिवसांपेक्षा जास्त काळ निलंबनाची कारवाई करण्याचा विधानसभेला अधिकार नाही. मात्र, भाजपच्या १२ आमदारांना वर्षभरासाठी निलंबित करण्यात आले. वर्षभर निलंबित करणे ही लोकप्रतिनिधीच्या हकालपट्टीपेक्षाही गंभीर शिक्षा म्हणावी लागेल, असे ताशेरे न्यायालयाने गेल्या वेळी झालेल्या सुनावणीत ओढले होते.

विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, उपसभापती नीलम गोऱ्हे आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली. सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय विधिमंडळाच्या अधिकारात हस्तक्षेप करणारा आहे अशा शब्दात राष्ट्रपतींकडे नाराजी व्यक्त करण्यात आली. राष्ट्रपती कोविंद यांनी हा निर्णय तपासून योग्य तो निर्णय घ्यावा, अशी विनंती आम्ही राष्ट्रपतींना केली असल्याचे निंबाळकर म्हणाले. त्याचवेळी आम्ही १२ आमदारांचे निलंबन मागे घेत असल्याचे निंबाळकर यांनी जाहीर केले.

स्मार्ट सिटीचा उपक्रम; शहरातील 9 स्मशानभूमी करणार नयनरम्य

औरंगाबाद – महापालिकेने मागील काही वर्षांमध्ये स्मशानभूमीकडे कधीच गांभीर्याने लक्ष दिले नाही. त्यामुळे स्मशानभूमीमध्ये सर्वसामान्यांना दहा मिनिटे थांबू वाटत नाही. अनेक नागरिक तर स्मशानभूमीच्या प्रवेशद्वारावर उभे राहतात. स्मार्ट सिटी अंतर्गत शहरातील नऊ स्मशानभूमी विकसित करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. संचालक मंडळाचा होकार आल्यानंतर अंदाजपत्रक तयार करून निविदा काढण्याचे काम सुरू होणार आहे.

शहर चारही दिशेने वाढत आहे. लोकसंख्याही वाढू लागली. त्यातुलनेत स्मशानभूमी कबरस्तान ची संख्या वाढविण्यात आली नाही. अनेक वसाहतींना या सुविधा नसल्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. शहरात 41 स्मशानभूमी तर लहान-मोठे 42 कबरस्थान आहेत. प्रत्येक झोनमधील एक मोठी स्मशानभूमी स्मार्ट करण्याची संकल्पना स्मार्ट सिटीने मांडली यासंदर्भातील प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

फेब्रुवारी अखेरपर्यंत संचालक मंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीत स्मशानभूमी विकसित करण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात येईल, अशी माहिती सीईओ अस्तिककुमार पांडेय यांनी दिली. पहिल्या टप्प्यात 5 स्मशानभूमी विकसित करण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात 4 स्मशानभूमीचे काम हाती घेतले जाईल.