Monday, December 22, 2025
Home Blog Page 2797

भोसले गटाची सत्ता : वाठार सोसायटीत सत्तांतर तर बेलवडे बुद्रुक विजयी परंपरा कायम

कराड | कराड दक्षिणमधील वाठार व बेलवडे बुद्रुक येथील विकास सेवा सोसायटीच्या निवडणुकीत डाॅ. अतुल भोसले गटाने बाजी मारली आहे. पंचक्रोशीतील नागरिकांचे लक्ष लागून राहिलेल्या वाठार विकास सेवा सोसायटीत राजेश पाटील – वाठारकर समर्थक गटाचा डॉ. अतुल बाबा भोसले गटाने 10-3 असा धुव्वा उडवत सत्तांतर घडवून आणले. तर बेलवडे बुद्रुकमध्ये भोसले गटाने विजयी परंपरा कायम राखत 10/3 असा विजय मिळवला आहे.

कराड दक्षिणमध्ये वाठार व बेलवडे बुद्रुकमधील विकास सेवा सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक शुक्रवारी दि. 11 रोजी पार पडली. या निवडणुकीत वाठार विकास सेवा सोसायटीमध्ये डॉ. अतुल भोसले समर्थक म्हसोबा परिवर्तन पॅनेलने 10 जागांवर विजय मिळवत सत्ताधारी राजेश पाटील-वाठारकर समर्थक श्री म्हसोबा शेतकरी विकास पॅनेलचा धुव्वा उडवला असून सत्तांतर घडविले. बेलवडे बुद्रुकमध्ये डॉ. अतुल भोसले समर्थक शेतकरी सभासद सेवा सहकार पॅनेलने रयत विकास पॅनेलचा 10/3 असा पराभव करून आपली सत्ता कायम ठेवली आहे.

वाठारमध्ये 13 जागांसाठी ही निवडणूक लागली होती. सर्व तेरा जागांसाठी मतदान होऊन म्हसोबा परिवर्तन पॅनेलने दहा जागांवर विजय मिळवला. सत्ताधारी गटास फक्त 3 जागांवर समाधान मानावे लागेल. बेलवडे बुद्रुकमध्ये 13 जागांसाठी ही निवड लागली. त्यात सत्ताधाऱ्यांच्या 2 जागा बिनविरोध होऊन 11 जागांसाठी मतदान पार पडले. 11 जागांपैकी आठ जागांवर विजय मिळवत सत्ताधारी पॅनेलने विरोधकांचा 10/3 असा पराभव केला. बेलवडे बुद्रुक विकास सेवा सोसायटीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एफ. एस. गावित यांनी तर वाठार सोसायटीसाठी पी. एम. तायडे यांनी काम पाहिले.

“एसटीच्या नव्या भरतीतून टक्केवारी वसूल करण्याचा या सरकारचा प्लॅन”; पडळकरांचा गंभीर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या तीन महिन्यांपासून राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा विलीनीकरणाच्या मागणीसाठी संप सुरु आहे. अशात कर्मचाऱ्यांना बडतर्फही केले जात आहे. यावरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडी सरकावर निशाणा साधला. “एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटवण्यापेक्षा चिघळवण्याचाच सरकारकडून कट रचला जात असल्याचा आरोप पडळकरांनी केला. तसेच यातून जुन्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढायचे आणि नव्या भरतीतून टक्केवारी वसूल करण्याचा प्लॅन या सरकारचा दिसत असल्याची टीकाही त्यांनी केली.

गोपीचंद पडळकर यांनी ट्विट करीत एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरून महाविकास आघाडी सरकावर निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले की, एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटवण्यापेक्षा कशा प्रकारे चिघळेल, यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. राज्यभर गेल्या अनेक दिवसापासून संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावर रूजू व्हा, असे म्हणायचे. आणि ते जेव्हा हजर होण्यासाठी गेले असता त्यांच्या हातात बडतर्फ करण्यात आल्याच्या नोटीसा द्यायच्या, असा पद्धतशीरपणे कट या सरकारकडून रचला जात आहे.

यावेळी पडळकरांनी महाविकास आघाडी सरकावर गंभीर आरोप केला. ते म्हणाले की, जुन्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढायचे आणि नव्या भरतीतून टक्केवारी वसूल करण्याचा प्लॅन या सरकारकडून केला जात असल्याचे दिसत आहे, असे पडळकर यांनी म्हंटले.

विराट कोहलीच्या खराब फॉर्म बद्दल रोहित स्पष्टच बोलला; म्हणाला की ….

virat rohit

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीचा फॉर्म हरवला आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत कोहलीची बॅट शांत राहिली. मालिकेतील तीन सामन्यांत त्याने केवळ 26 धावा केल्या. विराटने पहिल्या सामन्यात 8 तर दुसऱ्या सामन्यात केवळ 18 धावा केल्या. तिसऱ्या सामन्यात तर तो खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. याच्यावरून कर्णधार रोहित शर्माला कोहलीच्या खराब फॉर्म बाबत विचारले असता त्याने स्पष्टच उत्तर दिले

विराटच्या फॉर्मबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना रोहित म्हणाला, ‘विराटला आत्मविश्वासाची गरज आहे का? तूम्ही काय बोलत आहात ? विराटच्या फॉर्मची आम्हाला चिंता नाही. शतक न होणे ही वेगळी बाब आहे. त्याने अलीकडेच दक्षिण आफ्रिकेत तीन सामन्यांत दोन अर्धशतके झळकावली. त्यामुळे त्याची काही चूक आहे असे मला वाटत नाही. संघ व्यवस्थापनाला त्याच्या फॉर्मची चिंता नाही. खेळाडू आणि वैयक्तिकरित्या आम्हाला माहित आहे की आम्हाला कशावर लक्ष केंद्रित करायचे आहे.

दरम्यान, विराट कोहलीचा फॉर्म हा गेल्या काही दिवसांपासून हरवला आहे. वेस्ट इंडिज विरुद्ध घरच्या सामन्यात देखील त्याच्या बॅट मधून धावा निघाल्या नाहीत. भारताने ही मालिका जिंकली असली तरी विराटचा हरवलेला फॉर्म हा संघासाठी चिंतेचा विषय आहे. तर दुसरीकडे कर्णधार रोहित शर्माने प्रथमच संघाचे फुल टाइम नेतृत्त्व करत वेस्ट इंडिजला व्हाईटवॉश दिला.

होस्टेलमधील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास 10 वर्षे सक्तमजुरी

rape

कराड | तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी रणजित अशोक उर्फ बाळासो देशमुख (रा.सिद्धेश्वर कुरोली, ता. खटाव) याला दोषी धरून कराडच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती होरे यांनी त्याला 10 वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने सक्त मजुरीची शिक्षा सुनावली.

याबाबत अधिक माहिती अशी, कराड तालुक्यातील एक अल्पवयीन मुलगी होस्टेलमध्ये असताना आरोपी रणजित अशोक उर्फ बाळासो देशमुख हा तिला भेटण्यास गेला व तिला कास पठार येथे फिरविले. तेथे फिरून झाल्यानंतर आरोपीने तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पिडीत मुलीने लग्नानंतर जवळीक ठेवू असे सांगून त्यास नकार दिला. त्यानंतरही आरोपीने तिला लग्नाचे खोटे आमिष दाखवून तिच्यावर जबरदस्ती केली. याबाबत पिडीत मुलीने दि. 11 जुलै 2019 रोजी याबाबतची तक्रार कराड पोलिसात दाखल केली होती. त्यानुसार संशयित आरोपी रणजित अशोक उर्फ बाळासो देशमुख याच्यावर लैंगिक अत्याचार (पोक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुरूवातीला या गुन्हयाचा तपास तत्कालीन फौजदार चेतन मछले यांनी केला होता.

सदरचा खटला कराड येथील विशेष न्यायाधीश व जिल्हा व सत्र न्यायाधीश सौ. के. एस. होरे यांच्या न्यायालयात सुरू होता. सदर खटल्यात सरकार फिर्यादी पक्षातर्फे एकूण आठ साक्षीदार तपासले. विशेष व सहाय्यक जिल्हा सरकारी वकील राजेंद्र सी. शहा यांनी केलेला युक्तिवाद व पिडीत मुलीचे आई, वडील यांचे साक्षी पुरावे व वैद्यकीय अहवाल, डॉक्टर यांनी दिलेली साक्ष ग्राह्य धरून न्यायाधीशांनी आरोपी रणजित देशमुख याला दोषी धरून वेगवेगळ्या कलमान्वये पोक्सो कायद्यांतर्गत दहा वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंड, दंड न भरलेस तीन महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. याप्रकरणी सरकारी वकील म्हणून आर. सी. शहा यांनी काम पाहिले. तपासी अधिकारी म्हणून अमृता रजपूत यांनी काम पाहिले.

इलेक्ट्रिक वाहनांसाठी शहरात उभारणार 200 चार्जिंग स्टेशन

औरंगाबाद – कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी व्हावे यासाठी केंद्र शासनाने इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढविण्याचे धोरण आखले आहे. इलेक्ट्रिक वाहन खरेदी करणार्‍यांना अनुदानसुद्धा दिले जात आहे. महापालिकेने इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी शहरात तब्बल 200 चार्जिंग स्टेशन उभारण्याचा निर्णय घेतला आहे. 15 व्या वित्त आयोगातून हे चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार असल्याची माहिती प्रशासक अस्तिककुमार पांडेय यांनी दिली.

वातावरणीय बदलाचा परिणाम मोठ्या प्रमाणावर जाणार असल्यामुळे केंद्र व राज्य सरकारने उपाययोजना राबविण्यासंदर्भात सूचना केल्या आहेत. हवेतील कार्बन डाय ऑक्साईडचे प्रमाण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहने सरकारी व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यालयांनी खरेदी करण्याची सूचना केली आहे. 15 व्या वित्त आयोगातून मिळालेल्या निधीतून 85 टक्के निधी ई-वाहने, ई-चार्जिंग सेंटर यावर खर्च केला जाणार आहे.

मनपा प्रशासक पांडेय म्हणाले की, महापालिकेने स्मार्ट सिटी च्या सहकार्याने वातावरणीय बदलाचा परिणाम कमी करण्याच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. स्मार्ट सिटी कार्यालयाने पाच ई-वाहने खरेदी केली असून, पदाधिकाऱ्यांना साठी ई-वाहने खरेदी केली जातील त्या सोबतच ई-वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी शहरात दोन ठिकाणी चार्जिंग सेंटर उभारले जातील. महापालिकेच्या कार्यालयापासून त्याची सुरुवात केली जाईल सर्व सरकारी कार्यालयात ई-चार्जिंग सेंटर राहणार असून, पेट्रोल पंप, मॉल, बस स्थानक, रेल्वे स्टेशन, व्यापारी संकुल या ठिकाणीही ई-चार्जिंग सेंटर केले जाणार असल्याचे पांडे यांनी सांगितले. सध्या स्मार्ट सिटीच्या कार्यालयात चार्जिंग स्टेशन उभारले आहेत. त्याचप्रमाणे मध्यवर्ती जकात नाका येथील पेट्रोल पंपावरही चार्जिंग ची सोय आहे. चार्जिंगचे दर काय असतील हे धोरण नंतर निश्चित केले जाणार आहे.

नवाब मलिकांना झटका; समीर वानखेडेंच्या जातीबाबत आयोगाने दिला “हा” निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एनीसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्याकडून अनेक गंभीर आरोप करण्यात आले होते. त्यामध्ये मलिक यांनी वानखेडे यांच्यावर त्यांच्या जातीवरून निशाणा साधला होता. दरम्यान, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने समीर वानखेडे यांच्या जातीबाबत मोठा दिलासा दिला देणारा निर्णय दिला आहे. वानखेडे यांची जात योग्य आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात स्थापन करण्यात आलेली एसआयटी रद्द करण्यात यावी, असे आदेश आयोगाच्यावतीने देण्यात आले आहेत. आयोगाचा निर्णय नवाब मलिकांसाठी झटका मानला जात आहे.

आयोगाच्यावतीने समीर वानखेडे याच्या जातीबाबत महत्वपूर्ण निर्णय देण्यात आला आहे. तो म्हणजे आयोगाकडे उपलब्ध कागदपत्रांनुसार वानखेडे यांची जात अनुसूचित जातीच्या वर्गात मोडते आहे, असा निर्णय अनुसूचित जाती राष्ट्रीय आयोगाकडून देण्यात आला. त्याचबरोबर आयोगाने वानखेडेंना जाणीवपूर्वक त्रास देणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश आयोगाच्यावतीने देण्यात आलेले आहेत.

आयोगाच्यावतीने वानखेडे यांच्याबाबत देण्यात आलेल्या निर्णयामुळे मलिक यांच्या अडचणी वाढणार आहेत. त्याचबरोबर आयोगाच्यावतीने महाराष्ट्रात जात पडताळणी समितीनेही एक महिन्यात अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

“तुम्ही राजीव यांचे पुत्र असल्याचा आम्ही पुरावा मागितला का?”; आसामच्या मुख्यमंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दरम्यान उत्तराखंडमध्ये प्रचारादरम्यान आसामच्या मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. यावेळी मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी “तुम्ही राजीव गांधींचे पुत्र आहात की नाही? याचा पुरावा आम्ही कधी तुमच्याकडे मागितला आहे का? असा सवाल करीत वादग्रस्त विधान केले आहे.

उत्तराखंडमध्ये १४ फेब्रुवारीला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपा उमेदवाराच्या प्रचारासाठी भाजपचे दिग्गज नेते उपस्थिती लावत आहेत. आसामचे यावेळी मुख्यमंत्री शर्मा म्हणाले की, राहुल गांधी यांच्याकडून पुरावे मागितले जात आहेत. त्यांना आमचा सवाल आहे की, आमच्या सैनिकांनी संपावर गेल्याचे सांगितले असेल, तर पुरावे मागण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला. आपल्या देशाच्या लष्कराने पाकिस्तानात बॉम्ब फोडला असे म्हटले तर ते फोडलेच आहेत,”

यावेळी शर्मा यांनी राहुल गांधी यांना सवालही विचारला आहे. “लष्करात सेवा बजावलेल्या उत्तराखंडच्या सुपुत्रावर तुमचा विश्वास नाही का?, तुमचा बिपिन रावत यांच्यावर विश्वास नाही का? तुम्हाला पुरावा का हवा आहे? सैनिकांचा अपमान करणे बंद करा, असेहि शर्मा यांनी यावेळी म्हंटले.

एक दुजे के लिये…! दीर-भावजयीची भर रस्त्यात मिठी मारुन आत्महत्या

Suicide

औरंगाबाद – जालना औरंगाबाद महामार्गावरील करमाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इमारतीसमोर चक्कर येऊन कोसळलेल्या युगुलाने एकमेकांना मिठीत घेत जीव सोडला. वर्दळीच्या जालना रोडवर काल सायंकाळी घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली. दोघे मृत युगुल नात्याने दिर भावजय असल्याचे समोर आले आहे. दोघेही मृत हे बदनापूर तालुक्यातील असून, काकासाहेब बबन कदम (32) व सत्‍यभामा अशोक कदम (27) अशी मृतांची नावे आहेत.

करमाडच्या कृषी उत्पन्न बाजार समिती समोर काल सायंकाळी जालना रोडने झोकांड्या खात एक पुरुष व महिला येत असताना लोकांनी पाहिले. काही क्षणात त्या दोघांनी एकमेकांना मिठी मारली व ते रस्त्यावर कोसळले. त्यांना वांत्या ही होत होत्या. त्यांनी ही माहिती त्वरित पोलिसांना कळवली तोपर्यंत ते जोडपे रस्त्यावर हात-पाय खोडत तडफडत होते. त्यांचा मोबाईलही बाजूलाच पडलेला होता. पोलिसांनी मोबाईल वरून शोध घेत त्यांच्या नातेवाईकांना माहिती दिली. 108 रुग्णवाहिकेतून दोघांना चिकलठाणा येथील मिनी घाटीत पाठवण्यात आले, तेथे डॉक्टरांनी तपासून दोघांनाही मृत घोषित केले.

पोलिसांनी सांगितले की, जालना जिल्ह्यातील ही महिला तिच्या बहिणीसह बेपत्ता असल्याची तक्रार करणार पोलीस ठाण्यात आठ दिवसांपूर्वी दाखल करण्यात आली होती. सत्यभामा कदम या गोलटगाव येथील बहिणीकडे मुलाच्या वाढदिवसासाठी आल्या होत्या. तेव्हा पासून दोघी बहिणी बेपत्ता झाल्या होत्या. तिचा शोध लावण्यात करमाड पोलिसांना दोन दिवसांपूर्वी यश आले. तेव्हापासून करमाड पोलीस सत्यभामा यांचा शोध घेत होते. सत्यभामा कदम यांचे चुलत दीर काकासाहेब याच्या सोबत प्रेम संबंध असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली. बघ्यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार विषारी द्रव्य प्राशन केल्यानंतर त्यांनी एकमेकांना मिठी मारली व त्याच अवस्थेत ते पडून होते. उलट्या झाल्यानंतर त्यांना झटके येत होते उलट्या झाल्या नंतर ते विषारी दर्प पसरला होता. करमाड पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक विजयसिंग जारवाल यांनी करमाड येथील ग्रामीण रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेला संपर्क केला. त्यानंतर रुग्णवाहिका घटनास्थळी आल्यानंतर दोघांना चिकलठाणा येथील मिनी घाटीत उपचारांसाठी दाखल केले.

सततच्या छेडछाडीला कंटाळलेल्या मुलीने रोड रोमिओला दिला चांगलाच चोप

parbhani crime

परभणी : हॅलो महाराष्ट्र – आजकाल गुन्हेगारीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामध्ये आता कॉलेजचे रोड रोमिओ तरुणींची छेड काढून त्यांना त्रास देत असत. अशीच एक घटना परभणी जिल्ह्यातील सेलू या ठिकाणी घडली आहे. यामध्ये सेलू तालुक्यातील तळतुंबा या गावात राहणाऱ्या मुलीची तिच्याच कॉलेजला शिकत असलेला रवळगाव या ठिकाणी राहणारा मुलगा दररोज छेड काढून तिला त्रास देत होता.

सुरुवातीला या मुलीने त्या मुलाकडे दुर्लक्ष केले. यामुळे त्या रोड रोमिओची हिम्मत वाढत गेली. यानंतर या मुलीने रोड रोमिओला चांगलीच अद्दल घडवली. तिने छेड काढणाऱ्या रोमिओला भररस्त्यात गाठून त्याला बेल्टने चांगलाच चोप दिला. मात्र या प्रकरणी सेलू पोलिसात अजून कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. हे प्रकरण समोपचाराने मिटवण्यात आले.

या मुलीने दाखवलेल्या हिम्मतीने सर्वच स्तरातून कौतुक करण्यात येत आहे. सेलू शहरातील भर रस्त्यातवर अचानक घडलेल्या घटनेने बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. हे दोन्ही विद्यार्थी कुठल्या वर्गात शिकत होते आणि कुठल्या कॉलेजला होते याची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. या मुलीने दाखवलेल्या हिमतीचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे.

सीएच्या परीक्षेत अपयश आल्याने तरुणीने उचलले ‘हे’ पाऊल

sucide

पिंपरी : हॅलो महाराष्ट्र – पिंपरी चिंचवडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये सनदी लेखापालच्या म्हणजेच सीएच्या परीक्षेत अपयश आल्याने तरुणीने आत्महत्या करून आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. हि धक्कादायक घटना केशवनगर परिसरात घडली आहे. पल्लवी संजय जाधव असे आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. परीक्षेत अपयश आल्याने तरुणीने एवढा टोकाचा निर्णय घेतल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पल्लवीने परीक्षेतील अपयशामुळे एवढा टोकाचा निर्णय घेतल्याने कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. मृत पल्लवी सनदी लेखापाल म्हणजेच सीएच्या अभ्यासाची तयारी करत होती. यापूर्वीही तिने दोनवेळा सीएची परीक्षा दिली होती. मात्र त्यामध्ये तिला अपयश आले होते. यावेळी तिने तिसऱ्यांदा सीएची परीक्षा दिली मात्र यामध्ये देखील तिला अपयश आले.

या परीक्षेचा निकाल लागल्यानंतर मृत पल्लवी घरात कोणाशीच बोलत नव्हती. यानंतर आज सकाळी पल्लवीने केबलच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. यावेळी पल्लवी पुन्हा परीक्षेत अपयशी ठरल्याने तिने नैराश्यातून आत्महत्या केली असल्याचे पल्लवीच्या नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले. यानंतर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात पाठवला. तसेच पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.