Monday, December 22, 2025
Home Blog Page 2799

Indian Railway: 8 सर्व्हिसेसचे एकत्रीकरण करून IRMS अस्तित्वात आली

नवी दिल्ली । रेल्वेच्या विविध सेवांचे विलीनीकरण करून तयार करण्यात आलेला भारतीय रेल्वे मॅनेजमेंट सर्व्हिस (IRMS) कॅडर आता अस्तित्वात आला आहे. सरकारने यासंदर्भात कॅबिनेट नोटमध्ये अधिसूचना जारी केली आहे. IRMS मुळे अधिकाऱ्यांच्या ज्येष्ठतेवर कोणताही परिणाम होणार नाही, असे रेल्वेने स्पष्ट केले आहे. रेल्वेच्या आठ सर्व्हिसेसचे एकत्रीकरण करून कॅडर तयार करण्याचा निर्णय पीयूष गोयल यांच्या रेल्वेमंत्री असताना घेण्यात आला होता.

रेल्वेने सांगितले आहे की, महाव्यवस्थापक(Railway General Manager) च्या 27 पदांमध्ये सुधारणा करून त्यांना वरचा दर्जा दिला जाईल. जुन्या सेवेतील पात्र अधिकाऱ्यांना महाव्यवस्थापक हे उच्च श्रेणीचे पद दिले जाईल याची काळजी घेतली जाईल. कॅबिनेट नोटमध्ये असेही म्हटले आहे की, केवळ IRMS चे अधिकारीच रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष/कार्यकारी अधिकारी आणि कार्यकारी सदस्य होण्यास पात्र असतील.

त्यामुळे एक कॅडर तयार झाला
आतापर्यंत देशात धावणाऱ्या रेल्वेशी संबंधित विविध कॅडर होते. 2019 मध्ये, सरकारने भारतीय रेल्वेमधील अभियांत्रिकी, वाहतूक, यांत्रिक आणि इलेक्ट्रिकल यासह विविध विभागांसाठी सध्याच्या आठ सेवांऐवजी फक्त एक कॅडर ‘भारतीय रेल्वे सेवा’ तयार करण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे रेल्वेच्या कामाची प्रक्रिया आणखी चांगली होईल, असा सरकारचा विश्वास आहे. यामध्ये जलद निर्णय घेणे, संस्थेचे चांगले स्वरूप, नोकरशाहीला आळा घालणे आणि तर्कशुद्ध निर्णय घेणे याला प्रोत्साहन दिले जाईल.

रेल्वे सेवांचे एकत्रीकरण ही काळाची गरज असल्याचे सांगून तत्कालीन रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी 24 डिसेंबर 2019 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर सांगितले होते की, या निर्णयानंतर प्रत्येकजण खात्याच्या वरचा विचार करेल, गटबाजी संपेल. भारतीय रेल्वे व्यवस्थापन सेवेबाबत सर्वांची संमती घेण्यात आली आहे. यातून भारताच्या अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल.

मात्र, रेल्वेच्या विविध सेवेतील अधिकाऱ्यांमध्ये कॅडर विलीन करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे अस्वस्थता निर्माण झाली होती. त्यामुळे त्यांच्या प्रमोशनवर परिणाम होईल, असे सांगत सुरुवातीला अधिकाऱ्यांनी यावर आक्षेप घेतला होता. सुरुवातीला सरकारलाही जोरदार विरोध होईल असे वाटले, मात्र तसे झाले नाही.

कोण-कोणत्या सेवा विलीन झाल्या ?
या कॅडर मध्ये इंडियन रेल्वे सर्व्हिस ऑफ इंजिनीअर्स (IRSE), इंडियन रेल्वे सर्व्हिस ऑफ मेकॅनिकल इंजिनीअर्स, इंडियन रेल्वे सर्व्हिस ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनीअर्स (IRSEE), इंडियन रेल्वे स्टोअर्स सर्व्हिस (IRSS), इंडियन रेल्वे सर्व्हिस ऑफ सिग्नल इंजिनीअर्स (IRSSE), भारतीय रेल्वे सेवा वाहतूक सेवा (IRTS), भारतीय रेल्वे कार्मिक सेवा (IRPS) आणि भारतीय रेल्वे खाते सेवा (IRAS) जोडण्यात आली आहे.

गोव्याची शान- धनुष्य बाण; आदित्य ठाकरेंचा नवा नारा

Aditya Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी गोवा विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना सज्ज झाली असून त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी आज गोव्यात प्रचारसभा घेतली. यावेळी त्यांनी गोव्याची शान धनुष्यबाण असा नवा नारा दिला

शिवसेना आणि गोव्याचं एक वेगळं नातं आहे. आम्ही येथे फक्त निवडणुकीसाठी आलो नाहीत तर गोव्यातील स्थानिकांना न्याय देण्यासाठी आलो आहे असे म्हणत गोव्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिवसेना रणांगणात उतरली असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. महाराष्ट्र मॉडेल घेऊन शिवसेना रणांगणात उतरणार आहे असेही ते म्हणाले

यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधला. दहा वर्षात गोव्याचा विकास झाला आहे की कंत्राटदाराचा झाला असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला. गोव्यातील स्थानिकांकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. गोव्याचा विकास होताना दुर्दैवाने पर्यावरणाची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे येथे गेल्या दहा वर्षात गोव्याचा विकास झाला आहे की कंत्राटदाराचा असा सवाल उपस्थित करत भाजपवर टीका केली

दरम्यान, गोव्यात यावेळी शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस सोबत युती केली आहे . शिवसेनेने पेडणे, शिवोली, म्हापसा, साखळी, मांद्रे, हळदोणा, पर्ये, वाळपई, वास्को, केपे आणि कुठ्ठाळी या 11 मतदारसंघांत उमेदवार उतरवले आहेत. त्यामुळे गोव्यात शिवसेनेला नक्की किती यश मिळणार हे पाहावं लागेल

मेंढ्यात अवैध दारू विक्रेत्याची व्यसनमुक्त संघाच्या कार्यकर्त्यांकडून धरपकड

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके

सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यात मेढ्यासह परिसरात अनेक महिन्यापासून अवैध दारूविक्री केली जात आहे. याकडे उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिस खात्याकडूनही दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे व्यसनमुक्त संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अवैध दारू विक्री करणाऱ्यांची आज धरपकड केली. त्याच्या या कारवाईत एका दारूविक्रेत्यास त्यांनी ताब्यात घेत पोलिसांच्या स्वाधीन केले.

याबाबत अधिक माहिती अशी की, मेंढ्यात गेल्या अनेक दिवसापासून अवैध रीतीने दारू विक्री करण्याचा प्रकार केला जात आहे. दरम्यान, आठवडी बाजार दिवशी एका हाॅटेलमध्ये दारूच्या बाटल्या ठेवून एकजण खुलेआम दारू विक्री करत असल्याची माहिती व्यसनमुक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांना मिळाली. त्या कार्यकर्त्यांनी संबंधित दारू विक्री करणाऱ्यास पकडले. त्यानंतर त्याला पकडून विलासबाबा जवळ यांच्या स्वाधिन केले.

विलासबाबा जवळ यांनी याबाबतची माहिती मेढा पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अमोल माने यांना दिली. त्यानंतर दारू विक्रेत्यास गाडीतून मेढा पोलिस स्टेशनला नेऊन मुद्देमालासह पोलिसांच्या स्वाधिन केले. याप्रकरणी पोलिसांनी संबंधित दारू विक्री करणाऱ्यावर कारवाई केली असून गुन्हा दाखल केला आहार. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिसांकडून केला जात आहे.

IPL 2022 : मेगा लिलावापूर्वी कोणत्या संघाने किती पैसे खर्च केले अन् किती शिल्लक आहेत

IPL

नवी दिल्ली । आयपीएलच्या पुढील हंगामासाठीचा मेगा लिलाव 12-13 फेब्रुवारी रोजी बेंगळुरू येथे होणार आहे. यावेळी लीगमध्ये 10 संघ उतरतील. लिलावात सर्व 10 संघ खेळाडूंवर सट्टा लावतील. मात्र आता कोणत्या फ्रँचायझीकडे किती पैसे शिल्लक आहेत आणि किती खर्च झाला आहे ते जाणून घ्या. IPL-2022 च्या मेगा लिलावात एकूण 10 संघांबद्दल बोलायचे झाल्यास एकूण 590 खेळाडूंवर बोली लावली जाणार आहे. यामध्ये 370 भारतीय तर 220 परदेशी खेळाडू आहेत.

आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्सकडे 48 कोटी शिल्लक आहेत आणि 42 कोटी रुपये खर्च झाले आहेत. कर्णधार रोहित शर्माला संघाने 16 कोटींमध्ये कायम ठेवले आहे. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जकडे 48 कोटी शिल्लक आहेत आणि 42 कोटी खर्च केले आहेत. या फ्रँचायझीने रवींद्र जडेजाला 16 कोटी, धोनीला 12 कोटी, मोईन अलीला 8 आणि ऋतुराज गायकवाडला 6 कोटींमध्ये कायम ठेवले आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडे मेगा लिलावासाठी 57 कोटी रुपये शिल्लक आहेत. विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज यांना रिटेन करण्यासाठी त्याने 33 कोटी खर्च केले. ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्सने 4 खेळाडूंना कायम ठेवले ज्यासाठी 42.5 कोटी रुपये खर्च झाले. दिल्ली फ्रँचायझीकडे आता 47.5 कोटी रुपये शिल्लक आहेत.

पंजाब फ्रँचायझीला पूर्णपणे नवीन संघ तयार करायचा आहे आणि हे लक्षात घेऊन केवळ 2 खेळाडूंनाच कायम ठेवण्यात आले आहे. मयंक अग्रवालला 12 कोटींमध्ये कायम ठेवण्यात आले आहे. त्यांच्याकडे आता 72 कोटी रुपयेच शिल्लक आहेत. दोन वेळचा चॅम्पियन असलेल्या कोलकाता नाईट रायडर्सने आंद्रे रसेलला 12 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवले आहे. त्याशिवाय व्यंकटेश अय्यर आणि वरुण चक्रवर्ती यांना 8-8 कोटींमध्ये तर सुनील नरेनला 6 कोटींमध्ये कायम ठेवण्यात आले आहे. या संघाकडे आता 48 कोटी रुपये शिल्लक आहेत.

माजी चॅम्पियन सनरायझर्स हैदराबादने केन विल्यमसनला 14 कोटींमध्ये कायम ठेवले आहे. अब्दुल समद आणि उमरान मलिक यांना प्रत्येकी 4 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवण्यात आले आहे आणि आता या फ्रँचायझीकडे आता 68 कोटी रुपये शिल्लक आहेत. राजस्थान रॉयल्सने 4 खेळाडूंना कायम ठेवले ज्यासाठी 28 कोटी रुपये खर्च करण्यात आले. राजस्थान फ्रँचायझीकडे आता 62 कोटी रुपये शिल्लक आहेत. त्यांच्याकडून संजू सॅमसनला 14 कोटी रुपयांना तर जॉस बटलरला 10 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवण्यात आले आहे.

IPL-2022 मध्ये पहिल्यांदाच उतरणाऱ्या लखनौ सुपर जायंट्सकडे 59 कोटी रुपये शिल्लक आहेत. त्यांनी केएल राहुलला 17 कोटींना, मार्कस स्टॉइनिसला 9.2 कोटींना आणि फिरकीपटू रवी बिश्नोईला 4 कोटींना खरेदी केले आहे. गुजरात टायटन्स, हा आयपीएलच्या पुढच्या हंगामात सामील होणारा दुसरा संघ आहे. त्यांच्याकडे अद्याप 52 कोटी शिल्लक आहेत. या संघाचे कर्णधारपद हार्दिक पांड्या सांभाळणार आहे, जो यापूर्वी मुंबई इंडियन्सशी संबंधित होता.

पत्नी आणि सासरच्या जाचाला कंटाळून 24 वर्षीय जवानाने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

gorakha

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यामध्ये भारतीय सैन्य दलातील एका 24 वर्षीय जवानाने पत्नी आणि सासरच्या जाचाला कंटाळून आपल्या आयुष्याचा शेवट केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

काय आहे प्रकरण ?
गोरख नानाभाऊ शेलार असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. गोरख शेलार यांनी 6 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. गोरख हे सैन्य दलामध्ये भरती नर्सिंग असिस्टंट पदावर एएफएमसीमध्ये कार्यरत होते. गोरख शेलार यांनी पत्नी आणि सासरच्या जाचाला कंटाळून टोकाचे पाऊल उचलले आहे. गोरख शेलार यांच्या आत्महत्या प्रकरणी त्यांच्या पत्नीसह एकूण पाच जणांवर पुण्यातील वानवडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोरख यांची पत्नी अश्वीनी पाटील, युवराज पाटील, संगिता पाटील, योगेश पाटील, भाग्यश्री पाटील अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

गोरख यांच्या भावाने केला गंभीर आरोप
या आत्महत्येप्रकरणी गोरख शेलार यांचे भाऊ केशव यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. 16 फेब्रुवारी 2021 रोजी माझ्या भावाचं लग्न झालं होतं. लग्न झाल्यापासून माझ्या भावाची पत्नी अश्विनी युवराज पाटील हिने 6 फेब्रुवारी 2022 पर्यंत माझा भाऊ गोरख शेलार याला वारंवार मानसिक त्रास दिला. तुझी नोकरी घालवतो, गरोदर पत्नीचा गर्भपात करतो आणि तुझ्यासह तुझ्या कुटुंबावर गुन्हा दाखल करतो. नाहीतर सोडचिठ्ठी दे आणि 15 लाख रुपये दे असे वारंवार बोलून माझा भाऊ गोरख शेलार याला वारंवार शारीरिक आणि मानसिक त्रास दिला. या त्रासाला कंटाळून गोरख याने आत्महत्या केली असे केशव यांनी आपल्या तक्रारीत म्हंटले आहे. माझ्या भावाच्या मृत्यूला भावाची पत्नी अश्विनी, सासरा युवराज पाटील, सासू संगिता पाटील, मेव्हणा योगेश पाटील, मेव्हणी भाग्यश्री पाटील हे कारणीभूत असल्याचा आरोप केशव यांनी केला आहे.

सातारा जिल्हा कारागृहात बंदीकडूनच पोलिसाला मारहाण

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके

सातारा जिल्हा कारागृहात शुक्रवारी जिल्हा कारागृहात बंदी असलेल्या आरोपीकडून पोलिसाला मारहाण करण्यात आल्याचा प्रकार घडला. यावेळी बंदीने पोलिसास शिवीगाळ करत जीवे मारण्याचीही धमकी दिली.

याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा येथील जिल्हा कारागृहात अनेक कैदी ठेवण्यात आलेले आहेत. शुक्रवारी कारागृहात कामावर असलेले कारागृहातील पोलीस कर्मचारी रणजित गोपीचंद बर्गे (वय 40, रा. मोळाचा ओढा, सातारा. मूळ रा. खांडज, ता. बारामती, जि. पुणे) हे काम करीत होते. यावेळी कारागृहात बंदी म्हणून असलेल्या काशीनाथ उर्फ काश्या सोनबा जाधव (वय 37, रा. आंधळी, ता. माण) याने बर्गे यांना मारहाण केली. या मारहाणीमध्ये रणजित बर्गे यांना किरकोळ दुखापत झाली आहे.

पोलिसास मारहाण केल्या प्रकरणी आणि सातारा शहर पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी संबंधित बंदी असलेल्या आरोपीवर जिन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याबाबत बंदी विरोधात पोलीस रणजित गोपीचंद बर्गे यांची तक्रार दिली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास हवालदार दळवी तपास करीत आहेत.

महाविद्यालय राडा प्रकरण : 15 जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके

सातारा शहरातील वाय. सी. कॉलेज परिसरामध्ये युवकांच्यात जोरदार हाणामारी झाल्याची घटना नुकतीच घडली होती. या युवकांच्या हाणामारीत दगडफेक झाल्याने लेडीज शॉपीचे मोठे अर्थिक नुकसान झाले. दरम्यान या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात १५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

याप्रकरणी सोनाली संतोष पवार (रा. रांगोळे कॉलनी, शाहूपुरी, सातारा) यांनि तक्रार दिली असून त्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी यश जांभळे (पूर्ण नाव नाही. रा. मंगळवार पेठ, सातारा) याच्यासह अनोळखी १० ते १५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. युवकांच्या या राड्यामध्ये लेडिज शाँपीचे सुमारे ९० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

याबाबत संबंधितांनी तक्रार दिल्यानंतर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. पोलिसांनी संशयितांचा शोध सुरु केला असून हवालदार पोळ तपास करीत आहेत.

चिकलठाणा ते वाळूज अखंड उड्डाणपुलाचा मार्ग मोकळा

bridge

 

औरंगाबाद – चिकलठाणा ते वाळूजपर्यंत एकच उड्डाणपूल बांधण्यासाठी डीपीआर तयार करण्यासाठी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी मंजुरी देत औट्रम घाट बोगदा निर्मितीसाठी काही महत्त्वपूर्ण पर्यायदेखील सुचविले, अशी माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी दिली.

एकच उड्डाणपूल बांधताना शहरातील विद्यमान उड्डाणपूल चांगले असतील तर ते वापरात आणू, अन्यथा पाडून टाकू, असेही मत गडकरी यांनी व्यक्त केल्याचे डॉ. कराड यांनी सांगितले. औरंगाबाद शहर, जिल्ह्यातील महामार्गप्रश्नी गुरुवारी केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या उपस्थितीत दिल्लीत बैठक झाली. या बैठकीमध्ये डॉ. कराड यांनी चिकलठाणा ते वाळूजपर्यंत उड्डाणपूल, नगर नाका ते दौलताबाद टी पॉइंट रस्त्याचे रुंदीकरण करणे, औरंगाबाद ते वैजापूर शिर्डी मार्गाचे 10 मीटरपर्यंत रुंदीकरणासह दुहेरीकरण, कन्नड तालुक्यातील औट्रम घाटात रुंदीकरण आणि काही ठिकाणी बोगदे करण्याबाबतचे मुद्दे मांडले. तर औट्रम घाटात 14 किलोमीटरचे अंतर असून, धुळे ते सोलापूर या राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण करण्यात यावे, ज्या ठिकाणी जागेची अडचण आहे. त्याठिकाणी छोटे-छोटे बोगदे या महामार्गावर प्रस्तावित करावेत, असे आदेश गडकरी यांनी एनएचएआयच्या अधिकाऱ्यांना दिले. तसेच शहरातील मुख्य रस्ता असलेल्या जालना रोडवर चिकलठाणा ते वाळूजपर्यंत सरसकट उड्डाणपूल उभारण्यासंदर्भात एनएचएआयकडून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी कन्सल्टंट नियुक्ती करण्यासंदर्भातही त्यांनी आदेश दिले. नगर नाका ते माळीवाडामार्गे दौलताबाद टी पॉइंटपर्यंत रस्त्याचे रुंदीकरण करण्याबाबत या बैठकीत विचार झाला. ए.एस. क्लब ते वैजापूरमार्गे शिर्डी मार्गाचे मजबुतीकरण करण्यास मान्यता देण्यात आली. यावेळी एनएचएआयएचे मुख्य कार्यकारी व्यवस्थापक आशिष आसाडी, बी.डी. ठेंग, विभागीय प्रादेशिक अधिकारी अरविंद काळे, उद्योगपती विवेक देशपांडे आदी उपस्थित होते.

याशिवाय औट्रम घाटातील बोगद्याचा खर्च सहा हजार कोटींवर गेला आहे. सुमारे 14 किलोमीटर बोगदा करण्याऐवजी गरज पडेल तेथे छोटे बोगदे करावेत. तसेच उर्वरित घाटात चौपदरीकरण करून महामार्ग रुंद करून काम लवकर संपवावे, अशा सूचना गडकरी यांनी केल्या. चिकलठाणा ते वाळूजपर्यंत प्रस्तावित उड्डाणपूल बांधताना मेट्रोमार्ग देखील त्यातच विकसित केला जाईल, याचा विचार डीपीआरमध्ये होणार आहे. यामुळे मेट्रोचा स्वतंत्र मार्ग उभारण्याचा खर्च लागणार नाही.

नाना पटोलेंसोबतचा फोटो ट्विट करत संजय राऊतांचे सूचक ट्विट; म्हणाले की हम…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील दिग्गज नेतेमंडळी आपल्याला पक्षाच्या प्रचारासाठी गोव्यात ठाण मांडून बसले आहेत. याचदरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांची गोव्यात यांची आज भेट झाली. या भेटीनंतर संजय राऊत यांनी सूचक ट्विट केलं.

संजय राऊत यांनी आपल्या ट्विटर हँडल वरून नाना पटोले यांच्यासोबत झालेल्या भेटीचा फोटो शेअर केला. त्यावेळी त्यांनी कॅप्शन मध्ये हम असे लिहिले. यामुळे गोव्यात शिवसेना काँग्रेस ला पाठिंबा देणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे…

दरम्यान, गोवा विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी केली आहे. तर काँग्रेस स्वबळावर लढत आहे. गोव्यात यावर्षी आम आदमी पक्ष, तृणमूल काँग्रेस यांनीही उडी मारली आहे. त्यामुळे भाजपला आपली सत्ता राखताना तारेवरची कसरत करावी लागेल हे मात्र नक्की

Share Market : भारतीय शेअर बाजारात पुन्हा मोठी घसरण, सेन्सेक्स 700 तर निफ्टी 493.60 अंकांनी घसरला

Stock Market

नवी दिल्ली । शेअर बाजाराने या आठवड्याचा शेवट लाल रंगात केला. शुक्रवारी निफ्टी 50 231 अंकांच्या किंवा 1.31 टक्क्यांच्या घसरणीसह 17374.80 च्या पातळीवर बंद झाला, तर सेन्सेक्स 773.11 अंकांच्या किंवा 1.31 टक्क्यांच्या घसरणीसह 58152.92 वर बंद झाला. तर बँक निफ्टी 493.60 अंकांनी म्हणजे 1.27 टक्क्यांनी घसरला आणि तो 38517.30 वर बंद झाला.

इतर क्षेत्रांबद्दल बोलायचे तर, निफ्टी आयटी 2.72 ने घसरला आणि ऑटो सेक्टर 1.04 घसरला. याशिवाय, BSE FMCG मध्ये 0.87%, BSE Healthcare मध्ये 1%, BSE Metals मध्ये 0.33% आणि BSE ऑइल अँड गॅसमध्ये 0.19% घसरण झाली. शुक्रवारी बीएसई स्मॉलकॅप 1.90 टक्के आणि बीएसई मिडकॅप 1.84 टक्क्यांनी घसरला आहे.

विदेशी बाजारपेठेतील कमकुवतपणा हावी आहे
भारतीय शेअर बाजारातील या घसरणीचे कारण अमेरिकन बाजारातील विक्रीही असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. याशिवाय, गेल्या तीन दिवसांपासून भारतीय शेअर बाजाराने हिरवे वळण घेतले होते, त्यामुळे आज म्हणजे शुक्रवारीही नफावसुली दिसून आली.

 

निफ्टी 50 चे आजचे टॉप लुझर्स
1. Grasim Inds : 3.30 % घसरण
2. Tech Mahindra : 2.97 % घसरण
3. Infosys : 2.73 % घसरण
4. HCL Technologies : 2.24 % घसरण
5. UPL : 2.19 % घसरण