Monday, December 22, 2025
Home Blog Page 2798

कंपनीसाठी भाड्याची इमारत पहायला गेले, अन्…

औरंगाबाद – पैठण रोडवरील एक मोठी इमारत खासगी कंपनीने भाडेतत्त्वावर घेण्याचे निश्चित केले. इमारत पाहण्यासाठी कंपनीचे कर्मचारी दुपारी 2 वाजता इमारतीत गेले. पहिल्या मजल्यावर इमारत पाहत असताना खालच्या मजल्यावर अचानक शॉर्टसर्किटमुळे आग लागली. आग एवढी भयानक होती की, कर्मचाऱ्यांना खाली येणे अशक्य झाले. घाबरलेले कर्मचारी थेट गच्चीवर गेले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभाग घटनास्थळी दाखल झाले. आग विझवून दोन कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.

पैठण रोडवर बेस्ट प्राईजच्या बाजूला व्हॅल्यू डी नावाची इमारत आहे. ही इमारत भाडेतत्त्वावर एका कंपनीला हवी होती. कंपनीचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास इमारत पाहणीसाठी आले. तळमजल्यावरील इमारत बघितली. त्यानंतर ते पहिल्या मजल्यावर पोहोचले. इमारत पाहत असताना खालून मोठ्या प्रमाणात धूर येऊ लागला. त्यामुळे घाबरलेले कर्मचारी पायऱ्यांपर्यंत आले. खाली मोठी आग लागल्याचे लक्षात आले. कर्मचाऱ्यांनी पटकन गच्चीवर धाव घेतली.

या घटनेची माहिती अग्नीशमन विभागाला देण्यात आली. पदमपुरा येथून एक वाहन पाठविण्यात आले. कर्मचाऱ्यांनी विद्युत पुरवठा खंडित करून अवघ्या दहा मिनिटांमध्ये आग आटोक्यात आणली. हे थरारक दृश्य गच्चीवरून कर्मचारी पाहत होते. आग पूर्णपणे विझल्यावर दोघांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. ही कारवाई मुख्य अग्नीशमन अधिकारी आर. के. सुरे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहन मुंगसे, संजय कुलकर्णी, हरिभाऊ घुगे, संग्राम मोरे, शिवसंभा कल्याणकर, शेख आमेर, शेख तनवीर, शेख समीर, परमेश्वर सालुंके, योगेश दूधे, दीपक वरठे आदींनी केली.

दिराने केली हद्द पार ! वहिनीला दिला भयंकर मृत्यू, ‘या’ प्रकारे झाला खुलासा

कल्याण : हॅलो महाराष्ट्र – मुंबईजवळ असणाऱ्या उंभरणी गावात नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये आरोपीने आपल्या वहिनीची निर्घृणपणे हत्या केली आहे. त्याने वाहिनीची हत्या केल्यानंतर वाहिनीने आत्महत्या केल्याचा बनाव रचला होता. पण त्याचा हा बनाव फार काळ टिकू शकला नाही. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता त्याने आपण केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. या प्रकरणी आरोपीला 14 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. कल्याण तालुका पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

सुरेश त्र्यंबक वाघे असे अटक करण्यात आलेल्या आरोपी दिराचे नाव आहे. तर धृपदा जयराम वाघे असे हत्या करण्यात आलेल्या वहिनीचे नाव आहे. मृत धृपदा जयराम वाघे यांचा मृतदेह 6 फेब्रुवारी रोजी आपल्या राहत्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला होता. महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली. यानुसार पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती.

अशा प्रकारे झाला खुनाचा उलघडा
जेव्हा मृत धृपदा यांचा जेव्हा शवविच्छेदन अहवाल तेव्हा त्यामध्ये हि आत्महत्या नाहीतर खून असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करण्यास सुरुवात केली. या चौकशी दरम्यान मृत धृपदा यांच्या बहिणीने धृपदा यांचा आरोपी दीर सुरेश वाघे यांच्याशी वाद असल्याची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी आरोपी दिराला चौकशीसाठी ताब्यात घेतले. तेव्हा त्याने मृत धृपदा आणि आपल्यात संपत्ती आणि पैशांचा वाद असल्याची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी आरोपी दिराची कसून चौकशी केली असता त्याने जमीन आणि पैशांच्या वादातून आपल्या भावाची पत्नी धृपदा हिचा गळा आवळून खून केला. यानंतर पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केलं असता, त्याला 14 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

वीस हजार रुपयाची लाच घेताना वायरमन एसीबीच्या जाळ्यात

औरंगाबाद – नवीन वीज कनेक्शन देण्यासाठी 20 हजार रुपये लाचेची मागणी करून ती स्वीकारताना बजाजनगर येथील विद्युत वितरण कार्यालयाच्या वायरमनला जेरबंद करण्यात आले. ही कारवाई काल साजापूर येथे करण्यात आली.

बजाजनगर येथील विद्युत वितरण कार्यालय, के सेक्टर युनिट 2 च्या कार्यालयातील वायरमन सचिन कडूबा पाडळे याने साजापूर येथे नवीन विद्युत मीटर कनेक्शन देण्यासाठी फिर्यादीकडे 20 हजार रुपयाची मागणी केली. मात्र लाच देण्याची इच्छा नसल्याने फिर्यादीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे बुधवारी रोजी तक्रार केली. त्यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी रोजी साजापूर येथे सापळा रचला. यावेळी फिर्यादीच्या घरासमोर आरोपी सचिन कडूबा पाडळे याने 20 हजार रुपयांची लाच स्वीकारली. त्याच वेळी त्यास जेरबंद करण्यात आले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक राहुल खाडे, अप्पर पोलीस अधीक्षक विशाल खांबे, पोलिस उपअधीक्षक रूपचंद वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रेश्मा सौदागर यांनी केली.

महिलेला एकटं पाहून नराधमांनी साधला धाव, मध्यरात्री घरात शिरून दिल्या ‘या’ नरकयातना

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – नागपूर शहरातील वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. या घटनेत दोन जणांनी मध्यरात्री घरात घुसून एका महिलेवर सामूहिक अत्याचार केला आहे. पीडित महिला घरी एकटी असल्याचे पाहून नराधमांनी हा डाव साधला आहे. त्यांनी पीडितेला चाकुचा धाक दाखवून तिच्यासोबत विकृतीचा कळस गाठला आहे. या घटनेनंतर पीडित महिला रात्रभर घाबरलेल्या अवस्थेत घरात बसून राहिली. यानंतर तिने दुसऱ्या दिवशी घडलेला सगळा प्रकार आपल्या शेजाऱ्यांना सांगितला तेव्हा हि धक्कादायक घटना उघडकीस आली.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पीडित महिलेच्या वैद्यकीय तपासणीनंतर पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या पीडित महिलेने केलेल्या वर्णनावरून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. घटनेच्या दिवशी पीडित महिला सोमवारी रात्री आपल्या घरी एकटीच होती. रात्री अडीचच्या सुमारास दोन जणांनी पीडितेच्या घराचा दरवाजा ठोठावला. यावेळी आरोपींनी पाणी मागण्याच्या बहाण्याने पीडित महिलेच्या घरात प्रवेश केला. यानंतर या आरोपी नराधमांनी चाकुचा धाक दाखवत पीडितेवर जबरदस्तीने अत्याचार केला. यावेळी आरोपींनी आळीपाळीने पीडितेवर सामूहिक बलात्कार केला.

या धक्कादायक प्रकारानंतर पीडित महिला घाबरलेल्या अवस्थेत घरात तशीच बसून राहिली. यानंतर या पीडित महिलेने घटनेच्या दुसऱ्या दिवशी शेजाऱ्यांना आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला. यानंतर शेजाऱ्यांनी या घटनेची माहिती तातडीने वाडी पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी नवीनचंद्र रेड्डी आणि विनिता साहू हे आपल्या पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. यानंतर पोलिसांनी वैद्यकीय तपासणी केल्यानंतर पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास केला असता आरोपींनी या अगोदरसुद्धा पीडितेवर अशा प्रकारे बलात्कार केला होता. समाजात बदनामी होईल, या कारणाने पीडितेने त्यावेळी पोलिसांत तक्रार दाखल केली नव्हती. पीडितेने केलेल्या वर्णनानुसार पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

जानेवारीत वाहनांची विक्री 18.84 टक्क्यांनी घसरली, जाणून घ्या वाहन क्षेत्राची मंदी का आली ?

नवी दिल्ली । ऑटो इंडस्ट्री बॉडी सोसायटी ऑफ इंडियन ऑटो मोबाइल मॅन्युफॅक्चरर्स (SIAM) ने शुक्रवारी सांगितले की, जानेवारी 2022 मध्ये एकूण ऑटोमोबाईल विक्रीत मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत वार्षिक 18.84 टक्क्यांनी घट झाली आहे. SIAM च्या मते, या वर्षी जानेवारीमध्ये प्रवासी, व्यावसायिक तसेच दुचाकी आणि तीन चाकी वाहनांसह 14,06,672 वाहनांची विक्री झाली तर जानेवारी 2021 मध्ये 17,33,276 युनिट्सची विक्री झाली होती.

SIAM चे महासंचालक राजेश मेनन म्हणाले की,”ओमिक्रॉन आणि सेमीकंडक्टर टंचाईशी संबंधित चिंतेमुळे जानेवारी 2022 मधील विक्री जानेवारी 2021 च्या तुलनेत घसरली आहे. मेनन यांच्या मते, पुरवठ्यातील अडचणींमुळे प्रवासी वाहन विभाग बाजारातील मागणी पूर्ण करू शकत नाही.”

सेमीकंडक्टरच्या कमतरतेमुळे उत्पादनावर परिणाम झाला
SIAM ने शुक्रवारी सांगितले की,”कारखान्यांकडून डीलर्सना प्रवासी वाहनांचा पुरवठा जानेवारीमध्ये 8 टक्क्यांनी घटला कारण सेमीकंडक्टरच्या कमतरतेमुळे उत्पादन प्रभावित झाले.” एकूण प्रवासी वाहनांची घाऊक विक्री जानेवारी 2022 मध्ये 2,54,287 युनिट्सवर घसरली, जी मागील वर्षी याच महिन्यात 2,76,554 युनिट्स होती. जानेवारी 2022 मध्ये पॅसेंजर कारचे डिस्पॅच 1,26,693 युनिट्स इतके होते, जे मागील वर्षीच्या कालावधीत 1,53,244 युनिट होते. त्याचप्रमाणे, व्हॅन डिस्पॅच जानेवारी 2021 मध्ये 11,816 युनिट्सवरून जानेवारी 2022 मध्ये 10,632 युनिट्सवर घसरली.

युटिलिटी वाहनांची विक्री वाढली
मात्र, युटिलिटी वाहनांची विक्री जानेवारी 2021 मध्ये 1,11,494 युनिट्सच्या तुलनेत गेल्या महिन्यात 1,16,962 युनिट्सपर्यंत वाढली आहे. एकूण टू-व्हीलर डिस्पॅच 21 टक्क्यांनी घसरून 11,28,293 युनिट्सवर आले आहेत, जे मागील वर्षीच्या याच कालावधीत 14,29,928 युनिट होते. त्याचप्रमाणे तीनचाकी घाऊक विक्री जानेवारी 2021 मध्ये 26,794 युनिट्सच्या तुलनेत गेल्या महिन्यात 24,091 युनिट्सवर घसरली.

 

12 ते 15 महिन्यांत चांदीचा भाव 80,000 पर्यंत पोहोचू शकेल; गुंतवणुकीसाठी ठरेल योग्य

silver price

नवी दिल्ली । सामान्यतः सोन्यामधील गुंतवणूक जास्त चांगली मानली जाते. लोकं म्युच्युअल फंडामध्ये जोखीम घेऊन जास्त रिटर्न मिळवण्यासाठी गुंतवणूक करतात. मात्र तुम्हाला माहीत आहे का की, येणाऱ्या काळात चांदी म्युच्युअल फंड आणि सोन्यापेक्षा कितीतरी पट जास्त रिटर्न देऊ शकते. यावेळी तुम्ही चांदीमध्ये गुंतवणूक केली तर ते तुम्हाला येणाऱ्या काळात भरपूर कमाई मिळवून देऊ शकते.

बाजार विश्लेषकांचा असा विश्वास आहे की, या वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीपर्यंत कोरोना महामारी संपल्यानंतर अनिश्चितता कमी होईल, त्यामुळे सोन्यातील गुंतवणूक कमी होऊ शकते. त्यानंतर तेजी पाहून लोकं चांदीकडे आकर्षित होतील.

चांदी 80,000 पर्यंत पोहोचेल
पुढील 12-15 महिन्यांत चांदीचा भाव 80,000 रुपयांपर्यंत जाण्याची MOFSL ला अपेक्षा आहे. सिल्व्हर इन्स्टिट्यूटच्या मते, 2022 मध्ये जागतिक चांदीची मागणी 1.112 अब्ज औंसच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचण्याचा अंदाज आहे. 2022 मध्ये फिजिकल चांदीच्या गुंतवणुकीची मागणी 13% वाढण्याचा अंदाज आहे, जो गेल्या 7 वर्षांचा उच्चांक आहे. यासह 2022 मध्ये दागिने आणि चांदीच्या वस्तूंमध्ये चांदीचा वापर अनुक्रमे 11% आणि 21% पर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे.

चांदी 1.50 लाखांपर्यंत पोहोचेल, 250 टक्के रिटर्न देऊ शकेल
2022 आणि पुढील काही वर्षे चांदी तेजीत राहण्याची अपेक्षा आहे, असे विश्लेषकांचे मत आहे. केडिया ए डव्हायझरीचे व्यवस्थापकीय संचालक अजय केडिया सांगतात की, यावर्षी चांदी 80,000 रुपयांपर्यंत पोहोचेल. यानंतर, 2024 पर्यंत, ते 1.50 लाख रुपयांपर्यंत पोहोचू शकते. चांदी सध्या 61,000 च्या आसपास आहे. या अर्थाने, ते 2024 पर्यंत 33 टक्के आणि 250 टक्क्यांपर्यंत रिटर्न देऊ शकते.

‘हा’ गुंतवणुकीचा पर्याय आहे
आता जास्त लोकं म्युच्युअल फंड आणि एक्सचेंज ट्रेडेड फंड (ETF) मध्ये गुंतवणूक करत आहेत. यामुळेच ETF ची व्याप्ती वाढत आहे आणि आता लोकं सिल्व्हर ईटीएफमध्ये गुंतवणूक करण्याकडे वळत आहेत. सेबीने अलीकडेच सिल्व्हर ईटीएफ मंजूर केले आहेत. या वर्षी आतापर्यंत दोन सिल्व्हर ईटीएफ बाजारात दाखल झाले आहेत.

ETF म्हणजे काय ?
ETF म्हणजे सिक्युरिटीज आणि शेअर्स सारख्या मालमत्तेची बकेट. त्याची खरेदी आणि विक्री एक्सचेंजवर होते. त्यामुळे त्यांची वैशिष्ट्ये आणि फायदे स्टॉकमधील गुंतवणुकीसारखेच असले तरी ते म्युच्युअल फंड आणि बाँड्स सारख्या साधनांवर फायदे देखील देतात. कोणत्याही एका कंपनीच्या स्टॉकप्रमाणे, ETF चे ट्रेडिंग देखील दिवसभर चालते. एक्सचेंजवरील मागणी आणि पुरवठा यानुसार त्यांच्या किमतीत चढ-उतार होत राहतात.

खंडाळा नगरपंचायत : नगराध्यक्षपदी नंदा गायकवाड तर उपनगराध्यक्षपदी सुधीर सोनावणे बिनविरोध

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

राजकीयदृष्ट्या अतिसंवेदनशील असलेल्या खंडाळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी नंदा तात्याबा गायकवाड तर उपनगराध्यक्षपदी सुधीर चंद्रकांत सोनावणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी पिठासीन अधिकारी तथा प्रांतधिकारी राजेंद्र जाधव व मुख्यधिकारी चेतन कोंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

खंडाळा नगरपंचायतीची गुरुवारी विशेष सभा पार पडली. या सभेत नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष निवड करण्यात आली. यावेळी अध्यक्ष पदासाठी बहुमत असलेल्या राष्ट्रवादीकडुन नंदा तात्याबा गायकवाड यांनि अर्ज दाखल केला. त्यामुळे त्याची नगराध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यक्ष पदासाठी चार फेब्रुवारीला एकच अर्ज दाखल झाल्याने नगराध्यक्ष निवड ही आज केवळ औपचारिकता होती.

यावेळी उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीसाठी मात्र, राष्ट्रवादीकडून सुधीर चंद्रकांत सोनावणे तर विरोधी भाजपा कडुन संदीप प्रकाश जाधव यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. अर्ज माघारी घेण्याच्या कालावधीत भाजपाने उमेदवारी अर्ज माघार घेतला. यामुळे उपाध्यक्ष म्हणून राष्ट्रवादीचे सुधीर सोनावणे हे बिनविरोध म्हणून निवडुन आले.

नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीनंतर गुलालाची उधळण करण्यात आली. दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील यांनी खंडाळा येथे बुधवारी संध्याकाळी पक्षाकडुन निवडून आलेल्या नगरसेवकांशी चर्चा केली होती. दरम्यान आज सकाळी आमदार मकरंद पाटील यांनी याबाबतचा निर्णय दिल्यानंतर राष्ट्रवादी कडुन उपाध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.

LIC IPO: सवलत मिळवण्यासाठी डीमॅट खात्यांमध्ये झाली वाढ; जानेवारीमध्ये किती लोकांनी खाती उघडली ते पहा

LIC

नवी दिल्ली । सरकार मार्चअखेर LIC चा IPO बाजारात आणण्यास उत्सुक आहे, मात्र त्याहूनही जास्त गुंतवणूकदार उत्सुक आहेत. सरकारने पॉलिसीधारकांसाठी सवलत जाहीर केल्यापासून, डिमॅट खाते उघडणाऱ्यांचा पूर आला आहे. LIC चा IPO लॉन्च करण्याची सरकार जितकी तयारी करत आहे, तितकीच गुंतवणूकदारही आपली तयारी लवकरात लवकर पूर्ण करत आहेत. यामुळे जानेवारी महिन्यातच 34 लाख नवीन डिमॅट खाती उघडण्यात आली असून फेब्रुवारीमध्ये ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.

पॉलिसीधारकांसाठी राखीव कोटा
सरकारने LIC पॉलिसीधारकांसाठी देखील IPO कोटा राखून ठेवला आहे. पॉलिसीधारकांना IPO मध्ये जारी केलेल्या एकूण शेअर्सपैकी 10 टक्के स्वतंत्रपणे मिळतील. याशिवाय IPO मधील शेअर्सच्या मूल्यावरही सूट दिली जाईल. यामुळेच पॉलिसीधारक जास्तीत जास्त डीमॅट खाती उघडत आहेत जेणेकरून त्यांना या संधीचा फायदा घेता येईल.

ब्रोकर्सही योजना राबवत आहेत
पॉलिसीधारक आणि रिटेल गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी ब्रोकर्सही विविध योजना राबवत आहेत. ब्रोकर्स, डिजिटल आणि ट्रेडिशनल दोन्ही पॉलिसीधारकांना डिमॅट खाती उघडण्यासाठी गिफ्ट व्हाउचरसह विविध सवलती देत ​​आहेत. LIC चा IPO द्वारे सरकार सुमारे 1 लाख कोटी रुपये उभारण्याच्या तयारीत असल्याचा अंदाज विश्लेषक व्यक्त करत आहेत.

कंपनीचे एजंटही संधीची वाट पाहत आहेत
LIC च्या एजंटचे म्हणणे आहे की,”त्यांना गुंतवणुकीपेक्षा कंपनीशी अधिक भावनिक जोड आहे आणि तो ही संधी कोणत्याही प्रकारे जाऊ देऊ इच्छित नाही. आमच्यासाठी ही एक मोठी संधी असेल की,आम्हीही LIC च्या शेअर्सचे मालक होऊ.” विशेष म्हणजे देशभरात LIC शी जवळपास 13 लाख एजंट संबंधित आहेत.

पोलिसांची कमाल ! सराईत गुन्हेगाराला पकडण्यासाठी पोलिसांनी लढवली ‘हि’ शक्कल

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मुंबईतील मालाड पोलिसांनी दिवसाढवळ्या घरफोडी करून किमती ऐवज लंपास करणाऱ्या एका टोळीला अटक केली आहे. पोलिसांनी अत्यंत शिताफीने सापळा रचून टोळीतील पाच आरोपीना गजाआड केले आहे. या टोळीने काही दिवसांपूर्वीच मालाड येथील एका ज्येष्ठ नागरिकाच्या घरात चोरी केली होती. यामध्ये या चोरटयांनी घरातील टीव्ही, लॅपटॉपसह अन्य मौल्यवान वस्तू असा एकूण 40 लाखांचा मुद्देमाल लुटला होता. यानंतर पोलिसांनी तातडीने आपली सूत्रे हलवली आणि पाच जणांना या प्रकरणी अटक केली.संबंधित सर्व आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत.

या आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी चक्क शक्कल लढवली. यासाठी पोलिसांनी रोमँटिक कपलचा वेश धारण केला. तर काही पोलीस रिक्षाचालक, वेटरच्या वेशभूषेत सापळा रचला. 31 जानेवारी रोजी 60 वर्षीय फिर्यादी महिलेचा वाढदिवस होता. वाढदिवसानिमित्त फिर्यादी महिला दुपारी एकच्या सुमारास मुंबादेवी आणि महालक्ष्मी मंदिरात दर्शन घेण्यासाठी गेल्या होत्या. रात्री उशिरा घरी परतल्या असता त्यांच्या घराचं लॉक तुटल्याचं त्यांच्या लक्षात आलं. यावेळी त्यांनी घरात जाऊन पाहाणी केली असता घरातील टीव्ही, लॉपटॉपसह सोन्याचे आणि हिऱ्याचे दागिने तसेच काही रोकड असा एकूण 40 लाखांचा मुद्देमाल चोरीला गेला होता.

यानंतर पीडित महिलेने लगेच मालाड पोलीस पोलीस ठाण्यात आरोपी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला.यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला. तेव्हा एक संशयित टॅक्सी पोलिसांच्या निदर्शनास आली. पण गाडीचा नंबरप्लेट व्यवस्थित दिसत नव्हता. यानंतर पोलिसांनी काही टॅक्सीचालकांना विचारले असता संबंधित कॅब घाटकोपरमधील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.याठिकाणी पोलिसांनी आधीच सापळा रचला होता. यामध्ये एक पोलीस रिक्षाचालक, दुसरा वेटर तर अन्य दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी रोमॅंटीक कपलचा वेश घेतला होता. यानंतर पोलिसांनी अत्यंत शिताफीने सद्दाम खान, अब्दुल पठाण आणि रॉनी फर्नांडिस, नौशाद खान आणि गुड्डू सोनी या पाच आरोपींना अटक केली. पोलिसांनी या आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली टॅक्सी, चोरलेला टीव्ही सेट आणि 16.6 लाख रुपयांचे हिऱ्यांचे दागिने जप्त केले आहेत. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

ज्या पायऱ्यांवर सोमय्यांना धक्काबुक्की त्याच पायऱ्यांवर भाजप कडून सत्कार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। पुणे महानगरपालिकेच्या ज्या पायरीवर भाजप नेते किरीट सोमय्या याना शिवसैनिकांकडून धक्काबुक्की झाली, तिथेच भाजपाच्या वतीने सोमय्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पालिकेबाहेर भाजप समर्थकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. गर्दी अनावर झाल्याने पोलिसांकडून सौम्य बळाचा वापर करण्यात आला. त्यामुळे परिसरात सध्या तणावाचं वातावरण आहे.

यावेळी किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या बेनामी कंपन्या आहेत. त्यांनी कोविड कंपनी कोणाची आहे हे सांगावं असे म्हणत पुण्यातील जम्बो कोविड सेंटर मध्ये घोटाळा असे किरीट सोमय्या यांनी म्हंटल

पुण्यातील कोविड सेंटरचा ठेका मिळालेल्या कंपनीचा मालक चहावाला आहे. तसेच हा चहावाला केईएम रुग्णालयामागे असतो. ठाकरे सरकारने पुण्याच्या लोकांच्या जीवाशी खेळ केला. संजय राऊत यांची ही बेनामी कंपनी आहे. पुणे महापालिकेने त्या कंपनीला ब्लॅकलिस्ट केल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिकेत ४ ठेके दिले असा आरोप सोमय्या यांनी केला