Monday, December 22, 2025
Home Blog Page 2800

Start-ups ने तीन महिन्यांत उभे केले 53 हजार कोटी; फक्त ‘या’ दोन क्षेत्रांमध्ये विभागली गेली अर्धी रक्कम

नवी दिल्ली । स्टार्ट अपसाठी वातावरण निर्माण करण्यासाठी सरकार ने घेतलेल्या मेहनतील आता फळ मिळत आहे. भारतीय स्टार्ट-अप्सनी 2021 च्या चौथ्या तिमाहीत (ऑक्टोबर-डिसेंबर) $7.2 अब्ज (सुमारे 53 हजार कोटी) फंड उभारला आहे.

नॅसकॉम आणि प्रॅक्सिस ग्लोबलने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, चौथ्या तिमाहीत जमा झालेला फंड मागील तिमाहीच्या तुलनेत 18 टक्के जास्त आहे. फिनटेक आणि रिटेल टेक क्षेत्रातील स्टार्टअप्सनी एकूण फंडींग पैकी 46 टक्के फंड मिळवला आहे. नॅसकॉमने म्हटले आहे की, हा रिपोर्ट हे दर्शवितो कि, महामारीमुळे भारतातील रिटेलचे तंत्रज्ञान सेक्टर किती वेगाने विकसित होत आहे.

14 नवीन युनिकॉर्न देखील तयार झाले
रिपोर्टनुसार, गेल्या वर्षीच्या चौथ्या तिमाहीतच 14 नवीन युनिकॉर्न भारतीय बाजारपेठेत सामील झाले. यापैकी 6 रिटेल टेक आणि फिनटेक क्षेत्राशी संबंधित आहेत. ज्या स्टार्टअप्सचे बाजार मूल्य $1 बिलियन पेक्षा जास्त आहे ते युनिकॉर्न क्लबमध्ये सामील होतात. आतापर्यंत, देशातील 60 हून अधिक स्टार्टअप्स युनिकॉर्न क्लबमध्ये सामील झाले आहेत. यापैकी बहुतेकांची संख्या साथीच्या रोगानंतर वाढली आहे.

‘ही’ क्षेत्रे जागतिक गुंतवणूकदारांची पहिली पसंती आहेत
नॅसकॉमने म्हटले आहे की, भारतातील सर्वाधिक वेगाने वाढणारे स्टार्टअप फिनटेकशी संबंधित आहेत. विदेशी गुंतवणूकदारही या क्षेत्रावर जास्त विश्वास दाखवत आहेत. 2021 मध्ये वर्षभरात स्टार्टअप्सची चांगली वाढ झाली आहे आणि चौथ्या तिमाहीत या ट्रेंडला गती मिळाल्याचे दिसून आले. यामुळेच स्टार्टअप्सची संख्या आणि त्यांची संख्या या दोन्हींमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे.

वाहनांची परस्पर विक्री : 2 कोटी 65 लाख रुपये किमतीची 24 वाहने जप्त

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके

महाराष्ट्रसह गुजरात राज्यामध्ये ट्रक, टेम्पो व इतर चारचाकी वाहनांची थकीत हप्ते भरून चालवण्यासाठी घेवून वाहनांची परस्पर विक्री करून फसवणुक करणाऱ्या टोळीचा सातारा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी दोन भामटयांना अटक करण्यात आली आहे. तसचे त्यांच्याकडून सुमारे 2 कोटी 65 लाख रुपये किमतीची 24 वाहने जप्त केली आहेत.

याबाबात पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, सातारा शहर पोलीस ठाणेचे हददीमधील इंडो स्टार कॅपिटल फायनान्स शाखा सातारा येथून सचिन बजरंग चव्हाण (रा. एकंचे ता. कोरेगाव जि. सातारा) यांनी एक दहा टायरी ट्रक फायनान्सकडून कर्जाने घेतला होता. सदर ट्रकचे हप्ते थकित राहिलेने फायनान्स कंपनीचे एजंटचे ओळखीने सदर ट्रक हा उन्मेश उल्हास शिर्क (रा. निरा ता. पुरंदर जि. सातारा) यास ट्रक हा थकित हप्ते भरून ठराविक रक्कम देवून चालविण्यास घेतला होता. या ट्रकचे हप्ते थकित राहू लागल्याने सदर ट्रक मालकाने संबंधितास हप्ते भरण्याबाबत सांगितले.

परंतू त्यास वारंवार टाळाटाळ करून उडवाउडवीची उत्तरे येवू लागल्याने तसेच पैसे न भरता ट्रक देखील देत नसल्याने आपली फसवणूक झालेबाबत त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी इतर व्यवसायिकांकडून अधिक माहिती घेतली असता संबंधित व्यक्तिने अशाच प्रकारे अनेक लोकांची फसवणूक केल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात उन्मेश उल्हास शिर्क (रा. निरा) याचे विरुद्ध तक्रार दिली.

पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास केला असता त्यांना अब्दुल कादीर सय्यद (रा. सुपा ता. पारनेर जि. अहमदनगर) याचा यामागे हात असून तो आरोपी असल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. महाराष्ट्रसह गुजरात राज्यातील सामान्य नागरिकांची याप्रकारे मोठया प्रमाणात आर्थिक फसवणुक झाल्याचे तपासात दिसून आल्याने याप्रकरणी अधिक्षक अजयकुमार बन्सल यांनी सातारा शहर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांना गुन्हा उघडकीस आणणेबाबत सुचना दिल्या. त्यानंतर सातारा शहर पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पथकातील उपनिरीक्षक समीर कदम यांना मार्गदर्शनाखाली आरोपीस मुंबई व एकास पुणे येथून अटक केली.

धक्कादायक माहिती समोर

या प्रकरणात तपास केला असता पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली. ती म्हणजे दोन आरोपींनी सातारा,पुणे, मुंबई, सोलापूर, अहमदनगर,बीड, औरंगाबाद, बुलढाणा, पनवेल, ठाणे, रायगड,सांगली, गोवा, गुजरात अशा विविध भागातून वरील प्रमाणे कोटयावधी रुपयांची आर्थिक फसवणुक केली असल्याचे दिसून आले.

वाहनांची किंमत 2 कोटी 65 लाख

आरोपीकडून 14 ट्रक, 7 टाटा मॅजिक (छोटा हत्ती), 14 सुमो, 2 बोलेरो, 1 स्विफट अशी 2 कोटी 65 लाख रुपयांची एकूण 24 वाहने जप्त करण्यात आलेली आहेत. अजून 15 ते 20 वाहने हस्तगत करण्याचे काम चालू आहे. या आरोपींनी सातारा जिल्हयामध्ये अशा पद्वधतीने 40 ते 45 वाहन धारकांना फसविलेले आहे. आतापर्यत आरोपीनी सातारा जिल्हयात एकुण 4 ते 5 कोटी रुपयाची फसवणुक केली आहे.

रेल्वेने पुन्हा रद्द केल्या 380 गाड्या, Cancelled Trains ची संपूर्ण लिस्ट येथे पहा

Railway

नवी दिल्ली । भारतीय रेल्वेने आज पुन्हा एकदा 380 गाड्या रद्द केल्या आहेत. धुक्यामुळे या सर्व गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यासाठी तुम्ही http://enquiry.indianrail.gov.in/mntes या वेबसाइटला भेट देऊन तपासू शकता. भारतीय रेल्वेने इतक्या मोठ्या प्रमाणात गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही या हंगामात रेल्वेने अनेक गाड्या रद्द केल्या आहेत.

सहसा असा निर्णय रेल्वेकडून हिवाळ्यात घेतला जातो, मात्र यावेळी कोविड-19 आणि धुके या दोन्हीमुळे गाड्या रद्द करण्यात येत आहेत. डिसेंबरच्या शेवटच्या महिन्यापासून देशात धुके सुरू होते. साधारणत: जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये धुक्यामुळे गाड्या चालवण्यात अडचणी येतात. विशेषतः उत्तर भारतात, हवामानामुळे अनेक जलद-सुपर फास्ट गाड्यांचे वेळापत्रक केवळ डिसेंबर आणि जानेवारी महिन्यातच बिघडते.

याआधीही रेल्वेने एकाच वेळी 750 हून जास्त गाड्या रद्द केल्या होत्या. शुक्रवारी 380 गाड्या रद्द करण्यासोबतच रेल्वेने अनेक गाड्यांचे वेळापत्रकही बदलले आहे. 4 गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. याशिवाय 6 गाड्यांचे मार्गही वळवण्यात आले आहेत.

आज पुन्हा 380 गाड्या रद्द
सध्या कमी व्हिजिबिलिटी हे देखील गाड्या रद्द होण्यामागचे महत्त्वाचे कारण ठरत आहे. व्हिजिबिलिटीमुळे गाड्यांचा वेग कमी होतो. जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये अनेकदा रेल्वेला अशा प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. उत्तर भारतातील हवामानामुळे या दोन महिन्यांत रेल्वेला मोठा तोटाही सहन करावा लागत आहे.

गाड्या रद्द झाल्याचा परिणाम प्रवाशांवरही होतो. त्यांना पैसे परत केले जातात, मात्र अचानक ट्रेन रद्द झाल्याची बातमी ऐकून त्यांना आणखी त्रास होतो. तुम्ही भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट http://enquiry.indianrail.gov.in/mntes वर जाऊन ट्रेनबद्दल संपूर्ण माहिती मिळवू शकता. तसेच, NTES मोबाईल ऍप्लिकेशन तुमच्यासाठी रेल्वेच्या कोणत्याही माहितीसाठी खूप उपयुक्त ठरू शकते. येथे तुम्ही तुमच्या मोबाईलवर एका क्लिकवर सर्व गाड्यांची लिस्ट आणि त्यांच्याशी संबंधित माहिती मिळवू शकता.

बच्चू कडू यांना 2 महिने सश्रम कारावासाची शिक्षा

bachhu kadu

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यमंत्री बच्चू कडू याना 2 महिने सश्रम करावासाची शिक्षा करण्यात आली आहे. मुंबईतील फ्लॅटची माहिती लपवणे बच्चू कडू यांच्या चांगलेच अंगलट आले आहे. भाजप नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी या विरोधात तक्रार केली होती.

2014 च्या विधानसभा निवडणुकीत मुंबई येथील फ्लॅट लपवणे बच्चू कडू याना महागात पडले आहे. भाजप नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी 2017 साली याबाबत तक्रार केली होती. अखेर आज चांदूरबाजार प्रथम वर्ग न्यायालयाने निर्णय देत बच्चू कडू यांना २५ हजार रुपयांचा दंड ठोठवला. तसेच २ महिने सक्षम कारावासाची शिक्षा दिली.

नेमकं प्रकरण काय?
2014 च्या विधानसभा निवडणुकीत बच्चू कडू यांनी निवडणूक आयोगाला आपल्या संपत्तीची माहिती देणारं प्रतिज्ञापत्र सादर केलं. यात त्यांनी त्यांच्या मुंबईतील फ्लॅटची कोणतीही माहिती दिली नव्हती. याविरोधात अमरावतीतील अचलपूरचे भाजपाचे नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी तक्रार दाखल केली. या खटल्यात चांदूरबाजार प्रथमवर्ग न्यायालयाने निकाल दिला.

Cryptocurrency Prices : क्रिप्टोची मार्केट कॅप 15% कमी, Shiba आणि Dogecoin देखील घसरले

Cryptocurrency

नवी दिल्ली । शुक्रवार, 11 फेब्रुवारी 2022 रोजी क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये मोठी घसरण झाली आहे. काल गुरुवारी सकाळी 11 वाजेपर्यंत ग्लोबल क्रिप्टो मार्केट कॅप 15.31% ने $2 ट्रिलियन वरून $1.70 ट्रिलियनवर घसरली. मात्र Bitcoin आणि Ethereum या प्रमुख करन्सीमध्ये मोठी घसरण झाली नाही.

शुक्रवारी, भारतीय वेळेनुसार सकाळी 12:45 वाजता, सर्वात मोठी करन्सी असलेले Bitcoin 1.44% ने घसरले. ही करन्सी $43,346.80 वर ट्रेड करत होती. त्याच वेळी, Ethereum $3,086.32 वर ट्रेड करत होते, गेल्या 24 तासांत ते 3.22% खाली आले. Bitcoin चे मार्केट वर्चस्व 41.7 टक्के आहे तर Ethereum चे मार्केट वर्चस्व 17.9 टक्के आहे.

कोणते कॉईन्स घसरले ?
मार्केट कॅपनुसार, एक्सआरपी, सोलाना, पोल्काडॉट, शिबा इनू या प्रमुख करन्सीमध्ये जास्त घसरण झाली. हे कॉईन्स 5 टक्क्यांहून अधिकच्या घसरणीसह ट्रेड करत होते.
– XRP : घसरण 5.84%, CMP $0.8211
– Solana : घसरण 5.96%, CMP $105.59
– Polkadot : घसरण 5.99%, CMP $20.43
– Shiba Inu : घसरण 5.91%, CMP $0.00003087
– Terra LUNA : घसरण 4.82%, CMP $53.55
– Dogecoin : घसरण 3.19%, CMP $0.1525
– Cardano ADA : घसरण 2.18%, CMP $1.15

24 तासांत सर्वाधिक वाढ होणाऱ्या करन्सी
फायटर शिबाSONIC TOKEN, MetaPay और Chainbing (CBG) हे गेल्या 24 तासांत सर्वाधिक नफा मिळवणाऱ्यांमध्ये होते. SONIC TOKEN ने 2364.66%, MetaPay 635.78% आणि Chainbing (CBG) मध्ये 566.82% ची वाढ झाली.

‘प्रॉमिस डे’ दिवशी जयंत पाटलांनी शरद पवारांना दिले ‘हे’ वचन; म्हणाले की…

jayant patil sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या सोशल मीडियावर व्हेलेंटाईन वीकचा ट्रेंड सुरू आहे. आज त्यातील प्रोमिस डे असून तरुणांसोबतच राजकीय नेत्यांनाही व्हेलेंटाईन विक ची भुरळ पडली आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज प्रोमिस दे दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना एक प्रॉमिस दिले आहे.

आज प्रॉमिस डे! आजच्या या दिनी माझा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्व कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना आणि आदरणीय शरद पवार साहेबांना शब्द आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रातील प्रत्येक गाव, वाडी,वस्तीपर्यंत अत्यंत मजबुतीने बांधण्यासाठी मी सदैव कटिबद्ध आहे तंसंच त्याच्या खाली त्यांनी हॅशटॅग PromiseDay असंही लिहलं आहे.

दरम्यान, जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दिग्गज नेतेमंडळी पैकी असून शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू अशी त्यांची ओळख आहे. मधल्या काळात अनेक जवळचे सहकारी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडून जात असताना जयंत पाटील यांनी पवारांना साथ देत त्यांच्यासोबत संपूर्ण महाराष्ट्र पालथा घालून राष्ट्रवादीचा प्रचार केला. जयंत पाटील हे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असून ते महाविकास आघाडीतील मंत्रिमंडळात जलसंपदा मंत्री आहेत.

लोणंद नगरपंचायत : नगराध्यक्षपदी मधुमती पलंगे तर उपनगराध्यक्षपदी शिवाजीराव शेळके-पाटील

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

सातारा जिल्ह्यातील राजकीयदृष्ट्या महत्वाच्या असलेल्या लोणंद नगरपंचायतची नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक घेण्यात आली. यावेळी नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मधुमती पलंगे (गालिंदे ) यांची दहा विरूद्ध सात मताने निवड झाली. तर उपनगराध्यक्ष म्हणून राष्ट्रवादीचे शिवाजीराव शेळके-पाटील यांचीही दहा विरूद्ध सात मताने निवड करण्यात आली.

आज लोणंद नगरपंचायतच्या सभागृहात नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीसाठी विषेश सभेला सुरुवात झाली. यावेळी प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप आणि प्रभारी मुख्याधिकारी संजय गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी राष्ट्रवादीच्या उमेदवार मधुमती पलंगे यांनी दहा मते मिळवत बाजी मारली तर विरोधात असलेल्या काँग्रेसच्या उमेदवार दिपाली निलेश शेळके यांना सात मते पडली. तर उपनगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीकडून शिवाजीराव शेळके यांनी भाजपच्या उमेदवार दिपाली संदिप शेळके यांचा दहा विरूद्ध सात अशा मतांनी पराभव केला.

या निवडीवेळी नगरपंचायतीच्या सभागृहात भरत शेळके,रविद्र क्षीरसागर, सचिन शेळके, गणीभाई कच्छी, भरत बोडरे, सुप्रिया शेळके, सीमा खरात, राशिदा इनामदार, प्रविण व्हावळ, आसिया बागवान, तृप्ती घाडगे, राजश्री शेळके, ज्योती डोनीकर आदी नगरसेवक उपस्थित होते.

दहिवडी नगरपंचायत : नगराध्यक्षपदी सागर पोळ तर उपनगराध्यक्षपदी राजेंद्र साळुंखे बिनविरोध

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

सातारा जिल्ह्यातील राजकीयदृष्ट्या महत्वाच्या असलेल्या दहिवडीच्या नगरपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकला आहे. दिवंगत वाघोजीराव पोळ यांचे नातू राष्ट्रवादीचे नेते सागर पोळ यांची नगराध्यक्षपदी तर उपनगराध्यक्षपदी राजेंद्र साळुंखे यांची बिनविरोध निवड झाली.

दहिवडी नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षपदाची निवड प्रक्रिया पीठासीन अधिकारी प्रांतआधिकारी शैलेश सुर्यवंशी, मुख्याधिकारी अवधुत कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी नुतन नगराध्यक्ष सागर पोळ, उपनगराध्यक्ष राजेंद्र सांळुखे निलीमा पोळ, विशाल पोळ, सुरेंद्र मोरे, मोनिका गुंडगे, वर्षाराणी सावंत, सुप्रिया जाधव, महेश जाधव, विजया जाधव, शैलेंद्र खरात उपस्थित होते.

यावेळी राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख, सरचिटणीस अभय जगताप, राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष विक्रम शिंगाडे, तालुकाध्यक्ष बाळासाहेब सावंत, सुनिल पोळ, बाबा पवार, तानाजी मगर, दादासाहेब चोपडे, बाळासो गुंडगे, तानाजी जाधव, दादा जाधव, रामभाऊ पोळ, शामराव नाळे, पतंगराव जाधव, लालासो ढवाण, संजय जाधव, शामराव पोळ, महेश कदम उपस्थित होते.

भ्रष्ट्राचाराची प्रकरणे उघड होत असल्याने संजय राऊतांची कोल्हेकुई सुरू; आशिष शेलारांचा हल्लाबोल

SHELAR RAUT

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भ्रष्ट्राचार ची प्रकरणे उघड होत असल्याने संजय राऊत यांची कोल्हेकुई सुरू झाली आहे अशी टीका भाजप आमदार आशिष शेलार यांनी केली आहे. आशिष शेलार यांनी आज पत्रकार परिषद घेत संजय राऊत आणि महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वीच शिवसेना आणि भाजपमध्ये राजकीय कलगीतुरा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

आशिष शेलार म्हणाले, संजय राऊत हे एकाकी पडले आहेत. त्यामुळेच त्यांची आदळआपट होत आहे. भ्रष्ट्राचार ची प्रकरणे उघड होत असल्याने संजय राऊत यांची कोल्हेकुई सुरू झाली आहे. महाविकास आघाडीतील एकही नेता त्यांच्या बरोबर नाही. ज्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोदीत ते जाऊन बसतात त्यांचेही सर्वोच्च नेते याबाबत काही बोलले नाहीत.

संजय राऊतांनी निःपक्षपातीपणावरून केलेल्या वक्तव्यावर देखील शेलारांनी प्रतिक्रिया दिली. ज्या माणसाला स्वतःचा पक्ष माहिती नाही, त्यांनी असे विधान करू नये. त्यांनी पक्ष निःपक्षपातीपणाची भाषा बोलू नये. केंद्रीय मंत्री नारायण राणेंना अटक करणे हे निःपक्षपातीपणा होता का? नितेश राणा आणि आमदार राणा यांच्यावर दाखल केलेला गुन्हा निःपक्षपातीपणा आहे का? असा सवाल आशिष शेलार यांनी केला.

चूक होतेय म्हणून इंग्रजी बोलायला घाबरू नका, तीच तर शिकण्याची पहिली पायरी – डॉ. ईक प्रसाद दुवादी

Dr. Eak Duwadi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। अरण्यानंद साहित्य व संस्कृती प्रतिष्ठानच्या अरण्यानंद इंग्लिश कॅफेचे उदघाटन डॉ. ईक प्रसाद दुवादी यांनी केलं. लोकल टू ग्लोबल इंग्लिश कनेक्ट हा हेतू डोळ्यांसमोर ठेवून विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकवण्यासाठी हा उपक्रम अरण्यानंद तर्फे सुरू करण्यात आला आहे. नेपाळमधील काठमांडू विद्यापीठातील इंग्रजीचे प्राध्यापक असलेल्या डॉ. ईक प्रसाद दुवादी यांनी यावेळी इंग्रजी बोलताना, शिकताना चुका होणारच, त्या चुकांमधूनच इंग्रजी शिकता येईल असं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केलं. चुकांमधूनच आपल्यामध्ये इंग्रजी वापरण्याचा आत्मविश्वास निर्माण होतो असं ते पुढे बोलताना म्हणाले. दोन तास चाललेल्या या सत्रात त्यांनी नवनवीन ऍप्स व वेबसाईटचा वापर करून आपली इंग्रजी कशी सुधारायची याची माहिती दिली. त्यानंतर नेपाळ, कोरिया व महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी एकमेकांची ओळख करून घेत आपल्या देशाबद्दल माहिती सांगितली.

सोनी या काठमांडूच्या विद्यार्थिनीने आपल्या अमेरिकेतील वास्तव्याचे त्याबरोबरच तिने भारतातील भटकंतीचे अनुभव सांगितले. रूपा या पोखरा येथील विद्यार्थिनीने आपल्या ब्लॉग लिखानाबद्दल तसेच युजान या काठमांडू येथील कंटेंट रायटरने आपले व्यवसायिक अनुभव सांगितले. सोलापूर येथील सुप्रिया या एमसीए च्या विद्यार्थिनीने आपल्या रायफल शूटिंगच्या आवडीबद्दल सांगितले. तिन्ही देशांमधून एकूण १२० विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले होते.

अरण्यानंद प्रतिष्ठानच्या सदस्य डॉ. मनिषा आनंद पाटील यांनी दर बुधवारी ऑनलाईन पद्धतीने चालणाऱ्या या कॅफेची माहिती सर्वांना दिली. या कॅफेचा उद्देश विद्यार्थ्यांना आपली इंग्रजी सुधारण्याची तसेच आत्मविश्वासाने बोलण्याची संधी निर्माण करून देणे हा आहे. ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने हा कॅफे चालवला जाणार आहे. विविध खेळ, कोडी, आणि उपक्रमातून हसतखेळत इंग्रजी बोलायला लावले जाणार आहे. आकाश गुरुबेहती याने आभार मानले. डॉ मंगेश पाटील, श्री मनोज पाटील, प्रा. सौ. शीतल पाटील यांनी या उपक्रमाचे आयोजन केले. यामुळे खेड्यातील विद्यार्थ्यांना देश विदेशातील विद्यार्थ्यांशी संवाद साधून आत्मविश्वासाने इंग्रजी बोलण्याची संधी मिळणार आहे.