Sunday, December 21, 2025
Home Blog Page 2829

माझ्या मृत्यूनंतर औरंगाबादच्या जमिनीत मला दफन करा; ओवेसींचे वक्तव्य

Asaduddin Owaisi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्यावर उत्तरप्रदेश येथे गोळीबार झाला होता. यानंतर केंद्र सरकारने त्यांना झेड पळस सुरक्षा देऊन त्यांनी ती नाकारली. याच दरम्यान केंद्र सरकार वर टीका करताना यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. माझ्या मृत्यूनंतर औरंगाबादच्या जमिनीत मला दफन करा असे विधान त्यांनी केले.

असदुद्दीन ओवेसी म्हणाले, ‘मी मृत्यूला घाबरत नाही. एक ना एक दिवस सर्वांना मरायचेचं आहे. मी या देशात पैदा झालो आहे. जेव्हा माझे डोळे बंद होईल तेव्हा मला औरंगाबादच्या जमिनीत दफन केले जावे, असे ते म्हणाले. ओवेसींच्या या वक्तव्याने नवा राजकीय वाद निर्माण झाला आहे

दरम्यान, ओवेसींच्या या विधानाचा शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी खरपूस समाचार घेतला. ओवेसींनी औरंगाबादमध्ये दफन विधीची इच्छा व्यक्त करुन त्यांचे खरे दात दाखवले आहेत. औरंगाबादमध्ये औरंगजेबाची कबर आहे. त्यामुळेच त्यांनी दफनविधीसाठी औरंगाबादची इच्छा व्यक्त केली आहे”, असं अंबादास दानवे म्हणाले.

रेल्वेची दोन म्हैशींना जोराची धडक, एक ठार तर एक गंभीर जखमी

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

साताऱ्यात माल वाहतूक रेल्वेचा अपघात झाला आहे. संगम माहुली येथे रेल्वे स्टेशन नजीक माल वाहतूक करणाऱ्या रेल्वेने 2 म्हशींना धडक दिली आहे. रेल्वे पुण्याहून कोल्हापूरच्या दिशेकडे जात असताना हा अपघात झाला. रेल्वेच्या चाकांमध्ये दोन्ही म्हशी अडकल्याने माल वाहतूक करणारी रेल्वे जागेवर उभी होती. या दुर्घटनेत एक म्हैस जागीच ठार झाली तर एक गंभीर जखमी झाली.

सातारा- कोरेगाव मार्गावर संगममाहुली येथे ही दुर्घटना घडली. म्हैस ठार झाल्याने रेल्वे खोळबून उभी राहिली होती. रूळावरून म्हैशीला बाजूला करण्यासाठी जेसिबीच्या साहाय्य घ्यावे लागले. बऱ्याच प्रयत्नानंतर म्हैस बाहेर काढण्यात यश आले. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती.

कोल्हापूरच्या दिशेला निघालेल्या या रेल्वेने दोन म्हैशींना जोराची धडक दिली. रेल्वे रूळावर म्हैशी आल्याने ही घटना घडली आहे. म्हैस जागीच ठार झाल्याने म्हैस मालकांचे मोठे अर्थिक नुकसान झाले आहे.

लतादीदींची तब्बेत खालावताच राज ठाकरे ‘ब्रीच कॅंडी’त दाखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोना आणि न्यूमोनिया याची एकत्र लागण झालेल्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची प्रकृती पुन्हा एकदा खालावली असून त्यांना पुन्हा एकदा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. याच दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तातडीने ब्रीच कॅंडीत रुग्णालयात दाखल झाले आहे.

राज ठाकरे आणि मंगेशकर कुटुंब यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यामूळेच लता दीदींची तब्बेत खालावताच राज ठाकरे हे तातडीने रुग्णालयात दाखल होऊन त्यांनी लता मंगेशकर यांच्या तब्बेतीची चौकशी केली.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी लता दीदींच्या प्रकृतीबाबत माहिती दिली होती. दरम्यान टोपे यांनी सांगितले होते कि, लता दीदी आता कोरोनामुक्त झाल्या असून त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत आहे. यानंतर लता दीदींच्या प्रमुख प्रवक्त्यांनीदेखील लता दीदींच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याचे सांगितले होते. यानंतर आज अचानक लता मंगेशकर यांची प्रकृती ढासळली आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असून चाहत्यांमध्ये काळजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सातारा पोलिसांची कामगिरी : महाराष्ट्रासह गुजरातमध्ये व्यावसायिकांना फसविणारे दोघे जेरबंद

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

ट्रक चालविण्यास दिल्यानंतर फसवणूक करणाऱ्या दोघांना सातारा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वाहने चालविण्यास घेवून परस्पर विक्री करणाऱ्या दोघांनी महाराष्ट्रासह गुजरात राज्यातही ट्रक व्यवसायिक, ट्रान्सपोर्ट व्यवसायिकांना फसविललेले असल्याची माहिती समोर आलेली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहर पोलीस ठाणेचे हददीमधील इंडो स्टार कॅपिटल फायनान्स शाखा सातारा येथून सचिन बजरंग चव्हाण (रा. एकंबे ता. कोरेगाव जि. सातारा) यांनी एक दहा टायरी ट्रक फायनान्सकडून कर्जाने घेतला होता. सदर ट्रकचे हप्ते थकित राहिलेने फायनान्स कंपनीचे एजंटचे ओळखीने सदर ट्रक हा उन्मेश उल्हास शिर्क (रा. निरा ता. पुरंदर जि. सातारा) यास थकित हप्ते भरून ठराविक रक्कम देवून ट्रक चालविण्यास दिला होता. सदर ट्रकचे हप्ते थकित राहू लागल्याने सदर ट्रक मालकाने संबंधितास हप्ते भरण्याबाबत सांगितले. परंतू त्यास वारंवार टाळाटाळ करून उडवाउडवीची उत्तरे येवू लागल्याने तसेच पैसे भरत नाही व ट्रक देखील देत नाही. अशी दमबाजी करू लागल्याने आपली फसवणूक झालेबाबत फिर्यादी यांना समजले. त्याबाबत त्यांनी व्यवसायिकांकडून अधिक माहिती घेतली असता संबंधित व्यक्तीने अशाच प्रकारे बऱ्याच लोकांची फसवणूक केल्याचे खात्रीशीर समजलेवर फिर्यादी यांनी सातारा शहर पोलीस ठाणेत उन्मेश उल्हास शिर्क (रा. निरा) याचे विरुद्ध तक्रार दिली.

सदर फिर्यादीवरून प्रकार गंभीर स्वरूपाचा असल्याने व सामान्य नागरिकांची याप्रकारे मोठया प्रमाणात आर्थिक फसवणूक झाल्याचे प्राथमिक चौकशीत दिसून आल्याने पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधिक्षक अजय बो-हाडे, सहा पोलीस अधिक्षक आंचल दलाल यांनी सातारा शहर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांना सदरचा गुन्हा उघडकीस आणणेबाबत सुचना दिल्याने सातारा शहर पोलीस ठाणेचे डी. बी. पथकातील पो. उपनिरीक्षक समीर कदम यांना मार्गदर्शन करून सुचना दिल्याप्रमाणे डी. बी. पथकाने संबंधित संशयित आरोपीची तात्काळ माहिती प्राप्त करून एकास मुंबई व एकास पुणे येथून थरारकरित्या पाठलाग करून ताब्यात घेतले. त्यांचेकडे प्राथमिक चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली की, सदर दोन संशयित आरोपींनी सातारा, पुणे, मुंबई, सोलापूर, अहमदनगर, गुजरात अशा विविध भागातून अशाच प्रकारे फसवणूक केली असल्याचे दिसून आले. याबाबात आरोपीकडे अधिक विचारपूस केली असता त्याने सदरची वाहने परस्पर विक्री केल्याचे समजून येत आहे. त्यांची पोलीस कस्टडी रिमांड घेवून अधिक तपास सुरू आहे.

तरी सातारा जिल्हा तसेच इतर जिल्हयातील नागरिकांना व ट्रक व्यवसायिक, ट्रान्सपोर्ट व्यवसायिक यांना आवाहन करण्यात येते की, वरीलप्रमाणे कोणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी सातारा शहर पोलीस ठाणेस संपर्क साधावा. सदरची कारवाई गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस उपनिरीक्षक समीर कदम, पो.ना. सुजित भोसले, अविनाश चव्हाण, ज्योतीराम पवार, पंकज ढाणे, अभय साबळे, विक्रम माने, पो.कॉ. गणेश घाडगे, संतोष कचरे, सागर गायकवाड, विशाल धुमाळ, गणेश भोंग यांनी केलेली आहे.

मुंबई इंडियन्सचे खेळाडू भारतासाठी ओपनिंग करणार; रोहितसोबत ईशान किशन सलामीला येणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | वेस्ट इंडिज विरुद्ध उद्यापासून सुरू होणाऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी कर्णधार रोहित शर्मा सोबत मुंबई इंडियन्सचा त्याचा सहकारी ईशान किशन सलामीसाठी येईल असे खुद्द रोहितनेच स्पष्ट केले. सलामीवीर शिखर धवन ला कोरोनाची लागण झाल्यामुळे त्याच्या जागी ईशान किशन सलामीला येईल.

रोहित शर्माने पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली. भारतीय संघातील अनेक खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. त्यात आक्रमक सलामीवीर शिखर धवन चा देखील समावेश आहे. तर दुसरा सलामीवीर के एल राहुल हा त्याच्या बहिणीच्या लग्नामुळे उपस्थित राहू शकत नाही. त्यामुळे ईशान किशन ची सलामीवीर म्हणून वर्णी लागली.

कोण आहे ईशान किशन-
ईशान किशन हा डावखुरा फलंदाज आपल्या आक्रमक फलंदाजी साठी ओळखला जातो. आयपीएल मध्ये मुंबई इंडियन्स कडून खेळताना त्याने अनेक अविस्मरणीय खेळया खेळल्या आहेत. इशान किशनने गेल्या वर्षी वन डे क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. पहिल्यावहिल्या चेंडूवर जबरदस्त षटकार ठोकून त्याने साऱ्यांनाच थक्क केलं होतं. त्याच सामन्यात त्याने वन डे पदार्पणात सर्वात जलद अर्धशतक करण्याचा विक्रमही नोंदवला होता.

उदयनराजे भोसले यांनी घेतली अजित पवारांची भेट; चर्चाना उधाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. पुण्यातील शासकिय विश्रामगृहात दोन्ही नेत्यांमध्ये भेट झाली. आपण कामासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांना भेटण्यासाठी आलो असल्याचं खासदार उदयनराजे भोसेले यांनी सांगितलं आहे.

सातारा पालिकेच्या विकास कामांच्या निमित्ताने खासदार उदयनराजेंनी पुण्यातील शासकिय विश्रामगृहातील व्हीव्हीआयपी सुटमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांना सातारा पालिकेच्या हद्दवाढीत समाविष्ट झालेल्या भागाच्या विकासासाठी ४८ कोटी ५० लाख रूपयांचे अनुदान राज्य सरकारने द्यावे, अशी मागणी केली. आगामी काळात सातारा नगरपालिकेची निवडणूक देखील आहे. त्या निवडणुकीवर देखील आजच्या भेटीचा परिणाम होण्याची शक्यता असल्याचं बोललं जातंय.

दरम्यान यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार का? असा प्रश्न उदयनराजे यांना विचारला असता त्यांनी या प्रश्नावर उदयनराजे भोसले यांनी सूचक उत्तर देत म्हटलं, जसा सर्वधर्मभाव तसाच सर्व पक्ष समभाव मी मानतो असे ते म्हणाले.

मेढा ग्रामीण रुग्णालयात बेबी वॅार्मर फोटो थेअरपी मशीनचे लोकार्पण

पाचगणी | दुर्गम जावलीत रुग्णाच्या सेवेकरीता उभारण्यात आलेल्या ग्रामीण रुग्नालयात शिवसेनेच्या प्रयत्नातून गरोदर माताच्या शिशुकरीता महत्वाचे वैद्यकीय उपकरण नवजात शिशु काळजी यंत्रग्रामीण रुग्नालयााला मिळाले आहे. जावली तालुक्यांचे शिवसेना नेते एकनाथ ओबळे यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे आरोग्य मंत्री राजेंद्र येड्रावकर याच्या माध्यमातून आज मेढा ग्रामीण रुग्नालयालात लोकार्पण केले.

मेढा ग्रामीण रुग्नालयाच्या प्रशस्त इमारतीमध्ये आरोग्य सेवा देताना उपकरणांच्या अभावी अडचणींना सामोरे जावे लागत होते. प्रसुती मातांची व नवजात शिशु यांची ससेहोलपट होतानाचे विदारक चित्र जावलीतील ग्रामीण रुग्नालयात दिसत होते. जावली तालुक्यांतील शिवसेना नेते एकनाथ ओबळे यांनी याची दखल घेवून मेढा ग्रामीण रुग्नालयात बेबी वॅार्मर फोटो थिअरपी मशीनची मागणी केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत तात्काळ मशीन उपलब्ध करुन दिले.

सातारा-जावली विधानसभा संपर्कप्रमुख एकनाथ ओंबळे, विधानसभा क्षेत्रप्रमुख एस. एस. पार्टे गुरुजी, पाटण विधानसभा संपर्क प्रमुख प्रविण शिंदे, तालुका संपर्कप्रमुख नामदेव बांदल, तालुकाप्रमुख विश्वनाथ धनावडे, लक्ष्मण धनावडे, शहरप्रमुख सचिन जवळ, सचिन करंजेकर, सचिन रजपुत, डॉ. रूग्वेद नाईक, वैद्यकिय कक्ष समन्वयक प्रशांत जुनघरे, शांताराम कदम, ग्राहक संरक्षण कक्षाचे लहुराज सुर्वे, भालेघरचे सरपंच सिताराम पवार, केळघर शहरप्रमुख बाळासाहेब शिर्के, नंदु चिकणे, नामदेव चिकणे,संतोष शेलार उपस्थित होते.

महाबळेश्वर दवबिंदूने गोठले : थंडीचा कडाका वाढला, पारा 6 अंशावर

सातारा | पश्चिम महाराष्ट्रात थंडीचा कडाका आज अचानक वाढला आहे. महाराष्ट्राचे मिनी काश्मिर म्हणून ओळख असलेल्या महाबळेश्वरचा पारा तब्बल 6 अंशावर आल्याने महाबळेश्वरच्या अनेक भागात दवबिंदू गोठले आहेत. वेण्णा लेक आणि लिंगमळा परिसरामध्ये सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. वेण्णा लेक परिसरात ज्या ठिकाणी बोट उभ्या केल्या जातात त्या जेटीवर, गाड्यांच्या टपांवर मोठ्या प्रमाणात दवबिंदू गोठल्याचे पहायला मिळाले. या भागात पडत असलेल्या गुलाबी थंडीचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक महाबळेश्वर मध्ये येत असतात. लिंगमळा भागात गवंतांवर फुलांवर दवबिंदू गोठल्याचे पाहायला मिळत आहे.

महाराष्ट्राच नंदनवन असलेल्या महाबळेश्वरला थंडीचा कडाका वाढलेला आहे. गेल्या महिन्यात 12 जानेवारीला महाबळेश्वरचा पारा शुन्यावर गेल्याने वेण्णालेक व लिंगमळा येथे हिमकण पडलेले होते. त्यानंतर गेल्या आठवड्यात थंडीचा कडाका काहीसा कमी झाला होता. मात्र आज पुन्हा थंडी वाढल्याने महाबळेश्वमध्ये तापमानाचा पारा घसरल्याने अनेक ठिकाणी दवबिंदू पहायला मिळाले.

महाबळेश्वर शहरात पर्यटक शॅाल, स्वेटर, कानटोपी परीधान करुन शहरातील मुख्य बाजारपेठेमध्ये फेरफटका मारताना दिसत आहेत. वेण्णालेक व लिंगमळा परीसरात गारठा महाबळेश्वर शहरापेक्षा जास्त तीव्रतेने जाणवतो. हिमकण वेण्णालेकच्या परीसरात बोटीवर व झाडांच्या पानावर पाहयला मिळतात. पर्यटक व सर्वसामान्याना महाबळेश्वरमध्ये हिमकण पाहायला मिळणं निसर्गाचा आविष्कार मानला जातो.

 

अभ्यासाच्या तणावातून बारावीच्या विद्यार्थीनीने घेतला गळफास

suicide
suicide

औरंगाबाद – बारावीत शिक्षण घेणाऱ्या १८ वर्षीय तरुणीने परीक्षेच्या तणावातून राहत्या घरात साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी सायंकाळी पाच वाजता उघडकीस आली. उषा कृष्णाचंद्र चौधरी (18, रा. शंभूनगर) असे गळफास घेतलेल्या तरुणीचे नाव आहे.

उषा ही देवनागरी परिसरातील एका महाविद्यालयात बारावीत शिकत होती. तिचे वडील कृष्णाचंद्र हे फरशी बसवण्याचे काम करतात, तर आई घरकाम करते. तिला एक लहान भाऊ आहे. दरम्यान उषाला एमबीबीएस करायचे होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून ती तणावात होती. दरम्यान शुक्रवारी वडील नियमित कामासाठी गेले होते. सायंकाळच्या सुमारास उषाचा लहान भाऊ बाहेर खेळत असताना उषाने आईला अभ्यास करण्यासाठी पेपर आणण्यासाठी दुकानात पाठवले. आई पेपर आणण्यासाठी गेली असता उषाने घरातील फॅनच्या हुकला साडीच्या साहाय्याने गळफास घेतला. काही वेळाने आई घरी येऊन दरवाजा ढकलून बघितले असता उषाने गळफास घेतला होता.

यावेळी आरडाओरड झाल्याने शेजारील नागरिकांच्या मदतीने तिला तत्काळ घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. दरम्यान उषाने परीक्षेच्या तणावातून आत्महत्या केली असा अंदाज नातेवाइकांनी वर्तवला आहे. या प्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

दामदुप्पट पैसे देतो असे सांगून 15 लाखांची फसवणूक; दोघांविरोधात गुन्हा दाखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अल्पावधीत पैसे दुप्पट देतो असे सांगून 15 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार पंढरपुरात समोर आलं आहे. या प्रकरणी पंढरपूर येथील संकल्प पतसंस्थेचे चेअरमन प्रथेमश सुरेश कट्टे यांच्यासह एकावर फसवणुकीचा‌ गुन्हा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने खळबळ उडालीय.

याबाबत माहिती अशी की, सदर आरोपींशी ओळख असल्याने फिर्यादी सुरेश भिसे यांनी शेती खरेदी करण्याची इच्छा दोघांना बोलून दाखवली. याच संधीचा फायदा घेत आरोपी कट्टे आणि कोरके यांनी शेअर बाजारात पैसे गुंतवुन दुप्पट करण्याचे आमिष दाखवले. यासाठी भिसेला एच डी एफ सी बँकेतून कर्ज मिळवून दिले. 9 सप्टेंबर 2019 रोजी भिसेनी 15 लाख रुपये दामदुप्पट करण्याच्या अमिषा पोटी प्रथमेश कट्टेच्या खात्यात जमा केले.

त्यानंतर अद्याप कट्टे याने ते पैसे परत केले नाहीत. पैसे मागितल्यावर टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. अखेर आपली फसवणूक झाली हे लक्षात आल्यावर भिसे यांनी शहर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार प्रथमेश कट्टे आणि शुभम कोरकेवर भा द वि 420, 34 नुसार गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.