Sunday, December 21, 2025
Home Blog Page 2833

मुंबईतील ट्रॅफिकमुळे 3 टक्के जोडप्यांचे घटस्फोट होतात; अमृता फडणवीसांचा दावा

Amruta Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबईतील वाहतूक कोंडी मुळे तीन टक्के जोडप्यांचे घटस्फोट होतात असा दावा अमृता फडणवीस यांनी केला आहे. मुंबईतील एका कार्यक्रमात अमृता फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी मुंबईतील वाहतूक कोंडीवर भाष्य करताना घटस्फोटाशी संबंध जोडला.

मुंबईतील वाहतूक कोंडीमुळे तीन टक्के जोडप्यांचे घटस्फोट होत असल्याचे अमृता फडणवीस यांनी म्हटले. मुंबईत वाहतूक कोंडी वाढली असून खड्ड्यांमुळे आणखीच कोंडी होत असल्याचे वक्तव्य अमृता फडणवीस यांनी केले. एक सामान्य नागरीक म्हणून आपल्याला वाहतूक कोंडीचा हा त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी म्हटले.

यावेळी त्यांनी राज्य सरकार वर देखील निशाणा साधला. महाराष्ट्रातलं सरकार हे फक्त वसुली सरकार आहे. जनतेला किती समस्यांना सामोरं जावं लागत आहे याची काहीच सरकारला पडलेली नाही. जगही बोलू लागलंय की राज्यसरकारकडून दुजाभाव सुरू आहे, असं अमृता फडणवीस म्हणाल्या.

Share Market : जागतिक बाजारातील घसरणीचा परिणाम भारतातही दिसून आला, सेन्सेक्स 143 अंकांनी घसरला

Stock Market

नवी दिल्ली । गुरुवारी अमेरिकन आणि युरोपीय शेअर फ्युचर्समध्ये पुन्हा एकदा घसरण पाहायला मिळाली आणि त्याचाच परिणाम शुक्रवारी भारतीय बाजारांवर दिसून आला. आज निफ्टी 43.90 अंकांच्या किंवा 0.25 टक्क्यांच्या घसरणीसह 17516.30 च्या पातळीवर बंद झाला. BSE सेन्सेक्स 143.20 अंकांनी म्हणजेच 0.24 टक्क्यांनी घसरून 58644.82 वर बंद झाला. बँक निफ्टीबद्दल बोला म्हणजे तो 38789.30 वर बंद झाला. यामध्ये 220.70 अंकांची म्हणजेच 0.57% ची घसरण झाली.

संपूर्ण आठवड्यातील व्यवसायावर नजर टाकली तर या आठवड्यात निफ्टी आणि बँक निफ्टी 2 टक्क्यांहून अधिक वाढले आहेत. आजच्या ट्रेडिंगमध्ये बँकिंग, ऑटो, एफएमसीजी आणि आयटी शेअर्सवर दबाव होता.

वेगवेगळ्या क्षेत्रांबद्दल बोलायचे झाले तर रियलिटी मध्ये 2.76 टक्के घसरण झाली आहे, जी सर्वाधिक आहे. यानंतर PSU बँका 1.92 टक्क्यांनी घसरल्या आहेत. ऑटो 1.05%, फायनान्स 0.45% आणि फार्मा क्षेत्र 0.27% घसरले. सर्वात मोठी तेजी मेटल क्षेत्रात (+1.18%) दिसली.

निफ्टी 50 चे टॉप 5 गेनर्स
1. Hindalco: क्लोजिंग प्राइस 525.15
2. ONGC: क्लोजिंग प्राइस 169.60
3. सन फार्मा: क्लोजिंग प्राइस 893.95
4. एशियन पेंट्स : क्लोजिंग प्राइस 3,236.65
5. Divis Labs : क्लोजिंग प्राइस 4,304.50

निफ्टी 50 चे टॉप 5 लुझर्स
1. Hero Motocorp: क्लोजिंग प्राइस 2,721.75
2. SBI: क्लोजिंग प्राइस 530.30
3. NTPC : क्लोजिंग प्राइस 134.20
4. M&M : क्लोजिंग प्राइस 841.70
5. HDFC Life : क्लोजिंग प्राइस 624.35

Cryptocurrency Prices : क्रिप्टोची मार्केट कॅप झाली घसरण, बिटकॉइन आणि इथेरियममध्ये झाली चांगली वाढ

नवी दिल्ली । आज, 4 फेब्रुवारी, 2022 रोजी क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये मोठी घसरण झाली. ग्लोबल क्रिप्टोकरन्सीची मार्केट कॅप 4.44% घसरून $1.63 ट्रिलियनवर आली. मार्केट कॅप कमी झाली असली तरीही शुक्रवारी बिटकॉइन आणि इथेरियममध्ये लक्षणीय वाढ झाली होती. दुपारी 2.55 वाजता ही परिस्थिती होती.

गेल्या 24 तासांमध्‍ये सर्वात जास्त वाढ झालेल्या करन्सीबद्दल बोलायचे झाले तर इथेरियम 6.41% आणि सोलाना 8% च्या वाढीसह अव्व्ल स्थानी आहेत. या दोघांव्यतिरिक्त, Terra – LUNA, Avalanche – AVAX, आणि Polkadot ने देखील लक्षणीय वाढ नोंदवली आहे.

एका आठवड्यात इथेरियममध्ये 17% वाढ झाली
बातमी लिहिण्याच्या वेळी, Bitcoin 2.62% च्या वाढीसह $37,968.55 वर ट्रेड करत होता. एका आठवड्याबद्दल बोलायचे झाल्यास, बिटकॉइनच्या किंमतीत 3.39% ने वाढ झाली आहे. इथेरियम 6.41% वाढीसह हे कॉईन $2,830.85 वर ट्रेड करत होते. एका आठवड्यात इथेरियम 17.70% वाढला आहे. Bitcoin चे मार्केट वर्चस्व 41.7 टक्के आहे तर Ethereum चे मार्केट वर्चस्व 17.4 टक्के आहे.

24 तासांत सर्वाधिक वाढ झालेल्या करन्सीज
हे लिहिताना, Qrkita Token (QRT), Bird Token (BIRD) आणि Dogecolony (DOGECO) ही गेल्या 24 तासांत सर्वाधिक वाढ झालेल्या करन्सीज होत्या. Qrkita Token (QRT) ने गेल्या 24 तासांमध्ये 480.52% वाढ नोंदवली आहे. त्याचबरोबर Bird Token (BIRD) ने याच कालावधीत 471.39% ची वाढ नोंदवली आहे. याशिवाय Dogecolony (DOGECO) मध्येही 448.64% वाढ झाली आहे.

माजी आमदार हर्षवर्धन जाधव आणि पत्नी संजना जाधव यांच्या कार्यकर्त्यांमध्ये ‘राडा’

औरंगाबाद – कन्नड तालुक्यातील औराळा इथं माजी आमदार हर्षवर्धन जाधव आणि जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या संजना जाधव यांच्या समर्थकांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते काल आमने सामने आले. त्यानंतर काही वेळासाठी औराळ्यातील वातावरण प्रचंड तणावपूर्ण बनले होते. येथील आठवडी बाजारात देखील या धक्काबुक्कीचे पडसाद दिसून आले.

औराळा इथं हर्षवर्धन जाधव यांची सभा सुरु होती. सभा संपताच हर्षवर्धन जाधव यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात संजना जाधव यांच्या कार्यकर्त्यांनी जाब विचारला. त्यानंतर दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद सुरु झाला. नंतर या वादाला धक्काबुक्कीचे स्वरुप आले. गावातील काही तरुणांच्या मध्यस्थीने अखेर काही काळाने हे वातावरण शांत झाले. कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव आणि त्यांच्या पत्नी संजना जाधव यांच्यातील वाद सर्वश्रुत आहेत. केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावासाहेब दानवे यांच्या त्या कन्या आहेत. मागील वर्षीच हर्षवर्धन जाधव यांनी संजना जाधव यांना आता माझे नाव लावू नका, अशी भूमिका घेतली होती. त्यानंतर संजना जाधव यादेखील राजकारणात सक्रीय झाल्या असून कन्नड-सोयगाव मतदारसंघात त्या अॅक्टिव्ह आहेत. आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार हर्षवर्धन जाधव हे कन्नड तालुक्यातील विविध गावांमध्ये फिरत आहेत. सभा घेत आहेत. यासाठीच गुरुवारी औराळा इथं हर्षवर्धन जाधव यांची दुपारी बारा वाजेच्या सुमारास सभा सुरु होती. या सभेत हर्षवर्धन जाधव यांनी कुणाचेही नाव न घेता सर्व पक्षीय नेत्यांसह संजना समर्थकांवर टीका केली.

दरम्यान, संजना जाधव यांचे समर्थक तथा शेरोडीचे सरपंच जयेश बोरसे, आडगावचे सरपंच ज्ञानेश्वर बोरसे, आडगावचे सरपंच ज्ञानेश्वर निकम हे सभेदरम्यान स्टेजवर जाऊन बसले. सभा संपताच त्यांनी हर्षवर्धन जाधव यांना जाब विचारला. त्यानंतर दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद सुरु झाला. नंतर या वादाला धक्काबुक्कीचे स्वरुप आले. गावातील काही तरुणांच्या मध्यस्थीने अखेर काही काळाने हे वातावरण शांत झाले.

 

पाच जणांकडून फसवणूक : कराडच्या युवकाचे मुलीशी लावले खोटे लग्न; पोलिसांकडून गुन्हा दाखल

कराड प्रतिनिधी। सकलेन मुलाणी

लग्नावरून मुलगा अथवा मुलगीच्या कुटूंबियांची फसवणूक केल्याचे प्रकार घडतात. असाच एक प्रकार सातारा जिल्ह्यात घडला आहे. लग्न लावून देऊन युवकाची फसवणूक केल्याने पाच जणांवर विटा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाने विट्यासह खानापूर तालुक्यात खळबळ उडाली आहे. युवतीशी खोटे लग्न लावून चक्क युवकाची पाच जणांनी फसवणूक केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कराड येथील कुंभार गल्लीमधील गणेश बबन कुंभार या युवक गणेश बबन कुंभार व त्याच्या कुटुंबियांकडून लग्नासाठी प्रयत्न केले जात होते. या दरम्यान खानापूर तालुक्यातील सुलतानगादे येथील वर्षा बजरंग जाधव, खटाव तालुक्यातील आंबवडे येथील हिंदुराव पवार, सरीता प्रदिप पवार, दशरथ शिंदे यांनी गणेश याची भेट घेतली. सर्व चर्चा झाल्यानंतर त्याचे स्वाती (पुर्ण नांव माहित नाही) हिच्याशी लग्न लावून देण्यासाठी संबंधित पाच जणांनी गणेशाकडे रक्कमेची मागणी केली. त्यानंतर गणेशनेही त्यांना रोख दोन लाख रुपये, एक तोळे सोने आणि साडेतीन भाराचे चांदीचे दागिने दिले. त्यानंतर काही दिवस झाल्यानंतर ते पसार झाले.

या प्रकरणी गणेश कुंभार याने संबंधित पाच जणांविरोधात विटा पोलिसांत तक्रार दिली. गणेशच्या तक्रारीनूसार पाेलिसांनी वर्षा बजरंग जाधव ( सुलतानगादे, ता. खानापूर ), हिंदुराव पवार (आंबवडे, ता. खटाव, जि. सातारा ), स्वाती ( पुर्ण नांव माहित नाही ), सरीता प्रदिप पवार, दशरथ शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

बंडातात्यांवर घाणेरडे आरोप करणाऱ्यांची मानसिकता तपासली पाहिजे- तृप्ती देसाई

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर जेष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांच्यावर सर्वच स्तरातून टीका होत असताना तृप्ती देसाई यांनी मात्र बंडातात्यांवर टीका करणाऱ्या लोकांनाच खडेबोल सुनावले आहेत. बंडातात्यांवर घाणेरडे आरोप करणाऱ्यांची मानसिकता तपासली पाहिजे असे त्यांनी म्हंटल.

बंडातात्यांनी काल केलेले वक्तव्य संतापजनक आहेच, त्यांनी त्यावर माफी मागितली आहे. कायद्यानुसार कारवाई होईलच.परंतु बंडातात्यांवर घाणेरडे आरोप करणाऱ्यांची मानसिकता तपासली पाहिजे. बंडातात्या अनेक वर्षे व्यसनमुक्तीवर काम करतात, ते कीर्तनकार आहेतच परंतु त्यांनी समाजहितासाठी अनेक आंदोलनेही केलेली आहेत ,जी नवीन तरुण पिढीला माहितही नसतील. जे हजारो तरुणांची दारू सोडवण्यासाठी प्रयत्न केले ते कधी दारु पित नसतात, चांगल्या माणसाला विनाकारण बदनाम करु नका असे तृप्ती देसाई यांनी म्हंटल.

https://www.facebook.com/trupti.desai.589/posts/4852564834833400

बंडातात्यांनी मागितली माफी

दरम्यान, बंडा तात्या कराडकर यांनी आपल्या विधानाबाबत माफी मागितली आहे. सुप्रिया ताई आणि पंकजा ताई याना कोणतेही व्यसन नाही. मी अनावधानाने माझ्याकडुन ते विधान गेलं. मात्र आज मी त्या सर्वांची माफी मागतो. मला कोणाचाही अपमान करायचा नव्हता असेही त्यांनी म्हंटल.

नक्की दारू पिऊन कोण बोलतंय हे पाहावं लागेल; राऊतांचा बंडातात्यांवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या जेष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांच्याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांना विचारलं असता त्यांनी एका वाक्यात बंडातात्यांच्या विधानाचा समाचार घेतला.

बंडातात्या कराडकर यांनी राजकीय नेत्यांविरोधात वादग्रस्त विधान केलं आहे. यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. याबाबत संजय राऊत यांना विचारण्यात आले असता नक्की दारू पिऊन कोण बोलतंय… हे पाहावं लागेल असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

बंडातात्या नेमकं काय म्हणाले-
हभप बंडातात्या कराडकर यांनी सकाळी सकाळी राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे आणि भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्यावर दारु पिण्याचे आरोप केले. या सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे या दारुपिऊन रस्त्यावर नाचतात असा आरोप बंडातात्या यांनी केला. सुप्रिया सुळे दारुपिऊन रस्त्यावर पडल्याचे फोटो तुम्हाला ढिगाने मिळतील. राजकारणात येण्याआधी त्या दारुपिऊन पडत होत्या. सुप्रिया सुळे यांनी सांगावं की बंडातात्या खोटं बोलतायत”, असं बंड्यातात्या म्हणाले.

कराड शहरातील रस्त्यांच्या कामाची गटनेते सौरभ पाटील यांच्याकडून पाहणी; अधिकाऱ्यांना केल्या सूचना

कराड प्रतिनिधी। सकलेन मुलाणी

राज्याचे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी मंजूर केलेल्या निधीतून कराड शहरामध्ये विविध विकासकामे सध्या सुरू आहेत. याच निधीमधून प्रभाग क्रमांक 10 मध्ये खडीकरण व डांबरीकरण करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान या कामांची आज लोकशाही आघाडीचे गटनेते सौरभ पाटील यांनी पाहणी केली. तसेच कामासंदर्भात अधिकाऱ्यांना सूचनाही केल्या.

सध्या कराड शहरातील प्रभाग क्रमांक 10 मध्ये खडीकरण व डांबरीकरण करण्याचे काम केले जात आहे. आज गटनेते सौरव पाटील यांनी भेट देत नागरिकांशी संवाद साधला. यावेळी उपस्थित नागरिकांनी रस्त्याच्या सुरू असलेल्या कामासंदर्भात पाटील यांना माहिती दिली. त्यानंतर त्यांनी नगरपरिषदेचे अभियंता एम. एच. पाटील व संबंधित ठेकेदाराला दर्जात्मक काम करण्याच्या सूचनाही केल्या.

यावेळी पोपटराव साळुंखे, शिवाजी पवार, विक्रम भोपते, मंगेश वास्के, अजय सूर्यवंशी, महेश सुर्यवंशी, महेश चव्हाण , शशिकांत शिंदे, रुपेश चव्हाण, सतीश मुळीक, चंद्रहार नलवडे, बापू देसाई, आशितोष सुर्यवंशी, शेखर जाधव, सुनील घोरपडे संजय मुळीक, प्रदीप आवले, दादा पवार, अक्षय रैनाक, जयंत बेडेकर (दादा), सतीश भोंगाळे, भारत थोरवडे आदी उपस्थित होते.

औरंगाबादेत पाचवी पासूनचे सर्व वर्ग सुरू करण्यास परवानगी

औरंगाबाद – शहरात येत्या सोमवार पासून अर्थात 7 फेब्रुवारी पासून पाचवी पासूनचे प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मनपा प्रशासक अस्तिककुमार पांडेय यांच्या आदेशाने सदर आदेश जारी करण्यात आला आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याकारणाने शाळा बंद करण्यात आल्या होत्या. याआधी कोरोना स्थितीचा आढावा घेऊन ग्रामीण भागातील वर्ग सुरू करण्यात आले होते. मात्र शहरातील केवळ 8वी पासूनचे वर्ग सुरू करण्यात आले होते. आता ५वी ते ७वीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. आता शहरातील पाचवी पासूनचे पुढील सर्व वर्ग प्रत्यक्षपणे सुरू होतील.

दरम्यान, सर्व शाळांना मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. सर्व शिक्षकांचे लसीचे दोन्ही डोस झालेले असणे तसेच अन्य नियमांची पूर्तता व विद्यार्थ्यांची सुरक्षितता जपण्याबाबत सर्व शाळांना सूचित करण्यात आले आहे.

RBI कडून आणखी एका बँकेचे लायसन्स रद्द; ग्राहकांचे किती पैसे परत मिळणार हे जाणून घ्या

RBI

नवी दिल्ली । भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने महाराष्ट्राच्या इंडिपेंडन्स को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचे लायसन्स रद्द केले आहे. ही बँक आता ग्राहकांना आपली सेवा देऊ शकणार नाही. “परिणामी, बँक 03 फेब्रुवारी 2022 रोजी व्यवसाय बंद झाल्यापासून बँकिंग व्यवसाय करणे बंद करेल असे RBI ने एका निवेदनात म्हटले आहे. RBI ने गुरुवारी हा आदेश दिला.

RBI ने आपल्या आदेशात म्हटले आहे की, बँकेची आर्थिक स्थिती पाहता रिझर्व्ह बँकेने गेल्या वर्षीही त्यावर काही निर्बंध लादले होते. त्या निर्णयामुळे ग्राहकांना 6 महिने पैसे काढता आले नाहीत. मात्र तरीही बँकेच्या व्यावसायिक स्थितीत सुधारणा न झाल्याने आता लायसन्स रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बँकेकडे पुरेसे भांडवल नाही आणि भविष्यात आणखी कमाई होण्याची शक्यताही नाही, असे RBI ने आपल्या निर्णयात म्हटले आहे. अशा स्थितीत लायसन्स रद्द करणे हे ग्राहकांच्या हिताचे आहे.

नियमानुसार ग्राहकांना पैसे मिळतील
महाराष्ट्रातील नाशिक शहरात असलेल्या इंडिपेंडन्स को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचे लायसन्स रद्द करताना, RBI ने संबंधित विभाग आणि अधिकाऱ्यांनाही याबाबत कळवले आहे. बँकेने नियमानुसार ग्राहकांचे डिपॉझिट्स परत करण्याबाबत पावले उचलण्यास सांगितले आहे.

RBI च्या आदेशानुसार, बँकेच्या ग्राहकांना 5 लाख रुपयांपर्यंतचे डिपॉझिट्स परत केले जातील. बँकेच्या आकडेवारीनुसार, येथे 99% खातेधारकांना त्यांची संपूर्ण रक्कम मिळण्याचा हक्क आहे, म्हणजेच त्यांच्या बँक खात्यात 5 लाख किंवा त्याहून कमी रक्कम जमा आहे. अशा परिस्थितीत बँक लायसन्स रद्द करण्याच्या निर्णयाचा फटका फक्त 1 टक्के ग्राहकांनाच बसणार आहे.

फक्त 5 लाख रुपयांपर्यंतची रक्कम परत मिळेल
जर बँक बुडली तर ग्राहकांना जास्तीत जास्त 5 लाख रुपये परत मिळू शकतात. यापेक्षा जास्त रक्कम मिळू शकत नाही. डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट कॉर्पोरेशन (DICGC) च्या नियमांनुसार, प्रत्येक ग्राहकाचा 5 लाख रुपयांपर्यंतच्या डिपॉझिट्स साठी इन्शुरन्स काढला जातो. बँकेने RBI ला दिलेल्या माहितीनुसार, 27 जानेवारी 2022 पर्यंत बँकेने ग्राहकांना 2.36 कोटी रुपये परत केले आहेत.