Monday, December 22, 2025
Home Blog Page 2840

राष्ट्रपतीची घोषणा : साताऱ्याचे सुपुत्र अशोक पवार यांना जीवनरक्षक पुरस्कार

सातारा | मांडवे (ता. सातारा) येथील प्रवीण अशोक पवार या सुपुत्रास जीवनरक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. राष्ट्रपतींकडून या पुरस्काराची घोषणा केली आहे. दुबई-कोझिकोड विमानाच्या अपघातावेळी मदतकार्यात शौर्याची प्रचिती देणाऱ्या सातारच्या सुपुत्राचा गाैरव होणार आहे.

प्रवीण पवार हे सध्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात (CISF) पोलिस निरीक्षक या पदावर कार्यरत आहेत. 7 ऑगस्ट 2020 मध्ये दुबईहून कोझिकोडला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला अपघात झाला. या विमानातून 191 प्रवासी प्रवास करत होते. जोरदार पाऊस अन् प्रतिकूल हवामामुळे हे विमान कोझिकोडनजीकच्या दुर्गम भागात कोसळले होते. यावेळी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता प्रवीण पवार यांनी मोठ्या साहसाने अपघातातील जखमींना वाचविले होते.

या पार्श्वभूमीवर प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी जीवनरक्षक पुरस्कारांची घोषणा केली. त्यात देशभरातून 29 जणांना या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यात पवार यांचा समावेश आहे. एक लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

जर तुम्हीही अशा प्रकारे ट्रान्सझॅक्शन करत असाल तर सावध व्हा, RBI ने जारी केली महत्त्वाची माहिती

RBI

नवी दिल्ली । सध्या डिजिटल ट्रान्सझॅक्शनचा ट्रेंड झपाट्याने वाढतो आहे. अशा अनेक वेबसाइट्स आणि अ‍ॅप्स उपलब्ध आहेत ज्यांच्या मदतीने आपण पैसे ट्रान्सफर करतो. मात्र त्याचवेळी फसवणुकीच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. फसवणूक करणारे अनेक प्रकारे फसवणूक करत आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) पुन्हा एकदा फसवणुकी बाबतचा इशारा दिला आहे. सेंट्रल बँकेने ग्राहकांना फसवणूक करणाऱ्यांकडून होणाऱ्या नवीन फसवणुकीबाबत जागरूक राहण्यास सांगितले आहे. ही फसवणूक कशी टाळता येईल ते जाणून घेऊया.

RBI ने ट्विट करून माहिती दिली आहे
बँकिंग ट्रान्सझॅक्शनसाठी सुरक्षित वेबसाइट आणि अ‍ॅप्स वापरा. ट्रान्सझॅक्शनसाठी सार्वजनिक नेटवर्क टाळा. सिक्योर्ड डिजिटल ट्रान्सझॅक्शन तुमच्यापासून सुरू होतात.

अशा प्रकारे होते फसवणूक
सायबर गुन्हेगार फसवणूक करण्यासाठी बँक किंवा फायनान्स कंपनीच्या (800 123 1234) टोल फ्री क्रमांक 1800 123 1234 (हा खरा क्रमांक नाही) सारखा नंबर मिळवतात. त्यानंतर आरोपी हा क्रमांक कॉलरवर किंवा बँक किंवा फायनान्स कंपनीच्या नावाने इतर कोणत्याही अर्जावर नोंदवतात. अशा परिस्थितीत तुम्ही Truecaller च्या मदतीने बँक किंवा फायनान्स कंपनीला फोन केला तर अनेक वेळा हा फोन सायबर गुन्हेगाराकडे जातो आणि ते तुमच्याकडून तुमची सर्व माहिती घेतात आणि सायबर गुन्हे करतात.

अशा प्रकारची फसवणूक टाळा
तुम्ही कोणत्याही बँक किंवा फायनान्स कंपनीला कॉल करणार असाल, तर तुमच्याकडे तिच्या ट्रोल फ्री नंबरची संपूर्ण माहिती असली पाहिजे. त्याच वेळी, कोणत्याही बँकेच्या टोल फ्री नंबरवर तुमची सर्व माहिती कधीही शेअर करू नका.

बाप लेकीच्या नात्याला काळीमा ! बापानेच केला स्वतःच्या मुलीवर अत्याचार

rape

 

औरंगाबाद – नराधम बापानेच स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना वाळूज औद्योगिक परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी नराधम बापा विरोधात वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी नराधम बापाला अटक करण्यात केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबाद वाळूज पोलिस ठाणे हद्यीतील गुरूधानोरा येथे नेवरगाव येथे एक शेतकरी कुटुंब शेती व्यवसाय करतात. सप्टेंबर 2021 ते जानेवारी 2022 या 5 महिन्याच्या कालावधीत नराधम बापाने आपल्या स्वतःच्या 15 वर्षीय मुलीवर एकटी पाहून वेळोवेळी अत्याचार केले. विशेष म्हणजे ही माहीती आईसह भावाला सांगितली तर तुझा जीव घेईन अशी धमकी दिली. मात्र, मुलीने त्रास असाह्य झाल्याने आईला माहिती दिली. या विषयी आईने विरोध करण्याचा प्रयत्न करताच नराधम बापाने मुलीच्या आईच्या डोक्यात फरशी मारून तिला गंभीर जखमी केले. अखेर मुलीच्या आईने बुधवारी रोजी वाळूज पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी आरोपी नराधम बापा विरोधात अल्पवयीन मुलीचा छळ, जीवे मारण्याची धमकीसह पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरक्षक विनायक शेळके हे करीत आहे.

गोवा विधानसभा निवडणुकीवरून केजरीवाल यांनी केली ‘हि’ मोठी घोषणा; म्हणाले कि…

Arvind Kejriwal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गोवा विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या पक्षांतील नेत्यांकडून अनेकप्रकारच्या घोषणा केल्या जाऊ लागल्या आहेत. दरम्यान आज आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गोव्यातील जनतेसाठी मोठी घोषणा केली. गोव्यात जनतेने आम्हाला निवडून दिल्यास त्यांना मोफत वीज आणि पाणी देऊ, अशी घोषणा केजरीवाल यांनी केली.

आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी आज गोव्यातील माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी निवडणुकीसाठी तयार केलेला जाहीरनामा प्रसिद्ध केला. यावेळी ते म्हणाले की, गोव्यातील जनतेने आम्हाला निवडून दिले तर दिल्ली प्रमाणे मोफत वीज आणि पाणी दिले जाईल. यावेळी त्यांनी काँग्रेससह भाजप व इतर पक्षातील कार्यकर्त्यांना व समर्थकांनाही आवाहन केले. या निवडणुकीत आपला पाठींबा दिल्यास आपण पाणी आणि वीज या मोफत देण्याची घोषणा प्रत्यक्षात उतरवू असे केजरीवाल यांनी म्हंटले.

यावेळी केजरीवाल यांनी काँग्रेसवरही निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले की,काँग्रेसने पंचवीस वर्ष सत्ता उपभोगली. एखाद्या पक्षासाठी पंचवीस वर्षे खूप आहेत विकास करण्यासाठी. मात्र, काँग्रेसने पंचवीस वर्षात काहीही केले नाही. आम्ही गोव्याच्या निवडणुकीत अनेक विकासाचे मुद्दे घेऊन आलो आहोत. जर आमचा पक्ष यावेळी गोव्यात सत्तेवर आला तर पाच वर्षांत प्रत्येकाला किमान दहा लाखांचा फायदा करुन दिला जाईल, असेही केजरीवाल यांनी म्हंटले.

वकिलाची फी दिली नाही म्हणून आयुक्तांची खुर्ची जप्त करण्याचा न्यायालयाचा आदेश

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

मिरजेत प्रसिध्द वकिलाची अडीच लाख फी दिली नाही म्हणून मिरज महापालिका अतिरिक्त आयुक्तांची खुर्ची जप्त करण्याचे न्यायालयाचे आदेश दिल्याने एकच खळबळ उडाली. महापालिकेची लक्तरे निघाली असून वसुलीसाठी पथक जप्तीसाठी महापालिकेत पोहचल्यावर अधिकार्यांचे मात्र धाबे दणाणले. मात्र अतिरिक्त आयुक्त दत्तात्रय लांघी यांनी दोन लाखाचा चेक दिल्यानंतर न्यायालयाचे पथक परत गेले.

महापालिकेच्या मिरज विभागीय कार्यालयातील जंगम मालमत्ता जप्त करण्याचे आदेश मिरज न्यायालयाने दिल्यानंतर महापालिका कार्यालयात न्यायालयाचे बेलीफ हे अतिरिक्त आयुक्तांची खुर्ची जप्त करण्यासाठी आले होते. मिरजेतील प्रसिद्ध वकील प्रशांत नरवाडकर हे गेले अनेक वर्षे महापालिकेच्या पॅनलवर काम करत होते. सदर कालावधीत त्यांची फी महापालिकेने दिली नाही. याबाबत त्यांनी मिरज न्यायालयात 2019 साली वसुलीचा दावा दाखल केला. न्यायालयाने 2021 रोजी महापालिकेची जंगम मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार बुधवारी सकाळी 11 वाजता न्यायालयाचे पथक महापालिकेत जप्तीसाठी दाखल झाले.

यावेळी न्यायालयाचे बिलीफ यांनी अतिरिक्त आयुक्तांची खुर्ची जप्त करण्याची कारवाई सूरु करत असताना अतिरिक्त आयुक्त दत्तात्रय लांघी यांनी मध्यस्थी करत फिर्यादी यांना दोन लाखात तडजोड करून सायंकाळी 2 लाखाचा चेक दिल्यानंतर प्रकरणावर पडदा पडला. मात्र महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांची खुर्ची जप्त करण्यास पथक आल्यामुळे महापालिका कार्यालयात एकच धावपळ उडाली होते. महापालिकेच्या कारभाराची लक्तरे निघाल्याने शहरात एकच खळबळ उडाली. या घटनेने शहरात मात्र महापालिका कारभार कसा सुरू आहे हे चित्र स्पष्ट झाले.

तब्बल 10 ते 12 ठिकाणी चोरीचा प्रयत्न करत ‘या’ शहरातील उपनगरात चोरटयांच्या टोळीचा धुमाकूळ

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

इस्लामपूर शहरातील तलाठी कॉलनी, उरूण परिसर व जिजाऊनगर परिसरात सोमवार व मंगळवारी मध्यरात्री अज्ञात चोरटयांच्या टोळीने धुडगुस घातला. सोमवारी चोरटयांच्या हाताला फारसा मुद्देमाल लागला नाही परंतु मंगळवारी रात्री जिजाऊनगर येथील घरफोडी करून चोरटयांनी एलईडी, रोख रक्कम, चांदीची मुर्ती असा एकूण 37 हजार 700 रूपयांचा मुद्देमाल लंपास केला. इस्लामपूर शहर सीसीटिव्हीच्या कक्षेत आले असलेतरी चोरटयांनी मात्र दोन रात्री विविध भागात धाडसी चोरीचा प्रयत्न केल्याने इस्लामपूर पोलिसांसमोर चोरटयांचा बंदोबस्त करण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.

सोमवारी रात्री चोरटयांच्या टोळीने तलाठी कॉलनी व उरूण परिसरातील दहाहून अधिक घरे फोडण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्या हाताला फारसे काही लागले नाही. उरूण परिसरातील मध्यवस्तीत असणार्‍या उदय चौकातील डॉ.विश्वास पाटील यांच्या बंगल्याला चोरटयांनी लक्ष केले. परंतु पाटील कुटुंबिय जागे झाल्याने चोरटयांनी घटनास्थळावरून पलायन केले. पलायन करतानाही काही ठिकाणी घरफोडीचा प्रयत्न चोरटयांच्या टोळीने केला. जिजाऊनगर परिसरातील घरांना चोरटयांनी लक्ष केले.

बुधवारी सकाळी नवीन घरामध्ये देवपूजा करण्यासाठी अरविंद काळे कुटुंबियांसह गेले असता सकाळी 9.30 च्या सुमारास घराच्या दरवाजाचा कोयंडा तुटून कुलूप खाली पडलेले दिसून आले. घरातील साहित्य अस्ताव्यस्तपणे पडलेले होते. होमथिअटर, देवीची चांदीची मुर्ती व रोख रक्कम 25 हजार रूपये अज्ञातांनी चोरून नेल्याचे निदर्शनास आले. अरविंद काळे यांच्या घराशेजारील किसन रामचंद्र जाधव यांच्या घराचा दरवाज्याचाही कडी कोयंडा उचकटलेल्या अवस्थेत दिसून आला. त्यांच्या घरातील एलईडी टिव्ही चोरटयांनी गायब केला होता. इस्लामपूर शहरातील उपनगरांबरोबरच मध्यवस्तीत धाडसी चोरीचा प्रयत्न चोरटयांच्या टोळीने दोन दिवसात विविध भागामध्ये केलेला दिसून येत आहे. त्यामुळे ऐन थंडीच्या मोसमात चोरटयांनी चोरीचा धडाका सुरू केला आहे. पोलिस प्रशासनाने रात्रगस्त वाढवून चोरटयांचा पायबंद करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

नितेश राणे तुरुंगात पुस्तके वाचतायत?? जाणून घ्या व्हायरल फोटो मागील खरं सत्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप आमदार नितेश राणे यांना शिवसैनिक संतोष परब हल्ल्याप्रकरणी 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यानंतर काल रात्रीपासून नितेश राणे यांचा तुरुंगातील पुस्तक वाचत असल्याचा एक फोटो शोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. मात्र हा फोटो नेमका खरा आहे की खोटा? अन् कधीचा आहे याबाबत आपण जाणून घेऊया.

वास्तविक पाहता या व्हायरल फोटो मागील सत्य आम्ही तपासले असता हा फोटो 5 वर्षांपूर्वीचा आहे. नितेश राणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात वाळू प्रश्नावर राडा केला होता. त्याप्रकरणी त्यांना पाच वर्षांपूर्वी अटक करण्यात आली होती. मात्र सध्या अटक झाल्यानंतर त्यांचा हा जुना फोटो पुन्हा व्हायरल होत आहे.

दरम्यान, संतोष परब हल्ल्याप्रकरणी नितेश राणे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. काल दोन्ही वकिलांच्या सुनावणी नंतर नितेश राणे यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली. त्यामुळे राणेंचा मुक्काम दोन दिवस सावंतवाडी पोलीस ठाण्यात असेल. नितेश राणे यांना सावंतवाडीत आणल्याने या परिसरात अनेक राणे समर्थक उपस्थित आहेत. या पार्श्वभूमीवर सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या परिसरात कडेकोट सुरक्षा करण्यात आली आहे

समाजकल्याण सभापतींवर अ‍ॅट्रॉसिटी दाखल करण्याच्या मागणीसाठी जिल्हा परिषदेवर समतावादी महासंघाचा अर्धनग्न मोर्चा

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

तासगाव तालुक्यातील कवठेएकंद येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्ती सुधार योजनेंतर्गत भ्रष्टाचारासह समाजकल्याण सभापती प्रमोद शेंडगे यांनी केलेल्या जिल्हा नियोजन समितीमधील कामाच्या चौकशी करुन त्यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी समतावादी महासंघाच्यावतीने बुधवारी जिल्हा परिषदेवर अर्धनग्न मोर्चा काढण्यात आला. कवठेएकंद येथे अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्ती सुधार योजनेच्या कामांमध्ये भ्रष्टाचार झाला आहे.

जिल्हा परिषद समाज कल्याण विभागामार्फत नवबौद्ध वस्ती सुधार योजनेअंतर्गत कवठेएकंद येथे हाय मास्ट लाईटचे पोल उभारण्यात आले आहेत. हे पोल दलित वस्तीमध्ये न बसवता इतर ठिकाणी बसवले आहेत. या कामाशी संबधित जिल्हा परिषदेचे समाजकल्याण माजी सभापती प्रमोद शेंडगे त्याचबरोबर प्रशासकीय अधिकारी जे कोणी या पाठीमागे दोषी आहे.

त्यांची चौकशी करून कारवाई झाली पाहिजे. जिल्ह्यातील प्रत्येक गावात दलित वस्तीमधील निधी हा त्याच ठिकाणी खर्च केला आहे का? याचे थर्ड पार्टी ऑडिट करावे. त्या कामाची पात्रता तपासावी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन केले आहे का ? आराखड्याप्रमाणे कामे केली आहेत का? त्याचेही थर्ड पार्टी ऑडिट करण्याची मागणी करण्यात आली. शेंडगे यांच्यासह जे दोषी अधिकारी असतील, त्यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी जिल्हा परिषदेवर समतावादी महासंघाच्यावतीने अर्धनग्न मोर्चा काढण्यात आला. संबंधितांवर तात्काळ कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.

जात पडताळणी प्रमाणपत्र देण्यासाठी15 हजारांची लाच घेताना आर.पी.आय शहर अध्यक्षासह एकास अटक

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

सांगलीतल्या समाज कल्याण कार्यालयात वशिला लावून जात पडताळणी प्रमाणपत्र देण्याचे अमिश दाखवून १५ हजारांची लाच घेणाऱ्या राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यासह एकास अटक केली. अरुण बबन आठवले आणि प्रज्ञावंत गणपती चवडीकर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. विशेष म्हणजे यातील आठवले हा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या आरपीआय पक्षाचा जिल्हाध्यक्ष आहे. लाच लुचपत विभागाने केलेल्या या धडक कारवाईमुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

तक्रारदार यांनी सांगलीतील समाज कल्याण विभागात जात पडताळणी प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज केला होता. सदरचे प्रमाणपत्र हे लवकर मिळवून देतो, माझे खूप वजन आहे. वरिष्ठ अधिकारी माझे ऐकतात असे म्हणत आरपीआयचा शहर अध्यक्ष अरुण आठवले आणि प्रज्ञावंत चवडीकर या दोघांनी तक्रारदार यांच्याकडे १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यासाठी १५ हजार व स्वतःसाठी पाच हजार अशी एकूण २० हजार रुपयांची मागणी दोघांनी केली होती. त्यापैकी १५ हजार रुपये हे चवडीकर यांच्याकडे देण्यास आठवले याने सांगितले होते.

तक्रारदार यांनी मंगळवार दि. ०१ फेब्रुवारी रोजी लाच लुचपत विभागाकडे तक्रारी अर्ज केला होता. त्यांच्या तक्रारीवरून पडताळणी केली असता दोघांनी लाचेची मागणी केली असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर लाचलुचपत विभागाच्या पथकाने कॉलेज कॉर्नर येथे सापळा लावला असता चवडीकर याला १५ हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले.

“सदियों रहा है दुश्मन दौर-ए-ज़माँ हमारा…”; राणेंच्या अटकेप्रकरणी गोपीचंद पडळकरांचे ट्विट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर काल गुन्हा दाखल करीत त्यांना कणकवली पोलिसांकडून अटक करण्यात आली. दरम्यान न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची 4 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यावरून भाजप नेते आणि महाविकास अगदी सरकारमधील नेत्यांमध्ये एकमेकांवर टीका केली जात आहे. दरम्यान भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी एक सूचक असे ट्विट केले आहे. “कुछ बात है कि हस्ती मिटती नहीं हमारी, सदियों रहा है दुश्मन दौर-ए-ज़माँ हमारा…,” असे राणे यांच्याबाबत त्यांनी म्हंटले आहे.

भाजप नेत्यांमधील आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडूनही महाविकास आघाडी सरकावर निशाणा साधला जातो. त्यांनी भाजप आमदार नितेश राणे याच्या कालच्या अटक प्रकरणावरून एक सूचक असे ट्विट केले आहे. त्यांनी नितेश राणे यांचा एक फोटो ट्विट केला असून त्यावर “कुछ बात है कि हस्ती मिटती नहीं हमारी, सदियों रहा है दुश्मन दौर-ए-ज़माँ हमारा…,” असे कॅप्शन दिले आहे.

भाजप नेते तथा आमदार नितेश राणे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. काल कणकवली न्यायालयाने त्यांनी पोलीस कोठडी सुनावली आहे. राणे प्रकरणावरून भाजप नेत्यांकडून महाविकास आघाडी सरकारवर टीका केली जात आहे. तसेच राणे प्रकरणी जाणीवपूर्वक राजकारण केले जात असल्याचा आरोप भाजप नेत्यांकडून केला जात आहे.