Monday, December 22, 2025
Home Blog Page 2841

जात पडताळणी प्रमाणपत्र देण्यासाठी15 हजारांची लाच घेताना आर.पी.आय शहर अध्यक्षासह एकास अटक

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

सांगलीतल्या समाज कल्याण कार्यालयात वशिला लावून जात पडताळणी प्रमाणपत्र देण्याचे अमिश दाखवून १५ हजारांची लाच घेणाऱ्या राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यासह एकास अटक केली. अरुण बबन आठवले आणि प्रज्ञावंत गणपती चवडीकर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. विशेष म्हणजे यातील आठवले हा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या आरपीआय पक्षाचा जिल्हाध्यक्ष आहे. लाच लुचपत विभागाने केलेल्या या धडक कारवाईमुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

तक्रारदार यांनी सांगलीतील समाज कल्याण विभागात जात पडताळणी प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज केला होता. सदरचे प्रमाणपत्र हे लवकर मिळवून देतो, माझे खूप वजन आहे. वरिष्ठ अधिकारी माझे ऐकतात असे म्हणत आरपीआयचा शहर अध्यक्ष अरुण आठवले आणि प्रज्ञावंत चवडीकर या दोघांनी तक्रारदार यांच्याकडे १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यासाठी १५ हजार व स्वतःसाठी पाच हजार अशी एकूण २० हजार रुपयांची मागणी दोघांनी केली होती. त्यापैकी १५ हजार रुपये हे चवडीकर यांच्याकडे देण्यास आठवले याने सांगितले होते.

तक्रारदार यांनी मंगळवार दि. ०१ फेब्रुवारी रोजी लाच लुचपत विभागाकडे तक्रारी अर्ज केला होता. त्यांच्या तक्रारीवरून पडताळणी केली असता दोघांनी लाचेची मागणी केली असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर लाचलुचपत विभागाच्या पथकाने कॉलेज कॉर्नर येथे सापळा लावला असता चवडीकर याला १५ हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले.

“सदियों रहा है दुश्मन दौर-ए-ज़माँ हमारा…”; राणेंच्या अटकेप्रकरणी गोपीचंद पडळकरांचे ट्विट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर काल गुन्हा दाखल करीत त्यांना कणकवली पोलिसांकडून अटक करण्यात आली. दरम्यान न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची 4 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यावरून भाजप नेते आणि महाविकास अगदी सरकारमधील नेत्यांमध्ये एकमेकांवर टीका केली जात आहे. दरम्यान भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी एक सूचक असे ट्विट केले आहे. “कुछ बात है कि हस्ती मिटती नहीं हमारी, सदियों रहा है दुश्मन दौर-ए-ज़माँ हमारा…,” असे राणे यांच्याबाबत त्यांनी म्हंटले आहे.

भाजप नेत्यांमधील आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडूनही महाविकास आघाडी सरकावर निशाणा साधला जातो. त्यांनी भाजप आमदार नितेश राणे याच्या कालच्या अटक प्रकरणावरून एक सूचक असे ट्विट केले आहे. त्यांनी नितेश राणे यांचा एक फोटो ट्विट केला असून त्यावर “कुछ बात है कि हस्ती मिटती नहीं हमारी, सदियों रहा है दुश्मन दौर-ए-ज़माँ हमारा…,” असे कॅप्शन दिले आहे.

भाजप नेते तथा आमदार नितेश राणे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. काल कणकवली न्यायालयाने त्यांनी पोलीस कोठडी सुनावली आहे. राणे प्रकरणावरून भाजप नेत्यांकडून महाविकास आघाडी सरकारवर टीका केली जात आहे. तसेच राणे प्रकरणी जाणीवपूर्वक राजकारण केले जात असल्याचा आरोप भाजप नेत्यांकडून केला जात आहे.

मृत्यूवेळी बापाचा टाहो मुलाला वाचवा : अपघातातील पिता- पुत्रावर एकाच सरणावर अंत्यविधी

म्हसवड | माण तालुक्यातील नरबटवाडी (ढाकणी) येथील पिता- पुत्राला भरधाव बोलेरो चारचाकी गाडीने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. अपघातात वडिलांसोबत दुचाकीवरून निघालेला 13 वर्षाचा मुलगा ठार झाले आहे. ढाकणी फाट्यावर ही अत्यंत दुर्दैवी घटना घडली. या घटनेची फिर्याद म्हसवड पोलिस ठाण्यात  मयत पोपट तातोबा नरबट याचा चुलत भाऊ सुरेश मारुती नरबट (वय- 38, रा. नरबटवाडी, ता. माण) यांनी दिली.

याबाबतीत अधिक माहिती अशी, पोपट तातोबा नरबट (वय- 52) व त्यांचा मुलगा विश्वास पोपट नरबट (वय- 13, दोघे रा. नरबटवाडी, ता. माण) हे मंगळवारी सायंकाळी दुचाकीवरून म्हसवड-मायणी रस्त्याने म्हसवड कडून मायणीच्या दिशेने निघाले होते. ढाकणी फाटा येथे उसाने भरलेली ट्रॉली रस्त्याच्या कडेला उभी होती. यास ट्रॅक्टर जोडलेला नव्हता. रस्त्यावर उभ्या असलेल्या या ट्रॉलीला दुचाकी पास करत असताना समोरुन येणा-या पांढ-या रंगाचे बोलेरो गाडीवरील चालकाने जोराची धडक दिली. धडकेनंतर बोलेरो गाडी न थांबता निघुन गेली. या धडकेमध्ये दुचाकीवरील विश्वास पोपट नरबट यास जोराचा मार बसल्याने तो जागीच ठार झाला. तर त्याचे वडील पोपट तातोबा नरबट हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना पुढील उपचारासाठी अकलूज येथे नेत असताना त्यांचे रस्त्यातच निधन झाले.

फिर्यादीने ट्रॅक्टर मालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून हयगयीने व हलगर्जीपणाने ट्रॉली रस्त्यावर उभी केल्याने तसेच पांढ-या रंगाची बोलेरो गाडीवरील चालक यांनी धडक दिल्याने मुलगा व वडील यांचे मृत्यूस कारणीभूत असल्याचे नमूद करून त्यांचे विरोधात तक्रार दिली आहे.

मंगळवारी (दि.1) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ढाकणी येथे मुलगा विश्वास यास वह्या आणण्यासाठी गेले असता, काळाने त्यांच्यावर झडप घातली. अपघातानंतर मुलगा निपचित पडून आहे. हे लक्षात येताच मुलासाठी वडिल गंभीर जखमी असतानाही अरे कुणीतरी माझ्या मुलाला वाचवा असा टाहो फोडत होते. यावेळी उपस्थितांचे काळीज पिळवटून जात होते. याप्रसंगी ढाकणी येथील धिरज सरतापे यांनी प्राथमिक मदत मिळावी म्हणून खुप प्रयत्न केले. शेवटी पोपटराव नरबट यांच्या वर काळाने घाला घातल्याने दोघाही पिता पुत्रावर नरबटवाडी येथे एकाच सरणावर शोकाकुल वातावरणात अंत्यविधी करण्यात आला असून, या घटनेने ढाकणी नरबटवाडी सह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

10 वी – 12 वीच्या परीक्षा ऑफलाइन होणार; पहा परीक्षांचा कालावधी

Exam

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील 10 वी – 12 वीच्या परीक्षा ऑफलाइन होणार असल्याची महत्त्वपुर्ण माहिती बोर्डाने दिली आहे. तसेच विद्यार्थी शिकत असलेल्या शाळेतच परीक्षा केंद्र असणार आहेत. बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी याबाबत आज पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या ही 31 लाख आहे. तांत्रिक पद्धतीने ही परीक्षा घेणं शक्य नाही, त्यामुळे परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने घेणं शक्य नाही, असं शरद गोसावी म्हणाले.

10 वीच्या परीक्षा 15 मार्च ते 4 एप्रिल पर्यंत होतील तर 12 वीच्या लेखी परीक्षा 4 मार्च ते 30 मार्च पर्यंत होतील. 14 फेब्रुवारी ते 4 मार्च पर्यंत तोंडी परीक्षा होणार आहेत. परिक्षा हॉलमधे जास्तीत जास्त 25 विद्यार्थी एक सोडून एक या पद्धतीने बसवण्यात येतील. यावेळेस प्रॅक्टिकल परीक्षेसाठी शाळेबाहेरचे शिक्षक बहिस्थ परीक्षक म्हणून नसतील तर, त्याच शाळेतील शिक्षक अंत्यस्थ आणि बहिस्थ परीक्षक म्हणून काम करतील.प्रत्येक केंद्रावर वैद्यकीय सुविधा असतील असेही बोर्डाने सांगितलं.

विद्यार्थ्यांना 10 मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका देण्यात येणार आहेत. यावर्षी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना परिक्षा देण्यासाठी वाढीव वेळ मिळणार आहे. 40 ते 60 गुणांसाठी 15 मिनिटे अतिरिक्त वेळ मिळेल तर 70 ते 100 मिनिटे पेपर साठी अर्धा तास अतिरिक्त वेळ विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

सोन्या-चांदीच्या दरात घसरण, आजचा दर काय आहे ते पहा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अर्थसंकल्पाच्या एका दिवसानंतर आज सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. त्याच वेळी, चांदीच्या दरात थोडीशी घट झाली आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही एक चांगली संधी आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, एप्रिलमधील डिलिव्हरीसाठीचा सोन्याचा भाव आज 0.25 टक्क्यांनी घसरला आहे. त्याच वेळी, चांदीचे भाव 0.01 टक्क्यांच्या घसरणीसह ट्रेड करत आहेत.

सोन्या-चांदीची किंमत जाणून घ्या
एप्रिलमधील डिलिव्हरीसाठीचा सोन्याचा भाव आज 0.25 टक्क्यांनी घसरून 47,792 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. त्याचवेळी आजच्या ट्रेडिंग मध्ये चांदी 0.01 टक्क्यांनी घसरली. आज 1 किलो चांदीचा भाव 61,351 रुपये आहे.

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 44,950 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,000 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 45,500 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,650 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 45,500 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,650 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत.

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 45,500 रुपये
पुणे – 44,950 रुपये
नागपूर – 45,500 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 49,650 रुपये
पुणे – 49,000 रुपये
नागपूर – 49,650 रुपये

PolicyBazar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Gram 22 Carat Gold Yesterday 22 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4485.00 Rs 4485.00 0 %
8 GRAM Rs 35880 Rs 35880 0 %
10 GRAM Rs 44850 Rs 44850 0 %
100 GRAM Rs 448500 Rs 448500 0 %

 

PolicyBazar वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Gram 24 Carat Gold Yesterday 24 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4898.00 Rs 4899.00 0.02 %
8 GRAM Rs 39184 Rs 39192 0.02 %
10 GRAM Rs 48980 Rs 48990 0.02 %
100 GRAM Rs 489800 Rs 489900 0.02 %

 

नवरदेवाच्या ‘पिवळ्या’ हातात बेड्या

Crime

औरंगाबाद – हळदीच्या समारंभात तलवारी, जांबिया हातात धरून मित्रांचा बेधुंद नाचणाऱ्या नवरदेवा 6 त्याच्या सहा मित्रांना पुंडलिक नगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्या सर्वांना न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. लग्नात लागलेल्या हळदीच्या पिवळ्या हातात बेड्या पडल्या मुळे पुंडलिक नगर परिसरात खळबळ उडाली आहे. नवीन मध्ये नवरदेव विभीषण शिंदे (29), यश साखरे (19), शेख बादशहा (29), शुभम मोरे (22), किरण रोकडे (22) आणि वसीम शेख (20) यांचा समावेश आहे.

पुंडलिक नगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 जानेवारी रोजी विभीषणच्या हळदीचा कार्यक्रम होता. वसीम शेख याने तलवार आणि शुभम मोरे याने दोन जांबिया बाहेर काढले. तलवार म्यानातून काढून हातात उंच धरत, बेधुंदपणे नवरदेवासह इतर मित्र नाचू लागले. या सर्व धिंगाणाचे व्हिडिओ चित्रीकरणही करण्यात आले. यानंतर काही वेळातच व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केले. हे व्हिडिओ व्हायरल होत पोलिसांच्या हाती लागले. त्यावरून निरीक्षक गांगुर्डे यांनी सहाय्यक निरीक्षक खटाणे यांच्या पथकाला संबंधितांना अटक करण्याचे निर्देश दिले.

त्यानंतर खटाणे, हवालदार लक्ष्मणराव हिंगे, बाळाराम चौरे नाईक गणेश वैराळकर, जालिंदर मांटे, गणेश डोईफोडे, संतोष पारधे यांच्या पथकाने सर्वांना अटक केली.

Stock Market : बाजाराची सपाट पातळीवर सुरुवात, सेन्सेक्स-निफ्टी रेड मार्कवर

नवी दिल्ली । संमिश्र जागतिक संकेतांच्या दरम्यान भारतीय बाजाराला सपाट पातळीवर सुरुवात झाली आहे. शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक सेन्सेक्स सकाळी 9.45 वाजता 266.75 अंकांनी किंवा 0.45 टक्क्यांच्या घसरणीसह 59291.58 वर ट्रेड करत होता. तर दुसरीकडे, निफ्टी 28.45 अंकांच्या घसरणीनंतर 17,751.55 वर ट्रेड करताना दिसला.

सकाळी 09:15 वाजता, सेन्सेक्स 77.67 अंकांनी किंवा 0.13 टक्क्यांनी घसरून 59480.66 वर उघडला, तर निफ्टी 18.70 अंकांनी किंवा 0.11 टक्क्यांनी घसरून 17761.30 च्या पातळीवर होता.

हे शेअर्स रेड मार्कवर ट्रेड करत आहेत
आज सेन्सेक्सच्या 30 शेअर्सपैकी 21 शेअर्स घसरणीसह ट्रेड करत आहेत. मारुतीचे शेअर्स 1.31 टक्क्यांच्या वाढीसह अव्वल स्थानावर आहेत, यासह सर्वात मोठी घसरण एचडीएफसीच्या शेअरमध्ये नोंदवली जात आहे. याशिवाय एलटी, बजाज फायनान्स, कोटक बँक, आयसीआयसीआय बँक, टेकमहिंद्रा, एचसीएल टेक, हिंदुस्तान लीव्हर, विप्रो इत्यादींमध्ये घसरण आहे. त्याच वेळी, निफ्टी निर्देशांकातील 50 पैकी 34 शेअर्स रेड मार्कवर आहेत.

टॉप लुझर्स आणि टॉप गेनर्स
टाटा कन्झ्युमर प्रोड्क्टस, टायटन कंपनी, आयओसी, एशियन पेंट्स आणि बजाज ऑटो हे निफ्टीमध्ये टॉप गेनर्स आहेत. दुसरीकडे, एनटीपीसी, टाटा स्टील, इंडसइंड बँक, टेक महिंद्रा आणि विप्रो हे निफ्टीचे टॉप लुझर्स आहेत.

टायर कंपन्या फोकसमध्ये
आज टायर स्टॉकवर लक्ष केंद्रित करा. तिसर्‍या तिमाहीत अपोलो टायरचा नफा 49% कमी झाला आहे आणि मार्जिनमध्येही मोठी घट झाली आहे. त्याच वेळी, CCI ने टायर कंपन्यांना कार्टेलायझेशनच्या आरोपाखाली मोठा दंड ठोठावला. अपोलोला 425 रुपये आणि एमआरएफला 622 कोटी रुपये दंड भरावा लागेल.

ITC आणि Titan चे निकाल आज येतील
आज ITC आणि Titan चे Q3 चे निकाल जाहीर होतील. ITC चा नफा 6% वाढू शकतो. मार्जिन सुधारणा शक्य आहे. सिगारेटचे प्रमाण 7 ते 8% वाढण्याची अपेक्षा आहे. त्याच वेळी, टायटनचा नफा दुप्पट असू शकतो, मार्जिन वाढणे देखील शक्य आहे. ITC आणि Titan 1 आठवड्यात सुमारे 6% वाढले आहेत.

TATA ची नेक्सॉन आणि Maruti ची Brezza येणार CNG मध्ये; कधी होईल लॉंचिंग??

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात पेट्रोल आणि डीझेलच्या वाढत्या किमतींमुळे ग्राहकांचा कल हा CNG गाड्यांकडे वळला आहे. याच पार्श्वभूमीवर आता TATA कडून CNG नेक्सॉन आणि मारुती कडून  CNG Brezza चे लॉंचिंग करण्याची तयारी सुरू आहे.

टाटा ने यापूर्वीच सीएनजी सेगमेंटमध्ये पाऊल ठेवले असून. टियागो (Tiago) आणि टिगोर (Tigor) ला कंपनीने फॅक्ट्री फिटेड सीएनजी किट सोबत लाँच केले आहे. त्यात आता कंपनीची सर्वात पॉप्युलर असलेल्या टाटा नेक्सॉनला CNG किटसोबत बाजारात आणण्याची तयारी टाटा कडून सुरू आहे.

माहितीनुसार, टाटा मोटर्स सणासुदीच्या हंगामात म्हणजे ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर 2022 पर्यंत नेक्सॉन सीएनजी बाजारात सादर करेल. Nexon च्या CNG प्रकाराव्यतिरिक्त, कंपनी या SUV च्या इलेक्ट्रिक प्रकारावर देखील काम करत आहे.

दरम्यान, CNG गाड्यांचा वाढता प्रभाव पाहता मारुती देखील आता विटारा ब्रेझा सीएनजी आणण्याची तयारी करीत आहे. यावर्षी दुसऱ्या तिमाहीत लाँच केली जावू शकते. यापूर्वी फक्त मारुती आणि ह्युंदाईची फॅक्ट्री फिटेड सीएनजी सोबत आपले मॉडल्स विक्री करीत होती. मात्र आता टाटा कंपनी यामध्ये उतरल्याने स्पर्धा वाढली आहे.

मेंदूवर हर्बल टोबॅकोचा परिणाम झाल्याने मलिक अशी वक्तव्य करत आहेत; भाजप नेत्याची टीका

nawab malik bjp

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजप नेत्यांवर गंभीर आरोप केले. मलिक यांच्या आरोपानंतर आता भाजपा नेत्यांकडूनही प्रत्युत्तर देण्यास सुरुवात झाली आहे. भाजपाचे नेते मोहित कंबोज यांनी नवाब मलिक यांच्या मेंदूवर हर्बल टोबॅकोचा परिणाम झाल्याने ते अशी वक्तव्य करत आहेत, असा टोला टोला लगावला आहे.

भाजपाचे नेते मोहित कंबोज यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, नवाब मलिक रोज हर्बल टोबॅकोचा वापर करत आहेत. त्यामुळे त्याचा परिणाम त्यांच्या मेंदूवर झाला आहे. या अती वापराने त्यांच्या मेंदूमधील नसांना नुकसान झाले आहे. त्यामुळेच ते या पद्धतीच्या फालतू गोष्टी बोललेत. अशी वक्तव्य एखादा संतुलन बिघडेलेला व्यक्तीच करु शकतो,” अशी टीका कंबोज यांनी केली आहे.

यावेळी कंबोज मलिकांवर टीका करताना पुढे म्हणाले की, भाजपवर टीका करणाऱ्या मलिक यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी कि ज्यांचा स्वत:चा जावई आणि घरातील व्यक्तींचा गांजा प्रकरणाशी संबंध आहे. गांजा विक्री, तस्करीशी ज्यांच्या नातेवाईकांचा संबंध आहे ते काय दुसऱ्यांकडे बोटं दाखवत आहेत.

काय म्हणाले होते नवाब मलिक

काल माध्यमांशी संवाद साधताना राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजपवर सडकून टीका होती. यावेळी ते म्हणाले होते की, “वाइन विक्रीचा निर्णय सरकारने मागील आठवड्यामध्ये घेतला. हिमाचल सरकारने, गोवा सरकारने हाच निर्णय घेतला होता की नाही हे भाजप नेत्यांनी सांगावे. तसेच भाजप नेत्यांचे दारु निर्मितीचे कारखाने, त्याचे परवाने भाजपाचे नेते सरेंडर करणार का? त्यांनी आम्ही दारू पिणार नाही अशी शपथ घ्यावी, अशी मागणीही यावेळी मलिक यांनी केली.