Monday, December 22, 2025
Home Blog Page 2842

मेंदूवर हर्बल टोबॅकोचा परिणाम झाल्याने मलिक अशी वक्तव्य करत आहेत; भाजप नेत्याची टीका

nawab malik bjp

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजप नेत्यांवर गंभीर आरोप केले. मलिक यांच्या आरोपानंतर आता भाजपा नेत्यांकडूनही प्रत्युत्तर देण्यास सुरुवात झाली आहे. भाजपाचे नेते मोहित कंबोज यांनी नवाब मलिक यांच्या मेंदूवर हर्बल टोबॅकोचा परिणाम झाल्याने ते अशी वक्तव्य करत आहेत, असा टोला टोला लगावला आहे.

भाजपाचे नेते मोहित कंबोज यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, नवाब मलिक रोज हर्बल टोबॅकोचा वापर करत आहेत. त्यामुळे त्याचा परिणाम त्यांच्या मेंदूवर झाला आहे. या अती वापराने त्यांच्या मेंदूमधील नसांना नुकसान झाले आहे. त्यामुळेच ते या पद्धतीच्या फालतू गोष्टी बोललेत. अशी वक्तव्य एखादा संतुलन बिघडेलेला व्यक्तीच करु शकतो,” अशी टीका कंबोज यांनी केली आहे.

यावेळी कंबोज मलिकांवर टीका करताना पुढे म्हणाले की, भाजपवर टीका करणाऱ्या मलिक यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी कि ज्यांचा स्वत:चा जावई आणि घरातील व्यक्तींचा गांजा प्रकरणाशी संबंध आहे. गांजा विक्री, तस्करीशी ज्यांच्या नातेवाईकांचा संबंध आहे ते काय दुसऱ्यांकडे बोटं दाखवत आहेत.

काय म्हणाले होते नवाब मलिक

काल माध्यमांशी संवाद साधताना राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजपवर सडकून टीका होती. यावेळी ते म्हणाले होते की, “वाइन विक्रीचा निर्णय सरकारने मागील आठवड्यामध्ये घेतला. हिमाचल सरकारने, गोवा सरकारने हाच निर्णय घेतला होता की नाही हे भाजप नेत्यांनी सांगावे. तसेच भाजप नेत्यांचे दारु निर्मितीचे कारखाने, त्याचे परवाने भाजपाचे नेते सरेंडर करणार का? त्यांनी आम्ही दारू पिणार नाही अशी शपथ घ्यावी, अशी मागणीही यावेळी मलिक यांनी केली.

पुणे- बंगळूर महामार्गावर 7/12 जवळ भीषण अपघात : जखमींची प्रकृती चिंताजनक

सातारा | पुणे- बंगळूर महामार्गावर सातारा शहराजवळ शेंद्रे गावाच्या हद्दीत एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. साताऱ्याकडून कराडच्या दिशेने निघालेल्या एर्टीगा कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्यालगत असणार्‍या दुभाजकाला धडकली. या भीषण अपघातात सहाजण गंभीर जखमी असून यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. राज्यात अपघाताच्या घटना वारंवार घडताना दिसत आहेत.

दरम्यान, अपघातात कारचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच हे सर्व प्रवासी सातारा शहरातील कामाटीपुरा परिसरातील आहेत. या घटनेची माहिती होताच छत्रपती शिवेंद्रसिंहराजे ट्रेकर्सची टीम तत्काळ अपघातस्थळी दाखल झाली. त्यांनी जखमींना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसेच जखमींच्या नातेवाईकांना सुध्दा कळविण्यात आलं आहे.

सातारा शहराजवळ शेंद्रे गावाच्या परिसरात सातबारा हॉटेल आहे. या हॉटेलच्या परिसरात हा अपघात घडला. एर्टीगा कारमधून काही प्रवसी साताऱ्याहून कराडकडे जात होते. यावेळी भरधाव वेगता असताना चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. यानंतर एर्टीगा कार थेट दुभाजकावर जाऊन आदळली. या अपघताचाी तीव्रता जास्त असल्यामुळे कारमधील सहाजण जखमी झाले. तसेच दोघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहे.

भारतीय क्रिकेट संघात कोरोनाचा शिरकाव; अनेक दिग्गज खेळाडूंना कोरोनाची लागण

indian cricket

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | वेस्ट इंडिज विरुध्दच्या मालिकेपूर्वीच भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. भारताच्या 7 खेळाडूंचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये शिखर धवन, श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड अशा दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे.

6 फेब्रुवारी पासून भारत आणि वेस्ट इंडिज मध्ये 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका होणार आहे. हे सर्व सामने अहमदाबाद येथे खेळवण्यात येतील. त्यापूर्वीच भारतीय संघातील तब्बल 7 खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याने आता मालिकेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

बीसीसीआयने सांगितले की, प्रत्येक सदस्याला अहमदाबादचा प्रवास सुरू करण्यापूर्वी घरी आरटी-पीसीआर चाचणी घेण्यास सांगण्यात होते. तेव्हा त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. 31 जानेवारी रोजी धवन आणि नवदीप सैनी कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यानंतर 1 फेब्रुवारीला रुतुराज गायकवाडचा अहवाल पॉझिटिव्ह आला. मात्र, एक दिवस आधी झालेल्या चाचणीत त्याचा अहवाल निगेटिव्ह आला होता. 2 फेब्रुवारी ला श्रेयस अय्यरचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.

महाराष्ट्रात कायद्यांचे राज्य, कायद्यापुढे सर्व समान; नितेश राणेंप्रकरणी राऊतांची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना कार्यकर्ते संतोष परब हल्ला प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे याच्यावर काल गुन्हा दाखल करीत त्यांना कणकवली पोलिसांकडून अटक करण्यात आली. दरम्यान न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची 4 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. “महाराष्ट्रात कायद्यांचे राज्य आहे, कायद्यापुढे सर्व समान आहे. कुणाला असे वाटले कि न्यायालयाची कारवी चुकीची आहे तर न्यायालयीन लढाई चालू आहे त्यांची,” असे राऊत यांनी म्हंटले.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद सोडला. यावेळी ते म्हणाले की, नितेश राणे काल न्यायालयात हजर झाले. त्यांच्याबाबत सांगायचे झाले तर महाराष्ट्रात कायद्यांचे राज्य आहे. त्यांनी कायद्यांचे पालन करावे. त्यांना वाटले न्यायालयाचे कामकाज चुकीचे आहे तर त्यांनी न्यायालयात तसे विचारावे.

महाराष्ट्रात सध्या एकही राजकीय घडामोडी घडत आहेत. परमबीर सिंह यांनी अनेकांची नवे घेतली आहे. त्यांच्यावर सध्या खंडणीचा गुन्हा आहे. महाराष्ट्रात कायद्याचं राज्य आहे. कायद्यापुढे सगळे समान आहेत. परमबीर सिंह यांच्यावर खंडणीपासून अपहरणापर्यंत अनेक आरोप आहेत. आरोपी आपल्या बचावासाठी अनेकांचे नावे घेत असतो. विरोधी पक्षाने कितीही भांडवल केले तरी याचा काही उपयोग नाही. आम्हीही २०२४ पर्यंत सर्वकाही सहन करणार आहोत, असे राऊत यांनी म्हंटले.

साताऱ्याचे सुपुत्र माजी खासदार गजाजन बाबर यांचे निधन

पुणे | माजी खासदार गजानन बाबर (वय-78) यांचे पिंपरी-चिंचवड येथे निधन झाले. त्यांना मागच्या काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर पिंपरी-चिंचवडमधील एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र बुधवारी दुपारी 3 वाजून 25 मिनीटांनी उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी राजश्री बाबर आणि २ मुले असा परिवार आहे. निगडी येथे आज गुरूवारी सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

मुळचे सातारा जिल्ह्यातील असलेल्या गजानन बाबर यांनी 1990 साली वाई मतदारसंघातून शिवसेना उमेदवार म्हणून विधानसभा लढविली होती. त्यावेळी त्यांना मदनराव पिसाळ यांच्या विरोधात 20 हजार 417 मते मिळाली होती. त्यानंतर त्यांनी पिंपरी – चिंचवडच्या राजकारणात स्थान निर्माण केले होते. एक कडवट शिवसैनिक म्हणून त्यांनी ओळख मिळवली होती. पिंपरी चिंचवडमधील काळभोरनगर येथे शिवसेनेची पहिली शाखा देखील त्यांनीच सुरु केली होती, यानंतर पिंपरीमधील पारंपरिक प्रस्थ काळभोर यांना हादरा देत बाबर यांनी पहिल्यांदा भगवा फडकवला.

भुईंज येथील किसन वीर साखर कारखान्याचे ते उपाध्यक्ष होते. मागील काही वर्षात ते साखर कारखाना सोडून इतर राजकारणापासून अलिप्त होते. किकली येथील नवभारत विकास सोसायटीचे ते सध्या अध्यक्ष होते. त्यांच्यावर निगडी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. गजानन बाबर हे 3 वेळा नगरसेवक, हवेली मतदार संघातून 2 वेळा आमदार झाले. मात्र 2004 मध्ये त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलास लांडे यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. पण त्यातूनही हार न मानत 2009 ते 2014 या दरम्यान ते मावळ मतदारसंघातून शिवसेनेकडून लोकसभेवर निवडून गेले.

“किराणा दुकानात काम करणाऱ्या पोराला बाळासाहेबांनी आमदार-खासदार केले”, असे बाबर यांच्याबद्दल बोलले जायचे. मात्र 2014 साली शिवसेनेने त्यांचे तिकीट कापून श्रीरंग बारणे यांना दिले. त्यामुळे तेव्हा पासूनच ते पक्षावर नाराज होते आणि त्यांनी मनसेत प्रवेश केला होता. मात्र तिथे फार काळ ते रमले नाहीत. महापालिका निवडणूक तोंडावर आल्यानंतरही शिवसेनेकडून विशेष जबाबदारी दिली जात नसल्यामुळे ते पक्षावर नाराज हाेते. त्यानंतर 2017 साली त्यांनी तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये भाजपला जवळ केले होते.

सर्वात जास्त दारू पिणारे लोक भाजपात, आम्ही दारु पिणार नाही अशी शपथ घ्या – नवाब मलिक

nawab malik

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य सरकारने वाईनला सुपर मार्केटमध्ये विक्रीसाठी परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावरून भाजपकडून राज्य सरकावर निशाणा साधला जात आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस नेते नवाब मलिक यांनी भाजपवर टीका केली. “भाजपा नेत्यांची भूमिका ही दुटप्पीपणाची आहे. दारू बंद करण्याबाबत ते बोलत आहेत. मात्र, सर्वात जास्त दारू पिणारे लोक भाजपात आहेत. आजपासून आम्ही दारु पिणार नाही, अशी शपथ भाजपाच्या नेत्यांनी घ्यावी,” अशी मागणी मलिक यांनी केली.

नवाब मलिक यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “वाइन विक्रीचा निर्णय सरकारने मागील आठवड्यामध्ये घेतला. हिमाचल, गोवा सरकारने देखील हाच निर्णय घेतला होता. महाराष्ट्रात वाइन विक्रीच्या निर्णयाचा विरोध केला जात आहार. आणि तो कोण करतोय तर भाजपा. विरोध करणाऱ्या भाजप नेत्यांचेच दारु निर्मितीचे कारखाने आहेत. त्याचे परवाने भाजपाचे नेते सरेंडर करणार का?अनेक नेत्यांची वाइन विक्री आणि मद्यविक्रीची दुकाने देखील आहेत.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे भाजपमधील काही लोकांचे बार आहेत. सर्वात जास्त दारू पिणारे लोक हे भाजपात आहेत. त्यांची तर एक नेता सांगतेय की थोडी थोडी पित जा. भाजपमधील नेत्यांनी आता सांगावे कि आजपासून आम्ही दारु पिणार नाही तशी त्यांनी शपथ घ्यावी, असे मलिक यांनी म्हंटले.

एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं; डोळ्यादेखत पत्नीसह बाळाचा मृत्यू

परभणी : हॅलो महाराष्ट्र – परभणी जिल्ह्यातील रहाटी याठिकाणी एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. या घटनेत एका कुटुंबासोबत अशी घटना घडली जी एका क्षणात होत्याचे नव्हतं झालं. यामध्ये ऑटो रिक्षातून कुटुंबासह परभणीच्या दिशेनं जात असताना, वाटेत झालेल्या भीषण अपघातात आईसह 8 महिन्याच्या चिमुकल्याला आपला जीव गमवावा लागला आहे तर वडील वडील या अपघातात गंभीररित्या जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच आसपासच्या लोकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं. पण प्राथमिक तपासणी करत डॉक्टरांनी बाळासह आईला मृत घोषित केले.

काय आहे प्रकरण ?
पद्मिनी मुंजाजी शिंदे असे मृत पावलेल्या आईचे नाव आहे तर वैभव मुंजाजी शिंदे असे आठ महिन्याच्या बाळाचे नाव आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, पूर्णा तालुक्यातील बरबडी येथील रहिवासी असलेले मुंजाजी शिदे आपल्या पत्नी आणि 8 महिन्याच्या बाळाला घेऊन परभणीच्या दिशेनं जात होते. यादरम्यान वसमत ते परभणी या राष्ट्रीय महामार्गावर रहाटीजवळ जरा खराब रस्ता आहे. याठिकाणी रस्त्यावर अनेक खड्डे पडले आहेत. हे खड्डे चुकवत असताना एका अज्ञात वाहनाने मुंजाजी शिदे यांच्या रिक्षाला जोरदार धडक दिली आणि ऑटो रिक्षा उलटली.

या अपघातात आईसह आठ महिन्याच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. तर वडील मुंजाजी शिदे गंभीररीत्या जखमी झाली आहेत. या अपघातानंतर या कुटुंबाला आसपासच्या नागरिकांनी तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच आई आणि बाळाचा मृत्यू झाला होता. तर जखमी वडील मुंजाजी शिदे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताची माहिती समजताच संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.

भिवंडीत चोरटयांनी हॉटेलचे शटर उचकटून गल्ल्यावर मारला डल्ला

bhiwandi crime

भिवंडी : हॅलो महाराष्ट्र – मागील काही काळापासून भिवंडी शहरात चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. हे आरोपी चोर रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन दुकानांवर व घरांवर दरोडा टाकत असत. अशीच एक घटना भिवंडी शहरातील कणेरी परिसरामध्ये घडली आहे. या ठिकाणी चोरटयांनी मुक्कदर हॉटेलचं शटर उचकटून हॉटेलमधील गल्लाच लंपास केला आहे. हि संपूर्ण घटना त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

काय आहे प्रकरण ?
भिवंडी शहरातील कणेरी परिसरात मुक्कदर नावाचं एक हॉटेल आहे. आरोपी चोरट्यानं 30 जानेवारी रोजी रात्री अडीचच्या सुमारास हॉटेलचं शटर उचकटून आतमध्ये प्रवेश केला होता. यादरम्यान हॉटेलमध्ये एक व्यक्ती झोपला होता. पण आरोपीने चोर पावलाने आतमध्ये प्रवेश करत सर्व पैशांसह गल्ला लंपास केला. यावेळी आरोपीने त्या झोपलेल्या व्यक्तीचा मोबाइल देखील लंपास केला केला. हि संपूर्ण घटना त्या ठिकणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरु केला आहे.

या व्हिडिओमध्ये दिसत आहे कि, आरोपी चोर अत्यंत शिताफीने शटर उचकटताना दिसत आहे. हॉटेलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी त्याने आसपास आपल्याला कोणी पाहत तर नाही ना? याची चाचपणी केली. यानंतर त्याने चोर पावलाने आतमध्ये प्रवेश केला. आरोपीने ज्या पद्धतीने चोरी केली ते पाहता तो एक सराईत चोर असल्याचे समजत आहे. पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास सुरु करण्यात आला आहे.

सरकारने Twitter आणि Google ला खडसावले, म्हणाले- “कारवाई न केल्यास…”

Social Media

नवी दिल्ली । फेक न्यूजच्या बाबतीत ट्विटर, गुगलचे आणि केंद्र सरकारची जोरदार चर्चा चव्हाट्यावर आली आहे. केंद्राच्या अधिकार्‍यांनी दोन्ही टेक कंपन्यांना आपल्या प्लॅटफॉर्मवरील फेक न्यूज संदर्भात उचललेल्या पावलांबद्दल फटकारले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अधिकार्‍यांनी या दोन्ही कंपन्यांवर जोरदार टीका केली आणि म्हटले की,”फेक न्यूजवर कारवाई करण्यात दाखवलेल्या निष्क्रियतेमुळे सरकारला कंटेंट काढून टाकण्याचे आदेश द्यावे लागले, ज्यामुळे सरकारला आंतरराष्ट्रीय टीकेला सामोरे जावे लागले.”

सोमवारी व्हर्च्युअली झालेली ही बैठक काहीशी तणावपूर्ण होती, यावरूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रशासन आणि अमेरिकन टेक कंपन्यांमधील संबंध कसे आहेत याची माहिती कळते, असे सूत्रांनी सांगितले. मात्र, अधिकाऱ्यांनी या बैठकीत सदर कंपन्यांना कोणताही अल्टिमेटम दिलेला नाही, अशी माहिती देखील सूत्रांनी दिली. केंद्र सरकार टेक्नॉलॉजी सेक्टर संबंधीचे नियम कडक करत आहे, मात्र कंपन्यांनी कंटेंट मॉडरेशनवर आणखी काम करावे अशी सरकारची इच्छा आहे.

सरकारने 55 अकाउंट्स ब्लॉक केले आहेत
डिसेंबर आणि जानेवारीमध्ये माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने Google च्या YouTube प्लॅटफॉर्मवरील 55 चॅनेल आणि काही ट्विटर आणि फेसबुक अकाउंट्स ब्लॉक करण्यासाठी “आपत्कालीन अधिकार” वापरल्यानंतर ही बैठक झाली.

सरकारने म्हटले होते की, चॅनेल “फेक न्यूज” किंवा “भारतविरोधी” कंटेंटचा प्रचार करत आहेत आणि पाकिस्तानमधील अकाउंट्सद्वारे प्रचार केला जात आहे. या बैठकीबाबत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने कोणतीही माहिती दिलेली नाही. या बैठकीत देशांतर्गत कंटेंट शेअरिंग प्लॅटफॉर्म शेअरचॅट आणि कु यांचाही सहभाग होता. ट्विटर शेअरचॅट आणि आता मेटा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या फेसबुकनेही याबाबत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

या बैठकीबाबत कोणतीही कमेंट न करता, Alphabet Inc. च्या Google ने एका निवेदनात म्हटले आहे की,” ते सरकारी विनंत्यांवर काम करत आहेत आणि “स्थानिक कायद्यांचा विचार करून, योग्य तेथे कंटेंट ब्लॉक करतील किंवा काढून टाकतील.” कू म्हणाले की,” ते स्थानिक कायद्यांचे पालन करतात आणि त्यांच्या मजबूत कंटेंट कंट्रोल पद्धती आहेत.”

कॉलेजमधून घरी येताच बारावीच्या विद्यार्थ्याने उचलले ‘हे’ पाऊल, काय घडले नेमकं?

भंडारा : हॅलो महाराष्ट्र – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शाळा-महाविद्यालये नुकतीच सुरु करण्यात आले. याचदरम्यान भंडाऱ्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका विद्यार्थ्याने टोकाचे पाऊल उचलत आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. या विद्यार्थ्याने कॉलेजमधून घरी आल्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?
मृत विद्यार्थी हा भंडाऱ्यातील कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेत होता. या तरुणाने इतक्या टोकाचं पाऊल का उचललं याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. या विद्यार्थ्याने आपल्या राहत्या घरी गळफास घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एका गरीब परिवारातील हुशार विद्यार्थी असलेला हा तरुण घटनेच्या दिवशी सकाळी कॉलेजला गेला होता. कॉलेज संपल्यानंतर तो घरी आला त्यावेळी घरी कोणीच नव्हते. त्याची आई शेतीकामासाठी बाहेर गेली होती तर वडील जनावरे चारण्यासाठी गेले होते.

यावेळी त्याने घरी कोणीच नसल्याचे पाहून त्याने आपल्या घरातील स्वयंपाक घरात गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना रात्री उशिरा उघडकीस आली. हा तरुण आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा असून तो अभ्यासात अतिशय हुशार होता. मात्र त्याने आत्महत्या कोणत्या कारणामुळे केली हे अजून स्पष्ट झाले नाही. या घटनेची माहिती मिळताच लाखांदूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा केला. यानंतर त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवला. या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.