Monday, December 22, 2025
Home Blog Page 2844

गोवा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून 24 स्टार प्रचारकांची यादी जाहीर; प्रचारासाठी जाणार ‘हे’ नेते 

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गोवा विधानसभा निवडणुकीमुले राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या ठिकाणी शिवसेना आणि राष्ट्रवादी यांनी एकत्रित निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान भाजप विरोधात प्रचार करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने 24 स्टार प्रचारकांची यादी आज दिल्ली कार्यालयातून जाहीर केली. या स्टार प्रचारक यादीमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, खासदार प्रफुल पटेल, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 24 स्टार प्रचारकांची निवड केली आहे.

गोवा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनेही जोरदार तयारी केली आहे. नुकतेच भाजप केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी गोव्याचा दौरा केला. तर त्याच्यानंतर काँग्रेसच्यावतीनेही काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गोव्यात जाऊन निवडणुकीची व तेथील परिस्थिती माहिती घेतली. तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना यांच्यात युती होऊ शकली नाही, परंतु आमची मैत्री कायम राहील, असा विश्वास व्यक्त केला आहे.

गोवा विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे हे नेते असणार स्टार प्रचारक

1). शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
2). प्रफुल पटेल, माजी खासदार
3). सुनिल तटकरे, खासदार
4). सुप्रिया सुळे, खासदार
5). अजित पवार, उपमुख्यमंत्री
6). दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री
7). जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री
8). जितेंद्र आव्हाड, गृहनिर्माण मंत्री
9). नवाब मलिक, मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री
10). धनंजय मुंडे, सामाजिक न्यायमंत्री
11). हसन मुश्रीफ, ग्रामविकास मंत्री
12). ए. के. ससिनद्रन, केरळचे वनमंत्री
13). नरेंद्र वर्मा, राष्ट्रीय प्रवक्ते
14). फौजिया खान, खासदार
15). धीरज शर्मा, युवक राष्ट्रीय अध्यक्ष
16). सोनिया दुहन, विद्यार्थी राष्ट्रीय अध्यक्षा
17). शब्बीर विद्रोही, अल्पसंख्याक सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष
18). जोसे फिलीप डिसोजा, गोवा अध्यक्ष
19). डॉ. प्रफुल हेडे
20). अविनाश भोसले
21). सतिश नारायणी (गोवा),
22). पी. सी. चोको, केरळचे अध्यक्ष
23). थॉमस के. थॉमस, केरळचे आमदार
24). क्लाईड क्रास्टो, महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते

गुंठेवारी योजनेला मनपाकडून पुन्हा मुदतवाढ

औरंगाबाद – शहरातील अनाधिकृत मालमत्ता गुंठेवारी योजनेत अधिकृत करून देण्याची योजना मनपाने सुरू केली आहे.

शहरात किमान 1 लाखाहून अधिक अनाधिकृत मालमत्ता असतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मनपाच्या नगररचना विभागाकडे फक्त पाच हजार फाईल दाखल झाल्या आहेत. या योजनेची अंतिम मुदत 31 जानेवारीपर्यंत होती.

मात्र, प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी आता 28 फेब्रुवारीपर्यंत गुंठेवारी योजनेला मुदतवाढ दिली आहे.

धावत्या कारच्या बोनेटवर बसून तरुणाला स्टंट करणे पडले महागात; मुंबई पोलिसांनी घडवली अद्दल

mumbai crime

मुबई : हॅलो महाराष्ट्र – सोशल मीडियावर एका तरुणाचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये हा तरुण धावत्या कारच्या बोनेटवर बसून जीवघेणा स्टंट करताना दिसत आहे. बांद्रा वरळी सी लिंकवर हा धक्कादायक प्रकार घडला आहे. यादरम्यान रस्त्यावरून जाणाऱ्या एका प्रवाशाने या घटनेचा संपूर्ण व्हिडीओ आपल्या मोबाइलमध्ये शूट केला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी धावत्या कारच्या बोनेटवर बसून स्टंट करणाऱ्या तरुणाला चांगलीच अद्दल घडवली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?
इमरान झहीर आलम अन्सारी आणि गुलफाम सबीर अन्सारी असे अटक करण्यात आलेल्या दोन तरुणाची नावे आहेत. कारच्या नंबर प्लेटच्या माध्यमातून मंगळवारी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. संबंधित आरोपी सोमवारी रात्री बांद्रा ते वरळी दरम्यान असणाऱ्या सी लिंकवर गेले होते. याठिकाणी एक आरोपी कारच्या बोनेटवर बसला होता. तर अन्य आरोपी वेगाने कार चालवत होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. यावेळी या सी लिंकवरून जाणाऱ्या एका प्रवाशाने या घटनेचा व्हिडिओ आपल्या मोबाइलमध्ये शूट केला.

https://twitter.com/Princy_Vishu/status/1488800701157634051

त्याने हा व्हिडिओ ट्वीट करून यामध्ये मुंबई पोलिसांना देखील टॅग केले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे. यानंतर पोलिसांनी अधिक तपास करून इमरान आणि गुलफाम या दोन आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी या आरोपींवर कलम 279 आणि कलम 336 कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

पोलिसांच्या बदल्यांची यादी अनिल परब द्यायचे; अनिल देशमुखांचा गौप्यस्फोट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख याची ईडीच्याकडून चौकशी केली जात आहे. आज चौकशीदरम्यान देशमुख यांनी आणखी एक गौप्यस्फोट केला. “राज्यातील पोलीस बदल्यांची यादी मला शिवसेना नेते तथा परिवहनमंत्री अनिल परबच द्यायचे, असा धक्कादायक खुलासा देशमुख यांनी केला. देशमुख यांच्या या नव्या गौप्यस्फोटामुळे अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आज माजी गृहमंत्री अनिल देशमुख याची ईडीच्यावतीने चौकशी करण्यात आली. तत्पूर्वी सीताराम कुंटे यांची ईडीच्यावतीने चौकशी करण्यात आली. यावेळी देशमुख बदल्याची यादी देत असल्याचे त्यांनी म्हंटले होते. त्यांनी दिलेल्या जबाबानंतर ईडीच्यावतीने आज अनिल देशमुख याची चौकशी करण्यात आली. यावेळी देशमुखांनी या प्रकरणात अनिल परब यांचे नाव घेतले आहे.

यावेळी अनिल देशमुख म्हणाले की, मला दुसऱ्या तिसऱ्या कोणत्याही व्यक्तीने बदल्याची यादी दिली नव्हती तर मला यादी देणारी व्यक्ती हि अनिल परब होते. त्यांनी दिलेलीच यादी मी अतिरिक्त मुख्य सचिवांना दिली होती. बदल्यांसंदर्भातील यादी गृह मुख्य सचिवांकडे द्यावी लागते. त्यानुसार मी ती त्यांना दिली होती. या यादीनुसारच बदली करावी. पण जे नियमात बसत असेल तेच करा नाहीतर नावं बाहेर काढा, असेही तत्कालीन सचिवांना सांगितले होते.

Share Market : सेन्सेक्स 695 अंकांवर वाढला तर निफ्टी 17775 च्या वर बंद झाला

नवी दिल्ली । अर्थसंकल्पाच्या एका दिवसानंतर शेअर बाजारात तेजी दिसून आली. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये ग्रीन मार्कवर ट्रेडिंग सुरू झाले. ट्रेडिंगच्या शेवटी, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स 695.76 अंकांच्या किंवा 1.18 टक्क्यांच्या वाढीसह 59,558.33 वर बंद झाला. दुसरीकडे, नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) चा निफ्टी 203.15 अंकांच्या म्हणजेच 1.16 टक्क्यांच्या मजबूतीसह 17780 वर बंद झाला.

याआधी मंगळवारी भारतीय शेअर बाजाराने जोरदार वाढ नोंदवली होती. ट्रेडिंगच्या शेवटी, सेन्सेक्स 848.40 अंकांच्या किंवा 1.46 टक्क्यांच्या वाढीसह 58,862.57 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 237.00 अंकांच्या किंवा 1.37 टक्क्यांच्या वाढीसह 17,576.85 वर बंद झाला.

HDFC ने तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले
देशातील सर्वात मोठी हौसिंग फायनान्स कंपनी HDFC ने बुधवारी 31 डिसेंबर 2021 रोजी संपलेल्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. त्यानुसार, आर्थिक वर्ष 2021-22 च्या तिसऱ्या तिमाहीत, HDFC चा नफा वार्षिक 11.4 टक्क्यांनी वाढून 3,260.7 कोटी रुपये झाला आहे. जे 2,524.9 कोटी रुपयांच्या अंदाजापेक्षा खूप जास्त आहे. तिसऱ्या तिमाहीत कंपनीचा कर खर्च वार्षिक आधारावर रु. 826.7 कोटींवरून 787.5 कोटींवर आला आहे.

टाटा मोटर्सची विक्री वाढली
देशातील आघाडीची ऑटोमोबाईल कंपनी टाटा मोटर्सने म्हटले आहे की, जानेवारी 2022 मध्ये तिच्या एकूण विक्रीत वार्षिक आधारावर 27 टक्के वाढ झाली आहे. कंपनीने जानेवारी 2022 मध्ये 76,210 युनिट्सची विक्री केली आहे तर कंपनीने जानेवारी 2021 मध्ये 59,866 युनिट्सची विक्री केली आहे. जानेवारी 2022 मध्ये, कंपनीच्या एकूण देशांतर्गत विक्रीत वर्षभरात 26 टक्के वाढ झाली आहे, तर याच कालावधीत कंपनीच्या प्रवासी वाहनांची विक्री गेल्या वर्षीच्या जानेवारीत 26,978 युनिट्सवरून 40,777 युनिट्सपर्यंत वाढली आहे.

बनावट नोटांमध्ये झपाट्याने वाढ ! 500 ची नोट खोटी की खरी हे कसे ओळखायचे जाणून घ्या

PIB fact Check

नवी दिल्ली । बाजारात बनावट नोटांचा ट्रेंड झपाट्याने वाढत आहे. अनेकवेळा तुम्हाला घाईगडबडीत किंवा इतर काही कारणाने बनावट नोट मिळते. जी ओळखणे देखील थोडे अवघड स्ट. तुमच्याकडे असलेली 500 रुपयांची नोट खोटी आहे की खरी या संभ्रमात तुम्ही असाल तर आता अजिबात काळजी करण्याची गरज नाही.

आज आम्ही तुम्हाला अशाच 15 पद्धती सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुमची नोट खोटी आहे की खरी हे तुम्हाला सहज कळू शकेल. तुमच्या हातात असलेली 500 रुपयांची नोट खरी आहे की नाही ते अशा प्रकारे ओळखा.

ओळख क्रमांक 1: जेव्हा नोट प्रकाशासमोर ठेवली जाईल तेव्हा येथे 500 लिहिलेले दिसेल.
ओळख क्रमांक 2: डोळ्यासमोर 45 अंशाच्या कोनात ठेवल्यास, येथे 500 लिहिलेले दिसेल.
ओळख क्रमांक 3: 500 देवनागरीमध्ये लिहिलेले दिसेल.
ओळख क्रमांक 4: जुन्या नोटेच्या तुलनेत महात्मा गांधींच्या चित्राची दिशा आणि स्थिती थोडी वेगळी आहे.
ओळख क्रमांक 5: जेव्हा नोट हलके दुमडली जाते तेव्हा सिक्योरिटी थ्रेडचा रंग हिरवा ते निळा होतो.
ओळख क्रमांक 6: जुन्या नोटेच्या तुलनेत गॅरंटी क्लॉज, गव्हर्नरची स्वाक्षरी, प्रॉमिस क्लॉज आणि आरबीआयचा लोगो उजव्या बाजूला हलवण्यात आला आहे.
ओळख क्रमांक 7: येथे महात्मा गांधींचे चित्र आणि इलेक्ट्रोटाइप वॉटरमार्क आहे.
ओळख क्रमांक 8: वरच्या डावीकडे आणि तळाशी उजव्या बाजूला लिहिलेले अंक डावीकडून उजवीकडे मोठे होतात.
ओळख क्रमांक 9: येथे लिहिलेल्या 500 क्रमांकाचा रंग बदलतो. त्याचा रंग हिरव्यापासून निळ्यामध्ये बदलतो.
ओळख क्रमांक 10: अशोक स्तंभ उजव्या बाजूला आहे. उजव्या बाजूला वर्तुळ बॉक्स ज्यामध्ये 500 लिहिले आहे.
उजव्या आणि डाव्या बाजूला 5 ब्लीड लाईन्स आहेत ज्या उग्र आहेत.

मागे
ओळख क्रमांक 11: नोट छापण्याचे वर्ष लिहिलेले आहे.
ओळख क्रमांक 12: स्लोगन असलेला स्वच्छ भारत लोगो.
ओळख क्रमांक 13: मध्यभागी लँग्वेज पॅनेल
ओळख क्रमांक 14: भारतीय ध्वजासह लाल किल्ल्याचे चित्र
ओळख क्रमांक 15: 500 देवनागरीमध्ये लिहिलेला आहे.

अंधांसाठी
महात्मा गांधींचे पोर्ट्रेट, अशोक स्तंभाचे प्रतीक, ब्लीड लाईन्स आणि ओळख चिन्ह खडबडीत आहेत.

नितेश राणे यांना न्यायालयीन कोठडी

Nitesh Rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना कार्यकर्ते संतोष परब हल्ला प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे आज झाले. त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. नितेश राणे न्यायालयात हजर झाल्यानंतर त्याच्या प्रकरणावर सरकारी पक्ष तसेच नितेश राणे यांचे वकील या दोघांच्यात युक्तिवाद करण्यात आला. दरम्यान सरकारी वकिलांनी व पोलिसांनी न्यायालयात या प्रकरणी बाजू मांडत दहा दिवसाची पोलीस कोठडीची मागणी केली.

नितेश राणे आज न्यायालयात हजर झाल्यानंतर त्यांना न्यायालयाच्यावतीने न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. मात्र, सरकारी पक्षाकडून नितेश राणे यांची 5 तर पोलिसांकडून १० दिवसांची पोलीस कोठडी मागितली आहे. त्यामुळे नितेश राणे यांना जामीन मिळणार की नाही याबाबत अद्याप कोणत्याही प्रकारचे स्पष्टीकरण मिळालेले नाही.

कणकवली न्यायालयात शरण जाण्यापूर्वी भाजप आमदार नितेश राणेंनी केंद्रीयमंत्री अमित शहा आणि पी चिदंबरम याचा फोटो ट्विट करीत आघाडी सरकारला इशारा दिला. यावरून शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. केंद्रातील सत्तेचा दुरुपयोग करून महाविकास आघाडी सरकारला तसेच राज्य सरकारला घाबरवण्याच्या कोणी प्रयत्न करू नये, असा इशारा राऊतांनी दिला आहे.

खंडणीप्रकरणी पिंपरीत भाजपच्या ‘या’ विद्यमान नगरसेवकाला अटक

keshav gholave

पिंपरी चिंचवड : हॅलो महाराष्ट्र – पिंपरी चिंचवड महानगर पालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे माजी उपमहापौर आणि विद्यमान नगरसेवक केशव घोळवे यांना पिंपरी चिंचवड पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. केशव घोळवे यांच्यावर पिंपरी चिंचवड शहराच्या मुख्य बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना मेट्रोचे गाळे मिळवून देण्याचे आमिष दाखवून 55 हजार रुपये लुटल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच केशव घोळवे यांनी 2019 पासून अनेक व्यापाऱ्यांकडून भाजप कामगार आघाडी महाराष्ट्र प्रदेश या संघटनेसाठी 1200 रुपयांची पावती करण्यास भाग पाडले असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

केशव घोळवे यांनी फिर्यादी व्यापाऱ्याकडून 55000 हजार रुपयांची खंडणी गोळा केली होती. त्यानंतर देखील केशव घोळवे फिर्यादीकडे एक लाख रुपयांची मागणी करत होते. पण संबंधित व्यापाऱ्याने पैसे देण्यास नकार दिल्याने त्या व्यापाऱ्याला जीवे मारण्याची धमकी दिली. मोहम्मद तय्यब अली शेख असे फिर्यादी व्यापाऱ्याचे नाव आहे. त्यांनी पैसे देण्यास विरोध केला असता, घोळवे यांनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप मोहम्मद तय्यब अली शेख यांनी केला आहे.

जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर व्यापारी मोहम्मद शेख यांनी पिंपरी पोलीस स्टेशनमध्ये आरोपी विरुद्ध तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी आरोपीविरोधात विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी रात्री उशिरा भाजपचे विद्यमान नगरसेवक केशव घोळवे यांच्यासह गुड्डू उर्फ प्रमोद यादव, मलका यादव, घनश्याम यादव आणि हसरत अली शेख यांना अटक केली. तर दुसरीकडे केशव घोळवे यांच्यावर लावलेले सर्व आरोप खोटे असून त्यांना या प्रकरणात गोवलं जात असल्याचा आरोप भाजपच्या महिला प्रदेश अध्यक्षा उमाताई खापरे यांच्याकडून करण्यात आला आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हि कारवाई करण्यात आल्याने भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

केंद्रातील सत्तेचा दुरुपयोग करून आघाडी सरकारला कोणी घाबरवू नये; नितेश राणेंप्रकरणी विनायक राऊतांची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कणकवली न्यायालयात शरण जाण्यापूर्वी भाजप आमदार नितेश राणेंनी केंद्रीयमंत्री अमित शहा आणि पी चिदंबरम याचा फोटो ट्विट करीत आघाडी सरकारला इशारा दिला. यावरून शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “केंद्रातील सत्तेचा दुरुपयोग करून महाविकास आघाडी सरकारला तसेच राज्य सरकारला घाबरवण्याच्या कोणी प्रयत्न करू नये. आम्हीही कसे पुरून उरू शकतो हे यापूर्वी महाविकास आघाडी सरकारने दाखवून दिले आहे,” असा इशारा राऊतांनी दिला.

नितेश राणे कणकवली कोर्टापुढे हजर झाल्यानंतर शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. यावेळी ते म्हणाले की, आज नितेश राणे कणकवली कोर्टासमोर हजर झाले आहे. हि चांगली घटना आहे. कायदा आणि न्यायालय हे यापुढच्या गोष्टी पाहतील. नितेश राणे यांनी जो समय बलवान है असे सूचक ट्विट केले आहे आणि इशारा दिला आहे. त्याबाबत सांगायचे झाले तर केंद्र सरकारच्या सत्तेचा कोणी दुरुपयोग करून महाविकास आघाडी सरकारलं;आ कोणी घाबरवण्याचा प्रयत्न करू नये.

सरकारी यंत्रणेमध्ये हस्तक्षेप करणे, न्यायालईन कामकाजातहस्तक्षेप करण्याची पद्धत हि भाजपची आहे. हि महाविकास आघाडीची पद्धत नाही. कायद्याला कायद्याचे काम करू दे आणि न्यायालय त्याच्या पद्धतीने निर्णय देईल. आम्ही सर्व मंडळी न्यायालयाचा आदर करणारी आहोत, अशी प्रतिक्रिया राऊतांनी दिली.

कोर्टाच्या निर्णयाचा आदर ठेऊन मी शरण होतोय – नितेश राणे 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संतोष परब हल्ला प्रकरणात भाजप आमदार नितेश राणे यांचा सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर आज नितेश राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी कणकवली न्यायालयात मी न्यायालयाचा आदर राखत मी शरण जात आहे, असे राणे यांनी यावेळी सांगितले.

भाजप आमदार नितेश राणे हेआज कणकवली न्यायालयात शरण आले. तत्पूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, आता पर्यंत मला अटक करण्यासाठी राज्य सरकारने जे बेकायदेशीरपणे प्रयत्न केले. मात्र, काल न्यायालयाने माझ्याबाबत जो निर्णय दिला आहे. त्यावरून मी न्यायालयाचा आदर राखत स्वतःहून हजर होत आहे, असे राणे यांनी म्हंटले. तत्पूर्वी राणे यांनी एक सूचक ट्विट केले. अमित शाह यांचा फोटो पोस्ट करत समय बलवान है, असे ट्विट राणे यांनी केले आहे.

https://twitter.com/NiteshNRane/status/1488804496595898373?s=20&t=bMZzlNH23fG3qXqTgDKa9Q

दरम्यान नितेश राणे हे शरण येण्यापूर्वी राणे हे कोर्टात शरण येणार असल्याची माहिती नितेश राणेंचे वकील सतीश मानेशिंदे यांनी दिली. तर नितेश राणे शरण आल्यास त्यांची कोठडी मागणार असल्याची माहिती सरकारी वकील प्रदीप घरत यांनी दिली आहे. यापूर्वी तीनवेळा जामीन फेटाळल्यांनंतर चौथ्यांदा काल सत्र न्यायालयाने जामीन फेटळला त्यानंतर राणेंनी पुन्हा हायकोर्टात धाव घेतली. मात्र आज राणेंनी स्वतःहून  कोर्टासमोर शरण येणार असल्याची माहिती दिली.