Monday, December 22, 2025
Home Blog Page 2843

कॉलेजमधून घरी येताच बारावीच्या विद्यार्थ्याने उचलले ‘हे’ पाऊल, काय घडले नेमकं?

भंडारा : हॅलो महाराष्ट्र – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शाळा-महाविद्यालये नुकतीच सुरु करण्यात आले. याचदरम्यान भंडाऱ्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका विद्यार्थ्याने टोकाचे पाऊल उचलत आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. या विद्यार्थ्याने कॉलेजमधून घरी आल्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?
मृत विद्यार्थी हा भंडाऱ्यातील कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेत होता. या तरुणाने इतक्या टोकाचं पाऊल का उचललं याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. या विद्यार्थ्याने आपल्या राहत्या घरी गळफास घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एका गरीब परिवारातील हुशार विद्यार्थी असलेला हा तरुण घटनेच्या दिवशी सकाळी कॉलेजला गेला होता. कॉलेज संपल्यानंतर तो घरी आला त्यावेळी घरी कोणीच नव्हते. त्याची आई शेतीकामासाठी बाहेर गेली होती तर वडील जनावरे चारण्यासाठी गेले होते.

यावेळी त्याने घरी कोणीच नसल्याचे पाहून त्याने आपल्या घरातील स्वयंपाक घरात गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना रात्री उशिरा उघडकीस आली. हा तरुण आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा असून तो अभ्यासात अतिशय हुशार होता. मात्र त्याने आत्महत्या कोणत्या कारणामुळे केली हे अजून स्पष्ट झाले नाही. या घटनेची माहिती मिळताच लाखांदूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा केला. यानंतर त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवला. या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

“लोकांवर कराचा बोझा लादला नाही, कराच्या स्थिरतेवर आमचा भर आहे” – अर्थमंत्री निर्मला सीतारामन

Nirmala Sitharaman

नवी दिल्ली । केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी 2022 रोजी संसदेत 2022-23 या आर्थिक वर्षाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला. त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे आज 2 फेब्रुवारी 2022 रोजी, त्यांनी नेटवर्क 18 चे एमडी आणि ग्रुप एडिटर इन चीफ राहुल जोशी यांना दिलेल्या विशेष मुलाखतीत इन्कम टॅक्ससह अनेक मुद्द्यांवर खुलेपणाने सांगितले. या वर्षीच्या अर्थसंकल्पात करदात्यांना कोणताही दिलासा न देण्याच्या प्रश्नावर त्या म्हणाल्या की,”आमच्या सरकारचा संपूर्ण भर कराच्या स्थिरतेवर आणि त्याचे परिणाम यावर आहे.”

टॅक्सच्या परिणामांवर आमचे लक्ष
कोट्यवधी करदात्यांना दीर्घकाळ वाट पाहूनही अर्थसंकल्पात कोणताही दिलासा न देण्याच्या प्रश्नावर, सीतारामन म्हणाल्या की,”टॅक्स सिस्टीममध्ये स्थिरता आणण्यासाठी आमचे सर्वोत्तम प्रयत्न आहेत. आमचे सरकार टॅक्सच्या परिणामांवर लक्ष ठेवून आहे. टॅक्सच्या संदर्भात कोणताही निर्णय घेताना आपल्याला हे लक्षात ठेवावे लागेल की, याचा कोणावर परिणाम होईल आणि कोणाचा टॅक्स कमी करण्याची खरोखरच गरज आहे.”

फक्त कर कपातीचा विचार करू शकत नाही
कोरोना महामारीमुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेच्या काळात आपण फक्त कर कपातीचा विचार करू शकत नाही. खर्चाचा दबाव असूनही आम्ही लोकांवर कराचा बोझा लादलेला नाही आणि त्यांना टॅक्सच्या बाबतीत कोणताही प्रभाव पाडला नाही. आमची योजना टॅक्स सिस्टीम आणखी स्थिर करण्याची आहे, ज्यामध्ये गरजेशिवाय बदल करणे योग्य नाही.

 

दरमहा 42 रुपये जमा करून मिळवा 1,000 रुपये पेन्शन, सरकारच्या ‘या’ योजनेविषयी जाणून घ्या

SIP

नवी दिल्ली । पेन्शनमुळे लोकांना मासिक उत्पन्न मिळते. सध्या सरकार अनेक पेन्शन योजना चालवत आहे. या योजनांमध्ये समाविष्ट असलेली अटल पेन्शन योजना (APY) तरुण आणि महिलांना खूप आवडली आहे. संसदेत सादर केलेल्या आर्थिक सर्वेक्षण 2022 मध्ये असे दिसून आले आहे की, सप्टेंबर 2021 पर्यंत या योजनेत सामील झालेली 43 टक्के लोकं 18 ते 25 वर्षे या वयोगटातील आहेत. मार्च 2016 मध्ये अटल पेन्शन योजनेतील या वयोगटाचा वाटा 29 टक्के होता.

अटल पेन्शन योजना (APY) देखील अनेक महिलांना आकर्षित करत आहे. मार्च 2016 मध्ये जिथे महिलांचा सहभाग 37 टक्के होता, तो सप्टेंबर 2021 पर्यंत 44 टक्के झाला आहे. या आर्थिक सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, जास्त लोकं मासिक 1,000 रुपये पेन्शन स्वीकारत आहेत. मार्च 2016 मध्ये, 38 टक्के लोकांनी 1,000 रुपये मासिक पेन्शनचा पर्याय निवडला तर सप्टेंबर 2021 मध्ये हा आकडा 78 टक्क्यांवर पोहोचला. 2,000, 3,000 आणि 4,000 रुपये मासिक पेन्शनचा पर्याय या योजनेत समाविष्ट असलेल्या एकूण लोकांपैकी 8 टक्के लोकांनी निवडला आहे. 14% लोकांनी 5,000 रुपये मासिक पेन्शनचा पर्याय पसंत केला आहे.

अटल पेन्शन योजना म्हणजे काय ?
18 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाची कोणतीही व्यक्ती अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक करू शकते. 18 वर्षे वयाच्या व्यक्तीने दरमहा 42 रुपये जमा केल्यास, वयाच्या 60 व्या वर्षी त्याला दरमहा 1,000 रुपये पेन्शन मिळेल. त्याच वेळी, वयाच्या 18 व्या वर्षी प्रत्येक महिन्याला 210 रुपये पेन्शन जमा केल्यावर, निवृत्तीनंतर 5,000 रुपये मासिक पेन्शन मिळते. मात्र, वयानुसार प्रीमियमची रक्कम देखील वाढते. वयाच्या 40 व्या वर्षी जर एखाद्याला अटल पेन्शन योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्याला दरमहा 1 हजार रुपये पेन्शनसाठी 291 रुपये दरमहा जमा करावे लागतील तर 5 हजार रुपये दरमहा पेन्शनसाठी 1,454 रुपये जमा करावे लागतील.

अटल पेन्शन योजनेचे फायदे
अटल पेन्शन योजनेच्या प्रीमियमवर आयकर कलम 80CCD अंतर्गत टॅक्स बेनिफिट ही उपलब्ध आहे. कलम 80CCD अंतर्गत कपातीची कमाल मर्यादा 2 लाख रुपये आहे. यामध्ये 50,000 रुपयांच्या अतिरिक्त कपातीचाही समावेश आहे.

3 कोटी 90 लाख लोकं सामील झाले
12 ऑक्टोबर 2021 पर्यंत 3 कोटी 90 लाख लोकं अटल पेन्शन योजनेत सामील झाले होते. या योजनेत लोकांचे योगदान 16109 कोटी रुपये आहे. अटल पेन्शन योजना जवळपास प्रत्येक बँक आणि पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध आहे. सप्टेंबर 2020 ते सप्टेंबर 2021 या कालावधीत नवीन पेन्शन योजना आणि अटल पेन्शन योजनेच्या ग्राहकांच्या संख्येत 23.7% वाढ झाली आहे. सप्टेंबर 2020 मध्ये, 37.4 मिलियन लोकं त्याच्याशी जोडले गेले होते, जे 2021 मध्ये वाढून 46.3 मिलियन झाले. NPS अंतर्गत एकूण योगदान देखील एका वर्षात 29 टक्क्यांनी वाढले आहे.

“टिपू सुलतानाच्या औलादांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर आम्हीही…”; भाजपा नेत्याचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज पेगॅसस प्रकरणाबाबत युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुंबईत भाजपा कार्यालयावर मोर्चा काढला. यावरून आक्रमक झालेल्या भाजप कार्यकर्त्यांनीही काँग्रेस विरोधात रस्त्यावर उतरत घोषणाबाजी केली. यावेळी दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांनी जोरदार राडाही केला. दरम्यान यावरून मुंबई भाजपा अध्यक्ष तथा आमदार मंगल प्रभात लोढा यांनी काँग्रेसवर टीका करीत निशाणा साधला. “टिपू सुलतानाच्या औलादांनी भाजपावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना त्याचं पद्धतीने उत्तर देऊ, असा इशाराही यावेळी त्यांनी दिला.

मुंबईत भाजप कार्यकर्त्यांच्यावतीने काँग्रेस कार्यकर्त्यांच्या विरोधात करण्यात आलेल्या आंदोलनावेळी मंगल प्रभात लोढा यांनी ट्विट करीत इशारा दिला. यावेळी ते म्हणाले की, “टिपू सुलतानाच्या औलादांनी भाजपावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना त्यांच्याच पद्धतीने उत्तर दिले जाईल. आम्ही संघर्ष करणारी लोक आहोत. भाजपा कार्यकर्त्यांना डिवचण्याचा प्रयत्न कराल तर याद राखा आमचीही मागे हटणार नाही,” असा इशारा यावेळी त्यांनी दिला.

दरम्यान, भाजप कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्र घेत काँग्रेस कार्यकर्त्याच्या अटकेचीही मागणी पोलिसांकडे केली. तसेच युवक काँग्रेसचा हा मोर्चा यशस्वी होऊ न देण्याच्या दृष्टीने भाजपा कार्यकत्यांना त्या आंदोलकांना हुसकावले.

आमदार म्हणून मी व्यवसाय करायचा नाही का? : आ. शिवेंद्रराजेंचा सवाल

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

पंडित ऑटोमोटिव्हची जागा आम्ही NCLT च्या लिलावातून विकत घेतली आहे. कामगारांच्या थकीत पगाराशी आमचा काही संबंध नाही. कामगारांनी बँक ऑफ बडोदा, NCLT यांच्याशी चर्चा करावी. आम्ही कायदेशीररित्या ही जागा घेतली असून माझ्याच प्रॉपर्टीमध्ये मला जाण्यास विरोध करणे हा गुन्हा आहे. आमदार म्हणून मी व्यवसाय करायचा नाही का? आम्ही इन्कम टॅक्स भरतोय ही चूक करतोय का? असा संतप्त सवाल आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उपस्थित केला आहे.

सातारा एमआयडीसीत पंडित ऑटोमोटिव्हची जागा आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी खरेदी केली असून यास येथील कामगारांचा विरोध करत आहेत. आमदार शिवेंद्रराजे यांनी आमच्यावर अन्याय केला असल्याचा आरोप येथील कामगारांनी केला आहे. कामगारा आपल्या कुटुंबातील सदस्यांसह कंपनीच्या गेटवर जमा झालेले होते.

आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, आम्ही कंपनी मालकांकडून घेतलेली नाही. लिलावातून आम्ही जागा घेतली आहे. आमचा मालक म्हणून कामगारांशी कसलाही संबध येत नाही. आम्ही कोणताही बेकायदेशीर व्यवहार केलेला नाही. आम्ही रितसर मालक झालेलो आहोत. आम्ही कायदेशीरपणे व्यवसाय करत आहे, त्यामुळे आमदार म्हणून आम्ही व्यवसाय करायचा नाहीच का?

‘या’ चार मोठ्या बँकांनी बदलले काही महत्त्वाचे नियम, त्याविषयी जाणून घ्या

Bank FD

नवी दिल्ली । स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, ICICI बँक आणि बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांसाठी ही एक महत्त्वाची बातमी आहे. वास्तविक, या बँकांशी संबंधित अनेक नियम बदलले आहेत. हे नियम 1 फेब्रुवारी 2022 पासून तीन बँकांमधील बँक खातेधारकांसाठी लागू झाले आहेत. एका बँकेचा बदल 10 फेब्रुवारीपासून लागू होईल. याबाबत बँकांनी आपल्या खातेदारांना अनेकदा माहिती दिली आहे. बँकांनी खातेदारांना या नियमांकडे विशेष लक्ष देण्यास सांगितले आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियाचे नियम
तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाचे (SBI) ग्राहक असाल तर आता तुम्हाला पैसे ट्रान्सफर करणे महागात पडणार आहे. SBI च्या वेबसाइटनुसार, बँकेने 1 फेब्रुवारी 2022 पासून IMPS ट्रान्सझॅक्शनमध्ये (IMPS) एक नवीन स्लॅब जोडला आहे, जो 2 लाख ते 5 लाख रुपयांपर्यंत आहे. आता 2 लाख ते 5 लाख रुपयांच्या दरम्यान, बँकेच्या शाखेतून IMPS द्वारे पाठविण्याचे शुल्क 20 रुपये +GST असेल.

ICICI बँकेने ‘हे’ नियम बदलले
ICICI बँकेने केलेले बदल 10 फेब्रुवारीपासून लागू होतील. या दिवसापासून, ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डच्या ग्राहकांना प्रत्येक ट्रान्सझॅक्शनसाठी 2.50 टक्के ट्रान्सझॅक्शन चार्ज भरावे लागेल. चेक किंवा ऑटो डेबिट रिटर्न असल्यास, तुम्हाला संपूर्ण रकमेवर 2 टक्के शुल्क भरावे लागेल. याशिवाय ग्राहकाच्या बचत खात्यातून 50 रुपये +GST ही कापला जाईल. हे शुल्क किमान 500 रुपयांच्या ट्रान्सझॅक्शनवर लागू होईल.

बँक ऑफ बडोदाचे नियम बदलले
1 फेब्रुवारीपासून बँक ऑफ बडोदाने चेक क्लिअरन्स नियमाशी संबंधित नियमात बदल लागू केला आहे. बँकेने दिलेल्या माहितीनुसार, 1 फेब्रुवारीपासून चेक पेमेंटसाठी ग्राहकांना पॉझिटिव्ह पे सिस्टम फॉलो करावी लागेल. म्हणजेच आता ग्राहकांना चेक दिल्यानंतर त्या चेकशी संबंधित माहिती बँकेला पाठवावी लागणार आहे. जर तुम्ही चेक दिला असेल आणि त्याची माहिती दिली नाही, तर तुमचा चेक परत पाठवला जाऊ शकतो, याचा अर्थ तो रोखला जाऊ शकणार नाही. SMS, मोबाईल अ‍ॅप, इंटरनेट बँकिंग आणि ATM द्वारे दिले जाऊ शकते.

येथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की, हे फक्त 10 लाख किंवा त्याहून अधिक रकमेच्या चेकसाठीच आहे. जर तुम्ही एखाद्याला लहान रकमेचा चेक दिला असेल, तर तुम्हाला ही प्रोसेस फॉलो करण्याची गरज नाही. RBI ने फसवणुकीपासून बचाव करण्यासाठी हा नवीन नियम जारी केला आहे. अनेक बँकांनी त्यासाठी अर्ज केले आहेत. याशिवाय योनो अ‍ॅपद्वारे केलेल्या IMPS वर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

पंजाब नॅशनल बँकेच्या नियमात बदल
पंजाब नॅशनल बँकेने (PNB) देखील एक नियम बदलला आहे. 1 फेब्रुवारीपासून लागू झालेला हा नियम सांगतो की, जर तुमच्या कोणत्याही हप्त्याचे किंवा गुंतवणुकीचे डेबिट फेल झाले आणि त्याचे कारण तुमच्या खात्यात पैसे नसतील तर त्यासाठी तुम्हाला 250 रु. शुल्क भरावे लागेल. आतापर्यंत यासाठी केवळ 100 रुपये आकारले जात होते. याशिवाय डिमांड ड्राफ्ट रद्द किंवा रद्द केल्यास आता 100 ऐवजी 150 रुपये द्यावे लागतील.

चोरटयांनी अवघ्या तीन मिनिटांत कपड्याचं दुकान केलं साफ, घटना CCTV मध्ये कैद

पुणे : हॅलो महाराष्ट्र – राज्यात सगळीकडे चोरीचे सत्र सुरु आहे. चोरट्यांनी पुणे जिल्ह्यातील देहूरोड परिसरात एका कपड्याच्या दुकानात चोरी केली. यामध्ये आबूशेट रोडवरील फॅशन पॉईंट या दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी कपड्यांचे संपूर्ण दुकान लुटले. हे चोरटे चोरी करत असताना दुकानातील सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहेत.

या सीसीटीव्ही मध्ये दिसत आहे कि, आरोपी एका रिक्षातून आले आणि दुकानाचे शटर उघडून त्यांनी दुकानात प्रवेश केला. हे चोरटे मध्यरात्री तीनच्या सुमारास चोरी करण्यासाठी आले होते. हे चोर गल्ल्यातील काही रोख रक्कम आणि 70 हजाराचे कपडे घेऊन फरार झाले आहेत. मात्र चोरी करतानाची घटना दुकानातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या प्रकरणी दुकानाच्या मालकाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलीस हे सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत आहेत.

https://twitter.com/Princy_Vishu/status/1488765900547592192

काही दिवसांपूर्वी चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरात बँक ऑफ इंडिया शाखेत दिवसाढवळ्या चोरी झाली होती. या चोरटयांनी बँकेत सर्व कर्मचारी उपस्थित असतांना 16 ते 17 लाखांची रक्कम लंपास केली. हि घटना 31 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजताच्या दरम्यान घडली होती. या चोरटयांनी 500 आणि 200 च्या नोटांचे बंडल पिशवीत टाकून त्या ठिकाणाहून पळ काढला. या आरोपींसोबत एक महिलासुद्धा असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसत आहे.

नितेश राणेंना धक्का; दोन दिवसांची सुनावली पोलीस कोठडी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना कार्यकर्ते संतोष परब हल्ला प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे आज झाले. त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. मात्र, यावर सरकारी पक्ष तसेच नितेश राणे यांचे वकील या दोघांच्यात युक्तिवाद करण्यात आला. युक्तिवादानंतर नितेश राणे यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दोन दिवसांची 4 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याने हा राणे कुटूंबासाठी धक्का मानला जात आहे.

नितेश राणे आज न्यायालयात हजर झाल्यानंतर त्यांना सुरुवातीला न्यायालयाच्यावतीने न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. मात्र, सरकारी पक्षाकडून नितेश राणे यांची 5 तर पोलिसांकडून 10 दिवसांची पोलीस कोठडी मागणी करण्यात आली. त्यामुळे नितेश राणे यांना जामीन मिळणार की नाही याबाबत प्रश्न निर्माण झाला होता. अखेर न्यायालयाने निर्णय देत नितेश राणे यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

भाजप आमदार नितेश राणे यांना कोर्टाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्यामुळे त्यांना आता 4 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत राहावे लागणार आहे. त्यामुळे नितेश राणे यांच्या संतोष परब हल्ला प्रकरणात अडचणी वाढल्या आहेत. राकेश परब यांनाही 4 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. नितेश राणेंना संतोष परब हल्लाप्रकरणी न्यायालयाने यापूर्वीच जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दिवाणी न्यायालयात नितेश राणे शरण गेले. त्यानंतर याप्रकरणी युक्तिवाद झाला. त्यानंतर न्यायालयाने निर्णय सुनावल्यानंतर राणेंना पोलिसांनी कणकवली पोलिस स्टेशनमध्ये नेण्यात आले आहे. आता पोलिस कोठडीत त्यांची कसून चौकशी केली जाणार आहे.

साताऱ्यात सामूहिक आत्मदहनाचा प्रयत्न : आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पत्नीने बेकायदेशीर जमीन खरेदी केल्याचा कामगारांचा आरोप

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा येथील पंडित ऑटोमोटिव्ह प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या कामगारांनी सामूहिक आत्मदहनाचा केला प्रयत्न केला. आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्या पत्नी सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी ही कंपनी बेकायदेशीररित्या खरेदी केल्याचा यावेळी  कामगारांनी आरोप केला.

आज दि. 2 फेब्रुवारी रोजी 20 ते 22 लोकांनी एकत्र येऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला. आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी केली आमच्या संसाराची राखरांगोळी केली, असे म्हणत कामगारांनी ज्वलनशील पदार्थ अोतून आपल्या अंगावर ओतून घेतला. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला.

सदरची कंपनी सातारा एमआयडीसीत आहे. कामगारांनी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आत्मदहनाचे पाऊल कामगारांनी उचलल्याने कंपनीच्या आवारात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर पोलिसांनी मध्यस्थी करून आंदोलकांना शांत केले.

 

गोवा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून 24 स्टार प्रचारकांची यादी जाहीर; प्रचारासाठी जाणार ‘हे’ नेते 

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गोवा विधानसभा निवडणुकीमुले राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या ठिकाणी शिवसेना आणि राष्ट्रवादी यांनी एकत्रित निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान भाजप विरोधात प्रचार करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने 24 स्टार प्रचारकांची यादी आज दिल्ली कार्यालयातून जाहीर केली. या स्टार प्रचारक यादीमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, खासदार प्रफुल पटेल, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 24 स्टार प्रचारकांची निवड केली आहे.

गोवा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनेही जोरदार तयारी केली आहे. नुकतेच भाजप केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी गोव्याचा दौरा केला. तर त्याच्यानंतर काँग्रेसच्यावतीनेही काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गोव्यात जाऊन निवडणुकीची व तेथील परिस्थिती माहिती घेतली. तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना यांच्यात युती होऊ शकली नाही, परंतु आमची मैत्री कायम राहील, असा विश्वास व्यक्त केला आहे.

गोवा विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे हे नेते असणार स्टार प्रचारक

1). शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
2). प्रफुल पटेल, माजी खासदार
3). सुनिल तटकरे, खासदार
4). सुप्रिया सुळे, खासदार
5). अजित पवार, उपमुख्यमंत्री
6). दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री
7). जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री
8). जितेंद्र आव्हाड, गृहनिर्माण मंत्री
9). नवाब मलिक, मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री
10). धनंजय मुंडे, सामाजिक न्यायमंत्री
11). हसन मुश्रीफ, ग्रामविकास मंत्री
12). ए. के. ससिनद्रन, केरळचे वनमंत्री
13). नरेंद्र वर्मा, राष्ट्रीय प्रवक्ते
14). फौजिया खान, खासदार
15). धीरज शर्मा, युवक राष्ट्रीय अध्यक्ष
16). सोनिया दुहन, विद्यार्थी राष्ट्रीय अध्यक्षा
17). शब्बीर विद्रोही, अल्पसंख्याक सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष
18). जोसे फिलीप डिसोजा, गोवा अध्यक्ष
19). डॉ. प्रफुल हेडे
20). अविनाश भोसले
21). सतिश नारायणी (गोवा),
22). पी. सी. चोको, केरळचे अध्यक्ष
23). थॉमस के. थॉमस, केरळचे आमदार
24). क्लाईड क्रास्टो, महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते