Tuesday, December 23, 2025
Home Blog Page 2858

औरंगाबाद मनपा निवडणुक तुर्त अशक्य

औरंगाबाद – मुंबईसह राज्यातील 20 महापालिकांमध्ये एप्रिल किंवा मे महिन्यात निवडणुका घेण्याच्या हालचालींना वेग आला आहे. मात्र, औरंगाबाद महापालिकेची निवडणूक घेता येणार नाही. जानेवारी 2020 मध्ये राज्य निवडणूक आयोगाने टाकलेल्या आरक्षणास आणि वॉर्ड रचनेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले असून या याचिकेचा निकाल लागलेला नाही. त्याचप्रमाणे स्थानिक राजकीय नेते सुहास दाशरथे यांनी औरंगाबाद खंडपीठात महापालिका आणि नगरपालिका मधील नगरसेवकांची संख्या वाढवण्याच्या प्रक्रियेला आव्हान दिले आहे.

मनपा चा कार्यकाळ एप्रिल 2020 मध्ये संपला. कार्यकाळ संपला तेव्हा कोणाची पहिला होती. त्यामुळे निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या तत्पूर्वी सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली. यामध्ये महापालिका आणि राज्य निवडणूक आयोगाने चुकीच्या पद्धतीने वॉर्ड रचना केली, प्रगणक गट फोडण्यात आले, काही विशिष्ट राजकीय मंडळींसाठी वॉर्ड तयार करण्याचा आरोप याचिकेत करण्यात आला. याचिकेवर अनेकदा सुनावणी घेण्यात आली अद्याप मात्र अंतिम सुनावणी झालेली नाही.

आता 3 मार्च रोजी याचिकेवर सुनावणी असल्याचे बोलले जात आहे. ही संगणकाद्वारे जनरेट होणारी तारीख आहे. त्यादिवशी प्रकरण बोर्डावर येईल असे नाही. राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाला कायद्यात बदल झाला आता प्रभाग पद्धत अमलात आणत आहोत असे शपथपत्र आधारे कळविले आहे. मात्र जोपर्यंत या याचिकेचा निकाल येत नाही तोपर्यंत मनपाची निवडणूकच घेता येत नाही.

Budget 2022: लहान शेतकऱ्यांवर विशेष लक्ष; राष्ट्रपती म्हणाले,”सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केल्या अनेक योजना”

PM Kisan

नवी दिल्ली । संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. वर्षाच्या पहिल्या सत्राची सुरुवात राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने झाली. राष्ट्रपतींनी दोन्ही सभागृहांना संबोधित केले. राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी आपल्या अभिभाषणात सांगितले की,”सरकार देशातील ग्रामीण अर्थव्यवस्था आणि शेतकर्‍यांच्या सक्षमीकरणासाठी सतत काम करत आहे.” लहान शेतकऱ्यांसाठी सरकारने उचललेल्या पावलांचा त्यांनी उल्लेख केला.

राष्ट्रपती म्हणाले की,”लहान शेतकऱ्यांचे (एकूण 80 टक्के) हित सरकारने प्रामुख्याने ठेवले आहे. सरकारही सेंद्रिय शेतीसारखे प्रयत्न करत आहे. पावसाचे पाणी वाचवण्यासाठीही सरकार पावले उचलत आहे.”

राष्ट्रपतींनी शेतकऱ्यांबद्दल ‘या’ गोष्टी सांगितल्या…

1. अर्थसंकल्पापूर्वी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी संबोधित करताना सांगितले की,”सरकार ग्रामीण अर्थव्यवस्था आणि देशातील शेतकऱ्यांना सशक्त करण्यासाठी सतत काम करत आहे.

2. देशातील 80 टक्के शेतकरी हे छोटे शेतकरी आहेत, ज्यांचे हित माझ्या सरकारने नेहमीच केंद्रस्थानी ठेवले आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या माध्यमातून 11 कोटींहून जास्त शेतकरी कुटुंबांना 1 लाख 80 हजार कोटी रुपये देण्यात आले आहेत.

3. सरकारने सर्वाधिक पिकांची खरेदी केली आहे. खरीप पिकांच्या खरेदीमुळे 1.30 कोटी शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. 2020-21 या वर्षात निर्यात सुमारे 3 लाख कोटींवर पोहोचली आहे.

4. 2020-21 या वर्षात कृषी निर्यातीत 25 टक्क्यांहून अधिकची वाढ नोंदवण्यात आली आहे. ही निर्यात सुमारे 3 लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

5. फलोत्पादन- मध उत्पादनाच्या बाबतीत आपण पुढे गेलो. 2015-15 च्या तुलनेत 115% वाढ झाली आहे. कोरोनाच्या काळात सरकारने भाजीपाला, फळे, दूध यासारख्या नाशवंत गोष्टींसाठी गाड्या चालवल्या.

6. देशातील 80% शेतकरी हे छोटे शेतकरी आहेत, ज्यांना सरकारने लाभ दिला आहे. देशातील 8 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना एक लाख कोटी रुपयांहून अधिकची रक्कम देण्यात आली आहे.

7. देशात सिंचन प्रकल्प आणि नद्या जोडण्याचे कामही पुढे नेण्यात आले आहे. केन-बेतवा प्रकल्पासाठी 150 कोटी रुपयांच्या निधीतून काम सुरू आहे.

8. शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे नवीन स्रोत तयार केले जात आहेत. अटल भुजल योजनेतून 64 लाख हेक्टर सिंचन क्षमता विकसित करण्यात आली आहे.

9. महामारी असूनही, 2020-21 मध्ये, आमच्या शेतकऱ्यांनी 30 कोटी टनांहून जास्त अन्नधान्य आणि 33 कोटी टनांहून जास्त बागायती उत्पादनांचे उत्पादन केले आहे.

10. किसान रेलचा शेतकऱ्यांना फायदा झाला. कोरोनाच्या काळात 1900 हून जास्त किसान रेल धावल्या. विचार नवा असेल, तर जुनी संसाधनेही उपयोगी पडू शकतात, हे यातून दिसून येते, असेही कोविंद म्हणाले.

Budget Session : राष्ट्रपती म्हणाले,”आर्थिक मदतीमुळे भारताची महिला मजबूत झाल्या तर 2 कोटी गरिबांना घरे मिळाली”

नवी दिल्ली । राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी सोमवारी अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू करताना संसदेत सांगितले की, सरकारने महामारीच्या दबावातही देशातील महिलांना बळ देण्याचे काम केले. थेट आर्थिक मदतीबरोबरच सामाजिक स्तरावरही बदल घडवून आणणारे अनेक निर्णय घेतले. याशिवाय देशातील 2 कोटींहून जास्त लोकांना घरे देण्यात आली.

राष्ट्रपती म्हणाले,”जन धन योजनेंतर्गत करोडो खाती उघडण्याचा उद्देश महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देणे हा होता आणि सरकारने त्यांच्या खात्यात रोख रक्कम पाठवून महामारीत खूप मदत केली. याशिवाय मुलींचे लग्नाचे वय 18 वरून 21 वर्षे केल्यास त्यांचा शैक्षणिक व सामाजिक स्तर वाढण्यास मदत होईल. उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून 8 कोटींहून जास्त महिलांना धूर आणि प्रदूषणापासून मुक्ती मिळाली.”

लष्करी शाळांमध्ये मुलींना संधी
रामनाथ कोविंद म्हणाले,”देशातील 33 मिलिटरी स्कूल आता मुलींनाही प्रवेश देत आहेत जे कौतुकास्पद आहे. महिलांना सैन्यातही कमिशन मिळाले आहे. नॅशनल डिफेन्स एकॅडमी (NDA) मध्ये महिला कॅडेट्सनाही मान्यता देण्यात आली आहे. त्यांची पहिली बॅच जून 2022 मध्ये येईल. तिहेरी तलाक हा कायदेशीर गुन्हा ठरवून सरकारने समाजाला या दुष्ट प्रथेपासून मुक्त करण्यास सुरुवात केली आहे.”

6 कोटी लोकांना शुद्ध पाणी तर कोट्यवधी लोकांना घरे मिळाली
ग्रामीण भागात पाण्याच्या पाइपलाइन टाकण्याचे काम शासनाने केले आहे. यामुळे देशातील खेड्यातील उर्वरित 6 कोटी कुटुंबांना शुद्ध पाणी उपलब्ध झाले आहे. ग्रामीण भागातील महिलांनाही याचा लाभ मोठ्या प्रमाणात मिळाला आहे. याशिवाय प्रधानमंत्री आवास योजनेतून 22 कोटींहून जास्त लोकांना घरे देण्यात आली आहेत.

MSME ला गॅरेंटेड लोन
अर्थव्यवस्थेचा कणा मानल्या जाणाऱ्या लहान आणि मध्यम उद्योगांना वाचवण्यासाठी सरकारने 4 लाख कोटी रुपयांची गॅरेंटेड लोन स्कीम जारी केली होती. या माध्यमातून आतापर्यंत सुमारे 3 लाख कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. महामारीशी लढा देणाऱ्या लाखो उद्योगांना या योजनेचा लाभ मिळाला.

स्टार्टअप वातावरण तयार केले, 6 लाख नोकऱ्या मिळाल्या
राष्ट्रपती म्हणाले की,”सरकारने रोजगार निर्मितीवर विशेष भर दिला आहे. देशात स्टार्टअप्ससाठी एक इकोसिस्टम तयार करण्यात आली आहे आणि आतापर्यंत या क्षेत्राने 6 लाखांहून जास्त नोकऱ्या दिल्या आहेत. असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या गणनेसाठी जारी करण्यात आलेल्या ई-श्रम पोर्टलवर आतापर्यंत 23 कोटींहून जास्त लोकांनी रजिस्ट्रेशन केले आहे.”

Budget 2022 : वाहन खरेदी करणे स्वस्त होऊ शकते, ऑटो पार्ट्सवरील GST कमी होणार ??

नवी दिल्ली । अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी रोजी आर्थिक वर्ष 2022-23 चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात अर्थमंत्री काय घोषणा करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्याचवेळी, कोरोना महामारी, वाढता खर्च आणि सेमीकंडक्टरचा तुटवडा यांच्याशी झुंजणाऱ्या वाहन उद्योगाला यावेळी अर्थसंकल्पाकडून मोठ्या आशा आहेत.

RoDTEP दर वाढवण्याची मागणी
भारतीय ऑटो कॉम्पोनंट इंडस्ट्री मधील सर्वात मोठ्या संघटनांपैकी एक असलेल्या ऑटोमोटिव्ह कॉम्पोनंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (ACMA)ने केंद्रीय अर्थसंकल्पासाठी सरकारला केलेल्या शिफारशींमध्ये, सर्व ऑटो पार्ट्सवर 18 टक्के समान GST दराची मागणी करत आहे. रिसर्च अँड डेव्हलपमेंट मध्ये गुंतवणूक वाढवण्यासाठी निर्यात उत्पादनांवरील शुल्क आणि कर सवलत म्हणजेच RoDTEP दर वाढवण्यासही त्यांनी सरकारला सांगितले आहे.

ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री सध्या आव्हानात्मक काळातून जात आहे
ACMA चे अध्यक्ष संजय कपूर म्हणाले की,”ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री आजवरच्या सर्वात आव्हानात्मक पण मनोरंजक काळाचा साक्षीदार आहे. साथीच्या रोगाने आयटी क्षेत्रात नवीन तंत्रज्ञान आणि गतिशीलता आणण्यास मदत केली आहे. ACC बॅटरीसाठी PLI योजना, ऑटो आणि ऑटो कॉम्पोनंटसाठी PLI आणि FAME-II योजनेचा विस्तार याविषयी सरकारने अलीकडील धोरण घोषणा खरोखरच दीर्घकाळ प्रलंबित आहेत ज्यावर काम करणे आवश्यक आहे.”

ऑटो पार्ट्समध्ये बनावट आणि ग्रे मार्केट वाढत आहे
कपूर म्हणाले की,” ते सर्व ऑटो पार्ट्सवर 18 टक्के एकसमान GST दर लावण्याची शिफारस करत आहेत. इंडस्ट्री मध्ये 28 टक्के GST दरासह लक्षणीय आफ्टरमार्केट ऑपरेशन्स आहेत, ज्यामुळे ऑटो पार्ट्समधील बनावट आणि ग्रे मार्केट वाढत आहे. जीएसटीचे दर कमी केल्यास हा ग्रे मार्केट दूर होण्यास मदत होईल.”

“ढोकळा कोण विकतो ते सोडा अगोदर वाईनच्या धंद्यात पार्टनरशीप कशी मिळाली ते सांगा?”; सोमय्यांचा राऊतांना सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काल भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले. त्यानंतर राऊतांनीही केंद्रीयमंत्री अमित शहा आणि सोमय्या यांच्यावर निशाणा साधला. दरम्यान आज सोमय्या यांनी पुन्हा सवाल उपस्थित करीत संजय राऊतांना आव्हान दिले आहे. “कोण ढोकळा विकतो आणि कोण काय करतो ते सोडा. तुम्हाला वाईनच्या धंद्यात पार्टनरशीप कशी मिळाली ते अगोदर सांगा?, तुमच्या चोपड्यात एक दमडीही दिली नाही. मग गर्गन यांनी तुम्हाला पार्टनरशीप दिलीच कशी? असा सवाल सोमय्या यांनी केला आहे.

किरीट सोमय्या यांनी आज मीडियाशी संवाद साधला. यावेळी सोमय्या म्हणाले की, शिवसेना खासदार अजय राऊत यांच्या कुटुंबातील कोणीही उद्योग-व्यवसायात नाही. असे ते सांगत आहेत. मग माझा राऊतांना सवाल आहे की, तुमच्यातील कोणी जर उद्योग-व्यवसायात नाहीत तर मग अशोक गर्ग यांनी तुम्हाला पार्टनरशीप कशी दिली?

मग संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत सेटलमेंट घडवून आणली आहे का? राऊत पडद्या मागे काय लपवत आहात. या वाईन उद्योगाची 100 कोटींची उलाढाल आहे. त्याचे लाभार्थी कोण आहेत? कोण ढोकळा विकतो, कोण केळी विकतो हे ढोंग बंद करा. पार्टनरशीप कशी मिळाली ते सांगावे? असा सवाल यावेळी सोमय्या यांनी राऊतांना विचारला आहे.

दोन दुचाकींची घाटात समोरासमोर धडक; दोघे गंभीर तर गाड्यांचा चक्काचूर

सांगली | तासगाव तालुक्यातील डोर्ली येथील भिवाघाट मार्गावर दुचाकी गाड्यांची समोरासमोर धडकून दोन जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. यामध्ये बस्तवडे येथील तरुण प्रणव हरिराम पाटील जखमी झाला आहे. तर दूसरा द्राक्ष कामासाठी आलेला परराज्यातील तरुण हा जखमी झाला आहे.

परराज्यातील तरुण हा डोर्लीकडून तासगावंकडे जात होता तर प्रणव हा तरुण आरवडेकडून बस्तवडेकडे जात होता. जुनी डोर्ली जवळ येताच दोन्ही गाड्याचा समोरासमोर धडक झाली व यात दोन तरुण गंभीर जखमी झाले. यामध्ये दोन्ही गाड्याचा समोरून चक्काचुर झाला आहे.

प्रवण यास कुटुंबीयांनी तात्काळ खाजगी गाडीतून उपचारासाठी नेऊन गेले तर तर दुसरा तरुण हा बराच वेळ ऍम्ब्युलन्स साठी घटनास्थळी जखमी अवस्थेत पडून होता. त्यामुळे घटनास्थळावरील लोक खेद व्यक्त करीत होते. रात्री उशिरापर्यंत तासगावं पोलिस स्टेशनमध्ये गुन्हाची नोंद करण्यात आली नव्हती.

चालकानेच मारला मालकाच्या लाखो रुपयांवर डल्ला, ड्रायव्हरसह दोन मित्रांना शहर पोलिसांकडून अटक

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

सांगलीतल्या वखारभाग मध्ये भेळ खाण्यासाठी मालक गाडीतून उताराला असता सदरच्या गाडीतून काच फोडून दहा लाख रुपये रक्कम अज्ञातांनी लुटल्याचा बनाव केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने संशयित गाडीच्या चालकासह त्याच्या दोन मित्रांना अटक केली आहे. डोक्यावर कर्ज असल्याने चालकानेच मालकाच्या 3 लाख 14 हजार रुपयांवर डल्ला मारल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी पोलिसांनी चालक लक्ष्मण मारुती जावीर, शक्ती बाबासो मोरे आणि अमर दत्तात्रय संकपाळ अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

वसीम नायकवडी यांचा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय आहे. शुक्रवारी जयसिंगपूर येथील व्यवहार करून 6 लाख 50 हजार रुपये एका कापडी पिशवी मध्ये घेवून सांगलीकडे आले होते. वखारभाग येथे आले असता मित्रासमवेत नाष्टा करण्यासाठी थांबले होते. त्यावेळी गाडीतील रोख रक्कमची पिशवी चोरीला गेली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयाचा तपास करीत असताना वखारभाग आणि जयसिंगपूर येथील ज्या ठिकाणी व्यवहार झाला अशा 25 ठिकाणचे सीसीटिव्ही फुटेज तपासण्यात आले.

त्यात असे निदर्शनास आले की गाडीतील ड्रायव्हर लक्ष्मण जावीर हा संशयित असून त्याने संशयितरीत्या काही फोन केले आहेत. त्यानंतर जावीर व इतर संशयित मोबाइल नंबरच्या लोकांना ताब्यात घेवून चौकशी चालू केली असता जावीरचा मित्र शक्ती बाबासो मोरे आणि अमर दत्तात्रय संकपाळ यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी सांगितले कि, जावीर याच्या सांगण्यावरून वखारभाग येथे गाडी आल्यानंतर नायकवडी व त्याच्यासोबत असणारे त्यांचे मित्र हे भेळ खाण्यासठी गेले असताना जावीर याने इनोव्हा गाडी लॉक करण्याच्या बहाण्याने पाठीमागे राहून रोख रक्कमेची असलेली बॅग देवून रक्कम चोरी केली असल्याची कबुली दिली. त्यानंतर तिघांनाही अटक करण्यात आली.

पटोलेंच्या ‘त्या’ वक्तव्यावरून चंद्रशेखर बावनकुळेंचे थेट सोनिया गांधींना पत्र; केली ‘ही’ तातडीची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल नुकतीच वादग्रस्त वक्तव्ये केली. त्यानंतर वक्तव्यावरून भाजप नेते आक्रम झाले. काल पटोले याच्यावर टीका केल्यानंतर आज भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना अपात्र लिहले आहे. तसेच वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या पटोलेंना तत्काळ पदावरून बरखास्त करा, अशी मागणी केली आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रात म्हंटले आहे की, “काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले हे वारंवार समाजविघातक अशा प्रकारची वक्तव्य करीत आहेत. तसेच ते सामाजिक शांतता बिघडवित आहेत. आपल्या पक्षासोबत आमचे राजकीय आणि वैचारिक मतभेद असले तरी राष्ट्राचे हित जिथे असते तिथे सर्व प्रकारचे मतभेद विसरून आपण एकत्र यावे हा आपल्या समृद्ध लोकशाहीचा संस्कार आहे. त्याच भावनेतून आपणास हे पत्र लिहीत आहे. पटोले यांनी अलीकडच्या काळात दोन वादग्रस्त विधाने केली आहेत.

नाना पटोले याच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे समाजात त्याच्या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे. पटोले यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अवमान करणारे विधान केले. त्यानंतर त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येचा ‘वध’ असा उल्लेख केला. वध हा राक्षसांचा होत असतो, महापुरुषांचा नाही, ही सामान्य गोष्ट या जबाबदार व्यक्तीला समजू नये, ही अत्यंत खेदाची बाब आहे.” या दोन्ही आक्षेपार्ह आणि अवमानकारक विधानाबद्दल पटोले यांनी माफी देखील मागितलेली नाही.

काँग्रेस पक्ष हा या देशातील जुना पक्ष आहे. मात्र, पटोले हे अशा विकृतीच्या माध्यमातून समाजात अशांतता निर्माण करत आहेत. अशा बेजबाबदार वक्तव्यावर आपण कठोर कारवाई करावी आणि त्यांना पदावरून तातडीने बरखास्त करावे, अशी विनंती या पत्रातून करीत असल्याचे बावनकुळे यांनी म्हटले आहे.

राज्यात भाजपचा मुख्यमंत्री कधीही होणार नाही- संजय राऊत

SANJAY RAUT

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा भाजपवर टीका केली आहे. काहीही झालं तरी महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री होणार नाही. किमान पुढचे 25 -30 वर्ष तरी महाराष्ट्रात त्यांची सत्ता येणार नाही असे म्हणत त्यांनी भाजपला डिवचले आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हे विधान केलं

संजय राऊत म्हणाले, भाजपवाले म्हणतील की उद्या ब्रिटनचा पंतप्रधान त्यांचा माणूस होईल, व्हाईट हाऊसमध्ये त्यांचा पंतप्रधान असेल असं ते सांगतील पण काही झालं तरी महाराष्ट्रात पुढचे 25 -30 वर्ष तरी त्यांची सत्ता येणार नाही. त्यांनी महाराष्ट्र विसरून जावं महाविकास आघाडी हेच या महाराष्ट्राचे भविष्य आहे, असा दावाही संजय राऊत यांनी केला.

दरम्यान इथून पुढे भाजपशी युती बाबत कोणतीही चर्चा नाही असेही त्यांनी स्पष्ट केलं. शिवसेना-भाजप युतीत आम्ही थोडंफार एकत्र होतो. एकत्र नांदलो. हे जे काही नातं होतं ते भाजपच्या आडमुठेपणामुळे संपलं आहे असे त्यांनी सांगितले

Budget 2022 : गतवर्षी पेक्षा मोठं असेल बजट; जाणून घ्या सरकार बजट मध्ये किती वाढ करू शकते

नवी दिल्ली । आगामी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून महामारीचा सामना करण्यासाठी सरकारने पूर्ण तयारी केली आहे. खर्चावर भर देत यंदा बजेटमध्येही वाढ करण्यात आली आहे. काही रिपोर्ट्स मध्ये असा दावा करण्यात आला आहे की, यंदाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प 2001 च्या अर्थसंकल्पापेक्षा 14 टक्के मोठा असेल.

ब्लूमबर्गच्या रिपोर्ट्स नुसार, अर्थमंत्र्यांचा संपूर्ण भर खर्च वाढवून अर्थव्यवस्थेला गती देण्यावर असेल. निर्मला सीतारामन यांनी वित्तीय तुटीची चिंता न करता अर्थसंकल्पाचा आकार गेल्या वेळेपेक्षा 14 टक्क्यांनी वाढवू शकतो. अर्थतज्ज्ञांमध्ये केलेल्या सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की, 2021-22 च्या अर्थसंकल्पाचा आकार 39.6 लाख कोटी रुपयांचा असू शकतो. चालू आर्थिक वर्षासाठी सरकारने 34.83 लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला होता.

तरीही सर्वसामान्यांचे हात रिकामे राहू शकतात
सरकार वाढीव बजेटचा वापर पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी आणि रोजगार वाढवण्यासाठी करेल, असे अर्थतज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे टॅक्सच्या दरांवर काही दिलासा मिळेल अशी आशा कमी आहे. आर्थिक परिस्थिती देखील साथीच्या रोगामुळे प्रभावित कुटुंबांना फारसा दिलासा देत नाही. अशा स्थितीत सर्वसामान्यांनी अर्थसंकल्पाकडून फारशा अपेक्षा ठेवू नयेत.

यावेळी सरकार आणखी कर्ज घेऊ शकते
पायाभूत क्षेत्रातील मोठ्या योजनांना निधी उपलब्ध करून देण्यासाठी यावेळीही सरकार मोठ्या प्रमाणावर कर्जावर अवलंबून असेल. अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांचा भर पुन्हा एकदा निर्गुंतवणुकीच्या माध्यमातून सरकारी मालमत्ता विकून निधी उभारण्यावर असेल. याशिवाय 13 लाख कोटींचे मोठे कर्जही घेतले जाऊ शकते. 2021 च्या अर्थसंकल्पात सरकारने 12.05 लाख कोटी रुपयांच्या कर्जाची घोषणा केली होती.