Tuesday, December 23, 2025
Home Blog Page 2859

Budget 2022 : गतवर्षी पेक्षा मोठं असेल बजट; जाणून घ्या सरकार बजट मध्ये किती वाढ करू शकते

नवी दिल्ली । आगामी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून महामारीचा सामना करण्यासाठी सरकारने पूर्ण तयारी केली आहे. खर्चावर भर देत यंदा बजेटमध्येही वाढ करण्यात आली आहे. काही रिपोर्ट्स मध्ये असा दावा करण्यात आला आहे की, यंदाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प 2001 च्या अर्थसंकल्पापेक्षा 14 टक्के मोठा असेल.

ब्लूमबर्गच्या रिपोर्ट्स नुसार, अर्थमंत्र्यांचा संपूर्ण भर खर्च वाढवून अर्थव्यवस्थेला गती देण्यावर असेल. निर्मला सीतारामन यांनी वित्तीय तुटीची चिंता न करता अर्थसंकल्पाचा आकार गेल्या वेळेपेक्षा 14 टक्क्यांनी वाढवू शकतो. अर्थतज्ज्ञांमध्ये केलेल्या सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की, 2021-22 च्या अर्थसंकल्पाचा आकार 39.6 लाख कोटी रुपयांचा असू शकतो. चालू आर्थिक वर्षासाठी सरकारने 34.83 लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला होता.

तरीही सर्वसामान्यांचे हात रिकामे राहू शकतात
सरकार वाढीव बजेटचा वापर पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी आणि रोजगार वाढवण्यासाठी करेल, असे अर्थतज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे टॅक्सच्या दरांवर काही दिलासा मिळेल अशी आशा कमी आहे. आर्थिक परिस्थिती देखील साथीच्या रोगामुळे प्रभावित कुटुंबांना फारसा दिलासा देत नाही. अशा स्थितीत सर्वसामान्यांनी अर्थसंकल्पाकडून फारशा अपेक्षा ठेवू नयेत.

यावेळी सरकार आणखी कर्ज घेऊ शकते
पायाभूत क्षेत्रातील मोठ्या योजनांना निधी उपलब्ध करून देण्यासाठी यावेळीही सरकार मोठ्या प्रमाणावर कर्जावर अवलंबून असेल. अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांचा भर पुन्हा एकदा निर्गुंतवणुकीच्या माध्यमातून सरकारी मालमत्ता विकून निधी उभारण्यावर असेल. याशिवाय 13 लाख कोटींचे मोठे कर्जही घेतले जाऊ शकते. 2021 च्या अर्थसंकल्पात सरकारने 12.05 लाख कोटी रुपयांच्या कर्जाची घोषणा केली होती.

‘पुष्पा’ अखेर मिरजेत जेरबंद ! तब्बल अडीच कोटीचे लाल चंदन जप्त

सांगली  | सर्व यंत्रणा चकवा देत मोठ्या प्रमाणात चंदनाची तस्करी केला जाणारा पुष्पा चित्रपट सध्या चर्चेत आहे. याचीच प्रचिती आज सांगली जिल्ह्यात आली. आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या दोन राज्यातील यंत्रणेला चकवा देत महाराष्ट्रात तस्करी होत असलेल्या चंदनाच्या तस्करीचे रॅकेट मिरज गांधी पोलिसांनी उधळून लावले. यावेळी पोलिसांनी तब्बल अडीच कोट रुपये किमतीचे एक टन रक्त चंदन जप्त केले. मिरज पोलीस आणि वन विभागाने छापा टाकून संयुक्त कारवाई केली. या दुर्मिळ लाल चंदनाची तस्करी करणाऱ्या यासिन इनायतउल्ला खान याला अटक करण्यात आली आहे. सदरची टोळी हि अंतरराज्य असल्याने याची पाळेमुळे खणणार असल्याचा इशारा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिला.

आंध्र प्रदेश मधील शेषाचलम जंगलातून मोठ्या प्रमाणात चंदनाची तस्करी कशी केली जाते यावर प्रकाश टाकणारा चित्रपट पुष्पा नुकताच प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाची सारी कथा या लाल चंदनाच्या अनुषंगानेच चित्रपटांमध्ये दाखवण्यात आलेली आहे. विविध औषधी गुणधर्म असेलल्या रक्तचंदनाला जगभरात प्रचंड मागणी आहे. भारतामध्ये अनेक ठिकाणी रक्तचंदनाची झाडं आहेत. विशेषत: दक्षिण भारतातील कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि केरळ या राज्यांतील जंगलांमध्ये मुबलक प्रमाणात रक्त चंदन आढळतं. औषधी गुणधर्म आणि जागतिक बाजारपेठेत असलेली मागणी या दोन कारणांमुळे रक्त चंदनाची मोठ्या प्रमाणात तस्करी होते.

अशाच प्रकारे रक्तचंदन महाराष्ट्रात येणार असल्याची माहिती मिरज गांधी चौकी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, उपाधिक्षक अशोक विरकर आणि सहायक पोलिस निरीक्षक रविराज फडणीस यांच्या पथकाने वन विभागाच्या साह्याने चौकशी करण्यास सुरुवात केली. त्यावेळी रविवारी पहाटे तस्करी होत असलेले रक्तचंदन मिरजेतून जाणार असल्याची माहिती रविराज फडणीस यांना मिळाली.

फडणीस यांनी मिरज – कोल्हापूर रस्त्यावर पहाटेच्या सुमारास सापळा लावला. यावेळी फळ वाहतूक होत असल्याचा फलक लावून जाणारा टेम्पो पोलिसांना आढळून आला. त्याची तपासणी केली असता टेम्पो मध्ये मागील बाजूस द्राक्ष बागेत वापरलेले जाणारे बकेट मागे ठेऊन त्या मागे रक्तचंदन लपवलेले होते, वाहनात रक्तचंदन लाकूड असल्याचे वन विभागाकडून खात्री करण्यात आली. त्यामध्ये 2 कोटी 85 लाखाचे 983 किलो 400 ग्रॅम चंदन असल्याचे निदर्शनास आले. ते जप्त करण्यात आले असून हे रक्त चंदन नेमके आले कुठून याचा तपास सांगली पोलीस करीत आहेत.

वाईन पिऊन गाडी चालवल्यास दंड होणार का ? मुंबई पोलीसांनी दिले ‘हे’ उत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्य सरकारने किराणा दुकानात वाईन विक्री ला परवानगी दिल्यानंतर राज्यात विरोधी पक्षांनी सरकार वर ताशेरे ओढले आहेत. त्यानंतर वाईन आणि दारूमध्ये फरक असल्याचे सरकारने सांगितलं. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर शिवम वहिया यांनी ट्विट करत वाईन पिऊन गाडी चालवल्यास शिक्षा होईल का असा प्रश्न पोलिसांना विचारल्यानंतर पोलिसांनी देखील तेवढ्याच शिताफीने उत्तर दिले.

मी वाईन पिऊन वाहन चालवले तर मुंबई पोलीस मला तुरुंगात टाकतील की जवळचा बार दाखवतील असं शिवम यांनी मिश्कीलपणे विचारलंय. या प्रश्नाला मुंबई पोलिसांनीदेखील तेवढ्याच चपखल पद्धतीने उत्तर दिले आहे. जर तुमची चाचणी केल्यानंतर तुमच्या शरीरात अल्कोहोल आढळले तर आम्ही तुमच्यावर निश्चित कारवाई करु. तुम्हाला तुरुंगात जावं लागेल, असं मुंबई पोलिसांनी सांगितले आहे.

दरम्यान, राज्यात सुपर मार्केट आणि दुकानात वाईन विक्री ला परवानगी देण्यात आल्यानंतर सरकार वर टीका झाली. मात्र शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्टीकरण सरकारने दिले. तसेच वाईन आणि दारू मध्ये खूप फरक असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हंटल होत.

Budget 2022 : सबका साथ सबका विकास या तत्त्वावर केंद्र सरकारचे काम सुरु – रामनाथ कोविंद

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशनास राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने आजपासून सुरुवात झाली. यावेळी राष्ट्रपतींनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीपासून प्रजासत्ताक दिनाला सुरुवात आहे. सबका साथ सबका विकास या तत्त्वावर सरकारचे काम सुरु आहे. कोरोनानं संपूर्ण जगभरात प्रभाव टाकला. आपल्या जवळच्या व्यक्तींना आपण गमावलं. अशा कठीण प्रसंगी संसर्गाच्या काळात आपण टीम म्हणून काम केले. केंद्र सरकारची पार्थमिकता हि महिला सशक्तीकरण असल्याचे यावेळी राष्ट्रपतींनी सांगितले.

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन नुकतीच सुरू झाली असून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी यावेळी अभिभाषण केले. यावेळी ते म्हणाले की, कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे केंद्र सरकारच्यावतीने विशेष काळजी घेण्यात आली. आम्ही एका वर्षापेक्षा कमी कालावधीत 150 कोटी डोस दिले.

कोरोना लसीकरणामुळे लोकांचे मनोबल वाढले. 70 टक्केहून अधिक लोकांनी कोरोना लसीचे दोन डोस घेतले आहेत. किशोरवयीन मुलांचेही लसीकरण केले जात असून आठ कोरोना लसींना भारताने मंजुरी दिली आहे. त्यातील भारतातील तीन लसींना जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिली आहे. कोरोना काळात फार्मा कंपन्यांनी काम करुन दाखवले असल्याचे राष्ट्रपतींनी यावेळी सांगितले.

“सरकारच्या धोरणांमुळे आज भारत अशा देशांमध्ये आहे जिथे इंटरनेटची किंमत सर्वात कमी आहे. स्मार्ट फोनची किंमत देखील सर्वात कमी आहे. भारतातील तरुण पिढीला याचा मोठा फायदा होत आहे. सरकारच्या सततच्या प्रयत्नांमुळे भारत पुन्हा एकदा जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनला आहे. आज भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा मोबाइल फोन उत्पादक देश म्हणून उदयास आला आहे. त्यामुळे भारतातील लाखो तरुणांना रोजगारही मिळाला आहे,” असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले.

दोन सत्रात होणार अधिवेशनाचे कामकाज

आजपासून सुरु झालेल्या संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज दोन सत्रांमध्ये पार पडणार आहे. दि. 2 ते 11 फेब्रुवारी या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वार्धातील सभागृहांचे कामकाज प्रत्येकी पाच तास होणार आहे. राज्यसभेचे कामकाज सकाळी 8 ते दुपारी 2 आणि लोकसभेचे कामकाज दुपारी 4 ते रात्री 9 वाजेपर्यंत चालेल. राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर सोमवारी आर्थिक पाहणी अहवाल संसदेत मांडला जाणार आहे. 1 फेब्रुवारी रोजी नेहमीप्रमाणे सकाळी 11 वाजता लोकसभेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करतील. त्यामुळे सोमवार आणि मंगळवार या दोन्ही दिवशी शून्य प्रहर व प्रश्नोत्तराचा तास होणार नाही.

Budget Session 2022 : आजपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु, अर्थमंत्री सादर करणार आर्थिक सर्वेक्षण

Economic Survey

नवी दिल्ली । संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. त्याची सुरुवात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने होईल. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये राष्ट्रपती दोन्ही सभागृहांना संबोधित करतील. अधिवेशन सुरू झाल्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन 2021-22 आर्थिक सर्वेक्षण सभागृहात सादर करतील. उद्या अर्थसंकल्प सादर होणार आहे. यावेळी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दोन दिवसांत संसदेच्या दोन्ही सभागृहात शून्य तास आणि प्रश्नोत्तराचा तास होणार नाही.

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन टप्प्यात पूर्ण होणार आहे. पहिला टप्पा 11 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. त्यानंतर एक महिन्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा 14 मार्चपासून सुरू होईल आणि 8 एप्रिलपर्यंत चालेल. कोरोनाच्या निर्बंधामुळे सभागृहाचे कामकाज वेगवेगळ्या सत्रात पूर्ण होणार आहे. बुधवार, 2 फेब्रुवारीपासून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर चर्चा सुरू होईल. त्यासाठी चार दिवसांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 7 फेब्रुवारीला चर्चेला उत्तर देणार आहेत.

12 फेब्रुवारी ते 13 मार्च या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अंतर राहणार आहे. यादरम्यान स्थायी समित्या मंत्रालय आणि विभागांच्या अनुदानाच्या मागण्या तपासून त्यावर रिपोर्ट तयार करतील. अर्थसंकल्पीय अधिवेशनात 29, पहिल्या भागात 10 आणि दुसऱ्या भागात 19 बैठका होणार आहेत.

अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाची बैठक
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्यापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 2022-23 च्या केंद्रीय अर्थसंकल्पाला मंजुरी दिली जाईल. कॅबिनेटची मंजुरी मिळाल्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करतील. अर्थमंत्री दुसऱ्यांदा डिजिटल बजट सादर करणार आहेत.

अर्थमंत्री सादर करणार आर्थिक सर्वेक्षण
अर्थमंत्री निर्मला सीतारामन या आज संसदेत 2020-21 साठी आर्थिक सर्वेक्षण सादर करणार आहेत. अर्थसंकल्पापूर्वी आर्थिक सर्वेक्षण सादर केले जाते. वास्तविक, भारताचे आर्थिक सर्वेक्षण हे भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाने जारी केलेले वार्षिक डॉक्युमेंट आहे, ज्यामध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेशी संबंधित अधिकृत आणि नवीन डेटा समाविष्ट केला जातो. हे मुख्य आर्थिक सल्लागारांच्या देखरेखीखाली तयार केले जाते.

आर्थिक सर्वेक्षणाच्या आधारे येत्या वर्षात अर्थव्यवस्थेत कोणत्या प्रकारच्या शक्यता आहेत हे ठरवले जाते. या सर्वेक्षणाच्या आधारे शासनाला सूचनाही दिल्या आहेत. मात्र त्यांची अंमलबजावणी करायची की नाही ही जबाबदारी सरकारची आहे.

Gold Price : MCX वर सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ, आजचा दर काय आहे ते पहा

Gold Price Today

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोन्या-चांदीच्या किमतीत वाढ होऊनही सोने विक्रमी उच्चांकावरून स्वस्त मिळत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज पुन्हा सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे. त्याचबरोबर चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. आज एप्रिल डिलिव्हरीसाठीचा सोन्याचा भाव 0.11 टक्क्यांनी वाढला आहे तर चांदीचा भाव 0.07 टक्क्यांनी वाढला आहे.

आज सोन्याचा दर 48 हजारांपेक्षा कमी आहे
एप्रिल डिलिव्हरीसाठीचा सोन्याचा भाव आज 0.11 टक्क्यांनी वाढून 47,636 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. त्याचबरोबर आजच्या ट्रेडिंग मध्ये चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. आज 1 किलो चांदीचा भाव 0.07 टक्क्यांनी वाढून 61,079 रुपये झाला आहे.

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 44,850 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 48,990 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 44,900 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 48,990 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 44,900 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,250 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत.

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 44,900 रुपये
पुणे – 44,850 रुपये
नागपूर -44,900 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 48,990 रुपये
पुणे -48,990 रुपये
नागपूर – 48,990 रुपये

PolicyBazar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Gram 22 Carat Gold Yesterday 22 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4500.00 Rs 4504.00 0.089 %⌃
8 GRAM Rs 36000 Rs 36032 0.089 %⌃
10 GRAM Rs 45000 Rs 45040 0.089 %⌃
100 GRAM Rs 450000 Rs 450400 0.089 %⌃

 

PolicyBazar वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Gram 24 Carat Gold Yesterday 24 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4915.00 Rs 4913.00 -0.041 %⌃
8 GRAM Rs 39320 Rs 39304 -0.041 %⌃
10 GRAM Rs 49150 Rs 49130 -0.041 %⌃
100 GRAM Rs 491500 Rs 491300 -0.041 %⌃

संजय राऊतांना आता दिव्यदृष्टी प्राप्त झाली का?; मनसे नेत्याची टीका

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य सरकारने किराणामालाच्या दुकानांमध्ये वाईन विक्रीला परवानगी दिल्यानंतर विरोधकांकडून राज्य सरकावर टीका केली जाऊ लागली आहे. दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवरही निशाणा साधला. त्यांच्यानंतर आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राज्यशिवसेना खासदार संजय राऊत याच्यावर टीका केली. मनसे नेते राज ठाकरे यांच्यावर कोरोनाच्या काळात टीका करणारा अग्रलेख लिहिण्याऱ्या “संजय” ला आता दिव्यदृष्टी प्राप्त झाली का?, असे देशपांडे यांनी म्हंटले.

राज्य सरकारने किराणा दुकानात वाईनला परवानगी देण्याचा निर्णय घेतल्याने यावरून राजकीय वाटेवर चांगलेच तापले आहे. यावरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करीत शिवसेना खासदार संजय राऊत याच्यावर निशाणा साधला आहे. देशपांडेंनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “कोरोनाच्या पहिल्या लाटे मध्ये जेव्हा राजसाहेबांनी वाईन शॉप चालू करा कारण सरकारचा महसूल बुडतो आहे हे सांगितलं होतं. त्यावेळेला साहेबांवर टीका करणारा अग्रलेख लिहिण्याऱ्या “संजय” ला आता दिव्यदृष्टी प्राप्त झाली का?,”

देशपांडे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेसाहेब यांनी कोरोना काळात मद्यशॉप सुरू करा सूचना केली होती. राज्याचा महसूल वाढवा यासाठी ते बोलले होते. त्यावेळी मातरम त्याच्यावर टीका करण्यात आली होती. राज ठाकरे यांच्यावर टीका करणारा तो अग्रलेख ऑनलाईन का काढण्यात आला? असा सवालही संदीप देशपांडे यांनी यावेळी राऊतांना विचारला आहे.

Stock Market : अर्थसंकल्पापूर्वी बाजाराची चांगली सुरुवात, बँक आणि आयटी शेअर्समध्ये तेजी

Recession

नवी दिल्ली । अर्थसंकल्पाच्या एक दिवस आधी भारतीय शेअर बाजाराने जोरदार सुरुवात केली आहे. सेन्सेक्स 645.68 अंकांच्या किंवा 1.13 टक्क्यांच्या मजबूतीसह 57,845.91 च्या पातळीवर ट्रेड करत आहे. निफ्टी 199.10 अंकांच्या किंवा 1.16 टक्क्यांच्या वाढीसह 17,301.05 च्या पातळीवर दिसत आहे. आज बँक शेअर्समध्ये वाढ होत आहे.

आपण फेब्रुवारी सिरीजच्या सुरुवातीला आहोत त्यामुळे 31 डिसेंबर रोजी कोणताही स्टॉक F&O बंदी अंतर्गत नाही. हे लक्षात घेण्यासारखे आहे की जर सिक्योरिटीजच्या पोझिशन्सने त्यांच्या मार्केट वाइड पोझिशन मर्यादा ओलांडल्या तर F&O विभागामध्ये समाविष्ट असलेले स्टॉक्स बंदी असलेल्या श्रेणीमध्ये ठेवले जातात.

निफ्टीच्या 5 कंपन्यांचे आज निकाल
निकालांसाठी आज मोठा दिवस आहे. BPCL, IOC, SUN PHARMA, TATA MOTORS आणि UPL या 5 निफ्टी कंपन्यांचे निकाल आज येतील. तसेच DLF, EXIDE, HPCL आणि NAVIN FLUORINE च्या निकालांचीही प्रतीक्षा केली जाईल.

AGS Transact IPO
AGS Transact Tech Share: पेमेंट सोल्युशन्स प्रोव्हायडर कंपनी AGS Transact ची लिस्टिंग आज म्हणजेच 31 जानेवारी रोजी होणार आहे. बजेटमुळे कंपनीचे लिस्टिंग एक दिवस आधीच होणार आहे. याआधी कंपनीची लिस्टिंग 1 फेब्रुवारीला होणार होती. मात्र अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला सादर केला जातो, त्यामुळे आता कंपनीची लिस्टिंग एक दिवस आधी 31 जानेवारीला होईल. ही 2022 ची पहिलीच लिस्टिंग आहे.

जागतिक बाजारपेठ
अर्थसंकल्पाच्या एक दिवस आधी जागतिक संकेत चांगले दिसत आहेत. SGX NIFTY मध्ये 150 हून अधिक अंकांची वाढ होत आहे. NIKKEI मध्ये ताकद आहे. इतर आशियाई बाजार आज बंद आहेत. शुक्रवारी अमेरिकेच्या बाजारात जोरदार उसळी पाहायला मिळाली. DOW ने 565 पॉइंट्स चालवले आहेत त्यानंतर NASDAQ 3% पेक्षा जास्त आहे.

गांजाची शेती करण्याची परवानगी द्या; शेतकऱ्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गांजा लागवडीस परवानगी द्यावी अशी मागणी नांदेडच्या एका शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांकडे केलीय. अविनाश अनेराये अस सदर शेतकऱ्याचे नाव असून ते नायगांव तालुक्यातील शेळगांव इथं राहतात.अविनाश यांनी मेल करत ही मागणी उद्धव ठाकरे यांच्या कडे केली आहे.

कोरोना, अतिवृष्टी आणि थंडीच्या कडाक्यामुळे शेतकरी हतबल झाला असून त्याचे आर्थिक उत्पन्न घटलंय, त्यामुळे आपण सरसकट शेतकऱ्यांना गांजा लागवडीसाठी सशर्त परवानगी देऊन शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी सहकार्य करावे, अशी मागणी केल्याचे अविनाश यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

दरम्यान, सरकार जर किराणा दुकानात वाईन विक्रीला परवानगी देत असेल तर शेतकऱ्यांना गांजाची शेती करायला परवानगी द्या अशी मागणी नांदेड भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी यापूर्वी केली आहे. सरकारला दारू विक्रीतून उत्पन्न वाढवायचे असेल तर गांजाच्या शेतीतूनही चांगले उत्पन्न होईल असे त्यांनी म्हंटल होत.

निगडीत विहिरीत पडलेल्या जखमी सांबराला जीवदान

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके

सातारा तालुक्यातील निगडी येथील एका विहिरीमध्ये पडलेल्या सांबराला तब्बल 8 तासाच्या अथक प्रयत्नानंतर जीवदान देण्यात वन विभागाच्या पथकाला यश आले. दरम्यान पायामध्ये शिकारीचा फासा लागून जखमी झाल्याने सांबर विहिरीत पडले होते. त्याच्यावर उपचार केल्यानंतर त्याला सोडून देण्यात आल्याचे माहिती सातारा तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी डॉ. निवृत्ती चव्हाण यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती अशी की, निगडी येथील शिवारातील एका विहिरीमध्ये सांबर पडल्याची माहिती गावातील ग्रामस्थांना समजली. त्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती तत्काळ वन रक्षक राजू मोसलगी यांना शनिवारी सायंकाळी साडेसात वाजता दिली. वन विभागाचे रेस्कू पथका घटनास्थळी दाखल झाले. आठ तासांच्या अथक प्रयत्नानंतर तब्बल 200 ते 225 किलो वजनाचा नर जातीच्या सांबराला विहिरीतून दोरखंड व रेस्कु जाळीचा वापर करून बाहेर काढले.

विहिरीतून बाहेर काढलेल्या सांबराची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यावेळी त्याच्या मागील उजव्या पायात शिकारीसाठी वापरण्यात येणारा फासा अडकलेला असल्याचे दिसून आले. त्यानंतर त्याच्या पायातील फासा काढून टाकत जखमांवर मलमपट्टी करत उपचार करण्यात आले. सब्रुवर पार्थमिक उपचार केल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास त्याला सोडून देण्यात आले.

या सांबराला जीवदान देण्यामध्ये वनविभागाचे वन क्षेत्रपाल डॉ. निवृत्ती चव्हाण, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. चंदन सवणे,  वनपाल कुशाल पावरा, वनरक्षक राजू मोसलगी, सुहास भोसले, महेश सोनवले, श्रीकांत दुर्गे, गोरख शिरतुडे, शैलेश देशमुख, सुमित वाघ, दिपक मच्छे तसेच निगडी चे सरपंच सुभाष शामराव पवार, धनंजय बबन पवार, अण्णा मारुती जाधव, सागर प्रकाश मसुगडे, तुषार विजय पवार, प्रदीप तुळशीदास जाधव, रोहित व्यंकट पवार, महेश धनाजी भोईटे, प्रीतम आप्पासो पवार यांनी परिश्रम घेतले. बचावकार्य सहायक वन संरक्षक सुधीर सोनवले, उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडले.

सांबर हा एक हरीण वर्गातील प्राणी असून हा हा भारत देशात आढळतो. या जातीचे नर प्राणी 185 ते 260 किलो वजनाचे असतात. सप्टेंबर ते जानेवारी या काळात यांचा प्रणयकाळ दिसून येतो. इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्सरवेशन ऑफ नेचर या आंतरराष्ट्रीय संस्थेने या जातीचे अस्तित्व असुरक्षित असल्याचे जाहीर केले आहे. ज्या मागचे प्रमुख कारण हे मानवाचा निसर्गातील वाढता हस्तक्षेप तथा शिकार आहे.