Thursday, December 25, 2025
Home Blog Page 2878

माझ्या ‘ब्रा’ चे माप देव घेत आहे; अभिनेत्री श्वेता तिवारीचे वादग्रस्त वक्तव्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीने भोपाळ मधील एका कार्यक्रमा दरम्यान, ब्रा साईज आणि देव याबद्दल एक वादग्रस्त विधान केले आहे. माझ्या ब्रा चे माप देव घेत आहे असे विधान तिने केले. तिच्या या विधानानंतर सर्वत्र तिच्यावर टिकेचा भडीमार सुरू आहे. दरम्यान याप्रकरणी मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

श्वेता तिवारी तिच्या आगामी वेब सीरिजच्या घोषणेसाठी भोपाळमध्ये गेली होती. तिथे ती वेब सीरिजच्या संपूर्ण टीमसोबत प्रेम कॉन्फरन्समध्ये सहभागी झाली होती. त्यावेळी श्वेता तिवारी हिने वादग्रस्त वक्तव्य करताना म्हंटल की, ‘माझ्या ब्रा चं माप देव घेत आहे’

श्वेता तिवारीच्या वक्तव्याचा विरोध करत मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी म्हटले आहे, ‘श्वेता तिवारीने आतंरवस्त्राबाबत केलेले विधान अतिशय निंदनीय असून तमाम हिंदू संघटनेच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणी श्वेता तिवारीची पुढील 24 तासात चौकशी करण्याचे निर्देश भोपाळ पोलीस कमिशनरना देण्यात आले असून लवकरात लवकर या चौकशीचे रिपोर्ट सादर करण्याचे आदेश देण्यात आले. यानंतर या प्रकरणावर योग्य निर्णय घेण्यास येईल’, असे ते म्हणाले.

क्रिप्टो मनी लाँड्रिंगमध्ये 30% वाढ, 2021 मध्ये हा आकडा $ 8.6 अब्ज पेक्षा जास्त

Cryptocurrency

नवी दिल्ली । क्रिप्टोकरन्सीमध्येही मनी लाँड्रिंगची प्रकरणे वाढत आहेत. ब्लॉकचेन एनालिसिस फर्म चेनालिसिसच्या रिपोर्ट्स नुसार, सायबर गुन्हेगारांनी 2021 मध्ये $8.6 अब्ज किमतीची क्रिप्टोकरन्सी लाँडर केली. मनी लॉन्ड्रिंगची ही रक्कम 2020 च्या तुलनेत 30 टक्क्यांनी जास्त आहे.

रिपोर्ट्स चा अंदाज आहे की, 2017 पासून आजपर्यंत, सायबर गुन्हेगारांनी क्रिप्टोमध्ये एकूण $33 अब्जची लॉन्ड्रिंगकेली आहे, त्यापैकी बहुतेक सेंट्रलाइज्ड एक्सचेंजेसकडे वळले आहेत. चेनॅलिसिसने म्हटले आहे की,” 2021 मध्ये मनी लाँड्रिंगमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणे आश्चर्यकारक नाही कारण गेल्या वर्षभरातील खटला आणि बेकायदेशीर क्रिप्टो क्रियाकार्यक्रम या दोन्हीमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.”

17 टक्के पैसे सेंट्रलाइज्ड फायनान्स ऍप्लिकेशन्ससाठी गेले
चेनॅलिसिसने सांगितले की,”मनी लॉन्ड्रिंगच्या $8.6 अब्जपैकी, सुमारे 17 टक्के डिसेंट्रलाइज्ड फायनान्स ऍप्लिकेशन्ससाठी गेले. हे क्षेत्र पारंपारिक बँकांच्या बाहेर आर्थिक व्यवहारांची सुविधा देते. 2020 च्या तुलनेत हे प्रमाण 2 टक्के जास्त आहे.

चुकीच्या पत्त्यांवरून येणाऱ्या मूल्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे
चेनॅलिसिस रिपोर्ट्स नुसार, मायनिंग पूल्स, हाय -रिस्क एक्सचेंजेस आणि मिक्सर्समध्ये देखील बेकायदेशीर ऍड्रेसकडून येणाऱ्या मूल्यात लक्षणीय वाढ झाली आहे. फंडाचे मूळ लपविण्यासाठी मिक्सर्स सामान्यत: संभाव्य ओळखण्यायोग्य किंवा कलंकित क्रिप्टोकरन्सी फंड इतरांसह एकत्र करतात.

मनी लाँड्रिंग काय आहे ?
मनी लाँड्रिंग म्हणजे बेकायदेशीर कमावलेला पैसा कायदेशीर व्यवसायात ट्रान्सफर करण्याच्या प्रक्रिया.

Budget 2022 : निर्मला सीतारामन यावेळीही सादर करणार ग्रीन बजट, कमीत कमी प्रतींची केली जाणार छपाई

नवी दिल्ली । अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2022 रोजी 2022-23 या आर्थिक वर्षासाठी केंद्रीय अर्थसंकल्प 2022-23 सादर करणार आहेत. त्याचबरोबर देशाचा अर्थसंकल्प यंदाही ग्रीन असेल. कोविड महामारीमुळे आशियातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या कर प्रस्तावांचे सादरीकरण आणि आर्थिक स्टेटमेंटशी संबंधित मोठ्या प्रमाणात कागदपत्रांची छपाई या वेळीही होणार नाही.

बहुतेक बजट डॉक्युमेंट्स डिजिटल स्वरूपात असतील
अधिकाऱ्यांनी सांगितले की, बजटचे डॉक्युमेंट्स बहुतांशी डिजिटल स्वरूपात उपलब्ध असतील. फक्त काही कॉपी प्रत्यक्ष उपलब्ध असतील. बजट डॉक्युमेंट्स च्या शंभर कॉपी छापल्या गेल्या आहेत. ही संख्यात्मकदृष्ट्या इतकी विस्तृत प्रक्रिया होती की, छपाई कामगारांनाही नॉर्थ ब्लॉकच्या तळघरात छापखान्यात किमान काही आठवडे वेगळे ठेवावे लागले.

कर्मचार्‍यांना त्यांच्या कुटुंबीयांपासून दूर ठेवून अर्थसंकल्पीय डॉक्युमेंट्स छापण्याचे काम पारंपरिक ‘हलवा समारंभ’ करून सुरू करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला अर्थमंत्री, अर्थ राज्यमंत्री आणि मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित असतात. मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर बजटच्या कॉपी छापण्याचे प्रमाण कमी झाले. सुरुवातीला, पत्रकार आणि बाह्य विश्लेषकांना वितरित केलेल्या कॉपी कमी केल्या गेल्या आणि नंतर महामारीचा हवाला देत लोकसभा आणि राज्यसभा खासदारांना दिलेल्या कॉपी कमी करण्यात आल्या.

ओमिक्रॉनमुळे हलवा समारंभही पुढे ढकलला गेला
यावर्षी कोविड-19 च्या ओमिक्रॉन व्हेरिएन्टबाबत जास्त निर्बंध लादण्यात आले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, साथीच्या आजारामुळे पारंपारिक खीर समारंभही सोडून देण्यात आला आहे. मात्र, बजट डॉक्युमेंट्सचे संकलन डिजिटल करण्यासाठी, कर्मचाऱ्यांच्या एका लहान गटाला वेगळे करणे आवश्यक आहे.

अर्थसंकल्पीय डॉक्युमेंट्समध्ये सामान्यत: अर्थमंत्र्यांचे संसदेतील भाषण, मुख्य नोट्स, वार्षिक वित्तीय विवरणे, कर प्रस्ताव असलेले वित्त विधेयक, आर्थिक विधेयकातील तरतुदी स्पष्ट करणारे मेमोरँडम आणि मॅक्रो इकॉनॉमिक प्रोफाइल यांचा समावेश असतो. यामध्ये मध्यम मुदतीच्या आर्थिक धोरणासह आर्थिक धोरण विवरण, योजनांसाठी परिणाम फ्रेमवर्क, सीमाशुल्क अधिसूचना, मागील अर्थसंकल्पीय घोषणांची अंमलबजावणी, प्राप्ती बजट, खर्चाच्या अंदाजपत्रकाचा समावेश आहे.

गिरीश महाजनांनी भाजपला विकले; एकनाथ खडसेंनी टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि भाजप नेते गिरीश महाजन यांच्यात सध्या एकमेकांवर अनेक गंभीर आरोप, टीका टिप्पणी केली जात आहे. महाजन यांच्या टीकेला खडसे यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. “2019 च्या विधानसभा निवडणुकीपासून छुपी युती होती त्यामुळं रोहिणी खडसे यांचा पराभव झाला. गिरीश महाजन दुसऱ्याची मदत घेवून भाजपला धुळीत घालत आहेत, त्यांनी भाजपला विकले आहे, अशी टीका खडसे यांनी केली.

एकनाथ खडसे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, जळगाव जिल्ह्यात गिरीश महाजन यांनी छुप्या युतीमुळे भाजपा विकून टाकली आहे. भाजपाची इतकी वाईट परिस्थिती जिल्ह्यात कधीही नव्हती. भाजपला दुसऱ्याची मदत घेऊन खडसे यांचा पराभव करण्यासाठी लढावे लागते ही चिंताजनक बाब आहे.

भाजप नेते गिरीश महाजन यांनी काल गुलाबराव पाटील यांची भेट घेतल्यानंतर एकनाथ खडसे यांच्यावर टीका केली होती. त्याच्या टीकेला खडसेंनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

Silver ETF मध्ये गुंतवणूक करून तुम्ही मिळवू शकता भरघोस नफा; कसा ते जाणून घ्या

silver price

नवी दिल्ली । कमी जोखीम असल्यामुळे सोन्यात गुंतवणूक करणे हा एक चांगला पर्याय मानला जातो. मात्र, आता लोकांचा कल सोन्यासह चांदीमधील गुंतवणुकीकडेही वळत आहे. जगभरातील लोकं चांदीमध्ये पैसे गुंतवत आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे याद्वारे मिळत असलेला मजबूत रिटर्न. गेल्या चार वर्षांत चांदीने 63 टक्के रिटर्न दिला आहे.

वास्तविक, देशात दीर्घ काळापासून सोने आणि चांदी फिजिकली घेण्याची परंपरा आहे. मात्र गेल्या 5 वर्षांत हा ट्रेंड खूप बदलला आहे. आता जास्त लोकं स्टॉक मार्केट, म्युच्युअल फंड आणि एक्सचेंज ट्रेडेड फंड (ETF) मध्ये गुंतवणूक करत आहेत. यामुळेच ETF ची व्याप्ती वाढत आहे आणि आता लोकं Silver ETF मध्ये गुंतवणूक करण्याकडे वळत आहेत. सेबीने अलीकडेच Silver ETF ला परवानगी दिली आहे.

यावर्षी चांदी 80,000 पर्यंत पोहोचेल
या वर्षी आतापर्यंत दोन Silver ETF बाजारात दाखल झाले आहेत. येत्या काही महिन्यांत त्यांची संख्या तर वाढेलच, मात्र रिटर्नचा विचार करता गुंतवणूकही वाढेल. केडिया एडव्हायझरीचे व्यवस्थापकीय संचालक अजय केडिया सांगतात की,”मजबूत रिटर्न मिळण्याचे मुख्य कारण म्हणजे औद्योगिक वापरासाठी चांदीची मागणी वाढणे. हरित तंत्रज्ञान आल्यानंतर त्याची मागणी झपाट्याने वाढली आहे, तर खाणकामात सातत्याने घट होत आहे. यंदा चांदी 80 हजार रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचू शकते.”

महागाईपासून संरक्षण करण्याचा सर्वोत्तम मार्ग
मॉर्गन स्टॅनलीच्या हिलया रिपोर्टमध्ये असे म्हटले गेले आहे की,”चांदी प्रमुख सराफा बनत आहे. वाढत्या औद्योगिक वापरामुळे अर्थव्यवस्थेतील बदलांसाठी सोन्यापेक्षा चांदी जास्त संवेदनशील बनली आहे. जेव्हा जेव्हा अर्थव्यवस्था मजबूत होईल तेव्हा चांदीची मागणी वाढू लागेल. याचा अर्थ असाही होतो की, वाढत्या महागाईच्या काळात सोन्यापेक्षा चांदीची किंमत जास्त वाढेल. अशा परिस्थितीत चलनवाढीपासून संरक्षणाचे साधन म्हणून चांदी चांगली असल्याचे सिद्ध होईल.”

ETF काय असते ?
ETF म्हणजे सिक्युरिटीज आणि शेअर्स सारख्या मालमत्तेची बकेट. त्याची खरेदी आणि विक्री एक्सचेंजवर होते. त्यामुळे त्यांची वैशिष्ट्ये आणि फायदे स्टॉकमधील गुंतवणुकीसारखेच असले तरी ते म्युच्युअल फंड आणि बाँड्स सारख्या साधनांवर फायदे देखील देतात. कोणत्याही एका कंपनीच्या स्टॉकप्रमाणे, ETF चे ट्रेडिंग देखील दिवसभर चालते. एक्सचेंजवरील मागणी आणि पुरवठा यानुसार त्यांच्या किमतीत चढ-उतार होत राहतात.

‘या’ ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचाराची चौकशी सुरु, दहा लाख 70 हजाराच्या वसुलीचा आदेश असणारा रिपोर्ट पाठविला

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

जत तालुक्यातील साळमळगेवाडी येथील ग्रामपचांयतीच्या भ्रष्टाचाराचा भांडाफोड केल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे. सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांच्या सघंमताने केलेल्या भ्रष्टाचारा भक्कम पुराव्याचा परिणाम सकारात्मक झाला आहे. साळमळगेवाडी गावातील ग्रामस्थांनी दैनिक जनप्रवासचे स्वागत केले. तालुक्‍याच्या ठिकाणापासून अवघ्या १२ किलोमीटर अंतरावर साळमळगेवाडी गाव आहे.

दोन हजार लोकसंख्या आणि सात सदस्यसंख्या असलेल्या या गावातील ग्रामपंचायतचा कारभारा एका पडक्या व्यायाम शाळेत चालतो. गावाला ग्रामपंचायत नाही. अशा अवस्थेत सरपंच व ग्रामसेवक या दोघांनी मिळून दहा लाख ७० हजाराचा गैरव्यवहार केल्याचा सिद्ध झाला आहे. मात्र कोरोना सारख्या महामारीच्या नावाखाली जत पंचायत समिती ही कारवाई करण्यात चालढकल करीत होती. अखेर या भ्रष्टाचार या विषयावर सदस्यांनी भांडाफोड केल्याने शासनाचे सूत्रे गती फिरली आणि दहा लाख ७० हजाराचे वसुलीच्या आदेश असणारा अहवाल जिल्हा परिषदकडे पाठविण्यात आला आहे.

जत शहरात लघुशंकेच्या युनिटचा पत्ता नाही मात्र साळमळगेवाडी गावात ७८००० खर्चाचे मुतारी युनिट बसवण्यात आले आहे. तर शौचालय युनिटवर ही ६५ हजारचा खर्च तर गावात साफसफाईसाठी दररोज कामगारावर दोन हजार रुपये खर्चचा तपशील या ग्रामपंचायतीने दाखवला आहे.

मजूर सोसायटी मध्ये घोटाळा करणे आणि इतिहास समजणे वेगळी गोष्ट; मलिकांची दरेकरांवर बोचरी टीका

Darekar Malik

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई येथील एका उद्यानाला टिपू सुलतान यांचे नाव देण्यात आल्यानंतर भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये खडाजंगी उडाली असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक आणि भाजपचे प्रवीण दरेकर यांच्यात चांगलीच जुंपली आहे. नवाब मलिक हे हिंदू द्वेष्टी असल्याचा आरोप दरेकरांनी केल्यानंतर नवाब मलिक यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

नवाब मलिक म्हणाले, प्रवीण दरेकर यांनी इतिहास समजून घेण्याची गरज आहे. मजूर सोसायटी मध्ये घोटाळा करणे आणि इतिहास समजणे वेगळी गोष्ट आहे. जर दरेकर इतिहास समजून घेऊ शकत नाहीत, तर राष्ट्रपतींना इतिहास विचारा असता सल्ला देत जर मी काही चुकीचे बोललो असेन, तर भापजपने राष्ट्रपती भवनासमोर ठिय्या आंदोलन करावे असे आव्हान नवाब मलिक यांनी दिले.

नेमकं काय आहे प्रकरण-

मुंबई येथील एका उद्यानाला टिपू सुलतान यांचे नाव देण्यात आल्यानंतर भाजप आक्रमक झाली आहे. याच दरम्यान टिपू सुलतान हे स्वातंत्र्य सेनानी होते असे विधान नवाब मलिक यांनी केलं. टिपू सुलतान कधीही इंग्रजांना शरण गेले नाहीत. इंग्रजांशी लढाई करतानाच ते शहीद झाले होते असे मलिक यांनी म्हंटल. त्यानंतर प्रवीण दरेकर यांनी यावर प्रत्युत्तर देताना मलिक हे हिंदु द्वेष्टी असल्याचा आरोप केला होता. तसेच या संपूर्ण प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसने आपली भूमिका जाहीर करावी असे आवाहन त्यांनी केलं.

“असा मस्तवालपणा, गुंडगिरी…”; सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया

Nitesh Rane Shivsena

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भाजपा नेते तथा केंद्रियनमंत्री नारायण राणे यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांचा सुप्रीम कोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज आज फेटाळला. अर्ज फेटाळत नितेश राणे यांना जिल्हा न्यायालयात 10 दिवसांमध्ये हजर होण्याचे आदेशही दिले. यावरून शिवसेनेकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे. “कायद्यापुढे सर्वांना झुकावं लागतं. असा मस्तवालपणा, गुंडगिरी, दादागिरी, लोकांना धमकावणं हे सगळे प्रकार….आता पूर्वीचे दिवस राहिलेले नाहीत”, असे शिवसेनेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी म्हंटले आहे.

शिवसेनेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, “कायदा सर्वांसाठी समान असतो. कोणाचाही उन्माद कायदा खपवून घेत नाही. कायद्यापुढे सर्वांना झुकावं लागतं. असा गुंडगिरी, मस्तवालपणा, दादागिरी, लोकांना धमकावणं हे सगळे प्रकार….आता पूर्वीचे दिवस राहिलेले नाहीत”, असे कायंदे यांनी म्हंटले आहे.

यावेळी पुढे त्या म्हणाल्या की, “लोकप्रतिनिधी, कोणीही असो कायद्यासमोर सर्व समान असतात. याची जाणीव आता तरी राणे कुटुंबाला होईल असं वाटतं. याच्यातून बोध घेतला पाहिजे. आता तरी कायदा सुव्यवस्था बिघडू नये याची काळजी घेतली पाहिजे, असे कायंदे यांनी म्हंटले.

मादी बिबट्या आणि बछड्याची अनोखी भेट वन विभागाच्या ट्रॅप कॅमेऱ्यात झाली चित्रित

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे मादी बिबट्या आणि तिच्या बछड्याची अनोखी भेट झाली. वन विभागाच्या ट्रॅप कॅमेऱ्यात हा प्रसंग चित्रित झाला आहे. वाटेगाव येथील एका शेतात, बिबट्याचा बछडा भटकंती करत आला होता. वन विभागाने या ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावले होते. वन विभागाने ह्या परिसरातील ग्रामस्थाना मार्गदर्शन केले. या परिसरात शांतता ठेवण्यात आली.

दरम्यान त्या बछडा बिबट्याची आई मादी बिबट्या तेथे आली, आणि आपल्या बछडयाला अलगद घेऊन गेली. वनविभाग आणि ग्रामस्थानी मादी बिबट्या आणि बछड्याची अनोखी भेट घडवून आणली. वाळवा आणि शिराळा तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांचे दर्शन होत आहे. यामुळे परिसरातील ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेलं होत. काही दिवसांपूर्वी वाटेगाव येथे बिबट्याचे दर्शन झाले होते. याची माहिती मिळताच वनविभागाच्या पथकांनी ज्या ठिकाणी बिबट्या दिसला होता त्या ठिकाणी ट्रॅप कॅमेरे बसविले होते.

बुधवारी पहाटेच्या सुमारास वनविभागाच्या या ट्रॅप कॅमेरा मध्ये मादी बिबट्या आणि तिच्या बछड्याची भेट झाल्याचे चित्रित झाले आहे. दरम्यान त्या बछडा बिबट्याची आई मादी बिबट्या तेथे आली, आणि आपल्या बछडयाला अलगद घेऊन गेली. वनविभाग आणि ग्रामस्थानी मादी बिबट्या आणि बछड्याची अनोखी भेट घडवून आणली.

पेठ येथील तरुणाकडून तीन गावठी कट्टे अन काडतुसांसह सव्वा लाखांचा मुद्देमाल हस्तगत

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

वाळवा तालुक्यातील पेठ येथे राहणाऱ्या तरुणाला सांगलीतील संजयनगर मध्ये गावठी कट्टा विक्रीसाठी आला असता सापळा रचून पकडण्यात आले. अमोल अर्जुन शेलार असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्याकडून गावठी बनावटीचे तीन पिस्टल आणि ४ जिवंत काडतुसे असा एकूण १ लाख ११ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. शेलार याच्या विरोधात संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे एक पथक संजयनगर परिसरात पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी पथकातील कर्मचाऱ्यांना माहिती मिळाली कि, एक व्यक्ती देशी बनावटीचे हत्यार विक्रीसाठी येणार आहे. मिळालेल्या माहिती प्रमाणे पथकाने अभयनगर येथील देवकुळे हॉस्पिटल जवळ सापळा लावला. त्यावेळी एक जण पिशवी घेऊन संशयित रित्या त्या ठिकाणी थांबला होता. त्याला छापा टाकून पकडल्यानंतर त्याच्या जवळ गावठी बनावटीचे तीन पिस्टल आणि काडतुस सापडले. त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक ढेरे यांनी हत्यार बाळगणेचा परवाना आहे का असे विचारता त्याने त्याचेकडे परवाना नसल्याचे सांगितले.

सदरची अग्नीशस्त्रे आणि काडतुसे सविस्तर पंचनाम्याने जप्त करुन त्यास ताब्यात घेवून त्याच्या विरोधात भारतीय शस्त्र अधिनियमचे कलम प्रमाणे संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्याकडून ५० हजार रुपये किमतीचे दोन देशी बनावटीचे स्टील प्लेटिंग बॉडीचे पिस्टल, १८ एम एम बोर असलेला एक गावठी कट्टा आणि १ हजार २०० रुपये किमतीचे ४ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उप निरीक्षक दिलीप ढेरे, राहुल जाधव, सचिन कनप, अमोल ऐदाळे, सुधीर गोरे, संकेत मगदूम, राजू मुळे, संदीप पाटील आणि संतोष गळवे यांच्या पथकाने केली.