Thursday, December 25, 2025
Home Blog Page 2877

औरंगाबादेत महाराणा प्रतापांचा पुतळा बसवणारच

औरंगाबाद – शहरातील कॅनॉट परिसरात महाराणा प्रताप यांचा पुतळा उभारण्यावरून एका नव्याच वादाला तोंड फुटले आहे. भाजप आणि शिवसेना हा पुतळा उभारण्यासाठी आग्रही आहे तर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी हा पुतळा उभारण्यास विरोध दर्शवला आहे. या निधीतून ग्रामीण भागातील युवक, युवतींसाठी सैनिकी शाळा उभारावी, असा सल्ला खासदारांनी दिला आहे. या वादात आता महसूल राज्य मंत्री अब्दुल सत्तार यांनी आणखी एक वक्तव्य केलंय. शहरात महाराणा प्रताप यांचा पुतळा उभारणारच. यासाठी मी पुढाकार घेईन, असे ते म्हणाले.

सिल्लोड नगरपरिषदेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटन प्रसंगीच्या कार्यक्रमात आज मंत्री अब्दुल सत्तार यांनी हे वक्तव्य केलं. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते इमारतीचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी औरंगाबादमधील महाराणा प्रताप यांचा पुतळा उभारणीच्या वादासंबंधी ते बोलले. अब्दुल सत्तार म्हणाले, औरंगाबादेत महाराणा प्रताप यांचा पुतळा बसणारच. तसेच इम्तियाज जलील यांनी विरोध करू नये, असं मी आवाहन केलं आहे. औरंगाबादेत हा पुतळा बसवताना मी स्वतः पुढे असेन.’

मागील आठवड्यात एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, पालकमंत्र्यांना एक पत्र लिहून हा पुतळा उभारण्यासाठी विरोध दर्शवला. पुतळा उभारण्याऐवजी ग्रामीण भागातील युवक, युवतींसाठी सैनिकी शाळा उभारावी, हाच शूर योद्धा महाराणा प्रताप यांच्या प्रती आदर भाव असेल, अशी मागणी खा. जलील यांनी केली आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी राजपुत समाजाच्या वतीने शहरात खासदार इम्तियाज जलील यांच्याविरोधात आंदोलन करण्यात आले. पुतळ्याला विरोध करणाऱ्या खासदारांचा निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच शिवसेना आमदार अंबादस दानवे यांनीदेखील, ज्यांना महाराणा प्रतापांचा इतिहास ठाऊक नाही, त्यांनी याविषयी काही बोलू नये, असा इशारा दिला होता. आता मंत्री अब्दुल सत्तार यांनीदेखील या वादात पुढाकार घेतल्याचे दिसून आले आहे.

कार- ट्रॅक्टरच्या अपघातात भाजप नेत्याचा जागीच मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गडचिरोली जिल्ह्यात कार आणि ट्रॅक्टर मध्ये भीषण अपघात झाला असून यामध्ये भाजपाचे जिल्हा सचिव तथा ‘मन की बात’ कार्यक्रमाचे जिल्हा संयोजक आनंद गण्यारपवार यांचा जागीच मृत्यू झाला. सकाळी साडेसहा वाजता हा अपघात झाला आहे. अपघात एवढा भीषण होता की यात ट्रॅक्टरचे 2 तुकडे झाले.

अतुल गण्यारपवार व आनंद गण्यारपवार हे चामोर्शी येथून ब्रम्हपुरीमार्गे चारचाकी वाहनाने नागपूरला जात होते. दरम्यान रणमोचन फाट्याजवळ समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरने कारला जोरदार धडक दिली. यात कारमध्ये मागे बसलेले आनंद गण्यारपवार हे जागीच ठार झाले, तर अतुल गण्यारपवार व चालक हे एअरबॅगमुळे बचावले

या घटनेनंतर तिघांनाही ब्रम्हपुरी येथे नेण्यात आले. अतुल गण्यारपावार यांच्या मानेला दुखापत झाली असून, प्रकृती स्थिर आहे. दरम्यान खासदार अशोक नेते यांनी रूग्णालयात जात घटनेची माहिती घेतली. आनंद गण्यारपवार यांच्या निधनामुळे चामोर्शीमध्ये शोककळा पसरली आहे

घरबसल्या LIC पॉलिसीचे स्टेट्स कसे तपासावे हे समजून घ्या

LIC

नवी दिल्ली । एलआयसी ही सरकारी कंपनी देशात लाईफ इन्शुरन्स पॉलिसी विकण्यात आघाडीवर आहे. दुर्गम ग्रामीण भागात त्याची पोहोच सर्वाधिक तर आहेच, त्याबरोबरच लोकांचा त्यावर जास्त विश्वास देखील आहे. कंपनीचे एजंट सर्वत्र हजर आहेत, तर ई-सेवाही सुरू झाली आहे.

एलआयसीकडून पॉलिसी खरेदी करणारी बहुतेक लोकं त्यांच्या एजंटवर अवलंबून असतात. त्यांना आपल्या पॉलिसीचे स्टेट्स जाणून घेण्यासाठी एजंटची मदतही घ्यावी लागते. कंपनीच्या ई-सेवेद्वारे, तुम्ही घरबसल्या फक्त तुमच्या पॉलिसीचे स्टेट्सच तपासू शकत नाही तर त्याबरोबर वार्षिक व्याज, प्रीमियम आणि बोनससह इतर माहिती देखील मिळवू शकता. ही सेवा पूर्णपणे मोफत आहे.

ई-सेवेमध्ये नोंदणी कशी करावी
सर्व प्रथम  http://www.licindia.in वर जा आणि Customer Portal वर क्लिक करा.
जर आधीची नोंदणी नसेल, तर New user वर क्लिक करा आणि पुढीलज पेजर user id आणि पासवर्ड तयार करा.
नवीन user id सह लॉग इन करा आणि Basic Services वर जा आणि तुमची पॉलिसी जोडा.
इतर सर्व पॉलिसी देखील यामध्ये जोडल्या जाऊ शकतात.

ई-सेवांचे फायदे
पॉलिसीधारकांना त्यांच्या प्रीमियमची ड्यू डेट कळू शकेल, ज्यामुळे वेळेवर भरणे सोपे होईल.
तुम्ही तुमचा प्रीमियम इंटरनेट बँकिंग, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे भरू शकता. एजंटला कॅश द्यावे लागतात.
पॉलिसीशी संबंधित माहिती वेळोवेळी अपडेट केली जाऊ शकते.
जर एखाद्याने पॉलिसीवर कर्ज घेतले असेल, तर त्याची माहितीही येथे उपलब्ध होईल.
बोनस, क्लेम स्टेटस, पॉलिसी रिव्हायव्हल, प्रीमियम पेमेंट सर्टिफिकेट, क्लेम हिस्ट्री जाणून घेऊन तुम्ही येथे तक्रार देखील करू शकता.

मंत्रालय कोणाच्या बापाची मालकी नाही, हिंमत असेल तर माझ्यावर गुन्हा दाखल करा

thackeray somaiya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते किरीट सोमय्या यांचा नगरविकास खात्याला भेट देऊन फायली चाळल्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर सरकारने सोमय्याना थेट नोटीस बजावली. त्याच पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या पुन्हा एकदा आक्रमक झाले असून त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

वित्तमंत्रालय आणि नगरविकास खात्याची सूचना डावलून उद्धव ठाकरे यांनी प्रताप सरनाईक यांच्या दंडमाफीसाठी ज्या फाईलवर सही केली तो कागद मिळवण्यासाठी मी मंत्रालयात गेलो होतो. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी ही गुंडगिरी सुरु केली आहे. पण शिवसेनेची ही गुंडगिरी आम्ही खपवून घेणार नाही, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले.

ते पुढे म्हणाले, फक्त एका फोटोसाठी मुख्यमंत्री माझ्यावर गुन्हा दाखल करायला सांगत आहेत. दोष काय तर मी खुर्चीवर बसलो. दोन कर्मचारी माझ्या सेवेत आहेत. ठाकरे जे खोटे बोलले ती चोरी मी पकडली, त्याचा राग त्या कर्मचाऱ्यांवर ते काढत आहेत. एका गरीब टायपिस्ट लिपीकाला तुम्ही नोटीस देता. बाळासाहेब ठाकरे कुठे आणि हे मुख्यमंत्री बघा, असे सोमय्या म्हणाले.

मंत्रालय ही कोणाच्या बापाची मालकी नाही. ठाकरे सरकारने महाराष्ट्राला लुटायचे आणि ते उघडकीस आणले की असे वागायचे. मी पोलीस ठाण्यासह सर्व विभागातील सचिवांना तक्रार दिली आहे. इतकेच नाही तर ज्यांनी मला नोटीस बजावली ते अधिकारी शिंदेंनाही मी विचारले आहे, तुम्ही माहिती अधिकार कायद्याचे उल्लंघन केले आहे”, असंही सोमय्या म्हणाले.

बनावट कागदपत्रे बनवून नोकरीत घेण्यासाठी थेट जिल्हाधिकाऱ्यांना धमकी

Sunil chavhan

औरंगाबाद – पदवीधर अंशकालीन कर्मचारी असल्याचा बनाव करत शासनसेवेत लिपिकपदी सामावून घेण्यासाठी थेट जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना वेळोवेळी निवेदन, व्हॉट्सॲपवर मेसेज पाठवून आत्महत्येची धमकी, देत सरकारी कामात अडथळा आणणाऱ्याविरोधात सिटी चौक पोलिसांनी गुन्हा नोंदविला. प्रशांत रामभाऊ साबळे (रा. रमानगर) असे आरोपीचे नाव आहे.

सिटी चौक पोलिसांनी सांगितले की, याविषयी जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने महिला अधिकाऱ्याने पोलिसांत तक्रार नोंदविली. साबळे याने 1999 पासून पदवीधर अंशकालीन कर्मचारी म्हणून काम केले असल्याचे सांगून शासकीय सेवेमध्ये कोतवालपदी नियुक्ती द्यावी, असे विनंती अर्ज 13 डिसेंबर 2013 ते 2020 या कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालयास दिले होते. तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करून तो शासकीय सेवेमध्ये थेट नियुक्तीस पात्र ठरत नसल्याचे त्यास कळविले. त्यानंतरही तो तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांना भेटून आणि मोबाईलवर बोलून, मेसेज पाठवून नियुक्ती न दिल्यास आत्महत्या करण्याची सतत धमकी देतो. 29 ऑक्टोबर 2018 रोजी तत्कालीन तहसीलदारांनी त्याच्याविरोधात पोलिसांत तक्रार नोंदविली.

जिल्हाधिकारी चव्हाण रूजू झाल्यापासून साबळेने त्यांना भेटून लिपिकपदी नियुक्ती देण्याची मागणी करणारे निवेदन दिले. या अर्जावर चव्हाण यांनी त्यांच्या अधिकाऱ्यांकडून अहवाल मागविला असता साबळेने तहसील कार्यालयात अंशकालीन कर्मचारी म्हणून काम केले नसल्याचे समजले. 3 डिसेंबर 2021 रोजी रात्री त्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या व्हॉट्सॲपवर मेसेज पाठवून धमकी दिली. 24 जानेवारीला पुन्हा जावक संकलनातील पुरावा पाठवत आहे, असा मेसेज पाठवून धमकावले. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने महिला अधिकाऱ्याने सोमवारी सिटी चौक ठाण्यात तक्रार नोंदविली. सरकारी कामात अडथळा, बनावट कागदपत्रे बनविणे, फसवणूक, आत्महत्येची धमकी इ. कलमांनुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक इंगळे तपास करत आहेत.

Share Market : सेन्सेक्स 581अंकांनी घसरला तर निफ्टी 17200 च्या खाली बंद झाला

Share Market

नवी दिल्ली । गुरुवारी ट्रेडिंगच्या शेवटी सेन्सेक्स-निफ्टी रेड मार्कवर बंद झाले. ट्रेडिंगच्या शेवटी, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स 581.21 अंकांनी किंवा 1 टक्क्यांनी घसरून 57,276.94 वर बंद झाला. दुसरीकडे, राष्ट्रीय शेअर बाजाराचा (NSE) निफ्टी 167.80 अंकांनी म्हणजेच 0.97 टक्क्यांनी घसरून 17,110.20 अंकांवर बंद झाला.

गुरुवारच्या ट्रेडिंगमध्ये एचसीएल टेक्नॉलॉजीज, टेक महिंद्रा, डॉ रेड्डीज लॅबोरेटरीज, टीसीएस आणि विप्रो हे निफ्टीचे टॉप लुझर्स ठरले. तर एक्सिस बँक, एसबीआय, मारुती सुझुकी, सिप्ला आणि कोटक महिंद्रा बँक टॉप गेनर ठरले.

मंगळवारी सेन्सेक्स 57,858 वर बंद झाला
मंगळवारी ट्रेडिंगच्या शेवटी, निफ्टीने 17200 ची पातळी ओलांडली आणि 17,277.95 वर बंद केला. त्याचप्रमाणे सेन्सेक्स 0.64% किंवा 366.64 अंकांनी वाढून 57,858.15 वर बंद झाला.

टेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाल्याने ग्रे मार्केटमधील वातावरण बिघडले
शेअर बाजारात, नव्या युगातील अनेक तंत्रज्ञान कंपन्यांच्या शेअरमध्ये गेल्या काही काळापासून मोठी घसरण पाहायला मिळत आहे. या घसरणीचा परिणाम आता अनलिस्टेड मार्केटमध्ये किंवा ग्रे मार्केटमध्येही दिसून येत आहे. शेअर बाजाराबरोबरच अनलिस्टेड मार्केटपासून गुंतवणूकदार दूर होत आहेत. येत्या काही दिवसांत अनेक कंपन्या बाजारात लिस्ट होण्याच्या तयारीत असल्याचे डीलर्सचे म्हणणे आहे. मात्र, असे असूनही, अनलिस्टेड बाजारात या शेअर्सच्या ट्रेडिंगच्या प्रमाणात मोठी घट झाली आहे, जी गुंतवणूकदारांची कमी होत चाललेली स्वारस्य दर्शवते.

BoAt ची पॅरेण्ट कंपनीने सेबीकडे IPO साठी अर्ज दाखल केला
BoAt ब्रँड अंतर्गत देशात इयरफोन आणि स्मार्ट वॉच विकणार्‍या कंपनीच्या पॅरेण्ट असलेल्या इमॅजिन मार्केटिंगने SEBI कडे 2000 कोटी रुपयांच्या IPO साठी ड्राफ्ट डॉक्युमेंट्स दाखल केली आहेत. इमॅजिन मार्केटिंगच्या या IPO मध्ये 9 अब्ज रुपयांचा फ्रेश इश्यू असेल तर 11 अब्ज रुपयांची ऑफर फॉर सेल असेल.

देशात तयार होणार आधुनिक आधार केंद्रे; ‘या’ सुविधा मिळणार

नवी दिल्ली । UIDAI ने देशभरात आधुनिक आधार सेवा केंद्रे स्थापन करण्याच्या योजनेवर काम सुरू केले आहे. या आधुनिक आधार सेवा केंद्रांवर फक्त आधार कार्ड बनवलेच जाणार नाहीत तर ते अपडेटही केले जातील. ही केंद्रे आठवड्याचे सातही दिवस सुरू राहणार असून नागरिकांना आणखी मूलभूत सुविधाही उपलब्ध होणार आहेत.

पहिल्या टप्प्यात, UIDAI ने देशात अशी 114 आधुनिक केंद्रे उभारण्याची योजना आखली होती. आतापर्यंत देशातील विविध शहरांमध्ये अशी 64 आधार केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. पहिल्या टप्प्यात 53 शहरांमध्ये हे बसवले जाणार आहेत. या शहरांच्या लिस्टमध्ये महानगरे, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाच्या राजधानी आणि प्रमुख शहरांचा समावेश आहे. देशात आधीच 35 हजारांहून जास्त आधार केंद्रे कार्यरत आहेत, जे बँका, पोस्ट ऑफिस आणि इतर काही सरकारी आवारात सुरू आहेत.

सातही दिवस काम करेल
या आधुनिक आधार सेवा केंद्रांचे वैशिष्ट्य म्हणजे ते आठवड्याचे सातही दिवस काम करतील. ही केंद्रे सकाळी 09:30 ते सायंकाळी 5:30 या वेळेत सुरू राहणार आहेत. आधारशी संबंधित सर्व कामांसाठी वन स्टॉप सेंटर असतील. येथे नवीन आधार तयार केला जाईल आणि अपडेट देखील केला जाईल.

चांगल्या सुविधा मिळतील
आधार सेवा केंद्रांवर येणाऱ्या लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी या केंद्रांवर आणखी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यांच्याकडे एअर कंडिशनर असतील. बसण्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था असेल. इतकेच नाही तर वृद्ध आणि दिव्यांगांसाठी व्हीलचेअरसह सर्व आवश्यक सुविधांचीही व्यवस्था करण्यात येणार आहे.

ऑनलाइन अपॉइंटमेंट
आधार प्राधिकरणाने ऑनलाइन अपॉइंटमेंट बुकिंग सर्व्हिस देखील सुरू केली आहे. वेबसाइटला भेट देऊन तुम्ही तुमच्या जवळच्या केंद्रासाठी अपॉइंटमेंट बुक करू शकता. हे बुकिंग आधारशिवायही करता येईल. तसेच यासाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. लोकांना महिन्यातून 4 वेळा अपॉइंटमेंट बुक करण्याची सुविधा मिळेल.

माझ्या ‘ब्रा’ चे माप देव घेत आहे; अभिनेत्री श्वेता तिवारीचे वादग्रस्त वक्तव्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीने भोपाळ मधील एका कार्यक्रमा दरम्यान, ब्रा साईज आणि देव याबद्दल एक वादग्रस्त विधान केले आहे. माझ्या ब्रा चे माप देव घेत आहे असे विधान तिने केले. तिच्या या विधानानंतर सर्वत्र तिच्यावर टिकेचा भडीमार सुरू आहे. दरम्यान याप्रकरणी मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

श्वेता तिवारी तिच्या आगामी वेब सीरिजच्या घोषणेसाठी भोपाळमध्ये गेली होती. तिथे ती वेब सीरिजच्या संपूर्ण टीमसोबत प्रेम कॉन्फरन्समध्ये सहभागी झाली होती. त्यावेळी श्वेता तिवारी हिने वादग्रस्त वक्तव्य करताना म्हंटल की, ‘माझ्या ब्रा चं माप देव घेत आहे’

श्वेता तिवारीच्या वक्तव्याचा विरोध करत मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी म्हटले आहे, ‘श्वेता तिवारीने आतंरवस्त्राबाबत केलेले विधान अतिशय निंदनीय असून तमाम हिंदू संघटनेच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणी श्वेता तिवारीची पुढील 24 तासात चौकशी करण्याचे निर्देश भोपाळ पोलीस कमिशनरना देण्यात आले असून लवकरात लवकर या चौकशीचे रिपोर्ट सादर करण्याचे आदेश देण्यात आले. यानंतर या प्रकरणावर योग्य निर्णय घेण्यास येईल’, असे ते म्हणाले.

क्रिप्टो मनी लाँड्रिंगमध्ये 30% वाढ, 2021 मध्ये हा आकडा $ 8.6 अब्ज पेक्षा जास्त

Cryptocurrency

नवी दिल्ली । क्रिप्टोकरन्सीमध्येही मनी लाँड्रिंगची प्रकरणे वाढत आहेत. ब्लॉकचेन एनालिसिस फर्म चेनालिसिसच्या रिपोर्ट्स नुसार, सायबर गुन्हेगारांनी 2021 मध्ये $8.6 अब्ज किमतीची क्रिप्टोकरन्सी लाँडर केली. मनी लॉन्ड्रिंगची ही रक्कम 2020 च्या तुलनेत 30 टक्क्यांनी जास्त आहे.

रिपोर्ट्स चा अंदाज आहे की, 2017 पासून आजपर्यंत, सायबर गुन्हेगारांनी क्रिप्टोमध्ये एकूण $33 अब्जची लॉन्ड्रिंगकेली आहे, त्यापैकी बहुतेक सेंट्रलाइज्ड एक्सचेंजेसकडे वळले आहेत. चेनॅलिसिसने म्हटले आहे की,” 2021 मध्ये मनी लाँड्रिंगमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणे आश्चर्यकारक नाही कारण गेल्या वर्षभरातील खटला आणि बेकायदेशीर क्रिप्टो क्रियाकार्यक्रम या दोन्हीमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.”

17 टक्के पैसे सेंट्रलाइज्ड फायनान्स ऍप्लिकेशन्ससाठी गेले
चेनॅलिसिसने सांगितले की,”मनी लॉन्ड्रिंगच्या $8.6 अब्जपैकी, सुमारे 17 टक्के डिसेंट्रलाइज्ड फायनान्स ऍप्लिकेशन्ससाठी गेले. हे क्षेत्र पारंपारिक बँकांच्या बाहेर आर्थिक व्यवहारांची सुविधा देते. 2020 च्या तुलनेत हे प्रमाण 2 टक्के जास्त आहे.

चुकीच्या पत्त्यांवरून येणाऱ्या मूल्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे
चेनॅलिसिस रिपोर्ट्स नुसार, मायनिंग पूल्स, हाय -रिस्क एक्सचेंजेस आणि मिक्सर्समध्ये देखील बेकायदेशीर ऍड्रेसकडून येणाऱ्या मूल्यात लक्षणीय वाढ झाली आहे. फंडाचे मूळ लपविण्यासाठी मिक्सर्स सामान्यत: संभाव्य ओळखण्यायोग्य किंवा कलंकित क्रिप्टोकरन्सी फंड इतरांसह एकत्र करतात.

मनी लाँड्रिंग काय आहे ?
मनी लाँड्रिंग म्हणजे बेकायदेशीर कमावलेला पैसा कायदेशीर व्यवसायात ट्रान्सफर करण्याच्या प्रक्रिया.

Budget 2022 : निर्मला सीतारामन यावेळीही सादर करणार ग्रीन बजट, कमीत कमी प्रतींची केली जाणार छपाई

नवी दिल्ली । अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2022 रोजी 2022-23 या आर्थिक वर्षासाठी केंद्रीय अर्थसंकल्प 2022-23 सादर करणार आहेत. त्याचबरोबर देशाचा अर्थसंकल्प यंदाही ग्रीन असेल. कोविड महामारीमुळे आशियातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या कर प्रस्तावांचे सादरीकरण आणि आर्थिक स्टेटमेंटशी संबंधित मोठ्या प्रमाणात कागदपत्रांची छपाई या वेळीही होणार नाही.

बहुतेक बजट डॉक्युमेंट्स डिजिटल स्वरूपात असतील
अधिकाऱ्यांनी सांगितले की, बजटचे डॉक्युमेंट्स बहुतांशी डिजिटल स्वरूपात उपलब्ध असतील. फक्त काही कॉपी प्रत्यक्ष उपलब्ध असतील. बजट डॉक्युमेंट्स च्या शंभर कॉपी छापल्या गेल्या आहेत. ही संख्यात्मकदृष्ट्या इतकी विस्तृत प्रक्रिया होती की, छपाई कामगारांनाही नॉर्थ ब्लॉकच्या तळघरात छापखान्यात किमान काही आठवडे वेगळे ठेवावे लागले.

कर्मचार्‍यांना त्यांच्या कुटुंबीयांपासून दूर ठेवून अर्थसंकल्पीय डॉक्युमेंट्स छापण्याचे काम पारंपरिक ‘हलवा समारंभ’ करून सुरू करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला अर्थमंत्री, अर्थ राज्यमंत्री आणि मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित असतात. मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर बजटच्या कॉपी छापण्याचे प्रमाण कमी झाले. सुरुवातीला, पत्रकार आणि बाह्य विश्लेषकांना वितरित केलेल्या कॉपी कमी केल्या गेल्या आणि नंतर महामारीचा हवाला देत लोकसभा आणि राज्यसभा खासदारांना दिलेल्या कॉपी कमी करण्यात आल्या.

ओमिक्रॉनमुळे हलवा समारंभही पुढे ढकलला गेला
यावर्षी कोविड-19 च्या ओमिक्रॉन व्हेरिएन्टबाबत जास्त निर्बंध लादण्यात आले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, साथीच्या आजारामुळे पारंपारिक खीर समारंभही सोडून देण्यात आला आहे. मात्र, बजट डॉक्युमेंट्सचे संकलन डिजिटल करण्यासाठी, कर्मचाऱ्यांच्या एका लहान गटाला वेगळे करणे आवश्यक आहे.

अर्थसंकल्पीय डॉक्युमेंट्समध्ये सामान्यत: अर्थमंत्र्यांचे संसदेतील भाषण, मुख्य नोट्स, वार्षिक वित्तीय विवरणे, कर प्रस्ताव असलेले वित्त विधेयक, आर्थिक विधेयकातील तरतुदी स्पष्ट करणारे मेमोरँडम आणि मॅक्रो इकॉनॉमिक प्रोफाइल यांचा समावेश असतो. यामध्ये मध्यम मुदतीच्या आर्थिक धोरणासह आर्थिक धोरण विवरण, योजनांसाठी परिणाम फ्रेमवर्क, सीमाशुल्क अधिसूचना, मागील अर्थसंकल्पीय घोषणांची अंमलबजावणी, प्राप्ती बजट, खर्चाच्या अंदाजपत्रकाचा समावेश आहे.