गिरीश महाजनांनी भाजपला विकले; एकनाथ खडसेंनी टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि भाजप नेते गिरीश महाजन यांच्यात सध्या एकमेकांवर अनेक गंभीर आरोप, टीका टिप्पणी केली जात आहे. महाजन यांच्या टीकेला खडसे यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. “2019 च्या विधानसभा निवडणुकीपासून छुपी युती होती त्यामुळं रोहिणी खडसे यांचा पराभव झाला. गिरीश महाजन दुसऱ्याची मदत घेवून भाजपला धुळीत घालत आहेत, त्यांनी भाजपला विकले आहे, अशी टीका खडसे यांनी केली.

एकनाथ खडसे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, जळगाव जिल्ह्यात गिरीश महाजन यांनी छुप्या युतीमुळे भाजपा विकून टाकली आहे. भाजपाची इतकी वाईट परिस्थिती जिल्ह्यात कधीही नव्हती. भाजपला दुसऱ्याची मदत घेऊन खडसे यांचा पराभव करण्यासाठी लढावे लागते ही चिंताजनक बाब आहे.

भाजप नेते गिरीश महाजन यांनी काल गुलाबराव पाटील यांची भेट घेतल्यानंतर एकनाथ खडसे यांच्यावर टीका केली होती. त्याच्या टीकेला खडसेंनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.