Friday, December 26, 2025
Home Blog Page 2887

क्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा विराजमान

औरंगाबाद – शिवप्रेमींच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर परवा मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा शहरातील क्रांती चौकात दाखल झाला होता. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अखेर चबुतऱ्यावर बसवण्यात यश आलं आहे.

औरंगाबाद शहरातील क्रांती चौक इथल्या चबुतऱ्यावर शिवाजी महाराजांचा पुतळा 48 तासांच्या प्रयत्नानंतर बसवण्यात आला आहे. गेल्या 48 तासात पासून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा चबुतऱ्यावर बसविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. अखेर पहाटे पाच वाजता चबुतऱ्यावर पुतळा बसवण्यात आला आहे.

येत्या 10 तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे उद्घाटन होणार आहे.

कार अपघातात भाजप आमदाराच्या मुलासह 7 विद्यार्थ्यांचा मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | वर्धा येथे एका कारचा भीषण अपघात झाला आहे. पहाटे दीड वाजता हा भीषण अपघात घडला. या अपघातात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या सात विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये भाजप आमदार विजय राहांगडाले यांचा मुलगा आविष्कार रहांगडाले यांचाही समावेश आहे.

देवळी येथून वर्ध्याला येत असताना सेलसुराजवळ कारला अपघात झाला. नियंत्रण सुटल्याने सेलसुरा जवळील नदीच्या पुलावरून कार खाली कोसळली. जवळपास 40 फूट उंच असलेल्या पुलावरून कार खाली पडल्यानं भीषण अपघात झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, सातही मुलांचे मृतदेह सावंगी येथील रुग्णालयामध्ये रात्रीस आणण्यात आले आहेत. सातही विद्यार्थी दत्ता मेघे वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी असल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

मृत्यू वाढले : सातारा जिल्ह्यात 921 कोरोना पाॅझिटीव्ह तर 8 मृत्यू

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा जिल्ह्यात सोमवारी रात्री उशिरा आलेल्या कोरोना तपासणीत रिपोर्टमध्ये 921 जण बाधित आढळले आहेत. कोरोनाचा पाॅझिटीव्ह रेट 26. 14 टक्क्यांवर गेल्याने चितेंचे वातावरण कायम आहे. मात्र पाॅझिटीव्ह रेट काहीसा प्रमाणात कमी होताना दिसत आहे. तर गेल्या दोन महिन्यातील कोरोना बाधिताचा मृत्यूचा उंच्चाकी आकडा गेल्या 24 तासातील आहे.

गेल्या चोवीस तासात सातारा जिल्ह्यात 3 हजार 523 लोकांची कोरोना तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी 921 लोक बाधित आढळून आले आहेत. आजच्या अहवालात पाॅझिटीव्ह रेट 26 टक्क्यांवर आहे. तर 8 जणांचा मृत्यू झाला आहे.

सोमवारी दिवसभरात 976 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.  काल सायंकाळी जिल्ह्यात विविध ठिकाणी 8576 रूग्ण सक्रीय होते. तर केवळ 407 रूग्ण रूग्णालयात उपरार्थ आहेत.

औरंगाबाद गारठले ! यंदाच्या हिवाळ्यातील नीचांकी तापमानाची नोंद

औरंगाबाद – शहरातील किमान तापमानात काल एकाच दिवसात 5.2 अंश सेल्सिअसने घट झाली आणि या वर्षीच्या हिवाळ्यातील नीचांकी किमान तापमानाची नोंद करण्यात आली. चिकलठाणा वेधशाळेत 10.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून, कडाक्याच्या थंडीने शहर गारठले आहे.

शहरात रविवारी 15.4 अंश सेल्सिअस इतके तापमान होते. त्यात मोठी घसरण झाली आणि हुडहुडी भरवणाऱ्या थंडीला शहरवासियांना सामोरे जावे लागले. गार वाऱ्यामुळे दुपारच्यावेळीही बोचरी थंडी जाणवत होती. त्यामुळे दुपारी उन्हात उभे राहून ऊब घेताना नागरिक दिसून आले. शहरात थंडीमुळे सकाळी आणि सायंकाळी घराबाहेर निघणे ही अवघड होत आहे.

वाढत्या थंडीमुळे लहान मुले आणि ज्येष्ठांची विशेष खबरदारी घेतली जात आहे. हिवाळा सुरू झाल्यापासून यंदा तापमानात सतत चढ-उतार होत असल्याचा अनुभव येत आहे. गेल्या आठवडाभरापासून तापमानाचा पारा घसरत असल्याने थंडीचा जोर वाढला आहे. आगामी दिवसात हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजापेक्षा ही किमान तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे.

‘एक तू राहशील, नाहीतर मी राहील’ एका वाक्याने केला राजन शिंदेंचा घात

Rajan Shinde

औरंगाबाद – राज्यभर गाजलेल्या प्रा. डॉ. राजन शिंदे यांच्या हत्येला केवळ एक तात्कालिक वाक्य कारणीभूत ठरल्याचे पोलीस तपासात उघड झाले. ‘एकतर तू राहशील, नाहीतर मी राहील’ असा दम डॉ. शिंदे यांनी बाल निरीक्षणगृहातील अल्पवयीन विधिसंघर्षग्रस्त बालकास दिल्यानंतर ते आपल्याला मारतील. या भीतीपोटीच हे कृत्य केल्याची कबुली विधिसंघर्षग्रस्त बालकाने पोलीस चौकशीत दिली. या माहितीचा समावेश पोलिसांनी बाल न्यायमंडळासमोर सादर केलेल्या दोषारोपपत्रात केला आहे. याशिवाय पोलीस तपासात अनेक धक्कादायक बाबींचा खुलासा करण्यात आलेला आहे.

मौलाना आझाद महाविद्यालयातील इंग्रजी विभागाचे प्रमुख डॉ. शिंदे यांचा 10 ऑक्टोबर 2021 रोजी रात्री एन 2, सिडको येथील राहत्या घरी निर्घृण खून करण्यात आला होता. या घटनेमुळे समाजात खळबळ उडाली होती. शहर पोलिसांनाही खुनाचा उलगडा करण्याचे आव्हान होते. पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांच्या मार्गदर्शनात तपास अधिकारी अविनाश आघाव यांना विविध पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मदतीने आठव्या दिवशी खुनाचा उलगडा करण्यात यश मिळाले. या प्रकरणात 17 वर्षे 8 महिन्याच्या एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले होते. पोलीस तपासात धक्कादायक बाबी समोर आल्यामुळे विधिसंघर्षग्रस्त बालकाला ‘जुवेनाईल जस्टीस केअर ॲण्ड प्रोटेक्शन रुल्स’ (जेजे ॲक्ट) या कायद्यातील विविध तरतुदीनुसार प्रौढ समजण्यात येऊन खटला सत्र न्यायालयासमोर चालविण्यास नुकतीच मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे ही घटना पुन्हा चर्चेत आली.

पोलिसांनी दाखल केलेल्या दोषारोपपत्रानुसार पूर्वीपासून विसंवाद असलेल्या विधिसंघर्षग्रस्त बालकासोबत घटनेच्या दोन तासांपूर्वी शिंदे यांचे वाद झाले होते. त्यावेळी शिंदे यांनी त्यास ‘एकतर तू राहशील, नाहीतर मी राहील’ असे रागाच्या भरात म्हटले. त्यामुळे ते आपल्याला मारतील या भीतीपोटी दोन तासांनी शिंदे गाढ झोपेत असताना पहाटे 2:30 ते 3 वाजेच्या दरम्यान व्यायामाचे वजनदार डंबेल पाच वेळा पाठीमागून डोक्यावर जोरात मारले. त्यानंतर चाकूने त्यांचा गळा कापून डंबेलने कपाळ, कान, डोळ्याजवळ, चेहरा व मानेवर वार करुन, खोलवर गळा व दोन्ही हाताच्या नसा कापल्याचे दोषारोपपत्रात म्हटले आहे.

गुन्ह्यासाठी अनेक वेबसिरीजचा वापर –
शिंदे यांचा खून करण्यापूर्वी विधिसंघर्षग्रस्त बालकाने गुन्हा करण्याची पूर्वतयारी केल्याचेही तपासात स्पष्ट झाले. गुन्ह्यासाठी त्याने ओटीटी प्लॅटफाॅर्मद्वारे नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईमवर मर्डर मिस्ट्री, व्हायलेट, ॲक्शन असे मर्डर रिलेटेड क्राईम चित्रपट, वेबसिरीज पाहिल्या. त्यामध्ये इ गुड डॉक्टर, सेन्टीपेडे मुव्हीज, सेक्स एज्युकेशन, कार्स, डेमोन स्लायेर, जुजुत्सा कैसनचा समावेश आहे. तो मर्डर, हॉरर कथा असलेल्या कादंबऱ्या वाचायचा, असेही दोषारोपपत्रात म्हटले आहे. याशिवाय वेगवेगळ्या वेब ब्राउझरद्वारे खून कसा करायचा, पुरावे कसे नष्ट करावे याविषयी सर्च केल्याचे तपासात समोर आले. खून कसा करायचा, शरीरातील कोणत्या भागावर वार कसा करायचा याचीही माहिती ‘विधिसंघर्षग्रस्त बालकाने अवगत करून घेतली होती. सर्च केलेली ही माहिती पोलिसांना मिळू नये याकरिता ‘डार्क वेब’साठी लागणारे ‘टीओआर’ हे वेब ब्राऊझर वापरल्याचे तपासात समोर आले.

एकतर्फी प्रेमातून तरुणाचे ‘हे’ धक्कादायक कृत्य; तरुणीचे आर्मीचे स्वप्न राहिले अर्धवट

पाटणा : वृत्तसंस्था – बिहारमधील बक्सर जिल्ह्यातील एका माथेफिरू तरुणाने एकतर्फी प्रेमातून एक धक्कादायक कृत्य केले आहे. त्याने पीडित तरुणीच्या स्वप्नांची पार राखरांगोळी केली आहे. या तरुणीची दृष्टी गेल्यामुळे तिला थेट रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?
घटनेच्या दिवशी 4 तरुणांनी पीडित तरुणीला मारहाण करत तिच्या डोळ्यात चाकू घुपसला. यामुळे या तरुणीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.या संपूर्ण घटनेला 2 महिने उलटून गेले. मात्र एकाही आरोपीला पोलीस अटक करू शकले नाहीत. एकीकडे हे आरोपी मोकाट आहेत तर पीडित तरुणीवर अजूनही उपचार सुरु आहेत. हि संपूर्ण घटना डेरा या गावामध्ये घडली आहे.

रनिंगदरम्यान झाला हल्ला…
हल्ला झालेल्या तरुणीचे नाव चंपा असे आहे. चंपा घटनेच्या दिवशी रनिंगसाठी गेली होती. यावेळी बगीच्यात काही तरुण आले आणि ते मला मारहाण करू लागले. पहिल्यांदा एका तरुणाने मला कानशिलात लगावली. त्यानंतर अन्य तरुण मारहाण करू लागले. त्यानंतर सुऱ्याने माझ्यावर हल्ला केला. सैन्यात जाण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी दररोज 3 ते 4 किमी रनिंग करीत होते. त्या दिवशीही आईला एका ठिकाणी बसवून मी धावत होते असे चंपाने सांगितले.

तसेच चंपा 2017 मध्ये बीए पार्ट-1 ची परीक्षा देण्यासाठी गेली होती. यावेळी बबलू नावाच्या तरुणाने सांगितले कि जर तिने माझ्याशी लग्न केलं नाही तर तिला कोणासोबतच लग्न करण्यालायक ठेवणार नाही. तिला कधीही लग्न करायचं असेल तर ती माझ्यासोबतच करेल. मात्र चंपाने हि गोष्ट त्यावेळी गांभीर्याने घेतली नाही. यानंतर बबलूने रागाच्या भरात आपल्या मित्रांसह चंपावर हल्ला केला. या घटनेनंतर आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत मात्र त्यांचा अजून थांगपत्ता पोलिसांना लागला नाही.

दिलासादायक ! कोरोना रुग्णात मोठ्या प्रमाणावर घट

Corona

औरंगाबाद – औरंगाबादेत मागील काही दिवसांपासून कोरोनाचा उद्रेक पहायला मिळत होत. परंतु आज मात्र कोरोना रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणावर घट झाल्याचे पहायला मिळाले. जिल्ह्यात आज 596 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. नव्या रुग्णांमध्ये सर्वाधिक 463 रुग्ण हे शहरातील आहे. तर ग्रामीण भागातील 133 रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 50 हजार 362 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1 लाख 61 हजार 997 झाली आहे. आज तीन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण 3678 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 7957 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आज दिवसभरात 364 रुग्ण बरे होऊन घरी परतले. यात महापालिकेच्या हद्दीतील 251 तर ग्रामीणमधील 113 रुग्णांना सुटी देण्यात आली.

हृदयद्रावक! दुकानावर जाताना भरधाव ट्रकने तिघा भावंडांना चिरडले

परभणी – स्वतःच्या दुकानावर जात असताना अचानक भरधाव येणाऱ्या ट्रकने मोटरसायकलवरील तिघा भावांना चिरडल्याची हृदयद्रावक घटना आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास तालुक्यातील अकोली पुलावर घडली. अभिषेक काशीनाथ म्हेत्रे (18), योगेश काशिनाथ म्हेत्रे (15), रामप्रसाद विश्वनाथ मेहेत्रे (20) अशी मृतांची नावे आहेत. मृतातील दोघे सख्खे तर एक चुलत भाऊ होता. जिंतूरपासून चार किलोमीटर अंतरावरील अकोली गावाच्या पुलाजवळ असणारा खड्डा चुकवताना हा अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे.

मालेगाव येथील अभिषेक, योगेश आणि रामप्रसाद हे तिघे भाऊ आज सकाळी जिंतूरमधील भाजीमंडीमध्ये असणाऱ्या स्वतःच्या किराणा दुकानावर दुचाकीवरून (एम एच 26- 2834) जात होते. जिंतूरपासून अवघ्या 4 किलोमीटरवर असलेल्या अकोलीजवळील उड्डाण पुलावर समोरून येणाऱ्या ट्रकने (एम एच 18 बिजि 6270) दुचाकीला जोरदार धडक दिली. ट्रकखाली आल्याने तिन्ही भावांचा जागीच मृत्यू झाला. अपघात ऐवढा भीषण होता की, त्याठिकाणी हाडामासाचा सडा पडला होता.

अपघातानंतर अकोली गावातील ग्रामस्थांनी या संदर्भातली माहिती जिंतूर पोलिसांना दिली. घटनास्थळाला पोलीस निरीक्षक दीपक शिंदे व सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड यांनी भेट देऊन देऊन घटनास्थळाचा पंचनामा केला. सामाजिक कार्यकर्ते नागनाथ आकात, पांडुरंग मुसळे, तुकाराम शेटे, ज्ञानेश्वर पांचाळ, रुग्णवाहिका चालक घुगे यांनी मृतदेह रुग्णालयात आणण्यासाठी मदत केली.

मुंबईमध्ये जमावाची चोर समजून रिक्षा चालकाला मारहाण; आधी हातपाय बांधले आणि मग…

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मुंबईमधील समता नगर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये काही लोकांनी चोर समजून एका रिक्षा चालकाला बेदम मारहाण केली आहे. या आरोपींनी रिक्षाचालकाचे हातपाय बांधून त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या हल्ल्यात संबंधित रिक्षाचालक गंभीर जखमी झाला असून त्याचा उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे यामध्ये एक संतप्त जमाव रिक्षा चालकाला मारहाण करताना दिसत आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करून पोलीस पुढील तपास करत आहेत.

शाहरुख शेख असे हत्या झालेल्या रिक्षाचालकाचे नाव असून तो समता नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दामी नगर परिसरातील रहिवासी आहे. घटनेच्या दिवशी मृत शाहरुख हा समता नगर परिसरात असताना काही स्थानिक नागरिकांनी त्याला चोर समजून बेदम मारहाण केली. यानंतर आरोपींनी मृत शाहरुखचे हातपाय बांधून त्याला निर्मल चाळीजवळ फेकून दिले.या घटनेच्या 2 तासांनंतर स्थानिकांनी समता नगर पोलिसांना या घटनेची माहिती दिली.

या घटनेची माहिती मिळताच समतानगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर शाहरुखला उपचारासाठी तातडीने शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झाला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर मृत शाहरुख याचे नातेवाईक संतप्त झाले असून त्यांनी रविवारी उत्तर प्रदेश विभागाचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण पडवळ यांच्या कार्यालयाबाहेर हत्येचा गुन्हा दाखल करण्यासाठी धरणे आंदोलन केले. यावेळी माझ्या मुलाची हत्या करण्यात आली असून माझ्या मुलाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी शाहरुखच्या कुटुंबीयांनी केली आहे. समता नगर पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

Budget 2022 : अर्थमंत्री ‘या’ 10 मार्गांनी सर्वसामान्यांना देऊ शकतात दिलासा

नवी दिल्ली । अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासाठी यंदाचा अर्थसंकल्प आव्हानांत्मक आहे. 1 फेब्रुवारीला अर्थमंत्री अर्थसंकल्प सादर करतील. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा हा चौथा अर्थसंकल्प असेल. शेअर मार्केट , सामान्य माणूस आणि अर्थतज्ज्ञांना या अर्थसंकल्पाकडून मोठ्या आशा आहेत. हा अर्थसंकल्प कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर आणि तिसऱ्या लाटेच्या दरम्यान येत आहे. त्यामुळे अर्थसंकल्पाकडून बाजार आणि सामान्य माणसाच्या दोघांच्याही अपेक्षा आहेत.

येथे आपण अशा काही मदत उपायांबद्दल चर्चा करू, ज्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.

1. स्टँडर्ड डिडक्शनमध्ये वाढ
या अर्थसंकल्पामध्ये स्टँडर्ड डिडक्शनमध्ये वाढ होण्याची अपेक्षा पगारदार वर्गाला आहे. कोरोनामुळे लोकांच्या वैद्यकीय खर्चात वाढ झाली आहे. येथे महागाई विशेषतः पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्यांचे जगणे अवघड झाले आहे. यामुळे विशेषतः मध्यमवर्गीय कुटुंबांचे घरगुती बजट बिघडले आहे. त्यामुळे स्टँडर्ड डिडक्शन वाढवण्याची गरज आहे. अर्थमंत्री ते वार्षिक 50,000 रुपयांवरून 75,000 रुपयांपर्यंत वाढवू शकतात.

2. हेल्थ इन्शुरन्सवरील GST मध्ये कपात
मेडिक्लेम पॉलिसी प्रीमियमवरील GST चा दर कमी करण्याची गरज आहे. सध्या तो 18 टक्के आहे. तो 5 टक्क्यांवर आणावा. त्यामुळे लोकांमध्ये हेल्थ पॉलिसीची मागणी वाढेल. सध्या असलेल्या 18 टक्के टॅक्समुळे प्रीमियम खूप वाढतो. यामुळे अनेकजण हेल्थ पॉलिसी घेण्यास टाळाटाळ करतात. यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन या अर्थसंकल्पात याबाबत घोषणा करू शकतात.

3. अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी उपाययोजना
अर्थव्यवस्था मजबूत करणे आवश्यक आहे. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सरकारने पुन्हा उपायांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे अर्थतज्ज्ञांचे मत आहे. गेल्या दोन वर्षांपासून सरकार कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी जास्त खर्च करत आहे. याचा परिणाम सरकारच्या तिजोरीवर झाला आहे. तर दुसरीकडे कर वसुलीतही तुटवडा निर्माण झाला आहे. मात्र, आता परिस्थिती सुधारत आहे. अशा स्थितीत पायाभूत सुविधा आणि रोजगार वाढवण्यासाठी सरकारने प्राधान्यक्रमात समावेश करण्याची गरज आहे.

4. वेल्थ टॅक्स पुन्हा लागू करणार
अर्थतज्ज्ञ पुन्हा वेल्थ टॅक्स लागू करण्याच्या बाजूने आहेत. वेल्थ अँड इनहेरिटन्स टॅक्स लागू केल्याने समाजातील वेगाने वाढणारी आर्थिक विषमता कमी होण्यास मदत होईल, असा त्यांचा विश्वास आहे. कोरोना महामारीचा सर्वाधिक फटका आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांना बसला आहे. त्यामुळे गरीब आणि श्रीमंतांमधील दरी खूप वाढली आहे. वेल्थ अँड इनहेरिटन्स टॅक्स लावून ही तफावत काही प्रमाणात भरून काढता येईल.

5. वर्क फ्रॉम होम साठी वेगळे डिडक्शन
2020 मध्ये कोरोना महामारीला सुरुवात झाली. त्या वर्षी मार्चमध्ये लॉकडाऊन झाल्यानंतर मोठ्या संख्येने लोकांना वर्क फ्रॉम होम करण्यास भाग पाडले गेले. वर्क फ्रॉम होम (WFH) अजूनही चालूच आहे. विशेषत: खाजगी क्षेत्रात काम करणारे करोडो लोकं वर्क फ्रॉम होम करत आहेत. त्यामुळे इंटरनेट, वीज, फर्निचरसह अनेक खर्च वाढले आहेत. त्यामुळे वर्क फ्रॉम होम करणाऱ्या लोकांसाठी यंदाच्या बजटमध्ये वेगळे डिडक्शन जाहीर केले जाऊ शकते.

6. इलेक्ट्रिक वाहनांसाठी सवलती
सरकारला इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन द्यायचे आहे. त्यामुळे वेगाने वाढणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी होईल. त्यामुळे पेट्रोलियम आयातीवरील अवलंबित्व कमी होईल. जर सरकारने इलेक्ट्रिक वाहन कर्जांना प्राधान्य कर्जाच्या श्रेणीत आणले तर ते EV चा वापर वाढवेल. यामुळे लोकांना इलेक्ट्रिक वाहने घेण्यासाठी स्वस्त दरात कर्ज मिळू शकणार आहे. ऑटो इंडस्ट्रीचे मत आहे की, सरकारने EV शी संबंधित रीसर्च अँड डेव्हल्पमेंटसाठी जास्त निधीची तरतूद करावी.

7. मनरेगासाठी जास्त वाटप
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यावेळी मनरेगाच्या वाटपात मोठी वाढ करावी. 2020 मध्ये लॉकडाऊन सुरू झाल्यापासून मोठ्या संख्येने शहरांतील लोकं आपापल्या गावी परतले होते. यातील अनेक लोकं आजही आपल्याच गावात राहत आहेत. अशा लोकांसाठी मनरेगा हे उत्पन्नाचे मोठे साधन आहे. यामुळे त्यांना वर्षातील किमान 100 दिवस रोजगाराची हमी मिळते.

8. STT मध्ये कपात
शेअर्सच्या खरेदी-विक्रीवरील सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स (STT) कमी करण्याची गरज आहे. ब्रोकरेज कंपन्यांनी यासंदर्भात अर्थमंत्र्यांसमोर आपले म्हणणे मांडले आहे. त्यांचा असा विश्वास आहे की STT ऍक्टिव्ह व्यापार्‍यांचा नफा कमी करतो. केवळ ब्रोकरेज फर्म Zerodha चे ग्राहक STT, स्टॅम्प ड्युटी आणि GST म्हणून वार्षिक 2,500 कोटी रुपये भरतात. STT 2004 मध्ये स्थापित करण्यात आला. त्यानंतर अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी LTCG रद्द करण्याची घोषणा केली होती. नंतर LTCG देखील लागू करण्यात आला. त्यामुळे STT रद्द करण्याची गरज आहे.

9. रिन्यूएबल एनर्जी सेक्टर पर फोकस
सरकारने रिन्यूएबल एनर्जी सेक्टरवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. याचे कारण केंद्र सरकारला देशातील पारंपरिक इंधनांचा (कोळसा, पेट्रोल, डिझेल इ.) वापर कमी करायचा आहे. त्यासाठी रिन्यूएबल एनर्जी सेक्टरची क्षमता वाढवण्याची गरज आहे. त्यामुळे सरकारने या क्षेत्रात रीसर्च अँड डेव्हल्पमेंटला चालना द्यावी. यासोबतच या क्षेत्रातील गुंतवणुकीला प्रोत्साहन देणारे धोरणही अर्थसंकल्पात जाहीर केले जाऊ शकते.

10. स्टार्टअपसाठी आकर्षक पॉलिसी
स्टार्टअप्सची संख्या झपाट्याने वाढत आहे. आजच्या तरुणाईला काहीतरी नवीन करायचे आहे. नोकरी शोधण्याऐवजी त्यांना नोकरीच्या संधी निर्माण करायच्या आहेत. याला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार स्टार्टअप्ससाठी आकर्षक धोरण जाहीर करू शकते. स्टार्टअप कंपन्यांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या संस्थेचा असा विश्वास आहे की, स्टार्टअपची स्थापना झाल्यानंतर 10 वर्षे स्टार्टअप स्थिती कायम राहिली पाहिजे