Friday, December 26, 2025
Home Blog Page 2890

कोरोनाची लागण झाल्यानंतर पवारांना मोदींचा फोन; तब्बेतीची केली विचारपूस

modi pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती स्वतः पवारांनी ट्विट करत सांगितले. त्यांनतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तात्काळ शरद पवारांना फोन करत त्यांच्या तब्बेतीची चौकशी केल्याची माहिती समोर येत आहे.

पवारांना कोरोनाची लागण झाल्याच्या बातमीने सगळीकडे खळबळ उडाली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पवारांना कॉल केला आणि तब्बेतीची चौकशी केली. राजकीय विचारधारा वेगळी असली तरी शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांचे जिव्हाळ्याचे संबंध हे सर्वश्रुत आहेत. एकदा तर एका जाहीर कार्यक्रमात मोदींनी पवारांना आपले राजकीय गुरू मानले होते.

चिंता करण्याचे कारण नाही – पवार

माझी कोविडची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. परंतु काळजीचे कोणतेही कारण नाही. माझ्या डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे मी उपचार घेत आहे. गेल्या काही दिवसांपासून माझ्या संपर्कात असलेल्या सर्वांना मी विनंती करतो की त्यांनी स्वतःची चाचणी करून घ्यावी आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी. असे ट्विट शरद पवार यांनी केलं.

फेब्रुवारीमध्ये बँका 12 दिवस बंद राहणार; पहा सुट्ट्यांची पूर्ण लिस्ट

Bank Holiday

नवी दिल्ली । वर्षाच्या दुसऱ्या महिन्यात म्हणजेच फेब्रुवारीमध्ये 12 दिवस बँका बंद राहतील. जानेवारीतही 16 दिवसांची सुट्टी होती. फेब्रुवारीच्या या सुट्ट्यांमध्ये दुसरा आणि चौथा शनिवार तसेच रविवारच्या सुट्ट्यांचाही समावेश आहे. फेब्रुवारी महिन्यात वसंत पंचमी, गुरु रविदास जयंतीनिमित्त बँकांना सुट्टी असेल. मात्र, फेब्रुवारी महिन्यात देशातील सर्वच बँका 12 दिवस बंद राहणार नाहीत.

वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या सुट्ट्या असतात. फेब्रुवारी महिन्यात येणार्‍या काही सुट्ट्या/सण हे विशिष्ट राज्य किंवा प्रदेशाशी संबंधित असतात. त्यामुळे, बँकेच्या सुट्ट्या राज्यांनुसार बदलू शकतात. सुट्ट्यांची लिस्ट पाहूनच बँकेत जाण्याचे प्लॅनिंग करा. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यातही बुधवारी म्हणजेच 26 जानेवारीला बँका बंद राहतील.

सुट्ट्यांची लिस्ट खालील प्रमाणे आहे
2 फेब्रुवारी : सोनम लोचर (गंगटोकमध्ये बँका बंद)
5 फेब्रुवारी: सरस्वती पूजा/श्री पंचमी/बसंत पंचमी (आगरतळा, भुवनेश्वर, कोलकाता येथे बँका बंद)
6 फेब्रुवारी : रविवार
12 फेब्रुवारी: महिन्याचा दुसरा शनिवार
13 फेब्रुवारी : रविवार
15 फेब्रुवारी: मोहम्मद हजरत अली वाढदिवस/लुई-नागई-नी (इंफाळ, कानपूर, लखनौमध्ये बँका बंद)
16 फेब्रुवारी: गुरु रविदास जयंती (चंदीगडमध्ये बँका बंद)
18 फेब्रुवारी: डोलजात्रा (कोलकात्यात बँका बंद)
19 फेब्रुवारी: छत्रपती शिवाजी महाराज जयंती (बेलापूर, मुंबई, नागपूर येथे बँका बंद)
20 फेब्रुवारी: रविवार
26 फेब्रुवारी: महिन्याचा चौथा शनिवार
27 फेब्रुवारी : रविवार

जगातील टॉप पाच शहरांमध्ये औरंगाबादचा समावेश

Aurangabad cycle track
Aurangabad cycle track

औरंगाबाद – गुंतवणूक आणि उत्पादन वाढीच्या दृष्टीने नवीन विकसनशील शहरांची ओळख करून देणार्‍या ‘ग्ली स्टेटी जनरली- इनोव्हॅझिओन- मॅक्रोइकॉनॉमिया’ इटालियन मासिकाने नाविन्यपूर्ण उत्पादनाच्या जगातील पाच महत्त्वाच्या शहरात औरंगाबादला स्थान दिले आहे. औरंगाबाद सोबतच चीनमधील बीजिंग-टियांजिन, मुंबई, दक्षिण कोरियातील सेऊल, अमेरिकेतील बोस्टन आणि जर्मनीतील ड्रेस्डेन ही शहरे या यादीत आहेत.

‘इनोव्हॅझिओन’च्या मते ही शहरे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विविध औद्योगिक प्रभावी आणि सर्वात मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांचा सर्वात नावीन्यपूर्ण जागतिक उत्पादनाची शहरे आहेत. शहरांमध्ये जागतिक दर्जाची विद्यापीठे आणि संशोधन केद्रांसह आघाडीच्या प्रयोगशाळा आणि कारखाने आहेत‌. टाटा समूह, रिलायन्स इंडस्ट्रीज, हिंदुस्थान युनिलिव्हर, आणि मोठ्या बँका यासारख्या आयसीटी, टेक्स्टाईल, फार्मास्युटिकल आणि मेकॅनिकल कंपन्यांचे उत्पादन युनिट म्हणून मुंबई औरंगाबाद चे वर्गीकरण करण्यात आले आहे.

उत्पादन क्षेत्रात औरंगाबाद अव्वल ‘इनोव्हॅझिओन’ या नियतकालिकाच्या अहवालात म्हटले आहे की, औरंगाबाद हे 8 लाख लोकसंख्येचे शहर असून, ऑटोमोटिव, अभियांत्रिकी आणि फार्मास्युटिकल्स यासारख्या उत्पादन क्षेत्रांमध्ये हे शहर पुढे आहे. शहराच्या विस्तीर्ण औद्योगिक वसाहतींमध्ये सिमेंस, बीएमडब्ल्यू, स्कोडा यासारख्या विविध आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे प्लांट्स आहेत. उद्योगाबरोबरच औरंगाबाद मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आहे, जे संपूर्ण भारतात लोकप्रिय विद्यापीठांपैकी एक आहे. नियतकालिकाने असा अंदाज वर्तविला आहे की, येत्या काही वर्षात याहूनही अधिक वेगाने या शहराची वाढ होईल. विद्यार्थी आणि संशोधक देशभरातून अभ्यास करण्यासाठी आणि व्यवसाय करण्यासाठी येथे येतात. त्यामुळे शहराच्या क्रमवारीत आणखी सुधारणा होईल.

शिवसेनेचे हिंदुत्व कागदावरचे; फडणवीसांचा पलटवार

thackeray fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल शिवसैनिकांशी संवाद साधताना भाजपवर हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरून निशाणा साधला होता. त्यानंतर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर देत शिवसेनेच हिंदुत्त्व कागदावरचे आहे असा टोला लगावला आहे. फडणवीस म्हणाले की, राम जन्मभूमीच्या आंदोलनात कोण होते तुमचे. लाठ्याकाठ्या आम्ही खाल्ल्या. तुम्ही तोंडाची वाफ दडवली. तुम्ही तर साधं औरंगाबाद चे संभाजीनगर करू शकला नाही.

उद्धव ठाकरे म्हणतात की 25 वर्षे युतीत सडलो. पण युतीचा निर्णय हा बाळासाहेब ठाकरे यांचा होता. 2012 पर्यंत बाळासाहेब ठाकरे युतीचे नेते होते. त्यांच्या हयातीत त्यांनी ही युती कायम ठेवली. याचा अर्थ बाळासाहेबांच्या निर्णयावर तुम्ही बोट दाखवत आहात का? भाजपसोबत शिवसेना सडत असताना बाळासाहेबांनी शिवसेनेला सडत ठेवलं असं तुमचं म्हणणं आहे का असा सवाल फडणवीसांनी केला.

ते पुढे म्हणाले, शिवसेनेचा जन्म होण्यापूर्वीच मुंबईत आमचा नगरसेवक होता, आमदार होते. १९८४ मध्ये लोकसभेची निवडणूक तुम्ही भाजपाच्या चिन्हावर लढवली होती शिवसेनेच्या नाही. मनोहर जोशी जे नंतर मुख्यमंत्री झाले ते भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढले होते,” अशी आठवण यावेळी फडणवीसांनी करुन दिली

नाना पटोले हिंमत असेल तर औरंगाबादेत येऊन दाखवा

औरंगाबाद – नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बद्दल केलेल्या वक्तव्या विरोधात आज भाजपच्या वतीने शहरातील सिडको बसस्थानक चौकात जोडे मारो आंदोलन करण्यात आले.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/515841996403212/

या वेळी आक्रमक झालेल्या आंदोलकांनी रस्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान आंदोलक आणि पोलिसात झटापट झाली. यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी नाना पाटोले यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी भाजप पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले. आंदोलनामुळे बराचवेळ गोंधळाची परिस्थिती चौकात होती.

यावेळी नाना पटोले यांनी औरंगाबादेत पाय ठेऊन दाखवा. त्यांचे कपडे फाडु असा इशारा शहर अध्यक्ष संजय केनेकर यांनी दिला. यावेळी मोठ्या प्रमाणावर भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते

शेअर बाजारात खळबळ, निफ्टी-सेन्सेक्सने गाठला तळ; गुंतवणूकदारांचे बुडाले 17 लाख कोटी रुपये

Share Market

नवी दिल्ली। सलग चार सत्रांतील घसरणीचा फटका बसल्यानंतर सोमवारपासून शेअर बाजाराला मोठ्या आशा होत्या, मात्र गुंतवणूकदारांमध्ये गोंधळामध्ये वातावरण असल्याने बाजारात खळबळ उडाली. त्यानंतर अवघ्या काही तासांतच सेन्सेक्स 1,200 अंकांनी तर निफ्टी 380 अंकांनी घसरला.

रियल्टी, मेटल आणि आयटी निर्देशांकातील जोरदार विक्रीमुळे बाजार बुडाला आणि 58 हजारांच्या खाली पोहोचला. निफ्टीही 17,250 अंकांच्या खाली ट्रेड करत आहे. गेल्या पाच ट्रेडिंग सत्रांपासून बाजारातील सततच्या घसरणीमुळे आतापर्यंत गुंतवणूकदारांचे 17.5 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. बीएसईवर लिस्टिंग असलेल्या सर्व टॉप 30 शेअर्सनी रेड मार्क गाठले, तर निफ्टीच्या 50 पैकी 49 शेअर्सनी घसरण दाखविली. दुपारी 1:12 वाजता सेन्सेक्स 1,234 अंकांनी घसरून 57,799.70 वर ट्रेड करत होता. निफ्टीही 377.05 अंकांनी घसरून 17,245.50 च्या पातळीवर आला. दोन्ही एक्सचेंजमध्ये 2 टक्क्यांहून अधिकची घसरण झाली.

पाच दिवसांत सेन्सेक्स 3,300 अंकांनी घसरला
शेअर बाजारातील सततच्या घसरणीमुळे सेन्सेक्समध्ये पाच व्यापार सत्रांमध्ये 3,300 अंकांची घसरण झाली आहे. निफ्टीही 1,100 अंकांनी खाली आला आहे. दोन्ही 5.4% ने घसरले आहेत.

‘या’ 5 कारणांमुळे बाजारात विक्री सुरु
परकीय गुंतवणूकदारांची विक्री सुरूच असून यूएस फेड रिझर्व्हकडून व्याजदर वाढवण्याच्या भीतीने गुंतवणूकदारांमध्ये भीती पसरली आहे.
पेटीएम, कारट्रेड, पीबी फिनटेक सारख्या टेक शेअर्स मध्ये मोठ्या घसरणीचा परिणाम संपूर्ण बाजारावर झाला.
देशात दररोज तीन लाखांहून अधिक कोरोना संसर्गाची प्रकरणे समोर येत आहेत, त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण वाढत आहे.
धातूसह इतर कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्याने कंपन्यांच्या खर्चात वाढ होत असून, त्यांना उत्पन्न बुडण्याचा धोका दिसू लागला आहे.
महागाई आणि ऑफ-सीझन पावसामुळे ग्राहकांचा वापर अपेक्षेप्रमाणे दिसत नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. शरद पवार यांनी स्वतः ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. काळजी करण्याचे काही कारण नाही. मी डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेत आहे असेही पवारांनी सांगितलं

माझी कोविडची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. परंतु काळजीचे कोणतेही कारण नाही. माझ्या डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे मी उपचार घेत आहे. गेल्या काही दिवसांपासून माझ्या संपर्कात असलेल्या सर्वांना मी विनंती करतो की त्यांनी स्वतःची चाचणी करून घ्यावी आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी. अस ट्विट शरद पवार यांनी केलं

शरद पवार हे सातत्याने महाराष्ट्रभर फिरत असतात. वयाच्या 80 व्या वर्षी देखील पवार अनेक ठिकाणी जाऊन तसेच विविध कार्यक्रमाना हजरीं लावून लोकांना मार्गदर्शन करत असतात. दरम्यान, गेल्या काही दिवसापासून राज्यातील अनेक नेत्याना कोरोना ची लागण झाली आहे. अनेक आमदार, खासदार कोरोनाच्या विळख्यात आहेत. त्यातच आता दिग्गज नेते शरद पवार यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे

विवाहित महिलेच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी पतीला पाच दिवसाची पोलीस कोठडी

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा शहर उपनगरातील संगमनगर येथील 24 वर्षीय सुजाता शंकर भोळे विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना दि. २० रोजी घडली होती. यामध्ये सासरच्या लोकांकडून तिला बेदम मारहाण झाल्याने त्यात तिचा मृत्यू झाला असल्याचा आरोप माहेरच्या मंडळींनी केला. विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी काल पती शंकर काळूराम भोळे याला अटक केसात आली होती. दरम्यान त्याला आज सातारा येथील न्यायालयात यूजर केले असता न्यायालयाकडून पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे.

याबाबत मृत विवाहितेचे चुलते अतुल दत्तात्रय धुमाळ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सुजाता शंकर भोळे हिच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी पती शंकर काळूराम भोळे, सासू लीलावती कळूराम भोळे, दिर राजेंद्र काळूराम भोळे, जाऊ स्वाती राजेंद्र भोळे, यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या संपूर्ण कुटुंबावर भारतीय दंड संहिता 1860 नुसार कलम 304B, 489A, 302, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

दरम्यान, शनिवार, दि. 22 रोजी संशयित आरोपी शंकर भोळे याला त्वरित अटक करा या मागणीसाठी सुजाता भोळे यांच्या नातेवाईकांनी कृष्णाई वंदन या ठिकाणी जाऊन निदर्शने करण्याचा इशारा दिला होता. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत सातारा पोलिसांनी त्या ठिकाणी मोठा पोलीस फौजफाटा तैनात केला. सातारा विभागीय पोलीस अधिकारी आंचल दलाल यांनीही भेट देऊन नातेवाईकांची समजूत काडून संशयित आरोपी शंकर भोळे यास लवकरात लवकर अटक करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार आरोपीला काल अटक करण्यात आली. त्यानंतर आज त्याला न्यायालय समोर हजर केले असता न्यायालयाने त्याला 5 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. या पकरणाचा अधिक तपास सातारा पोलीस करत आहेत.

12 तासातच आरोपीच्या आवळल्या मुसक्या

विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ तपासाची सूत्र हलवली. 12 तास होण्याआधी तपास अधिकारी एस. एम. मछले आणि सातारा शहर गुन्हे अन्वेषणच्या पथकाने सापळा रचून गायब झालेल्या शंकर भोळे याच्या मुसक्या आवळल्या.

कोरोनाची लस बनवणाऱ्या कंपन्या झाल्या मालामाल; रोज किती कमाई करतात जाणून घ्या

नवी दिल्ली । कोरोना महामारी एकीकडे जगासाठी विनाशकारी ठरत असतानाच लस कंपन्यांसाठी मात्र ती वरदान ठरली आहे. संकटात सापडलेल्या फार्मा क्षेत्रासाठी कोरोनाने संजीवनीचे काम केले. विशेषतः कोरोनाची लस बनवणाऱ्या कंपन्या मालामाल झाल्या आहेत. कोविड लस बनवणार्‍या तीन कंपन्या – Pfizer, BioNTech आणि Moderna प्रत्येक सेकंदाला US $ 1,000 म्हणजेच 75 हजार रुपये कमवत आहेत. दररोज या कंपन्या $9.35 कोटी (सुमारे सात अब्ज रुपये) कमावत आहेत.

या चार कंपन्यांनी – Moderna, Pfizer, BioNTech आणि Johnson & Johnson यांनी जगातील दोन तृतीयांश लसींची विक्री केली आहे. ओमिक्रॉनच्या नावावर Modernaआणि Pfizer ने सुमारे दहा दिवसांत बूस्टर डोसमधून 70 हजार कोटींची कमाई केली. एस्ट्राझेनेका आणि जॉन्सन अँड जॉन्सन आता ही लस नफ्यात विकण्याचा विचार करत आहेत.

तोट्यातील कंपन्या नफ्यात बदलल्या
कोरोनापूर्वी, Moderna 3750 कोटी रुपयांच्या तोट्यात चालू होती, 2021 मध्ये तोटा संपला आणि 70 कोटी डॉलर्सचा नफा झाला. त्याचप्रमाणे 300 कोटींच्या तोट्यात असलेली बायोएनटेक वर्षभरानंतर 61 हजार कोटींच्या नफ्यात आली. त्याच वेळी, फायझरचा नफा 2020 मध्ये $80 कोटी होता, जो 2021 मध्ये $9 हजार कोटी झाला. म्हणजेच नफ्यात 124 टक्क्यांची झेप.

लाइव्ह मिंटच्या रिपोर्ट्स नुसार, 2020-21 मध्ये, सीरम इन्स्टिट्यूटने 7499 रुपयांच्या व्यवसायावर 3,890 कोटी रुपयांचा नफा कमावला. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत (सप्टेंबर, 2021) कंपनीचे परिचालन उत्पन्न 13,288 कोटी रुपयांवर पोहोचले.

टॉप 20 कंपन्यांमध्ये 18 फार्मा
देशात, 5000 कोटी रुपयांपेक्षा जास्त विक्री करून नफा कमावणाऱ्या टॉप 20 कंपन्यांमध्ये 18 कंपन्या फार्मा क्षेत्रातील आहेत. सीरम नंतर मॅक्लिओड्स फार्मास्युटिकल्सचा क्रमांक लागतो, ज्याचा निव्वळ नफा 28 टक्के आहे. भारतातील लस कंपनी सीरम इन्स्टिट्यूट जगातील सर्वात मोठी लस उत्पादक बनली आहे, मात्र नफ्यात ती मागे आहे.

एका लसीवर तीस पट नफा
गार्डियनच्या रिपोर्ट्स नुसार, फायझरच्या एका लसीची किंमत एक डॉलर आहे, तर एक डोस $ 30 मध्ये विकला जातो. Moderna सुद्धा आपली लस तीसपेक्षा जास्त पटीने विकते. ऑक्सफॅमच्या म्हणण्यानुसार, दोन्ही कंपन्या आपली लस 5 पट पेक्षा जास्त नफ्यावर विकत आहेत. आता दोन्ही कंपन्या ही लस 124 डॉलरला विकणार आहेत.

कोरोना लसीनंतर कंपन्यांचा नफा
कंपनी –     2020                  2021
मॉडर्ना –    3750 कोटी      + 700 कोटी डॉलर
फायझर –  800 कोटी        + 9000 कोटी डॉलर
जॉन्सन –   97000 कोटी    +120 हजार कोटी
बायोटेक – 300 कोटी        + 61 हजार कोटी
सीरम-      2251 कोटी      + 3,890 कोटी

स्रोत: पीव्हीए, लाइव्ह मिंट

कोणत्या रेशन कार्डवर किती धान्य उपलब्ध आहे ते जाणून घ्या

Free Ration

नवी दिल्ली । राज्य आणि केंद्र सरकार गरीब आणि गरजूंना अत्यंत नाममात्र किंमतीत जीवनावश्यक अन्नधान्य पुरवतात. लाभार्थ्यांची ओळख पटविण्यासाठी स्वतंत्र रेशन कार्डही दिली जातात. प्रत्येक रेशनवर मिळणाऱ्या धान्याची रक्कमही ठरलेली असते.

कोरोना महामारीच्या काळात केंद्र सरकारने 80 कोटी लोकांना मोफत धान्य वाटप करण्याची घोषणा केली होती, त्याचा लाभ मार्च 2022 पर्यंत मिळणार आहे. याशिवाय विविध योजनांतर्गत रेशनचे वाटप केले जाते. यामध्ये मोफत रेशन मिळत नसले तरी गरजूंना बाजारभावापेक्षा खूपच कमी दरात धान्य दिले जाते. तर कोणत्या रेशनकार्डवर, कोणाला आणि किती धान्य दिले जाते हे जाणून घेउयात.

अंत्योदय अन्न योजना रेशन कार्ड
या योजनेच्या लाभार्थ्यांना दर महिन्याला प्रति कुटुंब 35 किलो रेशन मिळते, ज्यामध्ये 20 किलो गहू आणि 15 किलो तांदूळ असतो. लाभार्थी गहू 2 रुपये किलो दराने आणि तांदूळ 3 रुपये किलो दराने खरेदी करू शकतात. हे कार्ड केंद्र सरकारकडून अशा भारतीय नागरिकांना दिले जाते जे घरगुती श्रेणीबाहेर आहेत म्हणजेच अत्यंत गरीब श्रेणीतील आहेत. या कार्डमध्ये इतर कार्डांपेक्षा जास्त रेशन उपलब्ध आहे.

BPL रेशन कार्ड
सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत दारिद्र्यरेषेखालील (BPL) रेशन कार्ड जारी केले जातात. या रेशन कार्डवर प्रत्येक कुटुंबाला महिन्याला 10 ते 20 किलो रेशन दिले जाते. रेशनचे हे प्रमाण राज्यानुसार बदलू शकते. तसेच अन्नधान्याच्या किमतीही राज्य सरकारांवर अवलंबून असतात. मात्र, तो बाजारभावापेक्षा कितीतरी पटीने कमी असेल.

APL रेशन कार्ड
दारिद्र्यरेषेवरील (APL) रेशन कार्ड दारिद्र्यरेषेच्या वर राहणाऱ्या लोकांना दिली जातात. APL रेशन कार्डवर प्रत्येक कुटुंबाला दर महिन्याला 10 ते 20 किलो रेशन दिले जाते. रेशनची किंमत राज्य सरकारे ठरवतात, त्यामुळे वेगवेगळ्या राज्यांमध्ये त्यात बदल होऊ शकतो.

PHH रेशन कार्ड
राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (NFSA) अंतर्गत प्राथमिक रेशन कार्ड (PHH) जारी केली जातात. राज्य सरकारे लक्ष्यित सार्वजनिक वितरण प्रणाली (TPDS) अंतर्गत प्राधान्यक्रमित कुटुंबे ओळखतात. प्राधान्य रेशन कार्डवर दर महिन्याला प्रति व्यक्ती 5 किलो रेशन उपलब्ध आहे. यामध्ये तांदूळ 3 रुपये किलो आणि गहू 2 रुपये किलो दराने दिला जातो.

अन्नपूर्णा रेशन कार्ड
अन्नपूर्णा योजनेंतर्गत हे रेशन कार्ड उपलब्ध आहेत, जी गरीब आणि 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या वृद्धांना दिली जातात. त्यावर दरमहा 10 किलो रेशन मिळू शकते. राज्य सरकारे ही कार्डे त्यांच्या विहित मानकांतर्गत येणाऱ्या वृद्धांना जारी करतात. राज्यानुसार धान्याचे प्रमाण आणि किंमत बदलू शकते.