Friday, December 26, 2025
Home Blog Page 2891

कोणत्या रेशन कार्डवर किती धान्य उपलब्ध आहे ते जाणून घ्या

Free Ration

नवी दिल्ली । राज्य आणि केंद्र सरकार गरीब आणि गरजूंना अत्यंत नाममात्र किंमतीत जीवनावश्यक अन्नधान्य पुरवतात. लाभार्थ्यांची ओळख पटविण्यासाठी स्वतंत्र रेशन कार्डही दिली जातात. प्रत्येक रेशनवर मिळणाऱ्या धान्याची रक्कमही ठरलेली असते.

कोरोना महामारीच्या काळात केंद्र सरकारने 80 कोटी लोकांना मोफत धान्य वाटप करण्याची घोषणा केली होती, त्याचा लाभ मार्च 2022 पर्यंत मिळणार आहे. याशिवाय विविध योजनांतर्गत रेशनचे वाटप केले जाते. यामध्ये मोफत रेशन मिळत नसले तरी गरजूंना बाजारभावापेक्षा खूपच कमी दरात धान्य दिले जाते. तर कोणत्या रेशनकार्डवर, कोणाला आणि किती धान्य दिले जाते हे जाणून घेउयात.

अंत्योदय अन्न योजना रेशन कार्ड
या योजनेच्या लाभार्थ्यांना दर महिन्याला प्रति कुटुंब 35 किलो रेशन मिळते, ज्यामध्ये 20 किलो गहू आणि 15 किलो तांदूळ असतो. लाभार्थी गहू 2 रुपये किलो दराने आणि तांदूळ 3 रुपये किलो दराने खरेदी करू शकतात. हे कार्ड केंद्र सरकारकडून अशा भारतीय नागरिकांना दिले जाते जे घरगुती श्रेणीबाहेर आहेत म्हणजेच अत्यंत गरीब श्रेणीतील आहेत. या कार्डमध्ये इतर कार्डांपेक्षा जास्त रेशन उपलब्ध आहे.

BPL रेशन कार्ड
सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत दारिद्र्यरेषेखालील (BPL) रेशन कार्ड जारी केले जातात. या रेशन कार्डवर प्रत्येक कुटुंबाला महिन्याला 10 ते 20 किलो रेशन दिले जाते. रेशनचे हे प्रमाण राज्यानुसार बदलू शकते. तसेच अन्नधान्याच्या किमतीही राज्य सरकारांवर अवलंबून असतात. मात्र, तो बाजारभावापेक्षा कितीतरी पटीने कमी असेल.

APL रेशन कार्ड
दारिद्र्यरेषेवरील (APL) रेशन कार्ड दारिद्र्यरेषेच्या वर राहणाऱ्या लोकांना दिली जातात. APL रेशन कार्डवर प्रत्येक कुटुंबाला दर महिन्याला 10 ते 20 किलो रेशन दिले जाते. रेशनची किंमत राज्य सरकारे ठरवतात, त्यामुळे वेगवेगळ्या राज्यांमध्ये त्यात बदल होऊ शकतो.

PHH रेशन कार्ड
राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (NFSA) अंतर्गत प्राथमिक रेशन कार्ड (PHH) जारी केली जातात. राज्य सरकारे लक्ष्यित सार्वजनिक वितरण प्रणाली (TPDS) अंतर्गत प्राधान्यक्रमित कुटुंबे ओळखतात. प्राधान्य रेशन कार्डवर दर महिन्याला प्रति व्यक्ती 5 किलो रेशन उपलब्ध आहे. यामध्ये तांदूळ 3 रुपये किलो आणि गहू 2 रुपये किलो दराने दिला जातो.

अन्नपूर्णा रेशन कार्ड
अन्नपूर्णा योजनेंतर्गत हे रेशन कार्ड उपलब्ध आहेत, जी गरीब आणि 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या वृद्धांना दिली जातात. त्यावर दरमहा 10 किलो रेशन मिळू शकते. राज्य सरकारे ही कार्डे त्यांच्या विहित मानकांतर्गत येणाऱ्या वृद्धांना जारी करतात. राज्यानुसार धान्याचे प्रमाण आणि किंमत बदलू शकते.

…आणि अचानक ऊस तोडणी मशीनने घेतला पेट

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

बागणी तालुका वाळवा येथील काली मस्जिद चौगले मळा येथे ऊस तोडणी मशीनने अचानक पेट घेतला. या आगीत मशीनचे सुमारे दीड कोटी रुपयांचे नुकसान झाले. वारणा भैरेवाडी येथील आप्पा चव्हाण यांची सदर ऊसतोडणी मशीन आहे. तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्यासाठी या मशिनद्वारे बागणी परिसरातील ऊस तोडणीचे काम सुरू होते. रविवारी या मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाला.

शेतानजीक जवळ असलेल्या पोल्ट्री फार्म जवळ ऊस तोडणी मशीन दुरुस्तीसाठी आणण्यात आले. दुरुस्तीवेळी वेल्डिंगचे काम सुरू होते. यावेळी डिझेल पाईप लिकेज असल्याने वेल्डिंगच्या ठिणग्या डिझेल वर पडल्याने मशीनने अचानक पेट घेतला. आग आटोक्या बाहेर गेली होती. बाजूला असणाऱ्या कामगारांनी प्रसंगावधान राखून मशीन पासून दूर गेले. त्यामुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही. परिसरातील शेतकरी व स्थानिक युवकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला.

आष्टा नगरपालिकेच्या अग्निशमन केंद्रात संपर्क साधून आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र मशीन भोवती आगीचे लोट पसरल्याने आग आटोक्यात येण्यास जवळपास तीन तास वेळ लागला. यात सुमारे दीड कोटीपेक्षा जास्त नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. सततच्या पावसाने शेतात ऊसतोडणी मशीन चालू न शकल्याने या धंद्यात मंदीचे सावट असताना सध्या शेतात घात आल्याने मशीन तोडणीस सुरवात झाली होती. तो पर्यंतच ही घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

25 वर्षे युतीत सडली तर मग दोन वर्षात शिवसेना वाढली का? दरेकरांचा सवाल

Darekar Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधताना भाजपवर तोफ डागली. शिवसेनेची 25 वर्ष युतीत सडली असे उद्धव ठाकरे यांनी म्हंटल्यांतर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांवर पलटवार केला आहे. तुमची 25 वर्षे भाजपसोबत सडली तर मग दोन वर्षात शिवसेना वाढली का? असा सवाल दरेकरांनी केला.

प्रविण दरेकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे. तुमची 25 वर्षे भाजपसोबत सडली तर मग दोन वर्षात शिवसेना वाढली का? असा सवाल प्रवीण दरेकर यांनी केला. मुख्यमंत्री त्यांचा असूनही निवडणुकीत शिवसेना चौथ्या क्रमांकावर फेकली का ?? सरकार असूनही आपली वाढ का होत नाही? याचं आत्मपरीक्षण करा असे दरेकरांनी म्हंटल.

उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले-

शिवसेनेची गेली 25 वर्ष भाजप सोबत युती होती. आपली 25 वर्ष युतीमध्ये सडली. माझं आजही तेच मत आहे. मी माझ्या मतावर ठाम आहे. असे उद्धव ठाकरे यांनी म्हंटल. बाळासाहेब म्हणायचे की राजकारण हे गजकर्णासारखं आहे, जेवढं खाजवावं तेवढी अधिक खाज येतं. तसे हे सगळे राजकारणातील गजकर्णी आहेत असा टोलाही त्यांनी लगावला.

विनामास्कसह नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई, लाखो रुपयांचा दंड वसूल

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

राज्यात ओमायक्रॉनचे रुग्ण आढळल्यानंतर कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली. सांगली जिल्ह्यातही रुग्णसंख्येत वाढ होत असून मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळत आहेत. दररोज ८०० च्या घरात रुग्ण आढळत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. अशातच मास्क न घालता फिरणाऱ्यांवर तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारला जात आहे. शनिवारी दिवसभरात ८० जणांवर गुन्हा दाखल करून त्यांच्याकडून तब्बल ९७ हजार १०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

राज्यात ओमायक्रोन व्हेरिएन्ट मुळे कोरोनाची तिसरी लाट सध्या पसरत आहे. सांगली जिल्ह्यात कोरोनाची तिसरी लाट मोठ्या प्रमाणात पसरली आहे. जिल्ह्यात दररोज ८०० हुन अधिक रुग्ण बाधित होत आहेत. वातावरणात झालेल्या बदलांमुळे रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढले आहे. कोरोनाला अटकाव करण्यासाठी नियमांचे पालन करा, सोशल डिस्टंसिंग तसेच मास्कचा वापर करा असे वारंवार सांगण्यात येत आहे. प्रशासनाच्या या आवाहनाला काही नागरिकांकडून हरताळ फासल्याचा प्रकार घडत आहे. त्यामुळे आता पोलिसांनी थेट रस्त्यावर उतरत विना मास्क फिरणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारण्यास सुरवात केली आहे.

पोलीस अधिक्षक दिक्षीत गेडाम यांनी जिल्हयातील सर्व पोलीस अधिकारी, प्रभारी अधिकारी तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला जिल्हयात गर्दीच्या ठिकाणी, मॉल, बाजार व इतर गर्दीच्या ठिकाणी विना मास्क फिरणाऱ्या नागरीकांवर तसेच विनाकारण फिरणा-या व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे शहरासह जिल्ह्यातील प्रमुख मार्गांवर पोलिसांनी कारवाई करण्यास सुरवात केली. यावेळी नियमबाह्य तसेच नियम मोडणाऱ्यांची वाहने जप्त करण्यात आली. शनिवार दि. २२ रोजी दिवसभरात विनामास्क फिरणाऱ्या ५२४ जणांवर गुन्हा दाखल करत २८ हजार ५०० रुपये दंड वसूल केला तर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करत ६८ हजार ६०० रुपये वसूल करण्यात आले. दिवसभरात नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करत ९७ हजार १०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, अन्यथा कठोर कारवाई करू असा इशारा यावेळी अधीक्षक गेडाम यांनी दिला.

प्रजासत्ताकदिनी राजपथ संचलनाचे नेतृत्व वाळव्याच्या कन्येकडे, तटरक्षक दलाचे नेतृत्व करण्याची मिळाली संधी

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

प्रजासत्ताक दिनी दिल्ली येथे होणाऱ्या संचालनाचे नेतृत्व करण्याची संधी सांगली जिल्ह्यातील वाळव्याच्या कन्येला मिळाली आहे. अपूर्वा गौतम होरे यांना प्रजासत्ताक दिनी दिल्ली येथे होणाऱ्या तटरक्षक दलाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. तीन वर्षांपासून अपूर्वा होरे या भारतीय नावीक दलात गुजराथ (पोरबंदर) येथे असिस्टंट कमांडंट पदावर कार्यरत आहेत.

बी.ई. इलेक्ट्रॉनिक असलेल्या अपूर्वा यांनी सर्व शिक्षण स्कॉलरशीप वर घेतले असून यु .पी.एस.सी परिक्षेत राज्यात प्रथम व देशात ६ व्या क्रमांकाने यश घेत त्या भारतीय +8h7नावीक दलात दाखल झाल्या. त्यांना मिळालेल्या संधी बद्दल त्यांचे वाळवा परिसरात कौतुक होत आहे.

“…..अन् शारदाताई खळखळून हसल्या !”

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

समाजात आजही अनेकांच्या डोक्यावर अंधश्रध्देच भुत बसलेले आहे. काही केल्या ते उतरता उतरत नाही. समाजातील अंधश्रध्देच हे भूत उतरवण्याचे काम अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्यावतीने केले जाते. दरम्यान, समितीच्यावतीने साताऱ्यातील मल्हारपेठेतील शारदाताई बाबर यांची आज सुमारे साडे तीन किलोहून अधिक जटांतून मुक्त करण्यात आले. जटामुक्त झाल्यानंतर शारदाताई यांचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता.

मल्हार पेठेत राहणाऱ्या शारदाताई बाबर यांच्या डोक्यावर गेली चार वर्षापासून जटा वाढत चालल्या होत्या. या जटा वाढण्यामागचे कारण म्हणजे शारदाताईंना देवाच्या जटा असल्याचे अनेकांनी डोक्यात बिंबवले. आणि त्यांनी त्या तशाच वाढवल्या. मात्र, वाढत गेलेल्या केसांच्या गुंत्यामुळे त्यांच्या डोक्यावर सुमारे साडेतीन किलोपेक्षाही जास्त वजनाच्या या जटा झाल्या होत्या. परिणामी त्यांच्या मानेलाही त्रास होत होता. त्यांना एकाच अंगावर झोपावे लागत असत आणि त्यामुळे त्यांचा खांद्यालाही वेदना होत होत्या.

त्याच्याबाबत माहिती समजल्यानंतर अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे सुरेंद्र शिंदे यांनी शरदाताईंची भेट घेतली. तसेच त्यांनी आणि शारदाताईंच्या बहिण उषा वायदंडे यांनी शारदाताईंची समजूत काढली. शारदाताई या जटा काढण्यासाठी तयार झाल्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती डॉ. हमीद दाभोलकर यांना दिली. काही वेळातच अनिसची टिम मल्हार पेठेत दाखल झाली.

शारदाताई यांच्या सांगण्यानुसार मला डोक्यावरचे सर्वच केस काढायचे आहेत असा अट्टाहास धरल्यानंतर त्यांना जवळच्याच केशकर्तनालयात नेण्यात आले आणि त्यांच्या डोक्यावरचे सर्वच केस काढण्यात आले. त्यांच्या डोक्यावरचे केस काढल्यानंतर त्यांनी खदखदून हसत आपल्याला मनापासून आनंद होत असल्याचे सांगितले. आणि त्यांनी हात जोडून अनिसचे आभारही मानले. यावेळी अनिसच्या वंदना माने, डॉ. दिपक माने, सुरेश शिंदे, संतोष साळुंखे हे उपस्थित होते.

जटाधारी महिलांनी अंधश्रध्दा निर्मुलन समितीशी संपर्क साधावा – डॉ. हमीद दाभोलकर

दरम्यान, त्रास होत असताना त्या कोणाला सांगायलाही धजावत नाहीत कारण समाज काय म्हणेल या विचारात ती महिला हे डोक्यावरच ओझ तसच घेऊन आयुष्य जगत असते. त्यामुळे अशी जट असलेल्या महिलांनी अंधश्रध्दा निर्मुलन समितीशी संपर्क साधावा असे आवाहन डॉ हमीद दाभोलकर आणि सौ वंदना माने यांनी केले आहे.

जटा वाढण्याचे कारण

केस वेळचेवेळी न धूणे, न विंचरणे, त्याची निगा न राखणे या कारणातून जटा वाढत असतात. आणि जेंव्हा केसांचा गुंता तयार होतो तेंव्हा त्या एकमेकाला चिटकून रहातात आणि लोक त्याला देवाची जटा असे सांगून त्याची देवपूजा करायला सुरवात करतात. समाजातील या अंधश्रध्देच्या पायात अनेक महिलांच्या डोक्यावर तीन किलोच्या वरती आणि सुमारे 10-12 किलोची जट तयार होते. आणि याचा त्रास त्या संबधित महिलेला होत असतो.

आता मजुरांना मिळेल दरमहा 3000 रुपये पेन्शन; ‘अशा’ प्रकारे करा अर्ज

E-Shram

नवी दिल्ली । देशातील खालच्या स्तरातील लोकांना सक्षम करण्यासाठी सरकार सर्व प्रकारच्या कल्याणकारी योजना राबवत असते. पंतप्रधान शेतकऱ्याप्रमाणेच सरकारने मजुरांसाठी देखील अनेक योजना राबवल्या आहेत. असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या मजुरांना वयाच्या 60 वर्षांनंतर पेन्शन मिळावी, यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना सुरू केली आहे.

या योजनेंतर्गत मजूर, वीटभट्टी किंवा बांधकामावर काम करणारी लोकं, फुटवेअर बनवणारे, कचरा वेचणारे, घरगुती कामगार, धोबी, रिक्षाचालक, जमीन नसलेले मजूर, विडी कामगार अशा इतर मजुरांना पेन्शन दिली जाते. यासोबतच त्या मजुरांचाही यात समावेश करण्यात आला आहे, ज्यांचे उत्पन्न 15,000 रुपयांपेक्षा कमी आहे.

असंघटित क्षेत्रातील सुमारे 42 कोटी कामगार उपस्थित आहेत
केंद्र सरकारच्या या योजनेशी संबंधित व्यक्तीला वयाची 60 वर्षे पूर्ण केल्यानंतर दरमहा 3,000 रुपये पेन्शन दिली जाते. दरम्यान, लाभार्थीचा मृत्यू झाल्यास निवृत्ती वेतनाच्या 50 टक्के रक्कम पती-पत्नीला पेन्शन म्हणून दिली जाते.

प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेचा लाभ घेण्यासाठी मजुरांना स्वतःची नोंदणी करावी लागेल. एका अंदाजानुसार देशात असंघटित क्षेत्रात सुमारे 42 कोटी कामगार आहेत. या योजनेतील अर्जदाराचे वय 18-40 वर्षांच्या दरम्यान असावे. त्यांना 60 वर्षापर्यंत दरमहा 55 ते 200 रुपये द्यावे लागतील. त्यांचे मासिक उत्पन्न 15,000 रुपयांपेक्षा कमी असावे. वयाच्या 60 वर्षांनंतर पेन्शन सुरू होईल.

ही लोकं अर्ज करू शकणार नाहीत
प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेअंतर्गत अर्ज करणारी लोकं संघटित क्षेत्रात काम करणारे कर्मचारी नसावेत. यासोबतच, कोणीही EPFO, NPS आणि ESIC चा सदस्य नसावा आणि करदाता नसावा.

अर्ज कसा करायचा ते जाणून घ्या
सर्वप्रथम तुम्हाला अधिकृत वेबसाइट  http://www.maandhan.in ला भेट द्यावी लागेल. यानंतर सेल्फ एनरोलमेंट वर क्लिक करा आणि तुमचा मोबाईल नंबर टाका. त्यानंतर Proceed वर क्लिक करा. नाव, ई-मेल आणि कॅप्चा कोड एंटर करा आणि जनरेट OTP वर क्लिक करा. OTP सत्यापित करा. ज्याचे अर्जाचे पान उघडेल. विनंती केलेली माहिती एंटर करा आणि सबमिट करा.

NRI नागरिकांना FD वर मिळत आहे भरपूर व्याज; बँकांची लिस्ट पहा

Money

नवी दिल्ली । परदेशात राहणाऱ्या अनिवासी भारतीयांना (NRI) बचत खाती आणि फिक्स्ड डिपॉझिटसवर (FDs) बँका जास्त व्याजदर देत आहेत. यामध्ये भारतीय बँकांसह अनेक परदेशी बँकांचाही समावेश आहे. वास्तविक, परदेशात स्थायिक झालेल्या बहुतांश भारतीयांनी येथे घरे किंवा इतर मालमत्ता खरेदी केल्या आहेत. यामुळे त्यांना भाड्याच्या रूपाने दरवर्षी मोठी कमाईही होते.

याशिवाय शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातून रिटर्न आणि लाभांशाच्या रूपातही भरपूर पैसा उपलब्ध आहे. अशा अनिवासी भारतीयांसाठी बँका अनिवासी सामान्य (NRO) बचत खाती उघडतात. बचत खात्यावर कमी व्याज मिळत असले तरी, अनिवासी भारतीय बँकांमध्ये NRO FD मिळवून प्रचंड व्याज मिळवू शकतात. अनेक छोट्या खाजगी क्षेत्रातील बँका 2-3 वर्षांच्या FD वर सर्वाधिक व्याज देतात.

RBL बँक
खाजगी क्षेत्रातील RBL बँक 2-3 वर्षांच्या FD वर 6.3% व्याज देत आहे. यामध्ये दोन वर्षांची FD केल्यास 1 लाख रुपये वाढून 1.13 लाख रुपये होतील.

बंधन बँक आणि येस बँक
बंधन बँक आणि येस बँक 2-3 वर्षांच्या FD वर वार्षिक 6.25 टक्के व्याज देतात. बंधन बँकेत FD घेण्यासाठी किमान 1,000 रुपये आणि येस बँकेत किमान 10 हजार रुपये जमा करावे लागतील.

इंडसइंड बँक
ही बँक FD वर वार्षिक 6 टक्के भरघोस व्याज देत आहे. यामध्ये 2-3 वर्षांसाठी FD करता येते. 1 लाख रुपये गुंतवले तर दोन वर्षांत ते 1.12 लाखांपर्यंत वाढेल.

DCB बँक
ही खाजगी क्षेत्रातील बँक NRO खात्याच्या FD वर वार्षिक 5.95 टक्के व्याज देते. यामध्येही 2-3 वर्षांची FD करता येते. 1 लाख गुंतवले तर ते दोन वर्षांत सुमारे 1.12 लाख रुपये होईल.

IDFC फर्स्ट बँक
इतर बँकांच्या तुलनेत येथे व्याज थोडे कमी मिळते, मात्र सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या तुलनेत जास्त रिटर्न मिळतो. NRO खात्याद्वारे 2-3 वर्षांसाठी FD , वार्षिक 5.75 टक्के व्याज उपलब्ध आहे. म्हणजेच दोन वर्षांत 1 लाख रुपये वाढून सुमारे 1.12 लाख रुपये होतात.

Gold Price : सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार सुरूच, आजचे दर पहा

Gold Price

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लग्नसराईचा हंगाम सुरू झाला असून, त्यामुळे बाजारात सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार सुरूच आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे, तर चांदीच्या दरात किंचित नरमाई आहे.

आज, फेब्रुवारीमधील डिलिव्हरीसाठीच्या सोन्याचा भाव 0.13 टक्क्यांनी वाढला. त्याच वेळी, चांदीचे भाव 0.26 टक्क्यांच्या घसरणीसह ट्रेड करत आहेत.

सोन्या-चांदीची किंमत काय आहे जाणून घ्या
फेब्रुवारीच्या डिलिव्हरीसाठीचा सोन्याचा भाव आज 0.13 टक्क्यांनी वाढून 48,312 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. दुसरीकडे, आजच्या ट्रेडिंगमध्ये चांदी 0.26 टक्क्यांनी घसरली. आज 1 किलो चांदीचा भाव 64,640 रुपये आहे.

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,780 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 48,,320 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,530 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,530 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,530 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,530 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत.

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 47,530 रुपये
पुणे – 46,780 रुपये
नागपूर -47,530 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 49,530 रुपये
पुणे -49,320 रुपये
नागपूर – 49,530 रुपये

PolicyBazar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Gram 22 Carat Gold Yesterday 22 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4677.00 Rs 4678.00 0.021 %⌃
8 GRAM Rs 37416 Rs 37424 0.021 %⌃
10 GRAM Rs 46770 Rs 46780 0.021 %⌃
100 GRAM Rs 467700 Rs 467800 0.021 %⌃

 

PolicyBazar वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Gram 24 Carat Gold Yesterday 24 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4931.00 Rs 4932.00 0.02 %⌃
8 GRAM Rs 39448 Rs 39456 0.02 %⌃
10 GRAM Rs 49310 Rs 49320 0.02 %⌃
100 GRAM Rs 493100 Rs 493200 0.02 %⌃

नाना पटोलेंची जीभच नाही तर अक्कलही घसरली, त्यांना मानसिक उपचाराची गरज

Nana Patole

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वर पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य करत ज्याची बायको पळून जाते त्याला मोदी म्हणतात अस म्हंटल होत. त्यानंतर भाजप आमदार श्वेता महाले यांनी नाना पटोले यांच्यावर निशाणा साधला आहे. नाना पटोले यांची जीभच नाही तर अक्कलही घसरली आहे अशी टीका त्यांनी केली आहे.

श्वेता महाले यांनी याबाबत ट्विट करत म्हंटल की, पोरकट पटोलेंची जीभच नाही तर अक्कलही घसरली.काँग्रेस मधे एकंदरीत अकलेचा दुष्काळ आहे.काँग्रेसने मोदीद्वेष केल्याने त्यांच्या पक्षाचाच जनाधार कधीच पळून गेलाय त्याकडे नानासाहेबांनी पहावे. परिस्थिती कठीण आहे पटोलेंवर चांगल्या दर्जाच्या मानसिक उपचाराची गरज आहे.खर्च वाटल्यास आम्ही करू अस त्यांनी म्हंटल.

पटोलेंना मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती करण्याची गरज- बावनकुळे

दरम्यान, नाना पटोले यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनीही समाचार घेतला. नाना पटोलेंना पंतप्रधानांबद्दल बोलताना लाज वाटत नाही. जगात क्रमांक एकचे पंतप्रधान त्यांच्याबाबत हे बोलत आहेत. हा वेडा झालेला माणूस आहे. त्याला नागपूरच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती करण्याची गरज आहे. संपूर्ण काँग्रेस पार्टी संपवल्याशिवाय ते राहणार नाही. नाना पटोले यांना आम्ही सोडणार नाही, असा इशारा बावनकुळे यांनी दिला आहे.