Friday, December 26, 2025
Home Blog Page 2892

सातारा जिल्ह्यात आजपासून 3833 शाळांची आणि महाविद्यालयांची वाजणार पुन्हा घंटा

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या काही दिवसांपासून बंद असलेली पहिली ते बारावीचे वर्ग आजपासून सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील सुमारे 3 हजार 833 शाळा आणि महाविद्यालयांची घंटा आजपासून पुन्हा एकदा वाचणार आहे. शाळा पुन्हा सुरू होणार असल्याने विद्यार्थी वर्गात आनंदाचे वातावरण पहायला मिळत आहे.

राज्य सरकाच्यावतीने सोमवारपासून राज्यातील शाळा सुरु करण्याचा नितीन नुकताच घेण्यात आला. त्यानुसार आजपासून शाळांना सुरुवात होत आहे. सातारा जिल्ह्यातील सुमारे 3 हजार 833 शाळा आणि महाविद्यालयांना आजपासून सुरुवात होणार असल्याने शिक्षण विभागाच्यावतीने तशी तयारीही करण्यात आली आहे.

ग्रामीण तसेच शहरी भागातील शाळांना सुरुवात होत असल्याने काही ठिकाणी शिक्षकांना ऑनलाईन शिकवण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्यात यावे अशी मागणी पालकांमधून होत होती. ज्या भागात कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त नाही अशा भागातील शाळा सुरू करण्याबाबत सातत्याने मागणी होत होती. त्यानुसार आजपासून शाळांना सुरुवात करण्यात अली आहे.

दरम्यान सातारा जिल्ह्यातील 2 हजार 691 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तसेच 1 जार 142 इतर सर्व नगर पालिका आणि खासगी शाळा अशा आहेत. अशा जिल्यातील एकूण 3 हजार 833 शाळा आणि महाविद्यालयांची घंटा आज वाजणार आहे.

Stock Market : भारतीय बाजारांची कमकुवत सुरुवात, RIL, ICICI बँक, येस बँक फोकसमध्ये

Recession

नवी दिल्ली । आठवड्याच्या पहिल्या ट्रेडिंगच्या दिवशी सोमवारी भारतीय बाजारांची कमकुवत सुरुवात झाली. सेन्सेक्स 245.19 अंकांनी किंवा 0.42 टक्क्यांनी घसरून 58,791.99 वर ट्रेड करत आहे. दुसरीकडे, निफ्टी 58.70 अंकांच्या किंवा 0.33 टक्क्यांच्या घसरणीसह 17,558.45 च्या पातळीवर दिसत आहे.

21 जानेवारी रोजी विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारात 3,148.58 कोटी रुपयांची विक्री केली. त्याच वेळी, या दिवशी देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी 269.36 कोटी रुपयांची खरेदी केली.

NSE वर F&O बंदी अंतर्गत येणारे स्टॉक
24 जानेवारी रोजी, 5 स्टॉक्स NSE वर F&O बंदी अंतर्गत आहेत. यामध्ये भेल, एस्कॉर्ट्स, इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स, व्होडाफोन आयडिया आणि नाल्को यांच्या नावांचा समावेश आहे. जर सिक्योरिटीजच्या पोझिशन्सने त्यांच्या मार्केट वाइड पोझिशन मर्यादा ओलांडल्या तर F&O विभागामध्ये समाविष्ट असलेले स्टॉक्स बंदी असलेल्या श्रेणीमध्ये ठेवले जातात.

जागतिक बाजारपेठ
जागतिक बाजारातून मिश्रित सिग्नल येत आहेत. आशियाची सुरुवात खराब झाली आहे. SGX NIFTY वर 125 अंकांचा दबाव दिसत आहे मात्र DOW FUTURES खालच्या पातळीपासून 200 अंकांनी सुधारला आहे. फेड व्याजदर वाढवण्याच्या भीतीने शुक्रवारी अमेरिकन बाजार घसरले. NASDAQ सुमारे 3 टक्क्यांनी घसरला होता तर DOW 450 अंकांनी घसरला होता.

निकाल
एक्सिस बँक, लार्सन अँड टुब्रो, मॅरिको, सिप्ला, फेडरल बँक, मारुती सुझुकी इंडिया, डॉ. रेड्डीज लॅब, कोटक महिंद्रा बँक, पंजाब नॅशनल बँक आणि भेल यांचे निकाल या आठवड्यात जाहीर होणार आहेत. याशिवाय कॅनरा बँक, एलआयसी हाउसिंग फायनान्स, आरबीएल बँक, वोक्हार्ट, भारत इलेक्ट्रॉनिक्स, सेंट्रल बँक, डीबी कॉर्प या कंपन्याही रांगेत आहेत.

RELIANCE ने तिसऱ्या तिमाहीत उत्कृष्ट रिझल्ट पोस्ट केले. कंपनीचा RVENUE 52% पेक्षा जास्त वाढून 2 लाख 9 हजार कोटी रुपये झाला आहे, तर नफा 38% ने वाढून 20539 कोटी रुपये झाला आहे. मार्जिनमध्येही सुधारणा झाली आहे. सर्व उभ्या भागात चांगली वाढ दिसून आली आहे. Jio च्या ARPU मध्ये वाढ झाली आहे.

किरण माने हे उत्तम वक्ता, त्यांनी राजकारणात प्रवेश करावा

Kiran Mane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विविध राजकीय आणि सामजिक विषयांवर प्रखर भूमिका घेणारे अभिनेते किरण माने यांना स्टार प्रवाह वरील मुलगी झाली हो मालिकेतुन हकालपट्टी करण्यात आली. आपण घेत असलेल्या राजकीय भूमिकांमुळेच आपल्याला मालिकेतून काढण्यात आल्याचा आरोप किरण माने यांनी केल्यानंतर राज्यात राजकारण तापलं. याच पार्श्वभूमीवर मराठी अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या दिपाली सय्यद याना विचारले असता त्यांनी किरण माने यांना राजकारण प्रवेश करण्याचा सल्ला दिला आहे.

एखाद्या व्यक्ती ने कोणती भूमिका घेतली म्हणून त्यांना मालिकेतून काढून टाकने आणि चुकीच्या बातम्या बाहेर पसरवणे हे पूर्णपणे चुकीचे आहे. मुळात किरण माने हे उत्तम वक्ता आहेत. आपले मुद्दे मांडण्याची कला त्यांना अवगत आहे, त्यामुळे त्यांनी राजकारणात यावे असे दिपाली सय्यद यांनी म्हंटल.

दरम्यान, मालिकेतून बाहेर काढल्यानंतर किरण माने यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. शरद पवार साहेब आपल्याला न्याय देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. दरम्यान, काँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने किरण माने यांना पाठिंबा दिला आहे.

ईडी, सीबीआय भाजपची चिलखते, ती काढून समोर या, आम्हीही लढायला तयार – संजय राऊत

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल संवाद साधत भाजपवर हल्लाबोल केला. यानंतर आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला. “आमची आम्हाला ताकद माहिती आहे. आमचा आत्मविश्वास हाच आम्हाला पुढे घेऊन जातो. आमच्याशी लढाल तर त्याचा परिणाम भोगावा लागेल. ईडी, सीबीआय हि भाजपची चलखतं आहेत. हिंमत असेल तर ती काढून मैदानात यावे. नाही लोळवले तर नाव सांगणार नाही. ईडी, सीबीय काहीही असो आम्ही लढायला आणि मरायला तयार आहोत,” असा इशारा राऊत यांनी दिला आहे.

संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, काल शिवसेना प्रमुख यांनी म्हंटले कि दिल्ली काबीज करायची आहे. आम्हाला आमच्या पक्षाचा विस्तार करायचा आहे. त्यासाठी आम्ही प्रत्येक राज्याची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपमध्ये काम झालं की नेत्याला फेकून दिलं जाते. राजकारणात गरज संपली की दूर केलं जाते. लक्ष्मीकांत पारसेकर, पर्रिकर, एकनाथ खडसे यांचं काय झाले? मुंडे परिवारासोबत काय झालं. संपूर्ण देशात भाजपत असंच केलं जातं.

भाजपसोबत आम्ही 25 वर्षे काढली. बाबरीनंतर उत्तर भारतात आमची लहर होती. याच काळात आम्ही उत्तर प्रदेश, हरियाणा, बिहार, पंजाब तसेच जम्मूपर्यंत आम्ही लढलो असतो तर आमचा पंतप्रधान असता. बाळासाहेब ठाकरे यांचे मन मोठे होते. देशात एक हिंदुत्वावादी पक्ष वाढत असेल तर ठीक आहे, असे बाळासाहेब यांचा विचार होता, असे राऊत यांनी यावेळी म्हंटले.

राज्यात मुघल पुन्हा कबरीतून अवतारले; अतुल भातखळकरांची मुख्यमंत्र्यांवर टीका

Atul Bhatkhalkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी “दिल्ली काबीज करण्याचं स्वप्न शिवसेनाप्रमुखांनी पाहिले,” आपण दिल्ली काबीज करु’ असे म्हंटले. तसेच आपले 25 वर्षे युतीत सडली, या मतावर मी ठाम आहे, असे ठाकरे यांनी म्हंटले. त्याच्या या वक्तव्यावरून भाजप नेते अतुल भातखळकर यांनी” मुख्यमंत्र्यांच्या सरकारमध्ये साकारतायत वीर टिपू उद्याने. ठाकरे सरकारच्या राज्यात मुघल कबरीतून पुन्हा अवतरलेत.’ असे ट्विट करीत मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.

अतुल भातखळकर यांनी ट्विट करीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याच्यावर निशाणा साधला आहे. “ज्वलंत हिंदुत्ववादी मुख्यमंत्र्यांच्या सरकारमध्ये साकारतायत वीर टिपू उद्याने. यांच्या बोगस बेगडी विचारधारेचे असे खंडीभर पुरावे देता येतील. ठाकरे सरकारच्या राज्यात मुघल कबरीतून पुन्हा अवतरलेत, असे ट्विटमध्ये भातखळकर यांनी म्हंटले आहे.

भातखळकर यांनी मुख्यमंत्री ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर देताना एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये एका क्रीडासंकुलाची स्वागत कमानीवर विर टिपू सुलतान क्रीडासंकुलाचे काम पालकमंत्री अस्मल शेख यांच्या निधीतून झाल्याचा उल्लेख आहे. ‘ज्वलंत हिंदुत्ववादी मुख्यमंत्र्यांच्या सरकारमध्ये साकारतायत वीर टिपू उद्याने. यांच्या बोगस बेगडी विचारधारेचे असे खंडीभर पुरावे देता येतील. ठाकरे सरकारच्या राज्यात मुघल कबरीतून पुन्हा अवतरलेत.’ असे कॅप्शन भातखळकर यांनी फोटोवर दिले आहे.

आदित्य ठाकरेंवरही साधला निशाणा

भातखळकर यांनी ट्विट करीत पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला आहार. त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “शाळा सुरू ही करायच्या आणि मुलांना उपस्थितीचे बंधन नाही असे परस्पर विरोधी विधान पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी करायचे. महाविकास आघाडी सरकारच्या राज्यात प्रत्येक मंत्री स्वतःला मुख्यमंत्री समजतो आणि मुख्यमंत्री घरात बसून दिल्लीवर स्वारी करणार आहेत, असा टोलाही भातखळकर यांनी लगावला.

अरे बापरे ! शहराचा पॉझिटिव्हीटी रेट 48 टक्के

Corona

औरंगाबाद – कोरोनाची तीसरी लाट दररोज नवीन विक्रम प्रस्थापित करत आहे. काल औरंगाबाद शहराचा पॉझिटिव्हीटी रेट 48.27 टक्क्यांवर पोहोचला आहे. दिवसभरात तब्बल 779 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पॉझिटिव्हिटी रेट 44 टक्क्यांपर्यंत पोहोचला होता. आता 100 नागरिकांची तपासणी केली, तर किमान 49 जण बाधित आढळून येत आहेत. वाढलेला संसर्ग लक्षात घेता प्रशासनाची झोप उडाली आहे. शहरात आणखी काही कडक निर्बंध लावावेत का असा विचार प्रशासनाने सुरू केला आहे.

पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत ज्या पद्धतीने रुग्णांना त्रास होत होता, तसा आता नाही. त्यामुळे आयसीएमआरच्या गाईडलाइन्सनुसार 95 टक्के रुग्णांना होम आयसोलेशनची परवानगी देण्यात आली आहे. मनपाकडून तपासण्या बंद करण्यात आल्या आहेत. जे नागरिक स्वतः हून येत आहेत, त्यांचीच तपासणी केली जात आहे. काल दिवसभरात 1618 जणांची कोरोना टेस्ट केली. त्यातील 779 जण बाधित असल्याचे सायंकाळी समोर आले आहे. शहरात सक्रीय रुग्णांची संख्या 5394 आहे. त्यातील 5017 रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत.

शिवसेनेची 25 वर्ष युतीत सडली; उद्धव ठाकरेंचा पुनरुच्चार

uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा भाजपवर टीका केली. भाजपसोबत 25 वर्षे युतीत सडली असे म्हणत त्यांनी भाजपवर प्रहार केला.

उद्धव ठाकरे म्हणाले, शिवसेनेची गेली 25 वर्ष भाजप सोबत युती होती. आपली 25 वर्ष युतीमध्ये सडली. माझं आजही तेच मत आहे. मी माझ्या मतावर ठाम आहे. असे उद्धव ठाकरे यांनी म्हंटल. बाळासाहेब म्हणायचे की राजकारण हे गजकर्णासारखं आहे, जेवढं खाजवावं तेवढी अधिक खाज येतं. तसे हे सगळे राजकारणातील गजकर्णी आहेत असा टोलाही त्यांनी लगावला.

ते पुढे म्हणाले, मध्यंतरी अमित शहा पुण्यात आले. म्हणाले एकट्यानं लढा. ठिक आहे… आम्ही एकट्यानं लढू.. पण मग तुम्ही तुमच्या अधिकारांचा गैरवापर करायचा नाही. राजकारणात जसं भिडायचंय असतं तसं भिडा, मग होऊन दे सामना.. इडीची पिडा लावायची आणि लढ म्हणायचे, अशांनी आव्हान देण्याची शिवसैनिकाला गरज नाही असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी भाजपचा समाचार घेतला.

गाढवं जस वाघाचे कातडं पांघरतात तस भाजपने हिंदुत्त्वाचं कातडं पांघरले; मुख्यमंत्र्यांचा घणाघात

thackeray fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | वाघाचं कातडं पांघरलेली शेळी असते तस भाजपने हिंदुत्त्वाचं कातडं पांघरले असे म्हणत राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरे यांनी राज्यभरातील शिवसैनिकांशी दृकश्राव्य माध्यमाद्वारे संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपवर घणाघाती हल्ला केला.

उद्धव ठाकरे म्हणाले, गाढवं, किंवा काही जनावरं वाघाचं कातडं पांघरतात, असं म्हणतात. तसंच भाजपने हिंदुत्वाचं कातडं पांघरलेलंय. आम्ही हिंदुत्व नाही सोडलेलं. आम्ही हिंदुत्त्वापासून कधीच दूर जाऊ शकत नाही. आम्ही भाजपला सोडलं. भाजप म्हणजे हिंदुत्व नाही. भाजपचे हिंदुत्व हे सोयीचे आहे.

सत्ता पाहिजे म्हणून इकडे हिंदुत्ववाद्यांशी युती, सत्ता हवी म्हणून मेहबुबा मुफ्ती यांच्याशी युत्ती, सत्ता पाहिजे म्हणून संघमुक्त भारत म्हणणाऱ्या नितीशकुमारांशी युती, सत्ता पाहिजे म्हणून मोदी हटाव या वाक्याला साथ देणाऱ्या चंद्रबाबूंशी युती, हे आपलं हिंदुत्व नाही”, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केलाय.

आज आपण ग्प्प बसलो तर देशात गुलामगिरी सुरू होईल. भाजपची आणीबाणी मोडायची तर शिवसेनेसारखा पक्ष दिल्लीत हवा, असे ठाकरे म्हणाले. त्यासाठी इतर राज्यांत शिवसेना वाढवण्याबरोबरच बॅँकांसारख्या सहकारी संस्थांपासून ते स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा, लोकसभेपर्यंतची प्रत्येक निवडणूक ही जिंकायचीच या जिद्दीने लढवावी लागेल असे उद्धव ठाकरे यांनी म्हंटल.

“ज्याची बायको पळून जाते, त्याचे नाव मोदी ठरते,”; पटोलेंचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काही दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर काल पुन्हा त्यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. “ज्याची बायको पळून जाते, त्याचे नाव मोदी ठरते,” असे आक्षेपार्ह वक्तव्य पटोले यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजप नेत्यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रविवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी “ज्याची बायको पळून जाते, त्याचे नाव मोदी ठरते,” असे आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्याच्या वक्तव्यानंतर भाजप नेत्यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला.

दरम्यान रात्री भाजपचे आमदार आणि राज्याचे माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात पटोले यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याविरोधात ‘जोडे मारो’ आंदोलन केले. त्यांच्याविरोधात तातडीने कारवाई न झाल्यास राज्यभरात भाजप कार्यकर्त्यांकडून पुन्हा एकदा तीव्र निषेध आंदोलने करण्यात येणार असल्याचा इशारा बावनकुळे यांनी दिला.

त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती करण्याची गरज – बावनकुळे

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान मोदींबाबतवादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी आक्रमक पवित्रा घेतला. यावेळी ते म्हणाले की, पटोलेंना पंतप्रधानांबद्दल बोलताना लाज वाटत नाही. जगात क्रमांक एकचे पंतप्रधान त्यांच्याबाबत हे बोलत आहेत. हा वेडा झालेला माणूस आहे. त्याला नागपूरच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती करण्याची गरज आहे. संपूर्ण काँग्रेस पार्टी संपवल्याशिवाय ते राहणार नाही. नाना पटोले यांना आम्ही सोडणार नाही, असा इशारा बावनकुळे यांनी दिला आहे.

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शाळा सुरू करण्याचा आज निर्णय

औरंगाबाद – जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने पहिली ते बारावीचे वर्ग सुरू करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडे परवानगी मागितली आहे. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आज होणाऱ्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठकीत तास फोर्स निर्णय घेईल, असे शिक्षणाधिकारी एम.के. देशमुख यांनी सांगितले.

जिल्ह्यातील 4 हजार 602 शाळा महाविद्यालयात पहिली ते बारावीच्या वर्ग चालवले जातात. त्यापैकी 3 हजार 629 शाळा ग्रामीण भागात आहेत. ग्रामीण भागातील 1347 गावांपैकी 169 गावांमध्ये सध्या कोरोनाचे रुग्ण आहेत. त्यापैकी औरंगाबाद, गंगापूर तालुक्यात शहरालगतच्या गावात कोरूना संक्रमण अधिक असून 1127 गावे वाडी-वस्तीवर कोरोनाचा शिरकाव झालेला नाही. आज टास्क फोर्स यावर काय निर्णय घेतो याकडे विद्यार्थी, पालकांसह शिक्षकांचे लक्ष लागले आहे.

शहरातील वर्ग आजपासून सुरू –
लसीचा किमान एक डोस घेतलेल्या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शहरातील शाळांमध्ये प्रत्यक्ष वर्ग आजपासून बनवण्यासाठी मनपा प्रशासकांनी परवानगी दिली आहे. तोरणाच्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी शाळांनी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.