Saturday, December 27, 2025
Home Blog Page 2916

Budget 2022- पगारदार वर्गाला यंदाच्या बजटमध्ये सरकार देऊ शकते गिफ्ट, त्याविषयी जाणून घ्या

नवी दिल्ली । 1 फेब्रुवारी 2022 रोजी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाकडून पगारदार वर्गाच्या करदात्यांच्या अनेक अपेक्षा आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या काळात अर्थसंकल्प 2022 च्या घोषणा करदात्यांना मोठा दिलासा देऊ शकतात. पगारदार वर्गातील करदात्यांना आगामी केंद्रीय अर्थसंकल्प 2022-23 पासून इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये बदल आणि सरचार्ज कपातीची अपेक्षा आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीला सुरू होणार असून अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करतील.

80C अंतर्गत गुंतवणुकीवर जास्त कर सूट
पगारदार वर्गाबद्दल बोलताना, त्यांना आशा आहे की या अर्थसंकल्पात, आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत गुंतवणुकीवर जास्त टॅक्स सूट जाहीर केली जाऊ शकते. अनेक दिवसांपासून याची मागणी होत असली तरी यंदाच्या अर्थसंकल्पात याबाबत काही मोठी घोषणा होते का, हे पाहावे लागेल.

नोकरदारांसाठी टॅक्स वाचवण्यासाठी कलम 80C हा सर्वात महत्त्वाचा विभाग आहे. या कलमांतर्गत सूट मर्यादा वाढवली म्हणजे अधिकाधिक लोकांना दिलासा मिळावा. सध्या कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपये सूट आहे.

याशिवाय होम लोनच्या व्याजावरील कर कपातीची मर्यादा अर्थसंकल्पात 2 लाखांवरून 5 लाखांपर्यंत वाढवणे अपेक्षित आहे. त्याच वेळी, 1.50 लाख रुपयांपर्यंतच्या मूळ रकमेवर 80C मध्ये वेगळी सूट असावी.

इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये बदल अपेक्षित?
गेल्या अनेक वर्षांपासून इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये वाढ करण्यात आली नसल्याने पगारदार वर्ग अर्थमंत्र्यांकडे बदलाची मागणी करत आहे. मात्र, आगामी अर्थसंकल्पात इन्कम टॅक्स रेटमध्ये कोणताही बदल जाहीर केला जाणार नाही. आगामी अर्थसंकल्पात सरकार नवीन आणि जुनी टक्स सिटीम लागू ठेवू शकते.

… तर भाजप नेत्यांच्या विरोधातही राज्यभर गुन्हे दाखल करणार ; काँग्रेस आक्रमक

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे सांगत भाजपने आक्रमक पावित्रा घेतला आहे. दरम्यान भाजप नेत्यांनी पटोलेंना अटक करण्याचीही मागणी केली आहे. “पटोले यांच्यावर टीका करताना भाजप नेते, माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांनीही आक्षेपार्ह वक्तव्ये केली आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात काँग्रेस नेते आक्रमक झाले आहेत. भाजप नेते अनिल बोंडे याच्या विरोधात राज्यभर गुन्हे दाखल करणार आहोत, असा इशारा कराड येथे काँग्रेसचे ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी आज पत्रकार परिषदेत दिला.

कराड येथे काँग्रेसचे ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी पत्रकार परिषद घेत माध्यमाशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीका करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी असे नाव वापरलेले नाही. तरीही पटोलेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल बोलले असे सांगत त्यांना बदनाम करण्यासाठी भाजपने अर्थाचा अनर्थ काढला आहे.

भाजपने ओबीसींचे आरक्षण पुर्णपणे संपवले आहे. भाजपचे राम कदम, आशीश शेलार यांनी महिलांच्या बाबतीत काय वक्तव्य केले हेही बघणे महत्वाचे आहे. त्यातुन भाजपची संस्कृती दिसुन येते. देशाची संपती विकायला लागले आहेत. ते देश विकतील अशी स्थिती आहे. त्याकडे दुर्लक्ष व्हावे यासाठी भाजपने हा नवीन मुद्दा उपस्थित केला आहे. त्याचा कॉंग्रेस ओबीसी विभागाकडुन निषेध केला जात आहे.

भाजपचे नेते अनिल बोंडे यांनी पटोले यांच्या विरोधात भयानक वक्तव्ये केली आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात राज्यातील सर्व पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करुन त्यांच्या अटकेची मागणी करत आहोत. ओबीसी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले भाजपाला भारी पडत असल्यामुळे त्यांच्या पायाखालील जमीन सरकली. बोंडे यांनी तोंड आवरावे. आम्हीही त्यांना जशास तसे उत्तर द्यायला तयार आहोत, असा इशारा यावेळी माळी यांनी दिला.

ओमिक्रॉनच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर सरकारचा मोठा निर्णय, आंतरराष्ट्रीय फ्लाइट्सवरील बंदी 28 फेब्रुवारीपर्यंत कायम राहणार

नवी दिल्ली । जगभरात ओमिक्रॉनची सतत वाढत असलेली प्रकरणे लक्षात घेता, आंतरराष्ट्रीय फ्लाइट्सवरील बंदी आणखी वाढवण्यात आली आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालकांनी (DGCA) एका परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. त्यात म्हटले आहे की, कोविड-19 च्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर आता 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत आंतरराष्ट्रीय व्यावसायिक उड्डाण सेवांवर बंदी घालण्यात आली आहे.

कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता बंदी पुन्हा वाढवण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, त्याचा आंतरराष्ट्रीय कार्गो फ्लाइट्सवर परिणाम होणार नाही. DGCA ने मान्यता दिलेल्या फ्लाइटवरही ही बंदी लागू होणार नाही. यासोबतच एअर बबल अंतर्गत फ्लाइट्सवरही बंदी घालण्यात येणार नाही. यापूर्वी DGCA ने 31 जानेवारी 2022 पर्यंत आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता.

मार्च 2020 पासून फ्लाइट्स बंद आहेत
साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर, 23 मार्च 2020 पासून भारतातील सर्व आंतरराष्ट्रीय फ्लाइट्स बंद आहेत. मात्र, गेल्या जुलै 2020 पासून, सुमारे 28 देशांसोबत एअर बबल करारांतर्गत विशेष आंतरराष्ट्रीय पॅसेंजर फ्लाइट्स सुरू आहेत. कोरोना पूर्णपणे आटोक्यात येईपर्यंत काटेकोरपणे पालन करावे लागेल, असे सरकारचे म्हणणे आहे.

20,000 कोटींचे नुकसान होऊ शकते
महामारीची तिसरी लाट आणि विमान इंधनाच्या (ATF) किमतीत झपाट्याने वाढ झाल्याने चालू आर्थिक वर्षात विमान कंपन्यांचा तोटा 20,000 कोटींपर्यंत वाढू शकतो. क्रिसिलच्या मते, एअरलाइन्स चालू आर्थिक वर्षात त्यांच्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या 20,000 कोटी रुपयांच्या तोट्याकडे जात आहेत. गेल्या आर्थिक वर्षातील 13,853 कोटी रुपयांच्या तुलनेत हा तोटा 44 टक्क्यांनी जास्त आहे. इंडिगो, स्पाइसजेट आणि एअर इंडियावर आधारित रिपोर्ट, जे मिळून 75 टक्के देशांतर्गत उड्डाणे करतात, असा इशारा दिला आहे की हा तोटा 2022-23 पर्यंत एअरलाइन्सच्या रिकव्हरीस उशीर करेल.

देशात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत
गेल्या 24 तासांत देशात कोरोना विषाणूचे 282970 नवीन रुग्ण आढळले आहेत. 441 लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएन्टची आतापर्यंत 8,961 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. देशातील दैनिक पॉझिटिव्हिटी रेट 15.13 टक्के आहे. ऍक्टिव्ह प्रकरणांची संख्या 1831000 पर्यंत वाढली आहे, जी 232 दिवसांतील सर्वाधिक आहे.

‘या’ कारणामुळे शिरसोली येथील 22 वर्षीय विवाहितेची गळफास घेवून आत्महत्या

prajkta sucide

जळगाव : हॅलो महाराष्ट्र – जळगाव तालुक्यातील शिरसोली या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये 22 वर्षीय विवाहितेने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तिने आत्महत्या केली नसून सासरच्या मंडळींनी खून केल्याचा आरोप माहेरच्या नातेवाईकांकडून करण्यात आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

प्राजक्ता उर्फ कोमल अजय बारी असे आत्महत्या करणाऱ्या विवाहित महिलेचे नाव आहे. मृत प्राजक्ता अजय बारी ह्या पती अजय अशोक बारी यांच्यासोबत शिरसोली या ठिकाणी राहत होत्या. अजय बारी हे खासगी वाहनावर चालक म्हणून नोकरी करतात. त्यामुळे ते आठवड्याचे तीन ते चार दिवस बाहेरगावी राहतात. मृत प्राजक्तासोबत तिचे सासू,सासरे, दीर आणि त्यांची बायको राहत होते.

मृत प्राजक्ताने राहत्या घराच्या वरच्या मजल्यावर मध्यरात्री साडीच्या सहाय्य्यने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तिने कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे अजून समजू शकले नाही. नातेवाईकांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले. प्राजक्ता हिने आत्महत्या केलेली नसून तीचा खून करण्यात आला असल्याचा आरोप प्राजक्ताचा मावसभाऊ प्रल्हाद सुकलाल फुसे यांनी केला आहे. यामुळे विवाहितेचे पती आणि सासरे यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी प्राजक्ताच्या माहेरच्यांकडून करण्यात आली आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

SBI ला मिळणार 1000 कोटी रुपये, IREDA मध्ये 1500 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यास मान्यता

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांना मंजुरी देण्यात आली. मंत्रिमंडळाने रिन्युअल एनर्जी सेक्टरच्या विकासासाठी इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट असोसिएशन लिमिटेड (IREDA) ला 1500 कोटी रुपयांच्या भांडवलाला मंजुरी दिली. सरकारने स्टेट बँक ऑफ इंडियाला (SBI) व्याजावरील व्याजाच्या बदल्यात 1,000 कोटी रुपये देण्याची परवानगी दिली आहे. राष्ट्रीय सफाई कर्मचाऱ्यांच्या आयोगाचा कार्यकाळ मंत्रिमंडळाने 3 वर्षांसाठी वाढवला आहे.

मंत्रिमंडळाच्या बैठकीबाबत माहिती देताना केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की,” केंद्रीय मंत्रिमंडळाने विशिष्ट कर्ज खात्यांमध्ये कर्जदारांना सहा महिन्यांसाठी चक्रवाढ व्याज आणि साधे व्याज यांच्यातील फरकाची सानुग्रह अनुदान योजना मंजूर केली आहे. सरकारने स्टेट बँक ऑफ इंडियाला (SBI) व्याजावरील व्याजाच्या बदल्यात 1,000 कोटी रुपये देण्याची परवानगी दिली आहे.

भांडवल ओतण्याचा फायदा होईल
केंद्रीय मंत्री म्हणाले की,” आमच्या सरकारने रिन्युअल एनर्जीवर खूप लक्ष केंद्रित केले आहे. 500 ​​GW लक्ष्य केले आणि पूर्ण केले. रिन्युअल एनर्जीची वीज निर्मिती क्षमता वाढवण्यासोबतच, सरकारने आपली आर्थिक क्षमता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या क्षेत्राचा 8,800 कोटी रुपयांचा पोर्टफोलिओ 6 वर्षांत 28,000 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. रिन्युअल एनर्जी क्षेत्राची कर्ज देण्याची क्षमता वाढवण्यासाठी सरकारने त्याला भांडवल देण्यास मान्यता दिली आहे. आता हे क्षेत्र 12,000 कोटी रुपयांपर्यंत कर्ज देऊ शकणार आहे. यामुळे क्षमता 3500 मेगावॅटपर्यंत वाढवण्यासाठी वित्तपुरवठा उपलब्ध होणार आहे. रिन्युअल एनर्जी क्षेत्रात भांडवल ओतण्यामुळे दरवर्षी 10,200 रोजगार निर्माण होतील आणि CO2 उत्सर्जन दरवर्षी सुमारे 7.49 कोटी टन कमी होईल.

व्याजावर किती व्याज दिले होते
कोरोनाच्या काळात सरकारने लोनवर मोरॅटोरियम 6 महिन्यांसाठी लागू केली होती. या अंतर्गत मार्च 2020 ते ऑगस्ट 2020 पर्यंत कर्ज न भरल्यास कोणत्याही प्रकारचा दंड किंवा NPA करण्यास मनाई करण्यात आली होती. यानंतर चक्रवाढ व्याजाचा प्रश्न निर्माण झाला. सर्वोच्च न्यायालयाने बँकांना व्याजावर व्याज आकारता येणार नाही, असे आदेश दिले होते. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय सरकारनेही मान्य केला असून व्याजाची रक्कम सरकार भरणार असल्याचे सरकारने सांगितले होते. यासाठी सरकारने 5500 कोटी रुपयांची तरतूद केली होती, ज्यामध्ये सरकार व्याज न घेण्याच्या बदल्यात ही रक्कम बँकांना देईल, असे सांगण्यात आले होते.

खानापूर नगरपंचायतीत भाजपला भोपळा; सत्ताधारी शिवसेना- काँग्रेसची सरशी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील नगरपंचायत निवडणूकांचे निकाल जाहीर झाले असून खानापूर नगरपंचायतीत गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या भाजपला एकही जागा मिळाली नाही. पडळकरांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती तरीही भाजपच्या हाती मात्र भोपळा लागला आहे.

खानापूर ग्रामपंचायतीची नगरपालिका म्हणून ही दुसरी निवडणूक गेल्या वेळेप्रमाणे तिरंगीच झाली. यामध्ये सत्ताधारी शिवसेना – काँग्रेसच्या पॅनेलने बाजी मारली. सत्ताधारी शिवसेना-काँग्रेसला 9 तर विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित जनता आघाडीला 7 जागा मिळाल्या असून, त्यांचा एक समर्थक अपक्ष निवडून आला. भाजपाने या निवडणुकीत भोपळाही फोडता आला नाही.

एकूण 17 जागांपैकी सत्ताधारी शिवसेना-कॉंग्रेसच्या पॅनेलचे नेतृत्व आमदार अनिल बाबर, सुहास शिंदे, पांडुरंग डोंगरे यांनी केले. यावेळी सत्ताधाऱ्यांना ९ जागा म्हणजे काठावरील बहुमत मिळाले आहे. आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निकाल महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

धक्कादायक ! आई घरी नसल्याचे पाहून घरमालकाचे 13 वर्षीय मुलीशी गैरवर्तन

औरंगाबाद – राज्यात तसेच औरंगाबादेत मागील काही दिवसांपासून महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसत आहे. अशातच अल्पवयीन मुलीची आई संध्याकाळी कामानिमित्त बाहेर गेलेली पाहून घरमालकाने मुलीशी गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार औरंगाबादेत घडला. मात्र घाबरलेल्या मुलीने आरडाओरडा केला. त्यामुळे शेजारील लोक तिच्याकडे धावले. त्यानंतर ही सर्व घटना उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी घरमालकाला बेड्या ठोकल्या. भरत गिरीश मेहता (30), असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मेहताचे श्रीकृष्ण नगरात स्वतःचे घर आहे. त्याच्या घरात विविध 8 भाडेकरू राहतात. यापैकीच एक पीडितेचे घर. पीडिता ही तिच्या आईसह किरायाने राहते. 17 जानेवारी रोजी रात्री तिची आई घराबाहेर गेली होती. ही संधी पाहून मेहता मुलीच्या खोलीत गेला आणि त्याने तिच्याशी गैरवर्तन केले. घाबरलेली पीडिता मोठ्याने ओरडली. त्यामुळे शेजारील लोक तिच्या खोलीकडे धावले. हे पाहून आरोपी तिथून निघून गेला. काही वेळाने घरी आलेल्या आईला पीडितेने सर्व हकिगत सांगितली.

सदर धक्कादायक प्रकार पाहून परिसरातील नागरिक प्रचंड संतापले. पीडितेच्या आईने जवाहर पोलीस स्टेशन गाठले आणि तेथे तक्रार दाखल केली. मात्र आरोपीला तत्काळ बेड्या ठोका, अशी मागणी करत जवाहर पोलीस ठाण्याबाहेर शेकडो लोक जमले. वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि जवाहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तत्काळ विनयभंग, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदवला. त्यानंतर अवघ्या तासाभरात आरोपी मेहताला बेड्या ठोकण्यात आल्या.

मस्तवाल सत्ताधाऱ्यांना जनतेने त्यांची जागा दाखवली; प्रभाकर देशमुखांची गोरेंवर टीका

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

दहिवडी नगरपंचायत रणधुमाळीमध्ये अनेकांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जीवाचे रान करून सत्ता काबीज केली. निवडणूक निकालानंतर माजी आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी भाजप नेते तथा आमदार जयकुमार गोरे याच्यावर घणाघाती टीका केली आहे. “मस्तवाल विरोधकांना जनतेने त्यांची जागा दाखवून दिली आहे. निकालानंतर आम्ही म्हणजेच सरकार असा आव आणणाऱ्या लोकांना चांगलीच चपराक मिळाली आहे, अशी टीका देशमुख यांनी नाव न घेता आ. जयकुमार गोरेंवर केली.

दहिवडी नगरपंचायत निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर माजी आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी विजय उमेदवारांचे अभिनंदन केले. त्यानंतर मतदारांचे आभार मानले. यावेळी ते म्हणाले की, राष्ट्रवादीच्या झोळीत सत्ता टाकून दहिवडीकरांनी दाखवलेला विश्वास सार्थ करण्यासाठी आम्ही नेहमी कटीबद्द आहोत. कोणताही विकास न करता स्वतःच्या नावाची प्रौढी मिरवणाऱ्या लोकांना जनतेने त्यांची औकात त्यांना दाखवून दिली.

या निवडणुकीत अनेकांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जीवाचे रान सरकार खऱ्या अर्थाने कोण असते हे त्यांना माहितीच नाही. सरकार ही जनता असते आणि जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. कार्यकर्त्यांनी केलेल्या कष्टाचे चीज झाले. आता निकाल लागला आहे. दहिवडीच्या विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत,असे देशमुख यावेळी म्हणाले.

दहिवडी नगरपंचायत रणधुमाळीमध्ये राष्ट्रवादीला एकूण आठ जागा, भाजपला पाच, शिवसेनेला एकूण तीन जागा तर एका अपक्ष उमेदवारालाही आपलं नशीब आजमावण्यात यश आले आहे. अपक्षाने राष्ट्रवादीला पाठिंबा दिल्याने राष्ट्रवादीच्या एकूण नऊ जागा झाल्या असून नगरपंचायतीवर एकहाती सत्ता आणण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यशस्वी ठरला आहे. तर या ठिकाणी भाजपला मात्र, एकूण ५ जागांवर आपला झेंडा फडकावा लागला.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/459562302323895/?extid=NS-UNK-UNK-UNK-AN_GK0T-GK1C&ref=sharing

दहिवडी नगरपंचायत निवडणुकीत विजयी उमेदवारांच्या जोरावर राष्ट्रवादीने आपल वर्चस्व अबाधित ठेवत विरोधकांना धोबीपछाड केले. तर प्रभाग क्र.६ मधून भाजपचे विद्यमान नगराध्यक्ष धनाजी जाधव यांनी २४९ मतांनी, प्रभाग ७ मधून युवा नेते तेजस पवार यांच्या भावजय उज्वला पवार २९९, प्रभाग ९ मधून अतुल जाधव यांच्या पत्नी नीलम जाधव ३४०, प्रभाग ११ मधून तानाजी अवघडे यांच्या पत्नी राणी अवघडे २४९,प्रभाग १५ मध्ये रुपेश मोरे ४२० मतांनी दणदणीत विजय मिळवला.

SBI च्या ग्राहकांसाठी खुशखबर, आता फसवणूक करून कोणालाही तुमच्या ATM मधून पैसे काढता येणार नाही !!

Cardless Cash Withdrawal

नवी दिल्ली । तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची माहिती आहे. SBI ने आपल्या ग्राहकांसाठी कॅश पैसे काढण्याच्या प्रक्रियेत आणखी एक पाऊल टाकले आहे. हे पाऊल प्रत्यक्षात सुरक्षा (Customer Safety) मजबूत करण्यासाठी आहे. आतापर्यंत एटीएम कार्ड क्लोन करून किंवा अन्य मार्गाने गुंड एटीएममधून पैसे काढत असल्याचे आपण अनेकदा पाहिले आहे. मात्र आता असे होणार नाही.

आता एटीएम मशिनमधून पैसे काढताना तुम्हाला OTP ही टाकावा लागेल. हा OTP तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर मिळेल आणि तुमच्या एटीएम पिननंतर तो टाकणे आवश्यक असेल. जर तुम्ही हा OTP टाकला नाही तर तुम्ही पैसे काढू शकणार नाही. आता समजून घ्या की जर एखाद्याला तुमच्या कार्डमधून पैसे काढायचे असतील तर तो देखील तुमच्या परवानगीशिवाय पैसे काढू शकणार नाही, कारण आता तुमच्या मोबाईल नंबरवर येणारा OTP यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावेल.

स्टेट बँक ऑफ इंडियाने आणलेल्या या फिचरमुळे आता ग्राहकांच्या सुरक्षेसाठी कडक व्यवस्था करण्यात आली आहे. एटीएम वापरणेही आता पूर्वीपेक्षा जास्त सुरक्षित झाले आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने म्हटले आहे की, त्यांच्या ग्राहकांच्या कॅश रक्कम काढण्याबाबत सुरक्षेचा एक नवीन स्तर (लेयर) स्थापित करण्यात आला आहे.

इतर बँकेच्या एटीएमवर OTP आवश्यक नाही
हे फीचर फक्त आणि फक्त SBI ATM मशीनवरच काम करेल. तुम्ही SBI चे ग्राहक असाल आणि इतर कोणत्याही बँकेच्या ATM मधून पैसे काढण्याचा प्रयत्न करत असाल तर हे फीचर काम करणार नाही. याचा अर्थ असा की, तुम्ही इतर कोणत्याही बँकेच्या ATM मधून पैसे काढले तर तुम्हाला OTP टाकण्याची गरज नाही.

हे नवीन फीचर नॅशनल स्विच (NFS) ने विकसित केले आहे. हे देशातील सर्वात मोठे इंटरऑपरेबल एटीएम नेटवर्क आहे. हे देशांतर्गत इंटर -बँक एटीएम ट्रान्सझॅक्शनपैकी 95 टक्क्यांहून जास्त हाताळते.

कसे काम करेल ?
>>सर्व प्रथम तुम्हाला SBI बँकेच्या ATM मध्ये जावे लागेल.
>> पैसे काढण्याची प्रक्रिया आधीसारखीच पूर्ण करा.
>>शेवटी तुमच्या नंबरवर एक OTP येईल.
>> हा OTP मशीनच्या स्क्रीनवरील बॉक्समध्ये टाकावा लागेल.
>> यानंतर तुम्ही पैसे काढू शकाल.

गोव्यात आमच्याशिवाय सरकार बनणार नाही- संजय राऊत

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गोव्यात आम्ही जेवढ्या जागा लढवू त्यातल्या जास्तीत जास्त जागा निवडूण आणू, त्यामुळे गोव्यात आमच्याशिवाय सरकार बनणार नाही, असा विश्वास शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेत गोवा विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना- राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीची घोषणा केली.

गोव्यात आमच्याशिवाय सरकार बनणार नाही याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. आया राम गया राम ही कल्पना आता हरियाणा नंतर गोव्यात दिसत आहे. गोव्यात काय होईल हे सांगता येत नाही इतके घाणेरडे राजकारण सुरु आहे. अशा राजकारणाचा आणि गोव्यातील राजकीय पक्षांचा लोकांना कंटाळा आला असे राऊत यांनी म्हंटल.

शिवसेना कुठून किती जागावर लढणार आणि राष्ट्रवादी गोव्यात कुठून किती जागावर लढणार याबाबत अजूनही सस्पेन्स कायम आहे. याबाबतची यादी उद्या जाहीर करण्यात येईल असे संजय राऊतांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, शिवसेना-राष्ट्रवादीची युती नेमकी किती जागा लढवणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.