Sunday, December 28, 2025
Home Blog Page 2921

क्रांती चौकातील तिरंगा आता 365 दिवस फडकणार

औरंगाबाद – शहरातील क्रांती चौक परिसरात झांशीची राणी उद्यान परिसरात तिरंगा ध्वजस्तंभ उभारण्यात आला आहे. हा स्तंभ 210 फूट उंचीचा असल्याने जोरदार वाऱ्यामुळे ध्वजाचे कापड फाटत आहे. त्यामुळे ठराविक वेळीच ध्वज फडकविला जात होता. पण आता व्यापारी, उद्योजक व सेवाभावी संस्थांनी ध्वजासाठी लागणारा निधी देण्यास सहमती दर्शविल्याने येत्या 26 जानेवारीपासून नियमितपणे म्हणजेच वर्षाचे 365 दिवस ध्वज फडकत राहणार आहे.

क्रांती चौक परिसरात झांशीची राणी पुतळा परिसरात ध्वजस्तंभ उभारण्यात आला आहे. या ध्वजस्तंभाची उंची 210 फूट एवढी आहे. याठिकाणी आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. त्यामुळे रात्रीच्यावेळी अनेक नागरिक याठिकाणी जमून सेल्फी घेतात. या ध्वजस्तंभाच्या देखभाल दुरुस्तीचे काम सीएमआयए उद्योजक संघटनेद्वारे केले जात होते. दरवर्षी देखभाल दुरुस्तीवर किमान एक लाखापेक्षा तर ध्वजासाठी 90 हजार रुपयांचा खर्च येतो. स्तंभ उभारताना याठिकाणी तिरंगा वर्षातील बाराही महिने फडकविण्याचे नियोजन होते. मात्र, स्तंभाची उंची अधिक असल्याने हवेचा वेग जास्त आहे. त्यामुळे ध्वजाचे कापड वारंवार फाटत आहे. त्यामुळे सीएमआयएने जिल्हा प्रशासनाच्या परवानगीने हा ध्वज वर्षातून पाच वेळा म्हणजेच 26 जानेवारी, 1 मे, 15 ऑगस्ट, 17 सप्टेंबर व दिवाळी सण अशा पाच महत्त्वाच्या दिवशीच ध्वज फडकविण्याचा निर्णय घेतला.

मात्र, आता वर्षभर हा ध्वज फडकविण्याचा निर्णय जिल्हाधिकारी चव्हाण यांनी घेतला आहे. यासंदर्भात सोमवारी सायंकाळी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ध्वज समिती व उद्योजक, व्यापारी, सेवाभावी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यात उद्योजकांना ध्वजासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. त्यावर उपस्थितांनी सहमती दर्शविली. त्यानुसार ध्वजासाठी निधी दिला जाणार आहे. त्यानुसार येत्या 26 जानेवारीपासून वर्षभर हा ध्वज फडकत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

मुंबईत गे सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, तीन आरोपींना अटक

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मुंबईच्या मालवणी पोलिसांनी मालवणी परिसरात गे सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या परिसरात गे सेक्स रॅकेट चालवणाऱ्या आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. हि टोळी एका ऑनलाईन डेटिंग गे अ‍ॅपद्वारे हे सेक्स रॅकेट चालवत होते. आरोपी ग्रिंडर हा मोबाईल अ‍ॅपद्वारे समलिंगी समाजाच्या तरुणांशी संपर्क साधायचे. यानंतर आरोपी त्या तरुणांना त्यांच्या मालवणी परिसरातील कार्यालयात किंवा घरी सशक्त तरुण पुरविण्याची हमी द्यायचे. अखेर आज गे सेक्स रॅकेट चालवणाऱ्या तीन आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. इरफान फुरकान खान, अहमद फारुखी शेख, इम्रान शफीख शेख असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणातील आणखी दोन आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

अशाप्रकारे झाला या रॅकेटचा खुलासा
आरोपींनी गे डेटिंग अ‍ॅपद्वारे अकाउंटट म्हणून एका कंपनीत काम करणाऱ्या 23 वर्षीय तरुणाला आपल्या जाळ्यात अडकवले. पीडित तरुणाने गे डेटिंग अ‍ॅपवर आपला इंटरेस्ट दाखवला होता. आरोपींनी या तरुणाला एका तासाचे 1 हजार रुपये लागतील, असे सांगितले होते. तशी डीलसुद्धा झाली होती. ठरल्याप्रमाणे पीडित तरुण हा आरोपींच्या मालवणी येथील कार्यालयात गेला. पीडित तरुण हा रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास मालवणी येथील एका मैदानाजवळ पोहोचला होता. डीलमध्ये ठरल्याप्रमाणे आरोपी इरफान खान हा पीडित तरुणासोबत शरीरसंबंध ठेवणार होता. पण खान हा कामात व्यस्त होता. त्यामुळे त्याने त्याच्या दुसऱ्या सहकाऱ्याला सांगितले पण तोदेखील कामात व्यस्त होता. त्यामुळे खानने त्याच्या इतर दोन सहकाऱ्यांना याबाबत सांगितले.

यादरम्यान पीडित तरुण आरोपींच्या ऑफिसात दाखल झालेला होता. तो तिथे आपल्या सेक्स पार्टनरची वाट पाहत होता. काही वेळानंतर त्या ठिकाणी चारजण आले. यानंतर त्या चौघांनी एकत्र पीडित तरुणासोबत शारिरीक संबंध ठेवण्याचा हट्ट केला. पण तरुणाने त्यांची ती मागणी नाकारली. त्यानंतर या चारही आरोपींनी रागाच्या भरात पीडित तरुणाला प्रचंड मारहाण केली. यानंतर आरोपींनी पीडित तरुणाकडून त्याचा मोबाईल, पाकिट आणि इतर मौल्यवान वस्तू हिसकावून घेतल्या. हे आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी पीडित तरुणाच्या अंगावरील कपडे काढून त्याचा न्यूड व्हिडीओ बनवला. तसेच तो व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्याची धमकी देत पैशांची मागणी केली. तरुणाने आपण पैसे घेऊन येत असल्याचा बहाणा करत तिथून कशीतरी सुटका करुन घेतली. यानंतर पीडित तरुणाने हा सगळा प्रकार त्याच्या कुटुंबियांना सांगितला. यानंतर कुटुंबीयांनी आरोपींविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली.

पोलिसांची प्रतिक्रिया
या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर, सिनिअर पोलीस इन्सपेक्टर शेखर भालेराव आणि हसन मुलानी यांच्या पथकाने या प्रकरणी तातडीने कारवाई करून तीन आरोपींना अटक केली आहे. आम्ही सर्व आरोपींच्या विरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे तसेच त्यांना कोर्टात हजार केले असता कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.

नाना पटोलेंची जीभ कापा अन् एका लाखाचं बक्षीस मिळवा !

nana

औरंगाबाद – कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर महाराष्ट्रातील भाजप आक्रमक झाली आहे. भारताच्या प्रधानमंत्र्यांवर मारामारीची भाषा करण्याच्या वक्तव्याचा संपूर्ण महाराष्ट्रातून भाजप कार्यकर्ते निषेध नोंदवून आंदोलन करत आहे. यातच भाजपा युवा मोर्चाचे जालना जिल्हाध्यक्ष सुजित जोगस यांनी अजब घोषणा करून सनसनाटी निर्माण केली आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची जीभ कापा आणि 1 लाख रुपये मिळवा अशी घोषणा सुजित जोगस यांनी केली आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विरोधात नाना पटोले यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्या प्रकरणी कदीम जालना पोलिस ठाण्यात कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात भाजपा युवा मोर्चाने तक्रार दिली आहे. नाना पटोले यांच्यावर त्वरित फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी या तक्रारीद्वारे करण्यात आली आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री तथा भाजपा नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री यांच्यावद्दल केलेल्या वक्तव्यासंदर्भात पोलिसांनी कारवाई केली होती. आणि आता पटोले यांच्यावर कारवाई करण्यात येत नाही. राणे यांना वेगळा कायदा आणि पटोले यांच्या साठी वेगळा कायदा आहे का असा सवालही भाजपा युवा मोर्चाच्या वतीने यावेळी करण्यात आला.

दरम्यान, भाजपा युवा मोर्चाच्या पदाधिकार्‍यांच्या वतीने घोषणाबाजी करून नाना पटोले यांच्या वादग्रस्त विधानाचा समाचार घेण्यात आला. यावेळी भाजपा युवा मोर्चा जालना जिल्हा उपाध्यक्ष संदीप हिवराळे, गोविंद ढेंबरे पाटील., जिल्हा चिटणीस सचिन गाडे, तालुकाध्यक्ष अनिरुद्ध जाधव, तालुका उपाध्यक्ष करण निकाळजे, गणेश देशमुख उपस्थित होते.

औरंगाबादेत कोरोनाचा धुमाकूळ ! आज आठशेहून अधिक कोरोना बाधित

Corona

औरंगाबाद – औरंगाबादेत मागील काही दिवसांपासून कोरोनाचा उद्रेक पहायला मिळत असून, आता तर कोरोना अक्षरशः कहर करत असल्याचे दिसून येत आहे. आज आठशे हून अधिक कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यात आज तब्बल 856 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. नव्या रुग्णांमध्ये सर्वाधिक 701 रुग्ण हे शहरातील आहे. तर ग्रामीण भागातील 155 रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 47 हजार 451 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1 लाख 55 हजार 606 झाली आहे. आतापर्यंत एकूण 3662 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 4493 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

शहराच्या एका टोकापासून तर दुसऱ्या टोकापर्यंतच्या भागांत नवे रुग्ण सापडले आहे. त्यामुळे संपूर्ण शहराला कोरोनाने पुन्हा स्वत:च्या विळख्यात घेण्यास सुरुवात केली आहे. दिवसभरात 244 रुग्ण बरे होऊन घरी परतले. यात महापालिकेच्या हद्दीतील 200 तर ग्रामीणमधील 44 रुग्णांना सुटी देण्यात आली.

पर्यटनाचं बुकिंग करणाऱ्या महिलेवर ऑफिसमध्येच प्राणघातक हल्ला

बारामती : हॅलो महाराष्ट्र – पुणे जिल्ह्यातील बारामती या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये पर्यटनाचं बुकिंग करणाऱ्या एका महिलेवर ऑफिसमध्ये घुसून चाकूने वार करण्यात आले. आरोपीने चाकूने या महिलेच्या हातावर वार केल्याने हि महिला जखमी झाली आहे. ही संपूर्ण थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या घटनेची माहिती बारामती शहर पोलिसांना देण्यात आली आहे.

या घटनेची माहिती मिळताच बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी केसरी टूर्सचं ऑफिस आहे. याच ऑफिसमध्ये फिर्यादी महिला पर्यटनाचं बुकिंग करण्याचं काम करते. यादरम्यान आज सकाळी एका अज्ञात तरुणाने ऑफिसमध्ये शिरून या महिलेवर चाकूने वार करून तिला जखमी केले.

नेमकं काय घडलं?
आज सकाळी साडेदहाच्या सुमारास केसरी रजत टूर्सचं ऑफिस उघडल्यानंतर आरोपी त्या ठिकाणी आला. त्याने मी काल आपल्या ऑफिसला येऊन गेलो. तुम्ही लवकर ऑफिस बंद केलं’, असं म्हणत फिर्यादी महिलेच्या गळ्यात हात घातला. यानंतर फिर्यादी महिलेने त्याचा हाथ धरून ठेवला. यानंतर आरोपीने माझा हात सोड असे म्हणत त्याने महिलेवर चाकुने वार केले. यानंतर या महिलेने त्याचा पाठलाग करून त्याला पकडण्याचा प्रयन्त केला पण आरोपी तरुण आपली चप्पल न घालताच गाडीवर बसून घटनास्थळावरून फरार झाला.

चिकलठाणा ते करमाड दरम्यान 17 दिवसांचा ‘लाईन ब्लॉक’; ‘या’ रेल्वे धावणार उशिरा

railway

औरंगाबाद – दक्षिण मध्य रेल्वेच्या करमाड ते चिकलठाणा सेक्शन मधील रेल्वे पटरीचे नवीनीकरण (थ्रू स्लीपर रेण्युवल) करण्या करिता दिनांक 18 जानेवारी ते 26 फेब्रुवारी, 2022 दम्यान आठवड्यातून तीन दिवस सोमवार, बुधवार आणि शनिवारी 180 मिनिटांचा लाईन ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक दुपारी 15.05 पासून सायंकाळी 18.05 वाजे पर्यंत घेण्यात येणार आहे. लाईन ब्लॉकमुळे औरंगाबाद-हैदराबाद एक्स्प्रेस काही दिवस औरंगाबाद येथून 125 मिनिटे उशिरा सुटणार, तर काचीगुडा-रोटेगाव डेमू एक्सप्रेस 40 मिनिटे उशिरा धावणार आहे.

या कालावधीत एकूण 17 ब्लॉक घेवून हे कार्य पूर्ण करण्यात येणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने हे कार्य महत्वपूर्ण आहे. हा लाईन ब्लॉक दिनांक 19, 22, 24, 26, 29, 31 जानेवारी आणि दिनांक 02, 05, 07, 09, 12, 14, 16, 19, 21, 23, 26 फेब्रुवारी 2022 रोजी एकूण 17 दिवस घेण्यात येणार आहे. यामुळे औरंगाबाद ते हैदराबाद एक्स्प्रेस आणि काचीगुडा ते रोटेगाव डेमू एक्सप्रेस या दोन गाड्या वरील तारखेस उशिरा धावतील. अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वेने एका पत्रकाद्वारे दिली आहे.

लाईन ब्लॉक च्या दिवशी गाडी संख्या 17650 औरंगाबाद ते हैदराबाद एक्स्प्रेस औरंगाबाद रेल्वे स्थानकावरून तिची नियमित वेळ दुपारी 16.15 वाजता ऐवजी 125 मिनिटे उशिरा म्हणजेच सायंकाळी 18.20 वाजता सुटेल. तसेच लाईन ब्लॉक च्या दिवशी गाडी संख्या 17661 काचीगुडा – रोटेगाव डेमू एक्सप्रेस जालना ते करमाड दरम्यान 40 मिनिटे उशिरा धावेल.

नागपूर हादरले ! 2 मुलांची आणि पत्नीची हत्या करून पतीचीही आत्महत्या

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – नागपूरमध्ये एक हादरवणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये आर्थिक अडचणीतून पतीने आपल्या दोन लहान मुलांची आणि पत्नीची हत्या करून स्वतःही आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. नागपूरच्या जरीपटका भागामध्ये हि घटना घडली आहे. मदन अग्रवाल असे हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून तो दोन लहान मुलं आणि पत्नीसह जरीपटका भागात राहत होता.

नेमके काय घडले ?
सोमवारी रात्री रात्री जेवणं करून सर्वजण झोपी गेले होते. त्यानंतर झोपेत असताना आरोपी पतीने पत्नीचा गळा चिरला. त्यानंतर आपल्या दोन लहान मुलांच्या गळ्यावरही चाकू फिरवून त्यांचाही खून केला. पत्नी आणि मुलांची हत्या केल्यानंतर मदन अग्रवाल याने स्वत: विष पिऊन आत्महत्या केली आहे.दुसऱ्या दिवशी दिवसभर घरातून कोणीही बाहेर आले नाही म्हणून शेजाऱ्यांना संशय आला. यानंतर शेजाऱ्यांनी याची माहिती पोलिसांना दिली.

यानंतर पोलिसांनी घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता मदन अग्रवाल यांची पत्नी मुलगा-मुलगी यांचे मृतदेह आढळून आले. यानंतर पोलिसांनी घटनास्थाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. मदन अग्रवाल हे गेल्या काही दिवसांपासून आर्थिक अडचणीत सापडले होते. यातूनच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. जरीपटका पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

महिलेसह दोघांकडून तरुणाला भररस्त्यात मारहाण

beed crime

बीड : हॅलो महाराष्ट्र – बीड-सोलापूर महामार्गावरील रौऊळगाव चौकात दोन जणांनी एका महिलेसह एका तरुणाला बेदम मारहाण केली आहे. या तरुणाला पैशाच्या व्यवहारातून मारहाण करण्यात आले असल्याचे समजत आहे. हा सगळा प्रकार महामार्गावर घडल्याने अनेकांनी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी काही लोकांनी मध्यस्थी करून हा वाद सोडवण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काही उपयोग झाला नाही. जवळपास 1 तास हा सगळा प्रकार सुरु होता. तिकडच्या काही लोकांनी आपल्या मोबाईलमध्ये या घटनेचा व्हिडिओ शूट केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?
बीड-सोलापूर महामार्गावरील अंजनवती या ठिकाणी राहणाऱ्या पीडित तरुणाने त्याच परिसरातील वाणगाव येथील एका व्यक्तीचे पैसे घेतले होते. वारंवार पैसे मागूनदेखील पीडित तरुण पैसे देत नव्हता. यामुळे वैतागून आरोपींनी हा रस्ता अवलंबला. यानंतर एकाच कुटुंबातील तिघांनी मिळून बीड-सोलापूर महामार्गावरील रौऊळसगाव चौकात संबंधित तरुणाला मारहाण केली. यामध्ये एका महिलेचादेखील समावेश होता.

जवळपास सुमारे एक तास हा सगळा प्रकार सुरु होता. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी निर्माण झाली होती. यावेळी आजूबाजूच्या लोकांनी मध्यस्थी करून हि भांडणे सोडवण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काही उपयोग झाला नाही. मारहाण करणारे तिघेजण ऐकण्याच्या तयारीत नव्हते. पैशांच्या देवाण-घेवाणीतून भररस्त्यात या तिघांनी गुंडागर्दी करत तरुणाला मारहाण केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. त्यामुळे पोलीस आता तिघांवर काय कारवाई करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

दिवस क्रमांक- 56; कामगार पुतळा वसाहतीतील नागरिक आजही न्यायाच्या प्रतीक्षेत

Workers Union

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। पुण्यातील महामेट्रो प्रकल्पाच्या कामासाठी कामगार पुतळा वसाहत दोन महिन्यांपूर्वी जमीनदोस्त करण्यात आली. यावेळी मूलभूत मागण्यांची पूर्तता न झालेल्या नागरिकांनी पुण्याच्या विधान भवनाबाहेर आंदोलन सुरू केलं. या आंदोलनाचा आज ५६ वा दिवस. या ५६ दिवसांतील घडामोडींचा हा आढावा..!!

० नेमकी मागणी –
१) सद्यस्थितीत वस्तीतील १७८ कुटुंबं पुनर्वसन योजनेत पात्र आहेत. मात्र त्यांना हडपसर आणि विमाननगर भागातील पुनर्वसन मान्य नाही. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने निर्धारित केलेली २१ लाख ५० हजार रुपये रक्कम मिळावी, त्या रकमेतून आम्हाला सोयीस्कर पडेल त्या ठिकाणी आम्ही घर घेऊ अशी मागणी नागरिकांची आहे.

२) कामगार पुतळा वसाहतीत वर्षानुवर्षे (२० वर्षांहून अधिक काळ) वास्तव्य केलेल्या नागरिकांना केवळ काही कागदपत्रांअभावी अपात्र करण्यात आलं आहे. अपात्र कुटुंबांची संख्या जवळपास ३०० हून अधिक आहे. जागेवर वास्तव्य असल्याचे जुने पुरावे ग्राह्य न धरताच त्यांना अपात्र केलं आहे. त्यांच्यावर हा अन्याय झाला असून अशा नागरिकांचा विचारही प्रकल्पबाधित म्हणून करण्यात यावा अशी मागणी आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या बबन भालके, हमीद शेख, मयूर घोडे यांनी केली आहे.

० पार्श्वभूमी – स्थानिक नागरिकांकडून जागा हस्तांतरित करण्याच्या प्रक्रियेला यंदाच्या एप्रिलमध्ये १ वर्षं पूर्ण होईल. २००८ ला झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणच्या निमित्ताने ही वस्ती विस्थापित करण्याचा विचार होता. मात्र काही कारणास्तव हा विचार मागे पडला. त्यानंतर मेट्रोच्या कामासाठी पुणे शहरातील उठवण्यात आलेली कामगार पुतळा वसाहत ही पहिली नागरी वस्ती ठरली.

दूर अंतरावरील विस्थापनामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागणार होतं. हाच विचार करून कामगार पुतळा वसाहतीमधील २०० हून अधिक कुटुंबांनी मेट्रोमुळे होत असलेल्या हडपसर आणि विमाननगर भागातील विस्थापनाला विरोध केला. मागील ९ महिन्यांपासून या कुटुंबांचा विरोध कायम आहे. ३ ते ४ किलोमीटर अंतरातील विस्थापन किंवा जागेचा रोख पैशांतील मोबदला ही स्थानिक नागरिकांची पहिल्यापासून अट राहिली आहे.

० सद्यस्थिती काय ?
– महापालिका प्रशासन आणि मेट्रो प्राधिकरण करत असलेल्या जमीन हस्तांतरण प्रक्रियेत अडथळा आणू नका. ऍग्रिमेंट करून घ्या आणि नियोजित जागी रहायला जा अशा स्पष्ट सूचना प्रशासनाने नागरिकांना वारंवार दिल्या होत्या. जून ते ऑक्टोबर या कालावधीत ऍग्रिमेंट केलेल्या नागरिकांची घरंही पाडण्यात आली. त्यानंतर मात्र ऍग्रिमेंट न करणाऱ्या लोकांनाही नोव्हेंबर महिन्यात सक्तीच्या सूचना देऊन त्यांची घरं पाडण्यात आली. यानंतर मेट्रोबाधित लोकांसाठी जारी केलेल्या १/१/२०१८ च्या अध्यादेशाचा आधार घेऊन कामगार पुतळा वसाहतीतील स्थानिक नागरिकांनी पुण्यातील विधान भवनाबाहेर आंदोलन करायला सुरुवात केली. वस्ती जमीनदोस्त करण्याच्या शेवटच्या टप्प्यात घरातील काही लोक स्वतःचं घर पाडलं जात असताना पंचनाम्यासाठी तिथेच उपस्थित होते तर काही जण विधानभवनाबाहेर आंदोलन करत होते. मागील ५६ दिवस हे आंदोलन सुरूच असून त्याची योग्य ती दखल प्रशासनातर्फे अद्यापही घेण्यात आलेली नाही अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते हमीद शेख यांनी दिली.

विस्थापनाच्या बाबतीत काही अडचणी असतील तर विभागीय आयुक्तांशी चर्चा करण्याच्या सूचना महामेट्रो प्राधिकरणातर्फे देण्यात आल्या होत्या. मात्र विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दीड महिना उलटून गेला तरी कामगार पुतळा वसाहतीतील आंदोलक नागरिकांची दखल घेतली नाही. “अशा प्रकारचं काही आंदोलन सुरू असल्याची माहितीच मला नव्हती” असा खुलासाही त्यांनी आंदोलकांसमोर केल्याचं मयूर घोडे यांनी सांगितलं.

वस्ती जमीनदोस्त झाल्यानंतरही काही नागरिक महिनाभर त्याच ठिकाणी तात्पुरता निवारा करून राहिले. मात्र जानेवारी महिन्यातील पहिल्या आठवड्यात वस्तीतील संपूर्ण जागा मोकळी करण्यात आली. ऍग्रिमेंट न केलेल्या काही कुटुंबांचं साहित्य मेट्रो प्राधिकरणाच्या ऑफिसमध्ये तसंच पडून आहे. काही नागरिकांनी आपल्या नातेवाईकांकडे तात्पुरता निवारा शोधला असून काही कुटुंब रस्त्याच्या कडेलाच आपला पूर्ण संसार मांडून आहेत. मागील २ महिन्यातील कडाक्याची थंडी, २-३ वेळा झालेला पाऊस या सगळ्यामुळे कामगार पुतळा वसाहतीतील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला आहे. आजारपणामुळे त्रस्त असलेल्या २ ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यूही यादरम्यान झाला असल्याची माहिती स्थानिक विकी कांबळे यांनी दिली.

कामगार पुतळा वसाहतीतील स्थानिकांनी या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी खासदार सुप्रिया सुळे, राज्यमंत्री बच्चू कडू, आमदार रोहित पवार यांची भेट घेतली होती. या भेटीनंतरही सन्मानजनक तोडगा निघाला नाहीच. आता मात्र वस्ती पूर्णपणे पाडल्यानंतर किमान हक्काच्या घराचा मोबदला मिळावा ही रास्त मागणी नागरिक करत आहेत. विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी या आठवड्यात स्थानिक नागरिकांना चर्चेचं आश्वासन दिलं आहे. नियमानुसार मोबदला मागणाऱ्या स्थानिकांच्या मागणीकडे प्रशासन कधी लक्ष देणार हाच प्रश्न आंदोलक नागरिकांसमोर आहे.

० आंदोलनातील हालचाली – आंदोलक नागरिकांनी एक्टिव्ह मेम्बर्स नावाने व्हाट्सअप ग्रुप तयार केला आहे. दिवसभरातील २४ तासांमध्ये स्थानिक नागरिक आळी-पाळीने या ठिकाणी हजेरी लावतात. सकाळचा नाश्ता, दुपारचं आणि रात्रीचं जेवणही आंदोलनाच्या ठिकाणीच केलं जातं. आंदोलक कुटुंबातील सर्वच जण हातावरचं पोट असलेले आहेत. दिवसभर काम करायचं, आणि वेळ मिळेल तसं आंदोलनाच्या ठिकाणी हजेरी लावायची हा दिनक्रम मागील ५६ दिवस ते नित्य-नियमाने पाळत आहेत. या आंदोलनात तरुण आणि महिलाही सहभागी आहेत. दैनंदिन आयुष्यातील सुख-दुःखाच्या घटना शेअर करत वस्तीवाल्यांनी हा लढा सुरू ठेवला आहे. प्रशासनाने आमच्या सहनशक्तीचा अंत पाहू नये, असं बबन भालके हॅलो महाराष्ट्र’च्या प्रतिनिधीशी बोलताना म्हणाले.

पंतप्रधानांची अशी खिल्ली उडवणे चुकीचे; रोहित पवारांनी घेतली मोदींची बाजू

Modi Rohit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दाओसमध्ये आयोजित वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये संबोधनावेळी पंतप्रधान मोदी भाषण करताना तांत्रिक अडचणी मुळे टेलिप्रॉम्प्टर अचानक थांबल्याने आणि पंतप्रधान मोदींना पुढे बोलता आलं नाही. यानंतर विरोधकांनी मोदींची खिल्ली उडवली. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मात्र पंतप्रधानांची अशी खिल्ली उडवणे योग्य नाही अस म्हणत मोदींची बाजू घेतली आहे.

रोहित पवारांनी याबाबत ट्विट करत म्हंटल की, इकॉनॉमिक फोरम’च्या ऑनलाईन बैठकीत काल बोलत असताना Teleprompter बंद पडल्याने पंतप्रधानांच्या भाषणात अडथळा आल्याचा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल होतोय… अनेकजण याबाबत खिल्ली उडवतात… पण मला वाटतं अशी खिल्ली उडवणं चुकीचं आहे… असे रोहित पवार यांनी म्हंटल.

एखाद्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील व्यासपीठावर पंतप्रधान बोलत असताना ते देशाचे प्रतिनिधी म्हणून बोलत असतात. अशा वेळी Teleprompter चाच आधार घ्यावा लागतो. यावेळी चुकूनही एखादा शब्द चुकीचा गेल्यास ते देशासाठी परवडणारं नसतं. त्यामुळं या गोष्टीची चेष्टा करणं योग्य नाही! अस परखड मत रोहित पवार यांनी मांडले.