Sunday, December 28, 2025
Home Blog Page 2925

बँकेच्या FD पेक्षा जास्त रिटर्न देणाऱ्या ‘या’ SIP दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम आहेत, याविषयी जाणून घ्या

EPFO

नवी दिल्ली । बँकांच्या एफडीच्या कमी व्याजदरामुळे गुंतवणूकदार आता गुंतवणुकीच्या इतर पर्यायांकडे जास्त लक्ष देऊ लागले आहेत. नवीन गुंतवणूक पर्यायांपैकी म्युच्युअल फंड हा सर्वात पसंतीचा पर्याय बनत आहे. विशेषत: लोक SIP च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत. वाढत्या महागाईत, बँक एफडीचा रिटर्न हा आता फायदेशीर राहिलेला नाही. अशा परिस्थितीत गुंतवणूकदार म्युच्युअल फंड आणि शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर पैसे गुंतवत आहेत.

कमी जोखीम घेऊ इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांमध्ये डेट म्युच्युअल फंड लोकप्रिय आहेत. इक्विटी आणि डेट म्युच्युअल फंडाच्या काही SIP खाली दिल्या आहेत जे तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर पाच वर्षांमध्ये फंड प्रकार, जोखीम पातळी, NAV (नेट एसेट व्हॅल्यू) आणि अपेक्षित रिटर्न यानुसार उत्तम रिटर्न देऊ शकतात.

इक्विटी फंडातील 5 वर्षांसाठी सर्वोत्तम SIP

एक्सिस ब्लूचिप फंड मंथली SIP : ही एक ओपन-एंडेड इक्विटी योजना आहे ज्याचा उत्कृष्ट ट्रॅक रेकॉर्ड आहे आणि दीर्घ कालावधीत प्रचंड भांडवल निर्माण करण्याची उत्तम योजना आहे. या अंतर्गत पैसे प्रामुख्याने लार्ज कॅप कंपन्यांच्या लार्ज कॅप स्टॉकमध्ये गुंतवले जातात. उदाहरणार्थ, जर तुम्ही या योजनेअंतर्गत पाच वर्षांसाठी 10 हजार रुपयांची SIP केली तर तुम्ही 6 लाख रुपये गुंतवाल जे 5 वर्षांत 7.24 लाख रुपये होतील.

ICICI प्रुडेन्शियल ब्लूचिप फंड: ही एक ओपन-एंडेड योजना आहे ज्याचे पैसे लार्ज कॅप स्टॉकमध्ये गुंतवले जातात. आतापर्यंतच्या ट्रॅक रेकॉर्डनुसार, यामध्ये 10 हजार रुपयांची SIP 5 वर्षांत 6.29 लाख रुपये होऊ शकते.

SBI ब्लूचिप फंड: या फंडाचे पैसे इक्विटीशी संबंधित साधनांमध्ये गुंतवले जातात जे दीर्घकालीन भांडवल उभारणीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी उपयुक्त ठरतात. या योजनेंतर्गत, बाजाराच्या स्थितीनुसार 10 हजार रुपये किंवा त्याहून अधिक भांडवलासह 5 वर्षांत 6.3 लाख रुपये किंवा त्याहून जास्त भांडवल केले जाऊ शकते.

Mirae Asset Large Cap Fund: हा फंड एप्रिल 2008 मध्ये लाँच करण्यात आला आणि या अंतर्गत एक वर्षानंतर पैसे काढण्यासाठी एक्झिट लोड नाही. त्याचे पैसे इक्विटी आणि इक्विटी संबंधित साधनांमध्ये गुंतवले जातात. लार्ज कॅप फंड म्हणून, या फंडातील 71.54 टक्के लार्ज कॅप फंडांमध्ये, 13.15 टक्के मिडकॅपमध्ये आणि 3.62 टक्के स्मॉल-कॅप शेअर्समध्ये गुंतवले जातात. या योजनेअंतर्गत 10,000 रुपयांच्या 5 वर्षांच्या SIP मधून 6.72 लाख रुपयांचे भांडवल तयार केले जाऊ शकते.

SBI मल्टीकॅप फंड: जर तुम्ही या योजनेत दरमहा 10 हजार रुपये गुंतवले तर आतापर्यंतच्या रिटर्न नुसार 5 वर्षांच्या शेवटी 6.69 लाख रुपयांचे भांडवल तयार केले जाऊ शकते. त्याचे पैसे इक्विटी आणि कर्ज साधनांमध्ये गुंतवले जातात.

संकल्पपूर्ती : किल्ले वसंतगडावर बुरुज, तटबंदीची पुनर्बांधणी पूर्ण, लोकार्पण सोहळा उत्साहात

कराड | किल्ले वसंतगडावरील पश्चिम दरवाज्याच्या बाजूकडील बुरुजासह तटबंदीचा काही भाग अतिवृष्टीमुळे ढासळला होता. त्याची डागडुजी व पुनर्बांधणी करून संवर्धन करण्याचा संकल्प सह्याद्री प्रतिष्ठान व टीम वसंतगडच्या दुर्गसेवकांनी केला होता. तो संकल्प पूर्णत्वास नेत बुरुज, तटबंदीची पुनर्बांधणी पूर्ण करून नुकताच त्याचा दुर्गार्पण सोहळाही उत्साहात संपन्न झाला.

या दुर्गार्पण सोहळ्यासाठी गडावर जमलेल्या शेकडो दुर्गसेवकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार, हर हर महादेवच्या गर्जना आणि येळकोट… येळकोट जय मल्हारच्या गजराने संपूर्ण वसंतगड दणाणून टाकला. तसेच दुर्गसेवकांनी भंडाऱ्याची उधळण करत संकल्पपूर्तीचा आनंदोत्सवही साजरा केला.

दरम्यान, रविवारी १६ रोजी सकाळी श्री चंद्रसेन महाराजांच्या मंदिरात पूजा करण्यात आली. त्यानंतर तुतारीच्या निनादात व हलगीच्या तालावर छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी मिरवणूक काढून  शिवरायांच्या मूर्तीला गडावरील कृष्णा व कोयना तळ्यातील पाण्याने अभिषेक घालण्यात आला. त्याचबरोबर गडाच्या पश्चिम दरवाजात पालखी आल्यानंतर उपस्थित शिवप्रेमी, दुर्गप्रेमी व दुर्गसेवांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा, आई तुळजा भवानीचा जयजयकार केला. तसेच दरवाजाच्या डाव्या बुरुजासह तटबंदीवर असलेल्या मावळ्यांनी महाराजांच्या पालखीवर भांडाऱ्याची उधळण करत मल्हारीचा येळकोट केला. भंडाऱ्याच्या उधळणीत किल्ले वसंतगड अक्षरशः न्हाऊन निघाला होता. यावेळी गडावरील वातावरण पूर्णपणे शिवमय झाले होते.

गेले दीड-दोन वर्षांपासून वसंतगडाच्या संवर्धनासाठी सह्याद्री प्रतिष्ठान व टीम वसंतगडच्या दुर्गसेवक मावळ्यांनी बुरुजाचे टनभर वजनाचे पाषाण बांधकामस्थळी नेेणे, पुरातत्व खात्याच्या निकषांनुसार संपूर्ण बांधकाम चुन्यात पूर्ण करणे, त्यासाठी शिवकालीन दगडी चुन्याचा घाना सुरू करून त्यामध्ये चुन्याची मळणी करणे, त्या मिश्रणासाठी लागणारे सगळे साहित्य तटबंदीपर्यंत वाहून आणणे, लोकसहभाग व देणगी स्वरूपात स्वराज्य निधी उभारणे आदी. दिव्य पार पडणाऱ्या सर्व मावळ्यांचा या सोहळ्यानिमित्त मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Budget 2022 : NPS सदस्यांना मिळू शकते टॅक्समध्ये मोठी सूट ! सरकारचा काय प्लॅन आहे समजून घ्या

नवी दिल्ली । 2022 च्या अर्थसंकल्पात, तीन वर्षांच्या लॉक-इन कालावधीसह एफडीवर कर सूट देण्याबरोबरच, केंद्र सरकार NPS ग्राहकांना मोठा दिलासा देऊ शकते. अर्थसंकल्पातील EPF आणि PPF प्रमाणेच, NPS सदस्यांना मॅच्युरिटीवर मिळालेली रक्कम कर सूटमधून बाहेर काढली जाऊ शकते. तसेच, त्यांना त्यांच्या मर्जीनुसार हे पैसे खर्च करण्याचे स्वातंत्र्यही दिले जाऊ शकते.

गुंतवणूक सल्लागार बळवंत जैन यांचे म्हणणे आहे की,”या अर्थसंकल्पात नॅशनल पेन्शन सिस्टम (NPS) शी संबंधित कर तरतुदींमधील काही विसंगती आणि असमानता दूर करण्यावर भर दिला गेला पाहिजे. हे सर्वांसाठी NPS न्याय्य आणि चांगले बनवेल. सदस्यांना त्यांच्या कष्टाने कमावलेल्या पैशावर पूर्ण अधिकारही मिळतील.”

40 टक्के वार्षिकी खर्च करावे लागतील
NPS आणि कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) सारख्या योजना पगारदारांसाठी आहेत. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी अंतर्गत, लोक रिटायरमेंट फंड तयार करतात. EPF आणि PPF च्या मॅच्युरिटीवर मिळणारी रक्कम करमुक्त आहे. NPS सदस्यांना लाइफ इन्शुरन्स कंपनीकडून एन्युइटी खरेदी करण्यासाठी मॅच्युरिटी रकमेच्या 40 टक्के रक्कम गुंतवावी लागते. त्यांच्या हातात फक्त 60 टक्के पैसा येतो, ज्यावर कोणताही कर आकारला जात नाही.

EPF आणि PPF सारख्या करात सूट
बलवंत जैन म्हणतात की केवळ NPS सदस्यांना एन्युइटी खरेदी करण्यास भाग पाडणे अयोग्य आहे, तर EPF आणि PPF सदस्यांना त्यांचे पैसे त्यांच्या आवडीनुसार खर्च करण्याचे स्वातंत्र्य आहे. अशा परिस्थितीत, सरकारने तिन्ही योजना जसे की EPF आणि PPF सारख्या NPS च्या मॅच्युरिटीवर मिळणाऱ्या उत्पन्नावरील करात सुधारणा करावी. यापूर्वी EPF अंतर्गत मॅच्युरिटीवर उत्पन्नाच्या वाट्यावर कर लावण्याच्या सरकारच्या प्रयत्नाला खूप विरोध झाला होता. अखेर 2016 च्या अर्थसंकल्पात ते मागे घेण्यात आले. आता तिन्ही योजनांची करप्रणाली एकसारखी करण्याचा मार्ग म्हणजे NPS ची मॅच्युरिटी रक्कम पूर्णपणे कराच्या कक्षेतून बाहेर काढणे.

फंड वापरण्याचे स्वातंत्र्य
खरेतर, म्युच्युअल फंडाची एक उद्योग म्हणून वाढ, कडक नियम आणि बाजार नियामक सेबीचे निरीक्षण यामुळे म्युच्युअल फंड गुंतवणूक तुलनेने सुरक्षित झाली आहे. सरकारने NPS सदस्यांना त्यांच्या आवडीच्या उत्पादनांमध्ये मॅच्युरिटीची रक्कम गुंतवण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले पाहिजे. यामध्ये संपूर्ण फंडधोक्यात येणार नाही याची खात्री करण्यासाठी फंड पूर्णपणे काढण्यावर निर्बंध समाविष्ट आहेत. हे EPF सदस्यांनाही लागू असावे.

प्रत्येकाला टियर-2 खात्यांवर 80C लाभ मिळतो
इन्व्हेस्टमेंट ऍडव्हायझर स्वीटी मनोज जैन स्पष्ट करतात की, आयकर कायद्याच्या कलम 80C च्या सध्याच्या तरतुदींनुसार, केंद्र सरकारचे कर्मचारी त्यांच्या टियर-2 NPS खात्यात तीन वर्षांच्या लॉक-इन कालावधीसह योगदानासाठी 80C अंतर्गत टॅक्स सूट घेऊ शकतात. हा लाभ फक्त केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांनाच का दिला जातो, सर्व करदात्यांना नाही. सर्व NPS सदस्यांना NPS टियर-2 खात्यात केलेल्या योगदानासाठी कर लाभ मिळायला हवा. विशेषत: जेव्हा टियर-2 खाते तुम्हाला त्याच कार्यकाळातील इतर उत्पादनांच्या तुलनेत ELSS पेक्षा कमी जोखीम असलेले उत्पादन देते.

योगदानावर समान कर लाभ मिळवा
केंद्र सरकारचे कर्मचारी कलम 80CCD(2) अंतर्गत पात्र वेतनाच्या 14 टक्क्यांपर्यंत नियोक्त्याच्या योगदानाबाबत कर कपातीसाठी पात्र आहेत, तर इतर श्रेणीतील कर्मचाऱ्यांसाठी ते वेतनाच्या 10 टक्क्यांपर्यंत मर्यादित आहे. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना असे अवाजवी लाभ देण्यात अर्थ नाही. ते सर्व कर्मचाऱ्यांसाठी एकसारखे केले पाहिजे. नियोक्त्याच्या योगदानाच्या संदर्भात इतर कर्मचार्‍यांसाठी मर्यादा देखील 14 टक्क्यांपर्यंत वाढवली पाहिजे.

नाना… तुझा पंजाच छाटलाच जाईल; पटोलेंवर टीका करताना भाजप नेत्याची जीभ घसरली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले. पटोलेंवर टीका करताना भाजप नेते डॉ. अनिल बोंडे याची जीभ घसरली आहे. “काँग्रेसच्या कुत्र्यांची होडच लागली आहे. नाना ने तर हद्दच केली मी मालकीनचा सगळ्यात प्रमाणिक कुत्रा आहे हे दाखविण्यासाठी भुंकण्यासोबतच चावण्याचाही धमकी दिली पण लक्षात ठेव तुझा पंजाच छाटलाच जाईल, असे वक्तव्य बोंडे यांनी केले आहे.

भाजप नेते डॉ. अनिल बोंडे यांनी ट्विट करीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, काँग्रेसच्या कुत्र्यांची होडच लागली आहे. नाना ने तर हद्दच केली मी मालकीनचा सगळ्यात प्रमाणिक कुत्रा आहे हे दाखविण्यासाठी भुंकण्यासोबतच चावण्याचाही धमकी दिली पण लक्षात ठेवाव शाहिस्ते खानाची नुसती बोटच छाटली होती तुझा पंजाच छाटलाच जाईल. अमरावतीचे पोर निघाले आहेत पंजा सांभाळून ठेव, असा इशारा बोंडे यांनी दिला आहे.

https://twitter.com/DoctorAnilBonde/status/1483322786802192390?s=20

पटोले नेमकं काय म्हणाले?

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी “मी का भांडतो? मी आता मागील 30 वर्षापासून राजकारणात आहे. लोकं पाच वर्षात आपल्या एका पिढीचा उद्धार करुन टाकतात. शाळा, कॉलेज हे करुन आपल्या एक-दोन पिढीचा उद्धार करुन टाकतात. मी एवढ्या वर्षाच्या राजकारणात एक शाळा नाही घेतली. एक ठेकेदारी नाही केली. जो आला त्याला मदत करतो. म्हणून मी मोदीला मारु शकतो, त्याला शिव्या देऊ शकतो आणि म्हणून मोदी माझ्या विरोधात प्रचाराला आला. एक प्रमाणिक नेतृत्व तुमच्या इथे आहे….”असं आक्षेपार्ह आणि वादग्रस्त वक्तव्य नाना पटोले यांनी व्हिडीओमध्ये केले आहे.

तेव्हा राणेंना अटक केली, आता नाना पटोलेंना मुख्यमंत्री अटक करणार का? भाजपचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आपण मोदींना मारू शकतो, शिव्या देऊ शकतो असे वादग्रस्त  विधान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केल्यानंतर आता भाजप आक्रमक झाली आहे. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी नाना पटोले यांच्यावर हल्लाबोल केला आहे. तसेच नारायण राणे यांना अटक करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता नाना पटोलेना अटक करणार का असा सवाल त्यांनी केला आहे. विक्रांत पाटील यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ ची बातचित करताना नाना पटोले यांच्यावर टीकेची झोड उठवली.

वाचाळवीर नाना पाटोळे यांनी सगळी हद्द पार करून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्याची हिम्मत दाखवली. मुळात ज्या पंतप्रधानांच्या कर्तृत्वाचे जगभरात कौतुक केल जात आणि दुसरीकडे नाना पटोले यांच्या कर्तृत्वाची उंची किती तोकडी आहे हे महाराष्ट्राला माहित आहे असा टोला विक्रांत पाटील यांनी लगावला तसेच याप्रकरणी राज्यभरातील पोलीस स्टेशन मध्ये एफआयआर दाखल करून नाना पाटोळे यांच्या अटकेची मागणी आम्ही करत आहोत असे विक्रांत पाटील यांनी म्हंटल

नारायण राणे यांच्यासारख्या केंद्रीय मंत्र्यांना कोणतेही चुकीचं विधान केलेलं नसताना त्यांच्या अटकेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अनिल परब यांनी प्रयत्न केले त्याचप्रमाणे आता देखील मुख्यमंत्री तशाच प्रकारे पोलिसांवर दबाव आणून नाना पटोले याना अटक करणार का असा थेट सवाल विक्रांत पाटील यांनी केला आहे

दरम्यान, मी पंतप्रधान मोदींबद्दल नव्हे तर गावगुंड मोदींबद्दल बोललो अशी सारवासारव नाना करत असले तरी आपण तो विडिओ नीट पहिला तर तुम्हाला समजेल की नाना पटोले हे पंतप्रधान मोदीं बद्दल च बोलत होते असेही विक्रांत पाटील यांनी सांगितलं. तसेच देशभरात आम्ही नाना पटोले यांच्या विरोधात गुन्हे दाखल करणार आहोत असेही त्यांनी सांगितल

‘या’ तीन मार्गांनी 2022 मध्ये कमावता येईल चांगले पैसे, कुठे गुंतवणूक करायची ते जाणून घ्या

SIP

नवी दिल्ली । 2021 हे वर्ष कोरोनामध्ये संमिश्र वर्ष ठरले. व्यवसाय पुन्हा रुळावर येण्यासाठी संघर्ष करत असताना, आर्थिक बाजार आणि क्रिप्टोकरन्सीसाठी हे वर्ष चांगले राहिले आहे. रिटेल इक्विटी गुंतवणूकदारांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली आहे. म्युच्युअल फंडात विक्रमी गुंतवणूक आली.

गेल्या वर्षी भारतीय बाजारातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीने नवीन उंची गाठली होती. Paytm, Zomato, Nykaa आणि Policybazaar सारख्या 63 कंपन्यांनी 1.2 लाख कोटी रुपये उभे केले आहेत. एका वर्षात IPO दरम्यान जमा झालेली ही सर्वाधिक रक्कम आहे. मात्र फक्त शेअर बाजारच आहे, जिथून पैसा कमावता येईल? तर स्टॉक मार्केटसह 3 असे उत्तम पर्याय आहेत, ज्यातून तुम्ही 2022 मध्ये पैसे कमवू शकता.

शेअर मार्केट
चांगल्या दर्जाचे ब्लू-चिप किंवा मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप स्टॉक देखील मजबूत रिटर्न देऊ शकतात. मात्र तुमची गुंतवणूक दीर्घकालीन असावी. हा कालावधी किमान 3-5 वर्षांचा असावा. भारतीय अर्थव्यवस्था महामारीतून सावरत आहे आणि विविध क्षेत्रातील अनेक सुधारणा पुढील काही वर्षांत चांगल्या दर्जाच्या कंपन्यांच्या शेअर्सच्या किमती उच्च पातळीवर नेतील.

नॅशनल पेन्शन योजना (NPS)
ही केंद्र सरकारची योजना आहे ज्याचा उद्देश तुम्हाला निवृत्तीनंतर स्थिर उत्पन्न देणे हा आहे. हे पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण (PFRDA) द्वारे मॅनेज केले जाते, जी भारतातील पेन्शन निधीची नियामक संस्था आहे. NPS ही एक संकरित गुंतवणूक योजना आहे, जी इक्विटी आणि कर्ज दोन्हीमध्ये गुंतवणूक करते.

NPS मध्ये गुंतवणूक केल्याने, तुम्ही जिवंत राहेपर्यंत तुम्हाला निश्चित मासिक पेन्शन मिळेल आणि रिटायरमेंटच्या वेळी एकरकमी रक्कम देखील मिळेल. तुम्ही NPS मधून मॅच्युरिटी रकमेच्या 60 टक्क्यांपर्यंत एकरकमी पैसे काढू शकता आणि उर्वरित रक्कम जीवन विमा कंपनीकडून एन्युइटी खरेदी करावी लागेल.

ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS)
SCSS मध्ये रु. 1,000 च्या पटीत जास्तीत जास्त रु 15 लाख गुंतवले जाऊ शकतात. या योजनेतील व्याज दर तिमाहीत जमा केले जाते जेणेकरून ते नियमित उत्पन्नाची आवश्यकता पूर्ण करू शकेल. SCSS खाते पाच वर्षांत मॅच्युर होते, त्यानंतर ते तीन वर्षांच्या ब्लॉकसाठी पुन्हा एकदा वाढवले ​​जाऊ शकते. लहान बचत योजनांच्या व्याजदरात कपात करूनही, SCSS चालू तिमाहीसाठी 7.4 टक्के दर देऊ करत आहे.

“पुणे मेट्रोत कोणतंही योगदान नाही म्हणून सीटवर का बसू असा प्रश्न पवारांना पडलाय का?”; भाजपचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सोमवारी सकाळी पिंपरी-चिंचवडला येऊन मेट्रो स्थानकांची पाहणी करून मेट्रोतून प्रवासही केला. यावेळी तिकिट खिडकीवर जाऊन पवारांनी तिकीट घेतले. पवारांच्या या दौऱ्यावरून भाजपाने निशाणा साधला आहे. “पुणे मेट्रो उभं करण्यासाठी माझं कोणतंही योगदान नाही, त्या मेट्रो ट्रेनच्या सीटवर का बसू? असा प्रश्न पडला आहे का शरद पवार साहेबांना?,” असा टोला भाजपाने पवारांना लगावला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या मेट्रो स्थानकांच्या पाहणीवरून भाजपने पवारांवर ट्विट करीत निशाणा साधला आहे. भाजपाने अधिकृत ट्विटर अकाउंटवरून शरद पवारांचा मेट्रोतून प्रवास करत असतानाचा फोटो ट्वीट केला आहे. “पुणे मेट्रो उभं करण्यासाठी माझं कोणतंही योगदान नाही, त्या मेट्रो ट्रेनच्या सीटवर का बसू? असा प्रश्न पडला आहे का शरद पवार साहेबांना?,” असा उपहासात्मक टोला भाजपाने लगावला आहे.

दरम्यान पवारांचा दौरा पूर्ण होताच भाजपाचे प्रदेशाध्य चंद्रकात पाटील यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीवर टीका केली. तसेच मेट्रोविरोधात विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव दाखल करणार असल्याचे सांगितले. भाजपाला मेट्रोकडून दुय्यम वागणूक मिळत असल्याचा आरोपही यावेळी पाटील यांनी केला आहे.

ऐतिहासिक मेहमूद दरवाज्याच्या संवर्धनाचे काम अखेर सुरू

औरंगाबाद – शहरातील ऐतिहासिक मेहमूद दरवाज्याच्या नूतनीकरणाचे काम अखेर सुरू झाले आहे. स्मार्ट सिटी अभियानातून सुमारे 38 लाख रुपये खर्च करून या दरवाजाला गतवैभव प्राप्त करून दिले जाणार आहे. चार महिन्यात नूतनीकरणाचे काम पूर्ण होईल, असा दावा करण्यात आला आहे.

स्मार्ट सिटी अभियानातून शहरातील नऊ ऐतिहासिक दरवाजांचे संवर्धन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र सर्वात जुन्या मेहमूद दरवाजाचे काम रखडले होते. स्ट्रक्चरल ऑडिटनंतर डागडुजीचा मार्ग मोकळा झाला आहे. दरवाजाच्या ज्या भागाची डागडुजी करता येऊ शकत नाही, तो भाग पाडून तेथे नवीन बांधकाम केले जाणार आहे. चारशे वर्षांपूर्वी दरवाजा बनवण्यासाठी जी पद्धत वापरण्यात आली होती त्याच पारंपारिक पद्धतीने हे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी चुना, दगड, वीट यांचा वापर करण्यात येणार आहे.

यासाठी चुना भिजवण्यासाठी हौद देखिल तयार करण्यात आले आहेत. यासाठी स्मार्ट सिटीने एकूण 38 लाखांचे टेंडर काढले होते. चार महिन्यांच्या कालावधीत हे काम पूर्ण होईल. स्मार्ट सिटीच्या साहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक स्नेहा बक्षी यांनी सांगितले की, दरवाजाच्या नूतनीकरणाचे काम तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे. हा दरवाजा जीर्ण झाला होता. त्यामुळे दगड कोसळण्याची भीती आहे. त्यामुळे नागरिकांनी काम पूर्ण होईपर्यंत पर्यायी रस्त्याचा वापर करावा, असे आवाहन स्नेहा बक्षी यांनी केले आहे.

PM Kisan : सरकारने बदलले नियम, आता ‘या’ कागदपत्राशिवाय मिळणार नाहीत पैसे

PM Kisan

नवी दिल्ली । प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतील फसवणूक रोखण्यासाठी सरकारने नियम बदलले आहेत. आता पीएम किसानच्या नोंदणीसाठी रेशन कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. रेशनकार्ड क्रमांक आल्यानंतरच पती किंवा पत्नी किंवा त्या कुटुंबातील कोणत्याही एका सदस्याला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळू शकेल. या योजनेंतर्गत नवीन नोंदणीवर शिधापत्रिका क्रमांक देणे बंधनकारक असेल. याशिवाय कागदपत्राची सॉफ्ट कॉपी तयार करून पोर्टलवर अपलोड करावी लागेल.

आता ‘ही’ कागदपत्रे द्यावी लागणार आहेत
जर तुम्ही पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत पहिल्यांदाच नोंदणी केली असेल तर अर्जदाराला रेशनकार्ड नंबर अपलोड करावा लागेल. याशिवाय PDF देखील अपलोड करावी लागणार आहे. आता सात बारा, आधार कार्ड, बँक पासबुक आणि घोषणापत्राच्या हार्ड कॉपी जमा करणे बंधनकारक करण्यात आले आहे. आता कागदपत्रांची PDF फाईल तयार करून पोर्टलवर अपलोड करावी लागणार आहे. यामुळे पीएम किसान योजनेतील फसवणूक कमी होईल. तसेच, नोंदणी करणे देखील पूर्वीपेक्षा आणखी सोपे होईल.

सरकार शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये देते
पंतप्रधान किसान योजनेंतर्गत देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांना वर्षाला 6000 रुपये मिळतात. शासन ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर ऑनलाइन ट्रान्सफर करते. तुम्हीही शेतकरी असाल मात्र या योजनेचा लाभ घेऊ शकत नसाल तर काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही PM किसान सन्मान निधी मध्ये तुमचे नाव देखील नोंदवू शकता, जेणेकरून तुम्हाला सरकारच्या योजनेचा लाभ घेता येईल.

शेतकऱ्यांना तीन हप्त्यांमध्ये पैसे मिळतात
पीएम-किसान सन्मान निधी योजनेंतर्गत, लाभार्थी शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी थेट त्यांच्या बँक खात्यात एका आर्थिक वर्षात 2000 रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये 6,000 रुपयांची रक्कम हस्तांतरित केली जाते. पहिला हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलै, दुसरा हप्ता 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर आणि तिसरा हप्ता 1 डिसेंबर ते 31 मार्च या कालावधीत दिला जातो.

तुम्ही तुमचे नाव याप्रमाणे ऑनलाइन तपासू शकता
शेतकऱ्यांना प्रथम PM किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in/ वर जावे लागेल आणि होम पेजवर फार्मर्स कॉर्नरवर जावे लागेल. शेतकरी कोपऱ्यातील लाभार्थी यादीच्या लिंकवर क्लिक करा. या प्रक्रियेनंतर राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गावाचा तपशील द्यावा लागेल. सर्व माहिती भरल्यानंतर तुम्ही Get Report वर क्लिक करताच संपूर्ण लिस्ट पाहता येईल.

Stock Market : अस्थिरतेच्या दरम्यान बाजाराने आपली धार गमावली, निफ्टी 18300 च्या खाली

Stock Market Timing

 मुंबई । संमिश्र जागतिक संकेतांमुळे बाजाराची सुरुवात तेजीसह झाली आहे. सेन्सेक्स 124.86 अंकांच्या किंवा 0.20 टक्क्यांच्या वाढीसह 61,433.77 वर ट्रेड करत आहे. दुसरीकडे, निफ्टी 26.95 अंकांच्या किंवा 0.15 टक्क्यांच्या वाढीसह 18,335.05 च्या पातळीवर दिसत आहे.

आशियाई बाजारात मंदीचे ट्रेडिंग दिसून येत आहेत. जपान आणि ऑस्ट्रेलियाच्या फ्युचर्स मार्केटमध्ये तेजी दिसून येत आहे. सोमवारी अमेरिकन बाजार बंद होते. दरम्यान, ब्रेंटची किंमत $86 च्या वर राहिली आहे. तर यूएस: 10-वर्षांचे बॉण्ड यील्ड 1.81% आहे.

आज ‘या’ कंपन्यांचे निकाल
आज म्हणजेच 18 जानेवारी रोजी बजाज फायनान्स, ICICI प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्स कंपनी, L&T टेक्नोलोंजि सर्व्हिसेस, ICICI सिक्युरिटीज, Tata Elxsi, Anup Engineering, DCM Shriram, Den Networks, EKI Energy Services, Just Dial, Jyoti Structures, Network18 Media & Investments, Newgen सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीज, रामकृष्ण फोर्जिंग्ज, श्री गणेश रेमेडीज, शक्ती पंप्स (इंडिया), स्टार हाउसिंग फायनान्स, ट्रायडेंट आणि TV18 ब्रॉडकास्ट त्यांचे तिमाही निकाल जाहीर करतील.

सोमवारी बाजार
17 जानेवारी रोजी, भारतीय बाजार सलग दुसऱ्या दिवशी एका श्रेणीत ट्रेड करताना दिसला, मात्र ऑटो, पॉवर आणि रिएल्टी शेअर्समध्ये खरेदीच्या आधारावर, तो 18300 च्या वर बंद करण्यात यशस्वी झाला आहे. मात्र , बँकिंग आणि फार्मा शेअर्सनी बाजाराच्या नफ्यावर मर्यादा आणून दबाव नियंत्रणात ठेवला. आजच्या ट्रेडिंगमध्ये मिडकॅप, स्मॉलकॅप शेअर्सची खरेदी झाली. स्मॉलकॅप निर्देशांक विक्रमी उच्चांकावर बंद झाला. त्याच वेळी, ऑटो निर्देशांक 2 महिन्यांच्या उच्च पातळीवर बंद करण्यात यशस्वी झाला. आजच्या ट्रेडिंगमध्ये सिमेंट, खतांचा स्टॉक वधारला.

सेटलमेंट अर्ज सादर करण्यासाठी कमी केलेली कालमर्यादा
बाजार नियामक सेबी (SEBI) ने सेटलमेंट अर्ज भरण्याची मुदत 180 दिवसांवरून 60 दिवसांवर आणली आहे. ही यंत्रणा आणखी सक्षम करण्याच्या उद्देशाने सेबीने हे पाऊल उचलले आहे. ‘कारणे दाखवा नोटीस’ मिळाल्यापासून 60 दिवसांच्या आत सेटलमेंट किंवा रिझोल्यूशन अर्ज सादर करणे आवश्यक आहे.