Sunday, December 28, 2025
Home Blog Page 2926

“हमें तो टेलीप्रॉम्प्टर ने लूटा, अपनों में कहां दम था।” ; मोदींच्या गोंधळावरून काँग्रेसचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषणा दरम्यान टेलिप्रॉम्टरमध्ये आलेला तांत्रिक बिघाडानंतर गोंधळून गेले त्यानंतर त्यांनी काहीसा संतापही व्यक्त केला. मोदींच्याबाबतीत या घडलेल्या प्रकारानंतर काँग्रेसकडून मोदींवर निशाणा साधला जात आहे. “हमें तो टेलीप्रॉम्प्टर ने लूटा, अपनों में कहां दम था।” असे काँग्रेसने ट्विट केले असून “एवढं खोटं तर टेलिप्रॉम्टरलाही सहन झालं नाही,” असे राहुल गांधी यांनी म्हणत मोदींना टोला लगावलेला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या भाषणामुळे चर्चेत आले आहेत. या प्रकरणावरुन काँग्रेसनेही ट्विट करीत पंतप्रधानांच्या बाबतीत घडलेल्या या प्रकारची खिल्ली उडवली आहे. हमें तो टेलीप्रॉम्प्टर ने लूटा, अपनों में कहां दम था। टेलिप्रॉम्प्टर माणूस: अच्छा चलता हूं, दुआओं में याद रखना, असे ट्विट करीत काँग्रेसने अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन खिल्ली उडवली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इकॉनॉमिक फोरमच्या दाव्होस अजेंड्यात दूरसंवादाद्वारे विशेष भाषण दिले. यावेळी मोदी भाषण देत असताना अचानक टेलीप्रॉम्प्टरमध्ये बिघाड झाल्यानंतर तो बंद झाला.

यानंतर पंतप्रधान मोदी भाषण देता देता थांबले. पंतप्रधान मोदी गोंधळून आणि थोड्या संतापलेल्या हावभावासहीत स्क्रीनच्या उजवीकडे पाहू लागले. या घडलेल्या प्रकारानंतर मोदींवर काँग्रेसकडून निशाणा साधला जात आहे.

एसटीच्या कर्तव्यावर तब्बल 50 कंत्राटी चालक हजर

ST

औरंगाबाद – संपकरी कर्मचारी कर्तव्यावर परत येत नसल्याने एसटी महामंडळाने पर्यायी मार्ग शोधला असून सोमवारी मध्यवर्ती बसस्थानकात 50 कत्रांटी चालकांना नियुक्त करण्यात आले आहे. दरम्यान कंत्राटी चालकाच्या मदतीने प्रशासनाने सोमवारी 15 एसटी बसेसमध्ये प्रवाशी घेऊन जात असतांना संपकरी कर्मचाऱ्यांनी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करीत एसटीच्या या निर्णयाचा निषेध केला. या कर्मचाऱ्यांना 48 दिवसांचे प्रशिक्षण न देताच त्यांच्या हातात स्टेअरिंग देऊन प्रवाशांच्या जीवाशी खेळ केला जात असल्याचा आरोप संपकरी कर्मचाऱ्यांनी केला आहे.

मागील दोन महिन्यापासून एसटीचे चालक-वाहक संपावर गेले आहे. जो पर्यत विलिनीकरण होत नाही तो पर्यत माघार घेणार नाही अशी भूमिका संपकरी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे आता शासनानेच चालक पुरविण्याची जबाबदारी मुंबई येथील अस्तीत्व मल्टीपर्पज सर्व्हिस या एजन्सीला सोपविली आहे. या एजन्सीने सोमवारी औरंगाबादेतील मध्यवर्ती बसस्थानकाला 50 चालक दिले. या चालकांमार्फत विविध मार्गावर लालपरीची सेवा सुरू करण्यात आली आहे. दरम्यान संपकरी कर्मचाऱ्यांनी खाजगी एजन्सीमार्फत नियुक्त करण्यात आलेल्या चालकाचा विरोध करीत बसस्थानक परिसरात घोषणाबाजी करत विरोध दर्शवला. या घटनेनंतर पोलिस आणि एसटी प्रशासनाने मध्यस्थी करत खासगी कंत्राटी चालकांच्या ताब्यातील लालपरी विविध मार्गावर रवाना केल्या. सोमवारी दुपारी 15 कंत्राटी चालक हे आपल्या कर्तव्यावर हजर झाले. हजर झालेले चालक हे लालपरीत प्रवासी घेऊन सिल्लोड, कन्नड, पैठण आणि नगरकडे रवाना झाले.

आणखी दोन कर्मचारी बडतर्फ –
औरंगाबाद विभागात संपकरी कर्मचार्यांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. सोमवारी दोन कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. आतापर्यत बडतर्फ करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची संख्याही 69 वर जाऊन पोहचली आहे.

साताऱ्यात ट्रक, क्रेन जप्त : अवैध लाकूड वाहतूक प्रकरणी दोघांवर वनविभागाची कारवाई

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

वनविभागाचे कर्मचारी रात्रगस्त घालत असताना मौजे गजवडी गावाच्या हद्दीत फणस, अकेशिया झाडांच्या लाकडांची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या ट्रक व क्रेनवर कारवाई करण्यात आली. याप्रकरणी सांगली व सातारा जिल्ह्यातील दोघांवरही कारवाई करण्यात आल्याची माहिती वनविभागाने दिली.

वनविभागाने दिलेली माहिती अशी, सातारा वनविभाग अधिकारी व कर्मचारी रात्रगस्त घालत होते. यावेळी गजवडी गावच्या हद्दीत लाकडांची अवैधरित्या वाहतूक केली जात होती. या वाहतूकीतील वाहन ट्रक (क्र. एम.एच 10 सी.आर. 4891) पकडण्यात आला. तर सदरचा लाकूड भरण्यासाठी वापरणेत आलेली क्रेन वाहन (क्र. एम.एच. 11 सी. डब्ल्यु. 1140) देखील जप्त करणेत आली. सदर प्रकरणी विजय दत्तात्रय साठे (रा.कवठे महाकाळ, जि.सांगली), मयुर सतीश फणसे (रा.देगांव ता.जि. सातारा) यांचेवर कारवाई करणेत आली. अवैध वृक्षतोड करणे तसेच त्याची विनापरवाना वाहतूक करणे हे भारतीय वन अधिनियम, 1927 नुसार गुन्हा आहे. कोणीही अशा प्रकारचे कृत्य करत असेल तर वनविभागास तात्काळ कळवावे असे आवाहन करणेत येत आहे.

सदरची कारवाई उपवनसंरक्षक (प्रा.) सातारा महादेव मोहिते, सहाय्यक वनसंरक्षक (वनी) सुधीर सोनवले यांचे मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल सातारा डॉ. निवृत्ती चव्हाण, वनपाल रोहोट मारुती माने, वनपाल परळी अशोक मलप, वनरक्षक सुहास भोसले, राजकुमार मोसलगी, सूर्याजी ढोबरे, महेश सोनावले, संतोष काळे, श्रीमती साधना राठोड, श्रीमती सिंधू सानप य वाहनचालक संतोष दळवी, सुमित वाघ, शैलेश वाघ यांनी केली.

मी पंतप्रधान मोदींबद्दल नव्हे तर गावगुंड मोदी बाबत बोललो; नाना पटोलेंचा खुलासा

Nana Patole

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आपण मोदींना मारू शकतो, शिव्या देऊ शकतो असे वादग्रस्त विधान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरल्या नंतर सर्वच स्तरातून नाना पटोले यांच्यावर विरोधकांनी निशाणा साधला. त्यानंतर नाना पटोले यांनी यावर स्पष्टीकरण देत आपण पंतप्रधान मोदींबद्दल नव्हे तर गावगुंड मोदी बाबत बोललो असे नाना पटोले म्हणाले.

आमच्या भागात मोदी नावाचा एक गावगुंड आहे. त्याची तक्रार गाववाले करत होते. मी त्यांना सांगत होतो की घाबरू नका मी तुमच्या सोबत आहे आणि मला कुणाला घाबरण्याची गरज नाही. त्या व्हिडीओत मी पंतप्रधानांचा उल्लेख केला नाही किंवा नरेंद्र असा शब्दही वापरला नाही. मोदी नावाचा गावगुंड आहे, त्याबद्दल मी बोललो आहे”, असं स्पष्टीकरण नाना पटोले यांनी दिले.

दरम्यान, नाना पटोले यांच्या वक्तव्याचा भाजपने खरपूस समाचार घेतला. नाना पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी भाजप कडून केली जात आहे. तर हीच का काँग्रेस संस्कृती असा सवाल भाजप नेते करत आहेत.

भाषण करताना टेलिप्रॉम्टर बंद पडला अन् मोदींचा गोंधळ उडाला ; पहा Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या भाषणबाजीमुळे जगप्रसिद्ध असलेले आणि लोकांना मंत्रमुग्ध करणारी व्यक्ती म्हणून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ओळखले जाते. त्यांच्याबाबतीत आज भाषण करताना त्यांचा गोंधळ उडाल्याचे पहायला मिळाले. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दाव्होस अजेंड्यात दूरसंवादाद्वारे विशेष भाषण दिले. या भाषणा दरम्यान टेलिप्रॉम्टरमध्ये आलेला तांत्रिक बिघाडानंतर पंतप्रधान मोदी काहीशे गोंधळून गेले त्यानंतर त्यांनी संतापही व्यक्त केला.

याबाबत अधिक माहिती अशी कि, काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इकॉनॉमिक फोरमच्या दाव्होस अजेंड्यात दूरसंवादाद्वारे विशेष भाषण दिले. यावेळी त्यांनी आर्थिक वाढ कायम राखतानाच भारत संपूर्ण खबरदारीसह कोरोनाच्या आणखी एका लाटेशी लढा देत आहे असे सांगत असताना अचानक टेलिप्रॉम्टरमध्ये बिघाड झाल्यानंतर तो बंद झाला. यानंतर पंतप्रधान मोदी भाषण देता देता थांबले. पंतप्रधान मोदी गोंधळून आणि थोड्या संतापलेल्या हावभावासहीत स्क्रीनच्या उजवीकडे पाहू लागले.

या घडलेल्या प्रकारानंतर मोदी यांनी निराश होऊन हात वर करत अखेर कानात हेडफोन लावत आपल्या भाषणामध्ये झालेल्या गोंधळानंतर समोरच्यांना ऐकू येतंय का हे विचारले. या साऱ्या प्रकारामध्ये पंतप्रधान मोदी चांगलेच गोंधळलेले दिसले. टेलिप्रॉम्टर बंद झाल्यानंतर पंतप्रधानांना न अडखळता एक वाक्यही बोलता आले नसल्याची टीका सोशल मीडियावरुन मोदी यांच्यावर होऊ लागली आहे.

कार्वेनाका येथे बंद फ्लॅट फोडला : चोरट्यांनी अडीच लाखाचे दागिने केले लंपास

crime

कराड | शहरातील कार्वेनाका येथे बंद फ्लॅटचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी घरातील अडीच लाखाचे दागिने लंपास केले. कार्वेनाका येथे थोरात हॉस्पिटलशेजारी घडलेली ही घटना रविवारी उघडकीस आली. याबाबत संतोष शंकर जाधव (रा. मलकापूर) यांनी रविवारी रात्री कराड शहर पोलिसात फिर्याद दिली आहे.

चोरीस गेलेल्या ऐवजामध्ये 44 हजार रुपयांचे मंगळसुत्र, 44 हजार रुपयांचे झुमके, 13 हजार 200 रुपयांचे कानातील टॉप्स, 13 हजार 200 बुगडी, 22 हजार रुपयांची अंगठी, 17 हजार 600 रुपयांची अंगठी, 13 हजार 200 रुपयांचे बदाम, 36 हजार 600 रुपयांच्या दोन वेढणी अंगठ्या, 17 हजार 600 रुपयांच्या कानातील दोन रिंग, 8 हजार 800 रुपयांची नथ, 8 हजार 800 रुपयांच्या लहान मुलांच्या 5 अंगठ्या व 4 बदाम, 15 हजार रुपयांची चांदीची वाटी, शिक्का, पैंजण, वाळे, कमरपट्टा, जोडण्या आदी 2 लाख 59 हजार रुपयांच्या ऐवजाचा समावेश आहे.

याबाबत संतोष कदम यांनी कराड शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी अज्ञातावर गुन्हा नोंद केला आहे.

औरंगाबादेत 14 नवीन ओमायक्रॉन रुग्णांचे निदान

औरंगाबाद – औरंगाबादेत सोमवारी 14 नव्या ओमायक्राॅन रुग्णांचे निदान झाले असून, आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. दरम्यान, सर्व रुग्ण आता निगेटिव्ह आहेत. औरंगाबादेतील आतापर्यंत आढळेल्या एकूण ओमायक्राॅनच्या रुग्णांची संख्या आता 19 झाली आहे.

ओमायक्राॅन लागण आतापर्यंत परदेशवारी करून आलेल्यांनाच होत असल्याचे समोर येत होते. परंतु परदेशवारी केलेली नसतानाही ओमायक्राॅन गाठत आहे. शनिवारी दोन रुग्णांचा अहवाल प्राप्त झाला होता. यातील 36 वर्षीय तरुण डिसेंबरमध्ये पश्चिम आफ्रिकेहून परतला आहे, तर 27 वर्षीय कोरोना योध्द्या तरुणीने कोणताही आंतरराष्ट्रीय प्रवास केलेला नाही. सुदैवाने हे दोघेही आता निगेटिव्ह आहेत. अवघ्या दोन दिवसांनी औरंगाबादेत एकाच दिवसात 14 नव्या रुग्णांची भर पडली आहे.

औरंगाबादेत यापूर्वी लंडनहून मुंबईमार्गे आलेल्या 50 वर्षीय गृहस्थासह दुबईहून आलेला सिडको, एन-7 येथील 33 वर्षीय तरुण ओमायक्राॅनग्रस्त असल्याचे 25 डिसेंबर रोजी समोर आले. अमेरिकेहून प्रवास करून आलेल्या 24 वर्षीय रुग्णाचा 9 जानेवारी रोजी अहवाल आला आणि तो ओमायक्राॅनबाधित असल्याचे निदान झाले.

किरण माने प्रकरणात रुपाली चाकणकरांची उडी; निर्मात्यांना खुलासा करण्याचे आदेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | प्रसिध्द मराठी अभिनेते किरण माने याना स्टार प्रवाह वरील मुलगी झाली हो मालिकेतून काढून टाकले. आपण राजकीय विषयांवर भाष्य करत असल्याने आपल्याला काढून टाकण्यात आले असा आरोप किरण माने यांनी केल्यानंतर राजकीय वातावरण देखील तापलं. त्यातच आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यानी पॅनोरामा इंटरटेनमेंट या निर्मिती संस्थेच्या पदाधिकारी सुझाना घई यांना एक पत्र लिहित घडलेल्या प्रकरणाचे स्पष्टीकरण मागितलं आहे. या पत्रात किरण माने यांच्या पत्नी ललिता किरण माने यांच्या तक्रारीचा देखील उल्लेख केला आहे

स्टार प्रवाह या वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतील अभिनेते किरण माने यांना कोणतीही पूर्वसूचना न देता विविध माध्यमांवर आपल्या वैचारिक भूमिका मांडतात या कारणामुळे या मालिकेतून काढून टाकलं असून मालिका निर्मात्याच्या या कृतीमुळे एका प्रगल्भ अभिनेत्यावर अन्याय झाला आहे. यासोबतच कुटुंब आर्थिक संकटात सापडून मानसिक तणावात आहे असे किरण माने यांच्या पत्नी यांनी राज्य महिला आयोगाकडे केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. असे रुपाली चाकणकर यांनी म्हंटल.

कलावंतांनी वैचारिक राजकीय भूमिका मांडल्यामुळे त्यांना मालिकेतून काढून टाकणे ही बाब कलाकाराच्या वैचारिक व्यक्तिस्वातंत्र्यावर हल्ला करणारी असल्यामुळे याबाबतीतचा लेखी खुलासा राज्य महिला आयोगास सादर करण्याचे निर्देश या मालिकेच्या निर्मात्यांना देण्यात आलेले आहेत. असे ट्विट रुपाली चाकणकर यांनी म्हंटल.

नाना भाऊ, शारीरिक उंचीबरोबर बौद्धिक उंचीही हवी !; देवेंद्र फडणवीसांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे भाजप नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीसही आक्रमक झाले. त्यांनी नाना पटोले हे बडबड करणारे व्यक्ती आहेत. त्यांची नुसती शारीरिक उंची आहे. त्याची बौद्धिक उंची नाही. त्यामुळे नाना भाऊ, शारीरिक उंचीबरोबर बौद्धिक उंचीही हवी, असे फडणवीसांनी म्हंटले.

देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून काँग्रेस आणि पटोलेंवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, काँग्रेस पक्ष कुठे चालला आहे? एकेकाळी स्वातंत्र्यलढ्यातील सहभागासाठी ओळखले जाणारे, आता केवळ सत्तेसाठी इतके खाली झुकत आहेत? काँग्रेस हा लोकशाही व्यवस्थेतील राजकीय पक्ष आहे की दहशत पसरवणारी संघटना? नाना भाऊ, शारीरिक उंचीबरोबर बौद्धिक उंचीही हवी !, अशी टीका फडणवीसांनी केली आहे.

यानंतर फडणवीस यांनी पटोले अंडी काँग्रेसवर निशाणा साधला असून त्यांनी टोलाही लगावला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, पंजाबमध्ये पाकिस्तान सीमेजवळ पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या सुरक्षेचा भंग, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी फोनवर बोलण्यासही नकार दिला ! आणि आता महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष म्हणतात, “तो मोदींना मारू शकतो, मारू शकतो, मोदींना शिव्या देऊ शकतो…”, असे फडणवीस यांनी ट्विट करीत पटोलेंच्या वक्तव्याचा व्हिडीओ शेअर केला आहे.

पटोले नेमकं काय म्हणाले?

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी “मी का भांडतो? मी आता मागील 30 वर्षापासून राजकारणात आहे. लोकं पाच वर्षात आपल्या एका पिढीचा उद्धार करुन टाकतात. शाळा, कॉलेज हे करुन आपल्या एक-दोन पिढीचा उद्धार करुन टाकतात. मी एवढ्या वर्षाच्या राजकारणात एक शाळा नाही घेतली. एक ठेकेदारी नाही केली. जो आला त्याला मदत करतो. म्हणून मी मोदीला मारु शकतो, त्याला शिव्या देऊ शकतो आणि म्हणून मोदी माझ्या विरोधात प्रचाराला आला. एक प्रमाणिक नेतृत्व तुमच्या इथे आहे….”असं आक्षेपार्ह आणि वादग्रस्त वक्तव्य नाना पटोले यांनी व्हिडीओमध्ये केले आहे.

दुर्देवी : शेततळ्यात बुडून सख्या भाऊ-बहिणीचा मृत्यू

पाटण | रोमनवाडी (येराड) (ता. पाटण) येथे सोमवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास शेततळ्यात बुडुन सख्खा बहिण- भावाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या दुर्देवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

याबाबत स्थानिकांकडून मिळालेली माहिती अशी, रोमनवाडी येथील एका फार्म हाऊसवर कामावर असलेले सचिन जाधव (रा. रोमनवाडी) यांच्याकडे पाहुणे म्हणून अनिल पवार (रा. काठी, ता. पाटण) हे आपल्या पत्नीसह दोन मुलासमवेत आले होते. यावेळी सौरभ अनिल पवार (वय- 16 रा. काठी) व पायल अनिल पवार (वय- 14) ही दोन मुले पळत शेततळ्याकडे गेली होती. यावेळी शेततळ्यात मुलाचा पाय घसरल्याने तो बुडत असताना, त्याला वाचवायला बहिण पायल ही गेली असता तीही बुडु लागली. ही बाब सचिन जाधव व मुलाचे आई-वडील यांना समजातच ते पळत गेले. मात्र तोपर्यंत दोन्हीही मुले पाण्यात बुडलेली होती. रात्री 8 वाजता शिरळ येथील मासेमारी करणाऱ्या लोकांनी दोन्ही मुलांना बाहेर काढले.

मुलगा रेठरे येथे आयटीआय व मुलगी विजयनगर येथे इयत्ता आठवीत शिकत आहे. भाऊ-बहिणीच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, रात्री उशिरा पाटण ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर दोन्ही मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. घटनास्थळी पाटणचे पीएसआय महेश पाटील व कर्मचारी यांनी भेट देऊन पंचनामा केला. यावेळी सरपंच प्रकाश साळुंखे, गावकामगार तलाठी पी. जी. शिंदे उपस्थित होते.