Sunday, December 28, 2025
Home Blog Page 2928

पंजाब विधानसभा निवडणूका पुढे ढकलल्या; आता ‘या’ दिवशी होणार मतदान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी उत्तरप्रदेश, मणिपूर, गोवा, पंजाब आणि उत्तराखंड राज्याच्या निवडणूका निवडणुक आयोगाकडून जाहीर करण्यात आल्या होत्या. त्यातील पंजाब विधानसभा निवडणुकीच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री चन्नी यांनी याबाबत निवडणूक आयोगाला पत्र लिहिले होते, त्यांनतर निवडणूक आयोगाने निवडणूका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला

निवडणूक आयोगाने यापूर्वी पंजाबमध्ये मतदानाची तारीख १४ फेब्रुवारीला घोषित केली होती. पण १६ फेब्रुवारीला संत रविदास जयंती असल्याने राजकीय पक्षांनी निवडणुका काही दिवस पुढे ढकलण्याची मागणी केली होती. त्यानुसार आता १४ फ्रेब्रुवारी ऐवजी २० फेब्रुवारी ला मतदान होईल असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं

पंजाबमधून १६ फेब्रुवारी या दिवशी मोठ्या संख्येने लोक उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील गुरूच्या जन्मस्थानाला भेट देतात. त्यामुळे १४ फेब्रुवारीला मतदान आणि यूपीतील निवडणुकांमुळे भाविकांना तिथे पोहोचणे कठीण होणार आहे. त्यामुळे मतदानाची तारीख ६ दिवस पुढे ढकलावी, अशी मागणी पंजाबमधील सर्वपक्षांनी केली होती.

सुमारे 50 स्टार्टअप युनिकॉर्न बनण्यासाठी तयार, 2022 मध्ये एकूण संख्या 100 पेक्षा जास्त होणार

मुंबई । देशातील स्टार्टअप्स सध्या जगभरात नाव कमावत आहेत. स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने अलीकडेच 16 जानेवारी हा नॅशनल स्टार्टअप डे म्हणून घोषित केला आहे. आता भारतीय स्टार्टअप्ससाठी आणखी एक आनंदाची बातमी आली आहे. ऍडव्हायजरी फर्म PwC इंडियाच्या रिपोर्ट्सनुसार, 2022 मध्ये भारतातील सुमारे 50 स्टार्टअप युनिकॉर्न बनू शकतात. म्हणजेच त्यांचे मूल्यांकन एक अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त वाढू शकते.

सोमवारी समोर आलेल्या रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, 2022 मध्ये एक अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त मूल्यांकन असलेल्या स्टार्टअपची संख्या 100 पेक्षा जास्त असू शकते. 2021 मध्ये भारतातील लिस्टेड आणि अलिस्टेड कंपन्यांच्या मूल्यांकनात मोठी वाढ झाली आणि या कालावधीत युनिकॉर्नची संख्या 68 पर्यंत वाढली. 2021 मध्ये देशात 43 युनिकॉर्न जोडले गेले.

मोठी गुंतवणूक येत आहे
PwC India च्या मते, एकट्या ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत भारतीय स्टार्टअप इकोसिस्टममध्ये USD पेक्षा जास्त 10 अब्ज गुंतवले गेले. फर्मचे पार्टनर अमित नवका यांनी सांगितले की,”कॅलेंडर वर्ष 2021 मध्ये, विकास पातळीचे सौदे झपाट्याने वाढले, जे युनिकॉर्न स्थिती प्राप्त करण्याची क्षमता असलेल्या कंपन्यांचा मजबूत आधार दर्शवितात.” ते पुढे म्हणाले की,”स्टार्टअप्ससाठी बाजारातील सेंटीमेंट अनुकूल आहे आणि 2022 च्या अखेरीस युनिकॉर्नची संख्या 100 पेक्षा जास्त होईल.”

नॅशनल स्टार्टअप डे जाहीर
नॅशनल स्टार्टअप डेच्या घोषणेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की,”2013-14 मध्ये जिथे चार हजार पेटंट मंजूर झाले होते, गेल्या वर्षी त्यांची संख्या 28 हजारांहून जास्त झाली आहे.”

ते म्हणाले की,”आज देशात 60,000 हून जास्त स्टार्टअप युनिट्स आहेत. यापैकी 42 युनिकॉर्न (एक अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त किमतीचे) आहेत.” मोदी पुढे म्हणाले की, “भविष्‍यातील तंत्रज्ञानासाठी रिसर्च एंड डेव्हलपमेंटमध्ये गुंतवणूक करणे ही सरकारची प्राथमिकता आहे. भारतामध्ये सुरू असलेल्या इनोव्हेशन मोहिमेमुळे ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्समध्ये देशाची क्रमवारी सुधारण्यास मदत झाली आहे. वर्ष 2015 मध्ये, भारत या क्रमवारीत 81 व्या क्रमांकावर होता आणि आता ते इनोव्हेशन इंडेक्समध्ये 46 व्या स्थानावर आहे.

राऊतांनी हिंमत असेल तर गोव्यात निवडणूक लढवावी; चंद्रकांतदादांचे आव्हान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गोवा विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाचे दिवंगत नेते मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर हे अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सर्व पक्षांनी उत्पल पर्रीकर यांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी निशाणा साधला आहे. “राऊत यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी गोव्यातील एक मतदार संघ लढवावा. पंतप्रधान मोदी गुजरातमधून जातात आणि उत्तर प्रदेशातून लढतात तसे तुम्हीही लढा,” असे आव्हान पाटील यांनी दिले.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “संजय राऊतांनी मनोहर पर्रिकरांच्या मुलाबद्दल कशाला भाष्य करायचे? तुमचे तिथे ऐकायला कोण बसलं आहे? आपच्या पक्षाकडे अध्यक्ष आहे पण बाकीच्या पक्षांना अध्यक्ष ठरवण्याची सवय नाही. पर्रिकरांच्या मुलाला भाजपाने तिकीट दिले तर तुम्ही सर्व जण निवडणूक लढणार नाही असे सांगावे.

मनोहर पर्रीकर यांनी 25 वर्षे निवडणूक लढवली होती. मनोहर पर्रीकर यांचा मुलगा उत्पल याने अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले आहे. त्यानंतर संजय राऊत यांनी ट्विट करत यावर भाष्य केले. संजय राऊत यांच्या ट्विटवर चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया देत टीका केली आहे.

Share Market : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजार ग्रीन मार्कवर बंद

Share Market

नवी दिल्ली । सोमवार, 17 जानेवारी 2022 रोजी भारतीय शेअर बाजार देखील ग्रीन मार्कमध्ये होता, मात्र वाढ फार मोठी नव्हती. निफ्टी 50 आज 0.30% म्हणजेच 54.30 अंकांच्या वाढीसह 18310.10 वर बंद झाला. BSE सेन्सेक्स 0.17% किंवा 106 अंकांनी वाढून 61329.03 वर बंद झाला. निफ्टी बँक निर्देशांक -0.31% किंवा 117.90 अंकांनी घसरून 38252.50 वर बंद झाला.

शेअर बाजारातील बहुतांश क्षेत्रांमध्ये खरेदी दिसून आली. ऑटो, रिएलिटी आणि एनर्जी हे सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या निर्देशांकांमध्ये होते. निफ्टी ऑटो 2 टक्क्यांहून अधिकने वाढले, तर रिएलिटी आणि एनर्जी यांनी अनुक्रमे 1.28% आणि 1.27% वाढ नोंदवली. रेड मार्कवर बंद झालेले निर्देशांक फार्मा, बँक, फायनान्स आणि आयटी होते.

निफ्टी 50 चे टॉप 5 गेनर्स
Hero MotoCorp +5.13 %
Grasim Inds. +3.31 %
Tata Motors Ltd.+2.98 %
ONGC +2.96%
UltraTech Cement+2.74 %

निफ्टी 50 चे टॉप 5 लुझर्स
HCL Technologies – 5.77%
HDFC Bank -1.43%
Britannia Ind. -1.27%
Cipla -1.25%
Axis Bank Ltd. -1.23 %

आता ‘या’ बँकेच्या क्रेडिट कार्ड युझर्सकडून आकारले जाणार जास्त शुल्क, कसे ते जाणून घ्या

Credit Card

नवी दिल्ली । नवीन वर्षात बँका आपल्या सर्विस चार्जमध्ये बदल करत आहेत. अनेक बँकांनी क्रेडिट कार्ड, एटीएम किंवा इंटरनेट बँकिंग चार्जमध्ये बदल केले आहेत किंवा काही ते करणार आहेत. या एपिसोडमध्ये खाजगी क्षेत्रातील मोठी बँक असलेल्या ICICI बँकेने आपल्या क्रेडिट कार्डच्या शुल्कात वाढ केली आहे.

ICICI बँकेने आपल्या क्रेडिट कार्डांशी संबंधित विविध शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. हे वाढीव शुल्क 10 फेब्रुवारीपासून लागू होणार आहे. नवीन शुल्कासाठी बँकेने आपल्या ग्राहकांना माहिती देण्यास सुरुवात केली आहे. बँकेने म्हटले आहे की, 10 फेब्रुवारी 2022 पासून क्रेडिट कार्ड लेट पेमेंट फीस, कॅश ऍडव्हान्स ट्रान्सझॅक्शन चार्ज, चेक रिटर्न फीस, ऑटो डेबिट रिटर्न फीस चार्ज वाढवण्यात आला आहे. यासंदर्भातील नोटीस बँकेच्या वेबसाइटवर जारी करण्यात आली आहे.

icici bank

नवीन शुल्क काय असतील जाणून घ्या
वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, 10 फेब्रुवारीपासून, ICICI बँक क्रेडिट कार्डवरून कॅश ऍडव्हान्स रक्कम घेतल्यास ट्रान्सझॅक्शन चार्ज 2.50 टक्के असेल, जे किमान 500 रुपयांपर्यंत असेल. चेक रिटर्न फी आणि ऑटो डेबिट रिटर्न फी एकूण रकमेच्या 2% असेल, जी किमान 500 रुपये असेल. बँकेचे असेही म्हणणे आहे की, चेक रिटर्न फी आणि ऑटो डेबिट रिटर्न फीच्या बाबतीत, ग्राहकाच्या बचत खात्यातून 50 रुपये + जीएसटी कापला जाईल.

ICICI बँकेचे Emerald क्रेडिट कार्ड वगळता सर्व प्रकारच्या क्रेडिट कार्डांची बिले न भरल्यास, लेट पेमेंट फीस खालीलप्रमाणे असेल-

100 रुपयांपेक्षा कमी पेमेंटसाठी – शून्य चार्ज
100 ते 500 रुपयांपर्यंतच्या पेमेंटसाठी – 500 रुपये चार्ज
500 ते 5000 रुपयांपर्यंतच्या पेमेंटसाठी – 750 रुपये चार्ज
5000 ते 10,000 रुपयांपर्यंतच्या बॅलन्ससाठी – 900 रुपये चार्ज

पंजाब नॅशनल बँकेनेही शुल्क वाढवले ​​आहे
पंजाब नॅशनल बँकेने (PNB) देखील आपल्या काही सर्विस चार्जमध्ये वाढ केली आहे. यामध्ये लॉकर चार्जेस आणि खात्यातील मिनिमम बॅलन्स न ठेवण्याचे चार्ज समाविष्ट आहे. हे बदल 15 जानेवारीपासून करण्यात आले आहेत. PNB च्या वेबसाइटनुसार, मेट्रो क्षेत्रातील ग्राहकांसाठी करंट अकाउंटमधील तिमाही सरासरी शिल्लक रकमेची मर्यादा 10,000 रुपये करण्यात आली आहे. यापूर्वी ही मर्यादा 5000 रुपये होती. खात्यात मिनिमम बॅलन्स न ठेवल्यास आता ग्रामीण आणि निमशहरी भागातील लोकांना प्रति तिमाही 400 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. यापूर्वी हे शुल्क 200 रुपये तिमाही होते.

काॅलेज युवतीचे भरदिवसा अपहरण : पुणे- बंगळूर महामार्गावर पिडीत तरूणी दुचाकीवरून पडल्याने जखमी

Satara Police City

सातारा | सातारा शहरातील एका काॅलेजच्या परिसरात 20 वर्षीय युवतीचे चक्क दुचाकीवरून अपहरण केल्याची घटना समोर आले आहे. संशयित बहाद्दराने भरदिवसा अपहरण केले होते. ‘तू आताच माझ्याशी लग्न कर, नाहीतर तुला सोडणारच नाही,’ अशी धमकीही दिली. संशयिताने पीडित तरुणीला पुणे -बंगळूरु राष्ट्रीय महामार्गावर घेवून गेला होता. तेव्हा डी मार्ट परिसरात धावत्या दुचाकीवरून तरूणी खाली पडल्याने जखमी झाली आहे. या धक्कादायक प्रकारानंतर सातारा शहर पोलीस ठाण्यात तरूणीने फिर्याद दिली आहे. या प्रकरणी प्रतीक संतोष गायकवाड (रा. फलटण) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी घटनेच्या दिवशी 6 जानेवारी रोजी सकाळी 11.15 वाजण्याच्या सुमारास धनंजय गाडगीळ कॉलेजसमोर उभी होती. दरम्यान याठिकाणी प्रतीक गायकवाड हा आपल्या दुचाकीवरुन तेथे आला. त्याने युवतीला जबरदस्ती करत आपल्या दुचाकीवर बसवलं. यानंतर त्याने युवतीला ‘तू आताच माझ्याशी लग्न कर, नाहीतर मी तुला सोडणारच नाही,’ अशी धमकी दिली.

प्रतीक गायकवाड याने पीडित तरुणीला दुचाकीवर बसवून पोवई नाका, वाढेफाटा मार्गे पुणे बंगळूरु राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या डी मार्टसमोर आणलं. याठिकाणी पीडित तरुणीनं दुचाकीवरून पाय टेकवत खाली उतरण्याचा प्रयत्न केला. पण दुचाकी तशीच पुढे गेल्याने ती खाली पडली. या अपघातात तिच्या हाताला, पायाला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. या धक्कादायक प्रकारानंतर पीडित तरुणीने सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

हर्सूल कारागृहातील दोन कैद्यांचा मृत्यु

harsul jail
harsul jail

औरंगाबाद – कोठेवाडी प्रकरणात मोक्का अंतर्गत हर्सूल तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्यासह अन्य एका कैद्याचा आज मृत्यू झाला. कोठेवाडी प्रकरणातील कैद्याचा हृदयविकाराच्या धक्क्याने तर दुसऱ्या कैद्याचा उपचारदरम्यान मृत्यू झाल्याची माहिती आहे.

हर्सूल कारागृहात हाब्या पानमळ्या भोसले (55, कैदी क्रमांक सी- 6544) हा मोक्का न्यायालयाने सुनावलेली शिक्षा भोगत होता. आज सकाळी 7 वाजेच्या दरम्यान त्याला कारागृहातून घाटी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात येत होते. यावेळी हृदयविकाराच्या धक्क्याने त्याचा मृत्यू झाला. तर, रमेश नागोराव चक्रुपे (60, कैदी क्रमांक सी- 8752) हा आरोपी घाटी रुग्णालयातील वार्ड क्रमांक 10 मध्ये उपचार घेत होता. आज पहाटे अडीज वाजेच्या सुमारास त्याचे उपचार दरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, दोन्ही आरोपी हे बाहेरील जिल्ह्यातील होते. मागील काही काळापासून ते हर्सूल कारागृहात शिक्षा भोगत होते.

काय होते कोठेवाडी प्रकरण ? –
17 जानेवारी 2001 रोजी मध्यरात्री साडेतीन वाजता कोठेवाडी (ता. पाथर्डी, जि. नगर) येथे संपूर्ण वस्तीवर 10 ते 15 आरोपींनी दरोडा घालून जबर मारहाण करीत चार महिलांवर सामूहिक बलात्कार केला होता. या वस्तीवरुन 44 हजार 35 रुपयांचे दागिने लुटले होते. सर्व 13 आरोपींना कोठेवाडी प्रकरणात नगरच्या न्यायालयाने जन्मठेप ठोठावण्यात आली होती. यावेळी सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांनी काम पाहिले होते. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजलेल्या कोठेवाडीतील दरोडा-बलात्कार प्रकरणासह आरोपींचा पाथर्डी, गंगापूर व वैजापूर तालुक्यांमध्ये दरोडा, मारहाण, बलात्कार, सामूहिक बलात्कार आदी गुन्ह्यातील सहभाग पोलिसांच्या निदर्शनास आला. यामुळे सर्व आरोपींवर औरंगाबादच्या विशेष मोक्का न्यायालयात खटला चालला. येथे 13 आरोपींना 12 वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी 10 लाखांचा, तर एकूण 1 कोटी 30 लाखांचा दंड मोक्का न्यायालयाने ठोठावला.

रोहित शर्माच होणार भारताचा कसोटी कर्णधार; पण ‘ही’ असेल अट

Rohit Sharma

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताचा 1-2 असा पराभव झाल्यानंतर विराट कोहलीने कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिला. त्यांनतर विराट कोहलीच्या जागी उपकर्णधार रोहित शर्मा हाच भारताचा कर्णधार असल्याची शक्यता आहे.बीसीसीआय कडून लवकरच याबाबत अधिकृत घोषणा केली जाऊ शकते.

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने याबाबत सांगितले की, ‘रोहित शर्माला भारताचा नवा कसोटी कर्णधार बनवण्यात येईल यात शंका नाही. दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी रोहित शर्माला कसोटी संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले होते, त्यामुळे तो कर्णधारपदासाठी सज्ज झाला असून लवकरच याबाबत घोषणा केली जाऊ शकते. रोहितवर कामाचा खूप ताण असेल, त्याला स्वतःला खूप तंदुरुस्त ठेवावे लागेल. मला वाटते की निवडकर्त्यांनी त्याच्याशी चर्चा केली असेल. त्याला त्याच्या फिटनेसवर जास्त मेहनत करावी लागणार आहे.

आगामी काळात श्रीलंकेविरुद्धतील मायदेशात होणाऱ्या कसोटी मालिकेत रोहित फुल्ल टाइम कसोटी कर्णधार असेल. त्याचवेळी केएल राहुल आणि ऋषभ पंत यांच्याकडे बीसीसीआय भावी कर्णधार या दृष्टीने पाहत आहे. या दोघात कोणाला उपकर्णधार करायचं यावर बीसीसीआय विचार करत असून यातील जो उपकर्णधार असेल तोच भारताचा भविष्यातील लीडर असेल असेही त्या अधिकाऱ्याने स्पष्ट केलं

 

प्रश्न विचारायला नाही तर प्रश्न सोडवायला अक्कल लागते; चित्रा वाघ यांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसापूर्वी विरोधकांवर टीका केली होती की, प्रश्न विचारायला अक्कल लागते. त्यांच्या या वक्तव्यावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. “मुख्यमंत्री साहेब प्रश्न विचारायला नाही तर प्रश्न सोडवायला अक्कल लागते. जर थोडी अक्कल शिल्लक राहिली असेल तर सरकाने महिलांच्या रक्षणासाठी वापरावी,” अशी टीका वाघ यांनी केली.

चित्रा वाघ यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मध्यंतरी टीका करताना प्रश्न विचारायला अक्कल लागते असे म्हंटले. वास्तविक पाहता दोन वर्षांमध्ये या महाविकास आघाडी सरकारची अक्कल कुठे गेली होती? या सरकारची अक्कल ही खंडणी गोळा करणे, गांजा बहाद्दरांना, गुन्हेगारांना वाचवण्यामध्ये वाया गेली आहे.

यावेळी चित्रा वाघ यांनी अभिनेता किरण माने याच्या प्रकरणावरबाबतही मत व्यक्त केले. त्या म्हणाल्या की, किरण माने याने मालिकेतून काढल्यानंतर नवीन नाटक उभे केले आहे. अशा हरामखोरांना शिक्षा व्हायला पाहिजे. कायदा हा सर्वांना समान आहे. महिलांचा अवमान करणे, त्यांना अपशब्द वापरणे हे त्यांच्या सोबत काम करणाऱ्या महिलांच्या पोस्ट आहेत. माने काळे आहे की गोरा हे देखील मला माहिती नाही. मात्र, कायदा हा सर्वांना सारखा आहे. त्यामुळे त्याप्रमाणे सर्वांना शिक्षा व्हावी, अशी मागणी वाघ यांनी केली.

Cryptocurrency Prices : LUS ने घेतली 3000% पेक्षा जास्त उसळी तर Bitcoin अन Dogecoin घसरले

नवी दिल्ली । गेल्या 24 तासांत क्रिप्टोकरन्सी मार्केट 0.96% ने खाली आले आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 2:30 वाजता, जागतिक क्रिप्टो मार्केट कॅप $2.05T ट्रिलियन पर्यंत खाली आले आहे. बिटकॉइन आणि इथेरियम हे दोन्ही मोठे कॉइन रेड मार्कवर ट्रेड करत होते. सोमवारी, कार्डानोने 12 टक्क्यांहून जास्तीची उडी घेतली.

सोमवारी, बिटकॉइन 0.70% खाली $42,836 वर ट्रेड करत होता. बिटकॉइनने गेल्या 24 तासांत $42,460.70 चा नीचांक गाठला आणि नंतर $43,436.81 चा उच्चांक गाठला. इथेरियम 1.39% खाली $3,273 वर ट्रेड करत आहेत.इथेरियमने त्याच कालावधीत $3,250.88 चा नीचांक आणि $3,376.40 चा उच्चांक गाठला. सोमवारी बातमी लिहिली तेव्हा, क्रिप्टो मार्केटमध्ये बिटकॉइनचे वर्चस्व 39.5 टक्के होते, तर इथेरियमचे वर्चस्व विक्रमी 19 टक्के होते.

Cardano मध्ये जोरदार वाढ
Coinmarketcap च्या आकडेवारीनुसार, Cardano ने सोमवारी गेल्या 24 तासात 12.35% ची उडी मारली आहे. जर आपण गेल्या 7 दिवसांबद्दल बोललो तर कार्डानो 30 टक्क्यांहून अधिकने वाढले आहे. सोमवारी ही बातमी लिहिताना कार्डानो $1.53 वर ट्रेड करत होते. सोमवारी, उर्वरित प्रमुख करन्सीज रेड मार्कवर ट्रेड करताना दिसल्या.

एका दिवसात सर्वाधिक वाढ झालेल्या करन्सीज
लुना रश, थोरियम आणि बार्टर ट्रेड ही गेल्या 24 तासांत (सकाळी 10:45 वाजता) टॉप तीन करन्सी होत्या. Luna Rush (LUS) 3299.38% वाढला आहे. THOREUM मध्ये 816.50% आणि BarterTrade (BART) मध्ये 231.44% वाढ झाली आहे.

इतर करन्सीमध्ये अशाप्रकारे झाली वाढ
>> Dogecoin : 5.97% घसरणीसह $0.1716 वर
>> Terra Luna : 4.08% घसरणीसह $83.08 वर
>> Shiba Inu : 3.71% घसरणीसह $0.00002957 वर
>> BNB : 1.94% घसरणीसह $485.37 वर
>> Tether : कोणताही बदल नाही. 1 डॉलर वर.
>> Solana: 3.77% घसरणीसह $143.75 वर
>> XRP: 1.60% घसरणीसह $0.7668 वर