Sunday, December 28, 2025
Home Blog Page 2927

पटोलेंवर तत्काळ गुन्हा दाखल करुन अटक करा; वादग्रस्त वक्तव्यावर गडकरी आक्रमक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. पटोलेंनी पंतप्रधानांच्या बद्दल वापरलेली भाषा आक्षेपार्ह असून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी भाजप नेत्यांकडून केली जात आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट करुन नाना पटोले यांना अटक करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यविषयी नाना पटोले यांनी वापरलेली भाषा अतिशय आक्षेपार्ह आणि निंदनीय असल्याचं, गडकरी यांनी म्हंटले आहे.

केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट केले असून पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्याविषयी महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वापरलेली भाषा अतिशय आक्षेपार्ह व निंदनीय आहे. माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे, की पटोलेंवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी., अशी मागणी ट्विटद्वारे गडकरींनी केली आहे.

पंतप्रधान मोदींबद्दल काहीही बोललेले खपवून घेतले जाणार नाही. आम्ही ते सहन करणार नाही. नेता तसा कार्यकर्ता म्हणावा लागेल. त्याचे राष्ट्रीय नेते सुद्धा असेच मध्ये गायब होतात. पटोले याचे वर्तन हे आता भ्रमिष्टासारखे चाललेले आहे, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पटोलेंच्या वक्तव्यानंतर केली आहे.

पटोले नेमकं काय म्हणाले?

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी “मी का भांडतो? मी आता मागील 30 वर्षापासून राजकारणात आहे. लोकं पाच वर्षात आपल्या एका पिढीचा उद्धार करुन टाकतात. शाळा, कॉलेज हे करुन आपल्या एक-दोन पिढीचा उद्धार करुन टाकतात. मी एवढ्या वर्षाच्या राजकारणात एक शाळा नाही घेतली. एक ठेकेदारी नाही केली. जो आला त्याला मदत करतो. म्हणून मी मोदीला मारु शकतो, त्याला शिव्या देऊ शकतो आणि म्हणून मोदी माझ्या विरोधात प्रचाराला आला. एक प्रमाणिक नेतृत्व तुमच्या इथे आहे….”असं आक्षेपार्ह आणि वादग्रस्त वक्तव्य नाना पटोले यांनी व्हिडीओमध्ये केले आहे.

प्रा. राजन शिंदे खून प्रकरण : अल्पवयीन मारेकरी प्रौढ समजला जाणार

Rajan Shinde

औरंगाबाद – राज्यभर गाजलेल्या मौलाना आझाद महाविद्यालयातील इंग्रजी विषयाचे प्रा. डॉ. राजेंद्र शिंदे यांचा खून खटल्यात नवीन घडामोड समोर आली आहे.

शहर पोलिसांनी ‘ज्युवेनाईल जस्टीस केअर अँड प्रोटेक्शन रुल्स’ (जेजे ॲक्ट) या कायद्यातील तरतुदीनुसार 16 वर्षांवरील मुलास प्रौढ समजण्यात यावे अशी मागणी करणारा अहवाल मुदतीत बाल न्याय मंडळासमोर सादर केला होता. त्याची प्राथमिक तपासणी करून बाल न्याय मंडळाने दोषारोपपत्रात अहवाल प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आंकडे पाठवला. त्याचे अवलोकन करून प्रमुख न्यायाधीशांनी पोलिसांची मागणी ग्राह्य धरत विधिसंघर्षग्रस्त बालकास प्रौढ समजण्यात येऊन खटला न्यायालयात चालविण्यास मान्यता दिली आहे. तसेच हा खटला सत्र न्यायाधीश एस. एस. देशपांडे यांच्याकडे वर्ग केला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 21 जानेवारी रोजी होईल.

या निर्णयाच्या विरोधात विधिसंघर्षग्रस्त मुलगा उच्च न्यायालयात जाण्याची शक्यताही व्यक्त होत आहे. दोषारोप पत्र बनवण्यासाठी तपास अधिकारी निरीक्षक अविनाश आघाव, अंमलदार सुनील बडगुजर यांनी परिश्रम घेतले.

43 खंड 591 पानांचे दोषारोपपत्र –
तपास अधिकाऱ्यांनी शिंदे खून खटल्यात तब्बल 43 खंडात 591 पानांचे दोषारोपपत्र बाल न्याय मंडळासमोर सादर केले आहे. यात तब्बल 75 साक्षीदारांची साक्ष घेण्यात आली. यामध्ये प्रत्येक पुराव्याचे सविस्तर विश्लेषण करण्यात आले आहे. डॉ. शिंदे यांच्या नातेवाईकांचे सविस्तर जबाब नोंदविण्यात आले आहेत. तसेच तांत्रिक तपासात सापडलेले विविध पुरावे देण्यात आले आहेत.

ऑनलाइन शिक्षणापासून 80 टक्के विद्यार्थी वंचित, त्यांचे काय ?

Online Class

औरंगाबाद – जिल्ह्यात नववी ते बारावीचे 9.12 लाख विद्यार्थी आहेत. त्यापैकी जेमतेम 20 टक्के विद्यार्थ्यांपर्यंत ऑनलाईन शिक्षण पोहोचत आहे. तर ऑनलाईन अभ्यास, स्वाध्याय, रीड टू मीसारख्या उपक्रमांना नगण्य प्रतिसाद नोंदवला जात आहे. 80 टक्के विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शिक्षणाशिवाय पर्याय नसल्याचे शिक्षक, पालक, शिक्षणतज्ज्ञांचे मत आहे.

जिल्ह्यात पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी 33 हजार 775 पालकांचे मोबाईल ‘रीड टू मी’ ॲप डाऊनलोड करून स्वयंअध्ययनासाठी उपलब्ध झाले आहेत. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे (एससीईआरटी) स्टुडंट व्हाॅटस् ॲप बेस्ड् डिजिटल होम असेसमेंट (स्वाध्याय) उपक्रमात सुरुवातीला 1 लाख 97 हजार विद्यार्थी स्वाध्याय सोडवत होते. मात्र याकडे शाळांकडून दुर्लक्ष झाल्याने 26 व्या आठवड्यात केवळ 1787 विद्यार्थ्यांनी स्वाध्याय डाऊनलोड केला. कोरोनामुळे शाळा बंद झाल्याने ऑनलाईन शिक्षणात 9.12 लाखांपैकी सरासरी 20 टक्क्यांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा सातत्याने सहभाग नाही. असे शिक्षकांचे म्हणणे आहे. त्यामुळे उर्वरित 80 टक्के म्हणजेच 7 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचे काय, असा सवाल शिक्षक संघटना, शिक्षणतज्ज्ञ उपस्थित करत आहेत.

विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवण्यासाठी शिक्षण विभागासह डाएट, समग्र शिक्षा आणि प्रादेशिक विद्या प्राधिकरण प्रयत्न करत आहेत. मात्र अल्पावधीत शाळा बंद झाल्याने ऑनलाईन शिक्षणाची परिस्थिती पुन्हा चिंताजनक बनली आहे. नेटवर्कची समस्या, इंटरनेट, मोबाईल, साधनांच्या उपलब्धतेचा अभाव आहे. शिक्षण विभागाकडून विद्यार्थी उपस्थितीबद्दल शाळांकडे अद्यापही ऑनलाईन शिक्षणाच्या प्रतिसादाबद्दल विचारणा केली नसल्याचे शिक्षणाधिकारी म्हणाले. त्यामुळे काही उपक्रमशील शिक्षकांचे वर्ग, शाळा वगळता सध्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणाची स्थिती चिंताजनक आहे.

रीड टू मी ॲप इन्स्टॉल केलेले तालुकानिहाय विद्यार्थी –
औरंगाबाद शहर 1 – 6475
औरंगाबाद शहर 2 – 998
पैठण – 5800
खुलताबाद – 5235
कन्नड – 4484
गंगापूर – 1074
सोयगाव – 1007
फुलंब्री – 515
औरंगाबाद – 242

नाना पटोलेंच वक्तव्य भ्रमिष्टासारखं; मोदींवरील टीका सहन करणार नाही; चंद्रकांतदादांचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याची व्हिडोओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. “आपण मोदींना मारू शकतो, शिव्या देऊ शकतो, असे विधान पटोले यांनी भंडारा येथील कार्यकर्त्यांच्या सभेत केले आहे. यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पटोलेंवर टीका केली आहे. “आपण काय बोलतोय. याचा त्यांना पत्ता नसतो. पंतप्रधान मोदींबद्दल काहीही बोललेले खपवून घेतले जाणार नाही. आम्ही ते सहन करणार नाही,” असा इशारा पाटील यांनी दिला आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पटोलेंच्या वक्तव्यानंतर माध्यमांशी संवाद साधत संताप व्यक्त केला. यावेळी ते म्हणाले की, पंतप्रधान मोदींबद्दल काहीही बोललेले खपवून घेतले जाणार नाही. आम्ही ते सहन करणार नाही. नेता तसा कार्यकर्ता म्हणावा लागेल. त्याचे राष्ट्रीय नेते सुद्धा असेच मध्ये गायब होतात. पटोले याचे वर्तन हे आता भ्रमिष्टासारखे चाललेले आहे. पंजाबच्या घटनेनंतर ते नौटंकी असे म्हंटले. आता यापुढे भाजप अशा प्रकारची वक्तव्ये सहन करणार नाही.

मंत्री नारायण राणे यांनी जेव्हा जर तरची वक्तव्ये केली होती. नितेश राणे यांच्याबाबत एक विधान केले तेव्हा त्याच्या घरावर पोलिसांनी नोटीस लावली. आता बघूया पोलिसांकडून काय कारवाई केली जातेय ती. जे पटोलेंवर पोलिसांनी कारवाई केली नाही तर आम्ही आक्रमक पवित्रा घेणारे आहोत, असा इशार यावेळी पाटील यांनी दिला.

व्हिडीओमध्ये पटोले नेमकं काय म्हणाले?

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी “मी का भांडतो? मी आता मागील 30 वर्षापासून राजकारणात आहे. लोकं पाच वर्षात आपल्या एका पिढीचा उद्धार करुन टाकतात. शाळा, कॉलेज हे करुन आपल्या एक-दोन पिढीचा उद्धार करुन टाकतात. मी एवढ्या वर्षाच्या राजकारणात एक शाळा नाही घेतली. एक ठेकेदारी नाही केली. जो आला त्याला मदत करतो. म्हणून मी मोदीला मारु शकतो, त्याला शिव्या देऊ शकतो आणि म्हणून मोदी माझ्या विरोधात प्रचाराला आला. एक प्रमाणिक नेतृत्व तुमच्या इथे आहे….”असं आक्षेपार्ह आणि वादग्रस्त वक्तव्य नाना पटोले यांनी व्हिडीओमध्ये केले आहे.

ओला स्कूटरच्या ग्राहकांसाठी खुशखबर!! कंपनीने घेतला ग्राहकांच्या फायद्याचा निर्णय

नवी दिल्ली । ओला स्कूटर खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. ओला कंपनी आपल्या ग्राहकांच्या सर्व S1 स्कूटर्सना S1 Pro वर अपग्रेड करेल. Ola S1 च्या खरेदीदारांना Ola S1 Pro सारखे हार्डवेअर त्याच किमतीत मिळेल आणि त्याशिवाय त्यांना कोणतीही अतिरिक्त रक्कम देण्याची गरज भासणार नाही. कंपनीचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी याबाबत माहिती दिली आहे.

भाविश अग्रवाल यांनी ट्विट करत म्हंटल की, “आम्ही आमच्या सर्व S1 ग्राहकांना S1 Pro हार्डवेअरमध्ये अपग्रेड करत आहोत. तुम्हाला सर्व S1 फीचर्स मिळतील आणि तुम्ही अपग्रेडसह प्रो रेंज, हायपर मोड, इतर फीचर्स अनलॉक करू शकता.” आपल्या ग्राहकांचे आभार मानत त्यांनी सांगितले की,”या स्कूटर्स जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये उपलब्ध करून दिल्या जातील.”

21 जानेवारी रोजी फुल पेमेंट विंडो उघडेल
मागील आठवड्यात, कंपनीने सांगितले होते की,” ज्या ग्राहकांनी स्कूटर आधीच बुक केली आहे, त्यांच्यासाठी शेवटची पेमेंट विंडो 21 जानेवारी रोजी संध्याकाळी 6 वाजता Ola App वर उघडेल. ओला इलेक्ट्रिकने गेल्या वर्षी त्यांची S1 आणि S1 Pro इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली होती, मात्र नियोजित वेळापत्रक असूनही स्कूटरच्या डिलिव्हरीस उशीर झाला.” कंपनीने शेवटी डिसेंबरमध्ये चेन्नई आणि बेंगळुरूमधील ग्राहकांना पहिल्या 100 स्कूटरच्या वितरणासह
पाठवण्यास सुरुवात केली.

स्कूटरच्या रेंजबाबत प्रश्न उपस्थित केले गेले
ओला इलेक्ट्रिकने गेल्या वर्षी त्यांची S1 आणि S1 Pro इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली, ज्यांची रचना Etergo AppScooter प्रमाणे करण्यात आली आहे. ओला इलेक्ट्रिक स्कूटर्सने ग्राहकांना आधीच पाठवण्यास सुरुवात केली आहे आणि त्यांना त्यांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. ओला स्कूटरच्या फीचर्स आणि डिझाइनला ग्राहकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असताना, स्कूटरची वास्तविक श्रेणी कंपनीने घोषित केलेल्या ईव्ही श्रेणीपेक्षा खूपच कमी असल्याचा दावा केला जातो आहे.

मी मोदींना मारू शकतो, शिव्या देऊ शकतो; नाना पटोलेंचं वादग्रस्त वक्तव्य

Nana Patole Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बोलताना वादग्रस्त वक्तव्य केले आहे. आपण मोदींना मारू शकतो, शिव्या देऊ शकतो असे विधान करत नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांना हवा देण्याचा प्रयत्न केला.

भारतामध्ये कोरोना महामारी नरेंद्र मोदी यांनी लोकांना मारण्यासाठी आणली. मोदी सरकार लोकांना मारायला लागले आहे. गरीब कुटुंबांना दारिद्र्य रेषेच्या वर आणण्यासाठी गॅस सिलिंडर दिले व आता पुढील काळात ज्याच्याकडे गॅस सिलिंडर आहे तो सधन घोषित करण्याचा केंद्र सरकारचा डाव असल्याचेही नाना पटोले यांनी म्हंटल.

नाना पाटोळे यांच्या विधानाचा भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी म्हंटल. कोणत्याच पक्षाच्या नेत्यानं अशा प्रकारची वाचाळ विधान करणं थांबवायला हवं असे दरेकर यांनी म्हंटल. नाना पटोले यांच्या विधानावरून काँग्रेसच्या पोटात काय आहे हे समोर येत आहे असे दरेकर म्हणाले मोदींच्या बाबत काँग्रेसच्या मनात या भावना आहेत का याचा विचार करण्याची वेळ आली असे असे प्रवीण दरेकर म्हणाले

नोकरदार वर्गाने ‘इथे’ करा गुंतवणूक; टॅक्सही वाचेल आणि ज्यादा रिटर्न्सही मिळतील

EPFO

नवी दिल्ली । जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हालाही कंपनीकडून आर्थिक वर्ष 2021-22 साठी इन्व्हेस्टमेंट डिक्लेरेशन फॉर्म मिळाला असेल. यामध्ये तुम्ही कोणत्या योजनेत किती गुंतवणूक केली आहे हे यात सांगितले जाते. याच्या च आधारे किती TDS (Tax Calculation) कापून घ्यायचा हे कंपनी ठरवते.

जर तुम्ही अजूनही गुंतवणूक केली नसेल तर आता 31 मार्चपर्यंत करू शकता. बहुतेक लोकं अशा बचत योजनांमध्ये गुंतवणूक करतात, ज्यामध्ये चांगल्या रिटर्नसह टॅक्स सूट देखील मिळते आणि धोकाही कमी असतो. गुंतवणुकीचे असे काही मार्ग आहेत, जिथे पैसे गुंतवून तुम्ही रिटर्न मिळवू शकता आणि टॅक्स वाचवू शकता.

5 वर्षांच्या FD वर टॅक्स बचत
BPN Fincap चे संचालक AK निगम यांच्या मते, 5 वर्षांच्या FD वर कर सवलत मिळवणे हा सर्वात सोपा मार्ग आहे. जर तुमचे बँकेकडे kyc असेल तर तुम्ही इंटरनेट बँकिंगद्वारेही FD उघडू शकता. नेटबँकिंगद्वारे पेमेंट कधीही ऑटो मोडमध्ये ठेवू नका कारण ते तुमच्या FD चे 5 वर्षांनी रिन्यूअल करू शकते ज्यामुळे मुदतपूर्तीचे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होणार नाहीत. FD वर मिळणारे व्याज कमाईमध्ये येते, त्यामुळे त्यावर टॅक्स लागू होईल. जर तुम्ही 5 वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी गुंतवणूक केली तर तुम्हाला त्यावर कर सवलतीचा लाभ मिळणार नाही.

टर्म लाइफ इन्शुरन्स पॉलिसी
टर्म इन्शुरन्स पॉलिसीच्या प्रीमियम पेमेंटवर टॅक्स सूट मिळू शकते. ही पॉलिसी मर्यादित कालावधीसाठी आहे, ज्याचा प्रीमियम खूपच कमी आहे. पॉलिसी धारकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास, आयकर कलम 10(10D) अंतर्गत क्लेमच्या रकमेवर 100% सूट उपलब्ध आहे. आयकर कायदा, 1961 च्या कलम 80C अंतर्गत वार्षिक 1.5 लाख रुपयांपर्यंतचा आयुर्विमा प्रीमियम सवलतीसाठी पात्र आहे.

होम लोनची मूळ रकमेवर कर सवलत
प्रत्येक वर्षी 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या होम लोनच्या मूळ रकमेवर 80C अंतर्गत कर सवलत देखील मिळू शकते. याशिवाय, होम लोनच्या व्याजावर कलम 24(बी) अंतर्गत दरवर्षी 2 लाख रुपयांची सूट आहे. अशा प्रकारे होम लोन तुम्हाला 3.5 लाख रुपयांची कर बचत देते.

मुलांच्या शिक्षणावर टॅक्स बेनिफिट
मुलांच्या शिक्षणावरील खर्चात तुम्ही कर सवलतीचा लाभ घेऊ शकता. मात्र, हे केवळ शुल्कासाठी आहे आणि कलम 80C अंतर्गत सूट उपलब्ध आहे. हा फायदा केवळ ट्यूशन फीसाठी आहे आणि मुलांच्या प्रवेशासारख्या मोठ्या खर्चासाठी नाही. ही कर सवलत फक्त मुलांच्या शिक्षणासाठी जाणाऱ्या शाळा, महाविद्यालय, विद्यापीठाच्या फीसाठी उपलब्ध आहे. परदेशात शिकणाऱ्या मुलाचे शिक्षण शुल्क करमुक्त नाही आणि ते फक्त दोन मुलांपुरते मर्यादित आहे.

इन्शुरन्स प्रीमियम प्लॅन
इन्शुरन्स योजना विकत घेतल्यावरही कर सवलतीचा लाभ मिळतो. एंडोमेंट प्लॅन, होल लाइफ प्लॅन, मनी बॅक, टर्म इन्शुरन्स आणि युलिप यांसारख्या पॉलिसी खरेदी करून टाकं वाचवू शकतो. या पॉलिसींच्या प्रीमियमचा भरणा केल्यावर, 80C अंतर्गत लाभ एका वर्षात 1.5 लाख रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे लाइफ इन्शुरन्समध्ये एन्युइटी प्लॅन घेतल्यासही टॅक्समध्ये सूट मिळू शकते.

पुणे विद्यापीठातील 27 एकरातील क्रिडा संकुलास पै. खाशाबा जाधव यांचे नाव आणि पूर्णाकृती पुतळा उभारणार

पुणे | सातारा जिल्ह्याचे सुपुत्र व ऑलिम्पिकमध्ये देशाला पहिले वैयक्‍तिक पदक मिळवून देणारे कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या क्रीडा संकुलात पूर्णाकृती शिल्प साकारण्यात येणार आहे. सप्टेंबर महिन्यात झालेल्या विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला असून येत्या महिनाभरात पुतळ्याचे अनावरण करण्यात येईल. पै. खाशाबा जाधव याचे नांव या संकुलाला दिले जाणार असून पूर्णाकृती शिल्पही उभारण्यात येणार आहे.

पुणे येथील बालेवाडी येथील क्रिडा संकुलानंतर सावित्रीबाई फुले विद्यापीठाचा क्रीडा संकुल मोठे असणार आहे. तब्बल 27 एकर जागेत इनडोअर तसेच आऊटडोअर खेळ खेळण्याची सुविधा निर्माण केलेली आहे. या संकुलाला पै. खाशाबा जाधव यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारतासाठी 1952 च्या हेलसिंकी ऑलिम्पिक स्पर्धेत खाशाबा जाधव यांनी कांस्यपदक जिंकत इतिहास घडवला होता. त्यांच्या या कार्याची दखल, तसेच भावी खेळाडूंना त्यांचे शिल्प प्रेरणादायी ठरावे, म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांचे हे पूर्णाकृती शिल्प ब्राँझ धातूत असेल. सुमारे पाचशे किलो वजनाचे हे शिल्प असणार आहे. सध्या त्याचे काम सुरू आहे.

विद्यापीठाने आतापर्यंत क्रीडा संकुलाच्या विकासासाठी 50 कोटी रुपये खर्च केले आहेत. यामध्ये सुशोभीकरण, तसेच वेगवेगळ्या खेळांच्या मैदानाची दुरुस्ती करण्यात आली आहे. विद्यापीठाने खर्च केलेल्या 50 कोटी रुपयांपैकी काही रक्‍कम विद्यापीठ अनुदान आयोगाकडून विद्यापीठाला देण्यात आली आहे.

अपयश लुंगीत लपवण्याचा प्रयत्न : शिवेंद्रराजेंची उदयनराजेंवर जळजळीत टीका

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पुष्पा चित्रपटातील नायकाप्रमाणे लुंगी घालून फोटो शुट केले होते. या फोटो शुटवर आता टीका होत आहे. पाच वर्षांच्या कामाचे अपयश लुंगीमध्ये लपवण्याचा प्रयत्न उदयनराजे करत असल्याची खोचक टीका आमदार शिवेंद्रराजे यांनी उदयनराजेंवर केली. या टीकेला आता खा. भोसले काय प्रतिउत्तर देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

पुष्पा चित्रपटाची चर्चा संपुर्ण देशभरात आहे. त्यात आता या सिनेमाने खासदार उदयनराजे भोसले यांनाही भूरळ पाडली. त्यामुळे या सिनेमातील नायकाप्रमाणे खासदार उदयनराजे यांनी पोवई नाक्यावरील सेल्फी पॉईंट येथे लुंगी घालून फोटो सेशन केले. या फोटो सेशनवर आता आमदार शिवेंद्रराजे यांनी टीका केली आहे.

मी उभारलेल्या कामाच्या प्रेमात उदयनराजे पडले आहेत हे चांगले आहे. उदयनराजेंच्या कामाच्या प्रेमात कोण पडेल अशी काम त्यांच्याकडे नाहीत. आपण केलेल्या पाच वर्षांच्या कामाचे अपयश हे लुंगी मध्ये लपवण्याचा प्रयत्न उदयनराजे करत असल्याची खरमरीत टीका शिवेंद्रराजे यांनी केली.

सातारकरांनी त्यांच्याकडे मनोरंजन म्हणून बघावे. राजकीय लोकांना देखील आता फॅन्सी ड्रेस पार्टी करावी लागत आहे, हा गंमतीचा भाग असल्याचे सांगत उदयनजेंच्या लुंगी घालून केलेल्या फोटो सेशनवर शिवेंद्रराजेंनी चांगलीच टीका केली आहे.

आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याचे काम करू नये, जनतेला कळत नाही का?; चंद्रकांत पाटलांचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी पिंपरी चिंचवड ते फुगेवाडीदरम्यान मेट्रोने प्रवास करीत दीड तास थांबून मेट्रोची सविस्तर माहिती घेतली. यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पवारांवर टीका केली आहे. आज पवारांनी जी ट्रायल घेतली. यामधून श्रेयवादाची लढाई सुरु आहे का? फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर हा प्रकल्प पूर्ण झाला आहे. त्यामुळे आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याचे काम सामान्य जनतेला कळत नाही का? अशी टीका पाटील यांनी केली.

चंद्रकांत पाटील यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, आज राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी पिंपरी चिंचवड ते फुगेवाडी दरम्यान मेट्रोने प्रवास केला. पिंपरी चिंचवड मेट्रोची ट्रायल कुठल्याही स्थानिक खासदार, आमदाराला न कळवता पवार यांच्या उपस्थितीत झाली. अशाप्रकारे घाईघाईने ट्रायल करण्याचे कारण काय होते? यामधून श्रेयवादाची लढाई सुरु आहे का? 11 हजार कोटींच्या या प्रकल्पामधील आठ हजार कोटी केंद्राने दिले आहेत.

कोविडमुळे पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणारे उद्घाटन पुढे ढकलण्यात आले होते. मेट्रोच्या ट्रायलला फक्त शरद पवार का? केंद्रात दहा वर्षे आणि महाराष्ट्रात १५ वर्षे राज्य असताना तुम्ही हा प्रकल्प का नाही केला? देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर हा प्रकल्प पूर्ण झाला आहे. त्यामुळे मेट्रोच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करणार आहे. महाविकास आघाडीच्या काळात प्रकल्प लांबला आहे. आता मेट्रोवर आम्ही हक्कभंगाचा प्रस्ताव आणणार आहोत,” असा इशारा पाटील यांनी यावेळी दिला.