Thursday, January 1, 2026
Home Blog Page 2991

यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मिळू शकेल आनंदाची बातमी, त्यासाठीची सरकारची योजना काय आहे जाणून घ्या

PM Kisan

नवी दिल्ली । कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी सरकार यावर्षीच्या अर्थसंकल्पात कृषी कर्जाचे लक्ष्य 18 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवू शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प 2022-2023 होणार आहे आणि त्यामध्ये सरकार कृषी क्षेत्राला कर्ज देण्याचे लक्ष्य 18 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवू शकते.

चालू आर्थिक वर्षात सरकारने कृषी कर्जासाठी 16.5 लाख कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवले आहे आणि पुढील वर्षीच्या अर्थसंकल्पात ते 1.5 लाख कोटी रुपयांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने दरवर्षी कृषी कर्जाचे उद्दिष्ट वाढवले ​​असून यावर्षीही ते वाढविण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. 2022-23 या आर्थिक वर्षासाठी सरकारने कृषी कर्जाचे लक्ष्य 18.5 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

सरकार दरवर्षी कृषी कर्जाचे उद्दिष्ट ठरवते
मात्र, जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात अंतिम आकडा निश्चित होईल. सरकार वार्षिक कृषी कर्जाचे उद्दिष्ट ठरवते. त्यामध्ये पीक कर्जाचे लक्ष्य देखील समाविष्ट आहे जे बँक शेतकऱ्यांना पिकांसाठी देते. गेल्या काही वर्षांपासून फार्म क्रेडिटने सातत्याने आपले टार्गेट ओलांडले आहे.

मागील आर्थिक वर्षांत लक्ष्य कसे होते ते जाणून घ्या
2017-18 मध्ये कृषी कर्जाचे लक्ष्य 10 लाख कोटी रुपये होते मात्र एकूण खर्च 11.68 लाख कोटी रुपये होता. त्याचप्रमाणे, 9 लाख कोटी रुपयांच्या निश्चित उद्दिष्टाच्या तुलनेत 2016-17 या आर्थिक वर्षात 10.77 लाख कोटी रुपयांचे पीक कर्ज वितरित करण्यात आले. साधारणपणे, शेती कर्जावर 9% व्याजदर असतो. मात्र, सरकार शेतकऱ्यांना अल्प मुदतीच्या कर्जावर व्याजात सवलत देते. सरकार 3 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर 2% व्याज अनुदान देते. म्हणजेच 7% व्याजाने कृषी कर्ज मिळते.

गुलमंडी ते पैठणगेट वाहन बंदीचा प्रयोग

paithan gate

औरंगाबाद – शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या पैठण गेट गुलमंडी पर्यंतचा रस्ता काही दिवस प्रायोगिक तत्त्वावर वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत पीपल फॉर उपक्रम राबविण्यात येणार असून मंगळवारी या भागातील व्यापार आन सोबत चर्चा करण्यात आली. या रस्त्यावर दिल्लीतील ‘चांदणी चौका’ प्रमाणे पायी फिरून खरेदी करता येणार आहे.

केंद्रीय शहरी विकास मंत्रालयातर्फे देशभरातील स्मार्ट शहरांसाठी पीपल फॉर स्ट्रीट योजना आणली. या योजनेत औरंगाबाद स्मार्ट सिटी ने भाग घेतला आहे. स्मार्ट सिटीच्या कर्मचाऱ्यांनी नोव्हेंबर 2019 मध्ये पैठणगेट येथील व्यापाऱ्यांना संकल्पना समजावून सांगितली. व्यापाऱ्यांनीही या योजनेला पाठिंबा दर्शवला. तसेच कॅनॉट प्लेस येथील व्यापाऱ्यांनी होकार दर्शवला. प्रत्यक्षात काम सुरू होण्यास स्मार्ट सिटी कडून विलंब झाला. काल सायंकाळी पुन्हा स्मार्ट सिटीच्या कर्मचाऱ्यांनी पैठणगेट येथील व्यापाऱ्यांनी सोबत चर्चा केली. व्यापाऱ्यांनी हॉकर्सचा सर्वाधिक त्रास असल्याचे नमूद केले तसेच पार्किंगला शिस्त लावण्याची विनंती केली.

पीपल फॉर स्ट्रीट मध्ये वाहतूक पूर्णपणे बंद केली जाईल. वाहतूक कधीपासून बंद होणार हे लवकरच घोषित केले जाणार आहे. या रस्त्यांवर नागरिकांना पायी फिरून खरेदी करता येईल. आकर्षक विद्युत रोषणाई, ठिकठिकाणी बसण्याची व्यवस्था अशा अनेक सोयी-सुविधा राहतील. या वेळी प्रकल्पप्रमुख स्नेहा मोहन, तिवारी आदींची उपस्थिती होती.

हसत्या- खेळत्या लेकराचा अज्ञात व्यक्तीकडून निर्घृणपणे खून, बीडमधील घटना

बीड : हॅलो महाराष्ट्र – बीड जिल्ह्यातील सोनिमोहा याठिकाणी माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये एका अज्ञात व्यक्तीने एका सहा वर्षीय अल्पवयीन मुलाची गळा चिरून निर्घृणपणे हत्या केली आहे. या लहानग्याला कोणत्यातरी वन्यपशूने हल्ला करून ठार केले अशी चर्चा संपूर्ण गावात रंगली होती. मात्र पोलिसांनी या घटनेचा अधिक तपास केला असता त्याचा खून झाल्याचे पोलीस तपासात समोर आले. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करून घटनेचा पुढील तपास सुरु केला आहे.

यशराज दत्तात्रय दराडे असे हत्या झालेल्या सहा वर्षीय अल्पवयीन मुलाचं नाव आहे. तो बीड जिल्ह्याच्या धारूर तालुक्यातील सोनिमोहा येथील रहिवासी आहे. मृत यशराज हा घटनेच्या दिवशी एका शेतात गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला होता. त्याच्या चेहऱ्यावर गंभीर जखमा आढळून आल्या होत्या. यानंतर यशराजच्या नातेवाईकांनी तातडीने यशराज याला अंबाजोगाई येथील रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या ठिकाणी उपचारादरम्यान यशराजचा मृत्यू झाला. मृत यशराजच्या चेहऱ्यावरील हिंस्त्र जखमा पाहून त्याच्यावर एखाद्या वन्यपशूने हल्ला केला असावा, अशी चर्चा संपूर्ण गावात रंगली.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर पोलिसांनी वनविभागाच्या अधिकाऱ्याच्या मदतीने संपूर्ण परिसराची कसून पाहाणी केली. यामध्ये हिंस्त्रप्राण्याचे ठसे किंवा इतर कोणतेही संकेत पोलिसांना या ठिकाणी आढळून आले नाहीत. त्यामुळे मृत यशराजची अज्ञात व्यक्तीने गळा चिरून हत्या केल्याचे समोर आले. यानंतर धारूर पोलिसांनी अज्ञात व्यक्तिविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे.

सत्तारांची अजून हळद उतरायची आहे; संजय राऊतांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी शिवसेना व भाजप युतीबाबत मोठे वक्तव्य केले होते. त्याच्या या वक्तव्यावरून विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टोला लगावला. त्यांच्यानंतर आता खुद्द शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपल्या शैलीत सत्तार यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजप-शिवसेना युतीबाबत कोण बोलतंय, कुणी प्रमुख नेता बोलतोय का? हे अगोदर सर्वांनी तपासून घावे. अब्दुल सत्तार अजून शिवसेनेमध्ये नवीन आहेत, त्यांची हळद आणखी उतरायची आहे, असे म्हणत राऊत यांनी टोला लगावला.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, शिवसेना आणि भाजपच्या युतीबाबत बोलणारे जे अब्दुल सत्तर हे जे मंत्री आहेत. त्यांनी शिवसेना पक्षामध्ये फक्त 25 वर्ष पूर्ण केलेली. त्याच्याकडून जी काही विधाने केली गेली आहेत. त्यांच्या त्या विधानाला काहीच अर्थ नाही. अजून त्यांच्या अंगावरची हळद उतरायची आहे बरीचशी.

सत्तार हे शिवसेनामध्ये पंचवीस वर्षांपासून असूनही त्यांना काहीही माहीत नाही. त्यामुळे ते काहीही बोलत आहेत. अजून ते शिवसेना पक्षात नवीन आहे. त्यामुळे त्यांना शिवसेनेची हळद पूर्णपणे लागायची आहे. बोलू द्या त्यांना, जे काही बोलायचे आहे ते त्यांना बोलू द्यावे. शिवसेना पक्षातील प्रमुख लोकांपैकी दुसरे कोणी काय बोलत आहे का? असा सवाल यावेळी राऊत यांनी उपस्थित केला.

सर्व्हिस सेक्टरमधील क्रियाकार्यक्रमांवर ओमिक्रॉनचा प्रभाव, PMI 3 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला

नवी दिल्ली । भारतासह जगभरात ओमिक्रॉन या नवीन प्रकारातील कोरोनाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. दरम्यान, डिसेंबर 2021 मध्ये भारताच्या सर्व्हिस सेक्टरमधील घडामोडी 3 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आले आहेत. बुधवारी मासिक सर्वेक्षणात असे म्हटले गेले आहे की, व्यावसायिक घडामोडी आणि विक्रीतील मंद वाढ आणि कोरोनाव्हायरसच्या नवीन लाटेची भीती यामुळे व्यावसायिक भावनांवर परिणाम झाला आहे. त्यामुळे सर्व्हिस सेक्टरमधील कामे मंदावली आहेत.

हंगामी समायोजित इंडिया सर्व्हिसेस बिझनेस अ‍ॅक्टिव्हिटी इंडेक्स, जो नोव्हेंबरमध्ये 58.1 वर होता, तो डिसेंबरमध्ये 55.5 या तीन महिन्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. या सर्व्हेनुसार, सर्व्हिस सेक्टरमधील प्रोडक्शनमध्ये सलग पाचव्या महिन्यात वाढ झाली आहे. पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स (PMI) च्या भाषेत, 50 ​​पेक्षा जास्त स्कोअर म्हणजे विस्तार, तर 50 पेक्षा कमी स्कोअर आकुंचन सूचित करतो.

IHS Markit च्या अर्थशास्त्राच्या सहयोगी संचालक पोलियाना डी लिमा यांनी सांगितले की,”डिसेंबरमध्ये थोडीशी मंदी असताना 2021 हे सर्व्हिस प्रोव्हायडरसाठी आणखी एक खराब वर्ष होते.”

मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर मंदावले
याव्यतिरिक्त, सर्व्हिस आणि मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर्सचे सामूहिक उत्पादन किंवा सामूहिक पीएमआय प्रोडक्शन इंडेक्स नोव्हेंबरमधील 59.2 वरून डिसेंबरमध्ये 56.4 वर घसरला. मात्र, ते अद्याप 53.9 च्या दीर्घकालीन सरासरीपेक्षा जास्त आहे.

सर्वेच्या डिसेंबरच्या आकडेवारीत वस्तू उत्पादक आणि सर्व्हिस प्रोव्हायडरसाठीच्या रोजगारात मोठी घट दिसून आली. एकूणच, 4 महिन्यांत पहिल्यांदाच नोकऱ्यांमध्ये कपात झाली आहे.

एसटीचे 12 कर्मचारी बडतर्फ तर 50 जण कामावर हजर

ST

औरंगाबाद – विलीनीकरणाच्या प्रमुख मागणीसाठी संपावर असलेल्या कर्मचार्‍यांवर एसटी प्रशासनाने कारवाईचे सत्र सुरूच ठेवले आहे. आतापर्यंत 21 कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. काल त्यात आणखी भर पडली असून, पुन्हा 12 जणांवर बडतर्फीची कुऱ्हाड कोसळली आहे. त्यामुळे एकूण बडतर्फ कर्मचाऱ्यांची संख्या 33 झाली आहे. तर काल गंगापूर, वैजापूर आणि सोयगाव या गावातील जवळपास 50 कर्मचारी कामावर हजर झाले आहेत.

औरंगाबाद एसटी प्रशासनाच्या वतीने काल दिवसभरात ग्रामीण भागासह अन्य शहरात जवळपास 108 बसेस रस्त्यावर धावल्या‌. या बसेसने 337 फेऱ्या करून 5 हजार 895 प्रवाशांना आपल्या इच्छित स्थळी सोडले. यामध्ये पुणे मार्गावर 15 तर नाशिक मार्गावर 7 खासगी शिवशाही बसेस चालवण्यात आल्या.

एसटी कर्मचाऱ्यांचा संपा बाबत आज न्यायालयात सुनावणी होणार आहे. या सुनावणी कडे संपकरी कर्मचाऱ्यांसह प्रवासी तसेच प्रशासनाचे लक्ष लागले आहे. या सुनावणीनंतर संपकरी कर्मचारी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले असून, जे कामावर रुजू होतील त्यांच्यावर कारवाई न करता त्यांना कर्तव्यावर हजर होण्याचे संकेत देण्यात येणार आहे.

भारतात ओमिक्रॉनचा पहिला बळी; 72 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू

Corona

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात सध्या ओमिक्रोन आणि कोरोनाचा झपाट्याने प्रसार होत आहे. या नव्या कोरोनाच्या ओमिक्रॉनने अनेकांना जखडले आहे. दरम्यान भारतात ओमिक्रॉनचा पहिला बळी गेला आहे. राजस्थानच्या जयपूरमध्ये हा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी दिली.

याबाबात अधिक माहिती अशी की, संबंधित मृत्यू पावलेली व्यक्ती ७२ वर्षीय रुग्ण असून ती ओमिक्रॉन पॉझिटिव्ह निघाली होती. त्यानंतर त्या व्यक्तीची चाचणी केली असता ती सुरुवातीला निगेटिव्ह आली. परंतु प्रकृती स्वास्थ्यामुळे त्या व्यक्तीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

देशात ओमिक्रॉन प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून बुधवारी सकाळी आरोग्य मंत्रालयाने याबाबत महत्वाची महिती दिली आहे. देशातील ओमिक्रॉनच्या एकूण रुग्णांची संख्या 2 हजार 135 झाली आहे. यामध्ये महाराष्ट्र आणि दिल्लीतून सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक 653 आणि दिल्लीत 464 रुग्ण आढळले आहेत. ओमिक्रॉनवरील 2 हजार 135 रुग्णांपैकी 828 बरे झाले आहेत.

Share Market : सलग चौथ्या दिवशी बाजार ग्रीन मार्कमध्ये बंद, सेन्सेक्सने पुन्हा ओलांडला 60,000 चा टप्पा

नवी दिल्ली । सलग चौथ्या दिवशी भारतीय शेअर बाजारांमध्ये हिरवळ दिसून आली. आज बुधवारीही बाजार वाढीने बंद झाले. सेन्सेक्सने आज पुन्हा एकदा 60,000 चा टप्पा पार केला. सेन्सेक्स आज 367.22 अंकांच्या वाढीसह 60,223.15 वर बंद झाला. तर दुसरीकडे, निफ्टी 120 अंकांच्या वाढीसह 17,925.25 वर बंद झाला. बँक निफ्टीने आज जोरदार प्रदर्शन केले. तो 855.75 अंकांनी वाढून 37,695.90 वर बंद झाला.

गेल्या 4 सत्रांमध्ये निफ्टीने 720 अंकांची वाढ नोंदवली आहे. निफ्टी बँकेने 4 सत्रांत 2300 अंकांची वाढ नोंदवली आहे. आज निफ्टी बँकेने 1000 हून जास्त अंकांची वाढ केली आहे. सध्या, निफ्टी 132.40 अंक किंवा 0.74% च्या वाढीसह 17,929.15 च्या स्तरावर दिसत आहे. त्याच वेळी, सेन्सेक्स 383.61 अंकांच्या म्हणजेच 0.64% च्या वाढीसह 60,252.45 वर दिसत आहे.

केवळ आयटी निर्देशांकात घसरण झाली
आजच्या ट्रेडिंगमध्ये, आयटी, मीडिया आणि फार्मा वगळता सर्वच क्षेत्रीय निर्देशांक हिरव्या रंगात बंद झाले. नफा कमावल्यामुळे निफ्टीच्या आयटी निर्देशांकात सुमारे 2 टक्क्यांची घसरण झाली. त्याचवेळी निफ्टी फार्मा देखील 0.3 टक्क्यांनी घसरून बंद झाला आहे. याशिवाय निफ्टी ऑटो 1.05 टक्क्यांनी, मेटल इंडेक्स 1.4 टक्क्यांनी वाढून बंद झाला आहे.

बँकिंग शेअर्समध्ये पुन्हा एकदा खरेदी दिसून आली आहे, त्यामुळे बँक निफ्टी आज 2.32 टक्क्यांच्या वाढीसह 37,695.90 वर बंद झाला आहे.

एयू स्मॉल फायनान्स बँक तेजीत आहे
एयू स्मॉल फायनान्स बँकेच्या शेअरची किंमत 5 जानेवारी रोजी सकाळच्या सत्रात 6 टक्क्यांहून अधिकने वाढली, तर गेल्या पाच दिवसांत स्टॉक 15 टक्क्यांहून अधिकने वाढला. ग्लोबल रिसर्च आणि ब्रोकिंग फर्म मॉर्गन स्टॅनलीने शेअर्सला ‘ओव्हरवेट’ रेटिंग दिले आहे ज्याचे टार्गेट 1,500 रुपये प्रति शेअर आहे, जे सध्याच्या पातळीपेक्षा 28 टक्क्यांनी जास्त आहे.

यूएस मध्ये चलनविषयक धोरणे कडक करण्याच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर 2022 मध्ये FII फ्लो मिळण्याची शक्यता आहे. मात्र, देशांतर्गत फंडसमधील खरेदी मजबूत राहण्याची शक्यता आहे. FII कडून येणारी कमतरता भरून काढण्यासाठी देशांतर्गत फंडस दिसून येतो. महागडे मूल्यमापन आणि FII फ्लो वर दबाव येण्याची शक्यता असल्याने, 2022 मध्येही 2021 सारखी मोठी-आधारित रॅली दिसण्याची शक्यता नाही. अशा परिस्थितीत, Angel One देखील अल्फा रिटर्न मिळविण्यासाठी बॉटम अप स्टॉक पिकिंग पॉलिसी स्वीकारण्याची शिफारस करतो.

… नया है वह; सत्तारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी काल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज्याच्या राजकारणात लक्ष घातले तर, शिवसेना व भाजपामध्ये पुन्हा मैत्रीचा पूल बांधला जाऊ शकतो, असे मोठे वक्तव्य केले होते. यावरून विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टोला लगावला आहे. “नितीन गडकरी मोठे नेते आहेत पण अब्दुल सत्तार नया है वह. असे बोलण्यासाठी कुणी महत्त्वाचा माणूस लागतो,” असा टोला फडणवीसांनी लगावला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेना नेते सत्तार यांनी भाजप शिवसेना युतीबाबत केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला. यावेळी ते म्हणाले की, भाजप शिवसेना युतीबाबत बोलणाऱ्या सत्तार यांना शिवसेनेबद्दल काहीच माहिती नाही. ते अजून पक्षात नवीन आहेत. अशा पकारची विधाने करायला कुणी तरी मोठी व्यक्ती असणे आवश्यक आहे.

यावेळी फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली. उद्धव ठाकरे यांनी विरोधकांकडून केल्या जात असलेल्या टीकांकडे लक्ष देण्याऐवजी महाराष्ट्राकडे लक्ष दिले तर अधिक चांगले होईल. ज्या प्रकारचे काळे कायदे ते विना चर्चेचे, मध्यरात्री पारित करत असल्याचा पळपुटेपणा महाराष्ट्राने पाहिला नसून त्याकडे त्यांनी लक्ष द्यावे,” अशी टीकाही फडणवीस यांनी केली आहे.

2021 मध्ये भारतीयांकडून सोन्यामध्ये प्रचंड खरेदी

नवी दिल्ली । भारताने 2021 मध्ये 1,050 टन सोने आयात करून 10 वर्षांचा आपला जुना विक्रम मोडला आहे. भारताने सोने आयातीवर एकूण $55.7 अब्ज खर्च केले. मागील वर्षीच्या तुलनेत हा आकडा दुप्पट आहे. 2020 मध्ये भारताने 23 अब्ज डॉलरपेक्षा कमी किमतीचे सोने आयात केले.

भारत हा जगातील सर्वात मोठा सोन्याचा ग्राहक आहे. 2021 मध्ये या मौल्यवान धातूच्या आयातीचा पूर्वीचा विक्रमही मोडला. यापूर्वी 2011 मध्ये 53.9 अब्ज डॉलरचे सोने आयात करण्यात आले होते. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने एका सरकारी अधिकाऱ्याच्या हवाल्याने म्हटले आहे की,” 2020 मध्ये 430 टन सोने आयात करण्यात आले होते, तर 2021 मध्ये त्याचे प्रमाण दुपटीने वाढून 1050 टनांवर पोहोचले आहे.”

2021 मध्ये भारतीयांनी सोन्याची प्रचंड खरेदी केली
कोरोना महामारीमुळे 2020 मध्ये सोन्याच्या देशांतर्गत मागणीत मोठी घट झाली होती. कोरोनाच्या निर्बंधांमुळे लग्न पुढे ढकलणे हे त्यामागील कारण होते. यामुळे 2020 मध्ये भारताने सोन्याच्या आयातीवर फक्त $22 अब्ज खर्च केले. कोरोनाव्हायरस महामारीमुळे 2020 मध्ये अनेक लग्ने पुढे ढकलण्यात आल्याने गेल्या वर्षी मागणी प्रचंड होती. मार्च 2020 मध्ये भारताने अतिशय कडक लॉकडाऊन लागू केले होते. त्यामुळे सर्वसामान्यांचे जनजीवनही ठप्प झाले होते.

मोठ्या संख्येने विवाह पुढे ढकलण्यात आले, जे भारतात सोने खरेदीचे प्रमुख कारण मानले जाते. याशिवाय अक्षय्य तृतीया सारख्या सणाला लोकं सोन्याची जोरदार खरेदी करतात, मत्र लॉकडाऊनमुळे हा सणही फारच कमी प्रमाणात साजरा झाला आणि ज्यामुळे मागणी देखील खूपच कमी राहिली.

किंमती घसरल्याने मागणीही वाढली
ऑगस्ट 2020 मध्ये, भारतीय बाजारात सोन्याची किंमत 56,191 रुपये प्रति दहा ग्रॅमवर ​​पोहोचली होती, जो एक नवीन विक्रम होता. मात्र मार्च 2021 मध्ये ही किंमत 43,320 रुपयांवर परत आली. त्याच महिन्यात 177 टन सोने आयात करण्यात आले. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये 86 टन सोने आयात करण्यात आले होते, जे डिसेंबर 2020 मधील 84 टनांपेक्षा किंचित जास्त होते.

वर्ल्ड गोल्ड काउंसिलच्या म्हणण्यानुसार, गेल्या वर्षीच्या पहिल्या तिमाहीत जागतिक बाजारपेठेत सोन्याची मागणी वाढली होती, मात्र दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीत ती कमी झाली. दुसऱ्या तिमाहीत ही मागणी 10 टक्के आणि तिसऱ्या तिमाहीत 7 टक्के होती. तिमाहीत. ऑक्टोबरमध्ये जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार तिसऱ्या तिमाहीत 831 टन सोन्याची खरेदी झाली.