Thursday, January 1, 2026
Home Blog Page 2990

आधी विवाहित प्रेयसीला पळवले, नंतर मुलीचे अपहरण केले आणि मग….

रायपूर : वृत्तसंस्था – छत्तीसगडमध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे. यामध्ये एका तरुणाने आपल्या विवाहित प्रेयसीला तिच्या घरातून पळवून नेले. यानंतर काही दिवसांनी त्याचे तरुणाने आपल्या प्रेयसीच्या मुलीला देखील पळवून नेले. या तरुणीच्या लग्नाच्या अगोदरपासून या दोघांचे प्रेमप्रकरण सुरु होते. हा तरुण लग्नानंतरही या विवाहित प्रेयसीच्या संपर्कात होता. यादरम्यान या दोघांनी घरातून पळून जाण्याचा निर्णय़ घेतला.

काय आहे नेमके प्रकरण ?
छत्तीसगडमधील एका विवाहित महिलेचे सूरज वर्मा या तरुणासोबत प्रेमप्रकरण सुरु होते. यानंतर या दोघांनी पळून जाऊन एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. या विवाहित प्रेयसीला एक मुलगी होती. त्या मुलीला ती आपल्या पतीकडेच सोडून आली होती. हे दोघे एकमेकांशी लग्न करणार होते. मात्र काही काळाने या महिलेला तिच्या मुलीची आठवण येऊ लागली आणि तिने प्रियकराकडे मुलीला भेटण्याचा तगादा लावला.

प्रियकराने आखला अपहरणाचा डाव
आपल्या मुलीला काहीही करून आपल्याकडे घेऊन यावे असा हट्ट या महिलेने प्रियकर सुरज यांच्याकडे धरला होता. यानंतर सुरजने मुलीचं अपहरण करण्याचा कट रचला. यासाठी त्याने आपल्या दोन मित्रांना सोबत घेतले. यामध्ये एक मित्र अल्पवयीन होता. यानंतर या तिघांनी मिळून मुलीच्या घराच्या परिसराची रेकी केली आणि मुलीच्या अपहरणाची योजना तयार केली. यानंतर त्यांनी संधी साधून मुलीला बाईकवर बसवून ते तिच्या आईकडे घेऊन आले.

पोलिसांनी अशा प्रकारे लावला शोध
आपली मुलगी संध्याकाळपर्यंत घरी न आल्यामुळे तिच्या वडिलांनी व कुटुंबीयांनी आसपासच्या परिसरात तिचा शोध घेतला आणि नंतर पोलिसांत तक्रार दाखल केली. यानंतर मुलीच्या वडिलांनी पळून गेलेली आपली पत्नी आणि तिचा प्रियकर यांच्यावर आपला प्राथमिक संशय असल्याचे सांगितले. यानंतर पोलिसांनी त्या दिशेने तपास करत मुलीला शोधण्यात यश मिळवले. पोलिसांनी मुलीच्या आईला व तिच्या प्रियकराला अटक करून मुलीला वडिलांच्या ताब्यात दिले आहे.

केयर्नने भारत सरकारविरोधात सुरू असलेले सर्व खटले मागे घेतले, संपूर्ण प्रकरण जाणून घ्या

नवी दिल्ली । ब्रिटीश कंपनी केर्न एनर्जीने भारत सरकारविरुद्ध विविध आंतरराष्ट्रीय न्यायालयांमध्ये दाखल केलेले सर्व खटले मागे घेतले आहेत. त्यामुळे मागील तारखेपासून कर आकारणीच्या तरतुदीनुसार त्यांच्याकडून वसूल केलेला सुमारे 7,900 कोटी रुपयांचा कर परत करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

केयर्न एनर्जीने बुधवारी देशातील अनेक वृत्तपत्रांमध्ये जाहिराती प्रसिद्ध केल्या असून भारत सरकारविरोधात सुरू असलेले सर्व खटले मागे घेण्याची माहिती दिली आहे. यासंदर्भात कंपनीने सरकारशी आधीच सहमती दर्शवली होती. ब्रिटीश कंपनीने म्हटले आहे की, त्यांनी यूएस ते फ्रान्स आणि नेदरलँड्स ते सिंगापूरच्या न्यायालयापर्यंत भारत सरकारच्या विरोधात सुरू असलेले सर्व खटले मागे घेतले आहेत.

नवीन कायद्यात मागील तारखेपासून कर वसुली रद्द करण्यात आली
खरे तर, गेल्या ऑगस्टमध्ये मंजूर झालेल्या नवीन कायद्यात, भारत सरकारने पूर्वलक्षी तारखेपासून कर वसूल करण्याची तरतूद रद्द केली होती. यासोबतच भारत सरकारच्या विरोधात विविध न्यायालयात दाखल केलेले खटले त्यांनी मागे घेतल्यास या तरतुदीनुसार वसूल केलेली रक्कम त्यांना परत केली जाईल, असे संबंधित कंपन्यांना सांगण्यात आले.

2012 मध्ये आयकर कायद्यात जोडलेल्या या तरतुदीनुसार, भारतात व्यवसाय करणाऱ्या परदेशी कंपन्यांकडून परदेशात केलेल्या ट्रान्सझॅक्शनवर पूर्वलक्षी तारखेपासून कर वसूल करण्याची व्यवस्था करण्यात आली होती. या तरतुदीनुसार, केयर्न आणि व्होडाफोनसह अनेक परदेशी कंपन्यांकडून पूर्वलक्षीपणे कर वसूल केला गेला. त्यापैकी 7,900 कोटी रुपये एकट्या केयर्नकडून वसूल करण्यात आले.

मात्र, नवा नियम अधिसूचित करताना सरकारने काही महिन्यांपूर्वी त्यासंबंधीचे प्रक्रियात्मक नियम जारी केले होते. कर रिफंडसाठी, संबंधित कंपन्यांनी सरकारकडे अर्ज करणे आणि सर्व प्रकरणे मागे घेण्याची खात्री करणे आवश्यक होते. याच क्रमाने केयर्नने ही जाहिरात दिली आहे.

खटला मागे घेतल्यानंतर त्यातून जमा झालेला कर रिफंड करण्याचा मार्ग मोकळा होईल, असे केयर्नने म्हटले आहे. आता भारत सरकार फॉर्म-4 जारी करून अंतिम टप्पा पार करेल, ज्यामध्ये रिफंड देण्याचे आदेश दिले जातील.

एअरटेल पेमेंट्स बँकेला RBI कडून मिळाला शेड्युल्ड बँकेचा दर्जा, अधिक तपशील जाणून घ्या

RBI

नवी दिल्ली । भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने एअरटेल पेमेंट्स बँकेला शेड्यूल्ड बँक म्हणून वर्गीकृत केले आहे. देशातील आघाडीच्या पेमेंट बँकांपैकी एक असलेल्या एअरटेल पेमेंट्स बँकेने मंगळवारी ही माहिती दिली. यापूर्वी पेटीएम पेमेंट्स बँकेलाही हा दर्जा मिळाला होता.

शेड्युल्ड बँकेचा दर्जा मिळाल्यानंतर, एअरटेल पेमेंट्स बँक रिक्वेस्ट फॉर प्रपोझलसाठी (RFPs) आणि प्राथमिक लिलावात सहभागी होऊ शकते आणि केंद्र आणि राज्य सरकारच्या दोन्ही व्यवसायात सहभागी होऊ शकते, असे या निवेदनात म्हटले गेले आहे. याशिवाय, ते सरकारच्या कल्याणकारी योजनांमध्येही सहभागी होऊ शकतात. आता ते सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या आर्थिक समावेशन योजनांमध्ये सहभागी होण्यासाठी पात्र ठरले आहे.

एअरटेल पेमेंट्स बँकेचे 11.5 कोटी यूझर्स आहेत
एअरटेल पेमेंट्स बँक ही देशातील सर्वात वेगाने वाढणारी डिजिटल बँक आहे. त्याच्या यूझर्सची संख्या 11.5 कोटी आहे. सप्टेंबर 2021 च्या तिमाहीत बँक नफ्यात आली होती.

एअरटेल पेमेंट्स बँकेने मानले RBI चे आभार
एअरटेल पेमेंट्स बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनुव्रत बिस्वास म्हणाले की,”शेड्युल्ड बँकेचा दर्जा दिल्याबद्दल आम्ही रिझर्व्ह बँकेचे आभारी आहोत.”

अलीकडे पेटीएम पेमेंट्स बँकेलाही मिळाला आहे शेड्युल्ड बँकेचा दर्जा
अलीकडेच रिझर्व्ह बँकेने पेटीएम पेमेंट्स बँक लि. लाँच केली आहे. म्हणजेच, PPBL (Paytm Payments Bank Ltd) ला शेड्यूल पेमेंट्स बँकेचा दर्जा देण्यात आला. हा निर्णय RBI कायदा 1934 अंतर्गत घेण्यात आला आहे. RBI ने सप्टेंबरमध्येच हा निर्णय घेतला होता आणि त्यानंतर ऑक्टोबरमध्ये त्याची अधिसूचना जारी करण्यात आली होती. पेटीएम पेमेंट्स बँकेने 9 डिसेंबर 2021 रोजी याची घोषणा केली. RBI च्या या निर्णयानंतर पेटीएमची मूळ कंपनी वन97 कम्युनिकेशन्सचे शेअर्स 6 टक्क्यांनी वाढले होते.

बूस्टर डोस म्हणून कोणती लस दिली जाणार? यावर केंद्र सरकारने काय उत्तर दिले जाणून घ्या

नवी दिल्ली । सध्या दिली जात असलेली लसच बूस्टर डोस किंवा प्रीकॉशनरी डोस म्हणून वापरली जाईल, असे केंद्र सरकारने बुधवारी सांगितले. केंद्राने म्हटले आहे की, सध्या लसींच्या मिश्रणाला परवानगी दिली जाणार नाही. याचा अर्थ असा की, ज्यांना पहिला आणि दुसरा डोस म्हणून Covishield देण्यात आले आहे त्यांना प्रीकॉशन डोससाठी तीच लस दिली जाईल. त्याचप्रमाणे, ज्यांना पहिले दोन डोस म्हणून Covaxin देण्यात आले आहे, त्यांना तिसरा डोस म्हणून Covaxin च दिला जाईल. नीती आयोगाचे सदस्य डॉ व्ही के पॉल यांनी आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

25 डिसेंबर रोजी देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्री-कॅझिटिव्ह डोस देण्याची घोषणा केली होती. पंतप्रधान मोदी म्हणाले होते की,”10 जानेवारीपासून डॉक्टर, आरोग्य आणि फ्रंट लाईन वर्कर्सना सल्ल्यानुसार, 60 वर्षांवरील लोक इतर गंभीर आजारांनी ग्रस्त आहेत अशांना लसींचा प्रीकॉशनरी डोस सुरू केला जाईल.

भारतात वेगाने पसरणाऱ्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर, ओमिक्रॉन व्हेरियंटसाठी बूस्टर डोस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच 15 ते 18 वयोगटातील तरुणांचेही लसीकरण सुरू झाले आहे. भारतात आतापर्यंत ‘ओमिक्रॉन’ या कोरोना विषाणूचे नवीन स्वरूपाचे 2,135 रुग्ण आढळले आहेत, त्यापैकी 828 लोकं संसर्गमुक्त झाले आहेत किंवा इतर ठिकाणी स्थलांतरित झाले आहेत. ही प्रकरणे 24 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये नोंदवली गेली आहेत.

आरोग्य मंत्रालयाने बुधवारी सांगितले की, महाराष्ट्रात सर्वाधिक 653 प्रकरणे आहेत, त्यानंतर दिल्लीत 464, केरळ 185, राजस्थान 174, गुजरात 154 आणि तामिळनाडू 121 आहेत.

मंत्रालयाने सकाळी आठ वाजता जारी केलेल्या आकडेवारीनुसार, भारतात एका दिवसात कोविड-19 चे 58,097 नवीन रुग्ण आढळल्यानंतर, देशातील संक्रमितांची संख्या 3,50,18,358 झाली आहे. तब्बल 199 दिवसांनंतर रोजची इतकी प्रकरणे समोर आली आहेत. यापूर्वी 20 जून 2021 रोजी 58,419 नवीन प्रकरणे नोंदवली गेली होती. देशात आणखी 534 बाधितांचा मृत्यू झाल्यानंतर मृतांची संख्या 4,82,551 वर पोहोचली आहे. त्याच वेळी, उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या सुमारे 81 दिवसांनंतर दोन लाखांच्या पुढे गेली आहे. सध्या देशात 2,14,004 लोकं कोरोना विषाणू संसर्गावर उपचार घेत आहेत, जे एकूण संसर्गाच्या 0.61 टक्के आहे. गेल्या 24 तासांत कोविड-19 वर उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या संख्येत 42,174 ची वाढ नोंदवण्यात आली आहे.

राज्यातील महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत राहणार बंद; उदय सामंतांची मोठी घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात कोरोना विषाणू संसर्गात वाढ होत असल्यामुळे मुंबईतील शाळा 31 जानेवारी पर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यानंतर राज्यातील महाविद्यालये बंद ठेवण्याबाबत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी नुकतीच घोषणा केली आहे. “राज्यातील सर्व अकृषी महाविद्यालये आणि तंत्रशिक्षण संस्था दि. 15 फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार आहेत. आहे. तसेच, सर्व विद्यापीठांनी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्णय देखील घेण्यात आला असल्याची माहिती सामंत यांनी दिली.

राज्यातील महाविद्यालया संदर्भात मंगळवारी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, सर्व कुलगुरू यांच्या समवेत बैठक घेण्यात आली होती. या बैठकीनंतर मंत्री सामंत यांनी आज निर्णय जाहीर केला. मंत्री सामंत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, तंत्रनिकेतन, विद्यापीठांशी संलग्नित महाविद्यालयांची परीक्षा हि ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे. विजेची अनुपलब्धता, नेटवर्क कनेक्टिव्हिटीमुळे, विद्यार्थ्यांच्या कुटुंबात किंवा विद्यार्थी कोरोनाबाधित असतील तर अशा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, याची दक्षता सर्व विद्यापीठांनी घेतली पाहिजे.

सध्या राज्यातील अनेक महाविद्यालयांच्या परीक्षा सुरु आहेत. तसेच अभ्यासक्रम आणि महाविद्यालयेही सुरु आहेत. कोरोनाचे प्रमाण जास्त वाढले तर या ठिकाणी महाविद्यालये ठेवण्यासंदर्भात नेमक्या काय उपाययोजना करता येतील याबाबतही कालच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यानुसार आता सर्व विद्यापीठे, महाविद्यालयांशी निगडीक वसतीगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना पूर्वसूचना देऊन आणि निश्चित कालावधी देऊन वसतीगृह देखील बंद करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी सर्व विद्यापीठांनी करावी, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.

औरंगाबाद मनसेचे नव्या नेतृत्वात पहिलेच आंदोलन; कोरोना नियमांना मात्र हरताळ

mns

औरंगाबाद – शहरातील अनेक भागातील नागरिक गुंठेवारीच्या मालमत्तांमध्ये राहतात. त्यांच्या करात मनपाने अन्यायकारकवाढ केली आहे. मुंबईत 500 चौरस फूट मालमत्ता असणाऱ्या नागरिकांना मालमत्ता करात माफी देण्यात आली, मग औरंगाबादकरांवर अन्याय का, असा सवाल करत औरंगाबादमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी आज मानपासमोर जोरदार आंदोलन केले. मागील महिन्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे औरंगाबादमध्ये येऊन गेले. त्यावेळी पक्षाच्या कार्यकारिणीत मोठे बदल करण्यात आले. आता नव्या नेतृत्वात औरंगाबाद मनसेचे हे पहिलेच आंदोलन आहे.

सोमवारी औरंगाबादेत पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. यावेळी सुभाष देसाई यांनी हळू हळू राज्यात सर्वत्रच 500 चौरस फुटांपर्यंतच्या मालमत्तांचा कर माफ होईल, असे सांगितले. मात्र पालकमंत्र्यांची केवळ तोंडी पोकळ आश्वासनं आम्हाला नको आहेत. ठोस निर्णय घ्यावा लागेल, असा आक्रमक पवित्रा मनसेने घेतला आहे.

 कोरोना नियमांना हरताळ – यावेळी आंदोलन करताना मनसेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना कोरोनाचा विसर पडल्याचे दिसून आले. एकीकडे सर्वसामान्यांनी नियम न पाळल्यास दंड आकारण्याचे आदेश मनपा प्रशासकांनी दिले आहेत. त्याच मनपाच्या समोर आज मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कोरोना नियम धाब्यावर बसवत आंदोलन केले. आता यावर प्रशासन किती दंड आकारणार असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक उपस्थित करत आहेत.

दोन-चार पादरेपावटे फुसफुसले की आग लागत नाही, मुख्यमंत्र्यांवरील टिकेवरून राऊतांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आपल्या आजारपणामुळे बैठका, कार्यक्रमांना उपस्थिती लावू शकत नाहीत. नुकत्याच झालेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही त्यांनी अनुपस्थिती लावली होती. त्यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपमधील इतर नेत्यांनी थेट मुख्यमंत्री पदाचा चार्ज दुसऱ्यांना देण्याबाबत सल्ले दिले. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. “दोन-चार पादरेपावटे फुसफुसले म्हणजे सरकारला आग लागत नाही, अशा शब्दात राऊत यांनी हल्लाबोल केला आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी गोव्यातील महाविकास आघाडीच्या प्रयोगाबाबत महत्वाचे वक्तव्य केले. गोव्यात महाविकास आघाडीचा प्रयोग व्हावा, ही राहुल आणि प्रियांका यांची इच्छा आहे. राज्यातील आघाडी सरकारच्या टिकण्याबाबत आणि उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदावरून विरोधकांच्याकडून केल्या जात असलेल्या टीकेचा राऊतांनी चांगलाच समाचार घेतला. सध्या विरोधी पक्षातील दोन चार पादरे पावटे फुसफूसत आहेत. त्यांच्या फुसफूसल्याने महाविकास आघाडी सरकारला आग लागत नाही.

उद्धव ठाकरे यांची प्रकृती उत्तम आहे. कालही त्यांनी शिवसेनेच्या विभागप्रमुख आणि शाखाप्रमुखांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. पंतप्रधानांशीही झूमद्वारे त्याच्याकडून संवाद साधला जातो. फायलींवर सह्या होत आहेत. प्रशासनाला सूचना दिल्या जात आहे. राज्यावर लक्ष आहे. त्यामुळे कोण काय बोलत आहे आणि काय करत आहे याकडे फार लक्ष देण्याची गरज नाही, अशा टोलाही यावेळी राऊतांनी लगावला.

रिक्षाचालकांची गुंडगिरी ! प्रवाशाला बेदम मारहाण, भर रस्त्यात राडा

औरंगाबाद – प्रवाशी शुल्कावरुन वाद होऊन काही रिक्षाचालकांनी एकत्र एका प्रवाशाला बेदम मारहाण केल्याची घटना शहरातील मध्यवर्ती बस स्थानकासमोर घडली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात एसटीचा संप सुरुर आहे. अशातच एसटी बसची संख्या कमी असल्यानं अनेकदा प्रवाशांना रिक्षा शिवाय दुसरा पर्याय उरत नाही. याच गैरसोयीचा फायदा उचलत काही रिक्षा चालकांनी मनमानी भाडेवाढ करत आपली मुजोरी सुरु केली आहे.

लॉकडाऊन व कोरोनामुळे आधीच महागाईन सर्वसामान्य माणूस बेजार झाला आहे. त्यात रिक्षा प्रवास परवडत नसतानाही पर्याय नसल्यान आता लोकांना अधिकची रक्कम मोजावी लागते आहे. दरम्यान, एका प्रवाशानं वाढीव प्रवासी शुल्कावरुन आवाज उठवल्यानं इतर रिक्षा चालकांनी त्यांच्यासोबत आधी वाद घातला. त्यानंतर ही बाचाबाची इतकी वाढली की रिक्षाचालकांनी अखेर गुंडगिरी करत प्रवाशालाच मारहाण केली.

जवळपास चार ते पाच रिक्षा चालकांनी एकत्र येत प्रवाशाला बेदम मारहाण केली आहे. लाथा बुक्क्यांनी प्रवाशाला मारहाण केल्यानं यात एक प्रवासी जखमी झाला आहे. दरम्यान, बाचाबाची आणि वाद यामुळे मध्यवर्ती बस स्थानक परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मिळू शकेल आनंदाची बातमी, त्यासाठीची सरकारची योजना काय आहे जाणून घ्या

PM Kisan

नवी दिल्ली । कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी सरकार यावर्षीच्या अर्थसंकल्पात कृषी कर्जाचे लक्ष्य 18 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवू शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प 2022-2023 होणार आहे आणि त्यामध्ये सरकार कृषी क्षेत्राला कर्ज देण्याचे लक्ष्य 18 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवू शकते.

चालू आर्थिक वर्षात सरकारने कृषी कर्जासाठी 16.5 लाख कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवले आहे आणि पुढील वर्षीच्या अर्थसंकल्पात ते 1.5 लाख कोटी रुपयांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने दरवर्षी कृषी कर्जाचे उद्दिष्ट वाढवले ​​असून यावर्षीही ते वाढविण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. 2022-23 या आर्थिक वर्षासाठी सरकारने कृषी कर्जाचे लक्ष्य 18.5 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

सरकार दरवर्षी कृषी कर्जाचे उद्दिष्ट ठरवते
मात्र, जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात अंतिम आकडा निश्चित होईल. सरकार वार्षिक कृषी कर्जाचे उद्दिष्ट ठरवते. त्यामध्ये पीक कर्जाचे लक्ष्य देखील समाविष्ट आहे जे बँक शेतकऱ्यांना पिकांसाठी देते. गेल्या काही वर्षांपासून फार्म क्रेडिटने सातत्याने आपले टार्गेट ओलांडले आहे.

मागील आर्थिक वर्षांत लक्ष्य कसे होते ते जाणून घ्या
2017-18 मध्ये कृषी कर्जाचे लक्ष्य 10 लाख कोटी रुपये होते मात्र एकूण खर्च 11.68 लाख कोटी रुपये होता. त्याचप्रमाणे, 9 लाख कोटी रुपयांच्या निश्चित उद्दिष्टाच्या तुलनेत 2016-17 या आर्थिक वर्षात 10.77 लाख कोटी रुपयांचे पीक कर्ज वितरित करण्यात आले. साधारणपणे, शेती कर्जावर 9% व्याजदर असतो. मात्र, सरकार शेतकऱ्यांना अल्प मुदतीच्या कर्जावर व्याजात सवलत देते. सरकार 3 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर 2% व्याज अनुदान देते. म्हणजेच 7% व्याजाने कृषी कर्ज मिळते.