Thursday, January 1, 2026
Home Blog Page 2992

2021 मध्ये भारतीयांकडून सोन्यामध्ये प्रचंड खरेदी

नवी दिल्ली । भारताने 2021 मध्ये 1,050 टन सोने आयात करून 10 वर्षांचा आपला जुना विक्रम मोडला आहे. भारताने सोने आयातीवर एकूण $55.7 अब्ज खर्च केले. मागील वर्षीच्या तुलनेत हा आकडा दुप्पट आहे. 2020 मध्ये भारताने 23 अब्ज डॉलरपेक्षा कमी किमतीचे सोने आयात केले.

भारत हा जगातील सर्वात मोठा सोन्याचा ग्राहक आहे. 2021 मध्ये या मौल्यवान धातूच्या आयातीचा पूर्वीचा विक्रमही मोडला. यापूर्वी 2011 मध्ये 53.9 अब्ज डॉलरचे सोने आयात करण्यात आले होते. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने एका सरकारी अधिकाऱ्याच्या हवाल्याने म्हटले आहे की,” 2020 मध्ये 430 टन सोने आयात करण्यात आले होते, तर 2021 मध्ये त्याचे प्रमाण दुपटीने वाढून 1050 टनांवर पोहोचले आहे.”

2021 मध्ये भारतीयांनी सोन्याची प्रचंड खरेदी केली
कोरोना महामारीमुळे 2020 मध्ये सोन्याच्या देशांतर्गत मागणीत मोठी घट झाली होती. कोरोनाच्या निर्बंधांमुळे लग्न पुढे ढकलणे हे त्यामागील कारण होते. यामुळे 2020 मध्ये भारताने सोन्याच्या आयातीवर फक्त $22 अब्ज खर्च केले. कोरोनाव्हायरस महामारीमुळे 2020 मध्ये अनेक लग्ने पुढे ढकलण्यात आल्याने गेल्या वर्षी मागणी प्रचंड होती. मार्च 2020 मध्ये भारताने अतिशय कडक लॉकडाऊन लागू केले होते. त्यामुळे सर्वसामान्यांचे जनजीवनही ठप्प झाले होते.

मोठ्या संख्येने विवाह पुढे ढकलण्यात आले, जे भारतात सोने खरेदीचे प्रमुख कारण मानले जाते. याशिवाय अक्षय्य तृतीया सारख्या सणाला लोकं सोन्याची जोरदार खरेदी करतात, मत्र लॉकडाऊनमुळे हा सणही फारच कमी प्रमाणात साजरा झाला आणि ज्यामुळे मागणी देखील खूपच कमी राहिली.

किंमती घसरल्याने मागणीही वाढली
ऑगस्ट 2020 मध्ये, भारतीय बाजारात सोन्याची किंमत 56,191 रुपये प्रति दहा ग्रॅमवर ​​पोहोचली होती, जो एक नवीन विक्रम होता. मात्र मार्च 2021 मध्ये ही किंमत 43,320 रुपयांवर परत आली. त्याच महिन्यात 177 टन सोने आयात करण्यात आले. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये 86 टन सोने आयात करण्यात आले होते, जे डिसेंबर 2020 मधील 84 टनांपेक्षा किंचित जास्त होते.

वर्ल्ड गोल्ड काउंसिलच्या म्हणण्यानुसार, गेल्या वर्षीच्या पहिल्या तिमाहीत जागतिक बाजारपेठेत सोन्याची मागणी वाढली होती, मात्र दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीत ती कमी झाली. दुसऱ्या तिमाहीत ही मागणी 10 टक्के आणि तिसऱ्या तिमाहीत 7 टक्के होती. तिमाहीत. ऑक्टोबरमध्ये जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार तिसऱ्या तिमाहीत 831 टन सोन्याची खरेदी झाली.

न्यायालयाच्या निर्देशानुसार नियमांचे पालन करत राज्यातील पहिली बैलगाडी शर्यत संपन्न

सांगली । प्रदिर्घ सात वर्षाच्या कालावधीनंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार व कोरोनाच्या नियमांचे पालन करत कवठेमहांकाळ तालुक्यातील नांगोळे येथे राज्यातील पहिल्या बैलगाडी शर्यतीचा धुरळा उडाला. नांगोळी येथे आयोजित केलेल्या बैलगाडी शर्यतीत कोल्हापूरच्या संदीप पाटील यांच्या बैलगाडीने प्रथम क्रमांक पटकावला. कवठेमहांकाळ तालुक्यातील नांगोळे येथील माळरानावर हजारो शौकिनांच्या उपस्थितीत बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते.

सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर व कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील बैलगाडी शर्यतीचे हजारो शौकिनांच्या शिट्या व टाळ्यांच्या गजरात तसेच जय शिवाजी जय भवानीच्या निनादात राज्यात पहिल्याच मानाच्या झालेल्या शर्यती संपन्न झाल्या. जनरल बैलगाडी शर्यतीत कोल्हापूरच्या संदीप पाटील यांनी प्रथम क्रमांक मिळविला. त्याना रोख 1 लाख रूपये बक्षिस देण्यात आले. तर दुसरा क्रमांक डफळापूरच्या अवि माने यांनी मिळविला.70 हजार रूपये रोख बक्षिस मिळविले तर 50 हजार रुपयांचे तिसर्या क्रमांकांचे बक्षिस कुलोठीच्या बाळू नाईक यांच्या बैलगाडीने मिळविला. ब गटामध्ये सतीश बिद्री,बाळू खामकर,अक्षय भोसले यांच्या बैलगाडीने अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला.

आदत अ गटात सचिन सर्वदे – जाखापूर यांनी प्रथम तर श्रीकांत हजारे- कुकटोळी यांनी द्वितीय तर संतोष गडदे- अंकले यांनी तृतिय क्रमांक पटकावला. आदत गटात बाळू डोंगरे-मिरज,राजू पाटील- कोंगनोळी व ज्ञानू देवकाते- कुलोती यांच्या बैलगाडीला अनुक्रमे प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांक मिळाला. या बैलगाडी शर्यतीसाठी सर्व गटासाठी एक कि.मी.चे अंतर ठेवण्यात आले होते.बैलगाडी गाडीवान व बैलांची वैद्यकीय तपासणी करून शर्यती सोडण्यात येत होत्या.विना लाठी,विना काठी तसेच सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या सर्व अटीचे पालन करण्यात येत होते.

शहरातील शाळा पुन्हा ‘लॉकडाऊन’ ! 

औरंगाबाद – कोरोना व ओम्रीकॉनचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शहरातील पहिली ते नववीच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी हा निर्णय घेतला आहे.

तसेच शहरातील दहावी ते बारावीचे वर्ग सुरळीत सुरू असतील. तर दहावीच्या पुरवणी परीक्षा देखील नियोजित वेळापत्रकानुसार पार पडतील.

आगामी 31 जानेवारीपर्यंत हे आदेश देण्यात आले आहेत. त्यानंतर प्रादुर्भाव लक्षात घेऊन निर्णय घेतला जाईल. सदर निर्णय मनपा प्रशासक अस्तिककुमार पांडेय यांनी घेतला आहे.

‘… तर काँग्रेस सत्तेतून बाहेर पडेल’ – जेष्ठ पत्रकार अशोक वानखेडे

सांगली । राज्यातील काँग्रेस नेते केवळ सत्तेसाठी महा विकास आघाडीमध्ये सामील झाले आहेत मात्र पक्ष श्रेष्ठींच्या नाराजीमुळे काँग्रेस सत्तेतून बाहेर पडेल असे संकेत ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे यांनी दिले. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांचे पटत नाही महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे वेगळी दिशा घेतात पृथ्वीराज चव्हाण कराडमध्ये बसतात आत्तापर्यंत शरद पवार काँग्रेस चालवत होते. तसे पाहिले तर पवारांना काँग्रेसने आंदण दिली होती.

येत्या काही महिन्यात अनेक राज्यातील विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड, पंजाब या राज्यांचा समावेश आहे. उत्तर प्रदेश, गोवा आणि उत्तराखंडमध्ये सत्ता टिकवणे जरुरीचे आहे. उत्तर प्रदेश हे सर्वात मोठे राज्य असल्याने तेथील सत्ता महत्त्वाची ठरणारी असेल. उत्तर प्रदेशच्या निकालानंतर 2024 पर्यंत देशाची दिशा आणि दशा तय होईल. त्यासोबत महाराष्ट्राचे भवितव्य निश्चित होईल. बहुतांशी राज्यात भाजप सत्तेत आल्यास मार्च 2022 नंतर महाराष्ट्रात सत्ता बदल होण्याचे संकेत आहेत.

महाराष्ट्रातील विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक लांबली गेल्यामुळे सोनिया गांधी नाराज झाल्या. विधानसभेत काँग्रेसचा अध्यक्ष होतो म्हणून आवाजी मतदानाने निवड का? असा प्रश्न निर्माण झाला. सरकारमध्ये मेजॉरिटी नसली तर अध्यक्ष कसा निवडून आणायचा. आणि मेजॉरिटी नसली तर सरकारमध्ये काय थांबायचे असा सवाल वरिष्टांनी उपस्थित केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्षांपासून सर्व नेत्यांचा हाय कमांडपुढे कस लागला असल्याचे ज्येष्ठ पत्रकार वानखेडे यांनी स्पष्ट केले.

पडळकर बंधूंवर फसवणुकीसह अट्रोसिटीचा गुन्हा दाखल

सांगली । आटपाडी तालुक्यातील झरे इथल्या शेतकऱ्याची जमीन बनावट खरेदी पत्र करून, ठरलेला व्यवहार प्रमाणे पैसे न देता ४ लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला. या प्रकरणी महादेव अण्णा वाघमारे (वय ७७ रा. झरे) यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी भाजपचे आमदार गोपीचंद पुंडलिक पडळकर यांच्यासह त्यांचे बंधू ब्रह्मदेव पुंडलिक पडळकर यांच्यावर फसवणुकीसह ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. सदरची घटना हि २१ मार्च २०११ ते आज अखेर घडली.

याबाबत वाघमारे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे, आटपाडी तालुक्यातील झरे येथे त्यांच्या मालकीची गट नंबर ६२४, ५५६ आणि ५५७ हि जमीन आहे. सदरची जमीन हि खरेदी करण्यासाठी संशयित ब्रह्मदेव पडळकर आणि गोपीचंद पडळकर यांनी समर्थता दर्शवली. वाघमारे आणि पडळकर यांच्यामध्ये ६ लाख २० हजार प्रमाणे जमिनीचा व्यवहार ठरला. २१ मार्च ते २०११ ते आज अखेर जमीन खरेदी पत्राचे दस्त करून घेतला होता. त्यावेळी त्यांची बनावट कागदपत्रे तयार करून १ लाख ६० हजार रुपये दिले व राहिलेली उर्वरित रक्कम नंतर देण्याचे ठरले होते.

अनेक वर्षे उलटली तरी अद्यापही ठरलेल्या व्यवहाराप्रमाणे उर्वरित ४ लाख ६० हजार रुपयांची रक्कम पडळकर बंधूंनी अद्याप दिली नाही. वारंवार पैसे मागूनही मिळत नसल्याने अखेर आपली फसवणूक झाल्याचे वाघमारे यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह त्यांचे बंधू ब्रम्हदेव पडळकर यांच्यावर फसवणुकीसह अनुसूचित जाती जमाती कायद्यांतर्गत ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे.

ठाकरे सरकार हे महाराष्ट्रातच्या इतिहासातील पळपुटे, खंडणीखोर”; फडणवीसांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील विविध भरती परीक्षांतील गैरव्यवहारावरून भाजपकडून राज्य सरकावर टीका केली जात आहे. दरम्यान आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. “महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार हे महाराष्ट्रातच्या इतिहासातील सगळ्यात पळपुटे, डरपोक, खंडणीखोर आणि भ्रष्टाचारी सरकार आहे. खादी टोळी एकत्र येऊन राज्य चालवत असल्याचे आज आपल्याला दिसत आहे, अशा अशब्दात फडणवीस यांनी टीका करीत हल्लाबोल केला.

मुंबईत आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजप युवा मोर्चाची बैठक पार पडली. यावेळी फडणवीस म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारमध्ये खंडणीखोरीची स्पर्धा लागली आहे. या सरकारमधील अनेक मंत्र्यांना, नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना आपले सरकार राहणार की जाणार असे वाटत आहे. त्यामुळे हे मंत्री, नेते सरकार जाण्याअगोदर जेवढा भ्रष्टाचार करता येईल तितका करत आहेत.

या ठाकरे सरकारच्या अनेक निर्णयामुळे राज्यात नोकरशाही भ्रष्ट होत असल्याची चिंता आहे. जनतेने आघाडी सरकारमधील तीन पक्षांवर विश्वास न दाखवता भाजपावर दाखवला. त्यामुळे भाजपचे 70 टक्के उमेदवार निवडून आले. त्यानंतर विश्वासघात करुन पुन्हा हे सरकार सत्तेवर आले. ज्या प्रकारचे परीक्षा घोटाळे बाहेर येत आहेत त्यातून युवा पिढी बरबाद करण्याचे काम सुरु असल्याची टीका यावेळी फडणवीस यांनी केली.

Cryptocurrency Price : गेल्या 24 तासांत ‘या’ तीन क्रिप्टोकरन्सी 500% वाढल्या

Cryptocurrency

नवी दिल्ली । गेल्या 24 तासांत क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये 0.79% ची वाढ झाली आहे. मात्र, मोठ्या क्रिप्टोकरन्सीपैकी, फक्त Ethereum आणि Cardano 1 टक्क्यांहून जास्तीने वाढले आहेत. तर उर्वरित क्रिप्टोकरन्सींनी किंचित नफा किंवा किंचित घट नोंदवला आहे.

मंगळवार, 5 जानेवारी 2022 रोजी, (IST सकाळी 10:15 पर्यंत) कालपर्यंत क्रिप्टोकरन्सी मार्केटकॅप $223 ट्रिलियन पर्यंत वाढली आहे. काल $221 ट्रिलियन होते. यामध्ये Bitcoin चे वर्चस्व किंचित कमी होऊन 39.4% झाले आहे आणि Ethereum चे मार्केटमध्ये 20.3% वर्चस्व आहे.

कोणत्या करन्सीमध्ये किती वाढ झाली आणि किती घसरली जाणून घ्या
बिटकॉइन 0.41% च्या वाढीसह $46,395.08 वर ट्रेड करत होते, त्यामुळे त्याची मार्केटकॅप $879 अब्ज झाली आहे. बिटकॉइनच्या किमतींनी आजचा नीचांक $45,752.46 आणि गेल्या 24 तासांत $47,406.55 चा उच्चांक गाठला आहे. Ethereum $3,810.39 वर 1.84% ची उडी घेऊन ट्रेडिंग दिसले. Ethereum ने गेल्या 24 तासांत $3,731.79 चा नीचांक आणि $3,876.79 चा उच्चांक केला आहे. त्याची मार्केट कॅप $453 अब्ज झाली आहे.

Binance Coin 0.72% ने वाढले आहे. ही बातमी लिहिताना ते $512.37 वर ट्रेड करत होते. Tether टोकन गेल्या अनेक दिवसांपासून स्थिर असून ते फक्त $1 वर ट्रेड करत आहे. सोलाना 1.18% वाढला आहे आणि $168.93 वर व्याट्रेड पार करत आहे.

XRP आणि Cardano
लोकप्रिय करन्सी XRP 0.31% वाढली आणि $0.8305 वर ट्रेडिंग नोंदवले गेले. Cardano $1.33 वर ट्रेड करत होता, तर Shiba Inu 1.70% वर स्थिर आहे आणि $0.00003267 वर ट्रेड नोंदवला गेला.

आजची टॉप गेनर क्रिप्टोकरन्सी
जर आपण गेल्या 24 तासांमध्ये सर्वात वेगाने वाढणाऱ्या करन्सी /टोकन्सबद्दल बोललो तर, Shuna Inuverse (SHUNAV) मध्ये 845.68% वाढ झाली आहे. यानंतर, Green Chart (GREEN) मध्ये 503.56% ची वाढ नोंदवली गेली आहे. या दोघांच्या खालोखाल Shiba Dollars (SHIBADOLLARS) आहेत, ज्यात गेल्या 24 तासांत 416.43% ची वाढ झाली आहे.

लॉकडाऊनबाबत राजेश टोपेंचे मोठे विधान ; म्हणाले…

Rajesh Tope

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आज टास्क फोर्सची बैठक पार पडली. या बैठकीस राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनीही उपस्थिती लावली होती. राज्यात लॉकडाऊन लावण्याबाबत डॉ. टोपे यांनी मोठे विधान केले आहे. “आज शंभर टक्के लॉकडाऊन लावण्याची गरज नाही. पण नॉन इसेन्शियल अॅक्टिव्हिटी तपासण्यात येणारे आहे. कोरोनाचा व्हायरस रोखण्यासाठी गर्दी थांबवणे गरजेचे आहे. निर्बंधांच्या बाबतीत मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेतील,” असे डॉ. टोपे यांनी म्हंटले आहे.

आरोग्यमंत्री डॉ. टोपे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, आज पार पडलेल्या कोरोनाच्या आढावा बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. सुरुवातीला आरटीपीसीआर चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, आता आरटीपीसीआर चाचणीबरोबर अँटिजेन टेस्टवर आपण भर दिला जाणार आहे. राज्यात अजून मोठ्या प्रमाणात अँटिजेनच्या टेस्ट वाढवाव्या लागणार आहेत.

राज्यात कोरोना चाचण्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला असून रुग्णसंख्या 30 हजारापर्यंत जाऊ शकेल. त्यामुळे दरदिवशी दीड ते पावणे दोन लाख आरटीपीसीआर दरदिवशी करण्यात येणार आहे. त्यामुळे ताण पडणार आहे. अँटिजेनवर पॉझिटिव्ह आल्यास आरटीपीआर होणार नाही. किऑस्क द्वारे अँटिजेन कराव्यात, अशा सूचनाही संबंधितांना दिल्याची माहिती यावेळी टोपे यांनी दिली.

क्वॉरंटाईन कालावधी आता सात दिवसांवर

राज्यात अजूनही काहींनी दुसरा डोस घेतलेला नाही. त्यामुळे कोरोना रुग आढळल्यास त्यांना केन्यात येणाऱ्या क्वॉरंटाईनचा कालावधी वाढविण्यात आलेला आहे. त्यांना आता 7 दिवसांपर्यंत क्वॉरंटाईन केले जाणार आहे. ज्यांनी लस घेतली नाही त्यांना ज्या भाषेत समजत असेल त्यांना त्या भाषेत समजावून त्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे. तसा निर्णय घेण्यात आला असल्याचे डॉ. टोपे यांनी सांगितले.

आता अशाप्रकारे बदला आपल्या आधार कार्डमधील फोटो

Aadhaar Card

नवी दिल्ली । भारतातील कोणत्याही नागरिकासाठी स्वत:ची ओळख पटवण्यासाठी आधार एक महत्त्वाचे डॉक्युमेंट बनले आहे. केंद्र सरकारकडून प्रत्येक भारतीय नागरिकाला 12 अंकी युनिक आयडेंटिटी नंबर जारी केला जातो. ज्यामध्ये व्यक्तीचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर, फोटोसह त्याची बायोमेट्रिक इन्फर्मेशनही असते.

जर तुम्हाला आधार वरील फोटो आवडला नसेल तर तुम्ही तो बदलून घेऊ शकता. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) कडे आधार नंबर जारी करण्याची आणि मॅनेज करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

UIDAI फक्त नाव, मोबाईल नंबर, जन्मतारीख, ई-मेल पत्ताऍड्रेस आणि फोटो बदलण्यासाठी ऑफलाइन सुविधा पुरवते. ते ऑनलाइन आणि पोस्टाद्वारे करता येत नाही. सोप्या शब्दात समजून घ्यायचे झाले तर तुम्हांला फोटोमध्ये बदल करण्यासाठी, तुम्हाला तुमच्या जवळच्या एनरोलमेंट सेंटरवर जावे लागेल किंवा तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन देखील हे काम करू शकता.

आधार कार्डमधील फोटो बदलण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे
1. पहिले तुम्हाला UIDAI ची वेबसाइट  http://uidai.gov.in वर लॉग इन करावे लागेल आणि आधार एनरोलमेंट फॉर्म डाउनलोड करावा लागेल.
2. हा आधार एनरोलमेंट फॉर्म भरा आणि जवळच्या आधार एनरोलमेंट सेंटरवर सबमिट करा.
3. आता कर्मचारी तुमचा बायोमेट्रिक डिटेल्स आधार एनरोलमेंट सेंटरवर घेईल.
4. आता आधार एनरोलमेंट सेंटरचा कर्मचारी तुमचा फोटो घेईल.
5. आता आधार एनरोलमेंट सेंटरचा कर्मचारी 25 रुपये + GST ​​फी म्हणून घेऊन तुमच्या आधार कार्डमधील फोटो अपडेट करेल.
6. आधार एनरोलमेंट सेंटरचा कर्मचारी तुम्हाला URN सोबत एक स्लिप देखील देईल.
7. तुमचा आधार कार्ड फोटो बदलला आहे की नाही हे तपासण्यासाठी तुम्ही या URN चा वापर करू शकता.
8. आधार कार्ड फोटो अपडेट केल्यानंतर, नवीन फोटोसह अपडेट केलेले आधार कार्ड UIDAI वेबसाइटवरून डाउनलोड केले जाऊ शकते.

Stock Market : सेन्सेक्सने पुन्हा ओलांडला 60,000 चा टप्पा ओलांडला, गेल्या तीन दिवसांत झाली मोठी रिकव्हरी

Recession

नवी दिल्ली । आज, बुधवारीही बाजारात ग्रीन मार्कने ट्रेड होत आहेत. या आठवड्यात सलग तिसऱ्या दिवशी बाजाराने मोठी रिकव्हरी दाखवली आहे. आज सेन्सेक्सने पुन्हा एकदा 60,000 चा टप्पा पार केला. आज दुपारी सुमारे 270 अंकांच्या वाढीसह सेन्सेक्स 60,130 च्या आसपास ट्रेड करत आहे. त्याच वेळी, निफ्टी 80 अंकांच्या वाढीसह 17,880 च्या जवळ दिसत आहे.

बाजारात तेजी दिसून येत आहे. तेजीची सीमा ओलांडून बाजार सात आठवड्यांच्या उच्चांकाकडे पाहत आहे. निफ्टी 17 हजार 850 च्या पुढे दिसत आहे. बाजाराला बँकिंग आणि फायनान्सचा भक्कम सपोर्ट मिळत आहे. सेन्सेक्सही 60 हजारांच्या पुढे दिसत आहे. निफ्टी बँकेत 700 अंकांची जबरदस्त ताकद आहे. पण मिडकॅपमध्ये फ्लॅट ट्रेडिंग होत आहे.

सोन्याची किंमत
सोन्याच्या दरात किरकोळ वाढ झाली आहे. COMEX वर सोने $1800 च्या वर ट्रेड करत आहे. मंगळवारी सोने 1800 डॉलरच्या खाली गेले. USFED मिनट्स रिलीज होण्यापूर्वी त्याच्या किंमती चढल्या आहेत. आज USFED बैठकीचे मिनट्स प्रसिद्ध केले जाईल.

यूएस बाजार
काल Dow 215 अंकांनी वाढून विक्रमी पातळीवर बंद झाला होता. त्याच वेळी, S&P 500 नवीन रेकॉर्ड पातळीला स्पर्श केल्यानंतर फ्लॅट बंद झाला. टेक स्टॉकमधील दबावामुळे काल Nasdaq 210 अंकांनी घसरला होता. बॉन्ड यील्डमध्ये वाढ झाल्यामुळे टेक स्टॉक्समध्ये विक्री झाली. बॉन्ड यील्ड वाढल्याने फायनान्शिअल शेअर्समध्ये वाढ झाली. काल फोर्ड मोटरच्या शेअर्समध्ये 11 टक्क्यांनी वाढ झाली. फोर्डने ईव्ही ट्रकचे प्रोडक्शन दुप्पट करण्याची घोषणा केली आहे. काल विमान आणि प्रवासाशी संबंधित शेअर्समध्येही खरेदी झाली.

विमान वाहतूक क्षेत्र फोकसमध्ये
मुंबई आणि दिल्ली ते कोलकाता विमान प्रवासात काहीसा दिलासा आहे. आठवड्यातून दोन ऐवजी तीन दिवस उड्डाणे मंजूर करण्यात आली आहेत. सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी उड्डाणे असतील.

भारत फोर्ज फोकसमध्ये
टॉर्क मोटर्स जानेवारीच्या अखेरीस पहिले इलेक्ट्रिक वाहन लॉन्च करेल. Kratos या स्वदेशी बनावटीच्या ई-बाईकची किंमत 1.5 लाख रुपये आहे. टॉर्क मोटर्समध्ये भारत फोर्जचा मोठा हिस्सा आहे.

GO FASHION मध्ये फंड एक्शन
SBI MF ने GO FASHION मध्ये 4.61 लाख म्हणजेच 0.85 टक्के हिस्सा खरेदी केला आहे. SBI MF चा कंपनीतील हिस्सा 4.57 टक्क्यांवरून 5.43 टक्क्यांवर पोहोचला आहे. गेलने IL&FS समूहातील कंपन्यांकडून ONGC त्रिपुरामधील 26 टक्के भागभांडवल विकत घेतले आहे.

यूएस मध्ये बॉण्ड यील्ड वाढले
दुसरीकडे, 10 वर्षांचे यूएस बॉण्ड यील्ड 1.65% वर पाहिले जाते. इंट्राडेमध्ये 10 वर्षांचे बॉण्ड यील्ड 1.71% वर पोहोचले आहे. त्याच वेळी, गुंतवणूकदारांना आज फेडच्या मिनट्स ची वाट पाहावी लागेल. ADP आज डिसेंबरसाठी नोकरीचा रिपोर्ट प्रसिद्ध करेल. डिसेंबरमध्ये 3.75 लाख नवीन नोकऱ्यांची भर पडण्याची अपेक्षा आहे.

OPEC+ ने कच्च्या तेलाचे उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतला
OPEC+ ने क्रूड उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. OPEC+ ने कच्च्या तेलाचे उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आधीच ठरलेल्या निर्णयानुसार फेब्रुवारीपासून दररोज 4 लाख बॅरल अधिक उत्पादन करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ब्रेंटची किंमत $80 च्या वर गेली आहे. अमेरिका पुरवठा वाढवण्यासाठी दबाव आणत होती.